Posts

Showing posts from May, 2026

केज तहसीलदारांची धडक कारवाई, एका दिवसात पाच रस्त्याचे अतिक्रमण केले खुले.

Image
येवता:प्रतिनिधी :आप्पाराव सारूक दि.२९ रोजी केज तालुक्यातील लव्हुरी-कोठी या गावचे जुने अनेक वर्षापासून अतिक्रमण करून शिव रस्ते बंद केलेले होते.दोन्ही ग्रावच्या शेतकऱ्यांनी अनेक वेळा रस्ता खुला करण्याची मागणी नियमा प्रमाणे तहसील कार्यालय,केज यांच्या कडे अनेक वर्षा पासुन होत असलेने.केजचे कर्तव्यदक्ष तहसीलदार,शुभम पवार यांनी आपल्या कर्मचारी फौज-फाट्यासह मस्साजोगच्या मंडळ अधिकारी,वैशाली देशमुख, ग्राम महसुल अधिकारी सज्जा,लव्हुरीचे ग्राम महसुल अधिकारी,अशोक चटप,भूमिअलेख कार्यालय,केजचे सुदाम चौरे,केज पोलीसांच्या बंदोबस्तात.शुक्रवारी दि.२९/०५/२०२६ रोजी लव्हुरी-कोठी येथील रस्ता अतिक्रमण कि.मी.खुले केले तसेच लव्हुरी येथील गट नं. ११०व १११ मधील पाच सर्वे नं. मधील अतिक्रमण खुले केले एकाच दिवसात पाच रस्ते खुले केल्याने शेतकऱ्यांचा जिव्हाळाचा प्रश्न सुटलेने कर्तव्यदक्ष मा.तहसीदार साहेब शुभम पवार यांचे शिस्तप्रिय व धाडसी अधिकारी म्हणुन सर्वत्र चर्चा होऊन सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.       आमच्या प्रतिनिधीने कोठी येथील सरपंच संपर्क साधला"रस्त्याचा प्रश्न सोडविला तहसीलदार शुभम...

बेलेश्वरवस्तीवरील महिलांनी लेकराबाळांसह गाठले तहसील कार्यालय; रस्ता मोकळा करून देण्याची मागणी

Image
बेलेश्वरवस्तीवरील महिलांनी लेकराबाळांसह गाठले तहसील कार्यालय; रस्ता मोकळा करून देण्याची मागणी रस्ते अडवणाऱ्यांवर कारवाईच्या घोषणा केवळ कागदावरच; डॉ. गणेश ढवळे यांचा आरोप लिंबागणेश( दि.३० ) : बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी ग्रामपंचायत अंतर्गत २०० लोकसंख्या असलेल्या बेलेश्वरवस्तीवरील महिलांनी लेकराबाळांसह थेट बीड तहसील कार्यालय गाठून शेतरस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली. मुलांच्या शाळा, दवाखाना, बाजारहाट तसेच शेतीच्या कामांसाठी वापरला जाणारा रस्ता काही व्यक्तींनी अडवल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) व शेख युनूस उपस्थित होते. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेत मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत व तलाठी गणपत पोतदार यांना तातडीने स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले. शेतरस्ता बंद झाल्यामुळे पेरणीपूर्व मशागत, खत-बियाणे वाहतूक तसेच दैनंदिन ये-जा यामध्ये अडथळे निर्माण होत असल्याने रस्ता तातडीने मोकळा करून...

जांब (ता. शिरूर) येथे ढाकणे दलित कुटुंबावर अमानुष अत्याचार-ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने तीव्र निषेध- नितीन सोनवणे

Image
जांब (ता. शिरूर) येथे ढाकणे दलित कुटुंबावर अमानुष अत्याचार-ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने तीव्र निषेध- नितीन सोनवणे  बीड | प्रतिनिधी जांब (ता. शिरूर) येथील अनुसूचित जातीच्या ढाकणे कुटुंबावर गावातील काही व्यक्तींनी जातीवाचक शिवीगाळ करत अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिनांक 28 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तुषार माणिक ढाकणे, विजय ढाकणे व संगीता माणिक ढाकणे यांच्यावर हल्ला करण्यात आला. किरकोळ कारणावरून — ढाकणे कुटुंबीयांच्या शेळ्या आरोपींच्या दारासमोर गेल्याच्या कारणावरून — हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तब्बल 9 महिला व 11 पुरुष सहभागी असल्याचा आरोप असून संपूर्ण घटना घरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे रात्री बीट अंमलदारांनी वाद मिटवल्यानंतर दुसऱ्या दिवशी गावातील चौकात बैठक बोलावून तुषार ढाकणे यांना सार्वजनिकरित्या महिलांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पीडित कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत सांगितले की, गावातील सरपंचांनी “मारा, काय करतोय बघून घेऊ” असे म्हणत आरोपींना प्रोत्साहन दिले. तसेच शिरूर पोलीस ठाण्या...

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण करण्यासाठी समिती स्थापन

Image
एकल महिलांच्या प्रश्नावर धोरण ठरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मसुदा समिती नेमली आहे. एकल महिलांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र धोरण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असणार आहे एकल महिलांच्या क्षेत्रातील एक कार्यकर्ता म्हणून खूप समाधान आहे त्याबद्दल सरकारचे मनापासून अभिनंदन.!!  या मसुदा समितीमध्ये साऊ एकल महिला समितीचा राज्य निमंत्रक म्हणून हेरंब कुलकर्णी यांचासमावेश करण्यात आला आहे. यातून धोरणात्मक सूचना करता येतील..  राज्य सरकारने महिला धोरण जाहीर केले तरीसुद्धा या एकल महिलांची मोठी संख्या बघता स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. २०११ साली महाराष्ट्रात एकल महिलांची संख्या ५४लाख होती ,ती १५ वर्षानंतर किमान ७०लाख असेल. त्यामुळे या महिलांचे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक ग्रामीण शहरी असे सर्व प्रश्न बघता धोरणाची गरज होतीच.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बजेटच्या भाषणात एकल महिलांसाठी लवकरच धोरण जाहीर करण्यात येईल अशी घोषणा केली होती . त्या घोषणेच्या अंमलबजावणीची विनंती केल्यावर मुख्यमंत्री यांचे संवेदनशील प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी एकल महिला प्रश्नावर दोन बैठक...

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन; श्रामनेरांचा सत्कार

Image
बीड | प्रतिनिधी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त आज दि. २७ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बीड बसस्थानकाजवळील बुद्ध विहार येथे दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया, शाखा जि. बीड (प.) यांच्या वतीने अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. यावेळी मुंबई येथील ऐतिहासिक चैत्यभूमी येथे आयोजित विशेष श्रामनेर प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन श्रामनेर झालेल्या बीड जिल्ह्यातील श्रामनेरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. महालिंगदादा निकालजे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयु. बापू निकाळजे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राज्य संरक्षण सचिव अमरसिंह ढाका, राज्य संघटक आयु. डी. एस. नरसिंगे, समता सैनिक दलाचे मेजर जनरल राजाभाऊ आठवले, महिला विभाग बीड जिल्हा (प.) अध्यक्षा आयु. अरुणाताई निसर्गंध, माजी विभागीय सचिव आयु. निसर्गंध गुरुजी, माजी अध्यक्षा आयु. पद्मिनताई गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष आयु. विष्णू कांबळे, शिवाजीराव, अनिल डोळस, हिशोबनिस आयु. सोनवणे आप्पा, बीड तालुका संस्कार सचिव प्रा. खैमाडे सर, ता. वड...

रोजंदारी मजदूर सेनेची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त नवीन समितीचा लवकरच विस्तार -भाई गौतम आगळे सर

Image
बीड प्रतिनिधी :-रोजंदारी मजदूर सेनेची बीड जिल्हा कार्यकारणीला बरखास्त करण्यात आल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी दिली. कार्यरत पदाधिकारी यांनी संघटनेच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे नवीन कार्यपद्धतीत आवश्यक बदल करून नव्या उत्साहाने संघटनात्मक कामकाज सुरू करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.      भाई गौतम आगळे सर यांनी सांगितले की बीड जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच कष्टकरी कामगारांना संघटनेशी जोडण्यासाठी नवीन जिल्हा कार्यकारिणीची स्थापना लवकरच करण्यात येणार आहे. नव्या समितीत जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सक्रिय आणि सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन गोर, गरीब व कष्टकरी कंत्राटी कामगारांना न्याय देण्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व आस्थापनेतील कंत्राटी कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी विविध आंदोलने लोकशाही मार्गाने राबिन्यावर भर दिला जाणार असून, नवीन समितीचा विस्तार लवकरच जाहीर केला जाईल...

वैद्यकिन्ही टोलनाक्यावरील स्वच्छालयात अस्वच्छतेचा कळस,प्रवाशांमध्ये संताप; प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी

Image
पाटोदा (प्रतिनिधी )पाटोदा तालुक्यातील मांजरसुंबा रोडवरील वैद्यकिन्ही जवळ असलेल्या टोलनाक्यावरील सार्वजनिक स्वच्छालयामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याचे चित्र समोर आले आहे. स्वच्छतेअभावी परिसरात दुर्गंधी पसरत असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.दररोज शेकडो वाहनांची ये-जा असलेल्या या टोलनाक्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी स्वच्छालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र संबंधित ठिकाणी नियमित साफसफाई होत नसल्याने स्वच्छालयाची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी घाण साचलेली असून पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “टोल आकारला जातो, मात्र मूलभूत सुविधा स्वच्छ ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे,” अशी नाराजी वाहनधारकांनी व्यक्त केली. सध्या राज्यभर स्वच्छता अभियान राबवले जात असताना वैद्यकिन्ही टोलनाक्यावरील ही परिस्थिती प्रशासनाच्या दुर्लक्षाचे उदाहरण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन स्वच्छालयाची निय...

महिला कामगारांच्या हितासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - सौ मिरा रोडे

Image
महिला कामगारांच्या हितासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - सौ मिरा रोडे  परळी प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय मजदूर कांग्रेस चे दोन दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा प्रदेश अध्यक्ष डॉ कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली लोळावणा येथे दिनांक 30 में 31 मे रोजी आयोजित केली त्या कार्यशाळाला परळी तालुक्यातील महिला कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परळी तालुका अध्यक्ष इंटक सौ मिरा रोडे यांनी केले आहे  दरम्यान आज परळीत महाराष्ट्र राज्य महिला कांग्रेस च्या अध्यक्षा सौ सिमाताई गुट्टे उपस्थित असताना त्यांनी परळी तालुक्यातील असंघटीत महिला कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या कामगारांच्या हितासाठी मोठ्या संख्येने संघटीत व्हा असे आवाहन केले याप्रसंगी त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी परळी तालुका अध्यक्ष इंटक सौ मिरा रोडे यांनी या प्रशिक्षण कार्यशाळाला परळी तालुक्यातील असंघटीत महिला कामगारांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे

आष्टी विधानसभा आढावा बैठकीस शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे– राहुल भैय्या चौरे यांचे आवाहन

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) शिवसेना संसदीय गट नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या “शिवसंवाद दौऱ्या” अंतर्गत दिनांक २९ मे २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता रोहिदास मंगल कार्यालय, पाटोदा येथे आष्टी विधानसभा आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.या महत्त्वपूर्ण बैठकीस शिवसेनेचे संपर्क मंत्री श्री. भरतशेठ गोगावले, श्री. प्रकाश आबिटकर, श्री. आशीष जयस्वाल, खासदार श्री. संदिपान भुमरे, शिवसेना सचिव श्री. भाऊसाहेब चौधरी तसेच माजी खासदार श्री. आनंद परांजपे उपस्थित राहणार आहेत. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. स्वप्निल गलधर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख, गटप्रमुख, बूथप्रमुख, युवासेना, महिला आघाडी तसेच शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठक यशस्वी करावी, असे आवाहन शिवसेना पाटोदा तालुका प्रमुख राहुल भैय्या चौरे यांनी केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, संघटनात्मक बांधणी, पक्ष विस्तार, बूथनिहाय नियोजन तसेच कार्यकर्त्यांशी थेट संवाद या महत्त्वाच्या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याने आष्टी विधानसभा मतदारसं...

न्याय मिळेपर्यंत आंबेडकर घराणे दळवी कुटुंबाच्या पाठीशी

Image
न्याय मिळेपर्यंत आंबेडकर घराणे दळवी कुटुंबाच्या पाठीशी आनंदराज आंबेडकर यांचा शब्द; आर्थिक मदत, शासकीय नोकरी व घरकुलासाठी प्रशासनाला सूचना बीड प्रतिनिधी : बीड शहरातील मातंग समाजातील युवक उमेश दळवी यांच्या झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी गंभीर दखल घेत दळवी कुटुंबीयांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांना धीर दिला. “या प्रकरणात पूर्ण न्याय मिळेपर्यंत आंबेडकर घराणे तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील,” असा विश्वास त्यांनी कुटुंबीयांना दिला. रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूर्यवंशी तसेच बीड जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम गोटू वीर यांनी उमेश दळवी यांच्या पत्नी, आई, भाऊ व बहिणीची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती आनंदराज आंबेडकर यांना दिली. त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी तात्काळ पोलीस प्रशासन, समाजकल्याण विभाग तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. दळवी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरी, तातडीची आर्थिक मदत तसेच घरकुल योजना मंजूर करण्यासाठी संबंधित विभागांनी त्वरित कार्यवाही करा...

एकल महिलांसाठी स्वतंत्र सर्वंकष धोरण बनविण्यासाठी मसुदा समिती स्थापन एकल महिलांच्या जीवनात आशेची पालवी फुटली - बाजीराव ढाकणे

Image
एकल महिलांसाठी स्वतंत्र सर्वंकष धोरण बनविण्यासाठी मसुदा समिती स्थापन  एकल महिलांच्या जीवनात आशेची पालवी फुटली - बाजीराव ढाकणे  बीड प्रतिनिधी : - राज्यातील लाखो एकल महिलांच्या जीवनात सामाजिक, आर्थिक आणि मानसिक परिवर्तन घडवून आणणारा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, एकल महिलांसाठी स्वतंत्र राज्य धोरण तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या या समितीत विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी, महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्था आणि तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, राज्यभर एकल महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनाही समितीत स्थान देण्यात आले आहे. या निर्णयाचे स्वागत करत साऊ एकल महिला समिती, महाराष्ट्र राज्यचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी हा निर्णय राज्यातील एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. “महाराष्ट्र हे देशातील ...

त्यागमूर्ती माता रमाईंना स्मृतिदिनानिमित्त लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन

Image
त्यागमूर्ती माता रमाईंना स्मृतिदिनानिमित्त लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन लिंबागणेश, दि.२७ : बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात आज बुधवार दि.२७ रोजी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास सरपंच बालासाहेब जाधव, भिम टायगर ग्रुपचे बीड जिल्हाध्यक्ष रविबापू निर्मळ, ग्रामपंचायत सदस्य दामोदर थोरात, रमेश गायकवाड, महादेव कुदळे, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, बाळकृष्ण थोरात, अँड. गणेश वाणी, सुरेश निर्मळ, गणपत तागड, दादासाहेब गायकवाड, मोहन कोटुळे, हरि पाटील, संजय पावले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना भिम टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रविबापू निर्मळ यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, वंचितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनात माता रमाई यांचा त्याग, प्रेरणा आणि खंबीर साथ मोलाची होती. बाबासाहेब परदेशात उच्च शिक्षण घेत ...

श्रामनणेर शिबिरातून समता, संयम व शिस्तीचे उत्तम संस्कार मिळतात अमरसिंह ढाका

Image
श्रामनणेर शिबिरातून समता, संयम व शिस्तीचे उत्तम संस्कार मिळतात अमरसिंह ढाका चैत्यभूमी श्रामनेर शिबिरार्थीचा धम्मदीप बुद्ध विहारात सत्कार बीड (प्रतिनिधी ) श्रामणेर शिबिरातून समता, संयम व शिस्तीचे उत्तम संस्कार मिळतात असे उद्गार अमरसिंह ढाका यांनी मुंबई येथे श्रामनेर शिबिरात सहभाग नोंदवलेल्या शिबिरार्थींच्या धम्मदीप बुद्ध विहार येथील सत्कार प्रसंगी अनुभव सांगताना प्रतिपादन केले. तथागतांचे तत्वज्ञान त्यांच्या वाणीतून निघालेल्या अनमोल पाली भाषेतील गाथेतून समजतात. गृहस्थी जीवनातील उपासक-उपासिका व बालकाकरता त्यांचे तत्त्वज्ञान समजण्याकरिता भारतीय बौद्ध महासभेने चैत्यभूमी दादर मुंबई येथे दहा दिवसीय श्रामनेर शिबिर आयोजित केले होते त्या शिबिरात बीड शहरातील भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक आयु.अमरसिंह ढाका. ॲड हनुमंत कांबळे जिल्हा पर्यटक संघटक बीड,ॲड चंद्रवदन जाधव धम्म महासंघ अध्यक्ष बीड यांनी सहभाग नोंदवून शिबिरातील आपले अनुभव उपस्थित उपासक -उपासिकांना श्रामनेर शिबिरात सहभाग नोंदवणे कसे गरजेचे आहे हे समजावून सांगून त्यांना श्रामनेर शिबिरात सहभाग नोंदवण्यास प्रेरित केले. सत्कार कार्...

नगर परिषद बीडमधील गणेश पगार चे कथित भ्रष्टाचार प्रकरण

Image
नगर परिषद बीडमधील गणेश पगार चे कथित भ्रष्टाचार प्रकरण  चौकशी न झाल्यास २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण अक्षय कोकाटे बीड | प्रतिनिधी नगर परिषद बीड येथील कथित करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत संबंधितांविरोधात दिलेल्या निवेदनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत मा. जिल्हाधिकारी बीड यांना दि. 29 एप्रिल 2026 रोजी तसेच मा. मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांना दि. 23 एप्रिल 2026 रोजी निवेदन देण्यात आले होते. या निवेदनामध्ये नगर परिषद बीड येथील आस्थापना, लेखा, स्वच्छता आदी विभागांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडून कथित आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या मुलगा व मुलगी यांची नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून झालेली नियुक्ती, त्यांची ऑर्डर प्रक्रिया व भरतीची वैधता याबाबतही चौकशीची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात श्री. गणेश तुळशीराम पगारे, सहा-लेखापाल नगर परिषद बीड यांच्या विरोधात स्वतंत्र चौकशी समिती स्थाप...

पाटोद्यात जोरदार वादळाचा तडाखा; अनेक घरांवरील पत्रे उडून नुकसान पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा नागरिकांची मागणी

Image
पाटोदा (प्रतिनिधी )पाटोदा शहरासह परिसरात आलेल्या जोरदार वादळ व वाऱ्यामुळे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर आले असून काही ठिकाणी झाडे व वीजतारा पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.वादळामुळे विशेषतः कच्ची घरे व पत्र्याच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांचे घरावरील पत्रे उडून गेल्याने पावसात घरात पाणी साचले असून जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.स्थानिक नागरिकांनी सांगितले की, अचानक आलेल्या वाऱ्यामुळे काही मिनिटांतच घरांची पत्रे उडून गेली. गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पाहणी करून मदत करावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी व शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

"नाते विकासाचे आणि विश्वासाचे"

Image
"नाते विकासाचे आणि विश्वासाचे" स्वर्गीय मारोतराव पा.नारे हे कोकलेगावच्या राजकारणात खूप मोठं प्रस्थ होतं.त्याचबरोबर कोकलेगावच्या राजकारणात त्यांचं मोठं योगदान राहिलं असून, त्यांनी अनेक नव्या दमाच्या तरुणांना कोकलेगावच्या राजकारणात प्रत्यक्ष सहभागी करून घेत अनेक मोठ्या पदावर विराजमान होण्याची संधी उपलब्ध करून दिली. स्वर्गीय मारोतराव पा.नारे हे अतिशय संयत, शालिन,बहुआयामी प्रतिभेचे धनी असलेले,वाचक, समीक्षक, सहकार, राजकारण, समाजकारण या क्षेत्रात ठाम वैचारिक अधिष्ठान निर्माण करणारे तसेच शिस्तीच्या बळावर राजकारणात समतोल व आदरयुक्य दरारा निर्माण करणारे,आपल्या कर्तृत्वाची अमीठ छाप उमटवणारे, ज्ञानी आणि गुणी तसेच समाजाभीमुख विकासाची दृष्ठी असलेले, सामाजिक जाणीवेच्या वैचारिक अधिष्ठानातून निर्माण झालेलं समाजमान्य व्यक्तिमत्व अशी त्यांची समाजात ओळख होती. कोकलेगावातील अनेक रुग्णांना ते स्वतः नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जायचे. उपचार घेत असताना तो रुग्ण पूर्ण बरा होईपर्यंत डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहायचे तसेच उपचारावर अतिशय बारकाईने लक्ष ठेऊन असायचे. रुग्ण पूर्ण बरा हो...

नीट पेपरफुटी प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Image
नीट पेपरफुटी प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी :- डॉ .गणेश ढवळे बीड (दि.२५ ) : देशभर गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबा गणेश कर यांच्या नेतृत्वाखाली बीडमधील विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नागरिक व सुजाण बीडकरांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर " शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे" एनपीए प्रशासन मुर्दाबाद, भ्रष्ट शिक्षण व्यवस्था मुर्दाबाद, पेपरफुटी करणा-यांची संपत्ती जप्त करा " आदी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात एनटीए संस्था बरखास्त करावी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी पेपरफुटीच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई करून त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी तसेच पेपरफुटीमुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेल्या...

पाटोदा येथील विठ्ठलनगरमध्ये 'भव्य महिला कीर्तन महोत्सव व देवी भागवत कथा' सोहळ्याचे आयोजन

Image
पाटोदा येथील विठ्ठलनगरमध्ये 'भव्य महिला कीर्तन महोत्सव व देवी भागवत कथा' सोहळ्याचे आयोजन ​पाटोदा (प्रतिनिधी ) :पाटोदा तालुक्यातील विठ्ठलनगर (भाकरे वस्ती) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानच्या वतीने अधिकमास तपपूर्ती सोहळ्यानिमित्त "भव्य दिव्य महिला कीर्तन महोत्सव व देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा" याचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा २४ मे २०२६ ते ३१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होत आहे. ​ह.भ.प. सुखनिवासवासी गु.श्री. बँकठस्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि सौ. सुनंदाताई सतिश म. उरणकर यांच्या संयोजनाखाली हा धार्मिक महोत्सव होत आहे. या सोहळ्याचे नेतृत्व ह.भ.प. संगीताताई सोळसकर करत आहेत. ​ ​सप्ताहभरात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ९ ते १० तुलसी अर्चन, १० ते १२ गाथा भजन, दुपारी १२ ते १ भोजन प्रसाद, दुपारी १ ते ४ या वेळेत सुप्रसिद्ध कथाप्रवक्त्या ह.भ.प. अंजलीताई दिघे (आळंदी) यांच्या सुश्राव्य वाणीतून 'देवी भागवत कथा' पार पडणार आहे. तसेच सायंकाळी ४.३० ते ६ हरिपाठ, ७ ते ९ भव्य कीर्तन, ९ ते १० भोजन प्रसाद आणि रात्री १० ते १२ संगीत भ...

जिल्ह्यात १ हजार ८८५ विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश निश्चित

Image
जिल्ह्यात १ हजार ८८५ विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश निश्चित बोगस प्रवेश रोखण्यात शिक्षण विभाग सपशेल अपयशी - मनोज जाधव  बीड (प्रतिनिधी ) आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना शिक्षण हक्क (आरटीई) कायदा अंतर्गत व्यवस्था करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी पहिल्या फेरीत १ हजार ८८५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चितकरण्यात आले असून .प्रवेश घेण्याची अंतिम मुदत उलटल्यानंतरही ४५९ जागा रिक्त राहिल्या आहेत नव्या सुचनेनुसार २९ मे पर्यंत या रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.अशी माहिती शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे. नियमित प्रवेशात २५ टक्के जागा आरटीई कायद्यातंर्गत राखीव ठेवण्यात येतात. जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत २१४ शाळांमध्ये २ हजार ४२५ जागा आरक्षित आहेत. यात पहिल्या टप्प्यात २ हजार ३६० विद्यार्थ्यांची निवड झाली होती . त्यातील १ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून बीड जिल्ह्यात सद्यस्थितीत ४५९ जागांसाठी प्रतीक्षा यादीतील वि...

पाटोद्यातील न झालेल्या कामाचे श्रेय द्यायचे तरी कुणाला?

“पाटोद्यातील न झालेल्या कामाचे श्रेय द्यायचे तरी कुणाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजूनही प्रतीक्षेत, मांजरा नदीवरील पुलाचे काम दहा वर्षांपासून रखडलेले, शहराला फिल्टरयुक्त शुद्ध पाणीपुरवठाही अद्याप नाही!” पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुका आल्या की मोठमोठ्या घोषणा आणि विकासाच्या गप्पा रंगतात, मात्र प्रत्यक्षात शहरातील मूलभूत प्रश्न आजही जैसे थे असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा अनेकदा करण्यात आली. विविध स्तरावर बैठका, आश्वासने आणि राजकीय भाषणे झाली, मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत पुतळा उभारणीचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शिवप्रेमी व नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्याचप्रमाणे शहरातील मांजरा नदीवरील पुलाचा प्रश्नही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तब्बल दहा वर्षांपासून पुलाच्या कामाबाबत चर्चा, आश्वासने आणि निधीच्या घोषणा होत आहेत, परंतु आजही पुलाचे काम रखडलेलेच ...

येवता परीसरात वादळी पाऊसाने आंबा पिकांचे तुकसान

Image
येवता परीसरात वादळी पाऊसाने आंबा पिकांचे तुकसान येवता: आप्पाराव सारूक दि.२४ रोजी केज तालुक्यातील येवता परिसरात जीवाची वाडी वाद्यळ वारास पाऊस झाल्याने आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दि. 23 शनिवारी सायंकाळी ५वा. दरम्यान पावसाने अचानक हजरी लावल्याने आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी शासनाकडे मदतीची प्रतीक्षा करत आहेत.

जीवे मारण्याच्या आरोपातून तीन आरोपीची नियमित जामीन मंजूर

Image
जीवे मारण्याच्या आरोपातून तीन आरोपीची नियमित जामीन मंजूर  सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी    गेवराई दिनांक 11 / 5 / 2026 रोजी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब बीड यांनी आरोपी 1 ) संदीप प्रधान 2 ) रोहित प्रधान 3 ) तेजस प्रधान राहणार धोंडराई तालुका गेवराई जिल्हा बीड यांचे विरुद्ध भा . न्या . स . चे कलम 109 (1) 118 (1) 189 (2) 190 191 (2) 191 (3) 351(2). च्या आरोपातून नियमित जामीन मंजूर केली आहे   याबाबत सविस्तर हकीगत अशी की दि . 24 /3 / 2026 रोजी सायंकाळी 6 = 00 वाजण्याच्या सुमारास वरील सर्व आरोपीने सदर प्रकरणातील फिर्यादीस म्हणाले की तू आम्हाला इंस्टाग्राम च्या ग्रुप वर आम्हाला शिव्या का दिल्या असे म्हणून मारहाण केली सदर महाराणीच फिर्यादीचे डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने फिर्यादी हा काकू नाना हॉस्पिटल बीड येथे ऍडमिट झाला व चार दिवसांनी फिर्याद दाखल केली सदर घटनेवरून गेवराई पोलीस स्टेशन मध्ये आरोपीने विरोधात भा . न्या . स . चे कलम 109(1) 118 (1) 189 (2) 190 191 (2) 191 (3)351 (2) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला व आरोपी यांचे वतीने नियमित ज...

नायरा पेट्रोल पंप ते जमजम पेट्रोल पंप रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने अपघातात वाढ

Image
नायरा पेट्रोल पंप ते जमजम पेट्रोल पंप रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने अपघातात वाढ. नायरा पेट्रोल पंप ते जमजम पेट्रोल पंप पर्यंत सरर्वीस रोड तात्काळ करण्यात यावा अन्यथा अंदोलन करु :- पप्पु गायकवाड गेवराई प्रतिनिधी दि. २२ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील गेवराई शहराच्या बाहेरून जाणारा झमझम पेट्रोल पंप ते नायरा पेट्रोल पंप चौक या ठिकाणी उड्डाण पुलाचे कामे चालू आहेत मात्र ती कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे एका साईडचा रस्ता बंद करून दुसऱ्या साईटचा रस्ता सुरू असून त्या रस्त्यावरून दोन्ही साईटचे वाहने येजा करत असल्या मुळे तसेच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांतून सतत वाळू सांडत असल्यामुळे व सिग्नल कमकुवत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघाताची संख्या वाढली असून मागील दोन महिन्यात १४ ते २० अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  एकाच साईडने दोन्ही साईटचे वाहने ये जा करत असल्यामुळे रुग्णवाहिकेला देखील खूप त्रास होत आहे तसेच रुग्णवाहिकेला रुग्ण नेताना अडचणी निर्माण होत असल्यामुळे रुग्णांचे देखील प्राण गमावले आहेत.   नायरा पेट्रोल पंप ते जमजम पेट्रो...

मनरेगा कामात भ्रष्टाचाराचा आरोप चौकशी करण्याची भाजपाचे माजी राज्यमंत्री लोकनेते बदामराव पंडितांची मागणी

Image
सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी  गेवराई तालुक्यातील वंजारवाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मनरेगाचे झालेल्या विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैर यावर व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे सकल चौकशीची मागणी केली आहे याबाबत माजी राज्यमंत्री लोकनेते बदामराव पंडित यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना निवेदन दिले आहे निवेदनामध्ये म्हटले आहे की वंजारवाडी गावातील अनेक कामे हेमेट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच काही कामे प्रत्यक्षात पूर्ण न होता कागदोपत्री पूर्ण झाल्याचा दाखविण्याचा दावा करण्यात आला आहे निवेदनानुसार चिरखा वस्तीतील सिमेंट रस्ता मारुती मंदिर ते येवले यांच्या घराकडे जाणारा रस्ता वंजारवाडी येथे यादव यांच्या शेताकडे जाणारा रस्ता तसेच वंजारवाडी ते रांजणी शिव रस्ता पवार यांच्या शेताकडे ही कामे बोगस दाखवून लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार करण्यात आला आहे असा आरोप करून तसेच खालील कामे पुस्तकी मोजमाप करून झा...

कोक्रोच जनता पार्टी चे सर्वेसर्वा अभिजित दिपके यांना झेड प्लस सेक्युरिटी द्या-डॉ जितीन वंजारे

Image
बीड प्रतिनिधी :- आज देशामध्ये सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कोणीही बोलले असता त्याला जेलमध्ये टाकण्याची परंपराच येथील सत्ताधाऱ्यांनी चालू केलेली आहे,विरोधकांना ईडी सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांचा धाक देऊन त्यांना जेलमध्ये टाकून विनाकारण त्रास दिला जात आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईली बाहेर काढून त्यांच्यावर दबावतंत्र टाकून स्वतःच्या पक्षांमध्ये त्यांची इनकमिंग केली जात आहे. भारतीय जनता पार्टीकडे अशी कोणती वाशिंग मशीन आहे की ज्या पक्षांमध्ये भ्रष्टाचारी नेता नसताना त्याच्यावर गंभीर आरोप केले जातात आणि तोच भ्रष्टाचारी नेता सरेंडर होऊन भाजपामध्ये प्रवेश केल्यास त्याच्या सर्व भ्रष्टाचारी चौकशी यंत्रणा बंद होतात आणि तो नेता मंत्री आमदार खासदार बनतो.हे का घडत आहे याला जबाबदार कोण आहे आणि याच कारणांमध्ये आज भारतामध्ये विरोधी पक्ष कमकुवत झाला आहे. टीव्ही पत्रकार सरकार ची दलाली करत आहे. येथील टीव्ही पत्रकार केवळ विशिष्ट सत्ताधारी लोकांचे गुलाम असताना आम्ही पाहत आहोत. मीडिया विकला गेलेला आहे. नवयुवकांना जातीवाद अन धर्मवाद शिकवून आणि जातीवादाच्या नावाखाली त्यांची माथी भडकवली जात आहे...

परळी पंचायत समितीत ग्रामसेवकांची कमतरता; नागरिकांची कामे रखडली

Image
परळी वैजनाथ प्रतिनिधी : परळी वैजनाथ पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवकांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनला असून याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन कामांवर होत आहे. पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवकांची एकूण ६२ पदे मंजूर असताना त्यापैकी केवळ ५१ ग्रामसेवक कार्यरत आहेत, तर तब्बल ११ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक ग्रामसेवकांकडे अतिरिक्त गावांचा कारभार सोपविण्यात आला आहे. सध्या अनेक ग्रामसेवकांकडे एका पदासोबत आणखी ३ ते ४ गावांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने कामाचा मोठा ताण निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अनेक ग्रामसेवक हे दररोज १०० ते १६० किलोमीटर अंतरावरून अपडाऊन करत असल्याची माहिती समोर आली आहे. शासनाने ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयातील अनेक कामे रखडत आहेत. रहिवासी दाखला, पीटीआर नक्कल, जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, हयात दाखला तसेच विविध शासकीय कागदपत्रांसाठी ग्रामस्थांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे...

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून 2652 रुग्णांना मोफत रक्तपुरवठा

Image
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून 2652 रुग्णांना मोफत रक्तपुरवठा; मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून गोर गरीब रुग्णांना न्याय,   तीन महिन्यांत 15 रुग्णांना सुमारे 2 लाख 95 हजार रुपयांची वैद्यकीय मदत बीड प्रतिनिधी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्षामार्फत गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे. स्वप्नील वरपे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आजपर्यंत तब्बल 2652 रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यात आला असून या रक्तपुरवठ्याची एकूण किंमत अंदाजे 39 लाख 78 हजार रुपये इतकी आहे. या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळून मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच मागील तीन महिन्यांत 15 गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY), आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) तसेच विविध सामाजिक ट्रस्ट यांच्या माध्यमातून उपचार व शस्त्रक्रियांसाठी सुमारे 2 लाख 95 हजार रुपयांची आर्थिक म...

येवला येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षपदी डॉ नंदकुमार राऊत तर उद्घाटकपदी प्रा. दादासाहेब कोते यांची निवड

Image
येवला येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षपदी डॉ नंदकुमार राऊत तर उद्घाटकपदी प्रा. दादासाहेब कोते यांची निवड  येवला प्रतिनिधी : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पाचव्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षपदी नाशिक येथील जेष्ठ साहित्यिक डॉ. नंदकुमार राऊत यांची तर उद्घाटकपदी लोणी, जि. अहिल्यानगर येथील जेष्ठ साहित्यिक प्रा. दादासाहेब कोते यांची निवड झाली असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. संजय वाघ तसेच प्रतिष्ठानचे सचिव मा. राजेश वाघ यांनी कळविले आहे.                                                                                                                                   ...

आष्टी पंचायत समितीचा भोंगळ कारभार; अल्टिमेटम संपत आला तरी प्रशासन सुस्त, तरुणाचा पुन्हा उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरज काकडे यांनी दिली आहे

Image
आष्टी पंचायत समितीचा भोंगळ कारभार; अल्टिमेटम संपत आला तरी प्रशासन सुस्त, तरुणाचा पुन्हा उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरज काकडे यांनी दिली आहे  आष्टी (प्रतिनिधी ): आष्टी पंचायत समितीमधील कथित भ्रष्टाचार आणि ढिसाळ कारभाराविरोधात प्रशासनाला दिलेला आठ दिवसांचा अल्टिमेटम आता संपत आला आहे. मात्र, अद्यापही भ्रष्ट व्यवस्थेने या तक्रारीवर लेखी किंवा तोंडी कोणत्याही प्रकारचे निवेदन न दिल्यामुळे, लोकशाही मार्गाने लढणाऱ्या तरुणांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'अधिकारी हे समाजाचे नोकर आहेत हे विसरले असून, शेतकऱ्यांच्या प्रत्येक कामासाठी पैशांची मागणी केली जाते,' असा घणाघाती आरोप करत या व्यवस्थेविरोधात पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. प्रत्येक टेबलावर पैशांची मागणी; शेतकरी हवालदिल आष्टी पंचायत समितीमध्ये सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामस्थांची प्रचंड पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचे वैयक्तिक प्रश्न असो की विहीर मंजुरी, शेततळे मंजुरी, घरकुल मंजुरी किंवा मस्टर भरणे आणि कामाची मागणी करणे— प्रत्येक कामासाठी इथे वेगवेगळ्या टेबलावर उघडपणे पैशा...

मौलाना आझाद महामंडळाचे कार्यालय शासकीय की खाजगी?; मनसेकडून महापुरुषांचे फोटो भेट देणार – वर्षाताई जगदाळे

Image
मौलाना आझाद महामंडळाचे कार्यालय शासकीय की खाजगी?; मनसेकडून महापुरुषांचे फोटो भेट देणार – वर्षाताई जगदाळे बीड | प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांच्या कार्यालयातील कारभाराबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चांना उधाण आले आहे. एका कामानिमित्त कार्यालयाला भेट दिल्यानंतर या चर्चांमध्ये तथ्य असल्याचे दिसून आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्षा वर्षाताई जगदाळे यांनी केला आहे. वर्षाताई जगदाळे यांनी सांगितले की, शासकीय कार्यालयांमध्ये महापुरुषांचे छायाचित्र लावण्याची परंपरा असताना, संबंधित कार्यालयात अधिकाऱ्यांनी स्वतःच्या गौरवाचे आणि सत्काराचे फोटो लावले आहेत. हे फोटो महापुरुषांच्या छायाचित्रांपेक्षा अधिक ठळकपणे लावण्यात आल्याने, “हे कार्यालय शासकीय आहे की खाजगी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कार्यालयाला महापुरुषांची छायाचित्रे भेट देऊन योग्य शिस्त लावण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.याशिवाय, कार्यालयातील कथित गोंधळ आणि भ्रष्टाचाराबाबत सविस्तर माहिती मागविण्यात ...

बालसंगोपन योजनेचे अनुदान रखडल्याने ‘ लाडके भाचे ’ आर्थिक संकटात

Image
बालसंगोपन योजनेचे अनुदान रखडल्याने ‘ लाडके भाचे ’ आर्थिक संकटात दीड ते दोन वर्षांपासून लाभार्थी प्रतीक्षेत; शिक्षण, पोषण आणि दैनंदिन गरजांवर परिणाम बीड प्रतिनिधी : - राज्यातील अनाथ, निराधार, एकल पालकांच्या तसेच अत्यंत गरजू मुलांच्या संगोपनासाठी महत्त्वाची मानली जाणारी ‘ सावित्रिबाई फुले बालसंगोपन योजना ’ सध्या निधीअभावी रखडल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. अनेक लाभार्थ्यांना गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष खात्यात अनुदान जमा झाले नसल्याने संबंधित कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे पालकांमध्ये संतापाची भावना वाढत असून शासनाने तातडीने प्रश्न सोडवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बालसंगोपन योजनेअंतर्गत पात्र मुलांना दरमहा २२५० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ विशेषतः अनाथ, निराधार, एकल पालकांच्या मुलांना तसेच अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या कुटुंबांतील मुलांना दिला जातो. या निधीतून मुलांचे शिक्षण, वह्या-पुस्तके, शाळेची फी, कपडे, औषधोपचार आणि पोषण आहाराचा खर्च भागविला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून नव्हे तर अनेक ठिकाणी दोन वर्ष...

महावितरणची मान्सुनपूर्व दुरुस्ती व देखभाल मोहीम कागदावरच; ग्रामीण भागात लोंबकळणा-या तारांमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात :- डॉ. गणेश ढवळे

Image
महावितरणची मान्सुनपूर्व दुरुस्ती व देखभाल मोहीम कागदावरच; ग्रामीण भागात लोंबकळणा-या तारांमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात :- डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश (दि.१९) : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून मान्सुनपूर्व दुरुस्ती आणि देखभाल मोहीम राबविण्यात येत असल्याचा दावा केला जात असला, तरी ग्रामीण भागात ही मोहीम प्रत्यक्षात केवळ कागदोपत्रीच सुरू असून महावितरणचा ढिसाळ कारभार सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे. अनेक ठिकाणी लोंबकळणाऱ्या किंवा तुटलेल्या वीजतारांमुळे ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. रस्त्यावर किंवा घरांच्या अगदी जवळ आलेल्या वीजतारांमुळे निष्पाप नागरिकांचे बळी गेले असून, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे जीर्ण झालेल्या कमकुवत तारा रस्त्यावर पडून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही भागांत वीजतारा माणसांच्या उंचीपर्यंत खाली आल्याने लहान मुले व जनावरांना विजेचा धक्का लागण्याच्या घटनाही घडत असल्याची खंत डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली आहे. महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी वीज खांब, ट्र...

बिंदुसरा नदीपात्र, ओपन स्पेस आणि व्यापारी संकुल अतिक्रमणप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Image
बिंदुसरा नदीपात्र, ओपन स्पेस आणि व्यापारी संकुल अतिक्रमणप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने “गोरगरिबांवर कारवाई अन् भू-माफियांना अभय का?” – डॉ. गणेश ढवळे बीड (दि.१८ ) : बीड शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप करत बिंदुसरा व करपरा नदीपात्रातील अतिक्रमणे, ओपन स्पेस गिळंकृत प्रकरणे तसेच व्यापारी संकुलातील बेकायदेशीर बांधकामांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१८ सोमवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विभागीय आयुक्त यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड, रामधन जमाले, बाजीराव ढाकणे, प्राचार्य. डी. जी. तांदळे, डॉ. संजय तांदळे , बाळासाहेब मोरे पाटील, किष्किंधा पांचाळ, सिताबाई भोसले ,सिता दहे, आदी सहभागी झाले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत हातावर पोट भरणाऱ्या चहा-नाश्ता चालक, टपरीधारक, फळविक्रेते, फुलहा...

अंगणवाडीतील बालकांना उष्णतेच्या तिव्रतेपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी उन्हाळी सुट्टी द्यालेक लाडकी अभियानाची मागणी

अंगणवाडीतील बालकांना उष्णतेच्या तिव्रतेपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी उन्हाळी सुट्टी द्यालेक लाडकी अभियानाची मागणी; बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन बीड प्रतिनिधी : - राज्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून बीड जिल्ह्यातही तापमानात मोठी वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे अंगणवाड्यांना तातडीने उन्हाळी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी लेक लाडकी अभियान, महाराष्ट्र राज्यच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात लेक लाडकी अभियानाचे मार्गदर्शक प्राचार्य डी जी तांदळे, लेक लाडकी अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या उष्णतेमुळे अंगणवाड्यांमध्ये पुरेशा सुविधा नसल्याने बालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक अंगणवाड्यांमध्ये वायुवीजन, पंखे तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी आहे. परिणामी उष्माघात, डिहायड्रेशन, थकवा, चक्कर येणे आदी आरोग्यविषयक समस्या निर...

एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार लिंबागणेश येथे एसटी बस बंद पडल्याने प्रवाशांचे हाल,वाहतूक विभाग मात्र बेफिकीर

Image
एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार लिंबागणेश येथे एसटी बस बंद पडल्याने प्रवाशांचे हाल,वाहतूक विभाग मात्र बेफिकीर :- डॉ.गणेश ढवळे  लिंबागणेश (दि.१७ ) : राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी विविध योजनांचा जाहिरातीद्वारे गाजावाजा करत असताना प्रत्यक्षात मात्र प्रवाशांच्या हालअपेष्टांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे. रविवार दि.१७ रोजी वसई–अंबेजोगाई ही एसटी बस सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लिंबागणेश येथील बसस्थानकावर तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. अचानक बस बंद पडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले असून तब्बल तीन तासांपासून प्रवासी अडकून पडले आहेत. वाहन चालकाने तत्काळ पाटोदा आगारप्रमुखांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र “मेकॅनिक रात्री ११ वाजता येईल, त्यानंतरच दुरुस्ती केली जाईल,” असे उत्तर मिळाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे पर्यायी बस व्यवस्था किंवा तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याबाबत आगार प्रशासनाकडून कोणतीही तत्परता दाखविण्यात आली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला. दरम्यान, डॉ . गणे...

धनदांडग्यांना , पुढा-यांना पायघड्या मात्र गोरगरिबांना कायद्याचा दंडुका! नगरपालिकेच्या दुटप्पीपणा निषेधार्ह:- डॉ.गणेश ढवळे

Image
  बीड (दि.१७ ) : बीड शहरातील बसस्थानक, जिल्हा रुग्णालय परिसरातील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टपऱ्या, फेरीवाले व लघुउद्योजकांच्या दुकानांवर अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली कारवाई करत नगरपालिकेने कायद्याचा धाक दाखवला. मात्र दुसरीकडे शहरातील मोठमोठ्या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे. नगरपालिकेने गोरगरीबांच्या उपजीविकेवर हातोडा चालवत स्वतःची पाठ थोपटून घेतली असली, तरी बिंदुसरा व करपरा नदीपात्रातील अतिक्रमित बांधकामे, मोठमोठे मंगल कार्यालये, हॉटेल्स आणि भू-माफियांनी केलेल्या नियमबाह्य बांधकामांवर मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी वारंवार आंदोलने आणि निवेदने दिली आहेत. मात्र नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. आर्थिक साटेलोटे आणि राजकीय दबावामुळेच मोठ्या अतिक्रमणधा...