Posts

Showing posts from August, 2022

पञकार संघाच्या प्रेसफोटो ग्राफर पाटोदा तालुकाध्यक्षपदी सखाराम भोसले,कार्याध्यक्ष राहुल सोनवने तर सोशल मिडीया अध्यक्ष पदी शेख महेशर, कार्याध्यक्षपदी दत्ता वाघमारे यांची निवड

Image
पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा तालुका पञकार संघाचे अध्यक्ष सोमिनाथ कोल्हे यांच्या मार्गदर्शना खाली बैठक झाली, या वेळी पञकार संघाच्या प्रेसफोटो ग्राफर पाटोदा तालुकाध्यक्षपदी सखाराम भोसले, कार्याध्यक्ष राहुल सोनवने,सोशल मिडिया तालुका अध्यक्ष पदी महेशर शेख व कार्याध्यक्षपदी दत्ता वाघमारे यांची निवड करण्यात आली.या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या बाबत सविस्तर वृत्त पाटोदा तालुका पञकार संघाचे अध्यक्ष सोमिनाथ कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा तालुका पञकार संघाची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.पञकार संघाच्या प्रेसफोटो ग्राफर पाटोदा तालुकाध्यक्षपदी सखाराम भोसले,कार्याध्यक्ष राहुल सोनवने ,सोशल मिडीया पाटोदा तालुका अध्यक्ष पदासाठी शेख महेशर व कार्याध्यक्षपदी दत्ता वाघमारे यांची निवड करण्यात आल्याने पाटोदा तालुक्यातून शुभेच्छा वर्षाव होत आहे.

बलभिम महाविद्यालयाने उच्च शिक्षणाची गंगा बीड जिल्ह्यातील घराघरात पोहचली

Image
बलभीम महाविद्यालय हे गुणवंत विद्यार्थी घडवणारे शैक्षणिक संकुल आहेः  डॉ. एस.बी. सय्यद बीडः प्रतिनिधी अंकुश गवळी  मराठवाड्यातील उत्तुंग व्यक्तीमत्व मा. मंत्री स्व. विनायकराव पाटील यांच्या पुढाकारातून तसेच बीड जिल्ह्यातील शिक्षणप्रिय नेत्यांच्या सहकार्य ने बीड जिल्ह्यात उच्च शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचण्यासाठी सन 1960 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मा. श्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.      बीड जिल्ह्याचा मागासलेपणाचा कायापालट करण्यासाठी शिक्षणासारखे प्रभावी साधन ग्रामीण व शहरी भागातील तरूणांना उपलब्ध करण्यासोबतच बीड जिल्ह्यातील गोरगरीब, आर्थिक दुर्बल घटक, शेतमजूर, उसतोड मजूरांच्या मुला-मुलींना अंधारातून प्रकाशापर्यंत पोहचविण्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात मोलाच योगदान देत एक नामांकित महाविद्यालय असा लौकिक बलभिम महाविद्यालयाने जपलेला आहे.  वाड्यावस्त्यावरील मुला- मुलींची शैक्षणिक जडणघडण करुन त्यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक घडवावा यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक आजपर्यंत तळमळीने, प्रामाणिकपणे काम करत आहेत. आम्हाला आमचे जे माजी विद्यार्थ

गणेश उत्सवाला पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, प्रकाश भैय्या गिरी

Image
बीड प्रतिनिधी   गणेश उत्सव ला पोलिसांना सहकार्य करा .व पोलिसांच्या हस्ते गणपतीची आरती करा, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना बीड युवक तालुकाध्यक्ष प्रकाश भैय्या गिरी यांनी आव्हान केले आहे,  महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल भैया दुबाले ,यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश भैय्या गिरी पोलीस बॉईज संघटनेचे काम करत आहेत, अडचणीला पोलिसांना मदत सहकार्य करणारे युवा नेते सदैव पोलिसांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रकाश भैय्या गिरी यांच्याकडे पाहिले जाते, पोलीस बॉईज संघटना महाराष्ट्र राज्य हे फक्त पोलिसांसाठी संघटना आहे ,संस्थापक अध्यक्ष राहुल भैया दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली गिरी हे काम करत आहेत गेले अनेक वर्षे. त्यामुळे येणाऱ्या गणपती विसर्जनापर्यंत पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान पोलीस बॉईज संघटनेचे बीड तालुका युवक अध्यक्ष प्रकाश भैय्या गिरी यांनी केले आहे ,

शिंदे सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पन्नास हजार मदत द्यावी - राहुल जाधव

Image
पाटोदा (गणेश शेवटी) पाटोदा तालुका हा सतत दुष्काळी व डोंगराळ भाग असल्याने येथील शेतकरी गरीब वर्ग आहे.यावर्षी खरिप पिकात सोयाबीनला गोगलगायने घेरले होते त्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे.त्यात पाऊसाने दांडी मारल्याने पुणा शेतकरी वर्ग संकटात सापडलेली  शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे पाटोदा ता. अध्यक्ष राहुल शाहूराव जाधव (पाटील ) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे मागी केली आहे. तालुक्यातील एक महिन्यापासून पावसाने दांडी मारल्याने व तालुक्यात अद्यापही मोठा पाऊस न झाल्याने खरीप पिके वाया जाण्याची परिस्थिती उद्भवली असून सोयाबीन उडीद बाजरी पिकांचा फुलोराच्या वेळेसच पावसाने दांडी मारल्याने खरीप पिकांचा फुलोरा जळून गेला असून सोयाबीन शेंगाच्या पापडी होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. सोबतच तालुक्यात गोगलगायी मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे पीक उगवले असता त्यांच अवस्थेत असतानाच नुकसान झाले असल्याने अनेक शेतकऱ्यांना दुभार पेरणी करावी लागली होती. या प्रकरणी उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीची शासनाने तात्काळ दखल घेऊन हेक्टरी ५० हजार रुपये अनु

वडवणी येथील कु. विज्ञाप्ती रंगराव लव्हाळे (ऋचा) इंडिया डान्स पाॅवर मेगा राऊंड , बेस्ट डान्स अवॉर्ड होणार दिल्लीत सन्मानित

Image
.  वडवणी प्रतिनिधी इंडिया डान्स  पॉवर मेगा राऊंड मध्ये वडवणी येथील ऋचा लव्हाळे ची बेस्ट डान्स ज्युनिअर अवॉर्ड ने होणार सन्मान   वडवणी प्रतिनिधी.  ओयासिस  ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन च्या वतीने घेण्यात आलेल्या बेस्ट डान्स ज्युनिअर अवॉर्ड साठी वडवणी येथील दहावीत शिकत असलेल्या कु. विज्ञाप्ती ऋचा रंगराव लव्हाळे हीची डान्स मेघा राऊंड मध्ये निवड झाली असून ती लवकरच नाईन एक्स नाईन एक्स या राष्ट्रीय चॅनलवर झळकणार आहे.ऋचा चे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. ओयासीस ग्रूप हा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक गुणी कलावंतांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने देश पातळीवर यथोचित सन्मान करत असते. वडवणी सारख्या ग्रामीण भागातून ऋचा ने आपल्या खास शैलीतील नृत्याने देश पातळीवर नाव करून दाखविले.बीड येथे डान्स कोरिओग्रफर सिद्धार्थ अग्रवाल यांच्या कडे ती डान्स चे प्रशिक्षण घेत आहे.इतक्या अल्पवयात तिची अवॉर्ड सोहळ्यात करिता निवड झाल्याने आनंद गगनात मावत नाही.शिक्षक दिनी पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे शानदार समारंभात बेस्ट डान्स ज्युनिअर अवॉर्ड वितरित करण्यात येणार आहे. ऑयसिस ग्रूप

शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा - रामहरी भैया मेटे

Image
बीड (प्रतिनिधी) जिल्ह्यात अचानक पावसाने दांडी मारल्याने जोमात आलेली शेतकऱ्यांची पिके पावसा अभावी करपू लागली . कापूस, तूर, सोयाबीन, मका , उडीद, मूग, सूर्यफूल ही पिके वाया गेली . शेतकरी हतबल झाला . शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळण्यासाठी बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा यासंबंधीचे निवेदन शिवसंग्राम नेते रामहरी भैय्या मेटे व शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले .         याप्रसंगी शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,नेकनूर जि.प गटप्रमुख विनोद कवडे,माजी सभापती ज्ञानेश्वर कोकाटे,ऊसतोड कामगार नेते तथा पंचायत समिती सदस्य बबनराव माने,शिरूर कासार तालुकाप्रमुख माऊली शिंदे,शिरूर तालुका उपाध्यक्ष नामदेव धांडे,ओबीसी आघाडीचे शिरूर तालुका अध्यक्ष शिवराम राऊत,शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे,सोशल मीडियाचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा पंडित शेंडगे,युवक आघाडीचे दत्ता जाधव,शिवसंग्राम शिरूर तालुका संघटक महादेव बहिर,शिरूर तालुका सरचिटणीस कृष्णा परजने,योगेश जाधव,विजय सुपेकर,विश्वास बहिरवाळ व अन्य शिवसंग्राम पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

पाटोदा तालुका डिजिटल मिडिया परिषद कार्यकारिणी जाहीर

Image
अध्यक्षपदी शेख, कार्याध्यक्षपदी पवार तर सचिवपदी शेलार यांची निवड पाटोदा | प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांच्या आदेशानुसार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मिडिया परिषदेच्या पाटोदा तालुका अध्यक्ष पदी जावेद शेख, कार्याध्यक्ष पदी बबन पवार यांची तर सचिव पदी हरिदास शेलार यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे... याबाबत अधिक माहिती अशी की,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांच्या आदेशानुसार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मिडिया परिषदेच्या पाटोदा तालुका कार्यकारिणी निवडी संदर्भात मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे यांच्या सुचनेनुसार डिजिटल मिडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिरसाठ यांनी नुकतीच पाटोदा या ठिकाणी एक बैठक घेतली.या बैठकीत त्यांनी परिषदेचे ध्येय,धोरणे, डिजिटल मिडियाचे कार्य काय असणार, ज्यांच्या निवडी केल्या जातील त्यांच्या जबाबदारी काय असणार याची सांगोपांग माहिती देत त्या जबाबदा

राष्ट्रीय बंजारा परिषदेची जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर

Image
जिसका दल होता है,उसका ही बल होता हैं      गेवराई -- राज्यातील दीड कोटी पेक्षा जास्त संख्येने असलेल्या बंजारा समाजाला सामाजिक शैक्षणिक व राजकीय न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तसेच सर्व सोयी सुविधां पासून वंचित असलेल्या महाराष्ट्रातील साडेबारा हजार बंजारा तांडे व वस्त्यांवर जोड रस्ते पिण्याचे पाणी स्मशानभूमी मतदान केंद्र अंगणवाडी आरोग्य केंद्र व्यायामशाळा वाढीव शाळा खोल्या इत्यादी मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भगवंत सेवक आदरनिय किसनभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ताकदीनिशी वाटचाल करीत असलेली बंजारा समाजाची सर्वात मजबूत संघटना राष्ट्रीय बंजारा परिषदेची गेवराई तालुका स्तरिय बैठक शासकीय विश्रामगृह गेवराई येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण होते.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष बाजीराव राठोड,महंत सुदरसिंग महाराज,कृष्णा राठोड,बाळराजे राठोड,अमर राठोड उपस्थित होते.बैठकीचे आयोजन गेवराई तालुका अध्यक्ष संजय चव्हाण यांनी

कार्यसम्राट आमदार अॅड लक्ष्मण ( आण्णा ) पवार साहेब यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

Image
  बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई विधानसभा मतदारसंघातील तांडे वस्तीवरील रस्ते . तालुक्यातील पिकविमा अडचणीचे निवारण करणे . विमा कंपनीतुन शेतीचे पंचनामे . सर्वे . आशा आनेक विषयावर चर्चा झाली बीड येथील . शासकीय विश्रामगृहा मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत कार्य सम्राट आ अॅड लक्ष्मण ( आण्णा ) पवार यांनी तालुक्यातील विविध रस्त्या संदर्भात आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व इतर रस्ते अंतर्गत इंजिनीयर व संबधित कर्मचारी यांच्यासोबत बैठक घेउन त्यांना योग्य त्या सुचना दिल्या या वेळी बीड तालुक्यातील व गेवराई विधानसभा मतदार संघातील गावातील नागरिकांनी आपापल्या रस्त्यासंदर्भात माहिती दिली व आ . लक्ष्मण ( आण्णा ) पवार साहेब यांच्या सोबत चर्चा केली व रस्ते . डांबरीकरण करण्याची मागणी केली . आ अँड लक्षमण ( आण्णा ) पवार यांनी येणाऱ्या अडीच वर्षात तालुक्यातील तांडे . वस्तीवर डांबरीकरण . रस्ते करणार असल्याची माहिती दिली . यावेळी जिल्हा परिषद विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादी विभागातील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते तसेच जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्

साथीच्या आजाराने पाटोदेकराचे आरोग्य धोक्यात आरोग्य विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात - निलाताई पोकळे

Image
पाटोदा (गणेश शेवाळे)देशासह संपूर्ण महाराष्ट्र कोरोना सारख्या महाभयकर आजाराने भयभीत झाले असून आताशी कुठे तरी सर्व सुरळीत चालू झाले असताना पाटोदा तालुक्यात घाणीचे साम्राज्य वाढले असल्यामुळे पाटोदा तालुक्यात ढासाचा सुळसुळाट वाढला असल्यामुळे डेंगू,मलेरिया व इतर साथीच्या रोगाचा प्रकोप वाढलेला असून, गेल्या काही दिवसांत तालुक्यातील रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे त्यामुळे डासांचा उपद्रव असलेल्या पाटोदा तालुक्यात विविध भागात तात्काळ फॉगिंग मशीन द्वारे औषध फवारणी करण्यात यावी आशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष निलाताई पोकळे यांनी केली आहे तालुक्यात रोगराई पसरत असताना आरोग्य विभागाने फॉगिंग मशीन पुजायला ठेवल्यात का शहरात ढासाचे साम्राज्य वाढले आहे सध्या पाटोदा तालुक्यात डेंगू चिकन गुणीया आजाराने थैमान घातले असून डेंगीचा प्रसार करणाऱ्या डासांची संख्याही वाढली आहे. डेंगीवरील नियंत्रणासाठी पाटोदा आरोग्य विभागाने तात्काळ उपाय योजना राबविल्या पाहिजे परंतु गंभीर विषयाकडे प्रशासन लक्ष द्यायला कोणीही तयार नसल्याने सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे यामुळे

"दादा"गिरीचा अस्त.! ठाकरे पर्वाचा उदय.!

Image
संपूर्ण मराठा समाजाची अस्मिता असलेल्या नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत अखेर "दादा"गिरी व बेबंद हिटलरशाही मोडीत काढत सुज्ञ सभासदांनी परिवर्तनाचा इतिहास घडवला. कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि संयमाच्या बळावर नितीनजी ठाकरे यांच्या ठाकरे पर्वाचा उदय झाला. भगवान के घर देर है लेकीन अंधेर नही या उक्तीप्रमाणे नितीनजी ठाकरे साहेबांच्या १५ वर्षांच्या अविरत संघर्षाला अखेर निर्भेळ यश आले. मात्र परिवर्तन पॅनलचे लढाऊ शिलेदार व सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अल्पमतांच्या दुर्दैवी पराभवाचा अपवाद वगळता सर्वच उमेदवार नितीनजींच्या ठाकरे लाटेत प्रचंड मताधिक्य घेत विजयी झाले. नितीनजी ठाकरे यांनी तर नीलिमाताई पवार यांना तब्बल १२६१ मतांनी धोबीपछाड देत सरचिटणीस पद काबीज करत ठाकरे पर्वाचा आरंभ केला. आदरणीय नितीनजी ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या आदर्श विचारांचा वारसा अंगिकारत केलेली सुयोग्य पॅनल निर्मिती, सूत्रबद्घ सूक्ष्म नियोजन, प्रभावी प्रचारयंत्रणा, मविप्रच्या सर्वच सभासदांशी १५ वर्षापासून जुळलेली नाळ व त्याला जिल्हाभरातील मविप्र हितचिंतक व कार्यकर्त्यांची लाभल

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनंतर लासलगाव विंचूर रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे मजबुतीकरणास सुरुवात

Image
नाशिक,लासलगाव,दि.३० ऑगस्ट :-लासलगाव विंचूर रस्त्यावर अपघाताचे प्रमाण अधिक वाढत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीला अडथला ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी तसेच दोन्ही बाजूंच्या रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे मजबुतीकरण करण्याच्या सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विंचूर लासलगाव रस्त्यावर अनेक वृक्षांच्या फांद्या या भररस्त्यात असल्याने तसेच साईड पट्ट्यांवर गवत व झाड झुडपे अधिक वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचे प्रमाण अधिक वाढले होते. याबाबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दि.२९ ऑगस्ट रोजी लासलगाव येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटण्यासोबत साईड पट्यांवर वाढलेले गवत, झाडे काढून रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईड पट्ट्यांचे मजबुतीकरण व रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या होत्या. या कामा

पाटोदा तालुका पञकार संघाच्या सोशल मिडीया पाटोदा तालुकाध्यक्षपदी शेख महेशर, कार्याध्यक्षपदी दत्ता वाघमारे यांची निवड

Image
पाटोदा (गणेश शेवाळे )पाटोदा तालुका पञकार संघाचे अध्यक्ष सोमिनाथ कोल्हे यांच्या मार्गदर्शना खाली बैठक झाली, या वेळी सोशल मिडिया पाटोदा तालुका पञकार संघाच्या अध्यक्ष पदी महेशर शेख यांची तर कार्याध्यक्षपदी दत्ता वाघमारे यांची निवड करण्यात आली. या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या बाबत सविस्तर वृत्त पाटोदा तालुका पञकार संघाचे अध्यक्ष सोमिनाथ कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा तालुका पञकार संघाची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. सोशल मिडीया पाटोदा तालुका अध्यक्ष पदासाठी शेख महेशर व कार्याध्यक्षपदी दत्ता वाघमारे यांची निवड करण्यात आल्याने पाटोदा तालुक्यातून शुभेच्छा वर्षाव होत आहे.

आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने डॉ निलेश गाडेकर सन्मानित.

Image
सोयगाव :-दि.३०:- येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख यांना राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त छ.संभाजीनगर जिल्हा ऑलम्पिक संघटनेमार्फत आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने रविवारी सहकार मंत्री अतुल सावे, अर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळ प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे छ.संभाजीनगर ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, डॉ उदय डोंगरे, डॉ मकरंद जोशी, डॉ संदीप जगताप, यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याच बरोबर अजिंठा शिक्षण संस्था चे अध्यक्ष रंगनाथनाना काळे सचिव प्रकाशदादा काळे, प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री, उपप्राचार्य डॉ शिरीष पवार, डॉ रावसाहेब बारोटे, डॉ शिवाजी अंभोरे, डॉ दिलीप बिरुटे, डॉ राजू वणारसे ,डॉ सैराज तडवी, डॉ छत्रुगन भोरे, डॉ भास्कर टेकाळे, डॉ निलेश गावडे, डॉ भाऊसाहेब गाडेकर, डॉ संतोष तांदळे, डॉ सुशील जावळे, डॉ पंकज गावित, डॉ विनोद बारोटे, डॉ पंकज गावित, डॉ ग्यानबा भगत, डॉ शंतनू चव्हाण, डॉ संतोष पडघन, डॉ दीपक पारधे, डॉ पंकज शिंदे, पंकज साबळे, शंकर काळे, कमलेश काळे, उदय सोनवणे, आदींनी अभिनंदन केले,

मुख्याधिकारी साहेब बीड शहरात तात्काळ स्वच्छता करा अन्यथा कचरा तेथे सेल्फी आंदोलन - बाळासाहेब धुरंधरे

Image
बीड प्रतिनिधी : बीड शहरात सध्या सर्वत्र अस्वच्छता, कचरा, रस्त्यावर नाल्यांचे पाणी, रोडवर मेलेले जनावरे, सडलेला भाजीपाला, प्लास्टिक पिशव्यांचा ढिगारे, आल्याचे चित्र बीड शहरातील अनेक भागात समोर आले आहेत. त्यातच सध्या गणेश आगमन तोंडावरच आले आहे त्यामुळे शहरात तात्काळ स्वच्छता होणे गरजेचे आहे. बीड शहरात सगळीकडे अस्वच्छता वाढल्याने रोगराईने शहरात अनेक भागात चांगलेच तोंड वर काढले आहे. गणेपती बाप्पाचे आगमन होणार असल्याने बीड शहरात तात्काळ स्वच्छता होणे फार गरजेचे बनले आहे.  सविस्तर माहिती अशी की बीड शहरातील मुख्य बसटॅन्ड पाठीमागील रस्त्यावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रोडवरुन जात असताना सडलेल्या अवस्थेत कचरा, मरुन पडलेले जनावरे, रोड लगत घाण पाणी, सडलेले प्लास्टिक पिशव्यांचे ढिगारे अशे अनेक चित्रं आहेत. वर्षातील बारा महिने ईथे हिच परिस्थिती असते या रोडवरुन जातांना लोकांना अक्षरशा नाकाला दाबुन जिव मुठीत घेऊन जावे लागते ईथे दोन- मिनेट थांबने म्हणजे मोठ्या रोगाला आमंत्रण मिळणे आहे. अनेकदा बातमी व्दारे कळवुन सुध्दा बीड नगर परिषद ला इथे स्वच्छता करण्यास जाग आली नाही??

ऊसतोड मजुरांकडून होणारी मुकदमांची फसवणूक थांबवा!

Image
निर्व्यसनी मजुरांनाच मुकादमांनी उचल द्यावी - युवा मुकादम गौतम कांबळे यांचे आवाहन बीड(प्रतिनिधी): - बीड जिल्ह्यात ऊस तोडणी कामगारांची संख्या जास्त असल्याने कारखानदारांना कामगार पुरवण्याकरिता मधला दुवा म्हणून मुकादम काम काम करत असतो. मात्र काही वेळा या प्रक्रियेत मुकादमांनाच आर्थिक नुकसानीचा सामना करण्याची वेळ येत आहे. यावर मुकादम संघटनेने तोडगा काढून निर्व्यसनी मजुरांनाच ऊस तोडणीसाठी उचल द्यावी असे आवाहन युवा मुकादम गौतम कांबळे यांनी केले आहे. व्यसनाधीन ऊसतोड मजुरांकडून मुकदमांच्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. उचलीच्या नावाखाली ऊसतोड मजूर मुकादमाला लाखोचा गंडा घालत आहेत. आपली चैन भागवण्यासाठी दोन-तीन मुकादम यांच्या कडून उचल घेणे आणि शेवटी त्यांच्याकडे कानाडोळा करून पसार होणे असे प्रकार घडत असल्यामुळे मुकादमांवरच आर्थिक संकटाची वेळ आली आहे. काही मुकादम व्याजाने पैसे काढून मजुरांना ते पैसे पुरवतात अशा परिस्थितीत मुकादमांची फसवणूक झाल्यास दाद मागायची कोणाकडे? हा प्रश्न आता ऊसतोड मुकादम यांच्या पुढे उभा राहिला आहे. घेतलेल्या उचली बाबत ऊसतोड मजुरांना तू कामावर का येत न

गणेश उत्सवाला पोलिसांना सहकार्य करा, दिलीप जाधव

Image
वडवणी प्रतिनिधी  गणेश उत्सव ला पोलिसांना सहकार्य करा व पोलिसांच्या हस्ते गणपतीची आरती करा, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना वडवणी तालुका अध्यक्ष दिलीप जाधव कुठेही अडचणीला पोलिसांना मदत सहकार्य करणारे युवा नेते सदैव पोलिसांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून दिलीप जाधव यांच्याकडे पाहिले जाते, पोलीस बॉईज संघटना महाराष्ट्र राज्य हे फक्त पोलिसांसाठी संघटना आहे ,संस्थापक अध्यक्ष राहुल भैया दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते तालुकाध्यक्ष दिलीप जाधव गेली अनेक वर्षापासून पोलिसांच्या संपर्कात आहेत, त्यामुळे येणाऱ्या गणपती विसर्जनापर्यंत पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान पोलीस बॉईज संघटनेचे वडवणी तालुका अध्यक्ष दिलीप जाधव यांनी केले आहे,

बालाजी व स्वातीने आठ दिवसांनी आधी प्रेमाचा आठवडा साजरा केला

Image
बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील बालाजी मच्छिंद्र बुधनर, या युवकांनी आपल्या पत्नीसह आधी प्रेमाचा आठवडा साजरा केला,  लग्नाचा वाढदिवस साजरा करावा म्हणून बालाजी व स्वाती यांनी आठ दिवसाने आधीच प्रेमाचा आठवडा साजरा केला.... या प्रेमाच्या आठवड्यात प्रत्येक दिवशी ते रोज नवीन ठिकाणी फिरायला जायचे. मंदीर देवस्थांनी ,यांच्या फुलपाखरू मालिकेतील वैदेही- मानस जोडी प्रमाणे ते एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम करतात.     28 ऑगस्ट ला बालाजी बुधनर चा वाढदिवस व 29 ऑगस्ट ला त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आणि त्यानिमित्ताने 22 ऑगस्ट पासून या जोडीने प्रेमाचा आठवडा साजरा केला, व 29 तारखेला प्रथम लग्न वाढदिवस साजरा केला.        अनोख्या पद्धतीने लग्न वाढदिवस साजरा करण्याचा हेतूने त्यांनी 29 ऑगस्ट रोजी घरामध्ये सत्यनारायणाची पुजा व महाप्रसादाचा छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता.     या कार्यक्रमाला मित्रपरिवार, सामाजिक, धार्मिक,राजकीय पक्षातील अनेक मान्यवर पदाधिकारी, विविध संस्थाचे पदाधिकारी, हितचिंतक आप्तेष्टगण, नातेवाईक आणि कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.         उपस

मातोश्री पांदन रस्त्याच्या कामावर मंजूरा ऐवजी जे.सि.बी.मशिद्वारे कामे सरपंच ग्रामसेवकावर चौकशी करून गुन्हे दाखल करा - किशोर नागरगोजे

Image
पाटोदा (गणेश शेवाळे )पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथील मातोश्री पांदन रस्त्याच्याचे दोन कामे चालू असून या दोन्ही रस्त्याचे कामाचे अगोदर हाजरी पत्रक भरुन एकाच रात्री मध्ये दोन्ही रस्ते जे.सि.बी.मशिनने कामे केली आहेत झालेले कामे हे अंदाज पत्रकाच्या दर्शविलेल्या मोजमापा नुसार केलेले नाहीत तसेच योजनेच्या नेमानुसार संबधित रस्त्याचे काम झाली नाहीत संबंधित रस्ता हा पांदन रस्ता नसुन हा वस्ती रस्ता असल्यामुळे प्रशासनाची दिशाभुल करून फसवणूक केली तर रस्त्यावरील हाजरी पटावर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्याच कुटूंबातील नातलग व्यक्ती आहेत.गावातील सर्व सामान्य मजुराला कामा संबधीत कसलीच माहिती देण्यात आलेली नाही. यावरुन वरील सर्व बाबीचे निरीक्षन केले असता संपुर्ण रित्या शासनाची फसवणुक चालु आहे.तरी या कामाचे अंदाजपत्रक, प्रशासकिय मान्यतेसाठी ग्रा.प.ने दिलेल्या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती तपासून सर्व बाबींची सखोल चौकशी करुन सरपंच ग्रामसेवाकावर ४२० चा गुन्हा दाखल करुन भरले हजेरीपट लवकरात लवकर रद्द करून कार्यवाही करावी नसता लोकशाही पध्दतीने अंदोलन करण्यात येईल असा इशारा येवलवाडी गावच

बदनापूरात बसस्थानक होणार-आ. नारायण कुचे

Image
बदनापूर तालुका हा १९९२ ला निर्मीत झाला असून तेव्हा पासून बदनापूर तालूक्यासाठी बसस्थानक नसल्याने बाहेर गावाहुन येणाऱ्या प्रवाशांना व तालूक्यातील नागरीकांना प्रवास करण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. या विषयावर मी विधानसभेत २०१६ च्या अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थीत करून शासनाचे लक्ष वेधले होते. प्रलंबित असलेल्या बसस्थानकाच्या जागेविषयी आमदार श्री.नारायण कुचे साहेब यांनी जिल्हाधिकारी श्री.विजय राठोड साहेब यांच्यासह व संबधीत सर्व विभागाच्या अधिकारी यांना घेऊन जागेची स्थळ पाहणी केली, यावेळी संबधीत गट नं २३७ हि जागा शासनाच्या नॅशनल हायवे नियमानुसार योग्य असून या जागेवर बसस्थानक बांधकामासाठी निधी मंजूर करण्याचे ठरले आहे. यावेळी सोबत उपविभागीय दंडाधिकारी श्री.सानप साहेब, नॅशनल हायवे कार्यकारी अभियंता श्री.बंडे साहेब, उप अभियंता यशवंत जाधव साहेब, जालना परीवहन मंडळाचे जिल्हा नियंत्रण श्री.नेहुल साहेब, तहसीलदार मूनलोड साहेब, कार्यकारी अभियंता सा.बां. कोल्हे साहेब, शाखा अभियंता राठोड साहेब, परीवहन मंडळाचे शाखा अभियंता झाल्टे साहेब, नगरपंचायत ठुबे साहेब, मंडळाधिकारी पाऊलबुद्धे सा

अजिंठा ग्रामीण रुग्णालयाचे होणार उपजिल्हा रुग्णालय

Image
 कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश; 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे विशेषबाब म्हणून होणार 50 खाटांचे श्रेनिवर्धन मुंबई, (प्रतिनिधी, ता. 29) : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड - सोयगाव विधानसभा मतदारसंघातील अजिंठा येथे सध्या ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र हे ग्रामीण रुग्णालय पुरेसे नाही. त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ३० खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून त्याचे पन्नास खाटांचे उप जिल्हारुग्णालय करण्यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाला कळविले होते. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजिंठा ग्रामीण रुग्णालयास 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास आरोग्य विभागाने विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच या कामात सुरुवात होणार आहे.   इमारत अत्याधुनिक व्हावी असा कृषीमंत्री सत्तारांचा मानस...  सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्या ठिकाणी सुसज्ज आणि अत्याधुनिक रुग्णालयाची इमारत बांधण्याचा मंत्री अब्दुल सत्तार यांचा मानस

लासलगाव विंचूरसह सोळागाव योजनेच्या नूतनीकरणाचे काम तातडीने सुरू करा - छगन भुजबळ

Image
सोळागाव पाणी पुरवठा योजनेस आठवडाभरात कार्यारंभ आदेश; मंत्री छगन भुजबळ यांची पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा सोळागाव पाणी पुरवठा योजनेचा विद्युत प्रवाह खंडित होणार नाही याबाबत छगन भुजबळ यांच्याकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना नाशिक,लासलगाव,दि.२९ ऑगस्ट :- लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणी पुरवठा योजनेच्या कामास आठवडाभरात कार्यारंभ आदेश प्राप्त होणार आहे.नूतनीकरणाच्या कामास तातडीने सुरुवात करण्यात यावी अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कुठल्याही परिस्थितीत योजनेचा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.  लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणी पुरवठा योजना आढावा बैठक माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत लासलगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांनी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांच्याशी

राष्ट्र सेवा दला तर्फे बाल विद्या निकेतन शाळेत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा.

Image
मालेगाव (प्रतिनिधी) - येथील राष्ट्र सेवा दलाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने बाल विद्या निकेतन प्राथमिक शाळा, मालेगाव कॅम्प येथे प्रतिकात्मक कबड्डी सामना खेळून हॉकीपट्टू मेजर ध्यानचंद, तसेच राष्ट्रीय स्तरावरील, उत्कृष्ट कबड्डीपटू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी राष्ट्र सेवा दल तालुका संघटक सारंग पाठक, जिल्हा संघटक पत्रकार रविराज सोनार, जेष्ठ सेवा दल सैनिक व विद्यापीठ स्तरावराचे खेळाडू अशोक पठाडे, नाशिक जिल्हा संघठक नचिकेत कोळपकर उपस्थित होते. प्रास्ताविकात नचिकेत कोळपकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिना बद्दल माहिती दिली. मुलींच्या कबड्डी संघाच्या दोन संघाचे नेतृत्व प्रतिज्ञा बोराळे व मेघा शिंदे यांनी केले. स्पर्धा निर्णायक अशोक पठाडे यांनी टॉस उडवून स्पर्धेस सुरवात केली. ३० मिनिटाच्या स्पर्धेत मेघा शिंदे हिच्या संघाने प्रतिज्ञा बोराळेच्या संघातील सर्व गडी बाद करून १७ मिनिटांत सामना जिंकला. सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. चॉकलेट वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सारंग पाठक यांनी सर्वांचे आभार मा

रमेश भावले यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाली सर्कल प्रमुख पदी निवड

Image
बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे नुकत्याच निवडी जाहीर झाले असून, त्यामध्ये आज रमेश भावले यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाली सर्कल प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल, त्यांचा सत्कार करताना व नियुक्तीपत्र देताना राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर, शहराध्यक्ष शिवाजी चांगण, शहर उपाध्यक्ष रामा लकडे, भगवान माने सर, काशीद सर, सचिन टेगंल, तुषार , प्रेम धायगुडे,कल्पेश भोंडवे विक्रम बप्पा सोनसळे, गोवर्धन गोरे, प्रकाश घुगे, आधी उपस्थित होते

गेवराई उपजिल्हा रुग्णालय येथे हर्बल गार्डन कामास सुरुवात

Image
गेवराई ( सखाराम पोहिकर ) गेवराई विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्य दक्ष . कार्यसम्राट . लोकप्रिय आमदार अॅड लक्ष्मण ( आण्णा ) पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करत हर्बल गार्डन कामाला आज सुरुवात करण्यात आली यावेळी या उदघाटन कार्यक्रमास गेवराई नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मा . श्री . राजेंद्र ( दादा ) राक्षसभूवनकर . नगरसेवक आप्पासाहेब कानगुडे माजी नगराध्यक्ष ब्रम्हदेव धुरंधरे पत्रकार सुभाषराव सुतार . भागवतराव जाधव . युवा पत्रकार गोपाळ चव्हाण . इम्रानभाई पठाण . स्वियं सहाय्यक प्रा . येळापुरे सर गेवराई उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ . चिचोले साहेब . डॉ . शिदे . डॉ . रोफ. डॉ . रादंड . डॉ . पारखे . डॉ . शेख . मंगेश खरात व वैद्यकिय सर्व स्टॉफ व कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते

बंजारा युवकांची राष्ट्रीय बंजारा परिषद कडे ओढा :पंचवीस पदाधिकाऱ्यांची निवड

Image
 गेवराई प्रतिनिधी :-राज्यात आणि बीड जिल्ह्यात बंजारा युवकांची राष्ट्रीय बंजारा परिषद कडे ओढ असून शेंकडों युवक दररोज आरबीपीचे सदस्यता स्वीकारत आहेत.भविष्यात राष्ट्रीय बंजारा परिषद गोर समाजाचे सर्वाधिक कार्यकर्ते असलेले मोठे सामाजिक संघटन असेल अशी सर्वदुर चर्चा होत आहे.      बंजारा समाजाची धर्मसत्ता मजबूत करुन गोर बंजारा समाजाला राजसत्तेकडे नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न व आवाहन करणारी देशातील सर्वात मोठी व चर्चेत असलेली संघटना राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या बीड जिल्हा गेवराई तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यासाठी रविवार दि.२७ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण होते. जिल्हा अध्यक्ष बाजीराव राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत युवा आघाडी, विद्यार्थी आघाडी,सोशल मीडिया आघाडी आणि फादर बॉडीची तालुका, जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली.गेवराई तालुक्यातील चाळीस पेक्षा तांड्यावरील बैठकीला उपस्थित  होते.त्यापैकी पंचवीस पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना

विठ्ठल खातळे यांची सांजेगाव-नांदडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड

Image
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- (नवनाथ गायकर यांजकडून )-इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव-नांदडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेना शाखाप्रमुख विठ्ठल खातळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.    सरपंच निताताई शंकर गोवर्धने यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामपंचायतीची विशेष सभा घेण्यात आली होती.     या अगोदर सदस्यांत ठरलेल्या समझोता प्रमाणे विद्यमान उपसरपंच यांचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांनी स्वखुशीने राजीनामा दिला होता.त्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते.    या पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत विठ्ठल खातळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड ग्रामपंचायत कार्यालयात झाल्याची सरपंच निताताई शंकर गोवर्धने, ग्रामसेवक पाटिल यांनी घोषणा केली.    यावेळी सदस्य मुक्ताबाई गोवर्धने, सिंदुबाई काळे, मंगेश शिंदे, इंदुबाई गोवर्धने, माचिंद्र गोवर्धने, तानाजी सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. बिनविरोध निवडणुक झाल्यानंतर सदस्य आणि ग्रामस्थांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन विठ्ठल खातळे यांचा सत्कार व अभिनंदन केले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.    यावेळी केरू गोवर्धने,शंकर गोवर्धने, खंडू

शहरातील उड्डाणपूलाखालील सौंदर्य अबाधीत ठेवा - छगन भुजबळ

Image
मुंबई नाका ते द्वारका परिसरात उड्डाणपूलाखाली संसार थाटलेल्या फुल विक्रेत्यांसह अनधिकृत व्यावसायिकांची पर्यायी व्यवस्था करा - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ नाशिक, दि.२९ ऑगस्ट :- नाशिक शहरातील मुंबईनाका ते द्वारका परिसरात उड्डाणपूलाखाली फुल व इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या पथविक्रेत्यांनी आपला संसारच याठिकाणी थाटला असून शहरातील मध्यवर्ती भागात अतिशय विदारक दृश्य बघावयास मिळत आहे. त्यामुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून या अनधिकृत व्यावसायिकांची पर्यायी व्यवस्था करून उड्डाणपूला खालील सौंदर्य अबाधित ठेवा अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक मनपा आयुक्त,पोलीस आयुक्त व महामार्ग प्रशासन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नाशिक शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. शहराचे अधिक सौंदर्य अधिक वाढावे यासाठी उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूला फुलझाडे लावण्यात आलेली आहे. मात्र मुंबई नाका ते द्वारका परिसरात फुल व इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी थेट या उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूस संसार थाटला आहे. याठिकाणी लावण्यात आलेली फुल झाडे देखील त्यांनी

प्रेरणादायी व्याख्याते राजेश दिवटे यांना रुबाबदार महाराष्ट्र सन्मान

Image
बीड प्रतिनिधी  रुबाबदार महाराष्ट्र मीडिया ही सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जीवन प्रवास जगासमोर आणण्याचे काम करते तसेच त्याचा सन्मान करू त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देते.  रुबाबदार महाराष्ट्र मिडीयाच्या कट्ट्यावर युवा प्रेरणादायी व्याख्याते राजेश दिवटे यांना निमंत्रित करण्यात आले होते या कट्ट्याच्या माध्यमातून दिवटे यांची मुलाखत घेतली व रुबाबदार महाराष्ट्र मीडियाचे संचालक अभिनेते सागर शेलार, प्रसिद्ध निवेदिका वर्षाराणी शालगर यांच्या हस्ते " रुबाबदार महाराष्ट्र सन्मान " देण्यात आला. राजेश दिवटे हे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभरातील युवकांसाठी प्रेरणादायी कार्य करत आहेत त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधील शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना मोफत प्रेरणादायी मार्गदर्शन केले आहे,आतापर्यंत 55 हाजर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला आहे तसेच त्यांनी झुंज दिव्यांग संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजू दिव्यांग बांधवांना मोफत कौशल्य प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन करतात तसेच

स्नेहा मडावी महिला कर्तव्य दक्ष पत्रकार यांना जॉय सामाजिक संस्था मुंबई तर्फे सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले

Image
बीड ( सखाराम पोहिकर ) पुणे जिल्ह्यातील हाडपसर येथील कर्तव्य दक्ष . सामाजिक कार्यात सर्व पक्षीय राजकारण न करता आपल्या लेखनीतून सर्व सामान्य नागरीकाना न्याय देण्यात सर्व पुढे जाऊन काम करणाऱ्या महिला म्हणजे स्नेहा मडावी यांच्या पत्रकारेतुन दिन दुबळ्यानां न्याय देण्यासाठी रात्र दिवस सतत कार्यरत आहेत आशा कर्तव्य दक्ष महिलाचा सन्मान करण हे आमच कर्तव्य समजून आम्ही आमच्या जॉय सामाजिक संस्था मुंबई तर्फे सन्मान पत्र देऊन सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले व पुढील काळात त्याच्या हातून आसेच समाज कार्ये घडो हीच आपेक्षा आम्ही बाळगतो तेव्हा हा सन्मानपत्र मिळताच हाडपसर परीसरातील नागरीकांचा आंनद गगनात मावेनासा झाला आहे स्नेहा मडावी यांच्या मित्र परीवार . नातेवाईक यांच्या कडून शुभेच्छा चा वर्षेवा होत आहे

संपादक विश्वनाथ शरणागत यांचा जॉय सामाजिक संस्था मुंबई तर्फे सन्मानपत्र देऊन गौरव

Image
बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील रामपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते व गोर गरीब . दिन दलीत दुबळ्याच्या मदतीला धावून जातात ते म्हणजे विश्वनाथ शरणागत यांच्या कामाची दखल मुंबई येथील  जॉय सामाजिक संस्थेर्ने दखल घेऊन त्याना व स्नेहा मडावी यांना पण संन्मान पत्र देण्यात आले या दोन सामाजिक कार्यकर्तेना या संस्थेने सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले हि माहिती गेवराई तालुक्यातील सर्व मित्र  मैत्रिणींना घरच्यांना नातेवाईक . सामाजिक कार्यकर्ते . राजकिय पदाधिकारी यांच्याकडून शुभेच्छा चा वर्षेव होत आहे व पुढील काळात आपल्या हातून आसेच सामाजिक कार्य घडो हीच आपणाकडून आपेक्षा 

शिवसेनेच्या पाटोदा तालुका प्रमुख पदी राहुल चौरे यांची निवड झाल्याने तालुक्यात जल्लोष

Image
पाटोदा (गणेश शेवाळे)शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पाटोदा तालुका प्रमुख पदी युवानेते राहुल चौरे यांची नियुक्ती करण्यात आली तालुका कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज शिवसेना जिल्हा कार्यालयातून जाहीर केल्या.यामध्ये पाटोदा तालुका प्रमुख पदी राहुल चौरे यांची निवड झाल्याने पाटोदा तालुक्यात जल्लोषाचे वातावरण असून निवडी बाबत बोलताना राहुल चौरे मनाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत.यामध्ये माझी पाटोदा तालुका प्रमुख पदी निवड केल्याने प्रथम शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघेंच्या स्मृतीस प्रथम अभिवादन करून महाराष्ट्र राज्याचे खणकर लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा तालुक्यात शिवसेना पक्ष गावागावात घरो घरी गल्ली बोळात वाढण्यासाठी संपूर्ण ताकदीने संपर्क प्रमुख व जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शना खाली काम करील असे मत नवनिर्वाचित शिवसेना तालुका प्रमुख राहुल भैय्या चौरे यांनी व्यक्त केले शिवसेना तालुका प्रमुख राहुल चौरे यांची निवड झाल

खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे बावीस गावच्या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

Image
पैठण उजव्या कालव्याद्वारे लाभ क्षेत्रात सोडण्यात आले पाणी ; माजलगाव तालुक्यातील पिकांना मिळणार नवसंजीवनी शेतकऱ्यांच्या वतीने भाजप तालुकाध्यक्ष अरुण आबा राऊत व जिल्हा सचिव बबन बाप्पा सोळंके यांनी खा.प्रितमताईंचे मानले आभार माजलगाव   नाथसागर धरणातून सोडलेले पाणी माजलगाव तालुक्यातील लाभ क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शेतीसाठी सोडण्यात यावे या शेतकऱ्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी पाटबंधारे विभागाला लाभ क्षेत्रातील शेतीसाठी पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या, त्यांच्या मागणीला पाटबंधारे विभागाने सकारात्मक प्रतिसाद देऊन उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडले आहे, या निर्णयामुळे तालुक्यातील बावीस गावच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील पंधरा दिवसांपासून पर्जन्यवृष्टीत खंड पडल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, माजलगाव धरणात नाथसागरातून पाणी सोडण्यात आले असल्यामुळे धरणात मुबलक पाणी होते. परंतु लाभ क्षेत्रातील गावांना या पाण्याचा शेतीसाठी लाभ होत नसल्याने ‘धरण उशाला आणि कोरड घश

गेवराई शहरात पोळा सण उत्साहात साजरा:-शिवराज पवार यांच्या हस्ते तोडले तोरण

Image
गेवराई प्रतिनिधी:-शहरात रीती रिवाजाप्रमाणे बैल पोळा हा सण शास्त्री चौक येथील हनुमान मंदिर येथे गेवराईचे पाटील शिवराज बाळराजे पवार यांच्या हस्ते तोरण तोडून पोळा फोडण्यात आला गेल्या दोन वर्षात कोविडमुळे अनेक सनांवर मर्यादा आल्या होत्या परंतु तब्बल दोन वर्षानंतर यावेळी मात्र पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या बैलाचा पोळा सण उत्साहात साजरा केला.दरम्यान गेवराई शहरातही दि:-26 ऑगस्ट रोजी पोळा हा सन प्रतिवर्षाप्रमाणे रिती रिवाजानुसार मानाचे पाटील युवा नेते शिवराज (दादा)पवार यांच्या हस्ते तोरण तोडून पोळा फोडून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली,यावेळी गेवराईचे पाटील कार्यसम्राट आ.ॲड.लक्ष्मण पवार,तहसीलदार सचिन खाडे,डीवायएसपी स्वप्नील राठोड, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर,युवा नेते आदित्य पवार,पो.नि.रवींद्र पेरगुलवार,मंडळाधिकारी जे.एस.लेंडाळ, तलाठी माणिक पांढरे,नगरसेवक राहुल जीजा खंडागळे,नगरसेवक भगवान घुंबार्डे,पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर,दादासाहेब गिरी,जान मोहंमद बागवान,अरुण मस्के,अजित कानगुडे,भारत गायकवाड,सचिन मोटे,उद्धव मडके,करण जाधव,महेश सौंदरमल,याहीया खान,संजय इंगळे माणिक

जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांच्या उपस्थितीतशिवसैनिकांचा गेवराईत मेळावा संपन्न

Image
गेवराई ( प्रतिनिधी ) शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांच्या उपस्थितीत दिनांक 24 ऑगस्ट रोजी गेवराई माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळावा संपन्न झाला.        मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ एम एस इंदानी तर शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, युवानेते रोहित पंडित, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, जिल्हा संघटक नितीन धांडे, बीड तालुकाप्रमुख गोरखनाथ सिंघन, जिल्हा परिषद सदस्य युवराज डोंगरे पं स सदस्य महादेव औटी, आयुबभाई पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गेवराई तालुकाप्रमुख कालिदास नवले यांनी तर सूत्रसंचालन उपतालुकाप्रमुख दिनकर शिंदे यांनी केले. यावेळी बोलताना युवा नेते रोहित पंडित म्हणाले की, बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुक्यात शिवसेना आजही मजबूत आहे आणि दिवसेंदिवस ती मजबूत होत राहील. त्यासाठी पक्षाने त्यांच्या पाठीशी ताकद उभा करणे गरजेचे आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे धनुष्य चिन्ह त्यांना मिळाले असते तर बदामराव पंडित हे प्रचंड मताधिक्क्याने वि

स्वाभिमानाने राजकारण करण्यासाठी मनसे ची सदस्य नोंदणी करून महाराष्ट्र ला बळ द्या - राजेंद्र मोटे

Image
गेवराई :-गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबई येथील रविंद्र नाट्यगृह येते पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी बैठक घेऊन राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करत ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात केली असून नागरिक व तरुणांनी आपली ऑनलाईन नोंदणी करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ताकद निर्माण करावी असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी केले आहे. देशासह राज्यात राजकारणाचा बाजार सुरू असताना या सर्वच राजकीय पक्षांच्या विरोधात लढा उभारून युवकांच्या व राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या लढ्यासाठी सक्षम नेतृत्व असलेले मनसे प्रमुख राज साहेब ठाकरे यांना बळ देण्यासाठी तरुणांसह नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी करून या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्यासाठी मनसेला बळ देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिक व तरुणांनी आपली ऑनलाईन सदस्य नोंदणी करून पक्षाला बळ द्यावे असे आवाहन केले. दरम्यान ही सदस्य नोंदणी ऑनलाईन पद्धतीने असून यासाठी स्कॅनर द्वारे व 8860300404 या नंबर वर कॉल करून देखील मनसे चे प्राथमिक सदस्य होता येण

राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या गेवराई तालुका बैठकीचे आयोजन

Image
गेवराई -- भगवंत सेवक,दानशूर नेते आदरनिय किसनभाऊ राठोड यांच्या सक्षम नेतृत्वात राष्ट्रीय बंजारा परिषद व गोर धर्मची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी व बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची इच्छा असणारे जिल्हा व तालुका स्तरावरील अभ्यासू आक्रमक निस्वार्थी व धाडसी पदाधिकारी निवडण्यासाठी रविवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह गेवराई येथे सकाळी ११ वाजता महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे,अशी माहिती राष्ट्रीय बंजारा परिषदेचे गेवराई तालुका अध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिली. या बैठकीत गेवराई तालुक्यातील सर्व तांड्यावरील अडीअडचण प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण हे राहणार असून प्रदेश उपाध्यक्ष जीवनभाऊ राठोड,काठोडा येथील संत रामराव महाराज गडाचे महंत सुंदरसिंग महाराज व आरबीपीचे नुतन बीड जिल्हाअध्यक्ष बाजीराव महाराज राठोड, बीड तालुका अध्यक्ष बाळराजे राठोड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या बैठकीत भविष्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व

श्री साईबाबा संस्थान व्यवस्थापन समितीची बैठक शिर्डी येथे संस्थानचे अध्यक्ष नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली

Image
यावेळी गरजू रुग्णांना १ कोटी ९५ लक्ष रुपये वैद्यकीय मदत देणे, पॅरामेडिकल स्टाफची पगारवाढ करणे आणि स्वाईन फ्लु व कोविडसाठी स्वतंत्र आयसोलेशन वार्ड बनवणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली. तसेच संस्थानमध्ये चोरी करणाऱ्यांची गय करू नका अशा सूचना यावेळी नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी दिल्या. श्री साईबाबा मंदिरात भाविकांच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या संख्येमुळे दर्शन घेण्यास येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी बनवण्यात येत असलेल्या नवीन दर्शन रांगेचे काम लवकरच पूर्ण होणार असून त्यामुळे भाविकांचे दर्शन अधिक चांगले होण्यास मदत होणार आहे. श्री साईबाबा समाधी मंदिरात हार - फुले नेऊ नये याचा निर्णय मागील कमिटीने घेतला होता. शिर्डी परिसरात हार - फुले विकण्याच्या नावाखाली अनेक वेळा भाविकांची लूट केली जाते व त्यामुळे शिर्डीचे नाव बदनाम होत असून हार - फुले मंदिरात नेण्यास बंदी कायम ठेवावी असे निवेदन सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने विश्वस्त मंडळाला देण्यात आले आहे. अशा अनेक तक्रारी भाविकांनी विश्वस्त मंडळातील सदस्यांकडेही केल्या आहेत. त्यामुळे हार - फुले नेण्याबद्दल सर्वपक्षीय ग्रामस्थ व भविकांशी

राज्यस्तरीय युवा समाजरत्न पुरस्काराने सामाजिक कार्यकर्ते राजेश दिवटे सन्मानित

Image
बीड प्रतिनिधी दिव्या शिक्षण प्रसारक मंडळ पुणे यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा 2022 या वर्षाचा राज्यस्तरीय युवा समाजरत्न पुरस्कार यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष तसेच झुंज दिव्यांग संस्थेचे कार्याध्यक्ष ,प्रेरणादायी वक्ते लेखक राजेश दिवटे यांना देण्यात आला.राजेश दिवटे हे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभरातील युवकांसाठी प्रेरणादायी कार्य करत आहेत त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधील शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना मोफत मध्ये प्रेरणादायी मार्गदर्शन केले आहे आतापर्यंत 55 हाजर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला आहे तसेच त्यांनी झुंज दिव्यांग संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजू दिव्यांग बांधवांना मोफत कौशल्य प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन करत आहे आहेत तसेच विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची उभारणी केली आहे राजेश दिवटे यांनी " यश तुमचेच " प्रगतीला पंख नवे " संघर्षाशी दोन हात " झिरो ते हिरो एक प्रवास " या चार प्रसिद्ध प्रेरणादायी पुस्तकांचे

महिलांना न्याय देण्यास असमर्थ ठरलेल्या निष्क्रिय राज्य महिला आयोग समिती बरखास्त करा मुख्यमंत्र्यांकडे किस्किंदाताई पांचाळ यांची मागणी

Image
बीड प्रतिनिधी:- महाराष्ट्रराज्य महिला आयोग समिती महिलांना न्याय मिळवून देण्यास असमर्थ असुन केवळ राजकीय हेतुने किंवा एखाद्या राजकीय पक्षाची मालकीहक्क असलेली राज्य महिला आयोग समिती बरखास्त करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तथा विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष किस्किंदाताई पांचाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदनाद्वारे केली असून मुख्यमंत्री महोदयांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.  आझाद मैदानात २ महिन्यापेक्षा ज्यास्त दिवस आमरण उपोषण करून सुद्धा भेट घेऊन दखल घेतली नाही महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर -किस्किंदाताई पांचाळ   बीड जिल्ह्य़ातील महाराष्ट्र महिला आयोग समिती सदस्य संगीता चव्हाण यांनी केलेली महिलांची आर्थिक फसवणूक तसेच अन्य गैरव्यवहार प्रकरणात चौकशी करून नियमानुसार आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी किस्किंदा पांचाळ यांनी आझाद मैदान मुंबई येथे दि.२५ एप्रिल २०२२ ते २४ जुन २०२२ पर्यंत सलग २ महिन्याहून अधिक दिवस त्या नंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले म्हणून आंदोलनला स्थगितदिली दि. 22 ऑगस्ट पासून स

राज समाजाच्या वतीने आमदार सुरेश धस यांचे पाटोद्यात जंगी स्वागत

Image
 राज समाजाचा कब्रस्थानचा प्रश्न सोडवा म्हणून राज समाजाचे आमदार सुरेश धस यांना निवेदन याआधीही आमदार धस यांनीच निधी दिला होता आताही तुम्हीच सोडवाणार राज समाजाची आमदार धसवर आपेक्षा पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा शहारातील राज कब्रस्थानला संरक्षण भिंत कंपाऊटवाल व सुशोभीकरणासाठी निधीची गरज आहे पाटोदा शहरातील पुला जवळी राज कब्रस्तानाला वॉल कंपाऊंड नसल्यामुळे या कब्रस्थान मध्ये बाजुच्या नदीचे पाणी आतमध्ये जात असून गावातील भटके जनावरे व बाजारासाठी आलेले लोक या कब्रस्थान मध्ये लगवीसाठी जातात यामुळे कब्रस्थान मधील कबरीची विटंबना होते  त्यामुळे सदर कब्रस्थानला संरक्षण भिंत व सुशोभीकरण करणे आवश्यक आहे तसेच रोड लगत नाली बांधकाम करणे देखील अत्यावश्यक असल्यामुळे पाटोदा शहरातील राज समाजातील शेकडो नागरिकांनी आमदार सुरेश धस यांचे कब्रस्थान ठिकाणी जंगी स्वागत करून राज समाजाच्या कब्रस्थानाचा प्रश्न सोडवा अशी राज समाजानी मागणी केली याआधीही आमदार धस यांनीच निधी दिला व आताही आमचा प्रश्न तुमची सोडवताल आशी अशा राज समाजाला आहे आशे मत सामाजातीक नागरिकांनी वेक्त केले यावेळी नगराध्यक्ष सय्यद आबुशेठ देखी

इतिहासामध्ये लक्षात राहतील असे प्रकल्प राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात निर्माण करावे - छगन भुजबळ

Image
देश अखंड राहण्यास महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान महत्वाचे - छगन भुजबळ मुंबई,दि.२५ ऑगस्ट :- जगात सर्वात जास्त विविधता, जाती, धर्म, पंथ असलेला भारत हा आज पर्यंत अखंड राहीला. ज्यामुळे हा देश अखंड रहिला तो केवळ ‘हा भारत देश सर्वांचा आहे हे विचार’ आणि याचे सर्व श्रेय महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्याला द्यावेच लागेल असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त मांडण्यात आलेल्या अभिनंदन ठरावावर त्यांनी सभागृहात आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हा एक खंडप्राय देश रहावा यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वांना अभिवादन करावे लागेल. भारत हा “भारत” कसा झाला हे समजुन घ्यावे लागेल त्यासाठी इतिहासात देखील थोडे डोकवावे लागेल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना "हर घर तिरंगा " हा उपक्रम राबविण्यात आला तो राबवित असताना सरकारने सांगितले की भारतीय स्वातंत्र्याला ७