किस्किंदा पांचाळ यांना ‘समाजरत्न नारीशक्ती विशेष पुरस्कार २०२६’; ११ वर्षांच्या सामाजिक कार्याची पावती
बीड प्रतिनिधी : (दि.०१) शिर्डी येथे विश्वकर्मा वंशीय समाज संघटना, अहिल्यानगर परिवाराच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान व समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदा पांचाळ यांना ‘समाजरत्न नारीशक्ती विशेष सन्मान पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. शुभारंभ लॉन्स, निघोज-कोपरगाव हायवे, शिर्डी येथे झालेल्या या कार्यक्रमात सौ. रेखा राऊत व सौ. अश्विनी गडकर यांच्या हस्ते किस्किंदा पांचाळ यांना फेटा, ट्रॉफी, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या ११ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या किस्किंदा पांचाळ यांनी समाजातील गरजू, वंचित घटकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना त्यांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून गोरगरिबांसाठी एक महिना मोफत जेवणाची व्यवस्था केली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी ७५ हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सामान्य कुटुंबातून पुढे येत, कोणताही सामाजिक किंवा राजकीय वारसा नसताना स्वतःच्या जिद्द, मेहनत आणि ध्येयवेड्या वृत्तीच्या जोरावर त्य...