डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.
गेवराई ( प्रतिनिधी ) दि. 30 एप्रिल - गेवराई तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता गेवराई क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पत्नीने बेशुद्ध अवस्थेत दाखल केले. त्यावेळी रुग्णाचे तापमान १०५.६°F दर्शविणार्या उच्च श्रेणीतील तापासह त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक अवस्थेत होती. रुग्णाच्या मेंदूला ताप गेल्यामुळे त्यांची शुद्धी पूर्णतः विस्कळीत झाली होती व त्यांना स्टेटस एपिलेप्टिकस (सातत्याने येणाऱ्या फिट्स/सीझर) चा त्रास होत होता. या गंभीर अवस्थेमुळे भद्री भोसले यांचे घरचे व नातेवाईक पूर्णपणे घाबरले होते. त्यावेळी डॉ. दिपक फाटक यांनी नातेवाईकांना प्रकृती व उपचारपद्धत समजावून सांगितले व सर्वांना धीर दिला. यानंतर डॉ. दिपक फाटक यांनी रुग्णावर तात्काळ उपचार सुरू केले व NCCT ब्रेन (CT Scan) करून मेंदूची तपासणी केली. अशिक्षित असलेल्या नातेवाईकांना तपासणीचा अर...