Posts

Showing posts from October, 2023

गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणजे मराठा समाजाला आरक्षण

Image
बीड जिल्हा प्रतिनिधी सखाराम पोहिकर :- गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथील ग्रामस्थ व महिला भगिनींनी आज सकाळी 9--00 वाजता गढी येथील माजलगाव फाटा येथील चौकात मनोज जरागे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण व अन्नत्याग आसे उपोषण सुरू केले आहे जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही गढी येथील ग्रामस्थ व महिला भगिनींनी हे साखळी उपोषण सुरू राहील असे गढी येथील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले यावेळी उपस्थित युवक बाळासाहेब मुळीक.राहुल लोणकर . गणेश गायकवाड.मोहन घोंगडे.पदमाकर सिरसाट व महिला भगिनींनी नर्मदा सिरसट.मदा गायकवाड.ईत्यादी महिला व तरूण युवक या साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत या वेळी महिला भगिनींनीशी चर्चा करताना त्या अश्या म्हणाल्या की आमच्या मुलांना व मुलींच्या शिक्षणासाठी या आरक्षणाचा लाभ होईल तेव्हा या सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे या साखळी उपोषणात सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींनी बोलताना दिसत होत्या

मराठा आरक्षण प्रश्ननी सकल मराठा समाज यांच्या वतीने उद्या वैद्यकिन्हीत चक्काजाम आंदोलन

Image
पाटोदा (गणेश शेवाळे )सकल मराठा समाज यांच्या वतीने ५३८-ड राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता वैद्यकिन्ही, बेनसुर,सोनेगाव,वाघीरा, घाटेवाडी, रामेवाडी,वैजाळा सौंदाणा, पाचेगाव, दासखेड,पाचंग्री,मंझरीघाट, बोडखेवाडी,ब्राम्हणवाडी,बेडूकवाडी या गावातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने वैद्यकिन्ही येथे उद्या दि. ३१/१०/२०२३ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत उद्या चक्का जाम आंदोलन होणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी उद्या होणाऱ्या चक्काजाम आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे

पदर आईचा अन् आयुष्याचा.

Image
 गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 8888435869 खरं तर आईच्या पोटातच आधी आईची ओळख झाली  आणि मग नऊ महिन्यांनी तिच्या  पदराची ओळख झाली. पाजताना तिनं  पदर माझ्यावरून झाकला, आणि मी आश्वस्त झालो ... तेव्हापासून तो खूप  जवळचा वाटू लागला आणि मग तो भेटतच राहिला ...  आयुष्यभर शाळेच्या पहिल्या दिवशी  तो रुमाल झाला रणरणत्या उन्हात  तो टोपी झाला, पावसात भिजून आल्यावर  तो टॉवेल झाला घाईघाईत खाऊन खेळायला पळताना  तो नॅपकीन झाला प्रवासात कधी  तो अंगावरची शाल झाला  बाजारात भर गर्दीत कधीतरी  आई दिसायची नाही पण पदराच टोक धरून  मी बिनधास्त चालत राहायचो ... मग त्या गर्दीत  तो माझा दीपस्तंभ झाला गरम दूध ओतताना  तो चिमटा झाला उन्हाळ्यात लाईट गेल्यावर  तो पंखा झाला निकालाच्या दिवशी  तो माझी ढाल व्हायचा. बाबा घरी आल्यावर,  चहा पाणी झाल्यावर, तो पदरच प्रस्ताव करायचा .... छोटूचा रिझल्ट लागला... चांगले मार्क पडले आहेत एक-दोन विषयात कमी आहेत,  पण ... पण आता अभ्यास करीन असं म्हणतोय.. बाबांच्या संतापाची धार बोथट होताना मी पदराच्या आडून पाहायचो हाताच्या मुठीत पदराच टोक  घट्ट धरून ! त्या पदरानेच मला शिकवलं कधी

बहुजन विकास परिषेद च्या विविध पदांच्या निवडी जाहीर

Image
बीड प्रतिनिधी केज येथील मुक्ता मंगल कार्यालय मध्ये काल दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी बहुजन विकास परिषद च्या संकल्प मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे , प्रदेश अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष रमेश पाटोळे,मान्यवरांच्या हस्ते बहुजन विकास परिषेद उद्योग विकास आघाडीच्या बीड जिल्हा अध्यक्ष भागवत वैद्य सह। बीड जिल्हा अध्यक्ष गोरख भाऊ मोमीन व युवक जिल्हाध्यक्ष अंकुश रोकडे युवक उप जिल्हाध्यक्ष अनिल कटक बीड जिल्हा सचिव ऋषिकेश धुताडमल बीड जिल्हा संपर्कप्रमुख मसू भाऊ पवार बीड जिल्हा कार्याध्यक्ष सुधाकर कानडे सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. भागवत वैद्य यांनी महिला बचत गटाचे मार्फत अनेक उद्योग निर्माण केले असून बीड मध्ये पहिली महिला उद्योग परिषदचे आयोजन केले होते.आता बहुजन विकास परिषद च्या माध्यमातून रमेश तात्या गालफाडे यांच्या मार्गदर्शनाने महिलांना उद्योग ,व्यवसाय करण्यासाठी महिलांना विविध उद्योगांचे प्रशिक्षण देऊन उद्योग चालू करून द्याण्यासाठी त्यांना कच्चा माल पुरवठा करून त्यांनी बनविलेला मालाची मार्केटिंग देखील करण्यात येणार आहे.त्यासाठी बीड जिल्ह्यात बहुजन वि

एडीजीपी कृष्णप्रकाश (आयपीएस) यांच्यासह देशपातळीवरील तज्ञांनी केली प्रशंसा

Image
निसर्गोपचाराचे सिद्धांत व आरोग्य' या पुस्तकाचे भव्य प्रकाशन संपन्न ( प्रतिनिधी आशा रणखांबे ) पुणे                  " जागतिक अभिरुचीसंपन्न निसर्गशक्तीच्या एकत्रिकरणाचा आरोग्यदायी महासंकल्प " या सिद्धांताचा पाया रचून देश - विदेशामध्ये निसर्गोपचाराचा अनन्यसाधारण प्रचार - प्रसार करणारे ' मिशन नॅचरोपॅथी ' चे संचालक व सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ क्रांती कुमार महाजन यांनी लिहिलेल्या " निसर्गोपचाराचे सिद्धांत व आरोग्य " या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच भारतीय वायुसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे समारंभपूर्वक करण्यात आले . महाराष्ट्र राज्याचे अँडीशनल जनरल ऑफ पोलीस श्री. कृष्णप्रकाश (आयपीएस) यांसह भारतीय सेनेतील महावीरचक्र विजेता नायक दिगेंद्र कुमार , वायुसेनेचे एअर मार्शल भूषण गोखले , एअर मार्शल प्रदीप बापट , एअर वाईस मार्शल नितीन वैद्य , सैनिक कल्याण विभागाचे महासंचालक ब्रिगेडीयर राजेश गायकवाड , भारत सरकारच्या जी-20 सचिवालयाचे संचालक श्री. संजीव जैन्य , भारत सरकारच्या युवक कल्याण क्रीडा मंत्रालयाचे संचालक श्री. अतुल निकम , कृष्णलीला वृत्तसमूहाचे प्

उपोषणादरम्यान जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; समाजाला केले महत्वाचे आवाहन

Image
 गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 8888435869   मराठा आरक्षणासाठी समाजाच्या वतीने गावागावात साखळी उपोषण सुरू आहेत. त्या साखळी उपोषणाचे आज आमरण उपोषणात रूपांतर झाले आहे. साखळी उपोषण आणि आमरण उपोषणासाठी मराठा बांधवांनी आपापल्या हद्दीतील पोलीस स्टेशनला परवानगीचे अर्ज द्या म्हणजे सरकारला माहीत होईल की गावागावात आमरण उपोषण आणि साखळी उपोषण सुरू झाली आहेत, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना केलं. मनोज जरांगे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाचा आजचा पाचवा व उद्याचा साहवा दिवस सुरु झाला आहे दिवस असून पोटात अन्नपाणी नसल्यानं मनोज यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना आता बोलताना त्रास होत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपचार न घेण्याचा निर्धार मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी केला आहे. आरक्षण हेच माझे उपचार असे म्हणत आपण आरक्षण घेऊच, पण कोणीही आत्महत्या किंवा उग्र आंदोलन करू नये असे आवाहनदेखील मनोज जरांगे यांनी मराठा समाज बांधवांना केलं आहे.  शांततेच्या मार्गानेच मराठ्यांना आरक्षण मिळणार असून सर्वांनी आपली एकजूट कमी होऊ देऊ नका असंही मनोज जरांगे मराठा बां

मादळमोही येथे मोहिमाता देवी यात्रा उत्सव कोजागरी पौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी

Image
 गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 8888435869          गेवराई तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मोहिमाता देवी, मादळमोही येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.२८ ऑक्टोबर रोजी यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. दरम्यान यावेळी पंचक्रोशीतील महिलांसह पुरुष भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यात्रेनिमित्त मोहीमातेच्या मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर उजाळून निघाला आहे. यामुळे भाविकांच्या डोळ्याचं पारणं फिटले आहे.            मादळमोही येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मोहीमाता यात्रा उत्सवात शनिवारी सकाळी गंगेचे पाणी कावडीने आणून गावातील विविध मार्गावरून लेझीम, ढोल-ताशा, टाळमृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून अभिषेक करण्यात आला. तसेच भाविकांचा नवसाच्या बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान रात्री गावातून मोहिमाता देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री १२ वाजता फटाक्यांची आतिषबाजी करून, आकाशात आकाश कंदिल देखील सोडण्यात आले. या या

बहुजन विकास परिषदेच्या मराठवाडा उपध्याक्षपदी डॉ.चद्रशेखर गवळी यांची निवड

Image
बीड प्रतिनिधी सखाराम पोहिकर आज दिनांक 29/10/2023 रोजी दुपारी 2-00 वाजता केज येथील मुक्ताई लॉन्समध्ये बहुजन विकास परिषदेच्या संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बहुजन विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री रमेश तात्या गालफाडे यांनी डॉ चंद्रशेखर गवळी यांच्याकडे मराठवाडा विभागांमध्ये सर्व बहुजन बांधवांना एकत्र करून त्याची काम करण्याची संधी डॉ चंद्रशेखर गवळी यांना मराठवाडा उपध्याक्षपदी निवड करून त्यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बोलताना डॉ चंद्रशेखर गवळी म्हणाले की जी जिम्मेदारी तात्यांनी माझ्यावर दिली ती मी माझ्या परीने मराठवाड्यातील सर्व बहुजन बांधवांना न्याय हक्कासाठी मी कायम आपल्या सोबत राहील असे नियुक्ती पत्र घेताना बोलत होते यावेळी सर्व मित्र हितचिंतक यांच्या कडून शुभेच्छा संदेश मिळत आहे

के के वाघ विद्याभवनाचा प्रथमेश पवार राज्यस्तरीय स्पर्धेत पात्र

Image
भाऊसाहेबनगर-ता.२९- नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या (१७ वर्ष वयोगट) शालेय विभागीय तलवारबाजी स्पर्धेत के के वाघ विद्याभवन व ज्युनिअर कॉलेज भाऊसाहेबनगर येथील इयत्ता १० वी चा खेळाडू प्रथमेश पवार याने विभागीय तलवारबाजी स्पर्धेत स्वतःचे कौशल्य पणाला लावून यश संपादन केले व तृतीय क्रमांक मिळविला.त्यामुळे त्याची गोंदिया येथील जिल्हा क्रीडासंकुल येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय तलवार बाजी स्पर्धेसाठी निवड झाली.त्याबद्दल त्याचे व त्याचे क्रीडा मार्गदर्शक क्रीडाविभाग प्रमुख गोविंद कांदळकर,क्रीडाशिक्षक डि.के.मोरे यांचे के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीरदादा वाघ,सचिव के.एस.बंदी,विश्वस्त शकुंतलाताई वाघ,डॉ.व्यंकटेश माने,के के वाघ शिक्षण संस्था, जनसंपर्कप्रमुख अजिंक्य दादा वाघ,सौ.अवंतिकाताई वाघ,माजी प्रा.शिवाजी नाठे, प्राचार्य अशोक बस्ते,समन्वयक यशवंत ढगे,वर्गशिक्षिका गायत्री रत्नपारखी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन समारोपानिमित्त परळी शहरात भव्य धम्म रॅली संपन्न:

Image
परळी प्रतिनिधी   परळी येथील भिमवाडीच्या त्रिरत्न बौद्ध विहारात गेली आषाढ पोर्णिमा ते अश्विन पौर्णिमा पर्यंत या वर्षावासा निमित्ताने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भगवान बौद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे धम्म उपासीका रजनी गौतम आगळे यांनी त्रिरत्न बौद्ध विहारात नियमीत सायंकाळी ०७ ते ०८ वाजेपर्यंत पठन केले, तर सर्व महिला मंडळानी ग्रंथ समजून घेतला. अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने तथागत गौतम बुद्ध यांच्या भव्य मूर्तीची परळी शहरातून शांतता प्रिय भव्य मिरवणूक काढण्यात आली. महामानव आंबेडकरांनी लिहिलेला भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे बौद्ध समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी परळी येथील भिमवाडीच्या त्रिरत्न बौद्ध विहारात रजनी गौतम आगळे यांनी सतत तीन महिने वाचन केले. सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले . तथागत गौतम बुद्ध व महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्रिशरण पंचशील घेण्यात आले. त्या नंतर अश्वरथावर भव्य बुध्दाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली.  या मिरवणुकीमध्ये उपासक, उपासिका

संडे स्पेशल दणका मोडला मावा ब्रँडेड गुटखा खाणाऱ्या आणि विकणाऱ्यांचा मानका!!

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755  शेवगाव शहरासह तालुक्यांमध्ये गेल्या आठवड्यात अण्णा भेसळ निरीक्षक { Food Qualiti Dept. } अहमदनगर विभाग आणि गुन्हे अन्वेषण विभाग { एल. सी. बी. } अहमदनगर यांच्या धडक कारवाईनंतर ब्रँडेड गोवा गुटखा आर एम डी आणि सुट्टा मावा यांच्या खुल्या विक्रीवर पान स्टॉल वर मिळत नसले तरी गल्लीबोळा चौकांच्या कोपऱ्यात आणि काही ठराविक दुकानांमध्ये दाम दुप्पट भावा जोरदार विक्री सुरू असून हिरा पंधरा रुपये गोवा वीस रुपये आर. एम. डी. पन्नास रुपये सुट्ट्या माव्याची एक पुडी वीस रुपये मोठी पुडी चाळीस रुपये आणि पोत साठ रुपये अशी चढ्या भावाने विक्री सुरू असून काहींनी दुकानाच्या मागच्या दाराने तर काहींनी चौकाचौकात पिशव्या घेऊन माणसं बसविले आहेत काहींनी शहरातील माव्याचे निर्मिती केंद्र खेड्या पाड्यात हलवले आहे. मावा पाहिजे हिरा गोवा RMD पाहिजे माझ्या माग या असं सांगायला पंटर नेमलेले आहेत शेकडो जीवानिशी गेले काही दवाखान्यात ऍडमिट आहेत काही चौका चौकात पिचकाऱ्या मारून मरण मागत आहेत हे सर्व थांबणार कधी? नगर चा एक मोठा व्यापारी आपली सुपारीचे थकलेले एक कोटी रुपयांचे पेमेंट वसुली स

मराठ्यांच्या विरोधात मराठा उभा करून देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाच युद्ध लाऊन दिलं- डॉ जितीन वंजारे

Image
 दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेणारे एका विशिष्ट संघटनाचे कार्यकर्ते आज सत्तेमध्ये आहेत ही खेदाची गोष्ट असून त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. आरएसएस या संघटनेमध्ये राजकीय बाळकडू पिलेले देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पक्ष तोडले आणि स्वतःच्या भाजपा या पक्षांमध्ये सर्वांना एकत्र करून स्वतःच्या पक्षाची सत्ता महाराष्ट्रात आणली, हा सगळा आटापिटा एकट्या देवेंद्र फडणवीस यांनी केला परंतु या महाराष्ट्राला मी पुन्हा येईन.....,पुन्हा येईन.....,पुन्हा येईन..... असं ठामपणे सांगणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का झाले नाहीत हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे याचे उत्तर सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय अभ्यासक डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी सांगितले की भाजपाची सत्ता महाराष्ट्रामध्ये येण्याअगोदर देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देऊ आणि नंतर मराठा समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते पहिल्याच कॅबिनेटमध्ये सर्व समाजाला आरक्षण देन्याची भाषा करणारे देवेंद्र फडणवीस आरक्षण देण्यास असमर्थ ठ

वैद्यनाथ महाविद्यालय समोर गती रोधक बसवा; सोमवारी रास्ता रोको आंदोलन .

Image
 शेकडो च्या संख्येने सहभागी व्हावे- ज्ञानेश्वर मुंडे प्रतिनिधी (परळी ) परळी शहरातील आझाद चौक, सिंचन भवन, वैद्यनाथ महाविद्यालय समोर गती रोधक बसवा या मागणी साठी सोमवार दि 30 ऑक्टबर 2023 रोजी भाजप विद्यार्थी आघाडी चे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात शेकडो संख्येने सहभागी व्हा असे आव्हान केले आहे .  परळी वै अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 B परळी शहरातून जात असुन सदर रस्त्या लगत तहसील, सिंचन भवन, आयटीआय कॉलेज,कोर्ट सह वैद्यनाथ महाविद्यालय आहे . सदरील महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनाची रहदारी आहे. या महामार्ग लागत शहरातील नामवंत वैद्यनाथ महाविद्यालय आहे या महामार्गावरून अनेक विद्यार्थी कॉलेजला जा ये करत असतात. या मार्गावर कॉलेज समोर गती रोधक नसल्या मुळे वाहनाचा वेग वाढून गेल्या काही दिवसात अपघात पण मोठ्या प्रमाणात झाले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी वैद्यनाथ महाविद्यालय चे शिपाई यांचा पन कॉलेज समोर अपघाती मृत्यू झाला असुन काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. तसेच या ठिकाणावरून अनेक विद्यार्थिनी पायी ये जा क

घोटी पोलिसाचीं दंबगगिरी फिर्यादीलाच केली अमानुष मारहाण,भा.ज.यु.मो.कडुन तीव्र निषेध पोलीसाच्यां निलंबनाची केली मागणी

Image
   घोटी प्रतिनिधी - (गौरव मांडे यांजकडुन )     ईगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस स्टेशनमधील पोलीसाच्यां दंबगगिरीचा एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. आपल्या दुचाकीच्या काही साहित्याची घरासमोरुन चोरी झाली आहे अशा आशयाची तक्रार घेऊन घोटी पोलीसात गेलेल्या फिर्यादीसच अमानुष मारहाण केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत सबंधीत दबंग पोलीसावर कारवाई करण्याची मागणी भा.ज.यु.मो.चे रवी गव्हाणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.    याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे- घोटी येथील रहिवाशी गौरव शिवाजी मांडे यांच्या रहात्या घरासमोरुन दुचाकीचे काही साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. या बाबतची तक्रार घोटी पोलीसात दाखल करणेसाठी मांडे यांनी तब्बल तीनदा चकरा मारल्या. यावेळी पोलीसानीं तक्रार दाखल करण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे मांडे यांनी याबद्दल वरीष्ठाकडे तक्रार करतो असं म्हटले.या गोष्टीचा राग येऊन उपस्थित दोन पोलीसानीं मांडे यांना लाथाबुक्क्यानीं व पट्टयानीं अमानुष मारहाण केली. यावेळी मांडे यांना सोडवण्यासाठी आलेल्या आई व भावजयी यांनाही धक्काबुक्की करणेत ये

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांची प्रेरणा घेऊन वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मुलांना शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

Image
आष्टी ( प़तिनिधी --गोरख मोरे ) :    जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब धनवे साहेब यांचे तालुक्यातील उलेखनिय शैक्षणिक कार्य पाहून नागोबाची वाडी येथील युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री.बाळासाहेब गोपाळघरे यांनी त्यांचा मुलगा चिरंजीव जीवन याच्या वाढदिवसाचा होणारा खर्च टाळून नागोबाचीवाडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इनामवस्ती, बारगजेवस्ती व नागोबाचीवाडी या तिन्ही शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत तसेच मुलांना खाऊचे वाटप करून बालगोपाळा मध्ये केला वाढदिवस साजरा. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इनामवस्ती या शाळेत चि.जीवन याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .  या प्रसंगी खर्डा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.राम निकम साहेब व तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पालक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर कौले सर यांनी चि. जीवन या बाळाचा सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व सर्वांचे आभार मानले .

शाळेच्या परिसरात वाढलेले गवत काढण्यासाठी शिक्षिकेने घेतला हातात तणनाशक पंप सर्वत्र होतंय कौतूक

Image
 आष्टी ( प़तिनिधी --गोरख मोरे ) :    जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शुक्रवार पेठ , खर्डा येथील शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले होते , त्याचा मुलांना खेळण्यासाठी अडथळा येत होता .     गेली आठ दिवसा पासून गवत काढण्यासाठी शोधूनही कोणीही मजूर मिळत नव्हता . शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. कामिनी राजगुरु मॅडम यांनी स्वतः ग्रामपंचायत कार्यालय खर्डा कडून तणनाशक फवारणी पंप मिळवून स्वतः वाढलेल्या गवतावर फवारणी केली. मुलांच्या हितासाठी त्यांनी केलेल्या कामाचे सर्व स्तरांतून त्यांचे कौतूक होत आहे .                      शुक्रवार पेठ शाळेतील विद्यार्थी यांची शैक्षणिक गुणवत्ताही चांगली असून येथे काम करणाऱ्या दोनही शिक्षिकांचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे , शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल जाधव, केंद्रप्रमुख राम निकम व तालुक्यातील सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

स्वराज्य शिक्षक संघाची राज्य कार्यकारणी जाहीर

Image
  राज्याध्यक्षपदी ज्ञानेशभाई चव्हाण/प्रदेशाध्यक्षपदी ज्ञानेश्वर शेळके/राज्य कार्याध्यक्षपदी दत्तात्रय चव्हाण /राज्यप्रसिद्धी प्रमुखपदी गणेश गुजर यांची नियुक्ती बीड जिल्हा (प्रतिनिधी --गोरख मोरे ) :    गेल्या वीस वर्षापासुन महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षकांच्या बाबततीत सातत्याने प्रत्येक शासन अन्यायकारक निर्णय लादत आहेत.शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी पक्ष व राजकारण विरहीत शिक्षक संघटना स्थापन करणेबाबत नुकतीच बैठक पार पडून ,विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर स्वराज्य शिक्षक संघाची राज्यकार्यकारणी संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. यावेळी एकमुखाने, सर्वानुमते, बिनविरोधपणे राज्याध्यक्षपदी श्री ज्ञानेशभाई चव्हाण जालना यांची निवड करण्यात आली .   तसेच प्रदेशाध्यक्षपदी ज्ञानेश्वर शेळके मुंबई, महासचिव शंकर शेरे जालना, राज्य कार्याध्यक्ष दत्तात्रय चव्हाण बीड, उपाध्यक्ष गिरीश मखमले बुलडाणा, प्रभाकर इचुरकर जळगाव, महाडिक, यतीन पाटील मुंबई, प्रदेश सचिव अंकुश शेंडोकार अकोला, राज्यप्रवक्ता विजय सुराशे जालना, संघटक गणेश सुराशे, कोषाध्यक्ष संजय बडक संभाजी

छत्रपती संभाजी राजे यांचा नाशिक दौऱ्याचा बाबत स्वराज्य पक्षाची नाशिक जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Image
छत्रपती संभाजी राजे यांचा नाशिक दौऱ्याचा बाबत स्वराज्य पक्षाची नाशिक जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण   प्रमुख शिलेदारांची पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी आढावा बैठक व नियोजन बैठक आयोजित केली होती या बैठकीचे प्रास्ताविक उमेश शिंदे सर यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी सर्वात प्रथम उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भागातून आलेले शिलेदार यांचे शब्दसुमनाने स्वागत करून बैठकीचं आयोजन नियोजन कुठल्या मुद्द्यांवर करण्यात आलं ते व्यवस्थित सर्वांना त्यावर मार्गदर्शन करून स्वराज्य प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या ,महापुरुषांच्या,थोर साधुसंत यांच्या पवित्र आणि मराठमोळ्या मर्द मावळ्यांच्या, बहुजन समाज अठरापगड जातीच्या सर्वच क्षेत्रातील तळागाळातील वंचीत, कष्टकरी ,दिनदुबळ्या, श्रमजीवी यांच्या अथक परिश्रमातून तयार झालेले हे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आजपर्यंत विविध पक्ष ,समूह असतील यांनी महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते म्हणुन काम करण्याचा प्रयत्न केला त्याला म

सदैव उपेक्षित राहिलेल्या मराठा समाजास कायम टिकणार आरक्षण द्या -नगरसेवक अँड विकास जोगदंड

Image
बीड (प्रतिनिधी ) 28 ऑक्टोंबर  विश्वातील सर्वश्रेष्ठ लोकशाहीचे जनक भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरानीं सामाजिक आणि शैक्षणिक मागास असलेल्या वर्गासाठी आरक्षणाची तरतूद केली असून त्यात कुठल्याही जातीचा उल्लेख केलेला नाही हेच तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टी सर्वव्यापी समान नेतृत्वाचे प्रतिक आहे. आपण जर का भारतीय संविधानाचे अधिनियम 338 ख. "मागासवर्गीया करीता राष्ट्रीय आयोग" चे अवलोकन केले तर आरक्षण तरतूद प्रकर्षाने समजेल मग सामाजिक शैक्षणिक मागासलेले कोण तर प्रामुख्याने अनु.जाती. जमाती व इतर मागास प्रवर्ग. म्हणून संविधानाचे अधिनियम 340,341,342 प्रवर्गानुसार सामाजिक व शैक्षणिक मागासलेल्या वर्गास आरक्षण मिळाले. मराठा समाज देखील कायम उपेक्षित राहिलेला आहे. बहुजन समाजात मराठा थोरला भाऊ आहे परंतु जसं एकत्र कुटुंबामध्ये थोरल्याला सर्व सांभाळून घ्यावं लागतं सगळी जबाबदारी सांभाळावी लागते थोरलेला नेहमी त्याग समर्पण करावा लागतो अशीच काहीशी परिस्थिती मराठा समाजाची झाल्याने मराठा समाजातील काही मोजके पुढारी सत्तेत गेले म्हणजे सर्व मराठा समाज

रंजना सानप यांना मैत्रा फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Image
. जि. प. प्राथमिक शाळा सुर्याचीवाडी शाळेतील शिक्षिका रंजना सानप यांना बीडच्या मैत्रा फाऊंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. सानप यांनी वीस वर्षाच्या शैक्षणिक सेवेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम रावबून शालेय गुणवत्ता वाढवली आहे.शैक्षणिक क्षेत्राबरोबर साहित्यिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे.त्याची स्वालिखित चार पुस्तके प्रकाशित असून दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गांवर आहेत. सातारा आकाशवाणी, कोकण नाऊ चेंनल वर कथा, कवितांचे सादरीकरण झाले आहे.राज्यभरातील विविध वर्तमानपत्रात त्यांचेतीनशेहुन अधिक लेख,कथा, कविता प्रकाशित झाल्या आहेत. बीडच्या मैत्रा फाउंडेशनचे संस्थापक द.ल. वारे, हर्षा ढाकणे, शितल गायकवाड, जिल्हाध्यक्ष संजय राठोड, उद्धव बडे यांनी सानप यांची निवड केली. आतापर्यंत सानप यांना शैक्षणिक व साहित्यिक कामासाठी चाळीसहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कार निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

केंद्र व राज्य सरकार मराठा समाजाची दीशाभुल केली ? केंद्र व राज्य सरकार नालायक पनाचा कळस - रोहन गलांडे पाटील

Image
  केज/ प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या वेळेत मराठा समाजाला आरक्षण दीले नाही यांचा स्पष्ट अर्थ असा होतो की मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे त्यामुळे केंद्र व राज्य सरकारला कुनाची दीशाभुल करावी यांची अक्कल नाही व केंद्र व राज्य सरकार नालायक पनाचा कळस आहे असे मराठा योद्धे रोहन गलांडे पाटील यांनी अरोप व्यक्त केला आहे.राज्या सरकारने मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या कडुन तीस दिवसाचा वेळ मागितला जरांगे पाटील यांनी चाळीस दीवसाचा वेळ दीला परंतु राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दीले म्हणून राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल केली जात यांची थोडी तरी लाज बाळगली पाहिजे राज्य सरकारने घेतलेल्या वेळेत आरक्षण देऊ शकत नाही तर राज्य सरकार सोबत आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री यांना लाज वाटली पाहिजे असे वक्तव्य रोहन गलांडे पाटील यांनी व्यक्त केले आहे . म्हणून केंद्र व राज्य सरकार नालायक पनाचा कळस आहेत असे मराठा योद्धे रोहन गलांडे पाटील यांनी वक्तव्य व्यक्त केले आहे.तसेच मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी परत अमर उपोषन सुरू केले आहे त्यांना जर काही झाले तर महाराष्ट्रात प

लिबागणेश येथील शेतकरी रमेश घोलप यांची ५ लाखाची सोयाबीन जळुन खाक

Image
लिंबागणेश:- बीड तालुक्यातील मौजे.लिंबागणेश येथील शेतकरी रमेश बाबुराव घोलप यांची घोलपवस्ती गट नंबर २०८ मधील १४ एक्कर मधील गोळा करून ठेवलेली सोयाबीन जळुन खाक झाली असुन अंदाजे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आज दि.२८ आक्टोबर शनिवार रोजी पहाटे ५ वाजता लिंबागणेश येथील शेतकरी रमेश बाबुराव घोलप यांनी १४ एक्कर शेतामधील सोयाबीन काढुन गंज लावलेली होती.पहाटे ५ वाजता त्यांचे मोठे बंधू सतिश बाबुराव घोलप यांना सोयाबीन गंज गोळा केलेल्या शेतातुन आगीचे लोळ दिसले.घटनास्थळी शेतकऱ्यांनी धाव घेतली असता सोयाबीनच्या गजीने पेट घेतलेला दिसुन आला.आजुबाजुला कुठेही विजेची तारेचा संबंध नसल्याने जाणिवपूर्वक सोयाबीन पेटवुन दिल्याचा संशय व्यक्त केला.        डॉ.गणेश ढवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन व्हिडिओ व फोटोसह तहसीलदार हजारे व नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनी विलास हजारे यांना फोनवरून कल्पना दिली. एकुण १०० क्विंटल सोयाबीनचे अंदाजे ५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.       कष्टाची राख झाली:- निलावती घोलप(रमेश घोलप यांची आई) दुष्काळात नातवांनी आम्ही कष्ट काबाड करुन सोयाबीन गोळा केलती.असा दुष्मन दावा साधायचा नव्हता,

शेवगाव शहराचे स्ट्रीट लाईट दिवसा चालू आणि रात्री बंद नगरपरिषद शेवगाव आणि महावितरण चा अजब कारभार

{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755  याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक दिवसापासून शेवगा शहरातील अनेक भागांमध्ये नगरपरिषद चे पथदिवे { स्ट्रीट लाईट } आणि जागोजागी बसविलेले हाय मॅक्स रात्रंदिवस सुरू असतात महावितरण कार्यालयाची विज यांना फुकट आहे का ??? असा सवाल सर्वसामान्य शेवगावकरांना पडला आहे नेवासा रोड प्रभाग क्रमांक 13 मुख्य बाजारपेठ आणि शहरातील अनेक जुन्या गल्ल्यां मध्ये शहराच्या विविध भागांमध्ये रात्रीचे स्ट्रीट लाईट बंद असतात आणि शहरातील अनेक भागांमध्ये दिवसा सुद्धा चालू असतात हे नेमके "काय गौड बंगाल आहे" पूर्वी सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बारा तास हे स्ट्रीट लाईट सुरू असत परंतु गेल्या काही महिन्यांपासून हे रात्रंदिवस सुरू असतात याची तक्रार नेमकी कोणाकडे करायची हा एक प्रश्न आहे याला जबाबदार महावितरण कार्यालय की नगरपरिषद शेवगाव    शेवगाव शहरांमध्ये चार महिन्यापूर्वी दंगल झाल्यानंतर तातडीने प्रत्येक प्रमुख चौकामध्ये गाडगे बाबा चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक क्रांती चौक छत्रपती संभाजी महाराज चौक नेवासा रोड छ. शिवाजी महाराज चौक अशा अनेक भागांमध्ये भले मोठ्या ह

तुलसी महाविद्यालयात बी.सी.ए विभाग प्रमुखपदी प्रा.डॉ.विकास वाघमारे यांची नियुक्ती

Image
  बीड(प्रतिनिधी):- तुलसी महाविद्यालय बी.सी.ए विभाग प्रमुखपदी प्रा.डॉ.विकास वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ एल.एम.थोरात यांनी डॉ.वाघमारे यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रा.डॉ.विकास वाघमारे यांनी सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ गुजरात गांधीनगर येथे एमफील,पीएचडी ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. ते मागील चार वर्षापासून तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय येथे बीसीए या अभ्यासक्रमासाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन प्राचार्य प्रो.डॉ एल.एम.थोरात यांनी बी.सी.ए विभाग प्रमुखपदी नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

उत्कृष्ट आरोग्यसेवेबद्दल डाॅ.रविंद्र जगतकर यांना सवित्रीज्योती राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर

Image
मित्र परिवाराकडून डाॅ.रविंद्र जगतकर यांचे अभिनंदन परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :- ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक तथा परळी शहरातील जगतकर गल्ली येथील भूमिपुत्र डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर यांना निर्वाण फाउंडेशन, नाशिक यांच्या तर्फे "सवित्रीज्योती राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार २०२३" देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती एका पत्राद्वारे प्राप्त झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत.        निर्वाण फाउंडेशन, नाशिक यांच्या तर्फे "सवित्रीज्योती राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार २०२३" सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वास त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरित करून त्यांच्या कार्यास बळ देण्याच्या विधायक उद्देशाने कर्तृत्ववान व्यक्तींना दरवर्षीच हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. यावेळी सामाजिक, आरोग्य क्षेत्रात आपल्या कार्यशैलीचा आगळा-वेगळा ठसा उमटविणाऱ्या, ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक तथा परळी शह

भगवान महाविद्यालयाच्या खेळाडूंची विविध खेळांमध्ये नेत्रदीपक कामगिरी

Image
 आष्टी ( प़तिनिधी --गोरख मोरे ) :    मागील पंधरा दिवसांमध्ये मराठवाडय़ातील विविध शहरांमध्ये पार पडलेल्या विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये येथील भगवान महाविद्यालयाच्या (कनिष्ठ व वरिष्ठ) खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून नेत्र दीपक असे यश मिळवले.    खरपुडी (तालुका-जिल्हा जालना) या ठिकाणी १० ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या मल्लखांब स्पर्धेमध्ये महाविद्यालयाची विद्यार्थिनी रेणुका डोके हिने विभागीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.      कनिष्ठ महाविद्यालयातीलच १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या ३००० मीटर मैदानी स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचा विकास गर्जे या खेळाडूने सैनिकी विद्यालय बीड येथे ११ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.     कनिष्ठ महाविद्यालयातील १७ वर्षे वयोगट मुलींच्या 'सेपाक टकारा' या क्रीडा प्रकारामध्ये सेलू (जिल्हा परभणी) या ठिकाणी २१ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या विभागीय स्पर

उद्या आष्टी डीवायएसपी कार्यालयाला कुलूप ठेकणार्या मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - बाळासाहेब गायकवाड

Image
पारधी महिलेवर अन्याय प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावा मागणीसाठी उद्या आष्टी डीवायएसपी कार्यालयाला कुलूप ठेकणार्या मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - बाळासाहेब गायकवाड पाटोदा (गणेश शेवाळे ) आष्टी तालुक्यातील वाळुंज येथे पारधी महिलेवर झालेल्या अन्यायाचा विरोधात वंचित बहुजन आघाडीचे सर्वां‌ सर्व अँड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील पारधी समाजातील महिलेवर अन्याय करणार्या आरोपींना ताक्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी उद्या आष्टी डीवायएसपी कार्यालयालावर अँड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कुलूप ठोकण्यासाठी निघणार्या वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चासाठी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आशे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे पाटोदा तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे

शेवगाव तालुका खंबीरपणे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा काल तालुक्यातील विविध ठिकाणी शिर्डी ला जाणाऱ्या बसेस रास्ता रोको करून अडवल्या

{ अविनाश देशमुख } 9960051755 शुक्रवार ता. 28/10/2023  याबाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 26 ऑक्टोबर गुरुवारी दुपारी 02:00 वाजता शिर्डी येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला जाणाऱ्या सुमारे 100 बसेस शेवगाव तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलन करून अडवण्यात आल्या तालुक्यातील मंगरूळ येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली तालुक्यातील सुलतानपूर मठाची वाडी येथे मोकळ्या बसेस ठेवल्या काल सकाळी दहा वाजता भातकुडगाव फाटा येथे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आणि त्यांच्या समवेत असलेल्या शेवगाव शहरातील बसेस अडवून श्री मनोज पाटील जरांगे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या आणि भरलेल्या सुमारे 25 ते 30 बसेस परत पाठविण्यात आल्या यामुळे शेवगाव शहरासह तालुक्यातून सुमारे 100 बसेस मोदींच्या सभेसाठी भरून जाणार होत्या परंतु मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधारी पक्षाचा चांगलाच प*** केला मेळाव्या साठी सरकारने सर्व कार्यालयांना अघोषित सुट्टी जाहीर केली होती व सर्व चतुर्थश्रेणी आणि तृतीय श्रेणी कर्मचारी बळजबरीने कार्यक्रमाला नेण्याचा घाट घातला होता परंतु

वेलनेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत थाटात शुभारंभ

Image
-डॉ.अनिल पवार व डॉ. गणेश डोळे यांनी उभारले शहरात भव्य हॉस्पिटल -वेलनेस मल्टीस्पेशालिटी डॉस्पिटलचा बीडकरांना होणार फायदा - माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर बीड प्रतिनिधी : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी वेलनेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ विजयादशीच्या शुभमुहूर्तावर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, वेलनेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा येथील गरजू रुग्णांना मोठा फायदा होईल. डॉ.अनिल पवार व डॉ. गणेश डोळे यांनी एकत्र येत सुरु केलेले हॉस्पिटल बीडकरांसाठी मदतीचे ठरेल अशा विश्‍वास माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला. शहरातील शिवराज पान सेंटर समोर वेलनेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची भव्य शुभारंभ मंगळवारी (ता. 24) अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, जेष्ठ नेते डाके नाना, माजीनगरसेवक विलास विधाते, श्री चव्हाण, जालिंदर धांडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. अनिल पवार व डॉ. गणेश डोळे या दोन युवा डॉक्टांनी एकत्र येत या हॉस्पिटलची सुरुवात केली. विशेष म्हणजे

वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष एड.अनिता चक्रे यांचा प्रामाणिकपणा सापडलेला मोबाईल केला परत

Image
   बीड प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीच्या महिला बीड जिल्हाध्यक्ष ऍड.अनिता चक्रे या कामानिमित्त,जिल्हा रुग्णालय रुग्णाच्या नातेवाईकाला भेटायला आल्यानंतर अज्ञात कोणाचा तरी व मोबाईल पडलेला दिसून आला तो त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे जाऊन पोलिसांच्या स्वाधीन केला व संबंधित व्यक्तीचा फोन करून त्याला बोलवून पोलिसांसमक्ष त्याच्या स्वाधीन करण्यात आला, यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व ज्याचा मोबाईल हरवला होता तो व्यक्ती दिसत आहेत.ऍड.अनिता चक्रे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

गेवराईच्या सरपंचाने फोडली वकील गुनवरत्न सदावर्ते यांची गाडी

Image
बीड गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 8888435869 गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे,  आज सकाळीच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड मराठा आदोलकांनी केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याप्रकरणी मंगेश साबळे यांच्यासह तीन जणांना अटक केली आहे. हे तिघेही मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित असल्याचे समोर आलं आहे, यातील मंगेश साबळे हे नाव चर्चेत आहे. साबळे यांनी काही दिवसापूर्वी स्वत:ची गाडी पेटवत निषेध केला होता. मंगेश साबळे हे वेगळ्या पद्धतीने आंदोलन केल्यामुळे चर्चेत असतात.  मंगेश साबळे हे संभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत. याअगोदर वेगळ्या पद्धतीने आंदोलन केल्यामुळे ते चर्चेत होते. साबळे यांनी काही दिवसापूर्वी पंचायत समितीसमोर पैसे उधळत आंदोलन केले होते. या आंदोलनाची माध्यमांनीही दखल घेतल्याने अखेर लाचखोर बीडीओला निलंबित करण्यात आले होते. यामुळे मंगेश साबळे चर्चेत आल

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन

Image
बीड गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 8888435869 ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल. जेष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. दरम्यान, यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर 8 महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली. बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंत

वैजाळा येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास सुरुवात

Image
मराठा समाजाला आरक्षण मिळेत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी व वैजाळयात निवडणूक होऊन देणार नाहीत- सरपंच भाऊसाहेब भराटे पाटोदा (प्रतिनिधी ) सरकारला मराठा समाजाने आरक्षणसाठी वेळ दिला तो संपल्यामुळे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी याठिकाणी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या मराठा आरक्षण प्रश्नी उपोषणाला पाठिंबा म्हणून गुरूवारी 26 आक्टोबर पासून सकल मराठा समाज वैजाळा यांचे विश्वासघाती सरकार विरोधात व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून वैजाळा सकल मराठा समाजाचे आज दि.२6 आक्टोबर पासून उपोषणाला सुरुवात केली असुन यादरम्यान सर्वपक्षीय राजकीय पुढा-यांना गावबंदी करण्यात आली असुन तशा प्रकारचे निवेदन ही देण्यात आले आहे.माझी सरपंच भाऊसाहेब भराटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत श्रीफळ फोडुन वैजाळा गावात उपोषणाला सुरुवात करण्यात आली यावेळी वैजाळा गावातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रतिनिधी मराठा कुणबी आर

तिरुमला बालाघाट हिल हाफ मॅरेथॉनमध्ये 1500 स्पर्धक धावणार

तिरुमला बालाघाट हिल हाफ मॅरेथॉनमध्ये 1500 स्पर्धक धावणार मान्यवरांच्या उपस्थित 29 ऑक्टोबरला होणार मॅरेथॉन मॅरेथॉनची तयारी पुर्ण. बीड प्रतिनिधी :- बालाघाटच्या निसर्गरम्य वातावरणात सर्वांना आरोग्यदायी अनुभव घेता यावा या उद्देशाने बीड मधील योगा प्रतिष्ठाणच्या वतीने दुसऱ्या वर्षी पण तिरुमला बालाघाट हिल हाफ मॅरेथॉनचे आयोजन 29 ऑक्टोबरला करण्यात आले असुन या स्पर्धेमध्ये राज्यातील व विविध राज्यातुन 1500 हुन अधिक स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी केली असुन या मॅरेथॉनची तयारी अंति टप्प्यात आली असुन याची माहिती योगा प्रतिष्ठाणच्या वतीने देण्यात आली आहे. डोंगराळ भाग, घाटातील वळण रस्ता, वन्यप्राणी, घाटात असलेली सह्याद्री देवराई मधील वनराई यामुळे प्रसिध्द असलेले ठिकाण असुन या वातावरणामुळे आरोग्या साठी लाभदायक असल्याने याभागात सकाळी मार्गांग वॉक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे बीड मधील योगा प्रतिष्ठाणच्या वतीने सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या धर्तीवर या भागात पण तिरुमला बालाघाट हिल हाफ मॅरेथॉन चे आयोजन केले आहे. 29 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6.00 वा. पालवण गावाच्या काही अंतरावरती असलेल्या मोकळ्या जा

शहराच्या तुलनेत प्रभाग क्र 4 मध्ये विकास कामांचा वाढता आलेख

Image
विकासप्रिय नगराध्यक्ष डॉ भारतभूषणजी क्षीरसागर रा.कॉ पार्टी बीड विधानसभा अध्यक्ष डॉ योगेशजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अँड विकास जोगदंड यांच्या अथक परिश्रमातून मुख्य रस्त्या सह गल्लीबोळातील रस्त्याचा प्रश्न मार्गी बीड (प्रतिनिधी ) 26 ऑक्टोंबर बीड शहरात सध्या विकास कामाचा धडाका सुरू असून गल्लीबोळासह प्रमुख रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने शहरातील जेष्ठ,कनिष्ठ,समवयस नागरिकांतून समाधान व्यक्त करत विद्यमान नगराध्यक्ष डॉ भारतभूषणजी क्षीरसागर, युवा नेते तथा रा.कॉ पार्टी चे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ योगेशजी क्षीरसागर यांचे आभार मानले जात आहेत  डॉ भारतभूषण क्षीरसागर व डॉ योगेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून शहरातील सर्व समस्याचे निराकरण प्रश्न मार्गी लावले जात आहे रस्ते,नाली,स्वच्छता,पाणी,विद्युत सह आदी मूलभूत सुविधावरील समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ योगेश क्षीरसागर प्रयत्नशील असून मोठ्या पोट तिडकीने कार्यरत आहेत त्यांच्याच खांद्याला खांदा लावून प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक अँड विकास जोगदंड हे प्रभागातील रस्त्या स

शासकीय धान्य गोदामातील हमालांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे

Image
   बीड (  प्रतिनिधी      ) बीड जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातील हमालांनी विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर पासून बेमूदत धरणे आंदोलन सुरु केले असून त्याच बरोबर दिनांक 26 ऑक्टोबर पासून फक्त आनंदाच्या शिधा किट उतरवण्याचे काम चालू ठेवण्याचा व उर्वरित काम प्रश्न सुटे पर्यंत न करण्याचा निर्णय घेतला आहे अद्याप पुरवठा विभागाकडून पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामूळे दोन्ही आंदोलन चालू आहेत. आंदोलनाच्या मागण्या पुढील प्रमाणे द्वार पोहोच योजनेतील दुकानदाराच्या दुकानात माल उतरवण्याचे काम ज्या त्या गोदामातील नोंदीत हमालांकडून करुन घेण्यात यावे शासनाने सुरु केलेल्या थेट वाहतूकीच्या धोरणानूसार त्यातील कामा बाबत स्पष्टता यावी गोदामातील धान्याची आवक जावकचे नियोजन वेगवेगळया वेळेनूसार करण्यात यावे आनंदाच्या शिधा किटची एक वर्षापासूनची थकीत हमाली हमालांना तातडीने मिळावी तसेच मार्च 2012 पासूनचा महागाई निर्देशांकाचा फरक मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार तात्काळ मिळावी दरमहा हमाली मिळण्याचे नियोजन व्हावे या व इतर मागण्यासाठी  सदर आंदोलन चालू आहे.प्रशासनाने त

शेख मुहम्मदी सुलतान चे मास्टर ऑफ फार्मसी मध्ये घवघवीत यश,औरंगाबादसह बीडच्या मानात मानाचा तुरा रोवला!

Image
बीड (प्रतिनिधी ) - येथील यशवंतराव बळवंतराव चव्हाण फार्मसी महाविद्यालयात नुकतेच पदवीदान दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यात शेख मुहम्मदी सुलतान ला विद्यापीठाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तिने मिळविलेल्या या यशाने औरंगाबादसह बीडच्या मानात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शेख मुहम्मदी सुलतान चे आजोळ बीड शहर. मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ तिचे मामा. म्हणून तिचे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण आजोळी बीड शहरातील छत्रपती शाहू महाराज विद्यालयात झाले. वडील शेख सुलतान याकूब हे औरंगाबाद येथे इंडसुर गिअर्स लिमिटेड या कंपनीत मॅनेजर लॉजिस्टिक्स या पदावर कार्यरत आहेत. म्हणून तिचे इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण चिकलठाणा, औरंगाबाद येथील श्री. बालाजी माध्यमिक शाळेत झाले. इयत्ता अकरावी व बारावी चे शिक्षण औरंगाबाद येथीलच छत्रपती उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. डी. फार्मसी चे शिक्षण श्री. धनेश्वरी मानव विकास मंडळ फार्मसी महाविद्यालयात झाले. बी. फार्मसी चे शिक्षण यशवंतराव बळवंतराव चव्हाण फार्मसी महाविद्यालयात झाले. तिथेच मास्टर ऑफ फार्मसी चे शिक्षण घेऊन सन २०२२ ला यात सर्वोत्त

स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

Image
सभासदांना १०  टक्के लाभांश जाहीर ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर  वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी परळी वैजनाथ /प्रतिनिधी -           शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्‍वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख कायम ठेवत पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षात मार्च 2023 अखेर उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे.स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक  सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली.                   संस्थेच्या कार्यालयात आज अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक  सर्वसाधारण सभा झाली. या वेळी आहवाल व ताळेबंद सभेत सादर करण्यात आला. सरत्या आर्थिक वर्षात 31 मार्च 2023 अखेर संस्थेची अर्थिकस्थिती पाहता संस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. विषेश म्हणजे अल्पावधीतच पतसंस्थेतील ठेवी- 40 कोटी 76 लाख 91 हजार 232,भागभांडवल- 69 लाख 57 हजार 550 , कर्ज- 32 कोटी 58 लाख 50 हजार 649,गुंतवणूक 13 कोटी 13 लाख 85 हजार 332,निव्वळ नफा 76 लाख 47 हजार 294 इतका आहे.      पतसंस्थेच्या या प्रगतीशील वाटचालीत सर्व खातेदार, ठेवीदार,कर्जदार, हितचिंतक यांच