एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण करण्यासाठी समिती स्थापन
एकल महिलांच्या प्रश्नावर धोरण ठरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मसुदा समिती नेमली आहे. एकल महिलांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र धोरण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असणार आहे एकल महिलांच्या क्षेत्रातील एक कार्यकर्ता म्हणून खूप समाधान आहे त्याबद्दल सरकारचे मनापासून अभिनंदन.!!
या मसुदा समितीमध्ये साऊ एकल महिला समितीचा राज्य निमंत्रक म्हणून हेरंब कुलकर्णी यांचासमावेश करण्यात आला आहे. यातून धोरणात्मक सूचना करता येतील..
राज्य सरकारने महिला धोरण जाहीर केले तरीसुद्धा या एकल महिलांची मोठी संख्या बघता स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. २०११ साली महाराष्ट्रात एकल महिलांची संख्या ५४लाख होती ,ती १५ वर्षानंतर किमान ७०लाख असेल. त्यामुळे या महिलांचे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक ग्रामीण शहरी असे सर्व प्रश्न बघता धोरणाची गरज होतीच.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बजेटच्या भाषणात एकल महिलांसाठी लवकरच धोरण जाहीर करण्यात येईल अशी घोषणा केली होती . त्या घोषणेच्या अंमलबजावणीची विनंती केल्यावर मुख्यमंत्री यांचे संवेदनशील प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी एकल महिला प्रश्नावर दोन बैठका घेतल्या व मसुदा समिती स्थापन करण्याचे महिला बालकल्याण विभागाला सूचित केले.महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या दोघींनीही त्यानंतर एकल महिला धोरण विषयावर चर्चा करण्यासाठी बैठका घेऊन समिती स्थापन केली.या समितीचे अध्यक्ष महिला बालकल्याण आयुक्त असून राज्यातील सर्व विभागांचे अधिकारी या समितीत आहेत
राज्यात पूर्वी या विषयावर ज्यांनी काम केले किंवा करत आहेत त्यांच्या सूचना ही महत्वाच्या ठरतील. त्या सर्वांशी आदरपूर्वक संपर्क करून त्यांच्या सूचना समजून घेतल्या जातील..एकल महिला यांच्या अपेक्षा आणि भावना याचे प्रतिबिंब नक्कीच या एकल महिला धोरणात असेल
बीड जिल्ह्यात बीड केज व अंबाजोगाई तालुक्यात कोरो एकल महिला संघटना ही मागील 2014 पासुन महिलांच्या अनेक प्रश्नावर एकल महिलांबरोबर काम करत आहे .
बीड जिल्ह्यात एकल महिलांचा सर्वे महिला बालकल्याण जिल्हा परिषद विभाग अंतर्गत तालुक्याच्या पंचायत समिती महिला बाल कल्याण अंतर्गत अंगणवाडी ताईंनी कष्ट घेऊन एकल महिलांचा सर्वे पूर्ण केलेला आहे. त्यांचेही अभिनंदन आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन एकल महिलांचे धोरण व्हावे यासाठी अनेक संस्थांनी संघटनांनी एकल महिला लिडर ( अभया) यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांचेही अभिनंदन!
हेरंब कुलकर्णी सरांनी पुढाकार घेऊन सातत्य ठेवून पाठपुरावा केला. आणि मसुदा समितीवर निवड झाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.. अभिनंदन
सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी नागापुरे 9049025415
Comments
Post a Comment