मनरेगा कामात भ्रष्टाचाराचा आरोप चौकशी करण्याची भाजपाचे माजी राज्यमंत्री लोकनेते बदामराव पंडितांची मागणी
सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील वंजारवाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मनरेगाचे झालेल्या विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैर यावर व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे सकल चौकशीची मागणी केली आहे याबाबत माजी राज्यमंत्री लोकनेते बदामराव पंडित यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना निवेदन दिले आहे निवेदनामध्ये म्हटले आहे की वंजारवाडी गावातील अनेक कामे हेमेट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच काही कामे प्रत्यक्षात पूर्ण न होता कागदोपत्री पूर्ण झाल्याचा दाखविण्याचा दावा करण्यात आला आहे निवेदनानुसार चिरखा वस्तीतील सिमेंट रस्ता मारुती मंदिर ते येवले यांच्या घराकडे जाणारा रस्ता वंजारवाडी येथे यादव यांच्या शेताकडे जाणारा रस्ता तसेच वंजारवाडी ते रांजणी शिव रस्ता पवार यांच्या शेताकडे ही कामे बोगस दाखवून लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार करण्यात आला आहे असा आरोप करून तसेच खालील कामे पुस्तकी मोजमाप करून झालेली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे यामध्ये वंजारवाडी ते शिवाजी चोरमले यांच्या शेतापर्यंत रस्ता एक किलोमीटर विश्वनाथ पवार ते राजेश हरकुट यांच्या शेतापर्यंत रस्ता एक किलोमीटर वंजारवाडी तलावा ते विठ्ठल गड विहिरीपर्यंत रस्ता एक किलोमीटर भाग एक तसेच भाग दोन वंजारवाडी ते दाभाडे यांच्या शेतापर्यंत एक किलोमीटर आधी कामाचा समावेश आहे यामध्ये सुद्धा अनियमिता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे यासंदर्भात उपसरपंच शोभा दिनकर पवार व ग्रामस्थांनी यापूर्वीही गटविकास अधिकारी गेवराई यांच्याकडे तक्रार दिली होती मात्र अद्याप कोणतीही ठोस चौकशी झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे जिल्हास्तरीय समिती स्थापन करून मनरेगा अंतर्गत झालेल्या सर्व कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी व जोशीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोकनेते बदामराव आबा पंडित यांनी निवेदनाद्वारे केली आहे
Comments
Post a Comment