Posts

Showing posts from June, 2023

पंढरपूर, देहू, आळंदी, पैठणसह सर्व मंदिरे-तीर्थक्षेत्रे ‘मद्य-मांस मुक्त’ करावीत !- पंढरपूर येथे वारकरी अधिवेशनात एकमुखी मागणी

Image
 पंढरपूर - ‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी अन् पैठण ही तीर्थक्षेत्रे, तसेच राज्यातील सर्व मंदिरे अन् तीर्थक्षेत्रे यांचा परिसर 100 टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावा; पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी; सर्व तीर्थक्षेत्रे, मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता’ लागू करावी, अशी एकमुखी मागणी पंढरपूर येथील ‘भव्य वारकरी अधिवेशना’त करण्यात आली.  वारकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री बालयोगी महाराज मठ, दत्तघाट येथे ‘वारकरी संप्रदाय’, ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामी नारायणानंद सरस्वती’ यांच्या संयुक्त हे वारकरी अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनात संतमहंत, मान्यवर, हरि भक्त परायण, धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत ‘हलाल उत्पादने’ विकत घेणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. या अधिवेशनासाठी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   उपस्थित मान्यवर - ह

शिक्षक हा शक्तीशाली व्यक्तीमत्व आहे-लक्ष्मण बेडसकर.

Image
 केज प्रतिनिधी :केज तालुक्यातील लव्हूरी केंद्रा आंतर्गत सेवापूर्ती गौरव समारंभ सत्कार या कार्यकरमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतःविधेची माता देवी सावित्रीबाई यांच्या प्रथमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केज पंचायत समितीचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी,लक्ष्मणराव बेडसकर यांनी भूसविले. कार्यक्रमाचे प्रस्थावित लव्हूरी केंद्राचे केंद्रप्रमुख,राधाकृष्ण कांबळे यांनी केले. वयानुरूपी सेवानिवृत झालेले बळीराम महादेव शेरखाने व सौ.विश्रांती आणि रामराव काळे व सौ.शोभाबाई यांचा स्वप्तीनीक सत्कार करून दोघांना कपडेचा आहेर त्यांच्या शाळेकडून करण्यात आला. शेरखाने व काळे यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले, श्रीम.अश्विनी गिरी,श्रीम.छाया जाधवर,विक्रम डोईफोडे,श्रीराम देशमुख,श्रीराम चाटे,यांनी आपआपले मनोगत व्यक्त करताना शेरखाने सर, काळे सर यांना शुभेच्छा देण्यात आल्या. अध्यक्षीय भाषनात बेडसकर म्हणाले की,जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक लव्हूरी शाळेने ठेवलेला सेवा पूर्ती गौरव समारंभ सत्कार मुर्ती सेवानिवृत व बद्धली झालेल्या शिक्षकांना

चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला होण्याची कारणे आणि त्या पाठीमागील सूत्रधार कोण असेल?( अनंत सरवदे )

Image
दिनांक 28 जून 2023 रोजी यूपीच्या सहारनपुरच्या "देवबंद" विधानसभा क्षेत्र येथे आझाद समाज पार्टीचे प्रमुख ऍड. चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्यावर पाच राऊंड फायर करून गोळीबार झाला.   त्या पूर्वी चंद्रशेखर आजाद यांची थोडक्यात पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. चंद्रशेखर आजाद पश्चिमी उत्तर प्रदेशच्या सहारनपुर जवळच्या एका ग्रामीण भागातले. यूपीमध्ये "ठाकूर" (राजपूत )आणि "जाट" या स्वतःस क्षत्रिय समजणाऱ्या दोन प्रभावी जाती आहेत. त्यानंतर दलित समाजातील जाटव, चांभार , वाल्मिकी, भंगी व अन्य छोट्या अनुसूचित जातीची संख्या आहे  लक्षणीय आहे. NCB च्या आकडेवारी प्रमाणे भारतात उत्तर प्रदेश मध्ये दलित, पिछडा समूहावर अन्याय अत्याचार, बलात्कार आणि हत्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे   या पूर्वी बीएसपीच्या मायावती 3 जून 1995 ते 18 /10 /1995 (137 दिवस ), 21 मार्च 1997 ते 20 सप्टेंबर 1997(184 दिवस ) 3 मे 2002 ते 29 ऑगस्ट 2003( एक वर्षे 118 दिवस) आणि 13 मे 2007 ते 16 मार्च (पूर्ण बहुमत काळ )2012 पर्यंत म्हणजे एकूण 7 वर्षे 16 दिवस एवढ्या कालावधीसाठी उत्तर प्रदेशच्या4 वेळा मुख्

नाशिक जिल्हा लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या, नाशिक जिल्हाध्यक्षपदी जनसेवक, मा. श्री.डॉ.शेरूभाई मोमीन, यांची सर्वां नुमते आज फेर निवड जाहीर

Image
 ,, नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी (जाकीरभाई मोमीन, विंचूर ) सामान्य माणसांचा बुलंद आवाज, लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या, नाशिक जिल्हाध्यक्ष पदी गेल्या अनेक वर्षांपासून सतत कार्यरत असलेले, निर्भीड, सर्वधर्मसमभाव आणि सर्व पत्रकारांच्या विविध समस्यां संदर्भात शासन दरबारी संघर्ष मय लढा उभारून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठा सहभाग असतो त्यांच्या कार्या ची पावती म्हणून, आज मुंबई येथे लोकशाही मराठी पत्रकार भवन, या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये लोकशाही मराठी पत्रकार संघाचे, संस्थापक अध्यक्ष सचिन दादा बोंबले यांच्या अध्यक्षतेखाली व यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र, जनसेवक, मा. श्री. डॉ.शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांना देण्यात आले आहे, " खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. " स्वाभिमानाने सर्व बहुजन समाज अठरापगड जाती धर्मातील पत्रकार बांधवांच्या विविध अडी - अडचणी व अनेक समस्या संदर्भात केंद्र व. राज्य शासनाच्या सर्व सोयी - सुविधा सवलती योजनांचा पुरेपूर लाभ म

मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत फेटा घालणार नाही'

Image
बीड  प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे   मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर येण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे या अधिक आक्रमक झाल्या आहेत. जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तो मी पर्यंत फेटा बांधणार नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यामुळे मुंडे आगामी काळात आपल्याच पक्षाची कोंडी करणार आहेत. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या जयंतीनिमीत्त बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी हा निर्धार केला आहे. ते म्हणाले “मला राजेंद्र मस्के म्हणाले, फेटा बांधा. मी म्हटलं, फेटा बांधणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी फेटा बांधणार नाही. ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आल्यावर गळ्यात कोणतीही फुलाची माळ गळ्यात घालणार नाही, असं सांगितलं होतं. आता ओबीसी आरक्षण वाचलं आणि लोकांनी गळ्यात हार घातले,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. “आपल्याला दूध पोळलेलं आहे. त्यामुळं आता ताकही फुंकण पिण्याची वेळ आली आहे. २०२४ हे इतिहास घडवणारं, म्हणजे, इतिहास बदलवणारं वर्ष आहे. तुमच्या सगळ्यांची नि:स्वार्थ साथ मला पाहिजे असेही मुंडे म्हणाल्या

येवल्याचे भाग्यविधाते ना.भुजबळ साहेबांच्या सहभगातून स्वच्छ येवला सुंदर येवला मोहीम

Image
. दिलीप आण्णा खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्यापासून स्वच्छता मोहीम ना.भुजबळ साहेबांच्या स्वच्छ येवला सुंदर येवला या संकल्पनेतून येवला शहर व वाढीव नव वसाहती सह हायवे परिसरातील मुख्य नाले व गटारींची आदरणीय भुजबळ साहेबांच्या स्वखर्चातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे या माध्यमातून शहरातील मुख्य नाले व गटारींची साफसफाई करण्यात येणार आहे.शुक्रवार दि 30 जून 2023 रोजी सकाळी 10 वा विंचूर चौफुली येवला येथून *राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा .श्री दिलीप आण्णा खैरे* यांच्या शुभहस्ते तर ज्येष्ठ नेते मा श्री अंबादास बनकर अण्णा ,स्विय सहाय्यक मा श्री बाळासाहेब लोखंडे , विधानसभा अध्यक्ष श्री वसंत पवार,शहरअध्यक्ष श्री दिपक लोणारी, माजी नगराध्यक्ष श्री हुसैन शेख,राजश्री पहिलवान,प्रदीप सोनवणे,भोलानाथ लोणारी,शबाना शेख,माजी नगरसेवक निसार निंबुवाले,अमजद शेख,मुस्ताक शेख,मलिक मेंबर,भारती येवले,निसार चप्पलवले,राजेश भांडगे,संजय परदेशी ,यांच्या प्रमुख उस्थितीत करण्यात येणार आहे. तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी या मोहिमसाठी सक्रिय सहभाग नोंदवावा आपल्या सूचना नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाशी

डिप्लोमा इन इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजीमहाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. सुप्रिया गोरख सुपेकर हीची नामांकित कंपनी Google नंतर आता Malaysia मध्ये AIA या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये Manager म्हणून निवड

Image
आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) : आनंद चॅरिटेबल संस्था संचलित,डिप्लोमा इन इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी आष्टी गंगाईनगर आनंद शैक्षणिक संकुल मधिल महाविद्यालयाची आष्टी येथील विद्यार्थीनी कु. सुप्रिया गोरख सुपेकर हीची नामांकित कंपनी Google नंतर आता Malaysia मध्ये AIA या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये Manager म्हणून निवड झाली आहे या झालेल्या निवडी बद्दल आज आनंद चॅरिटेबल संस्था संचलित,डिप्लोमा इन इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी आष्टी गंगाईनगर आनंद शैक्षणिक संकुल मध्ये आज सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सत्काराला उत्तर देताना इंजिनिअर कु ‌. सुप्रिया सुपेकर म्हणाल्या की माझी परिस्थिती अत्यंत हलाखीची होती माझ्याकडे डिप्लोमा व डिग्री कालेज साठी पैसे नव्हते मि पार्ट टाईम नौकरी करून मि जिद्द व चिकाटीने अभ्यास करून माझे शिक्षण पुर्ण करून आज मी मलेशिया या देशात  माझी मॅनेजर म्हणून माझी निवड झाली आहे माझे अभिनंदन व सत्कार आष्टी येथे सर्व खुप ठिकाणी झाले पण मी ज्या डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये खुप काही शिकले या यशा मध्ये कालेज चा सर्व प्राध्यापक मोलाचा वाटा आहे आष्टी त्या कॉलेज म

गंगाई फार्मसी कॉलेज कडा कॉलेजचे घवघवीत यश ९८%निकाल

Image
आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) : आनंद चॕरीटेबल संस्था संचलीत गंगाई फार्मसी कॉलेज कडा ता .आष्टी,जि बीड .या कॉलेजचा निकाल ९८ टक्के लागला असून या सर्व उत्तीर्ण झालेल्या तसेच विषेश गुण प्रविण्य मिळालेल्या विदयार्थ्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. भीमरावजी धोंडे साहेब तसेच संस्थेचे डायरेक्टर डॉ.अजय (दादा) भीमराव धोंडे व श्री अभयराजे धोंडे यांनी हार्दिक अभिनंदन केले तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राउत डी. बी., श्री. शिवदास विधाते, श्री. दत्तात्रय गिलचे, श्री. माऊली बोडखे, श्री. संजय शेंडे व प्राचार्य अशोक गदादे सर यांनी या यशाबद्दल सर्व विदयार्थ्यांचे तसेच या निकालात महत्वपूर्ण वाटा असलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे हार्दीक अभिनंदन केले. या मध्ये द्वितीय वर्षात प्रथम कु.चव्हाण स्नेहल संजय ८९.१८% , दितीय कु.पवार अनुराधा भागवत ८५.३६% , तृतीय गावडे रामेश्वर मदन ८३.५५% घेवून प्रविन्य मिळवले . तसेच या वर्षी प्रथम वर्षात कु. महाडीक अर्चना नवनाथ ८३.४०% व्दीतीय कु.साप्ते किरण बाजीराव ८३.००% व तृतीय नन्नवरे कृष्णा धोंडीराम ८२.६०% घेऊन प्राविण्य मिळवले. ही

जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे - प्रा.प्रदीप रोडे

Image
जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे - प्रा.प्रदीप रोडे देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार ; नोबेल हजारे यांना पंचवीस हजार रुपयांचा धनादेश स्मृतिचिन्ह देऊन सन्मान  बीड(प्रतिनिधी ):- जिद्द,चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे असे प्रतिपादन देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे यांनी केले. देवगिरी प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने दि.३० जून रोजी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बीडचे नायब तहसीलदार सुहास हजारे, समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक लक्ष्मण बारगजे,प्रा.विनोद रोडे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब मुंडे, प्रा.राम गायकवाड, गुलाबराव भोले, पत्रकार उत्तम हजारे, तुलसी कॉलेज ऑफ आयटीचे प्राचार्य डॉ.लंकेश्वर थोरात, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या प्राचार्य अश्विनी बेद्रे यांची उपस्थिती होती.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दि.३० जून रोजी सकाळी ११ वाजता गुणवंत विद्यार्

गोरगरीब व रोजंदारी कामगारांसाठी लढणारे भाई गौतम आगळे यांना कुठलीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने ठेवले नजर कैदेत

Image
परळी प्रतिनिधी रोजंदारी मजंदुर सेना केंद्रीय महासचिव तथा वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष भाई गौतम आगळे सर यांना व कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने अचानक कामावरून कमी केल्यामुळे त्यांना पूर्ववत कामावर घेऊन कायम करण्याच्या न्याय मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपरिषद कार्यालय बीड येथे 13 जून पासून रोजंदारी मजदुर सेनेचे केंद्रीय महासचिव तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष भाई गौतम आगळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू असून सदर कामगारांना पूर्ववत कामावर घेऊन त्यांना कायम करण्यात यावे अन्यथा बीड जिल्ह्यात येणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्यात येईल असा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. सदर आंदोलनाची जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आज दिनांक 30 जून 2023 रोजी रोजंदारी मजदूर सेनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे यांना परळी येथून धारूर येथे नजर कैदेत ठेवले असून मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता बचुटे यांना बीड येथून उचलून पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे नजर कैदेत ठेवण्यात आले आह

हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करा.. चव्हाण कृष्णा

Image
वडवणी प्रतिनिधी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांची जयंती 01 जुलै रोजी प्रत्येक तांड्यात वाडी वस्ती व पालावर जयंती उत्साहात साजरी करून आपला स्वाभिमान जागृत ठेवावा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व चव्हाण कृष्णा यांनी प्रसिद्धीपत्रकात केले आहे यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत स्वर्गीय वसंतराव नाईक त्यांचा सिंहाचा वाटा आहे राज्यातील शेतकरी कष्टकरी आणि अनेक वर्षापासून आपल्या मूलभूत हक्कापासून वंचित असलेल्या घटकांना विकासाच्या प्रवर्तन यासाठी कसोशीने प्रयत्न केले शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली पाहिजे त्यासाठी जाणीवपूर्वक नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले रोजगार हमी योजना कृषी विद्यापीठ स्थापना नवनवीन धरण औष्णिक उपकेंद्र अशी एक नव्हे तर अनेक योजना राबवली आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणली राज्यातील भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या कल्याणासाठी विशेष योजना राबविल्या पंचायत राज सारखी महत्वाची योजना त्यांनी सुरू केली त्यामुळे महाराष्ट्र त्यां

बीड नगर परिषद मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात असमर्थ - एस.एम.युसूफ़

Image
पालकांनो,आपल्या मुला-मुलींना काठी चालविणे शिकवा;शाळेत जातानाही काठी देऊन पाठवा! बीड नगर परिषद मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात असमर्थ - एस.एम.युसूफ़ बीड (प्रतिनिधी ) - शाळा सुरू झाल्या आहेत. शिक्षणासाठी लहान मुले-मुली दररोज न चुकता घराबाहेर पडत आहेत. विद्यार्थ्यांवर मोकाट कुत्र्यांचे हल्ले होत आहेत. शहरात कुत्र्यांचा झालेला सुळसुळाट थांबविण्यास बीड नगर परिषद असमर्थ ठरल्याचा आरोप करत आता आपल्या लहान मुला-मुलींची काळजी पालकांनीच घ्यावी व त्यांना काठी चालविणे शिकवावे व शाळेत जाताना सुद्धा त्यांच्यासोबत काठी द्यावी. जेणेकरून मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यापासून ते स्वतःचा बचाव करू शकतील असे आवाहन मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे. याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, काही महिन्यांपूर्वी बीड नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून शहरात वाढलेल्या अफाट मोकाट कुत्र्यांच्या त्रासापासून शहरवासीयांना वाचविण्यासाठी कुत्र्यांना पकडून शहरातील बीड नगर पालिकेच्या बंद पडलेल्या कोंडवाळ्यात टाकून नसबंदी मोहीम राबवावी अशी मागणी क

महाराष्ट्राच दैवत श्रीक्षेत्र भगवान गड-आषाढी विशेष

Image
- ----------------------------------------- बीड गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 8888435869 ----------------------------------------- मराठवाडा ही साधु संतांची भुमी आहे याच मराठवाड्यामध्ये अनेक साधु संत जन्माला आले  आणि आपले  जिवन भागवत धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य भगवंत सेवेसाठी समर्पित केलेले आहे याच मराठवाड्यात अहमदनगर जिल्ह्यातील संत कुलभूषण महात्मा संत भगवान बाबा यांनी स्थापन केलेला श्री क्षेत्र भगवान गड गडाचे मठाधिपती गुरुवर्य श्री संत भगवान बाबांनी अशी आपली ओळख निर्माण केली आहे. आषाढी निमीत्त जे भाविक श्रीक्षेत्र पंढरपुर ला गेलेत  पंढरपूर येथे जाऊन विठठल रुक्मिनी चे दर्शन घेऊन संत भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होतात.     श्री क्षेत्र भगवान गड  हे तिर्थक्षेत्र पाथर्डी तालुक्यात आहे ते तिर्थक्षेत्र ज्या डोंगरावर आहे त्याची दक्षिणोत्तर लांबी किमान 10 किलोमिटर असुन पुर्व पश्चिम रूंदी तिन किलोमीटर आहे या डोंगराचे विशेष वैशिष्टये असे की हा डोंगर कोणत्या ही दिशेने पाहिल्यास तो अर्ध चंद्राकृती दिसतो.तसेच श्री क्षेत्र भगवान गड हे संस्थान अति प्राचीन असून तेथ

पत्रकारिता क्षेत्रातील कोहिनूर हिरा "युवा पत्रकार नितिन भोंडवे"

Image
बीड प्रतिनिधि: अंकुश गवळी सध्या वाढत्या महागाई मुळे अनेक न्यूज पेपर मोडकळीस आले आहेत,अश्या सर्व अडचणी ला सामोरे जात पत्रकारिता करणे,पत्रकार होयच तेवढच सोपं, पण पत्रकारिता करीत असताना येणाऱ्या संकटाना समोर जाणं पण तेवढंच आवघड आहे आस माझं मत आहे.मी एका पत्रकाराचा संघर्षमय जिवन प्रवास जवळून पाहत आलो आहे.आणि तो पत्रकार  "सर्वसामान्य कुटुंबातून पत्रकारिता क्षेत्रात गगन भरारी घेणारा आवलिया युवा पत्रकार नितिन भोंडवे". बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात पिठ्ठी या गावी  1 जुलै 2000 रोजी ,वडील - बबन भोंडवे व आई - आशाबाई भोंडवे,मोठा भाऊ - सतिश भोंडवे अश्या एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला .त्यांचे 1 ते 4 थी प्राथमिक शिक्षण खोमनेवस्ती येथे पार पडले.नंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण 5 वी ते 12 वी जवाहर विद्यामंदिर निरगुडी येथे झाले.येथे शिक्षण घेत आसताना ते विविध स्पर्धा मध्ये भाग घेत अव्वल क्रमांक पटकावत असतं.माध्यमिक शिक्षण घेऊन त्यांनी नंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,बीड येथे प्रवेश घेतला.आणि खऱ्या अर्थाने तेथून पत्रकारितेला सुरुवात झाली. आय टी आय मध्ये प्रशिक

पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्यासाठी बस मिळाना म्हणून वारकरी पाटोदा बस स्टॅन्ड मध्ये तासनतास ताटकळत उभा होते नगरसेवक राजू भैय्या जाधव यांना समजताच तात्काळ वारकऱ्यांना जाण्यासाठी केली सोय

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) आषाढी एकादशी निमित्त पाठवून धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगडला जाण्यासाठी पाटोदा बस स्टैंड वर प्रचंड वारकऱ्यांची गर्दी झाली यामुळे वारकऱ्यांना जाण्यासाठी बसेस उपलब्ध नव्हत्या यामुळे आषाढी एकादशीला ज्यादा बसेस सोडण्यासाठी कर्तव्यदक्ष नगरसेवक राजू भैय्या जाधव यांनी पुढाकार घेत पाटोदा ते नारायणगड दर्शनासाठी जाणाऱ्या गाडया एसटी महामंडळ पाटोदा श्री खेडकर साहेब यांच्याकडे विनंती करुन एसटी बस उपलब्ध करून घेतल्या तसेच एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांना बस स्टॅंडवर चहा व फराळीच करून वारकऱ्यांचे स्वागत करून दर्शन साठी पाठवले असल्यामुळे वारकर्याने आनंद साजरा केलाकार्यसम्राट नगरसेवक राजू (भैय्या) जाधव यांच्या पाठपुरावामुळे वारकऱ्यांना आषाढी एकादशी निमित्त नारायण गडाचे दर्शनाचे भाग्य लाभलं गाड्या कमी असल्यामुळे नारायण गडाकडे जाणार्या गाड्या बंद करण्यात आली होती परंतु राजू भैय्या जाधव ने तात्काळ पाठपुरावा केल्यामुळे दोन गाड्या सोडण्यात आल्या यावेळी पाटोदा ते नारायण गड बस स्थानकात गाडी निघताच वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत आनंद व्यक्त केला

राजेंद्र मस्के यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करणार --पवन कुचेकर

Image
राजेंद्र मस्के यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करणार --पवन कुचेकर  बालाघाटावर विविध सामाजिरक उपक्रमाचे आयोजन  बीड जिल्हा (प्रतिनिधी --गोरख मोरे ) : भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष भावी आमदार मा. राजेंद्रजी मस्के साहेब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेवुन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांनी दिली आहे. बीड तालुक्यातील बालाघाटावर विविध सामाजिक उपक्रम घेवुन राजेंद्रजी मस्के साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. चौसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप, तसेच ५१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे तसेच वृध्द आश्रमात आधार म्हणून मदतीचा हातभार लावला जाणार आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांनी दिली आहे

पाटोदा महावितरण अधिकाऱ्यांच्या हम करे सो कायद्या कामकाजामुळे सामान्य नागरिक हैराण

Image
पाटोदा महावितरण अधिकाऱ्यांच्या हम करे सो कायद्या कामकाजामुळे सामान्य नागरिक हैराण दुरुस्तीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून अधिकाऱ्यावर कारवाई करा तीन गावातील सरपंचाची मागणी पाटोदा (गणेश शेवाळे )पाटोदा महावितरणच्या हम करे सो कायद्या अशा कामकाजामुळे पाटोद्यातील नागरिक हैराण झाले असून महावितरणच्या कार्यालयात ग्राहक तक्रार घेऊन गेले असता उपकार्यकारी अभियंता उडवा उडवीचे उत्तर दित असून ग्राहकांना शासकीय कामात अडथळा आणतात म्हणून गुन्हा दाखल करु अशा धमक्या देतात आशी लेखी तक्रार भायाळा, नफरवाडी, येवलवाडी गावच्या सरपंच व नागरिकांनी केली आसून विविध गावात महावितरणने कसल्याही प्रकारची दुरूस्ती न करता कामे दाखवले जातात यामुळे दुरुस्तीच्या कामात उपविभागाला भेटलेल्या साहित्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी येवलवाडी,भायाळा, नफरवाडी गावातील सरपंच व नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता यांची तक्रार कार्यकारी अभियंता बीड यांच्याकडे केली आहे

चंद्रशेखर आझाद यांचे हल्लेखोर तात्काळ अटक करा नसता महाराष्ट्र पेटवू -डॉ जितीन वंजारे

Image
1)जीवघेणे हल्ले दलीत नेत्यांवर च का होतात ? 2)इथे सरकार विरोधात बोलणाऱ्या लोकांचा आवाज दाबला जातोय त्यांना जीव मारलं जातय. 3)येथील नॅशनल मीडिया सरळ सरळ सत्ताधीश लोकांच्या दावणीला बांधलेला आहे 4)पानसरे, कुलबुर्गी,दाभोलकर प्रमाणे समाजहित पाहणाऱ्या लोकांना जिवे मारलं जातय त्यांच्या खुनाचा तपास होत नाही 5)देशात अराजकता आहे धर्मवाद आहे जातीयवाद प्रांतवाद आहे आणि मोदीजी बाहेरच्या देशात समानतेच्या गोष्टी करतात 6)येथील निवडणुका आल्या की सीमावर्ती भागात तणाव हल्ले घडवून आणले जातात,जातीय धार्मिक दंगली घडवल्या जातात आणि हे वास्तविक येथील नॅशनल मीडिया दाखवत नाही 7)जगाला युद्ध नको बुद्ध हवा असे सांगणारे मोदीजी देशातील दलितांवरील अत्याचारावर गप्प असतात. 8)चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सिक्युरिटी द्या त्यांच्या जीवितास धोका आहे ते दलितांचे मासिहा आहेत बीड प्रतिनिधी /-उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथील देवबंद परिसरामध्ये भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद प्रवास करत असताना काही हल्लेखोराणी त्यांच्यावर गोळीबार केला या घटनेचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी डॉक्टर जितिनदादा वंजारे खाला

देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने उद्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा

बीड, दि.२८ (प्रतिनिधी ) बीड येथील देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने उद्या दि.३० जून, शुक्रवार रोजी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.    येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे शुक्रवार दि.३० जून रोजी सकाळी ११ वाजता गुणवंताचा सत्कार समारंभ होणार आहे. देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदीपजी रोडे सर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास नायब तहसीलदार सुहास हजारे, जि. प. चे उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे, सिल्लोड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जर्नादनदादा मस्के, तुलसी संगणक व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लंकेश्वर थोरात, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन कॉलेजच्या प्राचार्या अश्विनी बेद्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. गुणवंत विद्यार्थ्याच्या या सत्कार सोहळ्यास विद्यार्थी, शिक्षक, पालक, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवगिरी प्रतिष्ठाच्या वतीने करण्यात आले आहे .     नोबल हजारे यांचा विशेष सत्कार देवगिरी प्रतिष्ठानच्या या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यामध्ये तैवान देशात उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्द

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून,गोंदेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

Image
येवला, निफाड , :-राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यास नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवस्मारक समितीच्या वतीने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले आहे. शिवस्मारक समिती गोंदेगाव यांच्या वतीने गोंदेगाव येथे १५ फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा साकारण्यात येत आहे. या पुतळ्याचा चौथरा एकूण ११ फुट इतका उंच असणार आहे. तसेच या पुतळ्याच्या परिसरात समितीच्या वतीने सुशोभिकरण करण्यात येणार आहे. आज गोंदेगाव येथील शिवस्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांची भेट घेऊन त्यांचे आभार मनात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, गोंदेगावचे सरपंच माधव जगताप यांच्यासह शिवस्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

वाल्मिक तात्या निकाळजे यांना राज्यस्तरीय राजर्षी छ. शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार प्रदान!

Image
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष, राज्याचे जेष्ठ मानव अधिकार विशेषज्ञ व कार्यकर्ते, दलित, आदिवासी, भटके विमुक्तांचे लाडके,अभ्यासू व झुंजार लढाऊ नेते, राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्प या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड.वाल्मिक (तात्या) निकाळजे यांच्या 42 वर्षांच्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सक्रिय योगदाना बद्दल, लढाईबद्दल व समाज परिवर्तना बद्दल राजर्षी छ.शाहू महाराज जयंती निमित्त आणि सामाजिक न्याय दिना निमित्त राज्यातील 100 सामाजिक संस्था संघटनांची शिखर संघटना विवेक विचारमंच महाराष्ट्र, शिवाजी विद्यापीठ आणि राज्यातील सहयोगी संस्था संघटना यांच्या वतीने दिला जाणारा राज्यातील मानाचा व प्रतिषठेचा राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित सामाजिक न्याय परिषदेत नुकताच कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला.     केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार, राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश भाऊ खाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनिल वारे, शिवाज

विकास पवार यांच्या ‘सेंच्युरी ऑफ द लेक अर्थर हिल’ या पुस्तकाची रेकॉर्ड बुक मध्ये नोंद

 प्रतिनिधी भंडारदरा / राजूर येथील विकास पवार यांच्या मूळ मराठी पुस्तकावरून अनुवादीत झालेल्या ‘सेंच्युरी ऑफ द लेक अर्थर हिल’ मधून भंडारदरा धरणाचा इतिहास उलगडला आहे. एखाद्या धरणाच्या सुरुवातीपासून सद्य स्थितीपर्यंतचा इतिहास मांडणारे हे एकमेव पुस्तक ठरले असून याची विक्रमांच्या जागतिक स्तरावर विविध विक्रमांची नोंद ठेवणार्‍या इमिका बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् या विक्रमांच्या पुस्तकात नोंद करण्यात आली आहे.    ‘सेंच्युरी ऑफ द लेक अर्थर हिल’ या पुस्तकात धरणाचे बांधकाम सुरू केल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत विविध टप्प्याची निवडक ७० छायाचित्रे देण्यात आली आहेत. बांधकामाच्या सुरुवातीपासून ते १० डिसेंबर १९२६ रोजी तत्कालीन अधिकारी लेस्लि विल्सन यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले, त्यावेळेपर्यंतच्या या फोटोमुळे धरणाच्या बांधकामाचा इतिहास डोळ्यासमोर स्पष्टपणे उभे राहतो.  भंडारदरा धरण म्हटले की, लगेच डोळ्यासमोर येतो अम्ब्रेला फॉल, उंच दरवाजांतून वेगाने वेगाने बाहेर पडणारे पाणी, तसेच समुद्राप्रमाणेच नजर पोहचेल तोपर्यंत पाणीच पाणी.... या धरणाची वाटचाल ही शतकपूर्तीकडे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजूर येथील आदि

लोकनेते विनायकराव मेटे यांना अभिवादन करण्यासाठी गावागावातून जनसागर लोटणार

Image
लोकनेते विनायकराव मेटे यांना अभिवादन करण्यासाठी गावागावातून जनसागर लोटणार एक दिवस साहेबांसाठी देण्याचा गावकऱ्यांनी केला संकल्प बीड (प्रतिनिधी ) दरवर्षी लोकनेते विनायकराव मेटे यांचा वाढदिवस त्यांच्यावर प्रेम करणारे चाहते विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरे करत असत मात्र स्व.मेटे यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य मावळ्यांना त्यांची जयंती साजरी करण्याची वेळ आली आहे. यात मागील दहा दिवसापासून जिल्ह्यासह राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात होते. या उपक्रमांना डॉ. ज्योती मेटे यांनी गावोगावी जात भेटी दिल्या याप्रसंगी त्यांनी लोकनेते विनायकराव मेटे यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे काम केले यावेळी गावोगावी स्वर्गीय मेटे साहेबांवर प्रेम करणाऱ्या चाहत्यानी आपल्या लाडक्या लोकनेत्यांला स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी ३० जून रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार केला आहे.         लोकनेते विनायकराव मेटे यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, विरोधी पक्षनेते यांच्या सह विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे मान्य

स्वच्छ पाटोदा व सुंदर पाटोदा बनविण्याच्या उद्देशाने पाटोदा नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष रस्त्यावर

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) पाटोदा शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या क्लीन पाटोदा मोहिमेस व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे आशे आवाहन नगराध्यक्ष सय्यद आबुशेठ, उपनगराध्यक्ष शरद बामदळे यांनी केले पाटोदा नंगरपचायतने बसवलेल्या कचरा कुंड्या व घंटागाडीतच कचरा टाकावा अशी विनंती पाटोदा शहरातील मेन रस्त्यामधील रस्ता दुभाजकामध्ये वृक्षारोपण करताना केली पाटोदा नंगरपचायतने केली पाटोदा शहरातील मेन रस्त्यामधील दुभाजकामध्ये आज पाटोदा नंगरपचायतने युवा नेते सागर धस यांच्या हास्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पाटोदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष सय्यद आबुशेठ, उपनगराध्यक्ष शरद बामदळे, नगरसेवक बालाजी जाधव, नगरसेवक नय्युम पठाण, पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमिनाथ कोल्हे, अविनाश जाधव,सय्यद शहाबाज, संजय शेवाळे, नितीन दळवी, वैभव वासकर शहरातील व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

एकसंघपणे आगामी सर्व निवडणुकीला समोर जाणार :- चंद्रशेखरजी बावनकुळे

Image
सर्व घटक पक्षांना सोबत घेवून महायुती एकसंघपणे आगामी सर्व निवडणुकीला समोर जाणार :-  चंद्रशेखरजी बावनकुळे मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात महायुतीच्या घटक पक्षांची बैठक दर महिन्याला घटक पक्षांची बैठक होणार -  चंद्रशेखरजी बावनकुळे शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांची बैठकीला उपस्थिती  मुंबई (प्रतिनिधी ) दि २८- महायुतीच्या घटक पक्षांची बैठक भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे प्रमुख उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात पार पडली सदर बैठकीस एकूण नऊ घटक पक्षांचे नेते उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई , मंत्री उदय सामंत, भाजपचे नेते आ.प्रवीण दरेकर ,सरचिटणीस विक्रांत पाटील , शिवसंग्राम चे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, शिवसंग्राम सरचिटणीस विक्रांत आंब्रे, रिपाईचे नेते अविनाश माहातेकर ,प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, रयत क्रांतीचे प्रमुख सदाभाऊ खोत , रा स प चे काशिनाथ शेवते, जनसुराज्य पक्षाचे सुमित कदम, पीपल्स रिपब्लिकन चे जयदीप कवाडे , बरीएम पक्षाचे चे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीत शिवसंग्रामची भूमिका प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी

संभाजी भिडे यांच्या राष्ट्रद्रोही वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री व राज्य गृहमंत्री राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का- शामसुंदर जाधव

Image
 बीड (प्रतिनिधी ) देशासह राज्यांमध्ये अनेक विद्रोही वक्तव्य आज राजकीय मंडळी करीत असल्याने देशासह राज्यातील वातावरण दूषित होत असल्याचा आरोप जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस बीडचे शामसुंदर जाधव यांनी केला आहे. काही कार्यकर्ते आपल्या विद्रोही वक्तव्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये दंगली घडवण्याचे काम करत असून त्यांच्यावर राज्य व केंद्र सरकारचा अंकुश राहिलेला नाही. संभाजी भिडे या वयोवृद्ध व अल्प बुद्धी असलेल्या व्यक्तीने राष्ट्राबद्दल अपमान जनक वक्तव्य करून राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाबद्दल आपली उदासीन भूमिका मांडण्याचे काम केले आहे. संभाजी भिडे यांच्या राष्ट्र विद्रोही वक्तव्यावर केंद्रीय गृह खाते व राज्य गृह खाते बघ्याची भूमिका घेत असल्याने अशा नतदृष्ट लोकांची हिम्मत वाढत आहे यांना पाठीशी घालणाऱ्या केंद्रीय व गृह राज्यमंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये शांतता व संयम ठेवणे ही काळाची गरज असताना समाजामध्ये अशांतता पसरवण्याचे काम काही समाज कंटक करत असल्याचा आरोप ही यावेळी त्यांनी केला. राज्य व केंद्र सरकारने फिर्यादी होऊन संभाजी भिडे यांच्या राष्ट्रद्रोहाचा गुन्हा

वडवणी मध्ये खाजगी सावकार असणाऱ्या शिक्षकाच्या घरी धाड

आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात, वडवणी तालुक्यात खळबळ वडवणी प्रतिनिधी अंकुश गवळी   :- वडवणी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून खाजगी सावकारकी ने डोके वर काढले असल्याची ओरड होत होती.  त्याच अनुषंगाने पेशाने शिक्षक असणाऱ्या खाजगी सावकराच्या घरी आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वडवणी येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयाचे आधिकारी व पोलीसांनी छापा टाकत आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. सावकार असलेल्या सदरील शिक्षकाला ३० जून पर्यत आपले म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे.अशी माहिती. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे प्रमुख शिवराज नेहरकर यांनी दिली आहे.      वडवणी तालुक्यातील चिंचवण येथील रमेश अंबादास बडे यांनी एक महिन्यापुर्वी अवैद्य सावकरी बाबत शिक्षक असणारे शहादेव बळीराम मुंडे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. तक्रारदार यांची मालकीची एक हेक्टर जमीन ही खाजगी सावकार असलेल्या शिक्षकाने काही रकमेअंती जमीनीचे खरेदी खत करुन घेतले होते .या तक्रारी चा अर्ज मिळतात काल सकाळी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे आधिकारी व कर्मचारी सह पोलीसांनी शहादेव मुंडे यांच्या वडवणी

चिंचाळा येथे पंजाबराव डक यांचे शेती विषयक मार्गदर्शन

Image
वडवणी प्रतिनिधी वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे उद्या दिनांक 29 जून 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक यांचे शेती विषयक शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे.    याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने शेतकऱ्यांना शेती विषयक योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यायला हवी शेती मशागत कशा पद्धतीने करायला हवी पाण्याचे नियोजन आणि वापर पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बी बियाण्यांचे करायचे नियोजन पिकांचे योग्य प्रकारे संगोपन औषधांची फवारणी खतांचा वापर आणि शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठीध कशाप्रकारे नियोजन करावे या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवार रोजी सायंकाळी सहा वाजता चिंचाळा येते महाराष्ट्राचे ख्यातनाम हवामान तज्ञ पंजाबराव डक यांचे शेती विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन चिंचाळा सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे तरीही या कार्यक्रमाला वडवणी तालुक्यासह परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आव्हान चि

अफवा कि चमत्कार, प्रशासन मात्र अभिज्ञ,चिंचाळ्यात जमिनीतून महादेवाची पिंड निघाली

Image
वडवणी प्रतिनिधी अंकुश गवळी :- शेती बांध जमिनीतून महादेवाच्या पिंडीची मुर्ती निघालाची घटना वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे काल दुपारच्या दरम्यान घडली आहे. सदरील घटना अफवा कि चमत्कार असा प्रश्न उपस्थित राहत असून याबाबत वडवणीचे स्थानिक आणि संबधित विभाग मात्र अभिज्ञ असल्याचे पाहवयास मिळत आहे. याठिकाणी गांवकरी दर्शनासाठी गर्दी करत असल्याच दिसून येत आहे. याबाबत विश्वासनीय सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, वडवणी तालुक्यातील मौजे चिंचाळा याठिकाणी परडी माटेगांव रोड लगत एका शेतकऱ्याच्या शेती बांधावर काल सोमवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जमिनीतून महादेव पिंडीचे अचानक दर्शन झाले असल्याची माहिती चिंचाळा गांवभर पसरली. यानंतर गांवकऱ्यांनी देखील घटनास्थळी जाऊन मुर्तीची पुजा आणि दर्शन घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. सदरील मुर्ती हि नवी कोरी असल्याच देखील बोलल जात आहे.आज देखील भाविक-भक्त पिंडीचे दर्शन घेताना दिसून येत आहेत. तर सदरील प्रकार अफवा कि चमत्कार आहे. याबाबत वडवणीचे स्थानिक प्रशासन आणि संबधित विभाग मात्र अन्नभिन्न असून या घटनास्थळी काल आणि आज दुपारी बारा वाजेपर्यत कोणी

जिल्ह्यात कुऱ्हाड बंदी असताना दररोज हजारो झाडांची कत्तल !

Image
जिल्ह्यात कुऱ्हाड बंदी असताना दररोज हजारो झाडांची कत्तल ! तात्काळ कारवाई करा नसता वन विभागाच्या दारात झाड लगाओ आंदोलन करणार - वर्षा जगदाळे बालाजी जगतकर बीड - जिल्ह्यात कुऱ्हाड बंदी असताना दररोज शहरात तीस ते चाळीस वाहनातून हजारो झाडांची कत्तली करत लाकूड आणला जातो, विभागीय आयुक्तांनी वन अधिकारी यांना तत्काळ झाडांची कत्तल रोखण्यासाठी आदेश देऊनही विभागीय वन अधिकारी गीते व वन अधिकारी काकडे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याने हजारोच्या संख्येने बीड जिल्ह्यातील बंदी असलेल्या झाडांची कत्तली होत आहेत, याकडे तात्काळ वन विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या वतीने वन विभागाच्या कार्यालयासमोर झाडे लगाव आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी दिला आहे. शहरातील एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणात स्वा मिल धारक आहेत, शहरात तब्बल 40 च्या आसपास स्व मील धारक कार्यरत असून जिल्ह्यात शासनाने बंदी घातलेले निम ,जांभूळ ,पिंपळ, वड चिंच, आधी झाडांना सर्रासपणे तोडले जात आहे, लाकूड

आंबेडकर चळवळीसाठी युवकांनी पुढे यावे - सर्वजित बनसोडे

Image
माजलगाव - तथागत भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा घेऊन आज ग्रामीण भागात तळागाळात सर्वसामान्य कार्यकर्ते तन-मन-धनाने निस्वार्थी आणि स्वाभिमानाने कार्य करतात . अशा सामान्य कार्यकर्त्यांची दखल सामाजिक समता अभियान चे घेऊन बहुजन नायक पुरस्कार 2023 प्रदान केला. हा पुरस्कार सामान्य कार्यकर्त्यांचा केलेला बहुमान हा कार्याला ऊर्जा देणारा आहे. व युवकांनी चळवळ गतिमान करण्यासाठी पुढे यावे.असे प्रतिपादन सर्वजीत बनसोडे यांनी मुख्य मार्गदर्शनपर बोलताना मत व्यक्त केले.                 माजलगाव येथे सामाजिक समता अभियान च्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त *बहुजन नायक पुरस्कार 2023* व * एक दिवशीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद चे उपशिक्षण अधिकारी मा नानाभाऊ हजारे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक समता अभियान चे अध्यक्ष प्रवीणकुमार डावरे , तर उद्घाटक म्हणून चिंचाणे साहेब होते . याप्रसंगी विशेष उपस्थितीमध्ये कार्याध्यक्

सोयगाव येथे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी घेतली प्रशासकीय आढावा बैठक

सोयगाव येथे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी घेतली प्रशासकीय आढावा बैठक.... अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम 5 जुलै पर्यत शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यासाठी तहसीलदार यांना सूचना.... सोयगांव प्रतिनिधि मुश्ताक शाह   ANCHOR: शुक्रवारी सायंकाळी झालेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गाव निहाय आढावा घेत विविध कामांचा आढावा घेतला आढावा बैठकीत मांडलेल्या समस्या ऐकून घेतल्यानंतर त्या मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले आढावा बैठकीत अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली यावेळी अंबादास दानवे यांनी तहसीलदार रमेश जसवंत यांना पाच जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्याबाबत सूचना केली सोयगाव हे गैरसोयीचे गाव नसून हे एक सोयीचे ठिकाण आहे यासाठी अधिकाऱ्यांनी भान ठेवावे अशाही सूचना यावेळी त्यांनी केल्या

पंढरपूरजवळ माजी आ.भीमराव धोंडे यांच्यावतीने संत वामनभाऊ दिंडीला महापंगत

Image
पंढरपूरजवळ माजी आ.भीमराव धोंडे यांच्यावतीने संत वामनभाऊ दिंडीला महापंगत अत्यंत पवित्र,उत्साही आणि भक्तीमय वातावरणात संत वामनभाऊंचा पालखी सोहळा  --माजी आ.भीमराव धोंडे आष्टी /बीड ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :   संत वामनभाऊंच्या लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पंढरीच्या वाटेवर अत्यंत पवित्र मनाने तल्लीन होऊन मार्गस्थ असतानाच दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी आ.भीमराव धोंडे यांनी पंढरपूरजवळ माजी आ.भीमराव धोंडे यांच्यावतीने संत वामनभाऊ दिंडीला महापंगत दिली.या पालखी सोहळ्यात माजी आ.धोंडे हे परवा काही अंतर पायी चालले आज मंगळवार दि.२७ जुन रोजी महापंगत दिली.अध्यात्म परंपरेमध्ये धोंडे घराण्याची वारीची सेवा करण्याची परंपरा माजी आ.भीमराव धोंडे यांनी सातत्याने जपली आहे.महाराष्ट्राच्या संत परंपरेने पावन अशा भूमित पंढरीच्या वारकऱ्यांना स्नेहभोजन देऊन कर्तव्य निभावण्याची कर्तव्य भावना अत्यंत पवित्र मनाने गेल्या १२ वर्षापासून माजी आ. भीमराव धोंडे यांनी जपली आहे. महाराष्ट्रातील संतांनी सांगितलेला समता , बंधुत्व,ऐक्याचा संदेश यापुढेही आपण जतन करूयात,संतांचा समतेचा संदेश पुढे ने

चिंचाळा येथे जमिनीतून वर आली महादेवाची पिंड

Image
चमत्कार झाल्याने गावकऱ्यांची पाहण्यासाठी गर्दी. मूर्ती पाहण्यासाठी चिंचाळा गाव शेतकऱ्यांच्या रानात वडवणी प्रतिनिधी अंकुश गवळी वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे सोमवार रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अरुण शिंदे यांच्या शेतामध्ये महादेवाची पिंड जमिनीतून वर आल्याची सांगण्यात येत असल्याने चिंचाळा गावातील आणि परिसरातील महिला पुरुष सह पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे.       अरुण शिंदे यांचे शेत गावापासून जवळच परडी माटेगाव रस्त्यालगत आहे काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाखाली महादेवाची पिंड निघाल्याचे लहान मुलांच्या लक्षात आले. ही माहिती गावात समजतात महिला पुरुषांनी पिंड पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असुन खरोखरच महादेवाची पिंड जमिनीतून निघाली असल्याचे अधिकृतपणे पुरातत्त्व विभागाने जाहीर केलेले नाही.

चिंचाळा गावकऱ्यांनी दिला शिक्षक दांपत्याला भावपूर्ण निरोप.

Image
आष्टी /बीड (प़तीनिधी --गोरख मोरे ) : चिंचाळा येथे कार्यरत असलेले रत्नाकर चव्हाण व त्यांच्या पत्नी सौ मंजुषा चव्हाण यांची बदली झाल्याने गावकऱ्यांनी मोठा समारंभ आयोजित करून भावपूर्ण निरोप दिला. रत्नाकर चव्हाण व त्यांच्या पत्नी यांनी चिंचाळा या गावात नियुक्ती झाल्यापासून विद्यार्थी हिताचे व शाळा विकासा साठी अनेक उपक्रम यशस्वी केले आहेत. स्वतःची मुलगी त्यांनी याच शाळेत शिकवली त्यामुळे गावकऱ्यांचा जिल्हा परिषद शाळेवर वरील विश्वास वाढला.चव्हाण सर यांनी लोकसहभागातून शाळा डिजिटल केली प्रोजेक्टर, संगणक, टॅबलेट इत्यादी डिजिटल साधने शाळेमध्ये उपलब्ध असल्याने तसेच त्याचा प्रभावी वापर करण्याचं कौशल्य श्री चव्हाण सरांकडे असल्याने चिंचाळा येथून चांगले विद्यार्थी घडले. शाळा बरोबरच त्यांनी सामाजिक बाबतीत लोकांना जागृत केले स्वतःला दोन्ही अपत्य कन्या असल्याने लिंगभेद दूर करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांनी लोकांना दाखवून दिले. त्याचा परिणाम असा झाला की, 2010 ते 14 या काळात शाळेच्या पटावर मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण खूप जास्त होते,ते 2022- 23 ला बदलून मुलींचे प्रमाण वाढलेले आहे.हे