रोजंदारी मजदूर सेनेची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त नवीन समितीचा लवकरच विस्तार -भाई गौतम आगळे सर


बीड प्रतिनिधी :-रोजंदारी मजदूर सेनेची बीड जिल्हा कार्यकारणीला बरखास्त करण्यात आल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी दिली. कार्यरत पदाधिकारी यांनी संघटनेच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे नवीन कार्यपद्धतीत आवश्यक बदल करून नव्या उत्साहाने संघटनात्मक कामकाज सुरू करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
     भाई गौतम आगळे सर यांनी सांगितले की बीड जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच कष्टकरी कामगारांना संघटनेशी जोडण्यासाठी नवीन जिल्हा कार्यकारिणीची स्थापना लवकरच करण्यात येणार आहे. नव्या समितीत जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सक्रिय आणि सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन गोर, गरीब व कष्टकरी कंत्राटी कामगारांना न्याय देण्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व आस्थापनेतील कंत्राटी कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी विविध आंदोलने लोकशाही मार्गाने राबिन्यावर भर दिला जाणार असून, नवीन समितीचा विस्तार लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी संघटनेच्या पुढील निर्णयाला सहकार्य करावे तसेच सामाजिक कार्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर व मराठवाडा अध्यक्ष राजेश कुमार जोगदंड यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी