धनदांडग्यांना , पुढा-यांना पायघड्या मात्र गोरगरिबांना कायद्याचा दंडुका! नगरपालिकेच्या दुटप्पीपणा निषेधार्ह:- डॉ.गणेश ढवळे

 

बीड (दि.१७) : बीड शहरातील बसस्थानक, जिल्हा रुग्णालय परिसरातील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टपऱ्या, फेरीवाले व लघुउद्योजकांच्या दुकानांवर अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली कारवाई करत नगरपालिकेने कायद्याचा धाक दाखवला. मात्र दुसरीकडे शहरातील मोठमोठ्या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.

नगरपालिकेने गोरगरीबांच्या उपजीविकेवर हातोडा चालवत स्वतःची पाठ थोपटून घेतली असली, तरी बिंदुसरा व करपरा नदीपात्रातील अतिक्रमित बांधकामे, मोठमोठे मंगल कार्यालये, हॉटेल्स आणि भू-माफियांनी केलेल्या नियमबाह्य बांधकामांवर मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी वारंवार आंदोलने आणि निवेदने दिली आहेत. मात्र नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. आर्थिक साटेलोटे आणि राजकीय दबावामुळेच मोठ्या अतिक्रमणधारकांना अभय दिले जात असल्याचा आरोपही होत आहे.

“कायदा सर्वांसाठी समान असावा. गोरगरीबांवर कारवाई आणि धनदांडग्यांना पायघड्या हा प्रकार थांबला पाहिजे. अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव न करता सर्वांवर समान निकष लावले गेले पाहिजेत,” अशी मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी