जीवे मारण्याच्या आरोपातून तीन आरोपीची नियमित जामीन मंजूर
जीवे मारण्याच्या आरोपातून तीन आरोपीची नियमित जामीन मंजूर
सखाराम पोहिकर
गेवराई तालुका प्रतिनिधी
गेवराई दिनांक 11 / 5 / 2026 रोजी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब बीड यांनी आरोपी 1 ) संदीप प्रधान 2 ) रोहित प्रधान 3 ) तेजस प्रधान राहणार धोंडराई तालुका गेवराई जिल्हा बीड यांचे विरुद्ध भा . न्या . स . चे कलम 109 (1) 118 (1) 189 (2) 190 191 (2) 191 (3) 351(2). च्या आरोपातून नियमित जामीन मंजूर केली आहे
याबाबत सविस्तर हकीगत अशी की दि . 24 /3 / 2026 रोजी सायंकाळी 6 = 00 वाजण्याच्या सुमारास वरील सर्व आरोपीने सदर प्रकरणातील फिर्यादीस म्हणाले की तू आम्हाला इंस्टाग्राम च्या ग्रुप वर आम्हाला शिव्या का दिल्या असे म्हणून मारहाण केली सदर महाराणीच फिर्यादीचे डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने फिर्यादी हा काकू नाना हॉस्पिटल बीड येथे ऍडमिट झाला व चार दिवसांनी फिर्याद दाखल केली सदर घटनेवरून गेवराई पोलीस स्टेशन मध्ये आरोपीने विरोधात भा . न्या . स . चे कलम 109(1) 118 (1) 189 (2) 190 191 (2) 191 (3)351 (2) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला व आरोपी यांचे वतीने नियमित जामीन अर्ज दाखल करण्यात आला व सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे भक्कम बाजू मांडण्यात आली व आरोपीचे वकीलचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा . अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब बीड एस एस घोरपडे साहेब यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपीची नियमित जामीन अर्ज मंजूर केला आरोपीच्या वतीने एडवोकेट अमोल दाभाडे यांनी काम पाहिले व त्यांना एडवोकेट अभिजीत गलधर सिद्धांत कोल्हे यांनी सहकार्य केले
Comments
Post a Comment