नायरा पेट्रोल पंप ते जमजम पेट्रोल पंप रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने अपघातात वाढ

नायरा पेट्रोल पंप ते जमजम पेट्रोल पंप रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने अपघातात वाढ.

नायरा पेट्रोल पंप ते जमजम पेट्रोल पंप पर्यंत सरर्वीस रोड तात्काळ करण्यात यावा अन्यथा अंदोलन करु :- पप्पु गायकवाड
गेवराई प्रतिनिधी दि. २२ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील गेवराई शहराच्या बाहेरून जाणारा झमझम पेट्रोल पंप ते नायरा पेट्रोल पंप चौक या ठिकाणी उड्डाण पुलाचे कामे चालू आहेत मात्र ती कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे एका साईडचा रस्ता बंद करून दुसऱ्या साईटचा रस्ता सुरू असून त्या रस्त्यावरून दोन्ही साईटचे वाहने येजा करत असल्या मुळे तसेच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांतून सतत वाळू सांडत असल्यामुळे व सिग्नल कमकुवत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघाताची संख्या वाढली असून मागील दोन महिन्यात १४ ते २० अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
 एकाच साईडने दोन्ही साईटचे वाहने ये जा करत असल्यामुळे रुग्णवाहिकेला देखील खूप त्रास होत आहे तसेच रुग्णवाहिकेला रुग्ण नेताना अडचणी निर्माण होत असल्यामुळे रुग्णांचे देखील प्राण गमावले आहेत. 
 नायरा पेट्रोल पंप ते जमजम पेट्रोल पंप हा रस्ता जलद गतीने तात्काळ तयार करण्यात यावा तसेच रस्ता होईपर्यंत सर्विस रोड तात्काळ सुरू करण्यात यावे अन्यथा दि. ९ जुन रोजी लोकशाही मार्गाने प्रवाशांसह वंचित बहुजन आघाडीच्यावतिने जमजम पेट्रोल पंप चौक व नायरा पेट्रोल पंप चौक या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करु असा लेखी निवेदनाद्वारे केलेल्या मागणीमध्ये वंचित बहुजन आघाडी मा.तालुका अध्यक्ष अजयकुमार (पप्पू) गायकवाड यांनी उपमहाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक भारतीय राज्यमार्ग प्रधिकरण यांच्या सह मा.जिल्हाधिकारी , मा.पोलीस अधीक्षक,मा.पोलिस निरीक्षक गेवराई यांना इशारा दिला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी