Posts

Showing posts from September, 2022

शेख ज़ाफ़र सुलतान चे बायोटेक्नॉलॉजीत घवघवीत यश,मौलाना आझाद महाविद्यालयात विभागात दुसरा

Image
औरंगाबाद (प्रतिनिधी ) - येथील मौलाना आझाद कॉलेज ऑफ सायन्स मधील बीएससी बायोटेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थी शेख ज़ाफ़र सुलतान याने पदवी परीक्षेत ८० टक्के गुण घेत विभागात दुसरा येण्याचा मान मिळविला. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. मझहर अहेमद फ़ारुक़ी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.          शेख ज़ाफ़र हा इयत्ता दहावी व बारावी मध्येही विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला होता. यानंतर त्याने बायोटेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश घेतले. दरवर्षी चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण होत राहिला. आता बीएससी बायोटेक्नॉलॉजी च्या पदवी परीक्षेत सुद्धा ८० टक्के गुण घेत उत्तीर्ण झाला. त्याला कॉलेजच्या अध्यापिका डॉ. रेश्मा ज़वेरीया यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. शेख ज़ाफ़रने ८० टक्के गुण घेत मिळविलेल्या या यशाने त्याचे पुढील शिक्षण एमएससी बायोटेक्नॉलॉजीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शासकीय कोट्यातून नंबर लागला आहे. याबद्दल त्याचे मौलाना आझाद शिक्षण संस्थेने तसेच सर्व अध्यापक, अध्यापिकांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच बीड शहरातील त्याचे मामा

मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला प्रचंड संख्येने उपस्थित रहा

Image
उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांचे शिवसेना पदाधिकारी , कार्यकर्त्यांना अवाहन सोयगाव प्रतिनिधी :- मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास सोयगाव तालुक्यातून प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अ.सत्तार यांनी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले आहे. सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातून 25 हजार पदाधिकारी कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी जाणार असून यासाठी 500 बसेसचे नियोजन मित्र मंडळाने केले असून महिला पुरुषांना स्वतंत्र बस असणार असल्याचे अब्दुल समीर म्हणाले.         कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी मुंबई येथे होणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेना दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने सोयगाव शहरासह तालुक्यातील सवाळतबारा, फर्दापूर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर बोलत होते.           मुख्यमंत्र्यांनी सिल्लोड - सोयगाव तालुक्यासाठी भरभरून निधी दिला. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या रूपाने मराठवाड्याला पहिल्यां

बिनपगारी शिक्षकांना शंभर टक्के पगार मिळवण्यासाठी मोर्चात सामील व्हा.

Image
                                   मराठवाडा शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास काकडे यांचे आवाहन  वडवणी प्रतिनिधी     विनाअनुदानित शिक्षकांना शंभर टक्के वेतन द्या या प्रमुख मागणीसह पेन्शन योजना लागू करा या मागणीला घेऊन मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर वीनाअनुदानित बिनपगारी शिक्षकांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे वडवणी तालुकाध्यक्ष श्रीनिवास काकडे यांनी केले आहे.     2001 सालापासून शासनाने शिक्षण क्षेत्रात कायम विनाअनुदानित धोरण आणल्यापासून आत्तापर्यंत शिक्षकांची उपासमारी सुरू आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये तीन-चार पक्षाची सरकारे आली आणि गेली परंतु शिक्षकांचे प्रश्न सोडवून त्या शिक्षकांना शंभर टक्के पगार देण्याचे काम एकाही सरकारने केलं नाही. त्यामुळे अनेक बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांच्या पुढे जगावं की मरावं हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षका

बीड पशुसंवर्धन विभागाचा भोंगळ कारभार स्थानिक उमेदवारांना डावलून भलतेच घेतले कामाला-हरिदास शेलार

Image
पाटोदा प्रतिनिधी बीड जिल्हातील खाजगी पशुधन पदवीधारक यांनी लंपी स्किन रोग काळात शासनाकडून कोणताही पैसा न घेता सेवा दिली आहे . त्यामुळे खाजगी कंत्राटदारामार्फत स्थानिक पशुधन पदवीधारक यांना नोकरीची संधी देण्यात यावी . अन्यथा या विरोधात लोकशाही मार्गाने मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा हारिदास शेलार व विकास रसाळ यांच्या वतीने मा. मुख्यमंत्री व मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांना यांना दि . २ ९ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे . या निवेदनात नमूद करण्यात आले की , खाजगी पर्यवेक्षक पदविका धारक असून बीड जिल्ह्यातीलच आहेत . तसेच शासनाने सिनर्जीज सोल्युशन कंपनीला बाह्य स्त्रोत कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यास मान्यता दिली . सिनर्जीज सोल्युशन या कंपनीने आपल्या जिल्हातील पशुधन पर्यवेक्षक पदविका धारकयांचा विचार करावा . नाही तर या विरोधात आंदोलन करावे लागेल . या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील पशुधन पर्यवेक्षक पद विका धारक यांचा विचार करावा . अंशकालीन सारखे सेवादाता यांना सरळ सेवेत १० टक्के आरक्षण देण्यात यावे . सेवादाता हे २०१७ ते २०२० यांनी अनेक वर्षापासून पशु संवर्

आरेवाडी येथे दसरा मेळाव्याला लाखोच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे

Image
महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, डॉ. स्नेहा सोनकाटे बीड प्रतिनिधी अंकुश गवळी:- लोकनेते बहुजन सम्राट धनगर समाजाची मुलुख मैदान तोफ, मा, आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आरेवाडी या ठिकाणी रविवार दिनांक 02. ऑक्टोंबर 2022 दुपारी एक वाजता, स्थळ बिरोबा वन आरेवाडी तालुका कवठेमहाकाळ या ठिकाणी दसरा मेळावा संपन्न होणार आहे, बहुजन समाजाला एक शूर स्त्री महाराणी अहिल्यादेवी यांचा वारसा लाभला आहे, महिलांची संख्या अधिक प्रमाणात असावी, यावेळी महाराष्ट्रातील महिलांनी मोठ्या प्रमाणात या मेळाव्याला उपस्थित राहावे म जास्तीत जास्त महिलांनी युवकांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावावी असे आव्हान डॉ,स्नेहा सोनकाटे मॅडम यांनी केले आहे,

बीड जिल्हयात खराब भगरीची विक्री सुरूच --बबलु शिंदे

Image
ओम एजन्सी चा बाकीचा साठा कुठे आहे ? (बीड प्रतिनिधी) नवराञ उत्सवाची नुकतीच सुरूवात झाली आणी अन उपवास धरलेल्या अनेकांनी भगर खालली या भगरीमुळे अनेकांना विषबाधा झाली बीड,शिरूर,गेवराई तालुक्यातील लोकांना विषबाधा झाली यावर बीड जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले अन्न व औषध प्रशासन विभागाने बीड येथील ओम एजन्सीवरती कारवाई करून फक्त 1800 किलोचा साठा दाखवला असुन बाकी साठा ओम एजन्सीची हातमिळवणी करून दाबला आहे अशी शंका येत असुन अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेली कारवाई ही केवळ दिखावा असुन ओम एजन्सीचा बाकीचा साठा गेला कुठे याची तात्काळ चौकशी करून योग्य कारवाईत करण्यात यावी अन्यथा द्वारकाधीश ग्रुपच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा द्वारकाधीश ग्रुपचे बबलु शिंदे यांनी दिला आहे

माजी सैनिक एफ.एम. गायकवाड यांचा सेवापुर्ती सोहळा सैनिकी विद्यालयात संपन्न

Image
   बीड प्रतिनिधी / सैनिकी विद्यालय बीड येथे शिक्षण निदेशक माजी सैनिक गायकवाड एफ.एम सर यांचा सेवापूर्ती सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल सोंडगे सर व प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे हे उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित अंजनवती हायस्कूल अंजनवती चे मुख्याध्यापक प्रदीप जगताप व कानडी घाट हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय कसबे त्याचबरोबर डॉ. अभिजीत पंडित इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सैनिकी संचलन करून झाली मान्यवरांचा डाके सर यांनी स्वागत केले कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षण निदेशक कोल्हे सर धारणकर सर सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी सर्वांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन शिवनीकर सर व क्षीरसागर सर यांनी केले विद्यार्थ्यांसह सर्व नातेवाईक पाहुणेमंडळी सर्व प्रमुखातिथी सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला

शेख शागिर्द अहमद यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रविवार रोजी कॉकसिट कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य उर्दु शिक्षक संघटना जिल्हा लातूर यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार उस्मानाबाद येथील कर्तव्यदक्ष शिक्षक शेख शागिर्द अहमद (सर)यांना मराठवाडा शिक्षक आमदार श्री.विक्रम काळे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी बीड, नांदेड, लातूर आणि परभणी येथील आदर्श शिक्षकांनाही राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी रॉयल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पाटील साहेब, मोइज शेख, मिनहाजुद्दिन काझी, फारुक शेख वकिल साहेब, महाराष्ट्र राज्य उर्दु शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष एम.ए.गफ्फार, युनुस अंसारी, एम.ए.राफे सर, डॉक्टर तबस्सुम बाजी, सादात सर, फजल सर, नुसरत कादरी सर व त्यांचे सहकारी शिक्षक व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडी बद्दल शेख शागिर्द अहमद (सर)यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

कुंभारवाडी येथे स्मार्ट कापूस कॉटन प्रकल्पाचे ' दिव्तीय प्रशिक्षण संपन्न

Image
एकात्मिक कीड व्यवस्थापनातून तुडतुडे,फुलकिडे व पांढऱ्या माशीचे करा नियंत्रण- डॉक्टर भैय्यासाहेब गायकवाड   कुंभारवाडी येथे स्मार्ट कापूस कॉटन प्रकल्पाचे ' दिव्तीय प्रशिक्षण संपन्न    बीड प्रतिनिधी अंकुश गवळी सेवा पंधरवडा निमित्त मौजे कुंभारवाडी या ठिकाणी आज दिनांक 30.09.2022 रोजी स्मार्ट कॉटन या योजनेअंतर्गत द्वितीय प्रशिक्षण पार पडले. यावेळी डॉक्टर गायकवाड बोलत होते त्यांनी कापसातील विविध किडींची ओळख शेतकऱ्यांना करून देताना त्याचे एकात्मिक नियंत्रण करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझरचे विस्तार अधिकारी श्री येवले यांनी मोसंबी ऊस व कापूस या पिकातील खत व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन संदर्भात उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी श्री खेडकर यांनी प्रशिक्षणामध्ये PMFME योजनेची सविस्तर माहिती उपस्थितांना करून दिली व या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा असे ही आव्हान केले.तसेच महाडीबीटी अंतर्गत एससी एसटी व इतर लाभार्थ्यांनी आवश्यक बाबीसाठी ऑनलाईन करून या योजनेत सहभाग

सफाई कामगारांचे प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावे - जिल्हाधिकारी

Image
. बीड ( प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्व सफाई कामगार व इतर कंत्राटी कामगारांना किमान वेतन व प्रचलित अद्यावत कामगार कायद्यांच्या सोयी-सुविधा तात्काळ द्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या संयुक्त बैठक संपन्न झाली त्या वेळी दिले.   ‌ ‌ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात आयोजित जिल्हायातील सफाई कामगारांच्या प्रश्नावर संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी जिल्हायातील सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद / नगरपंचायत, रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे, मराठवाडा अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी अशोक हिंगे पाटील, मराठवाडा अध्यक्ष, रोजंदारी मजदुर सेना, राजेश कुमार जोगदंड, जिल्हा अध्यक्षा अनिता बचुटे, उपाध्यक्षा आशाबाई कांबळे, कविता जोगदंड, सचीव प्रणीता आचार्य, परळी वैजनाथ शहर अध्यक्षा सोनुबाई आचार्य,सह जिल्हा पदाधिकारी व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. सदरील प्रकरणी कामगार कायद्यांच्या सोयी-सुविधा, शासन परिपत्रक निर्गमित सन २०१४ व २०१६ करण्यात आले. तरी अद्याप त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात होत नाही. त्या

आष्टी मधील औषधनिर्माताचा गौरव करून "जागतिक औषध निर्माता दिन" साजरा

Image
 आष्टी शहरांमध्ये 400 विद्यार्थीयांची रॅली काढून आरोग्या विषयी केली घोषणा देऊन जनजागृती  आष्टी प्रतिनिधी  आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसी आष्टी (डी. फार्मसी) व कॉलेज ऑफ फार्मासूटिकल सायन्स अँड रिसर्च आष्टी (बी फार्मसी ) येथे 25 सप्टेंबर जागतिक औषध निर्माता दिन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साजरा करण्यात आला त्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . 24 सप्टेंबर या दिवशी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथील लॅब इन्चार्ज जयचंद नलावडे व त्यांचे इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने सर्व विद्यार्थ्यांचे कॉलेजमध्ये हिमोग्लोबिन व ब्लड ग्रुप, व इतर चाचण्या करण्यात आला तसेच दुपारी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होते रांगोळी स्पर्धेमध्ये फार्मासिस्ट ही थीम होती. त्यामध्ये प्रथम क्रमांक लगड राजनंदिनी व मंदिलकर मनीषा( द्वितीय वर्ष बी फार्मसी) तसेच द्वितीय क्रमांक पाटील विकास व येरपुडे तेजस (द्वितीय वर्ष बी फार्मसी) व तृतीय क्रमांक मानसी जाधव व ऋतुजा कोकणे (अतिम वर्ष डी फार्मसी) या विद्यार्थ्यांनी पटकावला. रविवार दिनांक 25 सप्टेंबर जागतिक औषध निर्माता दिन या दिवशी आष्टी मध

पाटोदा तहसीलदार यांच्या कडून सरकारी वाहनाचा दुरउपयोग चक्क बाजार करण्यासाठी तहसिलच्या गाडीचा वापर

Image
 पाटोदा (प्रतिनिधी गणेश शेवाळे )“दुसऱ्याला सांगे ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण” असाच काही प्रकार पाटोदा तहसील मध्ये पाहिला मिळत आहे. पाटोदा तहसिलदार कार्यालयात सामान्य नागरिकांना गेल्यावर अनेक शासकीय नेम दाखवतात मात्र स्वतः शासकीय नेमाचे पालन करत नाहीत असाच प्रकार गुरुवार दिनांक 29/09/2022 रोजी पाहिला मिळाला पाटोदा तहसीलदार दुपारी 2.30 मिनिटांच्या सुमारास शासकीय वाहन घेऊन चक्क बाजार करण्यासाठी बाजारात गेल्या तासभर तहसिल प्रशासानाचे वाहन बाजार स्थळा जवळ उभे असल्यामुळे शहरात चांगलीच चर्चा रंगत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासकीय वाहनाचा दूर उपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी तालुक्यातील नागरिका कडून चूक झाली तर महसुल विभाग लाखो रुपय दंड वसूल करतात मात्र अधिकाऱ्यांनी चुक केल्यावर वरिष्ठ अधिकारी काही कारवाई करतील का ? असा प्रश्न तालुक्यातील नागरिकापुडे पडला आहे

विदर्भाच्या विकासाला गती मिळेल केंद्र मंत्री गडकरी, पलिटल मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी सामंजस्थ करार

Image
, सोयगाव प्रतिनिधी:-, त्यांनी सांगितले फळे भाजीपाल‌ कापूस दूध ऊस , मराठवाडायासाठी विकासाची गंगा ठरणार जालना जिल्ह्यातील डाय पोटेच्या‌ प्रकल्पास संदर्भात आज दिल्ली येथे, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या अध्यक्षेत खाली बैठक झाली या बैठकीला मी राज्याचा कृषिमंत्री या नात्याने उपस्थित होतो जालना जिल्ह्यातील जवसगाव आणि दरेगाव परिसरात १८२, हेक्टर क्षेत्रावर या प्रकल्पासाठी ‌२६४ कोटी रुपयती गुंतवणूक केली, जाणार त्यात कृषी पूरक उद्योगांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे,

बालाजी गुरखूदे यांची आर्म्स ॲक्ट गुन्ह्यामधून निर्दोष मुक्तता

Image
 बीड : - ( प्रतिनिधी ) : फिर्यादी महेश मंगलराव चव्हाण , नेमणूक दरोडा प्रतिबंधक पथक , बीड यांना दि.३१-०३-२०१९ रोजी सोबत सहपोलीस निरीक्षक गजानन जाधव साहेब , पो.ह. सौंदरमल , नागरगोजे , खताळ , राठोड , शिंदे भागवत गिते म.पो.ना. , साबळे , असे सरकारी जीप क्र . एमएच २३ / ए एफ ०० ९ ३ या वाहनाने चालक पो . शिपाई दुधाळ सह बीड शहरात गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुप्त बातमी मिळाली की , इसम नामे बालाजी गिरधारीलाल गुरखूदे , रा . नवी भाजी मंडई , बीड़ हा त्याचे ताब्यात घातक शस्त्र तलवार व कटियार जवळ बाळगून भाजी मंडई येथे फिरत आहे , अशी बातमी मिळाल्यावर दोन पंचासह बातमीच्या ठिकाणी अचानक १३.४५ वाजता शोध घेतला असता , इसम त्याचे उजवे हातात तलवार घेऊन ( शस्त्रासह ) बेदरे सोनार यांचे दुकाना समोर मिळून आला . त्यास ताब्यात घेवून नाव , गाव विचारले असता , त्याने बालाजी गिरधारीलाल गुरखूदे असे नाव सांगितले वरून , त्याची दोन पंचा समक्ष अंगझडती घेता , त्याचे कमरेस डावे बाजूस एक कटीवार व एक स्टीलची मूठ असलेली लोखंडी पाते असलेली दोन फूट ६ इंच लांबीची तलवार मिळून आली , ते नमूद २ पंचासमक्ष त्याचा जप्ती पंचनाम

कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासारचे पुरस्कार जाहीर

Image
शिरूर (का.) प्रतिनिधी : येथील कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक 6 ऑक्टोबर 2022 रोजी आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने आय.क्यू.ए.सी. विभाग व कला व सामाजिक शास्ञे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय अंतर विद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदेचे उद्घाटक प्राचार्य विवेक मिरगणे तर बीजभाषक अण्णा भाऊ साठे साहित्याचे गाढे अभ्यासक तथा विचारवंत प्रोफेसर शिवाजी जवळगेकर असणार आहेत. परिसंवाद सत्रात सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे प्रमुख व्याख्याते तर अध्यक्ष म्हणून डॉ. अब्दुल अनीस अब्दुल रशीद उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. तिसऱ्या सत्रात निवडक संशोधन पेपरचे वाचन होणार असून या सत्राचे अध्यक्ष डॉ. वैशाली आहेर असणार आहेत.         समारोप सत्रामध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक तथा अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील डॉ संजय सांभाळकर संवाद साधणार आहेत. या परिषदेचे मुख्य आयोजक तथा कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासारचे प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे अध्यक्ष म्हणून

हिवरसिंगा प्राथमिक शाळेत आरोग्य तपासणी संपन्न

Image
 सामाजिक हिताचे उपक्रम राबविण्यासाठी श्रीनिवास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नेहमीच आ्ग्रेसर-डॉ.तांबारे (शिरूर प्रतिनिधी ) दि.२९ सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय रायमोह व श्री निवास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिवरसिंगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय बाल स्वास्थ उपक्रम अंतर्गत जि.प.के.प्रा.शाळा हिवरसिंगा येथे शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी उपक्रम संपन्न झाला या साठी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ.संभाजी तांबारे सर, डॉ.संध्या पुरनाळे,श्री.विनोद कोल्हे,सौ.बोत्रे,तसेचश्री.शेख सर(मुख्याध्यापक) श्री.कंठाळे सर (मुख्याध्यापक) श्री.शिवराम राऊत (अध्यक्ष श्रीनिवास बहुउद्देशीय.सेवासंस्था) श्री.उमेश शिंदे.( अध्यक्ष-शाळाव्यवस्थापन समिती ),श्री.शिवाजी शिंदे.याची उपस्थिती होती.आरोग्य विभागाच्या माध्यमातून इ.१ली ७वी मधील २२० तर मानुरकर महाराज माध्यमिक विद्यालय मधील ८वी.ते १०वी ८०. विद्यार्थी आरोग्य तपासणी करण्यात आली.मौ.हिवरसिंगा येथे डेंग्यू साथरोग प्रसार वाढल्याने व शालेय विद्यार्थी यांचे आरोग्य महत्वाचे यासाठी श्री.शिवराम राऊत (अध्यक्ष-श्रीनिवास बहुउद्देशीय सेवाभावी

पुरातन विभागाच्या गलथान कारभारा विरोधात संभाजीनगर कार्यालय बाहेर संगमेश्वर मंदिराच्या पुन:र्निर्माणासाठी घंटानाद आंदोलन करणार - जितेद्र भोसले

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) हजारो भक्ताचे श्रद्धास्थान व पाटोदा तालुक्याचे ग्रामदैवत संगमेश्वर मंदिराचे शिखर पडून अनेक वर्षे झाली संगमेश्वर मंदिराच्या पुन:र्निर्माणासाठी प्रशासनाला वेळोवेळी मागणी करूनही पुरातन विभाग झोपेची सोग घेत असल्यामुळे संगमेश्वर मंदिराच्या पुन: र्निर्माणासाठी वेळोवेळी मागणी करून पुरातन विभाग पाटोदा शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या संगमेश्वर मंदिराच्या पुन:र्निर्माणासाठी साधू संत यांच्या सह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना घेऊन संभाजीनगर येथील पुरातन विभागाच्या कार्यालया बाहेर संगमेश्वर घंटानाद आंदोलन करणार असा इशारा युवा नेते जितेंद्र भोसले यांनी दिला असून लवकरच पुरातन विभागाने पाटोदा तालुक्याचे ग्रामवैभव नामशेष होण्यापूर्वीच वाचवण्यासाठी काम सुरू करावे नसता पुरातन विभागाच्या निषेधार्थ संभाजीनगर मधील कार्यालया बाहेर आंदोलन करु असा इशारा युवानेते जितेंद्र भोसले यांनी दिला आहे

कमीत-कमी रेल्वे साठी आंदोलनं आणि जेल भोगणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नावाचे फलक तरी लावा-डॉ. जितीन वंजारे

Image
बीड रेल्वे स्थानकाला स्व. गोपिनाथ मुंडे यांचं नाव दया- डॉ. जितीन वंजारे    बीड प्रतिनिधि :- स्वातंत्र्यानंतर गेल्या 60 65 वर्षापासून बीडच्या रेल्वेचा प्रलंबित प्रश्न हातामध्ये घेऊन बीड येथील सामाजिक कार्यकर्ते व इतर संघटनाचे विविध नेते आपापल्या परीने सरकार दरबारी आंदोलन निवेदन रास्ता रोको रेल मंत्रालयावर जाऊन दिल्लीला जाऊन जंतर-मंतर येथे आंदोलन करत होती त्या अनुषंगाने रेल्वे कृती समितीची स्थापना सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये झाली होती परंतु रेल्वे कृती समितीच्या एकही सदस्याला निमंत्रण न देता केवल राजकीय स्वार्थापोटी व श्रेयवाद घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी रेल्वेचे काम अर्ध्यावरच असताना जे उद्घाटन केलं त्याला आमचा जाहीर विरोध आहे.बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे येण्यासाठी तिला विविध वेळी विशेष निधी मंजूर करण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले आहेत त्यातून सर्वांनी मिळून एकत्र येऊन बीड जिल्हा रेल्वे कृती समिती तयार केली होती त्या अंतर्गत रेल्वेसाठी झगडनाऱ्या विविध लोकांना एकत्रित करून या कृती समितीचे काम चालू होतं परंतु ज्यांनी खस्ता खाल्ल्या आंदोलन केली रास्ता रोको केली दिल्लीपर्यंत रेल्वे

महान अशोक विजयादशमी रोजी माणगाव येथे सामूहिक मानवंदनेस एकत्र येण्याचे युवा बौद्ध धम्म परिषद चे आवाहन

Image
बुधवार, दि. ०५ ऑक्टोबर २०२२ महान सम्राट अशोक विजयादशमी रोजी माणगाव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथील सम्राट अशोक स्तंभास सामूहिक मानवंदना आणि अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील तमाम बौद्ध बहुजनांनी सहभागी व्हावे असे आवाहन युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य या धम्म संस्थेने केले आहे. माणगाव मध्ये एकत्र येण्याचा कृतीकार्यक्रम जनमाणसात रुजविण्यासाठी दरवर्षी अशोक विजयादशमी रोजी माणगाव येथे एकत्र येण्याचे आवाहन केले जाते. माणगाव धम्मवारी म्हणून प्रचलित झालेल्या या सोहळ्याला दरवर्षी विविध भागातून येणाऱ्या हजारो लोकांची उपस्थीती याठिकाणी असते. या कृतिकार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगत असताना "राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बहिष्कृतांची परिषद घेऊन डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे नेते घोषित केले होते, या भागातील अपंग, महिला, लहान मुले, वयोवृद्ध, विद्यार्थी, नोकरदार, कष्टकरी, कामगार इत्यादी लोक रजा काढून, काम खाडे करुन अथवा इतर कारणांनी दीक्षाभुमीला दूरचा प्रवास करून जाऊ शकत नाहीत, मान्यवर कांशीराम यांनी माणगाव मधुन प्रेरणा घेतली व येथे आंतररा

मासांहारी खाद्यपदार्थाच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची जैन संस्थांची मागणी हास्यास्पद-उत्तरेश्वर कांबळे

Image
आष्टी (प्रतिनिधी ): आपल्या देशात कोणाचा आहार काय असावा कोणी कोणते कपडे परिधान करावेत हे स्वातंत्र्य असुन मासांहारी खाद्यपदार्थाच्या जाहिरांवर बंदी घालण्याची याचिका तिन जैन संस्थांनी केली होती.दरम्यान याचिका करत्यांना मा.न्यायालयाने मासांहराच्या जाहिराती बघायच्या नसतील तर टिव्ही बंद करा असे.म्हणून चांगले फटकारले आहे.ही जैन संस्थांची मागणी निव्वळ हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया भीम आर्मीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी दिली आहे अधिक बोलताना कांबळे म्हणाले की अशी याचिका करणे खरच दुस-याच्या खाण्यापिण्याच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे.भारतात धार्मिक स्वातंत्र्य आहे.कोणी आपल्या धर्माचे नियम दुस-या धर्माच्या लोकांवर लादू नये.जैन धर्मातील साधू मुनी खुलेआम नग्र फिरतात त्याबद्दल आजवर कोणीही वाच्छता केलेली नाही.त्यांच्या धर्माबद्दलच्या रूढी पंरपंरेबाबत इतर धर्मातील लोकांनी कधीही वाईट प्रतिक्रिया दिली नाही.  खरतर जैन दिगंबर साधु मुनींच्या विरोधात देशातील महिलांनी सार्वजनिक ठिकाणी लैंगिकतेचे प्रदर्शन करतात म्हणून खटले दाखल करायला पाहिजेत.जैनांनी मांसाहाराचा फार त्रास

चारही शिक्षीकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देत मोरवड ग्रामस्थांनी नारी शक्तीचा सन्मान केला - श्रीमती बोराडे मॅडम

Image
चारही शिक्षीकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देत मोरवड ग्रामस्थांनी नारी शक्तीचा सन्मान केला - श्रीमती बोराडे मॅडम मोरवड शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम     वडवणी,दि.२८(प्रतिनिधी) सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरु असून योगायोगाने आज मोरवड ग्रामस्थ तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने आपल्या गावातील शाळेत कार्यरत असलेल्या चारही महिला शिक्षीकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देवून जो गौरव केला तो खरोखरच कौतुकास्पद व अभिमानास्पद असून या निमित्ताने आपण एकप्रकारे नारी शक्तीचा सन्मानच केला आहे. आजच्या समाजव्यवस्थेत आज एक स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. पवित्र असलेल्या शिक्षण क्षेत्रात देखील महिलांची संख्या व सहभाग लक्षणीय असून हे विकसित देशाच्या दिशेने नेणारे सुचवाच आहेत. बीड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार येथिल शिक्षिका, शाळा, विद्यार्थी, पालक व गावाला समर्पित असून येत्या काळात मोरवड येथिल शाळा व येथिल शिक्षक यांनी राज्य पातळीवर व देश पातळीवर देखील नावलौकिक मिळवावा हिच या निमित्ताने त्यांना सदिच्छा आहे. असे प्रतिपादन वडवणी गटसाधन केंद

क्षीरसागरांना कंटाळून मिल्लत नगर भागातील सय्यद अरबाजसह अनेक तरुणांचा शिवसंग्राम मध्ये जाहीर प्रवेश

Image
 आगामी नगरपालिका निवडणुकीत मुस्लिम बांधव परिवर्तन घडवून स्व.मेटे साहेबांना श्रद्धांजली अर्पण करतील-रामहरी मेटे  मुस्लिम तरुणांना साद देत क्षीरसागर मुक्त बीड शहराचे स्वप्न पूर्ण करणार -रामहरी मेटे  बीड (वार्ताहर) बीड शहरातील मिल्लत नगर येथील अनेक तरुणांनी शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैया मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहिर प्रवेश केला.बीड नगरपालिकेतील सत्ताधारी योगेश क्षीरसागर यांचे खंदे समर्थक असणारे सय्यद अरबाज सय्यद खमर व मिल्लत नगर मधील अनेक मुस्लिम तरुणांनी शिवसंग्राम भवन बीड येथे प्रवेश केला .                    शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैया मेटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बीड शहरातील मिल्लत नगर येथील सय्यद अरबाज सय्यद खमर सहित , सय्यद अरबाज , शेख शाहरुख, अबरार कुरेशी, आलम खाँन , सय्यद शहाबाज , कुरेशीजी शान मुसावीर कुरेशी, रिजवान कुरेशी आदी असंख्य युवकांना प्रवेश संपन्न झाला.स्व.विनायकरावजी मेटे साहेबांच्या अपघाती निधनानंतर मेटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला यातून स्वतःला सावरत व शिवसंग्राम मधील सर्व मावळ्यांना आधार देत संघटनेच्या माध्यमातून

जनावरांच्या लम्पी आजाराकडे प्रशासन राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष – ॲड. महेश धांडे

Image
बीड (प्रतिनिधी) - लम्पी हा जनावरांना होणारा संसर्गजन्य चर्मरोग राज्यासह बीड जिल्हयात ही वेगाने पसरत आहे. अवघ्या आठ दिवसांतच रोगाने २५ जिल्हयात वेगाने हातपाय पसरले आहेत. पंधरा हजारांपेक्षा जास्त जनावरे या आजाराने बाधीत झाले असून शेकडो जनावरे मृत्युमुखी पडले आहेत.           बाधित गुरांच्या त्वचेवर फोड येऊन गुरांच्या आतील फुफूस, यकृत, आतडे यांवरही हल्ला करुन त्यांचे अवयवांना निकामी करत असल्याचे जिनोम सिक्वेन्सींगमधून आढळून आले आहे. कोवीड प्रमाणे जनावरांचे लसीकरण अनिवार्य करणे आवश्यक असताना बीड जिल्हयातील प्रशासनातील अधिकारी तसेच जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधी मात्र हा मुददा मुग गिळुन गप्प आहेत. लम्पी आजार काळात जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात लसीकरणाबाबत प्रचार, प्रसार व माहिती पोहचविणे गरजेचे आहे. पुढे आपल्या प्रसिध्दी पत्रकात ॲड. महेश धांडे यांनी या आजारात जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते, लम्पीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जनावरांना ताप येतो, जनावरे चारा खाणे, पाणी पिण्यास कमी होतात. तसेच हळूहळू डोके, मान, मायांग, कास या भागावर गाठी येतात. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच

जिल्हा हद्दीवरील नदीवर पुल नसल्यामुळे लगतच्या गावातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान

Image
बीड जिल्ह्यातील नांदुर घाट तसेच धाराशिव जिल्ह्यातील फकराबाद हे गावे जिल्ह्यातून वेगळे असले तरी किलोमीटरने मात्र तीन ते चार किलोमीटर आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील फकराबाद. पारा. डोंगरेवाडी व इतर गावे दळणवळणासाठी व इतर रोजच्या व्यवहारासाठी शिक्षणासाठी नांदूर घाटला येतात. परंतु ये जा करत असताना नांदुर घाट जवळ असलेल्या पापनाशी नदीवर पूल नसल्यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे दोन ते तीन महिने शैक्षणिक नुकसान होते. शेतकऱ्यांची नांदुर घाट व्यापार पेठ असल्यामुळे दळणवळणासाठी त्यांना देखील अडचणी येतात. त्यामुळे या सर्व गावातील लोकांनी प्रशासनाला अशी मागणी केली आहे की पापनाशी नदीवर तात्काळ आम्हाला पुल करून द्यावा जेणेकरून आमच्या गावातील विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळेल हे काम जिल्हा हद्दीवर असल्यामुळे काम होत नाही काम रखडले लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे प्रशासनाने आमची दखल घेऊन तात्काळ पापनाशी नदीवर पूल करून द्यावा अशी मागणी फकराबाद व नांदूर घाटच्या शेतकऱ्यांनी केली आहे.

युवाशक्ती मत्स्य व्यवसाय संपर्क कार्यालयात हरदेव नगर या ठिकाणी शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Image
वडवणी प्रतिनिधी अंकुश गवळी :- वडवणी तालुक्यातील युवा शक्ती मत्स्य व्यवसाय संपर्क कार्यालयात, महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना युवाशक्ती मत्स्य व्यवसायाचे संचालक, भीमा महाराज गहिरे, नितीन लुचारे, छत्रगुन लुचारे, रघुनाथ कचरे, अर्जुन गहिरे, योगेश लुचारे,बाळू गहिरे, सिद्धेश्वर लुचारे, अक्षय बनगे, आदींची उपस्थिती होती, 

सोयगाव तालुका वॉटर ग्रीड योजनेला तत्वता मान्यता !

Image
 कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश; राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय  पॉइंटर..... - अभ्यास करून दोन आठवड्यात घेणार पुन्हा बैठक  - निजामकालीन बंधाऱ्यांसाठीही घेतली जाणार बैठक  मुंबई, प्रतिनिधी ‌‌ सोयगाव‌ / ‌ , ‌दि, २७, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत सोयगाव तालुक्यातील वॉटर ग्रेड योजनेला तत्वता मान्यता देण्यात आली.  बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता लोलापोड तसेच मंत्रालयातील पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.   तालुक्यातील तहान भागवण्याचा मानस  औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव हा दुर्गम आणि डोंगरी विभागात येणारा तालुका आहे. तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्याचा मानस कृषी मंत्री माननीय नामदार अब

पळसखेडा येथील उचापतखोर माकडांना जेरबंद करण्यात यश

Image
सोयगाव प्रतिनिधी ,:सोयगाव तालुक्यातील पळसखेडा या ठिकाणी मागील आठ ते दहा वर्षापासून माकडांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती आणि त्यामुळे या माकडांचा त्रास आता नागरिकांसोबतच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता म्हणूनच मागील तीन महिन्यापासून गावातील नागरिक व ग्रामपंचायत पळसखेडा या विषयावर वारंवार वन विभागाला तक्रारी करत होते त्याच बरोबर सामाजिक कार्यकर्ते राजू रेकनोद व राहुल सोनी वनविभागाच्या नेहमी संपर्कात होते . त्यावअनुषंगाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी गावातील माकडांचा सर्वे केला व आज माकडा जेरबंद करण्यासाठी वाहन घेऊन गावात धडकले गावात असणाऱ्या माकडांच्या दोन्ही टोळ्या गावातच असल्याने गावातील एका भागामध्ये पिंजरा लावून या माकडांना 1टोळीतील 63 माकडांना जेरबंद करण्यात आले यावेळी वनविभागाच्या अधिकारी एलजी बोरसे मॅडम वनरक्षक फर्दापूर व एस एस राजपूत वनरक्षक अजिंठा समाधान गिरी शिवना याबरोबरच गावातील राजू रेकनोद, मनोज शेवगण ,संतोष गर्दे ,पंकज जैन ,अमोल थोरात गणेश घोंगडे गोपाल शिपाई राहुल जैन, सुनील जैन, विवेक महानोर वाल्मीक महानोर जम्बा तडवी सुमेर जमादार आदी

अरण्यम वृक्ष लागवडीतून जैवविविधतेचे संवर्धन, पुनरुज्जीवन होणार- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Image
कातपूर येथे अरण्यम पद्धतीने वृक्ष लागवड औरंगाबाद ,    : जायकवाडी पक्षी अभयारण्य परिसर व जायकवाडी पाटबंधारे प्रकल्प परिसरात अरण्यम वृक्ष लागवडीतून जैवविविधतेचे संवर्धन, पुनरुज्जीवन होण्यास मदत होणार असल्याचे मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले. पैठणच्या सामाजिक वनीकरण परिक्षेत्रांतर्गत अरण्यम पद्धतीने कातपूर येथे वृक्ष लागवड प्रकल्पाचे उदघाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य वन संरक्षक सत्यजित गुजर, उपायुक्त समीक्षा चंद्राकार, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, विभागीय वनाधिकारी किर्ती जमदाडे, सहायक वनसंरक्षक राजेंद्र नाले, एन. व्ही. पाखरे, पैठण वन परिक्षेत्र अधिकारी गंगाधर सातपुते, औरंगाबादचे अनिल पाटील, सोयगावच्या नीता फुले, तांत्रिक सल्लागार मेघना बडजाते, आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, अरण्यम प्रकल्प दिशादर्शक ठरावा, असे 300 प्रकारच्या वृक्ष प्रजाती लावण्यात येत आहेत. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथांची पैठण ही पावन भूमी आहे. येथे भाविक बहुसंख

महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय अधिकारी बीड जिल्हा संघटनेच्या सचिवपदी डॉ. विकास मोराळे यांची निवड

Image
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील नागपूर प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी विकास मोराळे यांची महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय अधिकारी बीड जिल्हा संघटनेच्या सचिवपदी नुकतीच निवड झाली आहे. तर अध्यक्ष म्हणून आष्टीचे डॉ. प्रसाद वाघ हे अध्यक्ष झाले. वैद्यकीय अधिकारी विकास मोराळे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.         महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय अधिकारी शासकीय डॉक्टरांची संघटना आहे. या संघटनेची नुकतीच अध्यक्षसह व सचिव पदासाठी निवडूनक घेतली होती. त्यात अध्यक्ष म्हणून आष्टीचे डॉ. प्रसाद वाघ हे निवडून आले. तसेच परळी वैजनाथ येथील डॉ. विकास मोराळे यांची सचिव पदी निवडून आलं. अन्यायाविरोधात आवाज उठविला जाईल चुकीच्या गोष्टीचे समर्थन केले जाणार नाही. डॉक्टरासाठी आम्ही व संघटना कायम तत्पर असू ही निवडूनक खरोखरचं खूप प्रतिष्ठची झाली होती. अनेकांनी मला पाठबळ दिले. दिलेल्या जबाबदारी चोख पार पाडेल. अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. प्रसाद वाघ व सचिव विकास मोराळे यांनी दिली आहे. वैद्यकीय अधिकारी विकास मोराळे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

वडवणी तालुका मराठवाडा शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर; मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार समारंभ संपन्न

Image
- समान संधी समान दर्जा कुठे आहे? शिक्षकांचा सरकारला सवाल. - संविधानाने दिल्यालं प्रतिनिधित्व सरकारने हिरावून घेतलं - गणेश आजबे  - आमदारांचं पेन्शन बंद करा- कालिदास धपाटे.  - चुकीच्या धोरणामुळे शिक्षक अनुदानापासुन वंचित - अॅड.राज पाटील  वडवणी | प्रतिनिधी   वडवणी तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांसाठी शिक्षक संघटना रस्त्यावर उतरत आहेत. त्याच अनुषंगाने मराठवाडा शिक्षक संघाची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. व त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षक संघाचे माजी तालुकाध्यक्ष माजी प्राचार्य महादेव अंडील होते. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे, सरचिटणीस राजकुमार कदम, सचिव गणेश आजबे, लढा दुष्काळाशी फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड. राज पाटील, मुख्याध्यापक एस. एस. अडसूड, पत्रकार आशोक निपटे, निर्माते आशोक फपाळ, पत्रकार सतीश मुजमुले, पत्रकार हनुमंत मात्रे,पत्रकार गीतांजली लव्हाळे, पत्रकार अर्जुन मुंडे, यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन प्रा. अंडील

सप्तशृंगी गड वनी ते वेळापूर 120 किलोमीटर आंतरावरुन् अवघ्या पाच तासात पायी चालत मशाल ज्योत

Image
कोपरगाव तालुक्यातील वेळापुर् या गावच्या आदिवासी बांधवांनी सप्तशृंगी गड वनी ते वेळापूर 120 किलोमीटर आंतरावरुन् अवघ्या पाच तासात पायी चालत मशाल ज्योत आणली सालाबाद प्रमाणे कोरोना काळाच्या दोन वर्षातील कालखंडा नंतर या वर्षी कोपरगाव तालुक्यातील वेळापूर या गावच्या आदिवासी तरुणांनी सप्तशृंगी गडावरून ज्योत आणून शारदीय नवरात्र उत्सव कार्यक्रम हा सुरू केला.तालुक्यातून वेळापूर गावच्या या आदिवासी बांधवांचे कौतुक केले जात आहे त्यावेळेस एकलव्य महाराष्ट्र आदिवासी परिषद तालुकाध्यक्ष कैलास भाऊ पवार यांनी आपल्या बांधवांनी ही संस्कृती कायम अशीच चालू ठेवावी असे मनोगत व्यक्त करून नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी कैलास ठाकरे विलास ठाकरे केतन पवार सचिन पवार गणपत पवार सतीश पवार भाऊराव पवार नवनाथ भाऊ पिंटू भाऊ वाघ व सर्व आदिवासी बांधव व महिला भगिनी उपस्थित होत्या

युवा नेते राधेश्याम भैय्या गुरुखुदे यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमाुन साजरा,

Image
इन्फंट ऑफ इंडिया पाली या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप बीड प्रतिनिधी बीड शहरातील युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम भैया गुरुखुदे, यांचा वाढदिवस इन्फंट ऑफ इंडिया पाली या ठिकाणी साजरा करण्यात आला, यावेळी इतर खर्चांना आळा घालत, लहान मुलांना खाऊ वाटप करून, किराणा किट व खाद्यपदार्थ ,सामाजिक कार्यातून राधेश्याम भैय्या गुरखुदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित . मयूर सारंगकर, बाळासाहेब शेरकर, शुभम जोशी, दीपक शेणकुडे, तालीम शेख युवा नेते, आधी द्वारकाधीश मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

नगरसेवक ऊमर चाऊस यांच्यावर वाढदिवसा निमित्त शुभेच्छाचा वर्षाव

Image
पाटोदा (प्रतिनिधी )पाटोदा तालुक्यात सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असलेले सर्व समाजाच्या सुख-दुःखात हाकेला धावून जाणारे पाटोदा नगरपंचायतचे नगरसेवक ऊमर चाऊस यांच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छाचा वर्षाव होत असून नगरसेवक ऊमर चाऊस यांच्या वाढदिवसा निमित्त सत्कार करून शुभेच्छा देताना पाटोदा पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमिनाथ कोल्हे,माजी सरपंच जुबेरभाई चाऊस, युवानेते जितेद्र भोसले, पञकार महेश बेद्रे,सुधीर एकबोटे,इमरान सय्यद, गणेश शेवाळे,महेशर शेख,राहुल सोनवणे, यांच्या सह सुरेश धस मिञ मंडळाचे अध्यक्ष दिनेश भाऊ नारायणकर इत्यादीने शुभेच्छा देऊन सत्कार केला

रायमोह मंडळातील सोयाबीन २५%पीकविमासाठी मा.विभागीय आयुक्तांकडे ९६० शेतक-यांची निवेदन सादर-शिवराम राऊत.

Image
  रायमोह मंडळातील शेतक-यावर अन्याय होऊ देणार नाही -सुनिल केद्रेंकर (शिरूर प्रतिनिधी ) ..दि.२६ सप्टेंबर रोजी शिवसंग्राम शिरूर , धनश्री शेतकरी मंडळ हिवरसिंगा, श्रीनिवास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पोषक फार्मर्स शेतकरी उत्पादक कं, तसेच रायमोह म.मंडळातील हिवरसिंगा, मलकाचीवाडी, औरंगपूर,ढोरकरवाडी,खलापूरी,व इतर सर्व गावातील शेतकरी यांचे अर्ज श्री.शिवराम राऊत चि‌.बाळासाहेब दुधाळ यांनी मा.विभागीय आयुक्त श्री.सुनिल केंद्रेंकर सर यांची प्रत्यक्ष औरंगाबाद येथे भेटून रायमोह म.मं.सोयाबिन पीकविमा धारक शेतकऱ्यांना २५%अग्रीम पीकविमा मिळवून देण्यासाठी ९६० निवेदने सादर केले. बीड जिल्हा पीकविमा समितीने सोयाबीन पीक २५%अग्रीम विमा मिळण्यापासून रायमोह महसुल मंडळाला वगळण्यात आल्याने मंडळातील सर्व गावातील शेतकऱ्यांवर अन्याय आहे.या गावांमधील प्रशासनाने अंदाजे सोयाबीन लागवड जरी १६१४ हे.केली आसली तरीही प्रत्यक्ष सोयाबीन लागवड अधिक प्रमाणात हे.जूलै-ऑगस्ट मधील सलग २० दिवसापेक्षा हि अधिक पावसाने ओढ दिल्याने उत्पादनात ६०%पेक्षा अधिक घट होणारी आहे त्यातच सप्टेंबर महिन्यात पहिल्या दिवसापासून ते आज प

आर्वी गावच्या बचत गट महिलांचा अवैध धंद्या विरोधात नवरात्र काळात दुर्गाअवतार धारण

Image
बीड प्रतिनिधी  बीड जिल्ह्यातील शिरूर  तालुक्यातील आर्वी या गावात बऱ्याच दिवसापासून गावात, भर उजेडात आणि राज रोज दारू विक्री होत आहे, मोठ्या प्रमाणात या गावात दारू विक्री होत आहे, तसेच मटका सुरट, पत्ते इत्यादी प्रमाणात वाढत चालली आहे, यामध्ये गावातील तरुण युवक बिघडत आहेत, आर्वी गावातील दारू धंद्याला, व इतर सुरू असणाऱ्या विचित्र प्रकाराला, आळा घालण्यासाठी गावातील एकत्रित महिलांनी येऊन, माननीय सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील ग्रामसेवक, यांना वारंवार निवेदन देऊनही  गावात कुठल्याही दारूबंदी वगैरे प्रकार झाला नाही, आज आर्वी गावातील महिलांनी एकजूट होऊन गावातील धंदे बंद करण्यात यावे , व गावात येत्या आठ दिवसात जर दारूबंदी नाही झाली,  व पुढे काय विचित्र प्रकार व गैरप्रकार झाल्यास सर्व जबाबदारी तुमची राहील, अशी ठाम भूमिका महिलांच्या वतीने करण्यात आली आहे तहसीलदार साहेब यांना,

महात्मा फुले युवा दलाच्या बीड तालुका प्रमुख पदी संजय बनकर यांची निवड

Image
बीड/ प्रतिनिधी महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक प्रमुख ॲड.सतीश शिंदे यांच्या सुचनेनुसार व महात्मा फुले युवा दलाचे बीड जिल्हा प्रमुख अजय भैय्या शिंदे यांनी संजय बनकर यांची महात्मा फुले युवा दलाच्या बीड तालुका प्रमुख पदी निवड केली त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली त्यांच्या माध्यमातून महात्मा फुले युवा दलाचे ध्येयधोरण सर्वसामान्‍य पर्यंत पोहचविण्यासाठी दलाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सर्वसामान्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच महात्मा फुले युवा दलाचे विचार घराघरात पोहचविण्यासाठी व दलाच्या बळकटीसाठी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर  बीड तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जयदत्तजी अण्णा क्षीरसागर साहेब,बीडचे नगरसेवक योगेश भैय्या क्षीरसागर साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी रमेश दुधाळ, लहू लगड, गोरख आखाडे,वैजिनाथ बनकर,किशोर टुले आदी उपस्थित होते

बीडकर मेन्स वेअर या कापड दुकानाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

Image
युवकांनी शिक्षणाबरोबर व्यवसायात पदार्पण करावे, अभिषेक यादव  बीड प्रतिनिधी अंकुश गवळी बीड तालुक्यातील कुर्ला येथील अभिषेक सुरेश यादव व विष्णू घोडके या युवक तरुणांनी बीड शहरातील सम्राट चौक या ठिकाणी बीड करांच्या सेवेत, बीडकर मेन्स वेअर या कापड दुकानाचे भव्य उद्घाटन . प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले, यावेळी उपस्थित महेश भाऊ गुंड. अनिरुद्ध पाटील, राधाकिसन पटेकर, कुंदन भैया काळे, सुरेश यादव, सचिन पठाण. विनोद पाटील ,संतोष पाटील, विकास घोडके, बापूराव घोडके, व्यंकट घोडके, राम पंचाळ, दादाराव वर्पे, एकनाथ घोडके, तुकाराम घोडके, खाजाभाई शेख, तानुद्दीन शेख, भागवत यादव, नामदेव पोतदार, फरीद पठाण, दिगंबर डोंगरे, सचिन सावंत, वंजारे लक्ष्मीकांत, सखाराम पाटील ,विक्रम पाटील, अविनाश थौटे ,युवा पत्रकार अंकुश गवळी, गदले श्रीकांत, आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी भाषणात अभिषेक यादव म्हणाले आहेत की युवकांनी शिक्षणाबरोबर व्यवसायात पदार्पण करावे अशे प्रतिपादन अभिषेक यादव यांनी केली आहे,

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चालणारा हा पक्ष असून ,गाव तेथे शाखा अभियानाच्या माध्यमातून मजबूत करणार - दिपकभाऊ निकाळजे

Image
  आष्टीत भव्य कार्यकर्ता मेळावा, हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी  आष्टी प्रतिनिधी  आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका या निवडणुका रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून लढवण्यात येणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनी केले,ते आष्टी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पार्टीचे महाराष्ट्र संघटक कैलास जोगदंड यांनी आयोजित केलेल्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर बाळासाहेब पवार, दादासाहेब ओव्हाळ, सचिन कोकणे, अशोक ससाणे, सुनिल वाघमारे, दादासाहेब ओव्हाळ, भाऊसाहेब पगारे, सुनिल दाभाडे, अरूण भिगारदिंवे, रमेश भोईर,तान्हाजी भिसे, सुरेश दाभाडे, शशिकांत दारोळे, सचिन खरात, तान्हाजी मिसळे, महेंद्र मुनेष्वर, संतोष इंगळे, संदिप कडबू आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. आष्टी शहरात दि.२५ सप्टेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य संघटक कैलास जोगदंड यांनी भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते.यावेळी बो