Posts

Showing posts from March, 2024

अनाया फातिमा चा आयुष्यातील पहिला रोज़ा पूर्ण

Image
बीड (प्रतिनिधी ): शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा सेवानिवृत्त प्राध्यापक सी.आर.पटेल यांची नात अनाया फातिमा माजेद पटेल हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोज़ा वयाच्या सातव्या वर्षी पूर्ण केला. सध्या पवित्र रमजान महिन्याचे रोज़े सुरू आहेत. रमज़ान महिना आता शेवटच्या टप्प्यात आला असून काल रमज़ानचा वीस वा रोज़ा होता. हा रोज़ा अनाया फातिमा हिने ठेवला व तो यशस्वीरित्या पूर्ण केला. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. तप्त उन्हामुळे भल्याभल्यांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. अशा अवस्थेत लहान लहान मुली व मुले आपल्या आयुष्यातील पहिला रोज़ा धरत आहे. यामागे अल्लाहकडून रोज़ेदारांना मिळणारी अदृश्य ताकद असते म्हणूनच चिमुकले रोज़ेदार कमी वयातही आपले रोज़े पूर्ण करू शकतात. असेच अनाया फातिमानेही वयाच्या सातव्या वर्षी आपल्या आयुष्यातील पहिला रोज़ा पूर्ण केला. याबद्दल तिचे सर्व नातेवाईक, सहारा कॉलनी येथील रहिवासी यांनी अभिनंदन केले व त्याने यापुढेही दरवर्षी रमज़ान महिन्याचे पूर्ण रोज़े ठेवावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

पोलिस अधीक्षकांचे निवासस्थान घाणीच्या विळख्यात; तुंबलेल्या नाल्यांमुळे आरोग्य धोक्यात; नगरपरिषदेचा ढिसाळ कारभार; पोलिस अधिक्षकांना निवेदन

Image
पोलिस अधीक्षकांचे निवासस्थान घाणीच्या विळख्यात; तुंबलेल्या नाल्यांमुळे आरोग्य धोक्यात; नगरपरिषदेचा ढिसाळ कारभार; पोलिस अधिक्षकांना निवेदन  :- डॉ.गणेश ढवळे बीड:- शहरातील पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निवासस्थान तसेच कार्यालयाभोवती घाणीचे साम्राज्य पसरलेले असुन पोलिस अधिक्षक निवासस्थान, पोलिस अधिक्षक कार्यालय याठिकाणी नाल्या तुंबलेल्या अवस्थेत असुन कचरा साचल्याने आरोग्याचे संकट निर्माण झाले असून डेंग्यू मलेरियासह जलजन्य आजारांचा धोका असुन तातडीने नालेसफाई करण्यात यावी जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात यावी तसेच  जिल्हाधिकारी निवासस्थानासह ईतर  वरिष्ठ अधिकारी यांच्या निवासस्थाने,कार्यालये तसेच बीड शहरातील ईतर ठिकाणी ठेवलेल्या कचराकुंडीतील कच-याची नियमित विल्हेवाट लावण्याची उपाययोजना करण्यात यावी आणि बंद अवस्थेतील घंटागाड्या सुरू करण्यात याव्यात अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर, जिल्हाधिकारी बीड तसेच मुख्याधिकारी नगरपरीषद बीड यांना सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे, शेख युनुस च-हाटकर,सुदाम त

बीड शहरातील रामतिर्थ भागातील लखन लोंढे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

लोंढे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनचा शिवसेनेत जाहीर प्रवेश  आज बीड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात शहरातील रामतिर्थ भागातील सामाजिक कार्यकर्ते लखन लोंढे  व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून संपर्कप्रमुख किशोरजी पोतदार साहेब व जिल्हाप्रमुख गणेशभाऊ वरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी महिला आघाडीच्या जिल्हासंघटिका संगीताताई चव्हाण , युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी गजानन भैय्या कदम , उपजिल्हाप्रमुख राजुभाऊ महुवाले ,तालुकाप्रमुख गोरख अण्णा सिंघन कामगार नेते रविअणणा वाघमारे , युवा नेते नयुमभाई सय्यद, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटिका फरजाना भाभी शेख ,सरपंच प्रदीप कोटुळे ,यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख गणेशभाऊ वरेकर म्हणाले की, उद्धवजी ठाकरे साहेब हे सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारे नेते आहेत येणारा काळ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे म्हणून सर्व समाजातील युवकांनी या पक्षात यावे मी आपल्या सुखदुःखात

भाऊ बामण गेल्याची बातमी समजली आणि क्षणात मी हताश झालो. काही केल्या डोळ्यातून बाहेर यायला तयारच होईना भाऊ बामण. तसाच डोळ्यांच्या पापणीत घट्ट रुतून बसलेला.

{अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755  कधी काळी त्यानं म्हंटलेला कानात अजूनही तोच आवाज, “तुज्या बापाच्या लग्नाचा आंतरपाट म्याच धरला अन तुजा बी म्याच! तुमच्या आज्ज्या-पंज्ज्या सकट सगळ्यांचं महाळ बी म्याच केलं, पण कधी तुमच्याकडून एक रुपया बी घेतलेला नाय!” माणसं म्हणायची, “झोपलेला देव जागा करण्याची हिम्मत फ़क्त पांडोबाच्या हलगीत अन भाऊ बामणाच्या घंटीतच आहे.” भाऊ बामण नुसत्या गावाचा बामण नव्हता तर अख्ख्या पंचक्रोशीचा बामण होता. तांबडं फुटायच्या आधीच जाग यायची त्याला. अगोदर भाऊ बामण जागा व्हायचा मग जाग यायची गावाला. अंधारात गोठ्यातली रिकामी बादली घेऊन मंदिरापुढच्या आडावर हजर व्हायचा भाऊ बामण. राहाटावरून खाली बादली सोडून साखर झोपेत असलेलं पाणी शेंदायचा भाऊ बामण. कितीही कडाक्याची थंडी असो, पावसाची कितीही उभी धार असो, तरीही थंड पाण्याने गावात पहिली अंघोळ उरकायचा भाऊ बामण. कडाक्याच्या थंडीत उघड्या अंगावर दानवं घातलेला भाऊ बामण गावच्या देवळातली ठण-ठण आवाज घुमवत जेव्हा पहिली घंटा वाजवायचा, तेव्हा कुठे जाग यायची गावाला. माणसं म्हणायची, “गड्या भाऊ बामण उठला! पहाट झाली! उठा आता!” गावात तशी बामणाची मोजू

शिरूर शहरातील पाणीपुरवठा / पाईपचे लिकेज तात्काळ काढून नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करा -खेडकर / मोरे

Image
बीड जिल्हा(प्रतिनिधी-गोरख मोरे ) :   बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहरातील जिजामाता चौकात शहरात पाणीपुरवठा/ पाईप लिकेज होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे . शहरातील या भागातील नागरिकांना विकत पाणी घेण्याची वेळ आली असून , या भागात पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे .   तरी जिजामाता चौकातील पाईपचे लिकेज तात्काळ काढून , शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करावा , अशा आशयाचे निवेदन शिरूर कासार येथील नगरपंचायत चे मा . मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे .   संबंधित मा. मुख्याधिकारी साहेबांनी सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन शिरूर शहरातील नागरिकांना तात्काळ सुरळीत पाणीपुरवठा जर करण्यात आला नाही तर , उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने जिजामाता चौकातील पाईप लिकेजच्या जागी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल , व पुढील होणाऱ्या परिणामास शिरूर कासार नगरपंचायत कार्यालय जबाबदार राहील , असा इशारा असे प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे बीड उपजिल्हाप्रमुख श्री आजिनाथ खेडकर / शिरूर कासार उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख सोपा

तुलसी महाविद्यालयात मौखिक रोग तपासणी शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
दातांची काळजी घ्या डॉ. अशोक उनवणे यांचे आवाहन  बीड(प्रतिनिधी ):- शरीराच्या सर्व भागांची काळजी घेण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो मात्र अनेकदा दातांची नीट काळजी घेतली जात नाही ही बाब लक्षात घेऊन दातांची काळजी घ्या असे आवाहन डॉ. अशोक उनवणे यांनी केले.या मौखिक रोग तपासणी शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे शनिवार दि.३० मार्च रोजी सकाळी ११:०० वा. मौखिक रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये प्रमुख सहाय्यक म्हणून मुखरोग व चेहरा शल्यचिकित्सक डॉ. अशोक उनवणे, डॉ.अनघा उनवणे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तुलसी महाविद्यालय प्राचार्य डॉ.एल.एम.थोरात, प्रमुख अतिथी उपप्राचार्य प्रा.डी.जी.निकाळजे,आय. क्यू.सी.ए. समन्वयक डॉ. योगिता लांडगे, कार्यक्रम अधिकारी विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख प्रा.समिर मिर्झा यांची उपस्थिती होती.   पुढे बोलतांना डॉ.अशोक उनवणे म्हणाले की,सहसा जेव्हा आपण दातांच्या काळजीच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागतो तेव्हा दात पिवळे पडणे, पा

'चैत्र चाहूल'चे २०२४ चे ध्यास सन्मान जाहिर,जेष्ठ रंगकर्मी अतुल पेठे आणि लोककलावंत मनोहर गोलांबरे यांना जाहीर

Image
मुंबई प्रतिनिधी :'चैत्र चाहूल'तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या 'ध्यास सन्मान' या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. दीर्घकाळ सकस काम करणारा प्रयोगशील लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता म्हणून परिचित असलेले जेष्ठ रंगकर्मी अतुल पेठे तसेच गेली ४० वर्षाहून अधिक काळ संगीत क्षेत्रात वादक, गायक, संगीतकार, संगीत संयोजक म्हणून कार्यरत असलेले जेष्ठ लोक कलावंत मनोहर गोलांबरे यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.  'चैत्र चाहूल'तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या या विशेष 'ध्यास सन्माना'चे यंदाचे १७ वे वर्षे आहे. या सन्मानाचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रूपये पंचवीस हजार असे असून येत्या ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याला मराठी नववर्ष दिनी होणाऱ्या या सोहळ्यात जेष्ठ भाषा अभ्यासक राजीव नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे संयोजक विनोद पवार व महेंद्र पवार यांनी सांगितले आहे. 'चैत्र चाहूल'मध्ये यंदा 'हॅलो इन्स्पेक्टर' ही 'सवाई गंधर्व' मध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरलेली एकांकिका सादर होणार असून शाहीर रामानंद उगल

अमरसिंह पंडित यांच्या कडून अनिल तुरुकमारे यांचा सत्कार

Image
 गेवराई प्रतिनिधी -पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल तुरूकमारे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त अनिल तुरूकमारे यांचा माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.     यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आनंद सरपते, तालुकाध्यक्ष शिवाजी डोंगरे, बाबासाहेब आठवले, रजनी सुतार, नंदू तुरूकमारे, शामराव इगवे, बबन औटे, प्रा. अजित काळे आदी उपस्थित होते.

शिरुर येथे पवित्र रमजान निमित्त शिरुर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी संपन्न

Image
 बीड जिल्हा ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :     मा.संपर्क प्रमुख किशोरजी पोतदार साहेब यांच्या आदेशाने , मा.लोकसभा प्रमुख मा.आ.सुनिल दादा धांडे यांच्या आशीर्वादाने मा.शिवसेना जिल्हा प्रमुख परमेश्वरजी सातपुते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिरुर तालुका शिवसेच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते .   मा.शिवसेना उपजिल्हाप्रमुख आजिनाथ खेडकर , शिवसेना तालुका प्रमुख सोपान काका मोरे यांनी इफ्तार पार्टी चे आयोजन केले होते . या प्रसंगी बीड शिवसेना शहरप्रमुख निजामभाई शेख सरकार , शिवसेना नेते विनोद पाटिल गुंड , जिल्हासंघटक रतनतात्या गुजर , शिरुर उपतालुका प्रमुख संजय सानप , हाफिज अब्दुल जब्बार साहेब , व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फयाजभाई शेख , अजीम आतार , शब्बीर पठाण , मुन्ना शेख , वसीम शेख , नीहाल पठाण , सर्फराज आतार , शेख इलाही , सत्तार शेख , सय्यद सलीम , जब्बार पठाण , नजीर शेख , आमीन शेख , खुद्बुद्दीन शेख , अकबर पठाण , सय्यद सत्तार , हारून पठाण , हारून अत्तार , समीर पठाण , अय्युब सय्यद , शाहबाझ शेख आदी बांधव उपस्थित होते .  इफ्तार पार्टी ही शिरुर शहरातील मुख्य मज्जित येथे ,

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक, रंगपंचमीच्या दिवशी शेरी बु ! येथे चांदबाबा उरूस

Image
आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :    रंगीबेरंगी रंगाची उधळण करत उत्सव साजरा करण्याची परंपरा पुरातन काळापासून आष्टी तालुक्यातील शेरी बु! येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या चांद शहावली बाबांचा उरूस (यात्रा) (ता.३०) सुरवात होणार आहे . हा उरुस केवळ एक यात्रा नव्हे तर हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असून सामाजिक आणि धार्मिक एकतेचे दर्शन घडवणारा उत्सव आहे.दर्शनाचा लाभ घेण्यासह उरसाचा आनंद घेण्यासाठी सर्वधर्मीय बांधवांची होणारी गर्दी जणू त्याची साक्ष देत असते . बाबांच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह अनेक ठिक-ठिकाणचे भाविक दर्शनास येतात, पुरातन काळापासून रंगपंचमीच्या दिवशी चांद शहावली दर्गा उरसाला प्रारंभ होत असतो . या दर्गास आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते ग्रामस्थांच्या वतीने चादर चढवली जाते दिवसभर हा उरुस सुरू असतो. दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात.दर्शन झाल्यानंतर उरसाची मुख्य आकर्षण म्हणजे गावातील सर्व धर्मीय लोक चांद शहावली बाबाना मलिदयाच्या नैवेद्य अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले जाते . गूळ व चपाती एकत्र करून मलिदा सेवन करतात . त्यासह अन्य विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात .

सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधानच्या ‘लग्न कल्लोळ’चे 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर जोरदार स्वागत

Image
मुंबई प्रतिनिधी : लवकरच लग्नसराईची धुमशान संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहे. त्यापूर्वीच ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त गाण्यांसाह सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करून आपल्या ओटीटी प्रेक्षकांना सरप्राईज गिफ्ट दिले आहे. महाराष्ट्रातील चित्रपट रसिक प्रेक्षक हा सुवर्णयोग मनस्वी अनुभवत आहेत. श्रुती आणि अथर्व एकमेकांवर प्रेम करतात आणि ते लग्न करणार आहेत. श्रुतीला एक जुळी बहीण आहे, तिचे लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. जुळी असल्यामुळे श्रुती आणि तिच्या बहिणीची कुंडली सारखीच आहे, त्यामुळे अथर्व आणि श्रुतीचे लग्न होऊन घटस्फोट होण्याची शक्यता आहे. खरंच अशी घटना घडेल की घटनेला एक वेगळं वळण मिळेल? चित्रपटात सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, ऐश्वर्या आहेर आणि सुप्रिया कर्णिक यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपट मोहम्मद बर्मावाला आणि मयूर तिरमखे यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच प्रिया बेर्डे, अमिता कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर आणि भारत गणेशपुरे हे लोकप्रिय कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत. “नवा विषय आणि नवा आशय असणारा ‘ल

बीड येथे एक दिवसीय समता सैनिक दल शिबिराचे आयोजन

 बीड (प्रतिनिधी ) दिनांक : 31 मार्च रविवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक दिवशीय समता सैनिक दलाचे शिबिर नागसेन बुद्ध विहार, पालवन चौक बीड येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिर सकाळी ९:०० वाजल्यापासून दुपारी ६:०० वाजेपर्यंत राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक चळवळ प्रबळ करण्यासाठी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले समता सैनिक दलाला 2027 मध्ये शंभर वर्षे (शताब्दी वर्ष) पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने समता सैनिक दल वाढविणे, समाजामध्ये समता प्रस्थापित करणे, अन्यायाविरुद्ध पेटून उठणे, शोषित पीडित लोकांना न्याय देण्यासाठी समता सैनिक दल समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुता यावर आधारित एक लाख समता सैनिक तयार करणे, तरुणांना निर्व्यसनी, अभ्यासू, शीलवान, चारित्र्यवान आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी तयार करणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संस्थांचे व आंबेडकरी घराण्याचे रक्षण करणे तसेच विषमतेवर आधारित जात, लिंग, भेद यावर आधारलेली विषमता नष्ट करणे, संविधानाचे रक्षण करणे "संविधान के सन्मान में समता सैनिक दल मैदान मे" "घर तेथे समता सैनिक,

उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल प्रा.प्रदिप रोडे यांच्या हस्ते तुलसी शैक्षणिक समूहातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

Image
बीड(प्रतिनिधी ):- येथील देवगिरी प्रतिष्ठान बीड संचलित तुलसी शैक्षणिक समूहातील कर्मचाऱ्यांचे दि २७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे वार्षिक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याबैठकीत तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.एम.थोरात,उपप्राचार्य डी.जी.निकाळजे, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनचे प्राचार्य डॉ.अशोक धुलधुले, तुलसी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य उमा जगतकर, नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या प्राचार्य डॉ. शैलजा पैकेकर यांची उपस्थिती होती.यावेळी शैक्षणिक वर्षा मध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संस्थेचे प्रमुख प्रा.प्रदिप रोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा.प्रदिप रोडे यांनी कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी बोलताना प्रा.प्रदीप रोडे म्हणाले की, तुलसी शैक्षणिक समूहातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे . फुलांचा सुगंध काही अंतर असल्यावर येतो मात्र तुम्ही केलेल्या कार्याचा सुगंध दूरवर

उ.बा.ठा.कडुन वाजेचीं उमेदवारी जाहिर,निष्ठावंताकडुन तीव्र नाराजी ?

Image
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी -नवनाथ अर्जुन पा गायकर -     नाशिक लोकसभा मतदारसंघातुन जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना उमेदवारी अपेक्षित असतानां त्यांना डावलुन सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहिर झाल्याने उ.बा.ठा. शिवसेना गटात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.कुठे स्वागत, तर कुठे विरोध उमटला आहे.    शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे एक कडवट व सच्चे शिवसैनिक म्हणुन ओळखले जातात.शिवाय ते कट्टर निष्ठावान ही आहेत.   भगुर ही त्यांची जन्मभुमी व कर्मभुमी असली तरी आपल्या आक्रमक अंदाजामुळे जिल्हाभर ते सुपरिचीत आहेत. पक्षाची त्यांनी कट्टर पणे साथ संगत केली आहे.    गत सन २०१९ चे लोकसभा निवडणुकीत ते नाशिक मतदार संघातुन उत्सुक होते.पण खासदार हेंमत गोडसे यांचेसाठी त्यांनी आपल्या उमेदवारी ला मुरड घातली होती.   महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकानंतर अनपेक्षित घडामोडी घडल्या आणि शिवसेना चक्क रा.का.व कांग्रेस सोबत सत्तेत आली.या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त बारा आमदाराच्यां यादीत करंजकर यांचेही नाव समाविष्ट केले होते.    विजय करंजकर हे आता आमदार

शेवगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी व्यावसायिक श्री पी बी उर्फ पुंजाराम भानुदास शिंदे यांनी पूर्ण केले नर्मदा परिक्रमा आणि श्रीक्षेत्र गाणगापूर पाई वारी

Image
{ अविनाश देशमुख शेवगांव }9960051755  याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी आणि परम पूज्य दादाजी वैशंपायन दत्त मंदिर यांचे भक्त प्रवासी संघटना चे सदस्य पी. बी. उर्फ पुंजाराम भानुदास शिंदे यांनी पूर्ण केले नर्मदा परिक्रमा आणि श्रीक्षेत्र गाणगापूर पायी प्रवास पूर्ण केला त्याबद्दल शेवगाव शहरासह तालुक्यातील दत्त भक्त त्यांचे व्यापारी मित्र यांचेकडून त्यांच्यावर अभिनंदन आचा वर्षाव होत आहे सुमारे चार राज्य मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश आधी राज्यातून सुमारे तीन हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास पायी प्रदक्षिणा 112 दिवसांमध्ये अखंड पायी प्रवास करून नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा छोटेखानी सत्कार शेवगाव शहरांमध्ये सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अविनाश देशमुख महसूल चे कर्मचारी श्री कानिफनाथ ढाकणे भारतीय आयुर्विमा महामंडळ एल.आय.सी. च्या प्रतिनिधी सो मनीषा डांबे व नितीन भोसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा छोटे खाणी सत्कार शाल श्रीफळ व पेढे भरून करण्यात आला त्यांनी संपूर्ण प्रवासाचे वर्णन आलेल्या कटू गोड आठवणी त्या त्या राज्यातील भावि

तुलसी महाविद्यालयात ३० मार्च रोजी मौखिक रोग तपासणी शिबिर

Image
बीड(प्रतिनिधी ):- येथील देवगिरी प्रतिष्ठान बीड संचलित तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे दि.३० मार्च रोजी सकाळी १० वाजता मौखिक रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुखरोग व चेहरा शल्यचिकित्सक डॉ. अशोक उनवणे या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या मौखिक आरोग्याची तपासणी करून मुखरोग व चेहरा याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. मौखिक रोग तपासणी शिबिराचे आयोजन तुलसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.एम. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. यावेळी शिबिरामध्ये उपप्राचार्य प्रा.डी.जी.निकाळजे,डॉ. योगिता लांडगे यांची उपस्थिती राहणार आहे. या शिबिरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपली मौखिक आरोग्य तपासणी करावी असे आवाहन तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड आणि विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख प्रा.समीर मिर्झा यांनी केले आहे.

महावितरणच्या गलथान कारभारा मुळे दलीतवस्ती मधील लोक रहातात जीव मुठीत धरून

Image
महावितरणच्या गलथान कारभारा मुळे दलीतवस्ती मधील लोक रहातात जीव मुठीत धरून  संभाव्य धोका ओळखून घरावरील तारा  इतरत्र हालवा नसता आंदोलन करू -शेलार पाटोदा (प्रतिनिधी )पाटोदा तालुक्यातील  दासखेड येथील जवळपास 20 ते 25 घरे वजा झोपडपट्टी भागातून गेलेल्या रस्त्यावरून घराच्या छताच्या ऐन मध्यावरून गेल्या 25 ते 30 वर्षापासून 11 केव्हीची विद्युत वाहिनी गेलेली आहे. सदरील ठिकाणी लोकांची रहाण्याची निवासस्थाने असल्याने तेथून गेलेली विद्युत लाईन ही या रस्त्यावरील अनेकांच्या घरावरून गेलेली आहे. विद्युतवाहिनी घराच्या छताच्या अत्यंत जवळ असल्याने आणि तीची अवस्था जीर्ण झालेली असल्याने संभाव्य धोका होऊन जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. या भागात राहणारे रहिवाशी या तारे मुळे जीव मुठीत धरून येथे रहात आहेत. काही दिवसापूर्वी या तारेचा शॉक लागून विकास देवडे नावाचा व्यक्ती मरण पावल्याची दुर्देवी घटना घडलेली आहे तसेच हरिदास माने या व्यक्तीला विद्युत शॉक लागला होता. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. या बाबत सबंधित खात्याकडे,त्यांच्या वरिष्ठांकडे अनेकदा लेखी/तोंडी पाठपुरावा केला असतानाही या बाबत कोणतीच दखल घेण्यात

आत्ताची सर्वात मोठी बातमीः प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे यांच्या सोबत नवी आघाडी ?

Image
अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी  अकोला : राज्याच्या राजकारणात नवा द्विस्ट आला आहे. कारण वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, नव्या आघाडीची घोषणा केली. दुसरीकडे प्रकाश आंबडेरांनी जरांगेंसोबत आघाडी केल्याने ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की, "काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो.विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील.पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील. जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मा

श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथे रिमोट सेन्सिग,जी.आय.एस, जी.पी.एस या नवीन तंत्रज्ञानवर आधारित तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न

Image
आष्टी (प्रतिनिधी--- गोरख मोरे ) :  श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर, कृषी महाविद्यालय, आष्टी येथे कृषिविद्या विभागा अंतर्गत रिमोट सेन्सिग,जी.आय.एस, जी.पी.एस. नवीन शेती तंत्रज्ञानावर आधारित तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन कृषिविद्या विभाग आणि अल्बेडो फाउंडेशन नाशिक यांच्या सहयोगाने करण्यात आले होते . हि कार्यशाळा ३ दिवसाच्या कालावधीत पार पाडण्यात आली .कार्यशाळेसाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणूनअल्बेडो फाउंडेशन नाशिक डायरेक्टर इंजि. विक्रांत निकम हे होते . कृषी महाविद्यालयमध्ये शिकत असणाऱ्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याच्या अभ्यास क्रमात हा नवीन विषय देण्यात आला आहे . त्या विषयाच्या संदर्भात प्रात्यक्षीक सोप्या पद्धतीने समजण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यशाळेत इंजी.निकम यांनी रिमोट सेन्सिग,जी.आय. एस, जी.पी.एस या विषयाशी निगडित असे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान विद्यार्थांना सांगितले . त्याच प्रमाणे या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या शेती मधे याचा कसा बदल घडून आणु शकतो हे सांगितले . कोणत्याही भौगोलिक माहितीचे संग्रहण, संकलन, संघटन आणि विश्‍लेषण करणाऱ्या संगण

मलकापूर येथे कै.फुलचंद गित्ते यांच्या वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमनिमित्त ह.भ.प.एकनाथ महाराज चत्तर शास्त्री यांचे किर्तन

Image
परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :- तालुक्यातील मौजे मलकापूर येथे कै.फुलचंद कोंडिबा गित्ते (एम. कॉम,बीएड) यांचा वर्षश्राध्दाचा कार्यक्रमानिमित्त शुक्रवार दि.२९ मार्च २०२४ रोजी ह.भ.प.एकनाथ महाराज चत्तर शास्त्री यांचे सुश्राव्य किर्तन होणार असून भाविक भक्तांनी या किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.     परळी तालुक्यातील मलकापूर येथील महादेव फुलचंद गित्ते (पत्रकार) ,केशव फुलचंद गित्ते, वैभव फुलचंद गित्ते यांचे वडील कै.फुलचंद कोंडिबा गित्ते (एम.कॉम,बीएड) यांचा वर्षश्राध्दाचा कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. कष्टाने केली आयुष्याची सुरुवात। सगळयावर फिरवला मायेचा हात । सुख जवळ येताच काळाने फिरवली पाठ । जन्मो जन्मी पाहु आम्ही तुमची वाट ।। मित्ती माघ फाल्गुन कृ.४ शके १९४५, शुक्रवार, दि.२९/०३/२०२४ रोजी वारकरी भुषण तथा जगप्रसिद्ध कीर्तनकार श्री.ह.भ.प.एकनाथ महाराज चत्तर शास्त्री, श्री क्षेत्र आळंदी यांचे दुपारी १ ते ३ कीर्तन होणार आहे. तसेच पखवाज सेवक गंभीर महाराज अवचार श्री क्षेत्र आळंदी, गायणाचार्य ह.भ.प.शंकर महाराज इंगवले, गायणाचार्य ह.भ.प.गणेश महाराज सावळे, गायणाचार्य ह.भ.प. भ

ज्योतीताई मेंटे लागल्या प्रचाराला स्वः विनायक मेटे यांच्या समाधी स्थळाचे घेतले दर्शन

Image
बीड ( सखाराम पोहिकर ) स्व विनायक मेटे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन ज्योतीताई मेटे या प्रचाराला लागल्या आहेत यामुळे पुन्हा नवे टिस्ट आले असून नेमक त्या राष्ट्रवादी कॉग्रेस कडून लढणार की इतर कोणाकडून हे येणाऱ्या काळात समजणार आहे सुरूवाती पासून राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्याकडून बीड लोकसभा उमेदवारीसाठी ज्योतीताई मेटे या चर्चेत आहेत परंतू बजरंग ( बप्पा ) सोनवणे यांनी घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेतली यामुळे बजरंग ( बप्पा ) सोनवणे यांचेही नाव चर्चेत आले यानंतर पंकजा मुंडे यांनी शिवसंग्राम आपल्या सोबत असल्याचे म्हटले तर ज्योतीताई मेटे यांचे काहीसे नाव मागे पडल्या सारखे झाले परंतू मंगळवारी शिवसंग्राम भवन येथे कार्यकर्तेची बैठक पार पडली हि लोकसंभा निवडणूक लढवण्याच्या बाबतीत चर्चे झाली तेथून सरळ स्व विनायक मेटे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आशी माहिती फोन वरून देण्यात आली उमेदवारी दिली तर आम्ही राष्ट्रवादी कडून लढण्यास तयार असल्याचे सांगितले आसल्याने पुन्हा टिस्ट आला असून नेमकी बीड लोकसभेची उमेदवारी मेंटेना की

मल्टीपर्पज मैदानानंतर कॅनॉल चौकातही आचारसंहितेची अंमलबजावणी; ती मशालही झाकली!

Image
अलर्ट प्रशासन - गतिमान शासन; नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे - एस.एम.युसूफ़ मल्टीपर्पज मैदानानंतर कॅनॉल चौकातही आचारसंहितेची अंमलबजावणी; ती मशालही झाकली! बीड (प्रतिनिधी ) - शहरातील मल्टीपर्पज मैदानानंतर कॅनॉल चौकातही आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली असून ती मशालही झाकण्यात आली आहे. यामुळे प्रशासन अलर्ट असेल तर शासन कसे गतिमान करता येते याची चुणूक सध्या बीड शहरात दिसून येत असून नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.  याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली आदर्श आचारसंहिता देशभरात लागू आहे. या अनुषंगाने अनेक पथ्य पाळावे लागत आहे. तरीही कुठे ना कुठे काही ना काही राहुन किंवा सुटून जाते. अशाच प्रकारे बीड शहरातील मुख्य चौकांंपैकी एक असलेला तुळजाई कॅनॉल चौक आहे. जिथे हातात धगधगती मशालची प्रतिकृती बीड नगर परिषदेकडून लावण्यात आलेली आहे. मशाल हे चिन्ह या लोकसभेच्या निवडणुकीत एका राजकीय पक्षाचे असणार आहे. यामुळे या मशालीकडे प्र

'मोऱ्या' सुपरहिट

Image
मुंबई प्रतिनिधी  ; अनेक अडचणींवर मात करीत अत्यंत चतुराईने 'मोऱ्या' हा मराठी भाषेतील चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी प्रथम प्रदर्शित करण्यात आला. निर्मात्यांची विशेष लक्ष पुरवून चित्रपटाच्या कल्पक वितरणासोबत आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीची सांगड घालत प्रसिद्धी व मार्केटिंग व्यवस्थापन करून मुंबई, व उपनगर, पुणे आणि धुळे या केंद्रांवर लक्ष केंद्रित करून आपला जम बसवत प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे येण्यासाठी आकर्षित केले आहे.  ऐन राजकीय शिमग्याच्या आयपीएल मोसमात 'मोऱ्या' खरोखर प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरला आहे. विशेष आकर्षण निर्माण करणारे पोस्टर आणि अत्यंत नजाकतीने कापलेला चित्रपटाचा सुबक ट्रेलर, चित्रपटाचे वेगळे कथागुणधर्म, कलाकारांचा नैसर्गिक अभिनय, संगीत आणि सोशल मीडियावरील चर्चा, पोस्ट पाहून प्रेक्षकांची पाऊले आपसूकच चित्रपटगृहाच्या दिशेने वळत असल्याने विशेष आनंद होत असल्याची प्रतिक्रिया मोऱ्याची शीर्षक भूमिका करणारे अभिनेते आणि लेखक दिग्दर्शक जितेंद्र बर्डे यांनी दिली आहे.  मराठी चित्रपटांच्या ट्रेंड पेक्षा वेगळा विषय असलेल्या 'मोऱ्या'ला मिळत असलेला "द्विगुणि

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ करणार रक्तदानमाजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

Image
बीड प्रतिनिधी  - आम आदमी पार्टीचे दिल्ली येथे जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलेले आम आदमी पार्टीचे सर्व सर्वे मा. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली सरकार यांना ईडीच्या माध्यमान भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील सरकारने मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने विरोधकांना जेलमध्ये टाकण्यासाठी आणीबाणी सारखी परिस्थिती देशांमध्ये निर्माण करून विरोधक नागरिक सामान्य जनता यांच्यामध्ये भिंतीचे वातावरण निर्माण केले आहे ज्यांच्या वरती ईडीसीबीआयचे आरोप असून जर ते भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये सहभागी झाले तर हीच ईडीसीबीआय त्यांचे सर्व गुन्हे माफ करते व त्यांना विसरून जाते परंतु हेच डी सी बी आय जर भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पार्टीमध्ये सहभागी होत नसेल तर त्यांना चौकशीच्या नावाखाली वर्षानुवर्ष जेलमध्ये ठेवण्याचे काम करतं आहे आशा सरकारच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टी चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली असून याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 28 मार्च 2024 गुरुवार रोजी सकाळी दहा तीस ते एक वाजेपर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी येथे शेकडो कार्यकर

जम्मू-कश्मीर येथील राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत चि.सूर्या सचिन सौंदळे यास सूवर्णपदक तर कु.सानवी सौंदळे सह सब ज्युनिअर संघास सुवर्णपदक प्राप्त

Image
परळी वैजनाथ/प्रतिनिधी     पंचम ज्योतीर्लिंग वैद्यनाथाच्या परळी नगरीतील सुपुत्र चि.सूर्या सचिन सौंदळे याने जम्मू-कश्मीर येथील राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत नॅशनल डेव्हलपमेंट (9ते11वर्षे) वैयक्तिक गटातून सुवर्णपदक व त्याशिवाय मिश्र तिहिरी चे रौप्य पदक पटकावले तर त्याचीच ज्येष्ठ भगिणी कु.सानवी सौंदळे हीने सब ज्युनिअर गटात यश मिळवत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.   चि.सूर्या व कु.सानवी सख्खे भाऊ-बहीण यांच्या दैदीप्यमान यशामुळे आपल्या परळी शहराचेच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्हा,मराठवाडा प्रदेश व महाराष्ट्र राज्याचे नांव उज्जवल केले आहे.    सूर्या-सानवी परळी-वैजनाथ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा समुपदेशक जी.एस.सौंदळे (गुरूजी) यांची नातू-नात असून,राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती परळीचे अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांचे पुतणे आहेत.    राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टीक स्पर्धा मौलाना आझाद(एम ए) स्टेडीअम जम्मू-कश्मीर येथे दि.22 ते 24 मार्च 2024 दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या.     या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून तसेच छत्रपती संभाजी नगरच्या खेळाडूंसह

नाशिक लोकसभा मतदारसंघावरील महायुतीचा तिढा कायम ?

ईगतपुरी तालुका प्रतिनिधी  (नवनाथ गायकर यांजकडुन ) -    - नाशिक लोकसभा मतदारसंघ एकीकडे महा विकास आघाडीतंर्गत उ.बा.ठा.शिवसेना गटाला सुटल्याचे निश्चिंत झाले आहे. या जागेवर उ.बा.ठा.कडुन विजय करंजकर कि अन्य कोणी एवढीच औपचारीक घोषणा बाकी आहे. दुसरीकडे महायुतीत मात्र जागावाटप निश्चिंत झाले नसुन नाशिक वर सगळेच दावा करत असल्याने तिढा कायम असल्याचे दिसत आहे.    महायुती सध्या जोरावर असल्याने इच्छुकाचीं भाऊगर्दी ही मोठी आहे.आणि हीच डोकेदुखी महायुती पुढे आहे.   नाशिक च्या जागेवर नियमाने पाहु गेले तर शिवसेनेचा प्रथम हक्क आहे. या जागेवर सन २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत बाजी मारत हेंमत गोडसे हे विजयी झाले होते.त्यामुळे ही जागा शिवसेनेची हक्काची आहे. मात्र या जागेवर भाजपने दावा ठोकल्याने पेच निर्माण झाला आहे. भाजपचे दिनकर पाटील यांनी तर जागा वाटप निश्चिंत होण्यापुर्वीच या जागेवर दावा ठोकला आहे.नुसता दावाच नाही तर पुर्ण मतदारसंघ पिंजुनही काढला आहे. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातुन त्यांनी प्रचारातही आघाडी घेतलेली आहे. आता हे सगळे दिनकर पाटिल स्वत;ची खासदार होण्याची महत्त्वाकांक्षा पुर्ण करण्याहे

पाटोदा महावितरणला आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा विसर

Image
पाटोदा (प्रतिनिधी )महाराष्ट्रासह राज्यभरातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्याचसोबत आचारसंहितादेखील जाहीर झाली आहे.सर्व राजकीय पक्ष,कार्यकर्ते सरकारी आस्थापनांनी याचे पालन करणे अपेक्षित असते.पण अनेकदा सरकारी आस्थापनांना याचा विसर पडल्याचे दिसून येते.असेच दृश्य पाटोदा महावितरण कार्यालयात दिसून आले आहे.लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला व त्या दिवसापासूनच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा केली. त्यामुळे शासकीय सभा समारंभ बंद झाले.परंतु महावितरण कार्यालयातील भिंतीवरील मंत्र्यांच्या फोटो असलेल्या योजनेचे स्टिकर महावितरण कार्यालयात जागोजागी दिसुन येते असल्यामुळे आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा पाटोदा महावितरण कार्यालयाला विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आसुन बीड लोकसभा निवडणूक अधिकारी या गंभीर घटनेकडे लक्ष देणार का असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे

पाणीटंचाई आढावा निमित्ताने तलावांना भेटी देणा-या जिल्हाप्रशासनाचे तलावाच्या भिंतीवरील झाडाझुडुपांकडे दुर्लक्ष :- डॉ.गणेश ढवळे

Image
---- बीड:- बीड जिल्ह्यात यंदाच्या हंगामात परतीचा अवकाळी पाऊस सोडता एकाही नदी-ओढ्यातुन पाणी वाहिले नाही. त्यामुळे जलस्त्रोताची पाणीपातळी तशीच राहिली.पावसाने ओढ दिल्याने उन्हाळ्यात तिव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असुन पाणीटंचाई आढावा घेत आवश्यक उपाययोजना करण्याहेतुने जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी साठवण तलावांना प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थिती पाहत आहेत.मात्र याच पाणीटंचाईचा आढावा घेणा-या अधिका-यांना साठवण तलावाच्या पिचवर मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे असुन सुद्धा आणि दरवर्षी मान्सुनपुर्व दुरुस्तीचा कागदोपत्रीच खर्च दाखवत असताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत.यामुळे संबंधित प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे. पाली येथील बिंदुसरा धरणाच्या भिंतीवर मोठमोठाली झाडेझुडपे ---- बीड शहरापासून जवळ असलेल्या सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाली येथील बिंदुसरा धरणाच्या जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र

लोकशाही पत्रकार संघाच्या नागपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी शुभांगी वाळके यांची निवड

Image
बीड प्रतिनिधी बीड येथील लोकशाही पत्रकार संघांच्या कार्यालयामध्ये लोकशाही पत्रकार संघाच्या नागपूर जिल्हा उपाध्यक्ष महिला बचत गट विकास समिती पदी शुभांगी वाळके यांची निवड संघाचे सं. अ.भागवत वैद्य यांच्या आदेशाने,प्रदेश अध्यक्ष माणिक (दादा) वाघमारे ,प्रदेश कार्याध्यक्ष आयुब खान पठाण, प्रदेश सचिव हमीद खान यांच्या मगदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष सरस्वती कवडे,प्रदेश सचिव सना खान (महिला ) यांनी निवड केली.यावेळी म्हणाले लोकशाही पत्रकार संघाच्या नागपूर जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी वाळके की,लोकशाही पत्रकार संघ वाढी साठी काम तर करणार आहेच पण आमच्या अडचणी सोडविण्यासाठी लोकशाही पत्रकार संघाची मदत लागेल. बचत गटाचे, अनेक महिलांचे प्रश्न सोडवीत असते.आता मला भागवत वैद्य यांची मदत,सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे माझ्या कामाला वेग मिळेल. महिला बचत गट योजना यावर काम करेल. या निवडी वेळी संघाच्या पदाधिकारि लोकशाही पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य सं. अ.भागवत वैद्य,प्रदेश अध्यक्ष माणिक वाघमारे, प्रदेश सचिव हमेद खान,प्रदेश कार्याधक्ष अयुब खान पठाण, कायदेशीर सल्लागार माजी पोलीस आयुक्त सं

मनोज जरांगे पाटील यांच्या साठी बोललेला नवस सिताराम दानवे यांनी केला पूर्ण

Image
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :   मौजे देऊळगाव घाट तालुका आष्टी जिल्हा बीड येथील , सिताराम भाऊराव दानवे यांनी , मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील , दुसऱ्या टप्प्यात जे अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणासाठी बसले होते . त्यावेळी त्यांच्या नाकातून जो रक्तस्राव चालू झाला होता , तो रक्तस्त्राव थांबण्यासाठी , देऊळगाव घाट चे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ चरणी सिताराम दानवे यांनी नवस केला होता की , त्यांच्या नाकातील रक्त थांबले तर मी ११ किलो शेरनी वाटील . त्यामुळे त्यांनी आपण बोललेला नवस ११ किलो शेरनी वाटून भैरवनाथ चरणी पूर्ण केला पूर्ण केला .   या प्रसंगी देऊळगाव घाट चे सरपंच रामकिसन ठोंबरे , कैलास ठोंबरे , अमोल दानवे , आदेश दानवे , मनोज बर्डे , गणगे महाराज , पत्रकार आदिनाथ ठोंबरे सह आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते .

ज्योती ताईंना उमेदवारी मिळाल्यास पाठिंबा देण्याबाबत बाळासाहेबांकडे आग्रह धरू -अशोक हिंगे

Image
बीड (प्रतिनिधी ) महाविकास आघाडी कडुन‌ ज्यातीताई विनायकराव मेटे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना पाठिंबा देण्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडे आग्रह धरू अशी माहिती वंचित चे मराठवाडा अध्यक्ष अशोकराव हिंगे पाटील यांनी दिली आहे.   ते पुढे म्हणाले कि भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी मधे जाण्याची पुर्ण मानसिकता बाळासाहेब आंबेडकर यांची होती परंतु महाविकास आघाडी घ्या नेत्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे आमचा समावैश होईल का ते माहीत नाही परंतु जर महाविकास आघाडी कडुंन ज्योतीताई विनायकराव मेटे यांना उमेदवारी जाहीर झाली तर वंचित चा पाठिंबा देण्या बाबत आम्ही आग्रह धरणार आहोत. मेटे साहेबांचं पुर्ण जिवन संघर्ष मय होत. मराठा आरक्षणासाठी त्यांचा लढा कायम चालु होता. मराठा आरक्षणासाठी च्या बैठकीला जात असताना झालेल्या अपघातात त्यांचा अकाली मृत्यु झाला.ही हळहळ बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्याशीही त्यांचे स्नेहाचे संबंध होते.  महाविकास आघाडी ने ज्योती ताईंना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांच्या विजयासाठी बाळासाहेब कडे पाठिंबा दे

लोकशाही पत्रकार संघाच्या शहर अध्यक्ष पदी कु.अनिता मंगल बाबाजी दौंडकर यांची निवड

Image
बीड प्रतिनिधी बीड येथील लोकशाही पत्रकार संघांच्या कार्यालयामध्ये लोकशाही पत्रकार संघाच्या महिला उद्योग विकास समितीच्या पुणे शहर अध्यक्ष पदी कु.अनिता मंगल बाबाजी दौंडकर यांची निवड संघाचे सं. अ.भागवत वैद्य यांच्या आदेशाने,प्रदेश अध्यक्ष माणिक (दादा) वाघमारे ,प्रदेश कार्याध्यक्ष आयुब खान पठाण, प्रदेश सचिव हमीद खान यांच्या मगदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष सरस्वती कवडे,प्रदेश सचिव सना खान (महिला ) यांनी निवड केली.यावेळी म्हणाले कु.अनिता मंगल बाबाजी दौंडकर की,लोकशाही पत्रकार संघ वाढी साठी काम तर करणार आहेच पण आमच्या अडचणी सोडविण्यासाठी लोकशाही पत्रकार संघाची मदत लागेल. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर सरचिटणीस आहे.माझी एक ट्रस्ट आहे.दिशा नावाने अनेक महिलांचे प्रश्न सोडवीत असते.आता मला भागवत वैद्य यांची मदत,सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे माझ्या कामाला वेग मिळेल. या निवडी वेळी संघाच्या पदाधिकारि लोकशाही पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य सं. अ.भागवत वैद्य,प्रदेश अध्यक्ष माणिक वाघमारे, प्रदेश सचिव हमेद खान,प्रदेश कार्याधक्ष अयुब खान पठाण, कायदेशीर सल्लागार माजी प

सांकवाळ येथे ३५०वा शिवराज्याभिषेक जयंती महोत्सव आणि तिथीनुसार ३९४ वा शिवजयंती उत्सव सोहळा आयोजन

  गुरुवार दिनांक २८ मार्च २०२४ रोजी मुलगाव तालुक्यातील सांकवाळ प्रभाग क्रमांक १ येथे सन २०२२ पासून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. यावर्षी देखील मुरगाव शैक्षणिक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य रंगमंच उभारून सांय. ०४.०० ते रात्री ०८.०० पर्यंत शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या फोंडा किल्ल्याच्या परिसरातील लहान मावळे आणि गोमंतकाची राजधानी पणजी शहराच्या परिसरातील शिवप्रेमीं कलाकार या उत्सवात सहभागी होणार आहेत. स्थानिक भगीनींच्या लेझीम पथकाने मिरवणूक काढण्यात येणार आहे. गोमंतकातील भाजप कर्नाटक सेल चे सचिव मा श्री राजेश शेट्टी यांच्या हस्ते लेझीम पथकाने मिरवणूकीची सुरूवात होणार आहे. मिरवणुक विद्यानगर सांकवाळ बस स्थानका ( जंक्शन/ सिग्नल ) वरून निघणार आहे आणि महाविद्यालयाच्या प्रांगणातील अर्थात मैदानावरील भव्य अशा रंगमंचापर्यत पोहचणार आहे. तदनंतर विविध ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि विशेष असे व्याख्यान आयोजित केले आहे. विविध संमेलने, परिसंवादात सहभाग, गोव

ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणे हेच आपले ध्येय-प्रदिप खाडे

Image
ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणे हेच आपले ध्येय-प्रदिप खाडे      यश इंटरनॅशनलचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकतील- उद्योजक सुरेशनाना फड   विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यायामाकडे लक्ष द्यावे- सपोनि खोटेवाड विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने रसिक झाले मंत्रमुग्ध यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :-   दिंद्रुड सारख्या ग्रामीण भागात आम्ही शेतकरी, कष्टकरी आणि ऊसतोड कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण डोळ्यासमोर ठेवुन शाळा सुरु केली.आज आमच्या कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेच्या अनेक शाळा,कॉलेजमधून शिक्षण घेत विद्यार्थी उच्च पातळीवर पोंहचत आहेत यामुळे ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देण्याचे आमचे स्वप्न पुर्ण झाले असुन भविष्यात आणखी सुविधा उपलब्ध करु असे प्रतिपादन कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेचे अध्यक्ष प्रदिप खाडे यांनी केले. स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात शालेय विद्यार्थी कलावंतांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थित हजारो रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले होते.    कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेच्या संगम फाटा दिंद्रुड येथील यश इंट

निवडणूक रोखे प्रकरण गंभीर असून ती निवडणनूकी साठी घेतलेली खंडणीच आहे-डॉ.जितीन वंजारे

Image
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशवासीयांचा विश्वासघात केल्याबद्दल नैतिकता पाळून राजीनामा द्यावा- डॉ जितीन वंजारे बीड प्रतिनिधी /- इलेक्ट्रोलर बॉण्ड प्रकरण सध्या देशाच्या प्रत्येक इमानदार व्यक्तीकडून चर्चिल जाणार प्रकरण आहे,यामध्ये स्वतःचा काळा पैसा बँकेला इलेक्ट्रोरल बोंड म्हणून दान करायचा तोच पैसा एखाद्या पक्षाला दान म्हणून द्यायचा त्याच पैशाच्या जोरावरती त्या पक्षाने देशांमध्ये सत्ता आणायची आणि आलेल्या सत्तेवर पैसा दान केलेल्या उद्योजकांना पोसायचं, त्या उद्योजकांना वेगवेगळ्या बँकांमधून भरपूर प्रमाणावर कर्ज द्यायचं आणि परदेशात पळवून लवयाच,त्यांनाच सरकारी कॉन्ट्रॅक्ट द्यायचे म्हणजे हे उघड साटलोट असून यामुळे देशातील कामांची गुणवत्ता बिघडू शकते,हुकूमशाही बोकाळू शकते, म्हणजेच त्यांचा काळा पैसा पांढरा करून त्यांच्या उद्योगधंद्यांना या देशांमध्ये अनैतिकतेने काळाबाजार करण्यास प्रोत्साहन देण्यासारखंच प्रकरण भारतामध्ये घडलं आहे. त्याचं झालं असं 2017 मध्ये भारतीय अर्थ विधेयकामध्ये तडजोडी करून बँकांमधून इलेक्ट्रोरल बोंड तयार करण्याचा कायदा पारित करण्यात आला तो कायदा असा की देशामध्य

आचारसंहितेत ही मशाल सताड उघडी; तिला झाका - एस.एम.युसूफ़

Image
बीड (प्रतिनिधी ) - सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू आहे. याचे पालन करताना काही बाबी मात्र प्रशासनाकडून सुटत आहेत. अशाचप्रकारे बीड शहरातील तुळजाई चौकात नगर परिषदेने लावलेली ही मशाल सुद्धा सुटली आहे. तिच्यावर काहीतरी टाकून झाकणे आवश्यक आहे. या उघड्या मशालीमुळे निवडणुकीत उतरणाऱ्या एका राजकीय पक्षाचा प्रचार व प्रसार होत आहे. जे आदर्श आचारसंहितेला मारक असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे. असे मत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी आदर्श आचारसंहितेचे पालन करताना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या मल्टीपर्पज मैदानाच्या कमानीवरून माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या कोरलेल्या नावाकडे प्रसिद्धी माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची प्रशासनाने तत्परतेने दखल घेऊन ते नाव झाकले. असे असताना बीड शहरातील मोठ्या चौकांपैकी एक चौक असलेल्या तुळजाई चौकातील ही एवढी मोठी मशाल मात्र आचारसंहितेच्या अंमलबजावणीतून अद्यापपर्यंत सुटलेली आहे. मशाल हे निवडणुकीत उतरणाऱ्या एका राजकीय पक्षाचे निव