ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून 2652 रुग्णांना मोफत रक्तपुरवठा

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून 2652 रुग्णांना मोफत रक्तपुरवठा;

मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून गोर गरीब रुग्णांना न्याय, 


 तीन महिन्यांत 15 रुग्णांना सुमारे 2 लाख 95 हजार रुपयांची वैद्यकीय मदत

बीड प्रतिनिधी


ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्षामार्फत गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे. स्वप्नील वरपे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आजपर्यंत तब्बल 2652 रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यात आला असून या रक्तपुरवठ्याची एकूण किंमत अंदाजे 39 लाख 78 हजार रुपये इतकी आहे. या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळून मोठा दिलासा मिळाला आहे.

तसेच मागील तीन महिन्यांत 15 गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY), आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) तसेच विविध सामाजिक ट्रस्ट यांच्या माध्यमातून उपचार व शस्त्रक्रियांसाठी सुमारे 2 लाख 95 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली आहे.

जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्षामार्फत रुग्णांची आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून संबंधित शासकीय विभाग तसेच योजनांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे अनेक पात्र रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळून उपचारासाठी मोठा आधार मिळाला आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी सर्वसामान्यांच्या आरोग्य समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहत गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य उभे केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळत असून समाजातून या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

स्वप्नील वरपे पाटील यांनी रुग्णांच्या कागदपत्रांची पूर्तता, शासकीय योजनांसाठी प्रस्ताव सादर करणे तसेच मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा करून अनेक रुग्णांना दिलासा मिळवून दिला आहे. जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्षाचे हे कार्य आज अनेक गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी