Posts

Showing posts from March, 2026

लिंबागणेश येथे एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती; भालचंद्र विद्यालयात पालक व विद्यार्थिनींना मार्गदर्शन

Image
लिंबागणेश(दि.०१ ): गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात ८ मार्च, जागतिक महिला दिनापासून करण्यात आली आहे. १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस उपलब्ध करून देण्यात आली असून लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर आज (दि.०१) बुधवार रोजी लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली चिटकुलवार यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात पालक व विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद मोटे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. रूपाली चिटकुलवार यांनी केले. यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. क्रांती देशपांडे आणि डॉ. सुनिता बारकुल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत एचपीव्ही लसीक...

शिवाजी महाराज चौक ते अशोक नगर रस्ते कामात तत्काळ सुधारणा करा-नवनाथअण्णा शिराळे पाटील यांचा इशारा

Image
शिवाजी महाराज चौक ते अशोक नगर रस्ते कामात तत्काळ सुधारणा करा  नवनाथअण्णा शिराळे पाटील यांचा इशारा ​बीड प्रतिनिधी : बीड शहरातील मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अशोक नगर दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी सभापती नवनाथअण्णा शिराळे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशासनाने संबंधित गुत्तेदाराला कडक आदेश देऊन हे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घेण्याची मागणी त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या मुख्य रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून, त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने हे काम युद्धपातळीवर पूर्ण करणे आवश्यक आहे.  रस्त्यावर केवळ माती टाकून 'बोगस' काम केले जात असल्याचा आरोप शिराळे पाटील यांनी केला आहे. मातीऐवजी चांगल्या प्रतीचा मुरूम वापरून, त्यावर पाणी मारून बुलडोझरने योग्य पद्धतीने दबाई करण्यात यावी, जेणेकरून रस्ता मजबूत होईल. ​ जुन्या नियोजित सिमेंट रोडची कामेही रखडली असून ती तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात ...

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

Image
 (यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक) नवी दिल्ली, 30 : मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम विहित मुदतीत आणि अधिक गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे असे महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज येथे सांगितले.   श्री बनसोडे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गाझियाबाद येथील प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांच्या कार्यशाळेला भेट दिली. इंदू मिल स्मारकासाठी तयार होत असलेल्या पुतळ्याच्या कामाची सविस्तर पाहणी केली आणि कामाच्या सद्यस्थितीचा सखोल आढावा घेतला.    पाहणीनंतर महाराष्ट्र सदन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीवर सविस्तर माहिती दिली. स्मारकासाठी आवश्यक असणाऱ्या मुख्य धातूंच्या जागतिक दरात झालेल्या वृद्धीमुळे प्रकल्पाच्या मूळ निविदा दरांमध्ये आणि सध्याच्या वास्तविक खर्चामध्ये तफावत निर्माण झाली आहे. या अनपेक्षित दरवाढीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी अतिरिक्त निधीची तातडीने तरत...

भगवान महावीर जयंतीनिमित्त पाटोद्यात भव्य रक्तदान शिबीर

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) भगवान महावीर जयंतीच्या पावन निमित्ताने पाटोदा शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने युवक-युवतींनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला.शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी भगवान महावीर यांच्या अहिंसा, करुणा व सेवाभावाच्या शिकवणीचा जागर केला. “जीवदया हीच खरी सेवा” या संदेशाला अनुसरून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.रक्तदान शिबिरात सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य विभागाच्या सहकार्याने उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी रक्तदान करणाऱ्या युवकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. रक्तदानानंतर दात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन गौरविण्यात आले.या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असून पाटोदा शहरात सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. आयोजकांनी भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

पाटोदयात विद्यार्थिनी व पालकांसाठी भव्य आरोग्य जनजागृती मेळावा; गर्भाशय कॅन्सर जनजागृतीनंतर HPV लसीकरणाला सुरुवात

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरात  दिनांक 30/ 03/ 2026 रोजी पाटोदा शहरातील प्रियदर्शिनी माध्यमिक कन्या शाळा व वसंतराव माध्यमिक शाळा येथे विद्यार्थिनी व पालकांसाठी भव्य आरोग्य जनजागृती व समुपदेशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात आठवी ते नववीच्या वर्गातील मुलींसह त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.हा कार्यक्रम डॉ.नरेशजी कासट THO पाटोदा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, लक्षणे तसेच त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सखोल माहिती देण्यात आली. विशेषतः वय वर्ष 14 ते 15 वयोगटातील मुलींसाठी HPV लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. समुपदेशक चव्हाण यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले व आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून आला.या कार्यक्रमात TNO दराडे मॅडम यांची उपस्थिती विशेष ठरली. दराडे मॅडम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना लसीकरणाचे महत्त्व सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितले. तसेच पालकांनाही ...

लिंबागणेश परिसरात रानडुकरांचा उपद्रव; पिकांचे मोठे नुकसान, नुकसानभरपाईची मागणी

Image
लिंबागणेश परिसरात रानडुकरांचा उपद्रव; पिकांचे मोठे नुकसान, नुकसानभरपाईची मागणी सौर कुंपण योजना सरसकट लागू करण्याची मागणी – डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश (दि.३१ ) : बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश भागात सध्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने अन्नाच्या शोधात रानडुकरे व इतर भटकी जनावरे थेट शेतात घुसून उभी पिके जमीनदोस्त करत आहेत. खाण्यापेक्षा पिकांची नासाडीच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. “ रात्री पाणी देताना जीव धोक्यात” – रामदास मुळे (नुकसानग्रस्त शेतकरी) सध्या दिवसा वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. यावेळी रानडुकरे अंगावर येण्याचा धोका निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “काबाडकष्टाने उभे केलेले बाजरी, ज्वारी, मका यांसारखे पिक रानडुकरांकडून पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तलाठी यांना माहिती दिल्यावर फोटो पाठवण्यास सांगितले जाते...

तुकूचीवाडी येथे रामकृष्ण हरी नाम जप सप्ताहाची सांगता

Image
. येवता:प्रतिनिधी(सा.वा .)दि.३o/०३/२०२६केज तालुक्यातील तुकूचीवाडी येथे सुरू असलेल्या रामकृष्ण हरी नाम जप सप्ताहाची सांगता ३० मार्च -२०२६ रोजी दुपारी ह.भ.प.व्याकर्णाचार्य श्री.अर्जुन महाराज लाड,गुरूजी यांचे काल्याचे किर्तनाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.अर्जुन महाराज लाड  यांनी किर्तन रूपी अभंग  "अनंत नामाचा हा कालाI पुराणें म्हणते पाहुं चला ॥१॥हरिनामाचा कवळू घेतांl तिणें धालों पैअ सर्वथा ॥२॥ एका कवळासाठी गणीका बैसवली वैकुंठी ॥३॥एका जनार्दनी कवळ सेवुं जाणती ते प्रेमळ" ॥४॥हा घेण्यात आला. विवीध दृष्टांत देत भावीक भक्त तल्लीन झाले होते किर्तनास या भागाचे विडा गणाचे लोकप्रिय मा.जिल्हा परीषद सदस्य विजयकांत(भैया) मुंडे सह भाविक भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी महाप्रसदाचे वाटप करण्यात आले.

भक्तीच्या जनसागरात निमगाव गडाचा ४८ वा नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न

Image
भक्तीच्या जनसागरात निमगाव गडाचा ४८ वा नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न   सोपान मोरे यांचा मीडसांगवी ग्रामस्थांकडून सत्कार ​ आष्टी (प्रतिनिधी --गोरख मोरे ) :       अहिल्या नगर जिल्ह्यातील मीडसांगवी येथे श्री क्षेत्र निमगाव गडाच्या ४८ व्या नारळी सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सोहळ्यानिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनासाठी बीड/अहिल्या नगर जिल्ह्यातील भाविकांचा अथांग जनसागर लोटला . या प्रसंगी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिरूर कासार तालुकाप्रमुख सोपान ( काका) मोरे यांनी आवर्जून उपस्थिती लावून कीर्तनाचा लाभ घेतला.  ​ या प्रसंगी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना कीर्तनकार महाराजांनी आपल्या रसाळ वाणीतून समाजाला मोलाचा संदेश दिला. सत्याची कास धरून मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले. सप्ताहाच्या सांगता समारंभात उपस्थित मान्यवरांचा शाल /श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला . या मध्ये शिरूर कासार तालुक्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने सोपान (काका) मोरे यांचा मीडसांगवी ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार केला . या सन्मानाबद्दल सोपान (काका ) मोरे या...

परळीकरांच्या शिरपेचात आंतरराष्ट्रीय मानाचा तुरा

Image
परळीकरांच्या शिरपेचात आंतरराष्ट्रीय मानाचा तुरा इंजि. राजू जगतकर यांची आयर्लंड (UK) येथे डेप्युटी डायरेक्टर पदावर निवड परळी प्रतिनिधी - परळी शहरातील भीमनगर येथील भूमिपुत्र आणि मेकॅनिकल इंजिनीयर इंजि. राजू श्रावणराव जगतकर यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवत परळीकरांचा अभिमान उंचावला आहे. त्यांची यूरोपमधील आयर्लंड (UK) येथे सुरू असलेल्या अत्याधुनिक मेट्रो रेल्वे प्रकल्पात डेप्युटी डायरेक्टर पदावर निवड झाली आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे ११० किलोमीटर लांबीची, अत्याधुनिक आणि मानवचालकविरहित (Driverless) मेट्रो रेल्वे उभारली जाणार असून या महत्त्वपूर्ण कामाची जबाबदारी इंजि. जगतकर यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी कतार (दोहा) येथे बुलेट मेट्रो रेल्वे प्रकल्पात असिस्टंट डायरेक्टर म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. अत्यंत कमी वयात एवढ्या उच्च पदावर पोहोचणे ही बाब परळीकरांसाठी अभिमानास्पद असून तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. भीमनगर व जगतकर गल्ली परिसरात आज मोठ्या प्रमाणात इंजिनिअर तयार होत आहेत किंवा शिक्षण घेत आहेत. या सर्वांसाठी इंज...

धानोरा येथे २ एप्रिल २०२६ गुरुवार रोजी हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन

Image
धानोरा येथे २ एप्रिल २०२६ गुरुवार रोजी हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन   भागवताचार्य ह. भ. प. अशोक महाराज भोसले यांच्या कीर्तनाचे आयोजन   धानोरा परिसरातील सर्व स्तरातील नागरिक/ माता- भगिनी /युवक वर्गाने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा-- धानोरा ग्रामस्थ आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :            आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथे दिनांक २ एप्रिल २०२६ गुरुवार रोजी हनुमान जन्मोस्तवाचे आयोजन करण्यात आले .     या मध्ये पहाटे ४ ते ६ काकड मिरवणूक , सकाळी ६:२० वाजता श्री हनुमान जलाअभिषेक व महापूजा, सकाळी ७:३० ते १० या वेळात संत नामदेव महाराज गुरुकुल पारगाव जो संस्थान यांच्या बाल वारकऱ्यासहित भव्यरथ मिरवणूक होऊन त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळात भागवतचार्य ह. भ. प. अशोक महाराज भोसले यांचे जाहीर कीर्तन होणार आहे . व त्यानंतर महाप्रसादाची पंगत ठेवण्यात आली आहे . या महाप्रसाद पंगतीचे अन्नदाते ओमकार शिंगटे , सौरभ शेंदुरकर , सोपनील तरटे आणि ऋषिकेश मोरे यांच्या मार्फत असून धानोरासह परिसरातील सर्व स्तरातील नागरिक /माता- भगिनी /युवक वर्गाने धानोरा येथी...

आंदोलनकर्त्यांच्या निवारा शेड, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष; जिल्हा प्रशासनाला ‘तिरडी भेट

Image
आंदोलनकर्त्यांच्या निवारा शेड, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष; जिल्हा प्रशासनाला ‘तिरडी भेट’ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन : डॉ. गणेश ढवळे बीड (दि. ३० ) : बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्रामविकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. मात्र याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे ...

निदान जिल्हाधिकारी यांच्या नावाची पाटी असलेलं झाडं तरी जगवा :- डॉ. गणेश ढवळे

Image
फोटोसेशन आणि पुरस्कारापुरता वृक्षलागवडीचा दिखावा; “इव्हेंट जिल्हाधिकारी” यांनी विवेक जागा ठेवून वृक्षसंगोपणाची जबाबदारी निश्चित करावी ! निदान जिल्हाधिकारी यांच्या नावाची पाटी असलेलं झाडं तरी जगवा :- डॉ. गणेश ढवळे बीड (दि.२९ ): हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत जागतिक विक्रमाच्या उद्देशाने एकाच दिवशी ३० लाख झाडे लावण्याची मोहीम राबविण्यात आली होती. मात्र बीड प्रशासनाने प्रत्यक्षात ७० लाख झाडे लावल्याचा दावा करत विधानसभेत वनमंत्री गणेश नाईक यांची दिशाभूल केली. यासोबतच ९० टक्के झाडे जिवंत असल्याचा दावा देखील प्रशासनाने केला आहे. प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच दिसून येत आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लावलेले खंडेश्वरी दिपमाळ परीसरात झाड देखील जिवंत ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका होत आहे. पाली येथील नविन रेल्वे स्थानक परिसरात उद्घाटनावेळी लावण्यात आलेली १२ ते १५ फूट उंचीची झाडे पाण्याअभावी वाळण्याच्या स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी विवेक जान्सन यांच्या नावाचे फलक लावण्यात आलेल्या झाडांचेही संगोपन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याच...

चवदारतळे महाड क्रांती शताब्दी वर्षानिमित्त विशेष प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता आमंत्रित

चवदारतळे महाड क्रांती शताब्दी वर्षानिमित्त विशेष प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता आमंत्रित  चवदारतळे महाड क्रांतीच्या शताब्दी वर्ष (२०२६–२०२७) निमित्त सार्थक साहित्य प्रकाशन यांच्या वतीने “क्रांती सूर्याचं देणं” या विशेष ऐतिहासिक काव्यसंग्रहासाठी राज्यभरातील कवींना कविता पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “क्रांती सूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या विषयावर आधारित हा काव्यसंग्रह समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाच्या महान लढ्याला शब्दरूप अभिवादन करण्यासाठी प्रकाशित करण्यात येणार आहे. या उपक्रमातून महाड क्रांतीच्या ऐतिहासिक वारशाचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रभावीपणे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या काव्यसंग्रहासाठी नामवंत तसेच नवोदित कवींना सहभागी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कवींनी समता, सामाजिक न्याय, मानवता, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, मौलिक विचार, सत्याग्रह आणि महाड क्रांती या विषयांवर आधारित आशयसंपन्न व दर्जेदार मानवतावादी कविता पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त होणाऱ्या कवितांपैकी निवडक कवि...

जिल्हाधिकारी साहेब, अवकाळी पावसाने वाहून गेलेल्या पुलांची दुरुस्ती कधी? तत्कालीन पालकमंत्री अजितदादांनी मंजूर केलेल्या निधीचं काय झालं? लिंबागणेश ते बोरखेड पुलाच्या दुरुस्तीची मागणी :- डॉ. गणेश ढवळे

Image
जिल्हाधिकारी साहेब, अवकाळी पावसाने वाहून गेलेल्या पुलांची दुरुस्ती कधी? तत्कालीन पालकमंत्री अजितदादांनी मंजूर केलेल्या निधीचं काय झालं? लिंबागणेश ते बोरखेड पुलाच्या दुरुस्तीची मागणी :- डॉ. गणेश ढवळे बीड (दि.२८) : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील अनेक रस्ते, नळकांडी पुल, तलाव व बंधारे वाहून गेले होते. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने दुरुस्तीचे आदेश देत आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला होता. मात्र, या घटनेला सहा महिने उलटूनही अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे रखडलेली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी मंजूर निधीचा उपयोग नेमका कधी होणार? आणि प्रत्यक्ष कामांना सुरुवात कधी होणार? असा सवाल उपस्थित केला आहे. लिंबागणेश–बोरखेड रस्ता अद्यापही खचलेलाच बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेड हा महत्त्वाचा रस्ता व पुल सप्टेंबरमधील पावसात वाहून गे...

बौद्ध संस्कार विधींमध्ये सम्राट अशोकांची प्रतिमा लावण्याचे आवाहन

Image
बीड (प्रतिनिधी ) : बौद्ध धर्मीयांच्या संस्कार विधींमध्ये तथागत भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसोबतच चक्रवर्ती सम्राट अशोक यांची प्रतिमा किंवा मूर्ती अनिवार्यपणे ठेवावी, असे आवाहन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा)च्या संस्कार विभागामार्फत करण्यात आले आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी यासंदर्भात मार्गदर्शन करताना सांगितले की, बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनामध्ये सम्राट अशोक यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे बुद्ध धम्म भारतात व्यापक प्रमाणात प्रसारित झाला. त्याच परंपरेला पुढे नेत, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार करून या देशाला पुन्हा बुद्धधर्माची दिशा दिली. या ऐतिहासिक योगदानाच्या पार्श्वभूमीवर, प्रत्येक बौद्ध संस्कार विधीत तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे स्थान अधोरेखित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे वि...

आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर कार आणी टिप्परची समोरा -समोर धडक,आई आणी मुलाचा कारमध्ये होरपळून जागीच मृत्यू

Image
आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :        आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर कार आणि टिप्परची समोरासमोर धडक होऊन आई आणि मुलाचा कार मध्ये होरपळून जागीच मृत्यू झाला .    हा अपघात इतका भीषण होता काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली .   आष्टी पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक तथा प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराज यांच्या पत्नी आणि मुलावर काळाने घाला घातला .   मिळालेल्या माहितीनुसार, ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराज यांची पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी वय ४२ आणि मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी वय २५ हे कारने आष्टीकडून बीडकडे जात असताना कापसी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव टिप्परने कारला जोराची धडक दिली असून या भीषण धडकेत कारने लगेच पेट घेतला, आणि या कारमधून आई आणि मुलाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यास यश आले . अपघाताची एवढी भीषणता होती की, कारचा अक्षरशा चेंदामेंदा झाला.   या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशामक दलाला मिळत...

धम्मदीप बुद्ध विहार येथे प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती उत्साहात संपन्न

Image
धम्मदीप बुद्ध विहार येथे प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती उत्साहात संपन्न  माया दिवाण व बौद्धाचार्य भास्कर सोनवणे यांचा सत्कार  बीड (प्रतिनिधी ) युद्धात निपुण असलेल्या प्रियदर्शी सम्राट अशोकाने तलवारीच्या जोरावर जवळपास चक्रवर्ती सम्राट पद मिळवले होते. परंतु कलिंगा युद्धातील नरसंहार बघून त्यांनी तलवारीचा त्याग करून तथागतांच्या प्रज्ञा, शिल,करुणा मैत्री,समता, शांती व मानवाच्या कल्याणाचा पंचशील व अत:दीप भव आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला शरण जाऊन व तसे आचरण करून जगात लोककल्याणकारी सम्राट म्हणून कार्य केले. त्यांचा आदर्श समोर ठेवून जगाला युद्ध नको, तर बुद्ध विचारांची गरज आहे असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ.नामदेव शिनगारे यांनी केले. महामानव अभिवादन ग्रुप व धम्मदीप बुद्ध विहार बलभीम नगर पालवण रोड बीड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीदिनी अभिवादन कार्यक्रमाच्याप्रसंगी अध्यक्षपदी प्रा. डॉ. नामदेव शिनगारे लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून से.नि. शिक्षण अधिकारी सखाराम उजगरे,प्राध्यापक डॉ .शिवाजीराव दिवाण, से.नी उपनिबंधक सहकार ॲड हनुमंत कांबळे मुख...

मुख्यमंत्री साहेब, शेतरस्ता अडवल्यानंतर फार्मर आयडी, आधार कार्ड ब्लॉक… खरंच कारवाई होणार का? शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? :- डॉ. गणेश ढवळे

Image
मुख्यमंत्री साहेब, शेतरस्ता अडवल्यानंतर फार्मर आयडी, आधार कार्ड ब्लॉक… खरंच कारवाई होणार का? शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? :- डॉ. गणेश ढवळे बीड (दि.२७ ): देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी व शेतीमालाच्या वाहतुकीसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ते योजना’ प्रभावी करण्यासाठी सुधारित शासन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, शेतरस्ता अडविणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार असून त्याचा शासकीय योजनांवरील लाभ बंद केला जाणार आहे. तसेच फार्मर आयडी आणि आधार कार्ड ब्लॉक करण्याची तरतूद करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडासह पुढील पाच वर्षे सर्व शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्याचाही इशारा देण्यात आला आहे. मात्र, ग्रामीण भागात प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे. शेतरस्त्यांच्या वादातून भांडणे, तणाव आणि पोलिसांत गुन्हे दाखल होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी वारंवार लेखी तक्रारी करूनही त्यांना वेळेत न्याय मिळत नसल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे शासनाचा हा कठोर आदेश प्रत्यक्षात प्रभावीपणे अंमलात येणार की नेहमीप्रमाणे कागदोपत्रीच राहणार, असा सवा...

एकता मराठी संमेलनात कथाकथन रंगले.महिला रसिकांनी लुटला मनमुराद आनंद

Image
एकता मराठी संमेलनात कथाकथन रंगले. महिला रसिकांनी लुटला मनमुराद आनंद सातारा प्रतिनिधी  : एकता फाउंडेशन, म.सा.प.शिरूर कासार आणि पाडळीकर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यातील पाडळी ता.शिरूर कासार येथे दोन दिवशीय राज्यस्तरीय एकता मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. दि.२४ मार्च रोजी नेत्रदीपक ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरवात झाली. तद्नंतर माजी आमदार ॲड.मा.उषाताई दराडे यांच्या अध्यक्षतेखालील संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डाॅ.तात्याराव लहाने यांनी केले. द्वितीय सत्रात 'लेखक आपल्या भेटीला' आणि राज्यस्तरीय निमंत्रितांचे कविसंमेलन (भाग एक) पार पडले. रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने संमेलनाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.          दि.२५ रोजी सकाळी १० वाजता कथाकथन सत्राने संमेलनाच्या दुसर्‍या दिवसाची सुरूवात झाली. कथाकार रंजना सानप (मायणी जि.सातारा) यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमात कडा ता.आष्टी जि.बीड चे जेष्ठ कथाकार वि.भा.साळुंके यांनी 'अशी गस्त झाली मस्त' ही विनोदी कथा सादर करून उपस्थितांना खळखळून हसवले. यानंतर ...

१७ वर्षांनंतर जुळला आठवणींचा गोफ; निगमानंद विद्यालयाच्या २००९ बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात

Image
​बीड प्रतिनिधी  : निमगाव (मा.) येथील निगमानंद विद्यालयाच्या सन २००९ च्या १० वीच्या बॅचचे स्नेहसंमेलन बीडमधील हॉटेल सनराईज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तब्बल १७ वर्षांनंतर शालेय मित्र-मैत्रीण एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि आनंदाला उधाण आले. या सोहळ्याला अर्जुन थिटे सर, बेंद्रे सर, डोंगरदिवे सर आणि अशोक खोपडे सर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस आशीर्वाद दिले. शिक्षकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. ​महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते. स्वाती थिटे, आजिनाथ आंधळे, जगदीश लोणके (फौजी), विशाल खेडकर, डॉ. मच्छिंद्र भोसले, डॉ. संदीप सटले यांच्यासह अनेक मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील किस्से शेअर केले. ​ मान्यवर गुरुजनांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्वांनी आपापल्या करिअर आणि कौटुंबिक प्रवासाविषयी माहिती दिली. स्नेहभोजनाच्या आस्वाद घेत गप्पांचा कार्यक्रम रंगला. ​"शाळा सुटली तरी मैत्री सुटली नाही," अशी भावना व्यक्त करत, पुन्हा लवकरच भे...

गेवराईत प्रशासनाचा बेजबाबदारपणा शिगेला. लिलाव रक्कम अडकली ; तरुणाने जिल्हाधिकाऱ्यांना मागितली आत्महत्येची परवानगी

Image
गेवराईत प्रशासनाचा बेजबाबदारपणा शिगेला. लिलाव रक्कम अडकली ; तरुणाने जिल्हाधिकाऱ्यांना मागितली आत्महत्येची परवानगी  सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी             तहसीलदार संदीप खोमणे , नरेंद्र कुलकर्णी सह सहा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप : अडीच वर्षे पैसे न मिळाल्याने कर्जबाजारी होऊन टोकाचा निर्णय एक एप्रिलची दिली चेतावणी    गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन येथील गोदावरी नदी पात्रातील जप्त वाळू साठ्याच्या लिलाव प्रकरणाने गंभीर वळण घेतल्या असून , तब्बल अडीच वर्षे न्याय न मिळाल्याने एका तरुणाने जिल्हा अधिकारी विवेक जॉन्सन यांना थेट आत्महत्येची परवानगी मागितल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे .  विशेष म्हणजे या अर्जात संबंधित अधिकाऱ्यांचे नावे स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत .  गेवराई येथील जे जे बागवान यांनी सप्टेंबर 2023 मध्ये 300 ब्रास वाळू साठ्याचा लिलाव घेत तब्बल २ .१५ .o ४० रूपये तहसील कार्याला जमा केले , मात्र त्यानंतर तहसीलदार संदीप खोमणे , उपविभागीय अधिकारी कविता जाधव , गौण खनिज अधिकारी नरेंद्र कुलकर्णी , उपविभागीय गौण...

मौजे निमगाव चोभा येथील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता ह.भ.प. शंतनु महाराज गिरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार

Image
मौजे निमगाव चोभा येथील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता ह.भ.प. शंतनु महाराज गिरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार   आष्टी तालुक्यातील भाविक-भक्त सर्व स्तरातील नागरिकांनी लाभ घ्यावा-- निमगाव चोभा सप्ताह कमिटी/ भजनी मंडळ /ग्रामस्थ  आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :            आष्टी तालुक्यातील मौजे निमगाव चोभा येथे २० मार्च २०२६ ते २७ मार्च २०२६ या कालावधीमध्ये श्री भक्त दस्तवल भगवान पंढरीनाथाच्या कृपेने श्री रामचंद्र जन्मानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .           या कालावधीत ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे, ह.भ.प. प्रकाश महाराज जंजिरे , ह.भ.प. बंडोपंत महाराज ढाकणे, ह.भ.प. रवींद्र महाराज पोटे, ह.भ.प. गणेश महाराज शास्त्री, ह.भ.प. रामेश्वर महाराज भोजने यांचे या कालावधीत रात्री ९ ते ११ या वेळात कीर्तन झाले असून ह.भ. प. म्हातारदेव महाराज आठरे यांचे २६ मार्च २०२६ रोजी श्रीराम जन्मस्तोव निमित्त सकाळी १०ते १२ या वेळा...

बीडमध्ये श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रा; मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आरती

Image
बीडमध्ये श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रा; मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आरती ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी शहर दुमदुमले बीड (प्रतिनिधी) दि.२६ : शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या कंकालेश्वर मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव उत्साहात गुरुवारी (दि.२६) साजरा करण्यात आला. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर कंकालेश्वर मंदिर परिसर ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. आरतीनंतर पंकजाताई मुंडे यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले व उपस्थितांना राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कंकालेश्वर मंदिरातून भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रेला नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून हजारो रामभक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला. ‘जय श्रीराम, जय जय श्रीराम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला. महिला व पुरुषांची लक्षणीय उपस्थिती यावेळी पाहायला...

भव्य रथातून प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती मिरवणूक; बीडमध्ये उत्साहाचा जल्लोष

Image
भव्य रथातून प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती मिरवणूक; बीडमध्ये उत्साहाचा जल्लोष बौद्ध भिक्खू, समता सैनिक दल व बौद्ध बांधवांची मोठी उपस्थिती; सामाजिक ऐक्याचा संदेश बीड (प्रतिनिधी) : चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात भव्य रथातून प्रतिमेची मिरवणूक काढून उत्साहपूर्ण वातावरणात जयंती साजरी करण्यात आली. बौद्ध धम्माचा प्रसार देशाबरोबरच परदेशातही करणारे प्रियदर्शी सम्राट अशोक यांची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून 26 मार्च रोजी देशभर जयंती साजरी केली जात आहे. त्या निमित्ताने बीड शहरात सम्राट अशोक यांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. बौद्ध भिक्खू, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच बौद्ध उपासक-उपासिका यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. सम्राट अशोक यांच्या प्रतिमेचा भव्य रथ शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरविण्यात आला...

सरकारच्या संवेदनाहीन धोरणाच्या निषेधार्थ धनगर समाज रस्त्यावर! लिंबागणेश येथे रास्ता रोको

Image
लिंबागणेश (दि.२६) : धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दिपकभाऊ बो-हाडे यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर दि.१६ मार्चपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दहाव्या दिवशी त्यांचे सासरे रामराव होळकर यांनी जालना येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर धनगर समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून सरकारकडून केवळ आश्वासने देऊन वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. मंत्रीमंडळातील शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली असली तरी ठोस निर्णय न घेतल्याने समाजात नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या संवेदनाहीन धोरणाच्या निषेधार्थ मराठा सेवक डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२६ गुरुवार रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  आंदोलनाची सुरुवात स्व. रामराव होळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. सरकारच्या हलगर्जीपणामुळेच त्यांचा बळी गेला असल्याची तीव्र भावना व्यक्त...

सम्राट अशोक व त्यांचे राज्य.

Image
सम्राट अशोक व त्यांचे राज्य.  भारतीय इतिहासातील स्वर्णिम अक्षराने कोरलेल्या दिव्यपुरुष सम्राट अशोकांचे राज्य व त्या काळातील समाज व्यवस्था आणि इतर गोष्टी कशा होत्या ह्या शोधून काढण्यासाठी देशी-विदेशी इतिहास संशोधक आपल्या जीवाची पराकाष्टा करताना आपल्याला दिसतात. तथापि सम्राट अशोकांचे राज्यव्यवस्था व समाजस्थिती कशी होती हे आजवर व्यवहारिक दृष्टीने किंबहुना मुद्दामून दाबून दडपून टाकलेले आहे. अशोकाचे लक्ष जरी प्रजेत धर्म शिक्षणाचा प्रसार करण्याकडे असले तरी त्यांनी कधीही राजाच्या इतर कर्तव्याकडे केव्हाही दुर्लक्ष केले नाही! चंद्रगुप्ताच्या वेळी मगधसाम्राज्याचा विस्तार जितका होता व अशोकाने त्यात किती भर घातली याविषयी अनेक संशोधकांनी आपल्या पुस्तकात पुष्कळपणे लिहिले आहे. या प्रकरणात त्याचे विवेचन करणे गरजेचे नसले तरी अशोकाच्या राज्यविस्ताराचा मी यात सूक्ष्मपणे विवेचन करणार आहे. सम्राट अशोकाने कलिंग सारखे मोठे राज्य जिंकून ते मगध साम्राज्याला जोडले ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. दक्षिणेतील चोल, पांड्य, सातियपुत्र म्हणजे सत्यपुत्र व केरळपुत्र ही किरकोळ राज्ये सोडली तर बाकीचा सारा हि...

पाटोदा महावितरणचा बेजबाबदार कारभार; रात्री लाईट गायब,अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फोन बंद गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास संपर्क कोणाशी साधायचा मोठा प्रश्न

पाटोदा महावितरणचा बेजबाबदार कारभार; रात्री लाईट गायब,अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फोन बंद गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास संपर्क कोणाशी साधायचा मोठा प्रश्न पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरात महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.शहरातील बस स्टँड परिसरात काल रात्री वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. वारंवार प्रयत्न करूनही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याशी संपर्क साधता आला नाही, कारण त्यांचे फोन बंद असल्याचे निदर्शनास आले.आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नेमके कोणाकडे धाव घ्यावी, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. महावितरणकडून कोणतीही तातडीची मदत मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करत, वीजपुरवठा सुरळीत ठेवावा तसेच रात्रीच्या वेळीही अधिकारी व कर्मचारी संपर्कात राहावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

ट्रान्सजेंडर विधेयकाला विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांना दिले विविध संघटनांनी निवेदन

Image
बीड (प्रतिनिधी ) केंद्र सरकारने सादर केलेल्या ‘ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्क संरक्षण) सुधारणा विधेयक, 2026’ या प्रस्तावित विधेयकाच्या विरोधात बीडमध्ये विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत तीव्र निषेध व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर मातोश्री रमाबाई आंबेडकर सेवाभावी संस्था, एकल महिला संघटना बीड, क्रांती महिला असंघटित कामगार युनियन (महाराष्ट्र राज्य) तसेच शेर ए हिंद, धर्मराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संघटनांच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हे विधेयक भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे असून, व्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणारे आहे. संघटनांनी या विधेयकातील विविध तरतुदींवर आक्षेप घेत, ते तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. संघटनांच्या मते, या विधेयकामुळे ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या अधिकारावर गदा येणार आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद 19 व 21 नुसार प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा आणि स्वतःची ओळख जपण्याचा अधिकार आहे. मात्र, या विधेयकात ‘स्व-ओळख’ या संकल्पनेला दुय्यम स्थान दिल्याचा आरोप करण्या...

चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती 26 मार्च दिनी बीडमध्ये होणार साजरी - कॅप्टन राजाभाऊ आठवले

Image
बीड (प्रतिनिधी ): चक्रवर्ती सम्राट अशोक जयंतीनिमित्त बीड शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवार दि. २६ मार्च रोजी हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या जयंतीनिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी ठीक ९.०० वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयात सम्राट अशोकांच्या आदर्शांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यावेळी त्रिसरण व पंचशील ग्रहण करण्यात येणार आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भिक्खुसंघाच्या उपस्थितीत भव्य धम्मरथातून सम्राट अशोकांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक राजुरी वेस, कारांजा, बलभीम चौक, टिळक रोड, माळीवेस मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जाणार असून, त्या ठिकाणी सम्राट अशोकांना मानवंदना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल तसेच सम्राट अशोका शाक्य संघ (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी) यांचे सदस्य गणवेशात सहभागी होणार आहेत. तसेच भारतीय धम्म महासंघ व मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका पांढऱ्या ...

मावलाई श्री राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार डॉ. गणेश ढवळेंना जाहीर

Image
बीड (दि. २५ ): गेवराई तालुक्यातील मावलाई युवक क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा ब-हाणपुर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १७ वर्षांपासून मावलाई देवी यात्रेनिमित्त पत्रकारिता, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना “मावलाई श्री राज्यस्तरीय पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. यावर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांना “मावलाई श्री समाजसेवा पुरस्कार २०२६” जाहीर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील मूलभूत सुविधा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न, वृक्षारोपण व संवर्धन तसेच पर्यावरण संरक्षण यांसारख्या विविध सामाजिक विषयांवर सातत्याने अनोख्या आंदोलनांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ब-हाणपुर येथे दि. ०३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शशिकांत शिंगारे यांच्या हस्ते रोख रक्कम, ...

लेख : श्रीरामनवमीच्या निमित्ताने.....श्रीरामनवमीचे महत्त्व

Image
लेख : श्रीरामनवमीच्या निमित्ताने..... श्रीरामनवमीचे महत्त्व          श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा 1 हजार पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा. श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्योत ! धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा अर्थात् ‘मर्यादापुरुषोत्तम’, आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श पति, आदर्श मित्र, आदर्श राजा, आदर्श शत्रु असा सर्वार्थाने आदर्श ठरेल असा कोण, असे विचारताच डोळ्यांसमोर नाव येते ते म्हणजे ‘श्रीराम’ ! आदर्श राज्याला आजही रामराज्याचीच उपमा देतात. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपण श्रीरामनवमीचा इतिहास आणि महत्त्व, हा उत्सव साजरा करण्याची पद्धत आणि रामनामाचे महत्व यांविषयी जाणून घेणार आहोत. रामनवमीला श्रीरामाची उपासना आणि नामजप करून रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया !   1. तिथी : रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा करतात. 2. इतिहास : श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम या...

पुणे येथे राज्यस्तरीय कर्तृत्व गौरव पुरस्काराने माया दिवाण यांचा सन्मान

Image
पुणे/ बीड (प्रतिनिधी ) – नालंदा फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘नालंदा कर्तृत्व गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये माया दिवाण यांना ‘कर्तृत्ववान महिला गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठेचा सोहळा २१ मार्च २०२६ रोजी पत्रकार भवन, पुणे येथे उत्साहात पार पडला. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालयात नोंदणीकृत असलेल्या नालंदा फाउंडेशनतर्फे राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा माया दिवाण यांच्या समाजाभिमुख कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माया दिवाण यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत समाजासाठी दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिले आहे. लेखिका, कवयित्री, म्हणून त्यांची कार्य अधोरेखित आहे. समाजनिर्मितीसाठी त्यांनी अनेक वर्षे अविरत परिश्रम घेत प्रेरणा व सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे. त्यांच्या लेखनातून व कवितेतून सामाजिक बांधिलकी, सृजनशीलता आणि समर्पण यांचे उत्कृष्ट दर्शन घडते. या सन्मानामुळे त्यांच्या ...

नाशिकच्या भोंदू बाबावर कारवाई करा; बीड जिल्हाधिकाऱ्यांना 'अंनिस'चे निवेदन

Image
भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा-बुवाबाजी-सत्ता-संपत्तीच्या संगनमताने चालू असलेले 'महिलांचे शोषणा'विरोधी राज्यस्तरावर कठोर कारवाई व्हावी          राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना 'मअंनिस' बीड शाखेचे निवेदन बीड (दि 24 ):नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकर णाकडे केवळ त्या एका व्यक्तीच्या गुन्ह्याच्या रुपात पाहणे,ही मोठी चूक ठरेल.अंधश्रद्धा,सत्ता,संपत्ती,बुवाबाजी,ज्योतिष्य, व 'तथाकथीत अध्यात्म व दैवी शक्तीच्या' अतिशय धोकादायक संगनमताचे हे राज्याला हादरवून सोडणारे गंभीर उदा. आहे.करिता,या व अशा प्रकरणांची चौकशी केवळ आरोपीपुरती मर्यादित न ठेवता,त्या मागील संपुर्ण जाळ्याचा शोध घेण्याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,बीड शाखेच्या वतीने विवेक वाहिनीच्या राज्य कार्याध्यक्ष प्राचार्य सविता शेटे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मा.मुख्यमंत्री महोदयांना मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन पाठविले असल्याची माहिती जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्राचार्य कॉ डी जी तांदळे यांनी दिली आहे. यासंबंधाने अधिक माहिती अशी की,समाजातील असुरक्...

भगव्या रंगात रंगणार पाटोदा; विराट हिंदू संमेलनाची पाटोद्यात जोरदार तयारी

पाटोदा (प्रतिनिधी )सकल हिंदू समाज,पाटोदा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पाटोदा शहर भगव्या रंगात न्हाऊन निघत असून वातावरणात धार्मिक उत्साहाची लाट उसळली आहे. येत्या गुरुवारी, दि. २६ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या या भव्य संमेलनासाठी शहरात जोरदार तयारी सुरू असून सर्वत्र भगवे ध्वज आणि आकर्षक सजावट करण्यात येत आहे.श्रीराम मंदिर व काळा हनुमान मंदिर परिसरात सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत होणाऱ्या या संमेलनात नामांकित शिवचरित्रकार अशोक बांगर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्या विचारांतून हिंदू संस्कृती, इतिहास आणि एकतेचा संदेश दिला जाणार आहे.तसेच ह.भ.प. राधाताई महाराज आईसाहेब या मातृशक्ती प्रबोधन करणार असून समाजातील महिलांच्या सशक्त भूमिकेवर भाष्य करतील. ह.भ.प. लक्ष्मण महाराज सस्ते आणि ह.भ.प. केदारेश्वर महाराज जाधव हे प्रबोधनातून अध्यात्मिक व सामाजिक संदेश देणार आहेत.कार्यक्रमानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत काढण्यात येणारी भव्य मिरवणूक ही संमेलनाची मुख्य आकर्षण ठरणार आहे. ढोल-ताशा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीडमध्ये ‘महापुरुष सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा’चे आयोजन

Image
बीड प्रतिनिधी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बीड शहरात ‘महापुरुष सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात आयोजित केली जात आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, यंदाही जिल्ह्यातील इयत्ता 8 वी ते 12 वीतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. तालुकास्तरीय पहिली फेरी दिनांक 30 मार्च 2026, सोमवार रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या फेरीतून प्रत्येक तालुक्यातील अनुक्रमे पहिले 10 विद्यार्थी अंतिम फेरीसाठी निवडले जाणार आहेत. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या अकरा तालुक्यांतील विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा दिनांक 05 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता तुलसी महाविद्यालय, बीड येथे पार पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी 7,000 रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी 5...

वीर यांच्या "संगर" निवासस्थानी भंन्ते डॉ. सुमेधबोधी व भिक्खू संघाचे उत्स्फूर्त स्वागत

Image
 बीड प्रतिनिधी - एकतानगर नाळवंडी नाका परिसरातील “संगर” या निवासस्थानी चैत्यभूमी, मुंबई येथील भंन्ते डॉ. सुमेधबोधी व भिक्खू संघ यांचे वीर परिवाराच्या वतीने अत्यंत उत्साहात स्वागत, सत्कार व भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कालकथित नारायण वीर शिकवलेल्या धम्माच्या मार्गावर मार्गक्रमण करत वीर परिवार ने आज धम्म सेवा केली आहे. धम्मरथाद्वारे चैत्यभूमी येथून आगमन झालेल्या भंन्ते डॉ. सुमेधबोधी व भिक्खू संघाचे आगमन होताच परिसरात धम्ममय वातावरण निर्माण झाले. यावेळी अॅड.चंद्रवणी वीर तसेच समाजसेवक पुरुषोत्तम उर्फ (गोटु) वीर यांनी सहकुटुंब उपस्थित राहून भंन्ते व संघाची आदरपूर्वक सेवा केली. वीर परिवाराने अत्यंत श्रद्धा व समर्पण भावनेने भिक्खू संघाचे स्वागत करत पारंपरिक पद्धतीने सत्कार केला. तसेच सर्व भिक्खूंना सन्मानपूर्वक भोजनदान देण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी धम्माच्या मार्गावर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमात शांतता, करुणा व बंधुभाव यांचा सुंदर संदेश देत भंन्ते डॉ. सुमेधबोधी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांना प्रेरणा मि...

लिंबागणेश येथे गतिरोधकाच्या मागणीसाठी पत्रकार हरिओम क्षीरसागर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Image
(लिंबागणेश प्रतिनिधी )  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी (मांजरसुंबा – पाटोदा) मार्गावरील लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयासमोर तसेच गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार हरिओम सुधीरराव क्षीरसागर यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडून वारंवार आश्वासन देऊनही प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. या संदर्भात दि. १२ जून २०२५ रोजी झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सदर विषयावर चर्चा होऊन स्थळ पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार दि. २६ जून २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले होते. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडूनही दि. ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी संबंधित विभागाला गतिरोधक बसविण्याचे लेखी आदेश देण्यात आले होते. मात्र, या सर्व प्रक्रियेनंतरही संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी आदेशांची दखल न घेता आजपर्यंत गतिरोधक बसविण्यात आलेले नाहीत. परिणामी, शाळकरी विद्यार्थी...