वैद्यकिन्ही टोलनाक्यावरील स्वच्छालयात अस्वच्छतेचा कळस,प्रवाशांमध्ये संताप; प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी


पाटोदा (प्रतिनिधी)पाटोदा तालुक्यातील मांजरसुंबा रोडवरील वैद्यकिन्ही जवळ असलेल्या टोलनाक्यावरील सार्वजनिक स्वच्छालयामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याचे चित्र समोर आले आहे. स्वच्छतेअभावी परिसरात दुर्गंधी पसरत असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.दररोज शेकडो वाहनांची ये-जा असलेल्या या टोलनाक्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी स्वच्छालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र संबंधित ठिकाणी नियमित साफसफाई होत नसल्याने स्वच्छालयाची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी घाण साचलेली असून पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “टोल आकारला जातो, मात्र मूलभूत सुविधा स्वच्छ ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे,” अशी नाराजी वाहनधारकांनी व्यक्त केली.
सध्या राज्यभर स्वच्छता अभियान राबवले जात असताना वैद्यकिन्ही टोलनाक्यावरील ही परिस्थिती प्रशासनाच्या दुर्लक्षाचे उदाहरण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन स्वच्छालयाची नियमित साफसफाई करावी व प्रवाशांना स्वच्छ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी