Posts

Showing posts from February, 2023

अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उदघाटन संपन्न

Image
सोयगाव (प्रतिनिधी यासीन बेग ) दि.28, शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांच्याहस्ते रविवार ( दि.26 ) रोजी संपन्न झाले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने शहरातील विकास कामांसाठी जवळपास 70 लाख रुपयांच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे.      कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने नगर विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या कामात शहरातील तुकाराम शेठ यांच्या गोदामा पासून ते भैरवनाथ बँक पर्यंत गटारी बांधकाम करणे, वॉर्ड क्र.1 मध्ये काँक्रिटीकरण व एकलव्य नगर मध्ये सिमेंट काँक्रिट रस्ते तयार करणे,वॉर्ड क्र.2 मध्ये भवानी माता मंदीर ते दत्तू कुंभार यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता व गटारी बांधकाम करणे, गावातील चौका चौकात बाकडे बसविणे या विकास कामांचा समावेश आहे.     उदघाटन प्रसंगी युवानेते तथा सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, सोयगाव तालुका शिवसेना प्रमुख प्रभाकर काळे, माजी सभापती धरमसिंग चव्हाण, नगराध्यक्षा आशाबी तडवी, शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष बोडखे, शिवसेना गटनेते अक्षय काळे, गजानन कुडके, भग

जय हिंद कॅम्पस येथे किशोरीताई पेडणेकर ,अंकित प्रभू , अनिल कदम यांची सदिच्छा भेट

Image
बीड प्रतिनिधी :- माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये शिवगर्जना अभियान राबवला जात असून सदरील अभियानामध्ये शिवसेनेचे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या परिसरात जाऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहे याच पार्श्वभूमीवर बीड शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मुंबईच्या माझी महापौर माननीय किशोरीताई पेडणेकर युवासेना चे कार्यकारी सदस्य माननीय अंकित प्रभू व माजी आमदार अनिल कदम हे माजलगाव या ठिकाणी होणाऱ्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी बीड शहरामध्ये आले होते मा.अनिल दादा जगताप यांच्या माध्यमातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शेख निजाम यांच्या जयहिंद कॅम्पस या शैक्षणिक संकुलाम वर या मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली व उपस्थित विद्यार्थ्यांची पालकांची संवाद साधला यावेळी बोलताना माननीय अंकित प्रभू यांनी आपण शालेय जीवनामध्ये कसे प्रयत्न केले व राजकारण व समाजकारण या क्षेत्रामध्ये काम करीत असताना सुद्धा शिक्षणाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले माननीय किशोरीताई यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व समजून सांगितले

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट; निर्यातीला चालना देण्यासह नाफेडमार्फत खरेदीच्या उपाययोजना तातडीने करा – छगन भुजबळ

कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न तातडीने केंद्र सरकारसोबत चर्चा करून मार्गी लावावा ; छगन भुजबळ यांची सभागृहात मागणी मुंबई,नाशिक,दि.२८ फेब्रुवारी :- राज्यातील कांद्याचे दर कोसळले असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे शासनाने कांदा निर्यातीला अधिक प्रोत्साहन देण्यासोबत नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरु करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच बांगलादेशांत द्राक्ष निर्यात करण्यासाठी असलेली इम्पोर्ट ड्युटी कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः बांगलादेशाच्या पंतप्रधानांशी बोलून प्रश्न मार्गी लावावा. यासाठी राज्यशासनाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज सभागृहात केली. कांद्याचे दर कोसळल्याने नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत आज छगन भुजबळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, सुमारे ५ क्विन्टल कांदा विक्री नंतर शेतकऱ्याला केवळ १८ रुपये शिल्लक र

वडगाव ढोक शिवारातील डोंगराला अज्ञान व्यक्तीने लावली आग

Image
गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे :- गेवराई तालुक्यातील खंडोबा डोंगरात कडील साईट ते वडगाव ढोक शिवारातील डोंगराला आज (दि,२८ फेब्रुवारी) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावली आहे. या आगीमुळे डोंगरावर चरायला गेलेले जनावरे गावाच्या दिशेने पळू लागले. वडगाव शिवारामध्ये काय फॉरेस्ट डोंगर आहे त्यामध्ये बबन रामभाऊ कडपे हे वाचमन आहेत कडपे यांनी काही माणसं हाताखाली धरून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला परंतु थोड्याच वेळात आगीने संपूर्ण डोंगर व्यापला होता. खंडोबा शिवारात असणारा हा डोंगर हिरवळीने नेहमीच नटलेला असतो. शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी खाद्याची व्यवस्था या डोंगरामुळे पूर्ण होत असते. परंतु आज अचानक अज्ञान व्यक्तीने या डोंगराला आग लावण्यात आली. आणि पाहाता पाहाता संपूर्ण डोंगरावर आगीचे लोळ पाहायला मिळाले. आगीची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईचा करण्यात येईल असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले

कृषि महोत्सवात कृषि विभागाच्या अफलातून नियोजनाचा लखलखाट यशश्वी

Image
कृषी महोत्सवात झाला शेतकऱ्यांचा सन्मान; हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा कृषि महोत्सवाची सांगता बीड प्रतिनिधी : बीड जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच लाखो शेतकऱ्यांच्या साक्षीने अभूतपूर्व कृषि महोत्सव हर्षात संपन्न झाला. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या समारोपदिनी जिल्ह्यातील 1965 पासून महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित केलेल्या शेतकऱ्यांचा सोहळा आयोजित केला होता. दरम्यान आदर्श शेतकऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या कृषि महोत्सवात आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवेंच्या अफलातून नियोजनाचा लखलखाट यशश्वी झाल्याचे चित्र दिसत होते.   शेतकऱ्यांच्या आयुष्यात आधुनिक शेती आणि नवतंत्रज्ञपूरक शेती व्यवसायात उजेड पडणारा ऐतिहासिक महोत्सव साजरा करून बीडच्या कृषी विभागाने एक इतिहास रचला आहे. दरम्यान या शेवटच्या निरोपाच्या कार्यक्रमाच्या सत्राच्या अध्यक्ष म्हणून श्रीमती त्रिवेणी भोंदे, संचालक उमेद, बाबासाहेब जेजुरक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड, सुभाष साळवे

मराठी भाषा गौरव दिन उत्साहत साजरा,जि प प्रशाला सोयगांव या शाळेत कवी व थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंती ,

Image
सोयगाव (प्रतिनिधी यासीनब बेग ) मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संजय शहापुरकर सामाजिक कार्यकर्ते होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्राध्यापक डाॅ.प्रशांत देशमुख आप्पासाहेब रघूनाथराव भाऊराव गरुड महाविद्यालय शेंदुर्णी व प्राध्यापक विक्रम पाटील ग्राम विकास महाविद्यालय पिंपळगांव(हरेश्वर),केंद्रप्रमूख फिरोज तडवी सर ,विष्णु मापारी उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती प्रशाला सोयगांव उपस्थित होते.या प्रसंगी प्राध्यापक डाॅ.प्रशांत देशमूख यांनी बोलतांना विद्यार्थ्यांनी स्वावलंबनाचे धडे गिरवायला हवे व निरीक्षण शक्ति चांगल्याप्रकारे विकसित करावी असे मत मांडले.विद्यार्थ्यांनी स्वत:ज्ञान मिळवण्यासाठी धडपड केली पाहीजे असे मत मांडले.प्राध्यापक विक्रम पाटील सरांनी हसतखेळत मूलांना पक्षी निरीक्षण व मराठी भाषा कशाप्रकारे समृद्ध करता येईल याबाबत चर्चा केली .केंद्रप्रमुख फिरोज तडवी व विष्णु मापारी यांनी ही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पंकज रगडे सर यांनी केले.कु .सोनल चव्हान हीने मराठी भाषेची महती आपल्या प्रभावी शैलीत मांडली .प्रमूख वक्त्यांचा

मराठी पत्रकार परिषदेच्या प्रयत्नांना यश,शशिकांत वारिशे हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार :देवेंद्र फडणवीस

मुंबई : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा खटला जलदगती(फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालविण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे.. विधानसभेत या विषयावरील लक्षवेधीला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही कोणाला पाठिशी घालणार नाही किंवा सोडणार ही नाही हे निक्षूण सांगितले..  अतुल भातखळकर, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, अजित पवार आणि अन्य सदस्यांनी ही लक्षवेधी मांडली होती.. त्याला उत्तर देताना,देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी नि:पक्षपणे व्हावी यासाठी डीजींना लक्ष घालण्याच्या सूचना देणयात आल्याचे सांगितले.. शशिकांत वारिशे यांचा कुटुंबाला २५ लाखांची मदत देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्त्रयांनी स्पष्ट केले..  शशिकांत वारिशे हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने सातत्यानं केली होती.. ती आज मान्य झाल्याने हे परिषदेचे आणखी एक यश मानले जात आहे.. सरकारच्या या निर्णयाचे एस.एम.देशमुख यांनी स्वागत केले आहे.. हा पत्रकारांच्या एकजुटीचा विजय असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले आहे..  .

तुलसी कॉलेज मध्ये मराठी दिन, विज्ञान दिन साजरा

Image
बीड(प्रतिनिधी ):- तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे दि.२७ फेब्रुवारी रोजी मराठी दिन तर २८ फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन साजरा करण्यात आला या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.जी.निकाळजे यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना मराठी दिन, विज्ञान दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्य डी.जी. निकाळजे म्हणाले की, मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो असे सांगितले. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला आहे. तर भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजर

भारतीय बौद्ध महासभा बीड जिल्हा (पश्चिम)ची महत्वपूर्ण बैठक

Image
बीड प्रतिनिधी : दि. 28 भारतीय बौद्ध महासभा बीड जिल्हा पश्चिम अंतर्गत असलेले तालुका शाखा बीड, गेवराई, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार तसेच शहरातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, माजी श्रामनेर, बौद्धाचार्य, समता सैनिक, केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका आणि दहा दिवसाचे प्रशिक्षण घेतलेले उपासक-उपासिका यांना कळविण्यात येते की नागसेन बुद्ध विहार पालवन चौक बीड येथे दिनांक 11 मार्च 2023 शनिवार रोजी दुपारी ठीक 2 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या आदेशाने व तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्षांच्या सुचने वरुन अतिमहत्त्वाची सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली असून सदर बैठकस एस.के. भंडारे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी,बी.एच. गायकवाड राष्ट्रीय सचिव, भिकाजी कांबळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, के.आर.पडवळ विभागवीय सचिव महाराष्ट्र राज्य,या प्रमुख मान्यवराच्या अधिपत्याखाली होनार आहे. तरी वरील दर्शविलेल्या सर्व,बीड जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी, यांनी  बैठकीला दिलेल्या वेळेवर उपस्थित राहावे असे आव्हान महालिंग निकाळज

शाळेला दांडी मारणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान !पेपर नसल्यास अध्यापनासाठी शाळेत हजर राहण्याचे आदेश द्या - एस.एम.युसूफ़

Image
शाळेला दांडी मारणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ! पेपर नसल्यास अध्यापनासाठी शाळेत हजर राहण्याचे आदेश द्या - एस.एम.युसूफ़  बीड (प्रतिनिधी ) - इयत्ता दहावी-बारावी परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना पेपर नसल्यास शाळेत अध्यापनासाठी हजर राहण्याचे आदेश द्यावे अशी मागणी मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.            याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सध्या इयत्ता १२ वी बोर्डच्या परीक्षा सुरू असून इयत्ता १० वी बोर्डच्या परीक्षाही येत्या ०२ मार्च २०२३ पासून सुरू होत आहे. सध्या सुरू असलेल्या १२ वीच्या परीक्षेसाठी पेपर दिवशी परीक्षा केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेले शिक्षक हे त्या दिवशी तर केंद्रावर कर्तव्य बजावत आहेत मात्र ज्या दिवशी पेपर नसेल त्यादिवशी अशा शिक्षकांनी ते कर्तव्यरत असलेल्या शाळेत उपस्थित राहणे कर्मप्राप्त असूनही परीक्षा केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले शिक्षक पेपर नसताना सुद्धा शाळेत कर्तव्य बजावण्यास जात नसल्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. याम

राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी वंदना ताई गोगडे यांची निवड

Image
 अहमदनगर प्रतिनिधी :-येथील सामाजिक कार्यकर्त्या वंदना ताई गोगडे यांची राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या महीला अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली        राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या महीला अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात येत आहे या निवडीमुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष उमेश आनेराव राष्ट्रीय अध्यक्ष मा. आर. के. दिवाकर उपाध्यक्ष भुषण पवार राज्य प्रवक्ते द्वारकादास फटाले यांच्यासह यावेळी संघटनेचे सचिव उमेश आनेराव बार्शी, शंकर वानेगावकर नांदेड,संजय मोगरे नाशिक, महीला अध्यक्ष विजयालक्ष्मी आनेराव,मिनाक्षी ताई अहिरे,दिपा वैतकार वैशाली ताई परदेशी,मिनल लिंबोळे,विजया माळी, मंगल डफळ,विद्या कातखडे, दिपाली बोराडे  तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पदाधिकार्यांनी या निवडीबद्ल अभिनंदनांचा वर्षाव केला.

वीरभद्र मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी पाच कोटी मंजूर

Image
      मुखेड शहराचे ग्रामदैवत वीरदेवता वीरभद्रस्वामी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मुखेड शहरात विरदेवता वीरभद्रस्वामी यांचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर या शहराचे ग्रामदैवत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनासाठी येतात         हे प्राचीन मंदिर मागील अनेक वर्षापासून नादुरुस्त आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे अशी मुखेड शहरातील भाविक भक्तांची जुनी मागणी आहे. आमदार डॉक्टर तुषार राठोड हे सुद्धा या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्नशील होते.              राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर माननीय नामदार मंगलप्रभात लोढा हे पर्यटन विभागाचे मंत्री झाले. आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी माननीय मंत्री नामदार मंगल प्रभात लोढा यांच्याकडे या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सहा कोटी रुपयांची मागणी केली होती.            राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी पाच कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल आमदार डॉ तुषार राठोड साहेब यांची भव्यदिव्य मिरवणूक आतिषबा

मा. मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्री व शिक्षा मंत्री दिल्ली सरकार यांना अटक केल्याबद्दल केंद्र सरकारचा बीडमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने जाहीर निषेध

Image
       .                       बीड प्रतिनिधी :-दिल्लीचे उपमुख्यमंत्री व शिक्षा मंत्री मा. मनीष सिसोदिया यांना केंद्रीय जाच एजन्सी यांनी खोट्या गुण्याअंतर्गत केंद्र सरकारच्या दबावांमध्ये अटक केल्याबद्दल जाहीर निषेध करण्यात आला पाठीमागील बऱ्याच काळापासून आम आदमी पार्टी व आम आदमी पार्टीच्या नेत्यांना केंद्रामधील भारतीय जनता पार्टी सरकार हे केंद्रीय ज्याचे यांच्यामार्फत साधना करत आहे पाठीमागे दिल्लीचे आरोग्यमंत्री मा. सत्येंद्र जैन यांना व एमसीडी निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीला संपूर्ण बहुमत असताना देखील मेयर पासून अडीच महिने एलजी च्या माध्यमाने लोकतंत्र ्याची गळचेपी करून सरकार बनवण्यापासून वंचित करण्यात आले मा. मनीष सिसोदिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री व शिक्षा मंत्री यांना खोट्या आरोपांमध्ये जाच एजन्सी या सीबीआयने केली आहे या निषेधार्थ आम आदमी पार्टी बीड आज आपल्या कार्यालयासमोर निदर्शना करून या एजन्सीचा व केंद्र संविधानिक मार्गाने चालत असलेल्या सरकारला आडंगा घालून पाडण्याचा प्रयत्न करत आहे या सर्व गोष्टींचा जाहीर निषेध करत आहे याची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम

संगणक परिचालकाचें काम बंद आंदोलन,अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन

Image
     ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- ( नवनाथ गायकर यांजकडुन )      अल्पावधीतच ग्रामपंचायतीचा प्रमुख घटक व कामाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पेलणार्या संगणक परिचालकाच्यां विविध मागण्या कित्येक दिवसापासुन प्रलंबीत आहेत. या मागण्या तातडीने मान्य व्हाव्यात या हेतुने उदया (दि.२८/२/२३) पासुन महाराष्ट्र राज्यातील संपुर्ण संगणक परिचालक बेमुदत काम बंद करत संपावर जाणार आहेत. दरम्यान राज्याच्या सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर संघटना मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहे.     सध्या सर्वत्र संगणकीय युग आहे. ग्रामपंचायतीचा कारभारही आता हायटेक झालेला आहे. दरम्यान ग्रा.प.चे संगणकीय कामकाज सुलभतेसाठी संगणक परिचालकाचीं नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सातत्याने मागणी करुनही या घटकास ग्रा.प.कर्मचारी दर्जा देणेत आला नसुन यामुळे किमान समान वेतनाचाही लाभ या घटकास मिळत नाही.    या घटकाची अवस्था वेठबिगारापेक्षाही खस्ता असल्याची तक्रार संगणक परिचालक करत असुन आपल्या न्याय मागणीसाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालकाच्यां संघटनेने उदया पासुन बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.    ईगतपु

नाम फाऊंडेशन व शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातूनगेवराई तालुक्यात होणार जलक्रांती

Image
नाम फाऊंडेशन व शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेवराई तालुक्यात होणार जलक्रांती उमापूर येथे अमृता नदीच्या खोलीकरण कामाचा शुभारंभ नाम फाऊंडेशन आणि शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकसहभागासह गेवराई तालुक्यातील अकरा गावांमध्ये बंधाऱ्यांचे पुर्नजीवनसह नाल्यांचे खोलीकरण, सरळीकरण व विस्तारीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. उमापूर येथील अमृता नदीच्या खोलीकरण व सरळीकरण कामाचा शुभारंभ विजयसिंह पंडित यांच्यासह नाम फाऊंडेशनचे राजाभाऊ शेळके आणि कृषीभुषण शिवराम घोडके यांच्याहस्ते करण्यात आला. सुमारे चार किलोमिटरच्या खोलीकरण व सरळीकरणाच्या कामाला यावेळी सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवार, दि.२७ रोजी उमापूर येथे अमृता नदीच्या चार किलोमिटर पात्राच्या खोलीकरण व सरळीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित, नाम फाऊंडेशनचे प्रकल्प संचालक राजाभाऊ शेळके व कृषीभुषण शिवराम घोडके यांच्या शुभहस्ते कामाचा शुभारंभ झाला. सुमारे महिनाभर हे काम चलणार असून या कामी नाम फाऊंडेशनकडून पोकलेन मशिन उपलब्ध करण्यात आली

दोन महिन्यांपूर्वी महसुल च्या धडक कारवाई नंतर वाळु चोरांनी काढले पुन्हा डोके वर तालुक्याच्या पश्चिम भागात रात्रीची वाळु चोरी जोमात

Image
शेवगाव तहसीलदार छगन वाघ यांची अवैध वाळु उपसा करणा-या ढंपरवर कारवाई   { अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755 शेवगाव चे तहसीलदार छगन वाघ यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ढंपरवर दोन दिवसांपूर्वी नेवासा रोडवरील महावितरण कार्यालयाच्या समोर कारवाई केली. वाळूने भरलेला ढंपर शेवगाव नेवासा रोडवर जात असल्याची माहिती शेवगाव तहसीलदार यांना समजली. त्यानंतर तहसीलदार यांनी तलाठी, मंडलाधिकारी, यांना घेवून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ढंपरचा पाठलाग करून त्या वाहनाला नेवासा रोड वरील महावितरण कार्यालयासमोर अडवून सदर चालकाला याबाबत चौकशी केली असता चालकाकडे कोणत्याही प्रकारचा वाळु वाहतूक परवाना आढळून न आल्याने ते वाहन शेवगाव तहसीलदार यांनी ताब्यात घेवून सदर वाहनाचा व त्यामधे असलेल्या वाळूचा रीतसर पंचामार्फत पंचनामा करून वाहन ताब्यात घेतले.   शेवगाव शहर व तालुक्यमध्ये दररोज रात्री २५ ते ३० ढंपरने वाळु व मुरूम वाहतूक होत असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका ढंपर मालकाने दिली.  तालुक्याच्या पश्चिम भागातील  वडुले व सामनगाव परिसरामध्ये धडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे  वडुले व सामनगाव परिसरामध

अवधा यात्रेसाठी विशेष द्रेन सोडवा वाघरी दल संघटनेची रेल्वे मंत्रालय कडे मागणी

Image
  आदिवासी पारधी टाकोणकार समाजाचे श्रद्धा स्थान असलेल्या वळेखण देवी या देवीच्या यात्रेसाठी विशेष द्रेन सोडावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केंद्रीय रेल्वे मंत्री यांना दि. 27-०२-२०२३रोजी देण्यात आले. आदिवासी पारधी टाकोणकार समाजाचे श्रद्धा स्थान असलेल्या वळेखण देवी या देवीच्या दर्शनासाठी वरुड. मोर्शी. परतवाडा चांदुरबाजर दर्यापूर भातकुली बडनेरा अमरावती तालुक्यातील तसेच मुर्तिजापूर अकोला शेगाव बुलढाणा या ठिकाणाहून समाजा बांधवा "ब" दर्जा प्राप्त असलेले श्री. क्षेत्र आदिशक्ती जगदंबा वळेखण देवी संस्थान अवधा खुर्द, ता नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे, लाखो भाविक दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या रात्री देवीचा महोत्सवास येतात दर वर्षी नरखेड ते भुसावळ या ट्रेन ने प्रवास करतात गाडी मध्ये आधीच गर्दी असल्यामुळे भाविकांना प्रवास करण्यात खुप अडचणी निर्माण होतात प्रवास्यांन मध्ये वाद पण होतात भाविकांचा प्रवास सुखरुप व योग्य पद्धतीने व्हावे म्हणून एक विशेष ट्रेन, किंवा ट्रेन चे डबे वाढून द्यावे दर वर्षी हनुमान जयंती या दिवशी यात्रा महोत्सव असतो म्हणून भारतीय रेल्वे विभागाने या भाविक

शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न आणि विकासाचा अनुशेष लवकरच भरून काढू- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

Image
बीड/प्रतिनिधी नागरिकांच्या वेळोवेळी प्राप्त झालेल्या मागण्यानुसार बीड शहरातील विकासाची कामे सुरू असून प्रभाग क्रमांक सात मधील सिमेंट रस्ते आणि नाल्यांची 63 लाख रुपयांची कामे तातडीने होत आहेत बीड शहराच्या हद्द वाढीचा प्रश्न आणि शहरातील उर्वरित विकासाचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे शहरातील जव्हेरी गल्ली येथे जव्हेरी गल्ली, पिंगळे गल्ली, गवळी गल्ली, कबाड गल्लीतील परिसर आदी ठिकाणच्या सिमेंट रस्ते व नाली बांधकामाचे माजी मंत्री आदरणीय जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला.   या वेळी जव्हेरी गल्ली परिसराची पाहणी करत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागत आहे याचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी गजानन बँकेचे उपाध्यक्ष जगदीशभाऊ काळे, डॉ.योगेश क्षीरसागर,परशुराम गुरखुदे, इकबाल शेख, नगरसेवक राजेंद्र काळे, प्रा.किशोर काळे, गोपाळ गुरखुदे, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब आंबेकर ,राज

प्रा.अमोल ढोरमारे राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्काराने सन्मानित.

Image
बीड प्रतिनिधी अंकुश गवळी सौ. के.एस.के( काकु) कृषि महाविद्यालय बीड येथील कीटकशास्त्र विषयाचे प्रा.अमोल पांडूरंग ढोरमारे यांना जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने राजे यशवंतराव होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून यांच्या अग्रिकोड कृषि प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असलेल्या कामाची दखल घेत या यशवंतरत्न या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यावेळी वडील श्री.पांडूरंग बापूराव ढोरमारे,आई सौ.गोदावरी पांडूरंग ढोरमारे, सरपंच सौ. अंजना राम माने,मित्र परिवार अमोल चव्हाण,निखिल ढवळे,नितीन माने,विशाल माने,पत्रकार अंकूश गवळी आदी उपस्थित होते. दि.२६ फेब्रुवारी रविवार रोजी राजे यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे उद्घाटक माजी मंत्री जयदत्तजी क्षीरसागर व होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांच्या शुभहस्ते यशवंतरत्न २०२२-२३ ने सन्मानित करण्यात आलं.

निष्क्रिय राज्य महिला आयोग बरखास्तीसाठी आंदोलन; महिला आयोग आपल्या दारी उपक्रम थोतांड

Image
  ___ बीड शहरातील महिलांसाठी शासकीय कार्यालयासमोर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत यासाठी वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा कारवाई न करणा-या तसेच सामाजिक कार्यकर्त्या तथा विश्व कल्याण महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष किस्किंदाताई पांचाळ यांना २ महिन्यापेक्षा जास्त दिवस आझाद मैदानावर उपोषण करून सुद्धा भेट न घेणा-या अध्यक्ष राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य रूपालीताई चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी   आणि महिलांना न्याय देण्यास सक्षम नसलेल्या केवळ कागदोपत्रीच दिखावा करणा-या   निष्क्रिय राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य बरखास्त करण्यात यावा या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदाताई पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२७ फेब्रुवारी सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात शेख युनुस च-हाटकर,शेख मुबीन, मिलिंदसरपते, शेख मुश्ताक,किस्किंदाताई

भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती भीमशक्ती क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा बलभीम नगर पेठ बीड कार्यकारणी जाहीर

Image
अध्यक्षपदी राहुल चांदणे तर सचिव पदी शुभम धन्वे यांची निवड बीड प्रतिनिधी, अंकुश गवळी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समिती भीमशक्ती क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा बलभीम नगरपेठ बीड याची कार्यकारणी जाहिर करण्यात आली या कार्यकारणी मध्ये जंयती उत्सव अध्यक्ष पदी राहुल चांदणे तर सचिव पदी शुभम धन्वे.उपाध्यक्ष.सुधाकर डोंगरे.आकाश कांबळे सहसचिव.मुन्ना शिंदे.कोषाध्यक्ष आकाश कोरडे.कार्यध्यक्ष.रंजणीकांत वाघमारे.प्रकाश वडमारे.व्यवस्थापक.अभिजित गायकवाड.यांची निवड करण्यात आली या कार्यकारणी बैढकीमध्ये भिमशक्ती क्रिंडा मंडळाचे जेष्ट मार्गदर्शक .सदाशिव निसरगंध.कुशाबा गव्हाणे.बाळु कोरडे.बबन कोरडे.गौतम शिंदे.दिलीप धन्वे.सोपान पवार.कांत्ता वाघमारे.सुंदर वाघमारे.राणु वाघमारे.भगवान गायकवाड.वचिष्ट सरवदे .चंद्रसेन गायकवाड.राजेश कोकाटे.कल्याण कोकाटे भास्कर कांबळे.भास्कर चांदणे.साहेबराव डोंगरे.मारूती वडमारे.रावन मस्के.बाबासाहेब कदम .मसाची विर रमेश गायकवाड.अशोक जाधव.अशोक गायकवाड.यांची उपस्थित होती या बैढकीमध्ये जेष्ठाच्या सुचने नुसार यावर्षी मोठ्या उत्सवाहात ज

चिंचवडगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

Image
52.युवकांनी केले रक्तदान. आयोजक उमेश शेंडगे यांचा सामाजिक अभिनव उपक्रम वडवणी प्रतिनिधी, अंकुश गवळी वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती या ठिकाणी या गावांमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते जगदीश काका फरताडे, राजेभाऊ बादाडे, आदी मान्यवरांची उपस्थिती होती,  याप्रसंगी चिंचवडगाव व परिसरातील 52 युवकांनी रक्तदान केले, सामाजिक कार्यकर्ते उमेश शेंडगे यांचा अभिनव उपक्रम,

चौसाळा येथील बसस्थानक बनले अवैध धंदयाचे माहेर घर

" चौसाळा शहरात विनापरवाना अवैध दारूचे पंचवीस दुकाने "" (बीड प्रतिनिधी ) बीड तालुक्यातील चौसाळा बसस्थानक परिसरात अवैध दारूचे दुकाने मोठया प्रमाणावर थाटले असुन सहजासहजी गावठी दारू मिळत असल्याने दारूडंयाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तरूण पिढी व्यसनाधीन झाली आहे  याकडे पोलीस प्रशासन व दारू बंदी विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. एकटया चौसाळा शहरात जवळपास गावठी दारूचे पंचवीस दुकाने पाहायला मिळतात तसेच चौसाळा बसस्थानक परिसरात पाच दुकाने आढळून येतात याकडे पोलीस प्रशासन व दारूबंदी विभाग डोळेझाकपणा का करत आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे बसस्थानक परिसरात तळीरामाची संख्या वाढली असुन याचा नाहक ञास बसस्थानकातील प्रवासी महीला वर्गाला होत आहे  याबाबत पोलीस व दारूबंदी विभाग लक्ष घालणार आहे की नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे.

सार्वजनिक शिवजयंती जातेगाव ला द्वितीय क्रमांक बक्षीस देऊन तलवाडा पोलीस कडुन सन्मान

Image
महापुरुषांची जयंती नाचुन नाहीतर पुस्तके वाचून साजरी करावी डी वाय एसपी स्वप्निल राठोड तलवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकरजी वाघमोडे यांचा स्तुत्य उपक्रम गेवराई प्रतिनिधी महापुरुषांच्या जयंती नाचुन न करता पुस्तके वाचून साजरी करावी असे आवाहन डीवायएसपी स्वप्नील राठोड यांनी शिवजयंती उत्सव शांततेच्या मार्गाने आणि सामाजिक आदर्शदायी शिवजयंती साजरी करणाऱ्या गावकऱ्यांच्या सत्कार प्रसंगी तलवाडा पोलीस स्टेशनच्या आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी मत व्यक्त केले आहे गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर जी वाघमारे साहेब यांनी स्तुत्य उपक्रम राबवला असून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ज्या गावकऱ्यांनी आदर्शदायी उपक्रम राबवत शांततेच्या मार्गाने डीजे मुक्त शिवजयंती साजरी केली अशा समितीला बक्षीस देऊन सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी शिवजयंती आदर्श उपक्रमात तलवाडा शिवजयंती उत्सव समितीला प्रथम पारितोषिक तर द्वितीय क्रमांक जातेगाव सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीला मिळाला असून तृतीय क्रमांक गोविंदवाडी शिवजयंती उत्सव समितीला तर उत्तेजनार्थ जय अ

सोयगाव येथील सर्वरोग निदान उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
सोयगावच्या इतिहासात पहिल्यांदा झाले सर्वाधिक मोठे आरोग्य शिबीर  5 हजार रुग्णांनी घेतला लाभ  आलेल्या रुग्णांना जेवणासह देण्यात आला मोफत औषोधोपचार        सोयगाव ( प्रतिनिधी यासीन बेग ) दि.26, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. सोयगाव सह जवळपासच्या गावांतील विविध आजारांचे जवळपास 5 हजार 360 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आला. विविध आजारांचे जवळपास 75 तज्ञ डॉक्टरांनीं या शिबिरात सहभाग घेतला होता. शिबिरात आलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.         रविवार ( दि. 26 ) रोजी शहरातील नॅशनल मराठी हायस्कूल शाळेच्या प्रांगणात तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच ना.अब्दुल सत्तार मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोयगाव येथे पाहिल्यांदा मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.        युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते दी

सोयगाव पोलिसांच्या तत्परतेने वाचले तरुणाचे प्राण

Image
  सोयगाव ( प्रतिनिधी यासीन बेग ) शनिवार, ता, २५ एक चिमुकली पोलीस स्टेशनला आली आणि ठाणे अंमलदार यांना कळविले की सर माझे पप्पा आत्महत्या करण्यासाठी घरावर चढले आहेत तेव्हा ठाणे अंमलदार दोड यांनी एका क्षणाचाही‌ विचार न करता लागलीच रात्रीच्या नाकाबंदीवर गेलेले पोलीस अमलदार गणेश रोकडे यांना प्रभाघवनी वर संपर्क करून माहिती दिली की एक इसम भवानीपुर येथील राहते घरी येथे आत्महत्यातेच प्रयत्न करीत आहे तुम्ही लवकर असे कळविले वरून पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतला पोचवलं तर इसमाने पोलिस आले ते पाहून घराचे बालकनीच पाईपला बांधलेली दोरी गळ्यात घालून पटकन उडी घेतली तेव्हा पोलीस अंमलदार रोकडे यांनी त्वरित परत जाऊन त्यांना वरती उचलून पकडल तेव्हा आजोबाजुला पाच ते सहा महिलांनी कहीच सुचत नव्हतं की काय करावं तेहा पोलिसांनी अमलदारांनी सांगितल की बाहेरुन माणसला बोलवा गळफासची दोरी कापावी लागेल तेवढ्यात रिक्षा स्टैंड वर थांबलेली चार-पाच पुरुषानी येऊन मदत केली एकाने दोरी कापली आणि त्या माणसला जिव वाचला , सदर इसमास उपचार कामी ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे दाखल करण्यात आले आहे सदर इस

राष्ट्रीय महामार्ग क्र.161वाशीम - पांगरे रस्ता चौपदरीकरणाचे लोकार्पण सोहळा केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते,

Image
सोयगाव (प्रतिनिधी यासीन बेग) यावेळी हिंगोली येथे पार पडला. यावेळी हिंगोलीचे पालकमंत्री तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. हिंगोली येथील श्रीमती इंदिरा गांधी चौक परिसरातील रामलीला मैदान येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी‌        व्यासपीठावर खासदार हेमंत पाटील, खासदार भावना गवळी, आमदार संतोष बांगर , आमदार विपलव बाजोरिया, आमदार तान्हाणी मुटकुळे, आमदार लखन मलिक, आमदार नामदेव ससाणे आमदार राजेंद्र पाटील आदींसह आजी माजी आमदारांची उपस्थिती होती.

पिंपळगाव लेप येथे संसाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

Image
येवला तालुक्यातील विसापूर‌ हल्ली पिंपळगाव ‌‌‌‌लेप येथे वास्तव्य करत असलेले किसन दगु सोनवणे वय वर्ष (६०) यानी संसाराच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ‌घडली आहे.त्यांनी त्यांच्या झोपडीजवळील कडुलिंबाच्या झाडाला दोर बांधून गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली.यावेळी ग्रामस्थांनी पिंपळगाव लेपचे पोलीस पाटील दत्ता आहेर तसेच येवला‌ ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिसांना संपर्क करून घटनास्थळी बोलावून घेतले.तात्काळ येवला ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस गांभिर्य हे घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करून घेतला.तर मृतदेह शवविच्छेदनासाठी येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.या सर्व घटनेचा तपास पोलीस हवालदार गांभीर्य हे करत आहे.

महिला आयोग आपल्यादारी उपक्रम निव्वळ फार्स

Image
  ___ महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी आखलेला "महिला आयोग आपल्या दारी उपक्रम " म्हणजे निव्वळ फार्स असुन बीड जिल्ह्य़ातील महिलांच्या मुलभुत प्रश्नांविषयी वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा राज्य महिला आयोगाकडून केवळ पत्रव्यवहार करण्याचे सोपस्कार पार पाडले जातात मात्र मागण्यांसंदर्भात दुर्लक्ष केले जात असून असा निष्क्रिय राज्य महिला आयोग बरखास्त करण्यात येऊन कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांना पदमुक्त करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.  महिलांच्या स्वतंत्र स्वच्छतागृह संदर्भात महिला आयोगाचे ७ पत्र पण निष्कर्ष शुन्य  ___ बीड शहरातील नगररोड वरील शासकीय कार्यालयासमोर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत तसेच नगरपरिषद प्रशासनाने संकेत स्थळावर महिलांसाठी २५ शौचालये बांधल्याबाबत खोटी माहिती प्रसिद्ध करत शासनाची दिशाभूल करून ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त केले असून संबधित प्रकरणात ७ वेळा निवेदन तसेच आंदोलनानंतर राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य कार्यालयामार्फत संबधित प्रकरणात जिल्हाधिका

डाॅ.गणेश ढवळे राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्काराने सन्मानित

Image
  __ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने राजे यशवंतराव होळकर जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या सामाजिक तसेच भ्रष्टाचार विरोधी लढ्यातील वैविध्यपूर्ण आंदोलनाची दखल घेऊन सामाजिक कार्याबद्दल यशवंतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सहकारी शेख युनुस च-हाटकर, मिलिंद सरपते, हमीदखान पठाण, किस्किंदाताई पांचाळ, संध्या भोसले आदि उपस्थित होते.       आज दि.२६ फेब्रुवारी रविवार रोजी राजे यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण नाटय़गृह बीड येथे उद्घाटक माजी मंत्री जयदत्तजी क्षीरसागर व इंदोर होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर यांच्या शुभहस्ते "यशवंतरत्न पुरस्कार २०२२-२३ ने सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.सर्जेराव काळे, स्वागताध्यक्ष इंजि. विष्णु देवकते, तसेच विशेष उपस्थिती म्हणून योगेश क्षीरसागर,बाळासाहेब दोडतले, डाॅ.शिवाजी राऊत, अड.श्रीराम लाखे, संदिप उपरे, भाऊ प्रभाळे, राजेश शिंदे, लक्ष्मण नजान, कृष्णा पित

घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी पद्धत बंद करून नगरपरिषदेने स्वतः कंत्राटी कामगारांना कायम नियुक्त करावे.

Image
परळी ( प्रतिनिधी ) शासनाचा कोणताही विभाग असो संपूर्ण जबाबदारी त्या विभागाचे मुख्यमलकावर असते. परंतु मागील २२ वर्षे झाले कंत्राटदार जाणीवपूर्वक कंत्राटी कामगारांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवतात. त्याचा ठपका अधिकाऱ्यावरच फोडला जातो. कारन कंत्राट दाराने कायद्याचे पालन केले नाही तर, त्या नंतर मुख्यमालक म्हणून मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत यांच्यावर येते.अशीच परिस्थिती बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद नगरपंचायत ची दिसून येते. कारण की सत्ताधाऱ्यांची गुत्तेदार पोसण्याच्या नीतीमुळे नगर विकास शाखा जिल्हाधिकारी कार्यालय बीड बदनाम होत आहे. तर दुसरीकडे यांनी केलेले पापाचे प्रायश्चित्त बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद नगरपंचायत यांना करावे लागत आहे.   याचं जिवंत उदाहरण स्वच्छता विभागातील व इतर विभागातील कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा व त्यांच्या सोयी सुविधाचा प्रश्न समजला जाऊ शकतो. नगरपरिषदेच्या वतीने या कंत्राटी कामगारासाठी नियुक्त करण्यात आलेली एजन्सी / कंत्राटदार किमान वेतन न देता तुटपुंजे वेतन देतात.तेही दोन दोन महिने वेतन देत नाहीत. बाकी सोयी सवलती फार लांबच

सनी लिओनी,सपना चौधरी चालते पण गौतमी पाटील चालत नाही वारे जनता - डॉ. जितीन वंजारे

Image
           लिहिण्यासारखा विषय अजिबातच नाही परंतु महाराष्ट्राच्या कला युगामध्ये जी जातीयता पसरत चाललेली आहे या कारणामुळे लिहिण्यास प्रवृत्त होत आहे,यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे सामान्य घराण्यातील अतिशय गरीबी परिस्थिती मधून स्वतःच्या नृत्यकलामुळे-डान्स मुळे विशेष प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटील या नृत्यांगणीला जो विरोध होताना दिसत आहे हे पाहता बॉलीवूड सारख्या पवित्र अशा ठिकाणी सनी लियोनी सारखी अपवित्र पॉर्नस्टार सहजासहजी उच्चपदस्थ होते बॉलीवूडमध्ये ती तिचे प्रस्त निर्माण करते तिथे कसलाही प्रकारच्या विरोध होत नाही,राधिका आपटे,सई ताम्हणकर अशा अभिनेत्रीने अंग प्रदर्शन करून एखादा सीन चित्रपटांमध्ये दिल्यास ती अजिबात ट्रोल होत नाही तो फक्त एक बोल्ड सिन असतो त्यावर कोणाच्याच लेखण्या उंचावत नाहीत परंतु गौतमी पाटील सारख्या सामान्य कुटुंबातून टॉप पर्यंत पोहोचवणाऱ्या मुलीला समाज नागडी-उघडी आणि खालच्या दर्जाची कलाकार म्हणून जेव्हा संबोधन करतो तेव्हा माझ्यातला लेखक , कलाकार जागा झाल्याशिवाय राहत नाही. कारण "तुम करे तो रासलीला और हम करे तो कॅरेक्टर ढीला" अशा पद्धतीचा जो काही संद

बीडचा कृषी विभाग राज्याचे मॉडेल करणार- कृषी आयुक्त सुनील चव्हाण

Image
  कृषी महोत्सव पाहण्यासाठी जिल्हावासीयांची अलोट गर्दी; नियोजनबद्ध महोत्सवात मान्यवरांकडून आयोजकांचे कौतुक    हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, भाग्यश्री टिळेकर यांनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन  बीड प्रतिनिधी : बीडच्या कृषी महोत्सवाची चर्चा महाराष्ट्रभर होत आहे. या भागात पाण्याचा दुष्काळ असला तरी येथील माणसे पाणीदार आहेत. मराठवाड्यात कृषी व्यवस्थापनाची मजबूत बांधणी करायची आहे. महाराष्ट्र राज्यात बीडचा कृषी विभाग एक मॉडेल म्हणून काम करणार असल्याचे प्रतिपादन कृषी विभागाचे आयुक्त सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले.  कृषी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या आयोजित कार्यक्रमात आयुक्त सुनील चव्हाण बोलत होते. यावेळी मंचावर हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, भाग्यश्री टिळेकर, उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी बोलतांना कृषी आयुक्त सुनील चव्हाण म्हणाले की, बियाणे आणि रासायनिक खाते रास्त भावात शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी विशेष मोहीम राब

गढी येथील मुस्लिम समाजाला आखेर कब्रस्तानच्या कपाऊंड वॉलचा . प्रश्र लागला मार्गी मुसलिम समाजाला मा . अमरसिंह पंडीत साहेब यांनी दिला न्याय .

Image
गेवराई ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील मौजे गढी गावातील मुस्लिम समाजाच्या कित्येक वर्षा पासूनचा कब्रस्तानाच्या कंपाऊंड वॉलचा प्रश्न मा अमरसिह पंडित साहेबानी आखेर लावला मार्गी या कब्रस्तानाच्या वॉलकपाऊंडचा प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबित होता परंतू गेल्या काही दिवसांपासून मा शेख युसूफभाई . मा ईसाकभाई पठाण गढी ग्रामपंचायतचे सदस्य घोंगडे विष्णूपंत मा . बंजरंग ( दादा ) आर्सूळ मा . राजू पठाण . यां सर्वानी मिळून सातत्याने मा अमरसिंह पंडित साहेब यांच्याकडे या बाबत पाठपुरावा केला होता तेव्हा आज सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने मा अमरसिह पंडित साहेब यांच्याकडे विविध कामांवर व मुस्लिम समाजाच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली . तेव्हा . मा अमरसिंह पंडित साहेब यांनी 1 ) कब्रस्तानाच्या वॉलक पाउचा प्रश्न मार्गी लावला 2 ) पाणी फिल्टर ते पंढरीनाथ कुन्हा डे यांच्या घरा पर्यत सिमेंट रस्ता 3 ) आयुबभाई ते आरेफ पठाण यांच्या घरा पर्यत सिमेंट रस्ता हि सर्व कामे लवकरच सुरू होतील आसे मा अमरसिंह पंडित साहेब यांनी सांगितले व ईतर विविध प्रश्न व समस्या आहेत त्या विषयावर लवकरच निर्णय घेतला जाईल आसे या

महाराष्ट्रात गेल्या 25-30 वर्षात 21 पत्रकार निर्दयपणे संपविण्यात आले

Image
महाराष्ट्रात गेल्या 25-30 वर्षात 21 पत्रकार निर्दयपणे संपविण्यात आले मात्र अनेक घटनात आरोपींचाच पत्ता नाही, शिक्षा झाल्याचे उदाहरण नाही मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची खंत मुंबई- राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची 7 फेब्रुवारी २०२३ रोजी निर्घृण हत्त्या झाली.. एक ठाम भूमिका घेत रिफायनरी विरोधात आवाज उठविला बद्दल त्याचा आवाज कायमचा बंद केला गेला.. गाडी खाली चिरडून अत्यंत अमानुषपणे शशिकांतची हत्त्या केली गेली.. या घटनेनं महाराष्ट्र ढवळून निघाला.. मात्र शशिकांत वारिशे हा पहिला पत्रकार नाही की, ज्याचा आवाज कायमचा बंद केला गेला.. गेल्या २५ - ३० वर्षांची आकडेवारी परिषदेकडे उपलब्ध असून त्यानुसार यापुर्वी महाराष्ट्रात २१ पत्रकारांना निर्दयपणे संपवण्यात आले.. शशिकांत भाग्यवान असा की, मराठी पत्रकार परिषदेने पुढाकार घेतल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व पत्रकार, संघटना एकत्र आल्या .. आवाज उठविला.. मग आरोपी पकडला गेला.. मात्र या पुर्वीच्या अनेक घटनात आरोपींचाच पत्ता लागला नाही.. आरोपींना शिक्षा झाल्याचं एकही उदाहरण नाही.. महाराष्ट्रात ज्या पत्रकारांच्या हत्य

गंध फुलांचा गेला सांगून ...!रंग फुलांचा आहे अजून ...!

Image
 सोयगाव प्रतिनिधी मुश्ताक शाक    सोयगाव तालुक्यातील अजिठा पर्वत रांगेतील परिसरात व शेती बांधावर पांगऱ्याची झाडे आणि पळसाची झाडे लाल रंगाच्या फुलाने बहरुन गेलेली दिसत आहेत.  संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या अभंगातून झाडा बद्दल असे सुंदर वर्णन केलेले आहे ते म्हणतात की वृक्ष हे दुसरे तीसरे कुणी नाही तर आपले सगे सोयरे आहेत .  वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे अशा गोंडस अभंग मध्ये त्यांनी मानवाला वृक्षावरती प्रेम करायचे सांगितले आहे.  परंतु त्या अभंगाच्या शब्दाकडे लक्ष न देता अलीकडे फळ फळावर देणारी मोठमोठी झाडे तोडली जात आहे. जसे की चिंचेच झाड,आवळा,कविट,आंबा,बोरं,जांभळं,बाभुळ,टेंबुर,लिंबाचे,साग,चिकू,सिताफळ,रामफळझाड या विविध झाडापासून आपणास गोड गोड नैसर्गिक गोड व आबट फळे चाखावयास मिळतात तर अनेक झाडांपासून संसाराला उपयोगी पडणारी फर्निचर आणि घरातील विविध प्रकारच्या वस्तू बनवून मिळतात. सांगायचे ठरवले तर या पलीकडे देखील सफरचंद ,डाळिंब, चिकू, मोसंबी,संत्र,केळी, ही गोड चवदार फळे यश चाखावयास मिळतात.  हिवाळा, पावसाळा, उन्हाळा ,असे तीन ऋतू येतात काही ऋतूमध्ये वृक्षाची पानझड होते.  तर चैत