आष्टी तालुक्यातील धानोरा येथे मोफत आरोग्य शिबिराची पूर्व नाव नोंदणी संपन्न
आष्टी( प्रतिनिधी : गोरख मोरे ) मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व जिल्हा प्रशासन बीड यांच्या समन्वयाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त आष्टी/ पाटोदा/ शिरूर मतदार संघातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराचे दिनांक ६ ते ७ ऑगस्ट २०२६ रोजी अनिषा ग्लोबल स्कूल ग्राउंड, जामगाव रोड, आष्टी. जिल्हा बीड येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत आयोजन केले आहे. तत्पूर्वी रुग्णांची नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याने आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथे आज शुक्रवार ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते ५ या वेळात धानोरा सह परिसरातील गरजू रुग्णांची धानोरा येथील मारुती मंदिरात नाव नोंदणी करण्यात आली असून या प्रसंगी डॉ. मयूर कदम , सिस्टर संजीवनी गोरे, पल्लवी सिस्टर, आशा सविता मोरे ,सर्व लॅब टीम या प्रसंगी उपस्थित होते. धानोरा सह परिसरातील गरजू रुग्णांना मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ मिळवून देण्याकरिता आष्टी पंचायत समिती सदस्य परमेश्वर (काका ) शेळके , आष्...