Posts

Showing posts from September, 2023

स्वाभिमानी नेते ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या महासभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे.किशोर भोले

Image
गेवराई, प्रतिनिधी सखाराम पोहिकर :- बीड येथे दिनांक 11 ऑक्टोबर रोजी असलेल्या सभेसाठी बीड जिल्ह्यातील बहुजन समाजाने या महासभेत उपस्थित रहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका महासचिव किशोरजी भोले यांनी केले आहे वंचिताच्या सत्तेसाठी महासभेचे आयोजन आदरणीय, श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीड या ठिकाणी दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी ठीक दोन वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथे होत आहे संबंध बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर हे या महासभेस संबोधित करणार आहेत आणि या महाराष्ट्राच्या राजकारणात दिशा आणि दशा बदलाचे काम या महासभेच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे बहुजन समाज या लढाईत सो इच्छेने उपस्थित राहून बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करावेत आणि लढाई वंचिताच्या सत्तेसाठी महासभेसाठी गेवराई विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मोठ्या संख्येने वृद्ध तरुण महिला यांनी उपस्थित रहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुक्याचे तालुका महासचिव किशोरजी भोले यांनी प्रसिद्धी पत्रकार जाहीर केले

डॉ. दीपाताई क्षीरसागरांकडून श्री.खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात स्वच्छता

Image
डॉ. दीपाताई क्षीरसागरांकडून श्री.खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात स्वच्छता महात्मा गांधी जयंती निम्मित हिरकणी ग्रुप बीड तर्फे स्वच्छता अभियान  बीड दि.०१ (प्रतिनिधी ) हिरकणी ग्रुप बीड यांच्याकडून श्री. खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात महात्मा गांधी जयंती निम्मित आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत माजी नगराध्यक्षा डॉ. दीपाताई क्षीरसागर यांनी सहभागी होत परिसराची स्वच्छता केली. महात्मा गांधींना आदरांजली अर्पण करण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण देशात ०१ ऑक्टोंबर रोजी ०१ तास स्वच्छता श्रमदान अभियान राबविण्यात आले. त्यानुसार बीड शहरात देखील हे अभियान राबविण्यात आले. हिरकणी ग्रुप बीड यांच्याकडून श्री.खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत बीड नगर पालिकेच्या नगराध्यक्षा डॉ.दीपाताई क्षीरसागर यांनी सहभाग नोंदवत स्वच्छता केली. यावेळी त्यांनी सहभागी झालेल्या महिलांशी स्वच्छतेसंदर्भात चर्चा केली. यावेळी त्या म्हणाल्या की, देशातील प्रत्येक नागरिकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वच्छतेसाठी 'एक तारीख एक तास उपक्रम 'अंतर्गत जिल्हा परिषद शाळा परीसरात स्वच्छता मोहीम

Image
स्वच्छतेसाठी 'एक तारीख एक तास उपक्रम 'अंतर्गत जिल्हा परिषद शाळा परीसरात स्वच्छता मोहीम:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेश:- स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास उपक्रम 'स्वच्छता पंधरवडा -स्वच्छता सेवा या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्यादिवशी रविवार १ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरिक तसेच ग्रामीण भागामध्ये एक तारीख एक तास या उपक्रमांतर्गत स्वच्छता साफसफाई करून अभियानात सहभागी व्हावे या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लिंबागणेशकरांनी लिंबागणेश येथील केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. झुडपे विळा आणि कोयता यांनी कापण्यात आली.तसेच तणनाशके फवारणी करण्यात आली.शाळेचा परीसराची झाडुने स्वच्छता करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक आबासाहेब हंगे, सहशिक्षक अमर पुरी,भरत चौरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर वाणी, सरपंच बालासाहेब जाधव, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, ग्रामपंचायत कर्मचारी सुखदेव वाणी, विक्रांत वाणी, संतोष भोसले, कालिकादेवी वरीष्ठ महाविद्यालय शिरूर (कासार) कर्मचारी शिवाजी रणखांब, सुंदर जाधव, संतोष

बिंदुसरा प्रकल्पावरती स्वच्छता अभियान राबवुन रोहित धुरंधरे यांचा वाढदिवस साजरा.

Image
बिंदुसरा प्रकल्पावरती स्वच्छता अभियान राबवुन रोहित धुरंधरे यांचा वाढदिवस साजरा. तलावा किनारी घानिचे साम्राज्य पाहता; रुग्ण मित्र फाऊंडेशनचा नावलौकिक उपक्रम. बीड प्रतिनीधी : बीड शहराला पाणी पुरवठा केला जाणाऱ्या बिंदुसरा धरणाच्या परीसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरले होते. व अशातच गणपती विसर्जन झाले त्यावेळी बीड शहरातील अनेक गणपती विसर्जन याच तलावात झाले. सद्य स्थितीत पाहिले तर या तलावाभोवती प्लास्टिक, कचरा, मोठ्या प्रमाणात तलावाच्या काठावर पडलेल्या अवस्थेत आहे. इथुनच संपूर्ण बीड शहराला पाणी पुरवठा होत असतो. मात्र सर्वत्र प्लास्टिक, कचरा पाहता हा तलाव स्वच्छता करण्याचे काम प्रशासनाने करायला हवे मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या सर्व परीस्थितीला पाहता रुग्ण मित्र सामाजिक फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष रोहित धुरंधरे हे नेहमीच आगळा वेगळा उपक्रम राबवत असतात, त्यांनी आपला वाढदिवस पाली येथील बिंदुसरा प्रकल्पावर स्वच्छता अभियान राबवुन करण्याचे ठरवले. त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी वाढदिवस दिवशी रुग्ण मित्र सामाजिक फाऊंडेशन बीड येथील टि

कलाध्यापक उध्दवराव विभूते व श्रीरंग राठोड यांचा सेवागौरव समारंभ संपन्न

Image
शिक्षणातूनच देश परमोच्च शिखरावर पोहोचू शकतो - वसंतराव देशमुख गुरुजी कलाध्यापक उध्दवराव विभूते व श्रीरंग राठोड यांचा सेवागौरव समारंभ संपन्न माजलगाव - येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयातील कलाध्यापक उध्दवराव विभूते गुरुजी व सहशिक्षक श्रीरंग राठोड गुरुजी हे आज शासकीय नियमानुसार सेवा निवृत्त झाले असून त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा सेवा गौरव समारंभ संपन्न झाला.      या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व माता सरस्वती, भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजनाने झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे पुर्व कार्यवाह वसंतराव देशमुख गुरुजी , प्रमुख अतिथि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अमरनाथ खुर्पे तसेच व्यासपीठावर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राम कुलकर्णी, प्रकाश दुगड, विष्णुपंत कुलकर्णी , सत्कार मुर्ती श्री व सौ गीता उध्दवराव विभूते गुरुजी व श्रीरंग राठोड आदि उपस्थित होते.      यावेळी संस्थेच्या वतीने श्री व सौ गीता उध्दवराव विभूते व श्रीरंग राठोड यांचा संपूर्ण आहेर देऊन व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव करण्यात आले. माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर

तारखेपुढं २०२३ लिहायची सवय होते न होते तोच किलकिल्या दारातून २०२४ डोकावूही लागलंय..!!

{ अविनाश देशमुख शेवगाव } 9960051755 २०२३ च्या सुरूवातीला केलेले संकल्प तस्सेच आहेत.. एक तसूभरही पुढे सरकलो नाही..!! माझ्या माहितीच्या तलम पत्रावर एकही नवी ओळ समाविष्ट न होण्याची पुरेपूर खबरदारी घेतलीय..! संपत आलं वर्ष... हुरहूर.. हुरहूर आणि हुरहूर.. ही हुरहूर हिच माझी श्रीमंती..!! खरं तर माझं कँलेंडरही तेच आणि कर्तृत्वानं तळपणाऱ्या माणसांचंही तेच... पण ह्याच परिघात त्यांच्याकडून काहीतरी भव्यदिव्य घडतं. आणि मी माझं आळशी, नीरस वास्तव कुरवाळण्यातच धन्यता मानतो.. सावरकरांनी गजाआड 'कमला' लिहीलं... मंडालेच्या तुरूंगात पाऊल ठेवताच लोकमाऩ्य उदगारले.. बरं झालं गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ लिहायला मला वेळ हवाच होता...!! ते लोकमाऩ्य.. मी सामान्य..!!  कर्मवीर भाऊराव पाटील. .. परवाच २२ तारखेला त्यांची जयंती साजरी केली आपण... कर्मवीरांनी उभ्या महाराष्ट्रात शेकडो शाळा सुरू केल्या.. मित्रांनो स्वत:साठी एक घर बांधताना चार ठिकाणी मोडतो आपण..!!     ...आणि ह्या शाळा प्रस्थापितांसाठी नव्हत्याच.. तर काळोखातच हजारो पिढ्यांचे गर्भ निखळले अशांसाठी 'आश्रमशाळा' होत्या..!! .. काट्याचीच पादत्राणं कर

स्वाभिमानी नेते अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या महासभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा-नागेश बोराडे

Image
आष्टी ( प़तिनिधी --गोरख मोरे ) :    लढाई वंचिताच्या सत्तेसाठीच्या महासभेचे आयोजन. आदरणीय श्रध्देय साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीडमध्ये दिं ११ आॅक्टोबर २०२३ रोजी दुपारी ठिक २:०० वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथे होत आहे सबंध बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे अँड बाळासाहेब आंबेडकर हे या महासभेस संबोधित करणार आहेत आणि या महाराष्ट्राच्या राजकारणात दिशा आणि दशा बदलाचे काम या महासभेच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे तळागळातील समूहांने या लढाईत स्वईच्छेने उपस्थित राहुन बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करावेत आणि लढाई वंचिताच्या सत्तेसाठी महासभेसाठी आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातुन जास्तीत जास्त मोठ्या संख्येने वृध्द तरुण महिला यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा कार्यकर्ते नागेश रूपेश बोराडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे .

नाशिक शहरात ईद ए मिलाद शांतिपूर्वक संपन्न

Image
. नाशिक प्रतिनिधि : माजिद खान    नाशिक शहरात ईद ए मिलाद शांतिपूर्वक आपल्या नेहमीचे मार्गाने जसेकी चौक मंडईतुन काडण्यात आला व पुढे बागवान पुरा, कथडा, अजमेरी चौक, चव्हाटा, काझी पुरा, कोकणी पुरा, दुध बाजार ने होऊन बडी दर्गेला जाऊन संपन्न झाला. नाशिक शहराचे शहर ए खतिब हाफिज हिसामोद्दीन साहेब, शहरे काझी यांचे हिन्दू व मुस्लिम समाजाने प्रत्येक चौकात पुष्प हार देऊन स्वागत केले. रस्त्यांवर जुलूस मध्ये लोकांना बिस्कुट, खजूर, पाणी बोटल, नान खटाई, दुध, शर्बत, लहान मुलांना चॉकलेट, कॅक, वाटप करण्यात आले.

भिमनगर येथील सुगंध कुटी बुद्ध विहारात जगतकर परिवाराच्या वतिने बौध्द पोर्णिमा साजरी

Image
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  भिमनगर येथील सुगंधकुटी बौद्ध विवाहारात जगतकर कुटुंबाच्या वतिने बौध्द पोर्णिमा निमित्ताने बौध्द,धम्म व संघ वंदना व भदंत यांचे धम्म प्रवचन व खिरदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. तथागत गौतम बुद्धाचा मार्ग हा जगाच्या कल्याणाचा मार्ग असून त्यांची शिकवण आत्मसात केल्यास सर्वांचे कल्याण होईल असे मत ज्येष्ठ नागरिक प्रकाश अण्णा संभाजी जगतकर यांनी व्यक्त केले.  सुगंधकुटी बौद्ध विवाहारात भिमनगर जगतकर गल्लीतील बौद्ध उपासक,उपासिकांच्या वतिने प्रत्येक रविवारी बौध्द वंदनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येथे आज बौध्द पोर्णिमेच्या पावन दिनाची धार्मिक सेवा देण्याच येथील ज्येष्ठ नागरिक प्रकाश अण्णा संभाजी जगतकर यांच्या परिवाराला मिळाले. कपिल प्रकाश जगतकर राहुल प्रकाश जगतकर गंगाधर प्रकाश जगतकर व डॉ. रवींद्र प्रकाश जगतकर यांच्याहस्ते तथागत गौतम बुध्द व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.जगतकर परिवाराच्या सामूहिक कल्पनेतून बुद्ध पौर्णिमेनिमित्त भंते धम्मबोधी यांनी उपस्थितांना धम्मदेसना दिली.बौध्द,धम्म व संघ वंदना घेण्यात आली असुन त्यानंतर खिर

इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी अनुभवला निवडणूक प्रक्रियेतला आनंद

Image
शेवगाव तालुक्यातील चापडगाव जिल्हा परिषद केंद्र शाळेतील इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक श्री गवाजी बळीद यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक श्री तुकाराम भगतसर व तंत्रस्नेही शिक्षक श्री संजय गीतखने सर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेत वर्गनायक निवडीचा आनंद लुटला. वर्गनायक पदासाठी कु गायत्री दिवटे, चि श्रेयस गायके , तिर्थराज भिसे व कैवल्य गायकवाड या चार विद्यार्थ्यांनी उमेदवारी केली होती.एक दिवसाचा कालावधी प्रचारासाठी देऊन दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष मतदान कक्ष तयार करून मतदान प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यात आली .        मतदान अधिकारी म्हणून इयत्ता तिसरीच्या वर्गातील विद्यार्थी कु . स्वामिनी जाधव , चि प्रथमेश नेमाने , यश तेलोरे यांनी मतदार यादी , मतपत्रिका देणे , डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावणे , मतदान कक्षात जाऊन मतदान पेटीत पत्रिका मतदान करून टाकण्यास सहकार्य करणे आदि प्रशासकीय कामकाज पार पाडले .           प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तासाभराच्या अवधीनंतर प्रत्यक्ष मतदान मोजणी सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनि

रिपाइं(A)च्या वर्धापन दिना निमित्त हैद्राबाद येथे होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्याने उपस्थित रहावे-डॉ.नरेंद्र जावळे

Image
पाटोदा (प्रतिनिधी )डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या व सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया या पक्षाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.३ आक्टोबर २०२३ रोजी हैद्राबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास पाटोदा तालुक्यातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने रिपाइं(A)च्या वर्धापन दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हैद्राबादला होणार्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. नरेंद्र जावळे रिपाइंचे पाटोदा तालुका अध्यक्ष यांनी केले दि.३आक्टोबर २०२३ रोजी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार नामदार डॉ.रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हैद्राबाद येथील नामपल्ली रेल्वे स्टेशन जवळ एक्झिबीशन मैदानात राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.रामदासजी आठवले साहेब व रि.पा. ई.चे युवा प्रदेक्ष अध्यक्ष मा.प

उद्या होणार्या स्वच्छता अभियानास पाटोदा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे नगराध्यक्ष राजु भैय्या जाधव यांचे आवाहन

Image
पाटोदा (गणेश शेवाळे )भारत सरकार यांनी दिनांक १५ सप्टेंबर २०२३ ते ०२ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत“स्वच्छता पंधरवडा स्वच्छता अभियान देशभरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी एक तास श्रमदान करून एक तारीख - एक घंटा (एक तारीख - एक तास) हा स्वच्छता उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्याचे आयोजन देशभरात केले आसुन.पाटोदा शहरात ही स्वच्छता अभियान आमदार सुरेश आण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली खाली पाटोदा शहरात स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन केले असून पाटोदा नगरपंचायत स्वच्छता अभियान रुपरेषा खालील प्रमाणे आहे. सकाळी 9.00 वाजता बुद्ध विहार भीमनगर ते जुन्या पोलीस स्टेशन मार्गे काळा हनुमान मंदिर,राम मंदिर,श्री क्षेत्र संगमेश्वर मंदिर,चाऊस मज्जित तसेच श्री संत सेना महाराज मंदिर,श्री संत सावता महाराज मंदिर, सावता महाराज चौक, मरकज मज्जित,क्षेत्र भामेश्वर मंदिर,श्री संत भगवान बाबा चौक, अण्णाभाऊ साठे चौक, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,ते नगरपंचायत कार्यालया पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा स्वच्छता अभ

शेकडो मेंढ्या घेऊन धनगर समाज स्वतःच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरला

Image
...  गेवराई प्रतिनिधी गणेश ढाकणे   सकल धनगर समाज यांच्या वतीने आज शिंगारवाडी फाटा ता गेवराई जि बीड या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला गेल्या अनेक दिवसापासून धनगर समाज हा एसटी आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे या समाजाची मागणी आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला एसटीचे आरक्षण दिलेले आहे या आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करा या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन मोठाले मोर्चे ,रस्ता रोको ,केले तरी या सरकारला या धनगर समाजाची दया आली नाही प्रत्येक वेळेस आश्वासन देतात की धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश करून घेऊ असे न होता या समाजाला एसटीचे दाखले देण्यात यावेत यासाठी आज शिंगारवाडी येथे सकल धनगर समाज गेवराई च्या वतीने आज मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये पंचक्रोशीतील हजाराच्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहून आपल्या न्याय हक्कासाठी व आपल्या आरक्षणासाठी एकत्र आलेला दिसला जर या राज्य सरकारने धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर राज्यभर आंदोलन मोर्चे रस्ता रोको करण्यात येईल असे या ठिकाणी सर्व धनगर समाजाच्या नेत्यांनी संबंधित करताना

नाकर्ते राज्यकर्ते आणि निष्क्रिय मुख्याधिकारी नगरपरीषद यांच्या निष्क्रयतेमुळे बीडकरांचे आरोग्य धोक्यात :- डॉ.गणेश ढवळे

Image
--- बीड:- बीड शहरातील अमृत अटल पाणीपुरवठा योजना तसेच भुयारी गटार योजनेसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करूनही योजना पूर्ण न झाल्याने तुंबलेल्या नाल्यांची केवळ कागदोपत्रीच सफाई करत शासकीय निधी घशात घातल्याने गटारीतील पाणी मुख्य रस्त्यावर येऊन रस्त्यांना गटारीचे स्वरूप आले असून सत्ता भोगलेल्या राजकीय पुढारी आणि मुख्याधिकारी नगरपरीषद बीड नीता अंधारे या बीड शहरातील भिंतीवर स्वच्छ बीड व सुंदर बीड द्वारे जनतेची दिशाभूल करण्यात मग्न असुन  ढिसाळ नियोजनामुळे बीडकरांचे आरोग्य संकटात सापडले असुन शहरातील बहुतांश बाजारपेठ परीसरात तसेच केएसके महाविद्यालय,माळीवेस, जालना रोड,शाहुनगर आदी.प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी गटारीतील घाण पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असुन पादचारी, दुचाकी स्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. पसरलेल्या अस्वच्छतेमुळे बीडकरांचे आरोग्य धोक्यात आले असुन मोठ्या रोगराईचा सामना बीडकरांना करावा लागणार आहे. पुढा-यांची श्रेयवादासाठी चढाओढ, रखडलेल्या योजनांची जबाबदारी झटकतात --- बीड शहरांमध्ये खंडीभर पुढारी असुन केवळ अमृत अटल योजना अथवा भुयारी गटार योजना आम्ही आणली म्हणून प्रसारमाध्यमा

बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून.शेतकर्याना शंभर टक्के ऑग्रीम द्या.विकास गायकवाड

Image
गेवराई प्रतिनिधी सखाराम पोहिकर :-चालू वर्षी पावसाळा संपत आला . असताना सुध्दा सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडला.त्यामुळे शेतकरी बांधवांचे सोयाबीन.कापूस.तुर.व युग.या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी.हवालदिल झाला आहे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुध्दा अत्यंत हलाखीचा विषय झाला आहे 2013-14 च्या दुष्काळापेक्षाही भयंकर परिस्थिती दिसून येत आहे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया.खरात गट.अशी मागणी करत आहे की बीड जिल्ह्यात दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा .व शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई तात्काळ द्यावी व शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करावे .व जनावरांसाठी छावण्या उभ्या करण्यात याव्यात अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट घ्या वतीने करण्यात आली व जर का आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर संविधानिक मार्गाने जिल्ह्यातील सर्व आमदारांना घेराव घालणार व सरकारच्या एकाही मंत्र्याला बीड जिल्ह्यांत फिरू देणार नाही असा ईशारा बीड जिल्हा अध्यक्ष विलास गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे

गेवराईत बलात्कारातील आरोपीला विष पाजून मारले

Image
गेवराईत बलात्कारातील आरोपीला विष पाजून मारले पाच जणाविरूध्द गुन्हा दाखल  गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे:- 8888435869 बलात्कारातील आरोपी पोलीस ठाण्यात हजर होत नसल्याने पीडितेच्या नातेवाईकांनी विष पाजून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना बगेवाडी गेवराई (ता. गेवराई) येथे घडली. याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून दोन जण फरार आहेत. गेवराई तालुक्यातील बगेवाडी येथील गंगा भोसले या तरुणाविरोधात काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र, तो पोलीस ठाण्यात हजर झाला नव्हता. तु पोलिसांत हजर का होत नाही?असे म्हणून पीडितेच्या नातेवाईकांनी दोन दिवसांपूर्वी गंगा भोसले याला बेदम मारहाण करुन त्याला कीटकनाशक पाजले होते.यांनंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते . मात्र, त्याचा मंगळवारी (दि.२६) मृत्यू झाला. या प्रकरणी गंगा भोसले याची पत्नी गंगुबाई भोसले यांनी तलवाडा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून रमेश भाऊराव पवार, कृष्णा उर्फ होड्या चव्हाण, रवी लक्ष्मण शिंदे,

ई - पिक पहाणीची मुदत पुन्हा वाढली, आता करता येणार या तारखेपर्यंत

Image
ई - पिक पहाणीची मुदत पुन्हा वाढली, आता करता येणार या तारखेपर्यंत  शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील ई-पीक पाहणी १०० टक्के पुर्ण करुन घ्यावी - जिल्हाधिकारी मुंडे बीड गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे   बीड जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. या ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून मागील रब्बी हंगामामध्ये बीड जिल्हयातील शेतकऱ्यांनी १०० टक्के ई-पीक पाहणी करुन आपल्या पीकाची नोंदणी करुन शासनाच्या विविधि योजनांचा लाभ घेतला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सुरु असलेल्या खरीप हंगामाची ई-पीक पाहणी देखील आपल्याला १०० टक्के पुर्ण करावयाची आहे. असल्याचे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांनी म्हटले आहे. प्रसिध्दीस दिलेल्या पञकात पुढे म्हटले आहे की, खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई - पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सदरचे ई-पीक पहाणी श

पाटोदा नगरपंचायतच्या गणरायाला वाजत गाजत लाडक्या बाप्पाला निरोप

Image
पाटोदा नगरपंचायतच्या गणरायाला वाजत गाजत लाडक्या बाप्पाला निरोप हलगीच्या निनादावर थिरकले नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव सभापती व नगरसेवक पाटोदा (गणेश शेवाळे ) पाटोदा शहरात परंपरे प्रमाणे नगरपंचायत कार्यालयात गणरायाची स्थापना करण्यात आली होती या गणोशोत्सव निमित्ताने दहा दिवस दररोज नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती व सर्व नगरसेवक यांच्या हास्ते गणरायाची आरती करण्यात येत आसे दहाव्या दिवशी पाटोदा शहरात ढोेल ताशा हालगीच्या गजरात वाजत गाजत शहरात मिरवणुक काढुन यावेळी नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव सभापती व नगरसेवक हलगीच्या निनादावर थिरकले शहरातील नगरपंचायतच्या विहीरीत गणपती बप्पा मोरया या जय घोषणाने गणरायाच्या मुर्तीचे विसर्जन करण्यात आलेे यावेळी नगराध्यक्ष,सभापती, नगरसेवक कर्मचारी,पाटोदा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी साधला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थ्यांनीशी संवाद

Image
गेवराई प्रतिनिधी सखाराम पोहिकर आज दिनांक 29/9/2023 रोजी बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी मुलीशी संवाद साधताना त्या अश्या म्हणाल्या की मुलींनी खुप शिकावे आणि यशाची शिखरे पादाक्रांत करावीत असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी मुलीशी संवाद साधताना आसे आज दिनांक 28/9/2023 गुरूवार रोजी गेवराई जिल्हा बीड येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थ्यांनीशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या व दिनांक 28/9/2023 सप्टेंबर रोजी बीडच्या जिल्हाधिकारी दिपा ताई मुधोळ यांनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला भेट देऊन विविध विभाग.परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले वर्गात जाऊन विद्यार्थ्यांनीशी संवाद साधला विद्यार्थ्यांनीचा दिवसभराचा दिनक्रम आहार व अभ्यास याविषयी माहिती जाणून घेतली विद्यार्थीनीच्या समस्येवर प्रश्न विचारुन अडचणी विचारल्या वस्तीगृहातील स्वयंपाक झाला भेट देऊन कर्मचाऱ्यांशी बोलून आहाराबाबत समाधान व्यक्त केले कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गेवराई चा समावेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत झाला असून राज्यातील एकूण 455 शाळा या योजनेत

परळी येथील राजू जगतकर ची युरोप मधील डेन्मार्क देशात अतिउच्च प्रशिक्षणासाठी निवड

Image
बीड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा परळी येथील राजू जगतकर ची युरोप मधील डेन्मार्क देशात अतिउच्च प्रशिक्षणासाठी निवड बीड - सध्या मुंबई मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापक म्हणून ओळख असलेले आणि परळी बीड जिल्ह्यातील भूमिपुत्र यांची युरोप मधील डनमार्क या अतिप्रगतशील देशांमध्ये मुंबई मेट्रो रेल्वे अंतर्गत 14 ऑक्टोंबर पासून ते 05 नोव्हेंबर या कालावधीसाठी उच्च प्रशिक्षणासाठी राजू श्रावणराव जगतकर यांची निवड करण्यात आली आहे. अशा अतिउच्च प्रशिक्षणासाठी निवड झालेले हे महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील व जिल्ह्यातील एकमेव व्यक्तिमत्व आहे. राजू श्रावणराव जगतकर हे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात जगतकर गल्ली येथे वास्तव्य करतात, संपादक बालाजी जगतकर यांचे ते छोटे बंधू आहेत. यापूर्वीही कॅनडा, ऑस्ट्रेलिया,कतार, अमेरिका या देशांमधील मेट्रो रेल्वे मध्ये चांगल्या पदावर यांची नियुक्ती झाली होती मात्र त्या ठिकाणी न जाता आपलं करिअर हे भारतातच करायचं आणि ते घडवायचं या विचारातून पहिले दिल्ली मेट्रो रेल्वे मध्ये त्या कार्यरत होते त्यानंतर आज ते मुंबई मेट्रो रेल्वे येथील उच्च स्तरावरील मॅनेजर या पदावर

दर्जेदार रस्त्यावर खोदकाम करून विद्रूपीकरण करू नये-नगरसेवक अँड विकास जोगदंड

Image
बीड (प्रतिनिधी ) बीड शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून प्रमुख रस्त्या सह कानकोपऱ्या मध्ये रस्ते व नाली चे कामे झाली आहेत सदरील रस्ते अतिशय प्रशस्त आणि दर्जेदार झाले आहेत या सिमेंट रस्त्यामुळे बीड शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, यांच्या पाठपुराव्यामुळे व योगेश क्षीरसागर यांच्या सहकार्यातून तसेच प्रत्येक प्रभागातील नगरसेवक तसेच स्थानिक नागरिकांच्या मागणी वरून विकास कामे करण्यात आली आहेत रस्त्याचे काम सुरु होण्या पूर्वी नगर परिषद पाणी पुरवठा विभाग, स्वच्छता विभाग आणि नगरसेवक यांनी संयुक्त रित्या नागरिकांशी समन्वय साधून नळ जोडणी वा दुरुस्ती साठी संपर्क साधला नियमाप्रमाणे नळ जोडणे नळदुरुस्ती करण्यात आली  परंतु काही नागरिक नव्याने झालेल्या सिमेंट रस्त्याला ब्रेकर किंवा जेसीबी मशीन ने खोदून विनापरवानगी बेकायदेशीर रित्या खाजगी प्लंबर ला हाताशी धरून नळ जोडणी करून घेत आहेत हा त्यांचा स्वार्थीपणा शहराच्या तसेच प्रभागाच्या विकासात्मक दृष्टीने विनाशक आहे दर्जेदार रस्त्यावर खोदकाम केल्याने त्या रस्त्याचे तसेच संपूर्ण प्रभागाचे विद्रूपीकरण होत

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारतीताई पवार यांच्या हस्ते कळवण येथे सुजज्ज 100 खाटांचे फिल्ड हाॅस्पीटलचे उद्घाटन संपन्न

Image
कळवण येथे केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ.भारतीताई पवार यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय परिसरात बांधलेल्या ई सी आर पी 2 अंतर्गत 100 खाटांचे अद्यावत अश्या फिल्ड हाॅस्पीटलचे उद्घाटन करण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन, आयसीयू बेड आणि लोकांना मदत करण्यासाठी इतर आवश्यक वैद्यकीय उपकरणे,सुसज्ज अत्याधुनिक सुविधा आणि आवश्यक असलेली यंत्रसामुग्री रुग्णालयात उपलब्ध झाली आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गरीबातला गरीब रुग्णाच्या विभागाची व्यवस्थाही वातानुकूलित केली आहे.गरीब, मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत असो सर्वांना उपचार एकाच पद्धतीनं मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे असे डॉ. भारती पवार यांनी सांगितले. यावेळी शंकरराव वाघ,दिपक खैरणार, रमेश थोरात, सुधाकर पगार,विकास देशमुख,निंबा पगार,सुनील पवार ,डॉ. अनिल महाजण, नंदु कुमार खैरणार,सतीश पगार,Sk पगार,संदिप अमृतकार,राजेंद्र ठाकरे,गोविंद कोठावदे, सोनाली जाधव,कुष्णकुमार कांबळसकर,दिपक वेढणे,हेमंत रावले,काशिनाथ गुंजाळ मोतीराम वाघ,दादा मोरे, दिनकर आहेर,प्रकाश कडवे,मोहन चौधरी,भूषण देशमुख,चेतन निकम,गौरव पाटील,सुनिल खैरणार,प्रभाकर निकम,बबन वाघ, मनोहर बोरस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाच्या प्रगतीसाठी कायम दिशादर्शक :- डॉ भारती पवार

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाच्या प्रगतीसाठी कायम दिशादर्शक :- डॉ भारती पवार डॉ भारती पवार यांचे हस्ते बौद्धविहार, रस्ता काँक्रेटीकरण व गटारीच्या कामाचे भूमिपूजन  शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या संदेशाचे अनुकरण करून मी माझ्या जीवनात सर्वसामान्य जनतेसाठी शेवटपर्यंत काम करीत राहील असे प्रितपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले. कळवण नगर पंचायत प्रभाग क्रमांक ९ मध्ये विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांच्या निधीतून बौद्धविहारासाठी नगरसेविका भाग्यश्री शिरोडे यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून ५० लक्ष रुपयांचा निधी तर नगरसेविका भारती पगार यांनी प्रभाग क्रमांक १५ मधील रस्ता काँक्रेटीकरण व गटारीसाठी ४० लाख रुपये मंजूर करून घेतला आहे. या कामाचे भूमिपूजन डॉ पवार यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष कौतिक पगार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष तेजस पगार, नगरसेविका भारती पगार, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, या प्रसंगी

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारतीताई पवार यांच्या हस्ते वणी येथे २० खाटांचे फिल्ड हाॅस्पीटलचे उद्घाटन संपन्न

Image
वणी येथे केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ.भारतीताई पवार यांच्या हस्ते वणी ग्रामीण रुग्णालय परिसरात बांधलेल्या ई सी आर पी 2 अंतर्गत २० खाटांचे अद्यावत अश्या फिल्ड हाॅस्पीटलचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालयातील प्रसुती गृहाचे नूतनीकरण, सर्व सामान्य कक्षाचे नूतनीकरणाचे उद्घाटन यावेळी डाॅ भारतीताई पवार यांच्या कडून करण्यात आले. या वेळी बोलतांना सांगितले की काळा नुसार आपण आरोग्य सेवेत बदल घडवून आणत आहेत. प्रत्येक ठिकाणी आरोग्य सुविधा वाढविण्याचे काम करत आहे.या ठिकाणी सुविधा पुरवण्या साठी काही पदांची आवश्यकता आहे.त्या नुसार राज्य शासनाला प्रस्ताव देऊन पद निर्माण होतील अत्यावश्यक असलेली गरज या नविन फिल्ड हाॅस्पीटलच्या माध्यमातून होत असल्याने याचा फायदा निश्चित होईल असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डाॅ.भारतीताई पवार यांनी केले. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ.अशोक थोरात, वणी ग्रामिण रुग्णालयाचे डाॅ.बी एन मोरे,सरपंच मधुकर भरसठ, उपसरपंच विलास कड,भाजपा पदाधिकारी सुनिल पवार, महेंद्र पारख, मयुर जैन, कुंदन जावरे ग्रा.सदस्य रंजना पाडवी,राकेश थोरात, विजय बर्डे ,किरण गांगुर्

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील गरजू महिलांना निर्धुर चुल वाटप कार्यक्रमाचे आयोजन

Image
आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील गरजू महिलांना निर्धुर चुल वाटप कार्यक्रमाचे आयोजन   तब्बल २ हजार लाभार्थी महिलांना निर्धुर चुलीचा होणार फायदा बीड जिल्हा ( प़तिनिधी --गोरख मोरे ) :    कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघासह परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अशातच 'शाश्वत जगाची निर्मिती' या प्रकल्पांतर्गत कर्जत व जामखेड तालुक्यातील गरजू महिलांना निर्धुर चूल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत कर्जत व जामखेड मधील दोन हजाराहून अधिक ग्रामीण भागातील गरजू महिलांना निर्धूर चुलीचे वाटप करण्यात आले.    आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयआय केअर फाउंडेशन व कॅपजेमिनी यांच्या मदतीने आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून 'शाश्वत जगाची निर्मिती' या प्रकल्पाअंतर्गत गरजू महिलांना दोन्ही तालुक्यात स्वतंत्रपणे कार्यक्रम ठेवून निर्धूर चुलीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार, सौ.सुनंदाताई पवार यांच्यासह प्रमुख उपस्थिती म्हणून आय.आय केअर फा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची नियुक्ती

Image
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची नियुक्ती समीर भुजबळ मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार समीर भुजबळ व्हिजन असलेलं अनुभवी नेतृत्व - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुंबई शहराला समीर भुजबळ यांच्यासारखं युवा नेतृत्व मिळाल्याने अनेक दिवसांची पक्षाची पोकळी भरून निघाली - राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.प्रफुल्ल पटेल माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संघटन कौशल्याचा पक्ष वाढीस अधिक फायदा होईल - प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक उभारी घेईल - मंत्री छगन भुजबळ मुंबई,नाशिक,दि.२७ सप्टेंबर :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेत मंत्री छगन भुजबळ यांचे मोठ योगदान आहे. त्याचप्रमाणे पक्षाच्या सर्व कामाची जबाबदारी बॅकस्टेजला राहून समीर भुजबळ यांनी पार पाडली. आज मुंबई अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली असून या पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केला

पंडित जवाहरलाल नेहरू ज्युनियर कॉलेज चा सुनिल जालिंदर पोकळे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत चमकला

Image
पंडित जवाहरलाल नेहरू ज्युनियर कॉलेज चा सुनिल जालिंदर पोकळे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत चमकला  राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत तिसरा क्रमांक  आष्टी ( प्रतिनिधी --गोरख मोरे ) :    आष्टी आष्टी येथील पंडीत जवाहरलाल नेहरू ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी सुनिल जालिंदर पोकळे याने कोल्हापूर येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा - २०३३ कोल्हापूर जिल्हयातील साने गुरुजी विद्यालय कुरुदंड येथे नुकतीच पार पडली. या कुस्ती स्पर्धेत आष्टी येथील पंडीत जवाहरलाल नेहरू ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी सुनिल जालिंदर पोकळे याने १७ वर्ष वयोगट व ९२ कि. वजनगट फ्रिस्टाईल मध्ये सहभागी होऊन राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.   सुनिल जालिंदर पोकळे ला बालपनापासून कुस्तीचे धडे वडील जालींदर पोकळे यांच्याकडून मिळालेले आहेत. सुनिल जालिंदर पोकळे च्या कुस्ती विषयी आकर्षणामुळे त्यांनी त्याला महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सरावासाठी बालाजी कुस्ती संकुलात पाठवले. सईद चाऊस सर यांनी सराव करून घेतला. सुनिल जालिंदर पोकळे ची नु

सयाजी शिंदे यांच्या 'आधारवड' चित्रपटाचं वर्ल्ड डिजिटल प्रीमियर 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर

Image
मुंबई : जीवनाला कलाटणी देणाऱ्या ‘आधारवड’ चित्रपटाचा २ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. सुरेश शंकर झाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटात सयाजी शिंदे, शक्ती कपूर, राखी सावंत, रोहित हंचाटे आणि अतुल परचुरे हे नामवंत कलाकार दिसणार आहेत.  चित्रपटाची कथा श्रवण आणि त्याच्या प्रतिभावंत आयुष्याभोवती फिरते. श्रवणच्या आयुष्यात घडलेली एक भावनाविवश करणारी घटना त्याच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देऊन जाते. श्रवणचा जीवनप्रवास प्रत्येकासाठी एक प्रेरणा असून विचार करायला लावणारा आहे.  “आजच्या तरुणांना आपल्या पालकांचे महत्त्व सांगण्यासाठी आणि आपल्या पालकांप्रती आदर कमी होऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी ‘आधारवड’ हा चित्रपट आजच्या तरुण वर्गाने आवर्जून पाहायला हवं.” असे अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.इ.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले. अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या. जीवनाला कलाटणी देणाऱ्या वास्तवदर्शी भावनाविवश कथा सांगणाऱ्या ‘आधारवड’ चित्रपटासोबतच झकास मनोरंजन, सदाबहार एकापेक्षा एक क

‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेला युरोप भेटीचे निमंत्रण!

Image
युरोपियन देशांतील लोकांना भारतातील नैसर्गिक संपत्ती, मसाल्यातील व्यंजनांसोबत येथील संस्कृती परंपरेने मोहिनी घातली आणि त्या चिजांच्या अमाप लुटीसोबत १९० वर्षांचे पारतंत्र्यरुपी जीवन हिंदुस्तानींवर लादत राज्य केले. आता याच युरोपियांना पुन्हा एका कारणासाठी हिंदुस्तानातील महाराष्ट्राची भुरळ पडली आहे..!.. मात्र ती भारतावर राज्य करण्याची नाही तर आपल्या एका तरुणाला भेटण्याची!... त्या उमद्या मराठमोळ्या तरुणाचे नाव ‘मोऱ्या’ उर्फ ‘सीताराम जेधे’ असे असून तो मराठवाडा - खानदेश - पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या मध्यावर जोडणाऱ्या 'पिंपळनेर'चा रहिवाशी असल्याचे समजते. खास युरोपीय देशांनी आमंत्रण धाडल्याने मोऱ्या आणि त्याचा परिवार भलताच खुश झाला आहे. येत्या १ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘मोऱ्या’ योरोपीन देशांचा दौरा करणार असल्याचे समजते आहे. त्याच्यासोबत जेधे परिवारातील कोण कोण सदस्य जाणार हे स्पष्ट झाले नसले तरी त्याच्यासोबतच कुटुंबीयांचीहि ‘व्हिजा’साठी लगबग सुरु आहे. हा 'मोऱ्या' नेमका कोण आहे?, तो काय करतो?, तो कुठे?, कुठे?, कश्यासाठी? कोणाकडे? जातोय याबद्दल विशेष गुप्तता जेधे परिवा

कामगारांना न्याय दिला नाही तर मंत्रालयाला धडक देऊ रोजंदारी मजदूर सेनेचा इशारा.

Image
परळी ( प्रतिनिधी ) कंत्राटी रोजंदारी सफाई कामगारांसह इतर कामगारांच्या प्रलंबित प्रमुख ०६ मागण्या असून त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. कंत्राटी / रोजंदारी कामगार मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी बीड दीपा मुधोळ - मुंडे यांनी लवकरात लवकर विचार करून न्याय द्यावा.अन्यथा १५ दिवसानंतर मंत्रालयाला धडक देऊ ! असा इशारा रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव तथा वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष भाई गौतम आगळे सर यांनी दिला आहे.       बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद / नगरपंचायत आस्थापनेतील कंत्राटी / रोजंदारी कामगारांना शासनाने निश्चित केलेले कामगार कायदे, शासन परिपत्रक,शासन निर्णय व मा. न्यायालयाचे आदेश या पार्श्वभूमीवर रोजंदारी मजूर सेना पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद /नगरपंचायत, सरकारी कामगार अधिकारी बीड यांची संयुक्त बैठक दिनांक २६ / ०९ / २०२३ रोजी दुपारी ०४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे बोलावली होती, ती बैठक तब्बल तीन तास उशिराने सुरू झाली. यावेळी मागील सात वर्षांपासून कामगारांच्या मूलभूत प्रश्नावर संघटनेच्या वतीने लढा चालू आहे. कामगारांना किमान वे

२८ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस कागदोपत्रीच साजरा करु नये:- डॉ.गणेश ढवळे

Image
  बीड:- २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन माहिती अधिकार अधिनियम कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती, विविध उपक्रम राबवत जास्तीत जास्त नागरीकांमध्ये माहिती अधिकार कायद्याविषयी जनजागृती करुन साजरा करण्यात यावा केवळ कागदोपत्रीच साजरा करण्यात येऊ नये तसेच माहिती अधिकार दिवस साजरा न करणा-या शासकीय कार्यालयावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद, मुख्याधिकारी नगरपरीषद बीड यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.  सविस्तर माहितीस्तव -----  शासन निर्णय क्रमांक केमाअ /२००८ /प्र.क्र.३७८/सहा दि.२० सप्टेंबर २००८ अन्वये दि.२८ सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी " आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन" म्हणून साजरा करण्याचे शासन आदेश आहेत.यादिवशी माहिती अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती , विविध दृकश्राव्य माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देऊन व

मालेगांव शहरातील सुरु असलेल्या सर्व स्तरावचे कोचिंग क्लासेवर कार्यवाही करावी -आकाश सुरवाडे

Image
मालेगांव प्रतिनिधी :  मालेगांव शहरातील सुरु असलेल्या सर्व स्तरावचे कोचिंग क्लासेवर कार्यवाही करावी अशी मागणी परिवर्तन विद्यार्थी कृती समिती चे अध्यक्ष आकाश सुरवाडे यांनी अपर जिल्हाधिकारी मालेगांव यांच्या कडे निवेदनाद्वारे केली निवेदनाचा विषय असा की मालेगांव शहरातीलत मोठ्या प्रमाणात कोचिंग क्लासेस चालु असुन सदर क्लासेस मार्फत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक वर्गाची आर्थिक लुट केली जात आहे  या क्लासेस च्या संचालकानकडुन शिक्षणाचे बाजारीकरण होत असुन , या संदर्भात म.न पा .मालेगांव शिक्षण मंडळ जा.क्र./३३८/२०२१ दि.२३/८/२०२१आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक)नाशिक यांचे पत्र जा.क्र.१०/२०२१,दि.५/१०/२०२ यावरुन असे निदर्शनात येते कि शहरातील सुरु असलेले क्लासेस हे कुठल्याचं प्रकारचे नोंदणीकृत नाही  वास्तव्यात क्लासेस मध्ये क्षमते पेक्षा जास्त विद्यार्थी बसवतात महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांचा जिवांशी सदर संचालक खेळत आहेत ,क्लासेस मध्ये अग्निशमक यंत्रणा नाही  याचे महत्वाचे उदाहरण म्हणजे सुरत व दिल्ली परिसरातील क्लासेस ला आग लागल्याने

प्रबळ पक्षाची उमेदवारी मिळाली तर महेश दाभाडे करिष्मा करतील

Image
महेश दाभाडे यांची विधानसभेची घोषणा आ. लक्ष्मण पवार यांना धोक्याची घंटा प्रबळ पक्षाची उमेदवारी मिळाली तर महेश दाभाडे करिष्मा करतील  गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 8888435869 गेवराई विधानसभा मतदार संघात पंडित पवार यांचे निर्वीवादीत वर्चस्व राहिले आहे यांना अत्तापर्यंत चौथा तगडा उमेदवार नव्हता परंतू गेवराईचे माजी नगरअध्यक्ष महेश दाभाडे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे  संकेत दर्शविले आहेत तसेच त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा शरद पवार यांची भेट घेतली व बॅकफूटवर  गेलेले महेश दाभाडे पुन्हा चर्चेत आले आहे . याबाबद सविस्तर माहिती अशी की , मराठा महासंघातून सामाजिक चळवळीतून महेश दाभाडे हे नेतृव उदायास आले गेवराई नगर परिषदेत निवडणूकीत हॅट्रिक करूण ते उपनगरअध्यक्ष ते नगर अध्यक्ष  त्यांचा प्रवास राहिलेला आहे तसेच चकलांबा जिल्हा परिषद गटातून त्यांनी निवडणूक लढवली परंतू त्यांचा पराभव झाला. असा महेश दाभाडे यांचा राजकीय खडतर प्रवास आहे . परंतू गेवराई विधानसभेचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्या गटातील कोरकमिटीतील महेश दाभाडे यांची याठिकाणी मदभेद झाले तिन वर्षापासुन ते पक्षा

3 फुटांपेक्षा कमी उंचीच्या श्रींची मुर्ती नगर परिषदेकडे जमा करा

Image
3 फुटांपेक्षा कमी उंचीच्या श्रींची मुर्ती नगर परिषदेकडे जमा करा सार्वजनिक गणेश मंडळांनी त्यांच्या मुर्ती बोरना प्रकल्पात विसर्जित कराव्यात मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, तहसीलदार गोविंद पेदेवाड, पोलिस निरीक्षक सानप, चाऊस,कदम यांचे आवाहन परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :- शहर आणि परिसरात पाऊस कमी झाल्याने श्रींच्या विसर्जनासाठी असलेल्या हरिहर तिर्थामध्ये पाणी नाही. त्यामुळे प्रशासनाने उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांच्या सुचनेवरून गणेश विसर्जनाचे नियोजन केले आहे. 3 फुटांपेक्षा कमी उंचीच्या श्रींची मुर्ती नगर परिषदेकडे जमा करायच्या आहेत तर सार्वजनिक मंडळांनी त्यांच्या मुर्ती नंदनज येथील बोरना तलावात विसर्जित कराव्यात असे पालिकेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, तहसीलदार गोविंद पेदेवाड, पोलिस निरीक्षक रवि सानप (परळी शहर पोलीस स्टेशन) , सलीम चाऊस (संभाजीनगर पोलीस स्टेशन) आणि हेमंत कदम (परळी ग्रामीण पोलीस स्टेशन) यांनी केले आहे.          यावर्षी परळी शहर व परिसरात परिसरात अतिशय कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रतिवर्षी ज्या हरिहर तिर्थामध्ये श्रींच्या मुर्तींचे विसर्जन केले जाते ते त्या तिर्थात

मौजे धानोरा येथे मा, शिवराजे ग्रुप /मा, हिंदवी स्वराज्य ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवा निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

Image
आष्टी ( प्रतिनिधी- गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथे मा. शिवराजे ग्रुप /मा. हिंदवी स्वराज्य ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवा निमित्त आज २६ सप्टेंबर २०२३ मंगळवार रोजी जनता विद्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . सदर शिबिर सकाळी १० ते ५ या वेळात संपन्न झाले .    या रक्तदान शिबिरामध्ये ५० नव तरुणांनी रक्तदान केले . सदर मा. शिवराजे ग्रुप/मा. हिंदवी स्वराज्य ग्रुप अनेक वर्षापासून गणेश उत्सव कालावधीमध्ये सामाजिक उपक्रम राबवत असून , इतर खर्चाला फाटा देत समाज उपयोगी कार्यक्रम राबवत आहेत .   या रक्तदान शिबिर प्रसंगी मा. शिवराजे ग्रुप /मा. हिंदवी स्वराज्य ग्रुप - या दोन्ही ग्रुपचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , व सर्व सदस्य याप्रसंगी सहभागी झाले होते .   गणेश उत्सव काळामध्ये इतर खर्चाला फाटा देऊन समाज उपयोगी उपक्रम राबवावेत , असे आवाहन जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक / प्राचार्य श्री . गव्हाणे. यु .आर सर यांनी रक्तदान शिबिर प्रसंगी बोलताना सांगितले . तालुक्यातील प्रत्येक गावातील गणेश मंडळांनी मा. शिवराजे ग्रुप /मा. हिंदवी स्वराज्य ग्रुप या गणे

मराठा समाजाचे मनोज जरागे पाटील यांचे गढी येथे ग्रामस्थांनी केले जंगी स्वागत

Image
गेवराई प्रतिनिधी सखाराम पोहिकर  :-गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथे आज सकाळी 11-00 वाजता महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाचे नेते मनोज जरागे पाटील यांचे गढी गावात आगमन होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले व मनोज जरागे पाटील यांनी गढी येथील ग्रामस्थांना मराठा समाजापुढे मराठा आरक्षणासाठीची पुढची दिशा आणि दशा कशी आहे हे मराठा समाजापुढे आपले विचार व्यक्त करताना असे ते म्हणाले यावेळी गढी गावातील महिला व पुरुष मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गढी गावातील युवकांनी खूप सहकार्य केले या वेळी युवकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत मनोज जरागे पाटील यांचे स्वागत करण्यात आले

पत्रकार सुरक्षा समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी रोहित धुरंधरे यांची निवड

Image
बीड ( प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी त्यांच्या न्याय- हक्कांसाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलने, उपोषण, निवेदन तसेच राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न देखील राज्य सरकार कढून सोडवले आहेत परंतु जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे राज्यात काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन उपोषण निवेदन व पत्रव्यवहार कर

महंत तुकाराम महाराज भारती यांच्या नियोजनातून विराट सोहळा संपन्न

Image
संत ईश्वर भारती बाबांनी हरी भजनातून जग धवळून काढले - महंत शिवाजी महाराज नारायणगडक महंत तुकाराम महाराज भारती यांच्या नियोजनातून विराट सोहळा संपन्न  संत ईश्वर भारती महाराज जयंती ८३ पुण्यतिथी संपन्न.. बीड - दि २५ (प्रतिनिधी ) संत ईश्वर भारती बाबांनी हरी भजनातून जग ढवळून काढले. जनसामान्यांच्या उद्धार करण्यासाठीच संत ईश्वर भारती महाराजांचा जन्म झाला असे प्रतिपादन श्री ह भ प महंत शिवाजी महाराज नारायणगडकर यांनी केले. ईश्वर भारती महाराज यांच्या ८३ व्यां पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रीक्षेत्र बेलेश्वर येथे आयोजित काल्याचे कीर्तन पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, महंत महादेव आनंद भारती, महंत तुकाराम महाराज भारती ,महंत हरिहर महाराज भारती, शिवाजी महाराज येवले,हनुमान टेकडी महाराज, मारोती महाराज चोरमले, प्रा नाना महाराज कदम,सिद्धश्वर महाराज बागलांने, ओमकार महाराज कागदे, जनार्दन महाराज बांगर, रंजीत महाराज शिंदे योगेश महाराज जोगदंड सुरेश महाराज जाधव लोखंडे महाराज यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सारिका क्षीरसाग