Posts

Showing posts from August, 2023

नालंदा फाउंडेशन बीड यांच्या वतीने कवी प्रा.सागर जाधव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

Image
वामनदादाच्या चळवळीतील शिलेदार महादेव सातोबा गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार बीड(प्रतिनिधी ):- नालंदा फाउंडेशन बीड यांच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती निमित्त बीड शहरामध्ये २७ ऑगस्ट रोजी "भीम वाणी, वामन गाणी" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कवी प्रा. डॉ.सागर जाधव यांना नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे यांच्या हस्ते रोख रक्कम २५ हजार रुपये, स्मृति चिन्ह, माणपत्र देऊन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच वामनदादा कर्डक यांच्या चळवळीतील शिलेदार महादेव सतोबा गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संदीप उपरे ( राज्याध्यक्ष,सत्यशोधक ओबीसी परिषदेच,महाराष्ट्र राज्य), सुधाकर बनाटे (माजी शिक्षण उपसंचालक), वामनदादा कर्डक यांचे अंगरक्षक डी.पी.वानखडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अशोक वामनराव धुलधुले, प्राचार्य डॉ. केशव जोंधळे, प्रा. दिपक जमधाडे कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मानपत्राचे वाचन प्रो.डॉ.मनोहर सिरसाट यांनी केले. नालंदा फाउंडेशन बीड

अपघाती रुग्णांसाठी वरदान ठरत आहेत डॉ विशाल पिंगळकर

Image
विश्व हॉस्पिटलमध्ये शेकडो यशस्वी शस्त्रक्रिया प्रतिनिधी बीड मेंदू मनका आणि नसाच्या आजारावर पोषक उपचारासाठी प्रसिद्ध असलेले बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन मेंदू,मनका,मान आणि अपघातामध्ये डोक्याला लागलेल्या माराला, हातापायाला झालेल्या जखमेला ,आणि शरीरातील नसाच्या विविध आजारावर अगदी रुग्णाला समजेल अशा सुटसुटीत भाषेत उपचार आणि मार्गदर्शन करणारे "विश्व न्यूरो स्पाईन सर्जिकल सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल बीड" येथील न्यूरोसर्जन डॉ विशाल पिंगळकर हे अपघातातील रुग्णांसाठी एक वरदान ठरत असल्याची भावना सामान्य रुग्णांमधून येत आहे. रस्त्यावरील अपघातामध्ये डोक्याला मार लागलेल्या रुग्णांसाठी हातापायाला इजा,मणक्याचे दुखणे पॅरालिसीस, चक्कर येणे,विसर पडणे तसेच "नसा" वरील अनेक जुनाट आजारावर अल्प दरामध्ये उपचार विश्व हॉस्पिटलमध्ये केले जातात. तरीही बीड जिल्ह्यातील रुग्णांनी उपचारासाठी व डॉक्टरांना भेटण्यासाठी विश्व हॉस्पिटल ला 02442-295151,8208952442 संपर्क करून एक वेळ अवश्य भेट द्यावी.अशी माहिती विश्व हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली.

कोरडा दुष्काळ जाहीर करा, अग्रीम पिकविमा सरसकट द्या, मुख्यमंत्री,कृषीमंत्र्यांना निवेदन

Image
कोरडा दुष्काळ जाहीर करा, अग्रीम पिकविमा सरसकट द्या, मुख्यमंत्री,कृषीमंत्र्यांना निवेदन:- डॉ.गणेश ढवळे  बीड:- कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसेच सोयाबीन, उडीद आणि मुग यांच्या सह ईतर पिकांनाही अग्रीम पिकविमा देण्यात यावा या प्रमुख मागणीसह प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम २०२३ अंतर्गत जिल्ह्यातील मंडळांना सरसकट अग्रीम पिकविमा देण्यात यावा. बीड जिल्ह्यातील वगळण्यात आलेली बीड तालुक्यातील म्हाळसजवळा पाली,नाळवंडी आणि शिरूर तालुक्यातील खालापुरी, पाडळी,खोकरमोह, आदि.मंडळांना अग्रीम पिकविम्याचा लाभ देण्यात यावा या मागण्यांचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,शेख युनुस, रामनाथ खोड यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, कृषीमंत्री,कृषी आयुक्त यांना दिले असुन आंदोलनाचा इशारा दिला आहे. सविस्तर माहितीस्तव कोरडा दुष्काळ जाहीर करुन सरसकट दुष्काळी अनुदान देण्यात यावे. -----  पावसाळा सुरू होऊन ३ महिन्यांचा कालावधी लोटला असुन ९१ दिवसात केवळ २१ दिवस काही ठिकाणी रीमझिम पाऊस पडला असुन ७० दिवस कोरडे गेले आहेत.यामुळे पिकांची गंभीर परिस्थिती निर्माण झाली अ

श्री संत भगवानबाबांच्या १२७ व्या जन्मोत्सव सोहळ्याची सावरगावघाटात जय्यत तयारी

Image
श्री संत भगवानबाबांच्या १२७ व्या जन्मोत्सव सोहळ्याची सावरगावघाटात जय्यत तयारी    ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन; राजकीय नेत्यांची उपस्थिती.. जय जवान ग़ुप   बीड जिल्हा ( प़तिनिधी --गोरख मोरे ) :  राष्ट्रसंत भगवान बाबांच्या १२७ व्या जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी त्यांचे पावन जन्मस्थळ श्रीक्षेत्र सावरगाव घाट येथे होत असून जय जवान ग्रुपच्या माध्यमातून आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.   सोमवार ४ सप्टेंबर २०२३ रोजी हा सोहळा संपन्न होत असून, रविवार ३ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी दोन ते तीन यावेळेत ह भ प महंत पांडुरंग महाराज (डोंगरेश्वर संस्थान करंजवण) यांच्या शुभ हस्ते कलश पूजन व प्रवचन होणार आहे. तसेच श्री संत भगवान बाबा यांच्या १२७ जन्म महोत्सवा सुहास सन २०२३ निमित्त आयोजित सन्मान ज्ञान स्पर्धा पहिला गटाच्या चौथी ते सातवी मधून प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक तसेच दुसरा गट आठ ते बारा गेल्या १२६ व्या जन्मोत्सवापासून ते १२७ वा जन्मोत्सवापर्यंत सावरगाव घाट मधून नोकरीला लागलेल्या चा सन्मानचिन्ह देऊन गौरव वितरण जय जवान ग्रुप च्या वतीने देण्यात य

एकल महिला संघटना बीड तालुका समितीची निवड

Image
बीड प्रतिनिधी - शासकीय विश्रामगृह बीड येथे तालुकासमिती निवड करण्यात आली तर या समीतीच्या बीड तालुका अध्यक्ष शिल्पाताई पंडित,  उपाध्यक्ष शितलताई भोईटे,  सचिव कौशल्या कळसुले, खजिनदार पूजाताई काळे,   सदस्य संगीता धवन,  सत्यभामा वायभट, हमीदा सय्यद,  सुलोचना शिंदे,शहनाज सय्यद यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच कोरोचे राम शेळके उपस्थित सर्व लीडर्सना समितीच्या कार्याची माहिती दिली व तसेच सर्वांनी जबाबदारी पार पाडू सहमती दिली दर महिन्याच्या चार तारखेला बैठक करण्याचे ठरवण्यात आले. यासाठी गावातील गाव शाखेच्या 21 लीडर्स उपस्थित होत्या.

नवनाथ अण्णा शिराळे यांना मातृ शोक,मथुराबाई मोतीराम शिराळे यांचे दुःखद निधन

Image
बीड :- मथुराबाई मोतीराम शिराळे यांचे( वय 92 ) गुरुवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी ९: ३० वा रात्री वृद्धापकाळाने बीड येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. भाजपाचे जिल्हा सचिव नवनाथ अण्णा शिराळे यांचे मातोश्री त्या होत. मथुराबाई मोतीराम शिराळे (वय ९२) यांचे गुरुवार (३१ ऑगस्ट रोजी) रात्री ९:३० वॉ वृद्धापकाळाने बीड येथील राहत्या घरी निधन झाले. शनिवार दि०१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वॉ . त्यांच्या पार्थिवावर शिराळे नगर,जुना धानोरा रोड बीड येथील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले नवनाथ मोतीराम शिराळे, गोरख मोतीराम शिराळे , एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

पर्यावरणरक्षक वनराईच्या टीमचे शेरी बु !! ग्रामपंचायत च्या वतीने स्वागत

Image
कडा / राजू म्हस्के: -पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांनी पर्यावरण रक्षणासाठी वनराई संस्थेची स्थापना केली. 'खेड्याकडे चला' या महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन व स्वराज्य संकल्पनेतुन डॉ.मोहन धारिया यांनी सन १० जुलै, १९८६ रोजी सार्वजनिक विश्‍वस्त कायद्यांतर्गत वनराई या संस्थेची स्थापना केली. राज्यातील प्रत्येक गावागावात ,वाडी वस्तीवर, शेताच्या बांधावर जाऊन मृदा-जल-वन संवर्धन वनीकरण, वृक्ष लागवड करणे, वृक्षतोडीला आळा घालणे, वनसंवर्धना विषयी जनजागृती करून ‘वनराई’च्या माध्यमातून कार्यक्रम राबवले जाऊ लागले. संस्थेने नंतर वनीकरणाबरोबर जलसंवर्धन आणि मृदासंवर्धनाचे कार्य हाती घेतले हाच मूलमंत्र घेऊन वनराईच्या या संकल्पनेला प्रेरित होऊन आष्टी तालुक्यातील शेरी बु /खकळवाडी गावचे सरपंच संदिप खकाळ यांनी एल. टी. टी. एस व वनराई माध्यमातून गावाच्या विकासासाठी गावातील जेष्ठ व अनुभवी नागरिकांना व तरुणांना सोबत घेऊन आज शेरी बु येथे वनराई संस्था एकात्मिक ग्राम विकास प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने पाणी आडवा पाणी जिरवा ह्या मूलमंत्राचा ध्यास घेऊन वनीकरण, मृद जल संवर्धन , रोजगार , व

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून उद्या गेवराई शहर बंदची हाक

Image
 गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे :- दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षण मागणीसाठी शहागड येथील पैठण फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विराट जण आक्रोश आंदोलन संपन्न झाले. मात्र यानंतरही सरकारने कुठलाच निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंबड तालुक्यातील अंतरवली साराटी येथे आमरण उपोषण सुरू केले असून या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या दि. 01 सप्टेंबर रोजी गेवराई शहर बंद ची हाक देण्यात आली आहे. आज दि.31 रोजी 11 वा.शहरातील बेदरे लॉन्स येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वानुमते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन देऊन गेवराई बंद ची हाक देण्यात आली. या आवाहनाला व्यापारी महासंघानेही पाठिंबा दिला आहे.

बीडच्या मागासलेपणाचं खापर शरद पवार यांच्या माथी कसं काय फोडता ?-एस एम देशमुख

Image
 बीड जिल्हा  ( प़तीनिधी --गोरख मोरे   ) :    राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी परवा बीडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अर्धा डझन मंत्री बीडमध्ये होते.. शरद पवार यांनी घेतलेल्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा आहे म्हटल्यावर वक्त्यांनी अपयशाचं आणि सर्व पापाचं खापर शरद पवार यांच्या माथी फोडत त्यांना नाकर्ते ठरविलं. धनंजय मुंडे यांनी "शरद पवार यांनी बीडसाठी काहीच केलं नाही" असं सांगत बीडकरांची सहानुभूती आपल्या बाजुनं वळविण्याचा प्रयत्न केला.. छगन भुजबळ यांनी शरद पवार यांनी आपल्याला राजीनामा द्यायला लावून आपल्यावर कसा अन्याय केला याचा पाढा वाचला.. स्वत: अजित पवार यांनी  राष्ट्रवादीला मुख्यमंत्री होण्याची संधी आली होती पण ती कशी सोडली गेली याची कथा ऐकविली.. इतरंही नेते बरंच बोलले.. अजित पवार यांच्याशी निष्ठा दाखविण्यासाठी शरद पवारांबद्दल हा कडवेपणा दाखवणं आवश्यक होतं..    शरद पवारांबद्दल कोणी काय बोलावं हा माझा आजचा मुद्दा हा नाही.. मुद्दा बीडच्या विकासाचा आहे..बीडचा विकास न होण्याचं खापर धनुभाऊ शरद पवार यांच्याव

पाटोदा तालुका तात्काळ दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा - पांडुरंग नागरगोजे

Image
पाटोदा (गणेश शेवाळे )पाटोदा तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यात यावा या मागणीचे निवेदन पाटोदा तहसील कार्यालयात देण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की यंदाचा खरीप हंगामातील सर्व पिके पाणी नसल्याने पुर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. पाटोदा तालुक्यातील कोणत्याही गाव तलाव अथवा पाजर तलावामध्ये पाणीसाठा शून्य टक्के असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे अशातच महावितरण कंपनीने लोड शेडींगच्या नावाखाली विद्युत कंपनी लाईट बंद करून शेतकऱ्यांची कुचंबना करत आहे यामुळे शासनाने पाटोदा तालुक्यात पाऊस न पडल्याने शेतकरी राजा हवाल दिल झाला असल्यामुळे पाटोदा तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करुन सरसकट शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान देण्यात यावा तालुक्यातील सर्वांना स्वस्त धान्य दुकानात मोफत रेशन व गॅस देऊन मजूर ऊसतोड कामगाराना दुष्काळी कामे उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीचे निवेदन पाटोदा तहसील कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा पाटोदा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे यांनी दिले यावेळी नगरसेवक सुशील कवठेकर,अनिल जायभाय, शाम हुले,सरपंच तात्या

खोट्या बातम्या पसरवणाऱ्यानी पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

Image
मुंबई - वंचित बहुजन आघाडीला INDIA अलायन्सच्या बैठकीचं निमंत्रण आलेलं नाही. निमंत्रण नसल्यामुळे आम्ही बैठकीत सहभागी होऊ शकत नाही, हे पक्षाच्यावतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मात्र तरीसुद्धा काही माध्यमे सतत संभ्रम निर्माण करणाऱ्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीमध्ये वंचित बहुजन आघाडीने इंडिया अलायन्सच्या बैठकीकडे पाठ फिरवली अशी बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र त्या बातमीत इंडिया अलायन्सच्यावतीने वंचित बहुजन आघाडीला बैठकीचं निमंत्रणच देण्यात आलेलं नाही, याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही.  त्यामुळे आम्ही सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात खोट्या बातम्या देणं तात्काळ बंद करा. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याऐवजी जी वस्तुस्थिती आहे त्या संदर्भात बातम्या द्याव्यात. आता जनता शहाणी झाली आहे, तुमच्या फेक बातम्यांना बळी पडणार नाहीये. राजकीय पक्षांची किंवा राजकीय नेत्यांची दलाली करणे बंद करावे.  वंचित बहुजन आघाडीला बैठकीचे निमंत्रण दिले असल्याच्या खोट्या बातम्या पेरणाऱ्यांना आम्ही आवाहन करतो की, जर असे निमंत्रण पाठवले असेल, तर इंडिया अलाय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कडा येथील कार्यक्रमाला येण्याचे जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ -मुंडे यांना निमंत्रण

Image
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कडा येथील कार्यक्रमाला येण्याचे जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ -मुंडे यांना निमंत्रण   १०० सेवानिवृत्त शिक्षकांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणार सन्मान आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) : बीड जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ-मुंडे यांची संयोजक बूथ रचना -- मन की बात बीड जिल्हा शंकर देशमुख यांनी भेट घेऊन रविवार दि २४ सप्टेबर रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात आष्टी तालुक्यातील कडा येथे कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण देण्यात आले.    या प्रसंगी कडा व परिसरातील १०० सेवा निवृत्त शिक्षकांचा सन्मान जिल्हाधिकारी यांचे हस्ते केला जाणार असुन ज्या शिक्षकवृदांनी जीवनभर ज्ञानदानाचे काम केले , त्या सर्वांचा सत्कार करण्याची इच्छा होती . मा. बीड जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ --मुंडे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले , या प्रसंगी भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे उपस्थित होते .

आष्टी तालुक्यात दुष्काळी उपाययोजना राबवा- शिवसंग्रामचे ज्ञानदेव थोरवे यांची मागणी

Image
दुष्काळात तेरावा महिना !  आष्टी तालुक्यात दुष्काळी उपाययोजना राबवा- शिवसंग्रामचे ज्ञानदेव थोरवे यांची मागणी   आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :    पावसाच्या सुरुवातीला हवामान खात्याने यंदाच्या पावसावर अलनिनोचा प्रभाव असल्याचे भाकीत करीत दुष्काळी स्थितीचे संकेत दिले होते ,अगदी सुरुवातीपासूनच पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली असुन सप्टेंबर महिना आला तरी पाऊस पडत नसल्याने व पिकं येणारच नसल्याची खात्री झाल्याने आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांचे उडीद, तुर, बाजरी, मका, सोयाबीन, मूग, कांदा, सूर्यफूल, कपाशी अशी उभी पिके करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी , व लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करुन, दुष्काळी उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस प्रा. ज्ञानदेव थोरवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे .   संपूर्ण पावसाळ्यात जून / जुलै महिन्यात एक दोन पाऊस वगळता संपूर्ण पावसाळा विना पावसाचा निघून जाण्याच्या मार्गावर असून ऑगस्ट महिना ही संपायला ,तरी तालुक्यात चांगला

माजी आमदार श्री अमरसिंह पंडित यांच्या प्रयत्नाने गेवराई तालुक्यात तीन ठिकाणी 33 केव्ही उपकेंद्रांना मिळाली मंजुरी

Image
बीड जिल्हा प्रतिनिधी सखाराम पोहिकर :-गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रयत्नामुळे गेवराई तालुक्यातील कोळगाव बोरगाव आणि गढी या ठिकाणी 33 के व्ही उपकेंद्र झाले मंजूर या भागात सातत्याने कमी दाबाचा वीज पुरवठा होणे वारंवार वीज खंडित होणे अशा तक्रारी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडे या तिन्ही गावच्या शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या त्यावेळी ग्रामस्थांना माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिलेल्या आश्वासनाची या निमित्ताने पूर्तता झाली आहे लवकरच संबंधित ग्रामपंचायत चर्चा करून महावितरण कंपनीला जागा उपलब्ध करून कामाला वेगाने सुरुवात करण्यात येणार आहे यापूर्वी कोळगाव येथे मंजूर झालेले ३३ केव्ही उपकेंद्र केवळ जागा ग्रामपंचायत उपलब्ध करून न दिल्याने हे उपकेंद्र होऊ शकले नाही आता ग्रामपंचायत ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचाराची असल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून उपकेंद्राचे काम लवकर सुरू करण्यात येणार आहे या भागातील ग्रामस्थांनी श्री अमरसिंह पंडित साहेब यांचे विशेष आभ

पाटोदा तालुका शिक्षण क्षेत्रात एक नंबर होव्हा म्हणून विद्यार्थीच्या शिक्षणासाठी लागन त्या सुविधा आमदार आजबे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात आणु - दिपक दादा घुमरे

Image
अविनाश पवार यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत शेतकऱ्यांवर आलेल्या महासंकटामुळे दमदार आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसावर व्यर्थ पैसे न खर्च करता विविध सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस केला साजरा पाटोदा तालुका शिक्षण क्षेत्रात एक नंबर होव्हा म्हणून विद्यार्थीच्या शिक्षणासाठी लागन त्या सुविधा आमदार आजबे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात आणु - दिपक दादा घुमरे पाटोदा (गणेश शेवाळे ) पाऊसळा ऋतू सुरू होऊन दोन महिने झाले तरी मनाव असा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आसून पुढे जर पाऊस पडला नाही तर आपले काय होईल असे मोठे संकट शेतकऱ्यावर आले असल्यामुळे सर्व सामान्य शेतकरी लोक संकटात सापडले असताना दासखेड गावचे युवानेते अविनाश पवार यांच्या घरात कोणतेही घरात राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करता करता आमदार बाळासाहेब आजबे यांच्या संपर्कात येऊन फक्त गोर गरीब अडल्यानडल्या लोकांचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मार्फत कामे करून फक्त दासखेड गावचा नाहीतर संपूर्ण पाटोदा तालक्याचा विकास कसा करता येईल यासाठी धडपड करणारे अविनाश पवार

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे

Image
राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अँड मंजुषाताई दराडे यांचा अनोखा उपक्रम बीड प्रतिनिधी कायदा व सुव्यवस्था याचे पालन करण्यासाठी रात्रंदिवस सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणासाठी कर्तव्यदक्ष असलेला विभाग म्हणजे पोलीस डिपार्टमेंट होय.या पोलीस विभागाचे प्रमुख पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष अँड मंजुषाताई दराडे यांच्या पुढाकारातून राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बहिण भावाचे पवित्र प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन सर्वत्र उत्साहात साजरे केले जाते. ज्या मुली, महिला यांना अडचणीच्या वेळी कोणतेही रक्ताचे नातेसंबंधाचे संबंध नसताना अगदी भावाप्रमाणे पाठीशी उभे राहून महिलांना न्याय देणारे पोलीस खऱ्या अर्थाने महिलांचे बंधू आहेत. आपल्या या खऱ्या रक्षणकर्त्या भाऊरायाची राखी बांधून राष्ट्रवादी काँग्रेस महिला विभागाच्या वतीने अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना ओक्षण करून रक्षाबंधन करताना महिला राष्

मुलीच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

Image
मुलीच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप समदीप सामाजिक प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम वडवणी प्रतिनिधी मुलीच्या जन्माला तुच्छ समजणाऱ्या या समाजामध्ये मुलीच्या जन्माचे स्वागत केले जात आहे. याचाच प्रत्यय पुसरा येथील झोडगे परिवाराचा हा सामाजिक उपक्रम पाहून आला. मुलीचा पहिला वाहिला वाढदिवस जिल्हा परिषद शाळेतील लहान सहान विद्यार्थ्यांना वही पेन आणि खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला. या सामाजिक उपक्रमाच्या कार्यक्रमाला गावातील माजी सरपंच हरिभाऊ पवार, भावी पंचायत समिती सदस्य बंडू नाईकवाडे सदस्य बंडू नाना मुजमुले, पत्रकार अविनाश मुजमुले, पत्रकार सतीश मुजमुले युवा नेते आदर्श दादा मुलमुले,प्रदीप झोडगे, सचिन झोडगे, विशाल झोडगे, विष्णुबाळ झोडगे,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुंडे सर आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते, तसेच समदीप सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते.. कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांनी सिद्धी बाळास वाढदिवसाच्या अनेकत्तर शुभेच्छा दिल्या.

स्वातंत्र्य,समता, बंधुता व न्यायावर आधारीत भारतीय संविधानाचे अनुपालन करणे मानव हिताचे-प्रा.वसंतराव ओगले

Image
स्वातंत्र्य,समता, बंधुता व न्यायावर आधारीत भारतीय संविधानाचे अनुपालन करणे मानव हिताचे-प्रा.वसंतराव ओगले महामानव अभिवादनतर्फे शालेय साहित्य वाटप   बीड (प्रतिनिधी ):- भारतीय संविधान जगातील श्रेष्ठ संविधानापैकी सर्वश्रेष्ठ संविधान आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायावर आधारीत संविधानाचे अनुपालन करणे मानव हिताचे आहे असे प्रतिपादन प्रा.वसंतराव ओगले यांनी केले. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती, त्या दिनाचे औचित्य साधून महामानव अभिवादन ग्रुप व ‘वाचाल तर वाचाल’ फिरते मोफत वाचनालयातर्फे शालेय साहित्य व पुस्तकाचा संच वितरण कार्यक्रम आनंद छात्रालय पांगरी रोड बीड येथे केला होता. या प्रसंगी आनंद मागासवर्गीय शिक्षण संस्थेचे सचिव अ‍ॅड.व्ही.बी.मगर लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील विचारवंत प्रा.वसंतराव ओगले, से.नि.असिस्टंट जनरल मॅनेजर बीएसएनएलचे भिमराव कांबळे, संस्थेचे अध्यक्ष बी.ए.धुताडमल यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. तर महामानव अभिवादन ग्रुपचे कॅप्टन राजाभाऊ आठवले, डी.जी.वानखेडे

तुलसी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोष आणि उत्साहात साजरा

Image
शरीर तंदुरुस्त रहावे यासाठी आपण भरपूर खेळलेच पाहिजे - प्राचार्य डॉ.एल.एम.थोरात बीड(प्रतिनिधी ):- तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे दि. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  प्राचार्य डॉ.एल.एम थोरात यांनी खेळल्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते, म्हणून आपण दररोज भरपूर खेळलेच पाहिजे असा संदेश विद्यार्थ्यांना दिला तसेच तुलसी महाविद्यालयात क्रीडा संस्कृती वाढावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे विद्यार्थ्यांना सांगितले. उपप्राचार्य डी.जी. निकाळजे भारतीय हॉकीचे मानांकित खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या २९ ऑगस्ट या जयंती दिनानिमित्त भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, प्रोत्साहन मिळावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.   तुलसी महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा.राहुल सोनवणे यांनी कार्यक्रमा निमित्ताने विविध खेळांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच मेजर ध्या

जिल्हा परिषद वाघाचा वाडा शाळेतील चिमुकल्यांनी निसर्ग शाळेचा मनमुराद घेतला आनंद

Image
पाटोदा (गणेश शेवाळे )शालेय उपक्रमा सोबतच वनभोजन या सहशालेय उपक्रमाचे शाळांकडून आयोजन केल्या जाते. चार भिंतीच्या आतील बंदिस्त अभ्यासक्रम एकदिवस टाळून निसर्गाच्या सानिध्यात झाडे, पशु, पक्षी, वेली यांच्याशी गुज गोष्टी करीत अनेक अनुभवांची समृद्धी हस्तगत करुन घेण्यासाठी जिल्हा परिषद वाघाचा वाडा प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी वनभोजन या कार्यक्रमातून निसर्ग शाळेचा मनमुराद आनंद घेतला.  मोकळ्या रानी आणि उघड्या आभाळी मुलांनी गप्पा, गोष्टी, शालेय कविता, गाणी, स्वरचित कविता, प्राण्यांचे हुबेहुब आवाज, नाट्य संवाद, विनोद, चुटकुले, मनोरंजक व मैदानी खेळात सहभाग घेतला.व विषयांच्या अभ्यासक्रमातील घटक, उपघटकांची प्रत्यक्ष सांगड घालून शाळेतील शिक्षकांनी विविध अध्ययन अनुभती दिल्या.वाघाचा वाडा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका सौ.जयक्षी बडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी निसर्ग शाळेत सहभाग नोंदविला शिक्षिका बडे यांनी शेती करण्याच्या पद्धती व अवजारे यांच्या विषयी माहीती दिली. हिरव्यागार वनराईच्या संगतीत खिचडी सह रानभाज्यांचा पुलाव व विविध प्रकारची फळे या विशेष मध्यान्ह भो

अमानवी कृत्य करनाऱ्या पाटलावर कडक शासन करा,वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी

Image
. गेवराई / प्रतिनिधी  अमानवी कृत्य करनाऱ्या युवराज गलांडे पाटलावर कडक शासन करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्यावतीने मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना तहसिलदार गेवराई यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.  हरेगाव (ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर) येथील शुभम विजय मघाडे या बौध्द तरुणाला कबुतर व शेळ्या चोरीचा खोटा अरोप करत, त्यास घरातून युवराज गलांडे पाटील यांच्या नोकरांनी उचलुन नेले त्यानंतर विशाल याने मला येथे का आणले अशी विचारणा केली असता त्यास युवराज गलांडे पाटील व ईतर तीन ते चार लोकांनी जातीवाचक शिवीगाळ करत जबर मारहाण केली, त्यानंतर विशाल यास नग्न करुन झाडाला उलटे टांगून त्यावर लघुशंका केली, युवराज पाटील याने स्वत:च्या बुटावर थुंकुन ती थुंकी विशाल यास चाटायला लावली व केलेल्या कृत्याची कुठे वाच्यता अथवा तक्रार केली तर तुझ्या घराच्यांसह तुला जिवे मारु अशी धमकी दिली.  सदरील प्रकार हा अत्यंत घृणास्पद असून अमानविवय आहे, या कृत्यामुळे विशाल विजय मघाडे याच्या शरीरावर तसेच मनाला गंभीर इजा झाली असल्याने युवराज पाटील व ईतर चार आरोपींवर कठोर शासन करावे तसेच कठ

आंबेवाडी शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरांच्या अंभोरा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Image
 ....  आष्टी ( प्रतिनिधी ---गोरख मोरे ) :    अंभोरा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या आंबेवाडी शिवारात अहमदनगर ते बीड महामार्गालगत असलेल्या अर्जुन बबन बागले यांच्या शेतात सुजलॉन कंपनीच्या पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्याच्या उद्देशाने रविवारी मध्यरात्री सहा दरोडेखोर डम्पर व जेसीबी सह आले असता अंभोरा पोलिसांनी पाच आरोपींना पाठलाग करून पकडले तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. एक डंपर व जेसीबी असा पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. सदरील आरोपींना सोमवारी आष्टी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या विषयी सविस्तर माहिती अशी की,  आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांना आंबेवाडी शिवारात सहा दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी उपनिरीक्षक अदिनाथ भडके, पोलीस अंमलदार अमोल शिरसाठ, सतीष पैठणे, सुदाम पोकळे सहाय्यक फौजदार शांताराम रोकडे व पोलीस कॉन्स्टेबल बाळू जगदाळे यांना तात्काळ सदरील ठिकाणी पाठवले असता रविवा

वंचित बहुजन आघाडी,मालेगांव तालुका व शहर कार्यकारणीच्या वतीने हरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ निवेदन

Image
वंचित बहुजन आघाडी,मालेगांव तालुका व शहर कार्यकारणीच्या वतीने हरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ निवेदन        अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातील हरेगांव येथील ३ बौद्ध तरुणांना कबुतर व शेळी चोरल्याचा संशयावरून गांवातील स्वतःला उच्च जातीय समजणाऱ्या मनुवादी विचारसरणीच्या धनदांडग्यांनी बेदम मारहाण करुन अमानुष प्रकारे त्यांना उलटे लटकवून त्यांच्यावर लघवी केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयसमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळाने नायाब तहसीलदार यांना निवेदन देत,कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रबुद्ध भारतचे उपसंपादक जितरत्न पटाईत,युवा जिल्हाध्यक्ष किरण मगरे,सचिव राजू धिवरे,सदस्य राजेंद्र पवार,शहराध्यक्ष कैलास लोहार,तालुका पदाधिकारी सुनील आहिरे,शशिकांत पवार, सिध्दार्थ उशिरे,विशाल जाधव,संदीप महिरे,विशाल आहीरे,सचिन आहिरे,आसिफ शेख,विजय बिऱ्हाडे,महेंद्र आहिरे,मो.यासीन,शफीक अह.विनोद जगताप,दीपक उशीरे,सागर पगारे,दिलीप सोनवणे,सागर म्हसदे,सुरेश आहिरे,प्रवीण उशिरे,संजय हिरे,कादिर शेख,आलिम शेख,अर्शदभाई,सलीम शेख

तळेगाव रोही गावकऱ्यांचे दुष्काळ जाहीर करून पिण्याचे पाणी, गुरांना चारा उपलब्ध करून देण्याबाबत प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन

Image
चांदवड :- तालुक्यातील मौजे तळेगाव रोही हे गाव डोंगराळ , दुष्काळग्रस्त समजले जाणारे गाव असून या परिसरामध्ये पावसाळा ऋतू सुरू झाल्यापासून अद्याप पर्यंत प्रमाणात म्हणावा असा पाऊस पडलेला नसल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामधील विहिरींचे, तलावांचे व तळ्यांमधील पाणी सुद्धा आटले आहे. गुरा - जनावरांना आणि मानवाला पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे सैरावैरी आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणीसाठी वणवण - शोधाशोध करावे लागत असल्याने हया पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली असुन शासनाने हया गंभीर प्रश्नांकडे/ समस्यांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ लक्ष घालावे.     हया सर्व परिस्थितीकडे लोकप्रतिनिधी खासदार, आमदार व वरिष्ठ शासकीय अधिकारीही लक्ष घालत नसल्या कारणास्तव गावकऱ्यांनी आज चांदवड उपविभागीय तथा प्रांताधिकारी यांना लेखी निवेदन देऊन गावाच्या समस्या हया निवेदनात मांडल्या आहेत. हे निवेदन नायब तहसीलदार जे.जे केदारे यांनी स्वीकारले. जनतेला पिण्याचे पाणी नाही, रोजगार नाही, गुरांना चारा नाही दुष्काळाची चिन्हे दिसू लागल्याने शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिण्याचे पाणी व गुरांना चारा व जनतेला रोजग

स्वच्छ भारत अभियान शेवगाव तहसील कार्यलय शेवगाब पासून कोसो दुर वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव चे तहसीलदारांना निवेदन

{ अविनाश देशमुख शेवगाव } 9960051755 शेवगाव तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये ठीक ठिकाणी पान, मावा, गुटखा, तंबाखू युक्त सुपारी, खाऊन त्याच्या पिचकाऱ्या मारल्याने अनेक ठिकाणी इमारतीचे विद्रूपीकरण होत आहे पिण्याचे पाणी सार्वजनिक स्वच्छतागृह कार्यालयाच्या अनेक ठिकाणी भिंतीची दुर्दशा सुरू असल्याचे चित्र जागोजागी पाहण्यास मिळत आहे तहसीलदार साहेब यांच्या कक्षाच्या मागील बाजूस मागील दर्शनी भागात झाडे झुडपे वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे एकंदरीत संबंधितांचे पुरेसे लक्ष नसल्याने या लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या प्रशस्त व टूमदार इमारतीची दुर्दशा सुरू असल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांबरोबरच तालुक्याच्या विविध भागातून आपले काम घेऊन आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आल्याने तहसीलदार साहेब यांच्यासह संबंधितांनी इमारतीची योग्य साफसफाई करून घेण्याची व त्यानंतर इमारतीमध्ये घाण करणारा मग तो कोणीही असो त्याच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उघडण्याची मागणी करणारे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव शहर अध्यक्ष प्रीतम (पप्पू) गर्जे यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सर्व संबंधितांना द

बीड मध्ये 31 तारखेला वडार समाज महाराष्ट्र संघटना महाराष्ट्र राज्याचा विमुक्त जाती भटक्या जमातीचा महामेळावा,

Image
  या महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहा, धोंडीबा उपाळकर राजाराम जाधव,  बीड प्रतिनिधी ,अंकुश गवळी बीड शहरामध्ये 31 ऑगस्ट या ठिकाणी, वडार समाज संघटना महाराष्ट्र राज्य भटक्या मुक्त जाती सामाजिक आधार संघटना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय महामेळावा शहरातील लॉन्स मध्ये होणार आहे, एमआयडीसी परिसर या ठिकाणी होणार आहे, या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर साहेब राहणार आहे, या कार्यक्रमाचे उद्घाटक बीड जिल्ह्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे राहणार आहे, या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील मातंग समाजाचे युवा नेते रमेश गालफाडे राहणार आहेत, या कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनेचे तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, हा सदरील कार्यक्रम वडार समाज महाराष्ट्र संघटना महाराष्ट्र राज्य, व राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे, या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, जास्तीत

महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील जनतेची व सर्वसामान्य शेतकऱ्यांची व्यथा कधी थांबणार, परमेश्वर नाना तळेकर

Image
,  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ई-मेल द्वारे निवेदन सादर बीड प्रतिनिधी अंकुश गवळी बीड जिल्हा व इतर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे बाबत, कृष्णा खोऱ्याचे पाणी महाराष्ट्र मध्ये प्रत्येक नदी व तलाव यांना जोडून बीड जिल्हा दुष्काळग्रस्त व ऊसतोड कामगारांचा जिल्हा यातून शाप मुक्त करण्यात यावा, बीड जिल्हा व इतर जिल्ह्यात रेल्वेचे काम पूर्ण होत असताना एमआयडीसीमध्ये औद्योगिकरण वाढून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, महाराष्ट्र हा कापूस पिकावनारा राजा आहे, त्या कापसावरील GST कमी करावी, जशी उसावरील 30 %income इन्कम टॅक्स वाचवले तसे शेतकऱ्यांकडून व्यापाराने घेतलेल्या कापसाला 5%टक्के GST, भरावी लागते तो बोजा शेतकऱ्यांवर पडतो परिणामी शेतकऱ्यांच्या कापसाला 400 प्रतिक्विंटल भाव कमी मिळतो, पश्चिम महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांचे 500रुपये प्रति टन आपण MRP वाढवाली ,तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चारशे रुपये प्रत्येक क्विंटल भाव वाढून मिळेल, मराठा समाजातील सुशिक्षित तरुण नोकरी भरती आपण चालू केली आहे ,परंतु मराठा समाजातील तरुण मुलांना आरक्षण नसल्याम

बीड शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य लक्ष्यवेधी अंतराळवीर आंदोलन

Image
बीड शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य लक्ष्यवेधी अंतराळवीर आंदोलन:- डॉ.गणेश ढवळे बीड:- बीड शहरातून जाणाऱ्या नगर रोड आणि जालना रोड तसेच मोंढा नाका जालना रोड ते अमरधाम स्मशानभूमी रस्त्यावरील दुरावस्थेमुळे बीडकरांसह जिल्ह्याच्या ठिकाणाहून जाणा-या वाहनचालकांची अनेक वर्षांपासून तारेवरची कसरत सुरू असुन मणक्यांच्या व्याधींनी त्रस्त असुन मोठ्या प्रमाणावर अपघात घडलेले असुन बीडमध्ये नेत्यांची आणि पुढा-यांची कमतरता नसताना डझनावरी नेते असताना सर्वसामान्यांच्या हाल अपेष्ठांकडे त्यांचे दुर्लक्ष असुन शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य हे चंद्रग्रहावरील खड्ड्याप्रमाणे अधोरेखित होत असुन याकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली शेख युनुस च-हाटकर, रामनाथ खोड यांनी अंतराळवीरांचा प्रतिकात्मक वेश परिधान करुन बीड शहरातील रस्त्यांवरून प्रवास करत नेत्यांच्या नाकर्तेपणाचा निषेध नोंदवला.निवेदन जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, मुख्याधिकारी नगरपरीषद बीड यांच्या मार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी, प्रकल्प सं

खासदार डॉकटर प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत 51लक्ष कामाचे उद्घाटन

Image
   गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे :- गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथे 51लक्ष विकास कामाचे उद्घाटन झाले आहे वेगवेगळ्या शासकीय समितीवर निवड झाल्याबद्दल भाजपचे पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी उद्घाटक व मुख्य अतिथी म्हणून बीडच्या लोकप्रिय खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाचे उदघाटन पार पडले व संयोजक,भारतीय जनता पक्षाचे गणेश मुंढे भुमिका घेतली व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे गोरगरीब शोषित वंचित निराधारांच्या सर्वांगीण विकासाचे विचार तसेच केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या योजना वडगाव ढोक चे गणेश मुंढे यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत.याचाच एक भाग म्हणून बीडच्या लोकप्रिय खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नामुळे 2515 योजनेतून गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथे 51 लाख रुपये मंजूर झाले आहेत.या कामाचे उद्घाटन सोमवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजता करण्यात आले असून या निमित्ताने पदाधिकारी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला जिल्ह्यातील म

देवगिरी प्रतिष्ठान बीड आयोजित साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धत लातूरची प्रतीक्षा मोरे प्रथम तर गडहिंग्लजचा संकेत पाटील द्वितीय

Image
देवगिरी प्रतिष्ठान बीड आयोजित साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धत लातूरची प्रतीक्षा मोरे प्रथम तर गडहिंग्लजचा संकेत पाटील द्वितीय   चौदाव्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे डॉ.संजय शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन  बीड(प्रतिनिधी )- येथील देवगिरी प्रतिष्ठान,बीड आयोजित साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धचे उद्घाटन सदस्य सचिव साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशने समिती महाराष्ट्र शासन प्रा.डॉ. संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा देवगिरी प्रतिष्ठान,बीडचे संस्थापक अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे यांची उपस्थिती होती तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम पवार (अध्यक्ष अण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळ,बीड), प्रा. राम गायकवाड (अध्यक्ष मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,बीड), प्राचार्य डॉ. पांडुरंग सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रस्ताविकात प्रा.डी.जी. निकाळजे यांनी उपस्थितांचे स्वागत करून साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्

भाजपच्या राज्यात दलित , अल्पसंख्यांक समाजावरील अत्याचारात वाढ -काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस

Image
अहमदनगरच्या हरेगाव घटनेतली गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. भाजपच्या राज्यात दलित , अल्पसंख्यांक समाजावरील अत्याचारात वाढ -काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस बीड जिल्हा दि. २८ ऑगस्ट ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :     अहमदनगर जिल्ह्यातील हरेगावात तीन दलित तरुणांना चोरीच्या संशयावरून झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण केल्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी घटना असुन भाजपाने मागील ९ वर्षात जाती धर्मात विष कालवले आहे ,त्याचाच हा परिणाम असुन भाजपा सरकार केंद्रात व महाराष्ट्रात सत्तेवर आल्यापासून दलित, अल्पसंख्याक, वंचित, आदिवासी समाजावर सतत अत्याचार करण्याचे प्रकार वाढले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे .    नगर जिल्ह्यात हातावरचे पोट असलेल्या तीन दलित तरुणांना शेळी , कबुतराच्या चोरीच्या संशयावरून अमानुष मारहाण करण्यात आली. याआधी नांदेड जिल्ह्यातील बोंडार गावात अक्षय भालेराव या दलित तरुणाची हत्या करण्यात आली ,मुंबईतील कुर्ला भागात राहणाऱ्या दोन तरुणांना नासिकमध्ये गोमांस घेऊन ज

बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून पीक विमा मंजूर करा ; तात्काळ अग्रीम रक्कम द्या – भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांची मागणी

Image
(बीड प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यात सलग 25 दिवसांहून अधिक काळ समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. खरीपाची पीके पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकर्‍यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. अशा संकटात त्यांना आधार देणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून विमा कंपनीस बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पीक विमा मंजूर करून, तात्काळ अग्रीम रक्कम देण्यास आदेशित करावे अशी मागणी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यावर्षी पावसाळ्याच्या जून महिन्यापासूनच बीड जिल्ह्यात खूपच कमी पाऊस झाला आहे. सुरूवातीला पाऊस नव्हता म्हणून पेरण्या उशीरा झाल्या आणि नंतर पावसाने सलग 25 दिवसांहून अधिक काळ उघडीप दिली. तसेच 24 जूलै ते 26 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात कुठेच म्हणावा तसा पाऊस पडला नाही. परिणामी खरीप पीकांची वाढ खुंटली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या फक्त 42 टक्के एवढाच पाऊस झाला, सर्वांत कमी 29 टक्के पाऊस परळी तालुक्यात नोंदवला गेला आहे. जिल्ह्यात 51 हजार 835 हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्य

सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार संघर्ष समिती स्थापन करणार - डॉ जितीन वंजारे

Image
      बीड प्रतिनिधी:- बीड जिल्ह्याच्या नुकत्याच पार पडलेल्या उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेमध्ये बीडच्या विकासाचे प्रलंबित प्रश्न विचारणाऱ्या काही सामजिक कार्यकर्त्यांना अक्षरशा पोलीस स्टेशन मध्ये नजर कैदेत ठेवले गेले त्याची चूक इतकीच की त्यांनी नेत्याला अगोदर प्रसिध्दी पत्रकातून प्रश्न विचारले होते की तुम्ही ह्या उत्तरदायित्व सभेत या प्रश्नाची उत्तरे देणार आहात का नाहीत ? फक्त इतक्याच कारणाने बीडच्या काही सामाजिक कार्यकर्त्याना बिना अन्न-पाण्यावाचून दिवसभर पोलीस स्टेशन मध्ये नजर कैदेत ठेवले.ते कुठल्या गुन्ह्याचे आरोपी होते ?ते अतिरेकी होते की गुंड होते मग त्यांना नजर कैदेत कोणत्या कलमाखाली ठेवले गेले ? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी प्रशासनाला विचारला आहे.लोकशाही मध्ये नेत्यांना प्रश्न विचारणे चुकीचे आहे काय ? त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणे चुकीचे आहे काय ? मतदान त्यांनाच केलेले असताना त्यांनी दिलेले जाहीरनामे प्रमाणे न वागल्यास त्यांना विकासाचा जबाब विचारणे चुकीचे आहे का? मग लोकशाही संपून हुकूमशाही सुरू झाली आहे क

बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा.... मनसेचे आष्टीत पाण्याच्या टाकीवर शोलेस्टाईल आंदोलन

Image
आष्टी  ( प़तीनिधी --गोरख मोरे  ) :    बीड जिल्ह्यात पावसाने २१ दिवसांपासून उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या पिकांनी खाली  माना टाकल्या असून पीक जिल्हाभर वाळत आहे ,तरी शासनाने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा , शेतकऱ्यांना हेक्टरी १  लाख रुपयांची मदत जाहीर करावी , अशी मागणी मनसेचे  शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी आष्टीत पाण्याच्या टाकीवर शोलेस्टाईल आंदोलनादरम्यान केलीअसुन .याप्रसंगी तीव्र निदर्शने ,घोषणाबाजी करण्यात आली  .मोठया संख्येने जमलेल्या मनसैनिकांनी बराच काळ जोरदार घोषणाबाजी केली .   आष्टीचे तहसीलदार बाळदत्त मोरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलन करण्यात आली.ज्यात जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासोबतच  , वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळावी , पूढील काळात शेतकऱ्यांना त्रास होणार नाही यासाठी हरीण, रानडुक्कर या वन्यप्राण्यांचा प्रतिबंध करावा,जिल्हयातील पिके वाळत असल्याने पिक विमा कंपनीने जिल्हाभरातील शेतकऱ्यांना पिकविम्याची २५ % अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी,९९२  व इतर सोयाब

पाटोदयात राजकीय भूकंप

Image
 भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकत अक्षय भैय्या जाधव यांचा बाळासाहेब बांगर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश पाटोदा (गणेश शेवाळे )भारतीय जनता पार्टीला रामराम करत पाटोदा शहरातील युवानेते अक्षय भैय्या जाधव यांनी कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब यांची दमदार कामगिरीवर,धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता,प्रचंड अभ्यास व सर्व सामान्य नागरिक,शेतकर्या बदल तळमळ,कोणत्याही वर्गांवर अन्याय नाही हा आजेंडा पाहुन पाटोदा शहरातील हजारो युवकांचे लाडके युवानेते अक्षय भैय्या जाधव यांनी बीड येथील विराट सभेत गटनेते वाल्मिक आण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बांगर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवानेते अक्षय भैय्या जाधव यांनी सुजित गुंड सह शेकडो कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला

गेवराईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू आढळला

Image
 गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 8888435869  शहरातील मन्यारवाडी परिसरामध्ये एका तरुणाचा सोमवार (दि.28) सकाळी मृतदेह आढळून आला. तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मृतदेह शेतातआढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मनोहर विलास पुंड(वय 38 रा. रंगार चौक, गेवराई) असे मयताचे नाव आहे. त्याचा मृतदेह मन्यारवाडी शिवारात आढळून आल्याने येथील घटनास्थळी गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, डी. वाय. एस.पी राजपूत यांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. पुंड यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अस्पष्ट असून शवविच्छेदनाच्या अहावालनंतरच स्पष्ट होणार आहे.