Posts

Showing posts from July, 2022

आमदार प्रकाश सोळंके थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Image
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे महसुल प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश वडवणी प्रतिनिधी :  तालुक्यातील कवडगाव बु.मंडळात परवा दुपारी ३वाजेच्या सुमारास अचानक ढगफुटीसदृष्य पावसाला सुरुवात झाली तब्बल २तास झालेल्या धुव्वाधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला हा पाऊस कवडगाव मंडळातील २०गावच्या परिसरात २तास धुमाकुळ घालत होता या पावसाने शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात हानी झालि आहे शेताला तळ्याचे स्वरुप तर नदीला महापुरआल्याने शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात हाल झाले.दरम्यान माजलगाव मतदारसंघाचे आ.प्रकाशदादा सोळंके यांनी तत्काळ दखल घेत या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला व महसुल प्रशासनाला तत्काळ पंचनामे करुन घेण्याचे आदेश देण्यात आले.   या बाबत अधिक माहिती अशी कि यंदाच्या वर्षी वडवणी तालुक्यातील कवडगाव मंडळात गेल्या ७जुन पासुन सततधार पाऊस सुरु आहे शेतकर्यांनी कशीबशी खरीपाची पेरणी केली मात्र सततच्या पावसाने मशागत करता येत नसल्याने संपुर्ण पिके तणग्रस्त झाली आसुन सर्व शेती पडीक झाली आहे आणी अशातच परवा दि.३०रोजी या भागात दुपारी ३वाजेच्या सुमारास वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह ढगफुटीसदृष्य

सत्तेसाठी सतराशे साठ सामान्य जनतेसाठी आप्पासाहेब राख हामखास म्हणूनलोक मनतात आता कस आप्पासाहेब मनतील तस

Image
पाटोदा (गणेश शेवाळे)संध्या निवडणुकीचे बिगुल वाजले आरक्षण जाहिर होताच निवडणुकीचे वारे वाहु लागले.जिल्हा परिषद व पंचायत समीती गटामध्ये निवडणुक लागली प्रत्येक गट व गणामध्ये पक्ष आपआपल्या कामाला लागले आहे.तरी पक्षाने प्रत्येक उमेदवारांने आपले मतदार मजबूत करावे असे पक्ष श्रेष्ठीने उमेदवारां ना सांगितले असल्यामुळे प्रत्येक उमेदवार आप आपल्या पद्धतीने कामाला लागले आहे दिसून यत असताना  तांबाराजुरी गटात माञ वेगळेच चित्र पाहिला मिळत असून लोक मनत आहे सत्तेसाठी सतराशे साठ सामान्य नागरिकांच्या कामासाठी आप्पासाहेब राख असतात हामखास म्हणून तांबाराजुरी गटातील नागरिक चर्चा करतात राख हे चांगल्या पद्धतीने आपल्या गटात काम करतील म्हणून तांबाराजुरी गटातुन आप्पा साहेब राख यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी जनतेतुन होत आहे.

विवेक कुचेकर चौसाळा जिल्हा परिषद गटातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रबळ दावेदार

Image
बीड प्रतिनिधी:- बीड तालुक्यातील चौसाळा जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जातीसाठी राखीव असुन या गटात जातीय समिकरण असो किंवा सामाजिक समीकरण असो सगळयाच परिस्थितीत विवेक कुचेकर हा तरूण प्रभावी ठरतो त्यांनी सामाजिक पातळीवर काम करत असताना संघटन अतिशय मजबुत केले आहे तसेच सर्वच पक्षात त्यांनी संबध जोपासले आहेत.सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी लोकोपयोगी कामे अतिशय प्रभावी पणे केली आहेत सध्याच्या परिस्थितीत चौसाळा जिल्हा परिषद गटात प्रभावी दलित चेहरा दिसुन येत नसल्यामुळे विवेक कुचेकर यांची दावेदारी प्रभावी समजली जात आहे . राष्ट्रवादीचे उच्चशिक्षित उमेदवार विवेक(बाबा)कुचेकर  जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच चौसाळा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी कडुन उच्चशिक्षित तरूण आणी हक्काचा उमेदवार म्हणून विवेक (बाबा)कुचेकर यांच्याकडे पाहील जात आहे येणारया काळात त्यांच्याकडुन गोरगरिबांना न्याय मिळु शकतो या दृष्टीने त्यांच्याकडे नागरिक पाहत आहेत पक्ष नेत्याच्या उमेदवारीवर शिक्का मुहूर्त करून जनतेला हक्काचा चळवळीतील उच्चशिक्षित उमेदवार विवेक कुचेकर यांच्या रूपाने दयावा अशी मागणी होताना

वडवणीत शेतकऱ्यांना विविध प्रश्नांवर किसान सभेच्या वतीने चक्का जाम आदोलन

Image
दोन तास किसान सभेचा वडवणी शहरात चक्काजाम आंदोलन तालुक्यातील नागरिक युवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती वडवणी (प्रतिनिधी ):- मागील वर्षी ३ काळे कृषी कायदे वापस घेल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाला शेतकरी आंदोलन मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने आंदोलकांवर दाखल केलेले गन्हे मागे घेतले जातील व शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी केंद्रीय समिती स्थापन करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते पाळले गेले नाही म्हणून रविवारी ( ता ३१ )रोजी देशव्यापी विश्वास घात दिवस पाळुण वडवणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.एमएसपी ची केवळ घोषणा नको . उत्पादन खर्चावर आधारित दीडपट जास्त हमीभावाचा कायदा करा . केवळ सत्ता मिळवण्यासाठीच स्वामीनाथन आयोगाचा पुळका कशाला ? आता त्याची शेतकरी हितासाठी अंमलबजावणी करा . शेतकऱ्यांना आत्महत्येच्या गर्त्यात लोटणारे आयात - निर्यात धोरण बदलून खऱ्या अर्थाने शेतकरी हिताचे करा . संयुक्तकिसान मोर्चाच्या किसान आंदोलनात सरकारने शेतकऱ्यांवर दडपशाहीने दाखल केलेले सर्व गुन्हे वापस घ्या . रासायनिक खतांच्या किंमती कमी करुन खतांचा काळाबाजार थांबवा

लोकहितवादी मंडळाकडून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मानपत्र देऊन सन्मान

Image
सामूहिक प्रयत्नांतून ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ नाशिक, दि. ३१ जुलै :-लोकप्रिनिधी, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, नाशिक महानगपालिका आणि समस्त नाशिककरांचा हातभार लागल्याने नाशिकमध्ये पार पाडलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी झाले आहे. पुन्हा जर साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असेल तर यासाठी नाशिककरांच्या वतीने स्वागत असेल असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिकच्या मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे पार पडलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी नियोजन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्याबद्दल भुजबळ फार्म येथील कार्यालयात आज ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक असलेल्या लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून छगन भुजबळ यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सर्वांनी मेहनत घेतली त्या सर्वांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. साहित्य संमेलनात नाशिककरांना उपलब्ध करून दे

ताडसोन्ना पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार गोरख बाबर

Image
  बीड प्रतिनिधी बीड तालुक्यातील नबापूर व बोरदेवी येथील रहिवासी, गोरख बाबर ,सर्वसामान्य कुटुंबातून आलेले व्यक्तिमत्व ,हे नाव गेले अनेक दिवस सामाजिक क्षेत्रात ऐकाला भेटल आहे, एक छोट्याशा गावातून अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेले व्यक्तिमत्व घरात कुठला राजकीय वारसा नसताना, आज राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष पदाची माळ त्याच्या गळ्यात आहे, गेली अनेक वर्षे सामाजिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहेत ,बीड तालुक्यात जनसेवेसाठी कटिबद्ध आहे ,सामाजिक कार्यातून लोकांची कामे केली ,कुठला दवाखाना असो, पोलीस स्टेशन असो, गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतो, खरे तर या युवकांनी सामाजिक बांधिलकीतून खूप वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ,परिसरात वृक्षारोपण विविध ,सामाजिक कार्याची जाण असणारा अवलीया, परिसरातील सर्वसामान्य सोबत जाणारे व्यक्तिमत्व गेली अनेक वर्षे सामाजिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहे .  ताडसोन्ना पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार आहे अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष गोरख बाबर यांनी दिली आहे

राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या बीड तालुकाध्यक्ष पदी जयश्री राठोड यांची निवड

Image
                बीड  (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्त्या जयश्री राठोड यांची राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या बीड तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली       राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या बीड तालुकाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात येत ही निवड बीड जिल्हाउपाध्यक्ष रोहीणी ताई बांगर यांच्या हस्ते नियुक्त्ति पत्र देऊन करण्यात आली आहे या निवडीमुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे                               फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश आनेराव राज्य प्रवक्ते द्वारकादास फटाले यांच्यासह यावेळी संघटनेचे सचिव उमेश आनेराव बार्शी, शंकर वानेगावकर नांदेड,संजय मोगरे नाशिक, महीला अध्यक्ष विजयालक्ष्मी आनेराव,मिनल लिंबोळे,विजया माळी, मंगल डफळ,विद्या कातखडे स्वाती आघाव बीड जिल्हाध्यक्ष,रुपाली मिरदुडकर,राणी सानप  तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पदाधिकार्यांनी या निवडीबद्ल अभिनंदनांचा वर्षाव केला.

अंमळनेर गटात एकच लहर आता पाहिजे फक्त भाऊसाहेब आण्णा भवर

Image
पाटोदा (गणेश शेवाळे) जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडती मध्ये अंमळनेर जिल्हा परिषद गट हा ओपनला सुटताच अंमळनेर गटातील गावागावात चौका चौकात फक्त चर्चा रंगताना दिसत असून सामान्य जनता म्हणू लागली जे आपल्या सदैव सुखदुःखात धावून येतात, गटातील कोणत्याही गावात धार्मिक कार्यक्रम आसू अन्नदान फिक्स करणारे भाऊसाहेब आण्णा भवर यांची जिल्हा परिषद निवडणूकी साठी अंमळनेर गटात लहर दिसून यत असून आमदार सुरेश आण्णा धस सामान्य जनतेत चर्चा करून एकनिष्ठ प्रमाणिकपणे राहणाऱ्या भाऊसाहेब भवर यांची लहर पाहून भवर यांना न्याय देणार का

महाराष्ट्रद्रोही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदच्युत करा;राष्ट्रपतींना निवेदन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

Image
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कायमच वादग्रस्त विधान करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत यापुर्वीही त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतीराव फुले यांच्या बद्दल जाहीर कार्यक्रमात अवमान जनक वादग्रस्त विधान केले होते तेव्हाही महाराष्ट्रातील जनतेने याविषयी तिव्र नाराजी व्यक्त केली होती.  सध्या त्यांनी महाराष्ट्रातील ठाणे,मुंबई येथील राजस्थानी,गुजराथी यांना वजा केले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे वक्तव्य करून मराठी माणसा बरोबरच महाराष्ट्रातील जनसामान्यांचा अपमान केला असून असे वारंवार जाणीवपुर्वक वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पदच्युत करण्यात यावे जेणेकरून भविष्यात सामाजिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. अशा मागणीचे निवेदन ईमेलद्वारे महामहीम राष्ट्रपती मा.द्रौपदी मुर्मु यांना केली आहे. 

माजी सभापती तात्यासाहेब हुले यांची सौताडा तर तांबाराजुरी गटात आप्पासाहेब राख यांच्या नावाची जि.प निवडणूकी साठी जोरदार चर्चा

Image
राष्ट्रवादाची पडत्या काळात मदत करणाऱ्या माजी सभापती तात्यासाहेब हुले यांची सौताडा तर तांबाराजुरी गटात आप्पासाहेब राख यांच्या नावाची जि.प निवडणूकी साठी जोरदार चर्चा पाटोदा (गणेश शेवाळे) महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला आनेक मोठ मोठाले नेते सोडून जात असताना बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात मात्र  राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पडत्या काळात देशाचे नेते शरद पवार,महाराष्ट्र राज्याचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धनंजय मुंडे व आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली आप्पासाहेब राख व माजी सभापती तात्यासाहेब हुले यांनी प्रवेश करून पाटोदा तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला अच्छे दिन अनले असल्यामुळे सत्ता असो या नसो माजी मंत्री धनंजय मुंडे व आमदार बाळासाहेब आजबे यांच्या पाठिशी खंबीर पणे उभे रहाणारे आप्पासाहेब राख यांची तांबाराजुरी जिल्हा परिषद गटात तर माजी सभापती तात्यासाहेब हुले यांच्या नावाची सौताडा जिल्हा परिषद गटात आरक्षण सोडत होताच जोरदार चर्चा होत असून राष्ट्रवादी पक्ष तात्यासाहेब हुले यांच्या पत्नीला सौताडा गटात तर आप्पासाहेब राख यांना तांब

सरकार मेडीकल अँण्ड जनरल स्टोअर्सचे विविध मान्यवराच्या हास्ते थाटात उद्घाटन संपन्न

Image
पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा शहारातील युवा उद्योजक इलियास सिद्धीकी यांनी क्रांतीनगर येथे सरकार मेडीकल अन्ड जनरल स्टोअर्स हा नविन व्यावसाय चालु केला आसुन सदर व्यावसाय क्रांतीनगर भागात करण्याचा उध्देष म्हणजे या भागातील लोकांना औषध,गोळ्या घेण्यासाठी शहरामध्ये यावे लागत असे त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणुन त्यांनी हा व्यावसाय या भागात चालु केला आहे जनतेला २४ तास सेवा देणार आहेत सदर मेडीकलचे आज दि. २९ जुलै रोजी ऑल इंडिया पँथर सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार,एमआयएमचे जिल्हा अध्यक्ष शेख शफीकभाऊ,एएसएफचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकजभाई चव्हाण,यांच्या हास्ते उदघाटण झाले यावेळी पाटोदा शहरातील राजकीय नेते मंडळी, व्यापारी,डॉक्टर,मेडीकल असोशियनचे पदाधीकारी हजर होते आलेल्या सर्व मान्यवराचे आभार क्रॉग्रेसचे शहर अध्यक्ष इम्रानभाई शेख  यांनी सर्वाचे आभार मानले असून सरकार मेडीकल अँण्ड जनरल स्टोअर्स मुळे पाटोदा शहराच्या वैभवात वाढ झाली व सरकार मेडीकल मुळे जुना पाटोदा म्हणजे क्रांतीनगर जयसिंग नगर व इतर भागातील नागरिकांना जवळ आणी अतिशय योग्य दरात चांगली सुविधा मिळणार असल्याने ह्या भागातील

महिला शिक्षकांशी अश्लील पणे वागणाऱ्या आ. ब. हायस्कूल संस्थेतील शिक्षक (पर्यवेक्षक) वर कारवाई करण्याची रयत सेनेच्या वतीने मागणी

Image
चाळीसगाव - चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या शाळेतील एक शिक्षक हा सहकारी शिक्षिका यांना अश्लील संभाषण करून, अश्लील हातवारे करून गेल्या काही दिवसांपासून त्रास देत असल्याने त्याचेवर कारवाई करावी अन्यथा रयत सेनेच्या  वतीने १५ दिवसात चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी च्या आ. ब. हायस्कूल परीसरात आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे संस्थेचे चेअरमन, सचिव, मुख्याध्यापिका यांना दि २९ रोजी दिला आहे.              निवेदनात म्हटले आहे की या शिक्षकामुळे अनेक महिला शिक्षिका त्रस्त आहेत शिवाय त्या मानसीक त्रासामध्ये आहेत असे निवेदन नुकतेच राजपूत करणी सेनेने दिले असून ते सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहे. यावरून सदर शिक्षकाने केलेले हे कृत्य अशोभनीय असून शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारे आहे. शाळा ही शिक्षण देऊन नवीन पिढी घडवणारी असते याठिकाणी विद्यार्थ्यांना संस्कार देऊन घडवले जाते आणि ज्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते तेच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबुन जाते सध्या पूर्ण शाळेत हीच चर्चा सुरू असल्याने त्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विषयाचा गां

युवा नेते कलिम कळवात यांच्या वाढदिवसानिमित्त 42 युवकांनी केले रक्तदान

Image
सामाजिक कार्यातून कालिम कळवात यांचा वाढदिवस साजरा बीड प्रतिनिधी बीड येथील सतत सामाजिक शैक्षणिक, क्षेत्रात अग्रेसर असणारे , कलिम कळवात यांच्या वाढदिवसानिमित्त बीड येथील सारडा कॅपिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ,  यावेळी भव्य रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला उपस्थित नगरसेवक शुभम धुत, गणेश भैय्या गुरखुदे, आदित्य कुलथे, शैलेश गिरी, विकास खेत्रे, आकाश भोसले, अतुल घरात योगेश शेनकुडे, आधी 42 युवकांनी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला, यावेळी जिल्हा भरातून कलिम कळवात यांच्या वर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,

आकोट येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे भीमसैनिक बचाव राज्यव्यापी आंदोलन संपन्न

Image
अकोट प्रतिनिधी.:-. ऑल इंडिया पॅंथर सेना च्या वतीने. भीमसैनिक बचाव राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले व निवेदन सादर करण्यात आले.. राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या आदेशावरून महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भाई भोळे विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली.. अकोला जिल्हा अध्यक्ष परवेज खान यांच्या नेतृत्वात आंदोलन व निवेदन सादर करण्यात आले. अकोट तहसील कार्यालयावर भीमा कोरेगाव येथील भीमसैनिकावरील विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ राज्य सरकारने स्वतंत्र जीआर काढून रद्द करावे.. करिता तहसीलदार अकोट यांच्यामार्फत मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई.. उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई.. यांना या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अकोट तालुका अध्यक्ष उमेश तायडे तालुका उपाध्यक्ष एजाज शेख. नितीन गजभिये नासिर शेख आजाद कुरेशी. सोनू तेलगोटे प्रतीक सरदार रोशन धांडे गणेश कार, आकाश तेलगोटे नानू गुहे अभि वानखेडे शुभम बोदडे.. मित्रपरिवार उपस्थित. या गंभीर बाबीची दाखल राज्य सरकारने घ्यावी .अन्यथा ऑल इंडिया पँथर सेने कडुन मंत्रालयावर मुंबई येथे मोर्चा काढण्यात येईल.

येणाऱ्या निवडणुका वंचीत बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने स्वबळावर लढणार.

Image
वंचितच्या बहुजन आघाडीच्या मुलाखत मेळाव्याला ईच्छुकांची तुफान गर्दी. गेवराई / प्रतिनिधी      स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद या निवडणुका आवघ्या दोन महिन्यावर येवुन ठेपल्या त्या अनुशंगाने दि. २८ गुरुवार रोजी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बीड जिल्हा अध्यक्ष उध्दव खाडे, जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर,भटके विमुक्त राज्य सदस्य भिमराव चव्हाण, बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालाजी जगतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गेवराई शहरात ईच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतीला मोठी गर्दी झाली होती.   आज रोजी एकीकडे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आला याच वेळी गेवराई तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपरिषद या निवडणुका लढवु ईच्छीनारांच्या पत्रकार भवन गेवराई येथे घेण्यात आल्या यावेळी इच्छुकांनी मुलाखतीसाठी मोठी गर्दी केली होती. जवळपास २५ ईच्छुकांची उपस्थीत होते. यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष खाडे म्हणाले की अत्तापर्यंत गेवराई तालुक्यातील पुढाऱ्यांनी मिळुनमिसळुन कारखाना, संस

खासदार पाटीलताई आपण दिल्लीच्या आरोग्य सेवेचा प्रश्न संसदेत उपस्थित केला आपले खरच खूप आभार पण बीड जिल्ह्यातील आरोग्य प्रश्नाकडे लक्ष द्यावा ही विनंती

  पाटोदा (गणेश शेवाळे) महाराष्ट्र राज्याच्या तथा बीड जिल्ह्यातील डॅशिंगबाज कणखर महिला नेत्या खासदार रजनीताई पाटील यांनी दिल्लीतील सामान्य जनतेच्या आरोग्य प्रश्नी अतिशय चांगला प्रश्न संसदेत उपस्थित करून सरकारचे डोळे उघडे करण्याचे प्रयत्न केल्यामुळे आपले मनापासून खूप खूप आभार तर खासदार ताई दिल्लीच्या धरतीवर बीड जिल्ह्यातील ही सरकारी दवाखान्या मध्ये गोरगरीब जनतेला अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे बीड जिल्ह्यातील काही दवाखान्यांमध्ये डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नाहीत तर डॉक्टर भेटले तर सामान्य नागरिकांना चांगले उपचार भेटत नाहीत अनेक औषध गोळ्या रुग्णालया बाहेरून आणायला लावतात अशा अनंत अडचणीचा सामना बीड जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना सरकारी दवाखान्यांमध्ये करावा लागतात यामुळे आपण लवकर बीड जिल्ह्यातील ही सरकारी दवाखान्यातील प्रश्नाबाबत आपण आवाज उठवावा अशी कळकळीची विनंती आपल्याला सामान्य नागरिक करत आहेत आपण बीड जिल्ह्यातील आरोग्य प्रश्नी आवाज उठवतात ही जिल्ह्यातील नागरिकांना अपेक्षा आह

राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विजय ठोसर यांची निवड

Image
                बीड (प्रतिनिधी) पनवेल येथील एक सामाजिक कार्यकर्ते विजय ठोसर यांची राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली                    विजय ठोसर गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय त्यांच्या कार्याची दखल घेऊन व ओबीसीच्या सर्व कार्यात त्यांनी आजपर्यंत नोंदवलेला त्याचा सहभाग याची दखल घेऊन राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात येत आहे या निवडीमुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश आनेराव राज्य प्रवक्ते द्वारकादास फटाले यांच्यासह यावेळी संघटनेचे सचिव उमेश आनेराव बार्शी, शंकर वानेगावकर नांदेड,संजय मोगरे नाशिक, महीला अध्यक्ष विजयालक्ष्मी आनेराव,मिनल लिंबोळे,विजया माळी, मंगल डफळ,विद्या कातखडे संग्राम नागरगोजे बीड जिल्हाध्यक्ष,स्वाती आघाव बीड जिल्हाध्यक्ष,रोहीणी आघाव   तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पदाधिकार्यांनी या निवडीबद्ल अभिनंदनांचा वर्षाव केला.

विकासाचं केंद्रबिंदू मानून सर्व पत्रकार या कार्यालयातून कामं करतील - एस.एम.देशमुख

Image
 बीड जिल्ह्यातील वडवणीतलं हे पहीलं कार्यालय  नगराध्यक्ष शेषेराव जगताप यांनी पत्रकारांच्या हक्काचं कार्यालय द्यावे - एस.एम.देशमुख वडवणी/प्रतिनिधी वडवणी येथील मराठी पत्रकार परिषदेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शहरातील व तालुक्यातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना एस.एम देशमुख पुढे म्हणाले,वडवणी तालुक्यातील पत्रकारांसाठी कार्यालय झाले ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र पत्रकारांच्या अनेक अडचणी आहेत.मागील कोरोना काळात अनेक पत्रकार गेले.अनेक पत्रकारांना कामावरून काढून टाकले.अनेकांचं मानधन बंद केले.समाजाच्या पत्रकारांकडुन अनेक अपेक्षा असतात.गावातील असो वा शहरातील महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पत्रकारांना वेठीस धरले जाते.पत्रकारांना हे दिसत नाही का पत्रकारांना ते दिसत नाही का? असे प्रश्न निर्माण केले जातात. समाजातील विविध प्रकारच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पत्रकार तुम्हाला सहकार्य करतो मात्र पत्रकारांवर जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र त्याच्या मदतीला कोणी

घराच्या जागेच्या कारणावरून अल्पवयीन मुलाचा विनयभंगाच्या आरोपातून चौघांची निर्दोष मुक्तता

Image
अँड.महाजेर अली उस्मानी यांनी सबळ पुराव्या अभावी आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे अंबाजोगाई प्रतिनिधी शीतलकुमार रोडे :- येथील २ रे जिल्हा व  सत्र न्यायालयात विशेष बाल लै. प्रकरण क्र. ०४/२०१६ सरकार वि. गौतम व इतर या प्रकरणाची सुनावणी होऊन आरोपी १.गौतम बंकट भागवत व २.भारत बंकट भागवत,३.शारदा गौतम भागवत व ४. कलुबाई बंकट  भागवत रा. सुगाव ता.अंबाजोगाई जि. बीड यांची कलम ३५४(ब), ४५२,३२३, ५०४,५०६,३४ भा. दं. वि. सह ८ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा मधून मा. न्या.एस.जे.घरत  मॅडम यांनी सबळ पुराव्या अभावी दि.२५/०७/२०२२ रोजी निर्दोष मुक्तता केली. सदरील प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, दि.०८/०३/२०१६ रोजी मौ. सुगाव ता.अंबाजोगाई येथील अल्पवयीन मुलगी ही तिचे आईवडील, भाऊ हे मजुरी साठी शेतात गेले असता ती एकटीच घरी असताना तिचे भावकितील आरोपी १.गौतम बंकट भागवत व २.भारत बंकट भागवत,३.शारदा गौतम भागवत व ४. कलुबाई बंकट  भागवत रा. सुगाव ता.अंबाजोगाई जि. बीड हे तिचे घरी आले व त्यांनी तुमचेकडील असलेली घराची जागा का देत नाहीत असे म्हणून शिवीगाळ करून आरोपी गौतम भागवत याने फिर्यादी मुलीस वाईट हेतू

राज्यातील १० राजकीय पक्षांच्या मान्यता रद्द; केंद्रीय निवडणूक आयोगाची कारवाई

शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात पक्ष आणि निवडणूक चिन्ह कुणाचे यावरून रस्सीखेच सुरु असतानाच निवडणूक आयोगाने देशातील एकूण १११ राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे.यात महाराष्ट्रातील १० पक्षांचा समावेश आहे. राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गटामध्ये पक्ष आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण आपल्याकडेच रहावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात असतानाचा केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १० राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे. तसेच, त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्हही गोठवले आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने धनुष्यबाण हे चिन्ह आपल्या गटाला द्यावे अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर, शिवसेनेने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असताना पक्ष आणि निवडणूक चिन्ह याबाबतचा निर्णय निवडणूक अयोग्य घेऊ शकत नाही अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात पक्ष आणि निवडणूक चिन्ह कुणाचे यावरून रस्सीखेच सुरु असतानाच निवडणूक आयोगाने देशातील एकूण १११ राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे. यात महाराष्ट्रातील १० पक्षांचा समावेश आह

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे रविवार रोजी सिल्लोड येथे आगमन होणार

Image
सिल्लोड प्रतिनिधी :- मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे रविवार रोजी सिल्लोड येथे आगमन होणार आहे. शहरातील नगर परिषद प्रशाला येथे स्वागत सत्कार स्वीकारून मुख्यमंत्री उपस्थितांशी संवाद साधणार आहे. आज आमदार अब्दुल सत्तार तसेच पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सभा स्थळाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. पावसाचे दिवस असल्याने संपूर्ण कार्यक्रम स्थळ हे वॉटरप्रूफ असणार आहे. महिला -पुरुषांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.        यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, सिल्लोड शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज, सिल्लोड ग्रामीण ठाण्याचे एपीआय सीताराम म्हेत्रे यांच्यासह नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, नगरसेवक सुधाकर पाटील, विठ्ठल सपकाळ, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन, राजू गौर, मनोज झंवर, आसिफ बागवान, राजेंद्र ठोंबरे, विशाल जाधव, माजी पं. स. सदस्य शेख सलीम , सचिन पाखरे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

धारुर तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे होणाऱ्या मोर्चाचे साक्षीदार व्हावे-रामेश्वर गवळी

Image
रासपचा दिल्लीत जंतर मंतरवर भव्य मोर्चा बीड प्रतिनिधी,  राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर साहेब,यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 5 ऑगस्ट रोजी पक्षाच्यावतीने दिल्लीत जंतरमंतरवर विविध मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, मराठवाड्यातील व बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रीय समाज पक्षाचे धारूर तालुका अध्यक्ष रामेश्वर गवळी यांनी केले आहे याबाबत रासपा च्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 5 ऑगस्ट रोजी 2022 रोजी जातिनिहाय जनगणना करणे, ओबीसी आरक्षण कायम करण्यात यावे, नॉन क्रीमी लेयर ची अट रद्द करणे, 50% सिलिंग हटवणे, सार्वजनिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे, न्याय व्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण लागू करणे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव आणि खरेदीची हमी द्यावी, तसेच नागरिकांना शिक्षण व आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देणे, इत्यादी मागणीचे निव

मानव हित लोकशाही पक्षाच्या दनक्याने शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त केली सुट्टी जाहीर

Image
गेवराई ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील मानव हित लोकशाही पक्ष गेवराई तालुकाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांनी दिनांक 22 / 7 / 2022 रोजी शुक्रवार या दिवशी मानव हित लोकशाही पक्ष्याच्या वतीने गेवराई तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले होते की एक ऑगस्ट आण्णाभाऊ साठे या दिवशी जयंती आसते या दिवशी सार्वजनीक शासकिय सुट्टी देण्यात यावी आसे निवेदन मानव हित लोकशाही पक्षाच्या वतीने देण्यात आले होते की अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शासकिय सुट्टी देण्यात यावी ही मागणी महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन ती मान्य केली असून सर्व शासकिय कार्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली यां चा शासन निर्णय पत्रक काढण्यात आले असून हा मानवहित लोकशाही पक्षाचा गेवराई तालुक्यामधून दिलेला शब्द व निवेदनाची ताबडतोब दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात आला असून महाराष्ट्र शासनाचे मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे

आरोग्यसेवा दाता डॉ.जितीन वंजारे सच्चे समाजसेवक - रशिद शेख

Image
डॉ. जितीन वंजारे यांचा खालापूरी येथे सत्कार संपन्न - रशिद शेख बीड-प्रतिनिधि :-खालापूरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जीतीन दादा वंजारे खालापुरीकर यांची सामाजिक कारकीर्द पाहता वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान अनमोल आहे. खालापूरीसह परिसरात ग्रामीण भागामध्ये गोरगरिबांना मनोभावे वैद्यकीय सेवा करणारे डॉक्टर हे सच्चे समाजसेवक आहेत. असे प्रतिपादन शिवसेनेचे तालुका संघटक व खालापूरी गावचे तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष रशिद शेख उर्फ मामू यांनी केले.           गावातील युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जाण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करणारे तसेच गावात उच्च पदस्थ असणाऱ्या सर्व मंडळींची प्रोत्साहनपर सत्कार समारंभ आयोजीत करून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन ईतर विद्यार्थ्यांना मिळवून देणारे डॉक्टर जितीन दादा वंजारे खालापुरीकर हे एक सच्चा समाजसेवक आहेत. कोरोना सारख्या महामारी मध्ये रुग्णांची मनोभावे सेवा त्यांनी केली,घर प्रपंच, संसार आणि समाज या सर्वांचा ताळमेळ घालून राजकारण, समाजकारण व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करून बीडच्या सामाजिक पटलावर आपली वेगळी छाप सोडणारे डॉक्टर जितीन दा

बीड जिल्ह्यातील एस टी गाड्या पूर्व तः ग्रामीण भागात चालू करा-आम आदमी पार्टी बीड

Image
ग्रामीण भागातील सर्व एस टि बसेस सुरू करा अन्यथा आंदोलन करणार माजी सैनिक अशोक येडे. जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी  बीड प्रतिनिधी :- आज आम आदमी पार्टीच्या वतीने डि.टि.औ. मा.पडळ साहेब, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बीड विभागीय कार्यालय बीड यांना पत्र देण्यात आले की बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या काळाच्या आधी ग्रामीण भागामध्ये चालत असलेल्या एसटी बसेस पूर्वतः सुरू करा ग्रामीण भागातील होत असलेली नागरिकांची पिळवणूक शाळकरी मुलांचा अडथळा आवक जावक एसटी बसेस चालू नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे या नुकसानाची जिम्मेदारी ही एसटी महामंडळ आहे तरी महामंडळाने जिल्ह्यातील सर्व बसेस पूर्वतः सुरू कराव्यात जर वेळेवर या पत्राचा विचार केला गेला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी ज्या ठिकाणी बसेस सुरू नाहीत तेथील नागरिक सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल अशा आशयाचे पत्र आम आदमी पार्टीच्या वतीने तालुका केज चे आम्हाले पार्टीचे तालुका अध्यक्ष मा. नाशेर मुंडे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी माजी सैनिक अशोक

गढी ग्रामपंचायतचे सरपंच मा अंकुशराव गायकवाड यांच्याहास्ते पाणी शुध्द . करण्यासाठी AMAR बॉटलच वाटप

Image
  गेवराई ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील मौजे गढी या ठिकाणी गढी ग्रामपंचायत कार्यालया मार्फत गढी गावातील लोकांना पिण्याचे पाणी स्वच्छ व निर्जंतुक करण्यासाठी प्रत्येक कुटूबासाठी . पाणी सुध्द करण्यासाठी AMAR हे देण्यात आले असून संध्या पावसाळ्याचे दिवस आसल्यामूळे गढी गावात रोगराई वाढू नये म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने नि शुल्क या बॉटलचे वाटप करण्यात येत आहे तेव्हा हे वाटप करताना मा सरपंच अंकुशराव गायकवाड यांच्या हस्ते यमुना घोडके व मंगेशजी कांबळे यांच्या हस्ते श्री धोडीबा ढंगे यांना या वेळी ह्या बॉटल देऊन यांचा वापर कसा करावा हे मा अंकुशराव गायकवाड सरपंच यांनी समजवून सांगीतले या वेळी गढी ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी सखाराम पोहिकर पत्रकार बाबासाहेब जायभाये यांची विषेश उपस्थित होते 

बीड मध्ये भारतीय मराठा महासंघ ची आढावा बैठक संपन्न - बंकट शिंदे

Image
आज बीड येथील शासकीय विश्रामगृह बीड येथे भारतीय मराठा महासंघ बीड जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीत नवीन नियुक्त्या देण्यात आल्या.त्या पुढील प्रमाणे : - बीड जिल्हा संघटक - मा. कृष्णा शिंदे, बीड जिल्हा सचिव:- मा. प्रशांत चव्हाण, बीड तालुका युवक प्रमूख मा.तेजस खेमाडे: - बीड तालुका युवती प्रमुख कु. दिव्या सोनवळकर, बीड शहर अध्यक्ष: - मा. सुभाष सावंत, बीड शहर सचिव : - मा. रमेश चव्हाण, चौसाळा सर्कल प्रमुख मा. आकाश काळे इ. च्या निवडी करण्यात आल्या व नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित मराठवाडा अध्यक्ष दत्ता शिनगारे, मराठवाडा सल्लागार मा. ऍड. शिवाजीराव सोळंके, बीड जिल्हा प्रमुख मा. नंदकिशोर खांडे पाटील, बीड जिल्हा उप प्रमुख मा. विठ्ठलराव नांदे पाटील ( मामा), जिल्हा संपर्क प्रमुख मा. संकेत ढेरे, महिला जिल्हा प्रमुख मा. सौ. सुमित्रा ताई नाईकवाडे, बीड तालुका प्रमुख मा.बंकट शिंदे,बीड तालुका सचिव मा. मेघराज गालफाडे, बालाघाट सचिव मा.प्रसाद हावळे मा. प्रसाद कुलकर्णी व इतर युवती आणि युवक उपस्थीत होते. यावेळी बीड जिल्ह्याचे माजी खासदार मा. जयसिंग काका गायकवाड यांनी पदाधिक

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा - आमदार अब्दुल सत्तार यांचे समर्थकांना अवाहन

Image
 सिल्लोड येथे येत्या रविवार रोजी होणार ऐतिहासिक सभा विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी         मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सिल्लोड येथे होणाऱ्या ऐतिहासिक सभेसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा असे अवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांना केले आहे.                      मा. सर्वोच्च न्यायालयात अभ्यासपूर्ण व सक्षमपणे ओबीसी समाजाची बाजू मांडत, ज्येष्ठ विधिज्ञांची फौज उभारून ओबीसी समाजाला न्याय मिळवून दिल्याबद्दल तसेच सिल्लोड - सोयगावच्या विकासासाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल 31 जुलै रविवार रोजी सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा ओबीसी समाज तसेच लोकनेते आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येणार असून सिल्लोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार लोकार्पण तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याहस्ते संपन्न होणार आहे.

पळसखेडा गावातील एकाच कुटूबातील तीन शेतकरी भावाडाचा विजेचा शॉक लागून दुदैवी मुत्यू

जालना/भोकरदन ( सखाराम पोहीकर ) जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पळसखेडा गावातील आप्पा जाधव या शेतकऱ्याचे तीन मुले विजेच्या शॉक लागून मुत्यूमुखी पडले या वेळी शिवचरीत्रकार यशवत गोसावी यांनी या तीन शेतकरी भावाडाना . किसान युवा सेनेच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली व हे सरकार शेतकऱ्याच्या जिवावर कस उठल्या बदल आपले विचार व्यक्त केले ते आपण पाहू शकता बातम्या व जाहिरात साठी संपर्क  श्री सखाराम पोहिकर बीड जिल्हा प्रतिनिधी  मो नं 98 22 43 1516

हिवरापहाडी रस्त्या चा प्रश्न कधी सुटणार, संदीप गोरे

Image
नागरिकांना जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास बीड प्रतिनिधी बीड तालुक्यातील हिवरा पाडी, बोरफडी, कुटे वाडी, जरुड आधी गावांचे रस्त्याची दयनीय अवस्था झालेली,  या रस्त्यावरूनच बीडसारख्या शहराला हा रस्ता जोडत आहे, या परिसरातील नागरिकांना जिल्ह्यावर जर यायचे असेल, तर त्यांना अर्धा तास ऐवजी ,एक तास लागतो, संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या गावच्या रस्त्याची दखल घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात यावा,  अशी मागणी हिवरा पाडी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवसेना येळंबघाट ऊप सर्कल प्रमुख संदीप गोरे यांनी केले आहे.

बीड जिल्ह्य़ातील गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणातील रॅकेटसाठी एसआयटी अथवा सीआयडीमार्फत चौकशी करा:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

Image
बीड जिल्ह्य़ात गर्भलिंग निदान व गर्भपात संदर्भात मोठे रॅकेट कार्यरत असुन स्थानिक राजकीय पुढारी तसेच वरीष्ठ प्रशासकीय आधिकारी यांच्या पाठीराख्यामुळे मुख्य सुत्रधारापर्यंत जाणीवपुर्वक पोहचत नसल्यामुळेच तपास यंत्रणेबाबत बीड जिल्हावासियांमध्ये संशय असून यापुर्वीही मयत शितल गाडेकर प्रकरणात पोलीस तपासयंत्रणेतील आधिका-यांचे संशयास्पद निर्णय यासाठी कारणीभूत असुन या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.१३ जुन रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "तपासयंत्रणेला सदबुद्धी द्या आंदोलन टाळ मृदंगाच्या गजरात करण्यात आले होते.   १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन;मुख्य सुत्रधार शोधण्यासाठी एसआयटी अथवा सीआयडीमार्फत मार्फत तपास करा:-डाॅ.गणेश ढवळे  बीड जिल्ह्य़ातील गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातील रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी बीड तालुक्यातील मौजे. बकरवाडी येथील मयत शितल गणेश गाडे अथवा परळी येथील गर्भपात प्रकरणात स्थानिक तपासयंत्रणेबाबत जनसामान्यात प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबधित प्रकरणाची पोलीस उपअधिक्षक

केंद्र सरकार ओबीसींची जनगणना करणार नसेल तर राज्य सरकारने बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जनगणना करावी- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

Image
समतेचे चक्र उलटे फिरविण्याचा काही लोकांचा प्रयत्न- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ समर्पित आयोगाने देखील ओबीसींच्या आरक्षणाला अडथळे आणले - महेश झगडे आयोगाने चुकीची माहिती समोर आणण्याचा प्रयत्न केला - प्रा. हरी नरके अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची मुंबईत बैठक संपन्न मुंबई, दि. २६ जुलै- केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी अशी आमची सुरवाती पासूनची मागणी आहे मात्र केंद्र सरकार ओबीसींची जनगणना करणार नसेल तर राज्य सरकारने बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जनगणना करावी अशी आग्रही मागणी राज्याचे माजी उमुख्यमंत्री व समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आज केली. आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारीणीची बैठक मुंबईत पार पडली यावेळी ते बोलत होते.  यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींचा इम्पिरिकल डाटा मिळावा यासाठी राज्यसरकारने समर्पित आयोगाची स्थापना केली. महेश झगडे यांच्यासारखे हुशार लोक त्यात घेतले मात्र महेश झगडे एकटेच लढत होते. आयोगाने अनेकवेळा घेतलेल्या भूमिकां

रासपचा दिल्लीत जंतर मंतरवर भव्य मोर्चा

Image
कार्यकर्त्यांनी हाजारो च्या संख्येने उपस्थित राहावे, युवक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर बीड प्रतिनिधी,  राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर साहेब,यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 5 ऑगस्ट रोजी पक्षाच्यावतीने दिल्लीत जंतरमंतरवर विविध मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, मराठवाड्यातील व बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष प्रा, अण्णासाहेब मतकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे,  याबाबत रासपा च्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 5 ऑगस्ट रोजी 2022 रोजी जातिनिहाय जनगणना करणे, ओबीसी आरक्षण कायम करण्यात यावे, नॉन क्रीमी लेयर ची अट रद्द करणे, 50% सिलिंग हटवणे, सार्वजनिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे, न्याय व्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण लागू करणे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव आणि खरेदीची हमी द्यावी, तसेच न

निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावा म्हणून वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक विभागाला निवेदन

Image
पाटोदा (गणेश शेवाळे )महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत लोकसभा या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात कारण नुकतेच राष्ट्रपती पदासाठी लोकसभेमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडली राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया ही बॅलेट पेपरवर घेण्यात आली आहे जर भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक बॅलेट पेपरवर होत असेल तर राज्यातील इतर निवडणुकाही बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत. राष्ट्रपती पदाची मतदान प्रक्रिया सोडता इतर सर्व निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारे घेण्याचा केंद्र सरकारचा अट्टाहास का. या ईव्हीएमच्या विरोधात अनेक पक्ष संघटनांकडून ईव्हीएम मशीनच्या संदर्भात तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाकडे झाल्या आहेत तसेच शास्त्रज्ञांनी व राजकीय विश्लेषकांनी ईव्हीएम मशीन हॅक होत असल्या संदर्भात आपले मत मांडले आहे व तसे पुरावे देखील सादर केले आहेत या सर्व बाबींचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र राज्यातील आगामी काळातील सर्व ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यासाठी प्रस्ताव पाठवावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधि

बैलगाडी तळ्यात पडुन कारेगव्हाण येथील ऊसतोड मजुराच्या बैलाचा मृत्यू

Image
बीड प्रतिनिधी,:-बीड तालुक्यातील कारेगव्हाण येथे काल सकाळी ९:३० च्या दरम्यान बैलगाडी घेऊन शेतात जात असताना अचानक बैलाचा पाय घसरून बैलगाडी तळ्यात पडुन बैलाचा जागीच मृत्यू झाला बीड तालुक्यातील कारेगव्हाण हे गाव ऊसतोड मजुरांचे गाव म्हणुन परिचित आहे येथे डोंगराळ भाग असल्याने येथील ग्रामस्थांना आपली उपजीविका भागविण्यासाठी ऊसतोडणी साठी जावे लागते याच गावातील गहिनीनाथ प्रभु खंदारे हे काल सकाळी ९:३० वाजता आपल्या शेतात वैरण आणण्यासाठी जात असताना अचानक बैलाचा पाय घसरून बैलगाडी तळ्यात पडली व बैलाचा जागीच मृत्यू झाला एक तर परिस्थिती अतिशय बिकट असताना हे येवढं मोठ संकट या ऊसतोड मजुरावर आले आहे महसुल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करण्यात आला या ऊसतोड मजुरांचे अतोनात नुकसान झाले असून शासन स्तरावर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे या मध्ये प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून शासन स्तरावर मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी संघर्ष सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष संतोष भैय्या खंदारे यांनी प्रशासनाकडे केली आहे

राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या पाटोदा तालुकाध्यक्ष पदी राणी सानप यांची निवड

Image
           बीड/पाटोदा  (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्त्या राणी सानप यांची राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या पाटोदा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली        राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या पाटोदा तालुकाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात येत आहे या निवडीमुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश आनेराव राज्य प्रवक्ते द्वारकादास फटाले यांच्यासह यावेळी संघटनेचे सचिव उमेश आनेराव बार्शी, शंकर वानेगावकर नांदेड,संजय मोगरे नाशिक, महीला अध्यक्ष विजयालक्ष्मी आनेराव,मिनल लिंबोळे,विजया माळी, मंगल डफळ,विद्या कातखडे संग्राम नागरगोजे बीड जिल्हाध्यक्ष,स्वाती आघाव बीड जिल्हाध्यक्ष,रोहीणी बांगर   तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पदाधिकार्यांनी या निवडीबद्ल अभिनंदनांचा वर्षाव केला.

वंचित च्या वतीने गेवराई नगर परिषद व पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित रहावे किशोर भोले तालुका महासचिव

Image
 गेवराई प्रतिनिधी :-वंचितच्या वतीने गेवराई नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या ईच्छूक उमेदवारांच्या मुलाखती, इच्छुकांनी उपस्थित रहावे.. महासचिव किशोर भोले... आगामी काळातील होऊ घातलेल्या गेवराई नगर परिषद पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम दि.२८/७/२०२२ वार गुरुवार रोजी ठिक ११:०० वाजता ईच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी वंचितचे राज्य उपाध्यक्ष तथा बीड जिल्हा प्रभारी प्रा किसन चव्हाण सर मराठवाडा अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे पाटील तक्रार निवारण समिती चे राज्य अध्यक्ष प्रा विष्णू जाधव सर बीड जिल्हा अध्यक्ष उद्धव खाडे साहेब व जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीतमध्ये ईच्छूक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत तरी गेवराई तालुक्यातील नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी ईच्छूक असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने गेवराई तालुका महासचिव किशोर भोले यांनी केले आहे तसेच वंचित बहुजन आघाडी गेवराई

बस फेऱ्या सुरू करा..आल इंडिया पॅंथर सेनेची मागणी..

Image
 अकोला प्रतिनिधी :-राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भाई भोळे विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले विदर्भ संपर्कप्रमुख अविराज सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली.. अकोला जिल्हा अध्यक्ष परवेज खान यांच्या नेतृत्वात.सदर निवेदन देण्यात आले.आलं इंडिया पॅंथर सेना अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुका च्या वतीने,,बस चालू करण्याबाबत ऑल इंडिया पँथर सेना मुर्तिजापूर तालुका यांच्या वतीने बस चालू करण्यासाठी निवेदन दिले,रामटेक,मंडुरा मार्गे नवसाळ तसेच मुर्तिज़ापुर मार्गे मधापुरी,कुरुम,तसेच मुर्तिजापूर अमरावती अड्नेरि बस थांबा हे निवेदन पँथर च्या वतीन देण्यात आले, शाळेकरी मुले हॉस्पिटल ला जाण्यासाठी रुग्णांचे खूप हाल होत आहे,. विद्यार्थी वेळेवर शाळेत जाऊ शकत बस फेऱ्या बंद असल्यामुळे खाजगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट होत आहे. प्रवाशांना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्वरित बस फेऱ्या सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन ऑल इंडिया पॅंथर सेना मुर्तीजापुर तालुक्याच्या वतीने देण्यात आले. लवकरात लवकर या गंभीर बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल..अकोल

शारदा प्रतिष्ठानकडून गेवराई शहरात टिपरे महोत्सावाचे आयोजन

Image
नोंदणी करण्याचे आयोजक विजयसिंह पंडित यांचे आवाहन गेवराई, दि.25 (प्रतिनिधी ) टिपरे या लोककलेचे गेवराईशी अतुट नाते आहे, या लोककलेची परंपरा टिकावी म्हणून शारदा प्रतिष्ठानकडून  नापंचमीच्या सणानिमित्त टिपरे महोत्सवाचे आयोजन दि.३ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. टिपरे लोककलेसह विविध कलाकारांना या उत्सवात आपले कलाविष्कार सादर करण्याची संधी मिळणार आहे. गेवराईची लोककला टिकावी आणि नविन पिढीमध्ये रुजावी यासाठी जाणीवपूर्वक अनेक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. यासाठी जास्तीत जास्त लोककलावंत आणि संघांनी आपला सहभाग निश्चित करण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन महोत्सवाचे आयोजक विजयसिंह पंडित यांनी केले आहे. नागपंचमीच्यानिमित्ताने टिपरे आणि सोंग या कलाविष्काराचे आयोजन गेवराई शहरात अनेक वर्षांपासून केले जाते. वास्तविक गेवराईची लोककला म्हणून या कलाविष्काराकडे पाहिले जाते. लोककलेचा हा वारसा पुढच्या पिढीला कळावा आणि त्याचे जतन व्हावे या उद्देशाने बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सन २०१९ पासून गेवराई शहरात नेत्रदिपक टिपरे महोत्सवाचे आयोजन केले होते. मात्र कोविड संक्रमणाच्या कठिण परि

माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशनच्या वतीने बीडकर आरूण, कु.पुजा पवार यांचा वाढदिवस साजरा

Image
 बीड प्रतिनिधी /.दि.२५ माँसाहेबप्रेरणा कार्यालय बीड येथे माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशनच्या वतीने आँर्गनायझेशनचे पहिले सदस्य आरूण बीडकर व कु.पुजा पवार यांचा वाढदिवस साजरा या वाढदिवसाचे आयोजन पञकार संजय कुलकर्णी यांनी केले होते.या वाढदिवस कार्यक्रमाला प्रमुख ऊपस्थीती प्रेरणा गुरूकुल चे संस्थापक आध्यक्ष देवीदास पवार अँड.कु.प्रेरणा सूर्यवंशी हे होते. अँड.कु.प्रेरणा सूर्यवंशी यांनी आँर्गनायझेशनच्या वतीने दोघांनाही वाढदिवसाबद्दल मनपुर्वक शुभेच्छा दिल्या. नियुक्तीबद्दल बोलताना म्हणाल्या की ईश्वर त्यांना भरभराटी देओ पुजा पवार व आरूण बीडकर यांना दिर्घायुष्य देवुन यश भरभरून देवो हि ईश्वर चरणी प्रार्थना. ते संघटना वाढीसाठी करत आसलेल्या प्रयत्नाबद्दल ही आभार व्यक्त केले. माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशनचा नावलौकीक करावा. तसेच अँड.प्रेरणा सूर्यवंशी मँडमनी पुढील कार्यास व वाटचालीस त्यांना शुभेच्छाही दिल्या.संस्थापक आध्यक्षा अँड. प्रेरणा सूर्यवंशी यांनी टाकलेल्या विश्वासाच ऊत्तर देताना पुजा पवार म्हणाली की मी आँर्गनायझेशनची बीड प्रवक्ता म्हनुन चांगले काम करून दाखवेल.की मी बीड तालुक्यातील महिला

जिल्ह्यात आरटीई अंतर्गत १ हजार ६३६ विद्यार्थ्यांना मिळाले इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश - मनोज जाधव

Image
१९४ विद्यार्थी आणखी प्रवेश मिळण्याच्या प्रतीक्षेत बीड (प्रतिनिधी ) दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत विनाअनुदानित शाळा मध्ये प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे. बीड जिल्ह्यात निकष पात्र २२७ शाळा मध्ये १ हजार ९०८ जागा उपलब्ध होत्या या जागांवर आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावे यासाठी ४ हजार ९५२ इतके अर्ज पालकांनी ऑनलाईन पद्धतीने दाखल केले होते. त्या पैकी १ हजार ८३० पात्र विद्यार्थ्यांची निवड मोफत प्रवेशासाठी करण्यात आली होती. त्या पैकी १ हजार ६३६ विद्यार्थ्यांना आता मोफत प्रवेश मिळाला आहे. तर १९४ विद्यार्थी आणखी प्रवेश मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत अशी माहिती शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे.          आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा यादीतील चौथा टप्पा प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आला असून २२ ते २७ जुलै दरम्यान या टप्प्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रतीक्षा यादीतील पुढील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेशाची संधी मिळावी , यासाठी हा निर्णय घे

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे बिगूल वाजले आपच्या वतीने प्रभाग क्रमांक 21 आकुर्डी मध्ये कोपरा सभा संपन्न

Image
    आम आदमी पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 21 आकुर्डी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बंटीग्रुप बिल्डिंग समोर आकुर्डी या प्रभागातील इच्छुक उमेदवार वैजनाथ शिरसाट यांच्या प्रचारार्थ कोपरा सभा पार पडली, यावेळी बोलताना वैजनाथ शिरसाट यांनी प्रभागातील अनेक समस्यांची पोलखोल केली, त्यांनी सांगितले आम आदमी पार्टीची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ता आल्यास महापालिकेत उच्चदर्जाच्या शाळा, 24तास मोफत पाणी देण्यात येईल, महिलांसाठी बस फ्री करण्यात येईल, शास्तिकराचा विषय कायमचा मार्गी लावण्यात येईल असे त्यांनी म्हटले,     महागाईने जनता मेटाकुटीला आलेली आहे येणाऱ्या काळात ही जनता भाजपला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी म्हटले,    वैजनाथ शिरसाट गेली पंधरा वर्षे त्या प्रभागांमध्ये सामाजिक कार्य करत आहेत, त्यांना स्थानिकांसह ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा या भागांमधून आहे ते ओबीसी संघर्ष सेना पिंपरी-चिंचवड संघटनेचे अध्यक्ष आहेत.    या वेळी आपचे प्रवक्ते प्रकाश हगवणे बोलतांना म्हटले एकेकाळी श्रीमंतीचा रुबाब असणारी महानगरपालिका सत्ताधार्यांच्या कोट्यावधीच्या घोटाळ्यामुळे

माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Image
युवा नेते किशोर खोले यांचा राक्षसभुवन जि.प.शाळेत उपक्रम पाटोदा (गणेश शेवाळे )माजी मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त तालुक्यातील राक्षसभुवन येथील जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.युवा नेते किशोर खोले यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आपल्या नेत्याचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला पाहिजे या भावनेतून किशोर खोले यांनी हा उपक्रम राबविला.या वेळी भाजपा तालुका सरचिटणीस एम.एन.बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर,विवेक् पाखरे ,विठ्ठल वनवे,प्रकाश खेडकर, संकेत सानप, दत्तात्रयय तांबे,जितेंद्र खोले, संजय आघाव,बाळू सांगळे व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

आगामी निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात वंचितची मागणी.

Image
राष्ट्रपतीची निवडणूक बॅलेटपेपरवर तर ईतर ईव्हीएम मशिनवर का घेता? गेवराई / प्रतिनिधी  नुकतीच देशाच्या सर्वोच्च पदाची राष्ट्रपती पदाची निवडणुक झाली या निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आले, याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यासह देशभरातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या निवडणूका बॅलेट पेपरवरच घ्याव्यात यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभरात तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तहसिलदार, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य यांना निवेदनद्वारे मागणी केली.  वंचित बहुजन आघाडीच्यावताने या आधी देखील घंटानाद, रस्तारोको अशी विविध अंदोलने करत निवडणुकीचे मतदान हे बॅलेटपेपरवर घेण्यात याव्यात यासाठी अंदोलने केली. बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची सर्वप्रथम मागणी वंचीत बहुजन आघाडीने केल्यानंतर देशातील अनेक पक्ष, संघटणा यांनीही मागणी केली, विविध राज्याच्या विधानभवनात व देशाच्या संसदभवनात ईव्हीएम मशीनचा जोरदार विरोध करण्यात आला त्याचसह ईव्हीएम मशीन हे इलेक्ट्रॉनिक उपकरण असल्याने ते हॅक होऊ शकते याची प्रात्याशिके दाखवली. तसेच इलेक्ट्रॉ