नगर परिषद बीडमधील गणेश पगार चे कथित भ्रष्टाचार प्रकरण

नगर परिषद बीडमधील गणेश पगार चे कथित भ्रष्टाचार प्रकरण 

चौकशी न झाल्यास २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण अक्षय कोकाटे
बीड | प्रतिनिधी

नगर परिषद बीड येथील कथित करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत संबंधितांविरोधात दिलेल्या निवेदनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत मा. जिल्हाधिकारी बीड यांना दि. 29 एप्रिल 2026 रोजी तसेच मा. मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांना दि. 23 एप्रिल 2026 रोजी निवेदन देण्यात आले होते. या निवेदनामध्ये नगर परिषद बीड येथील आस्थापना, लेखा, स्वच्छता आदी विभागांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडून कथित आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या मुलगा व मुलगी यांची नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून झालेली नियुक्ती, त्यांची ऑर्डर प्रक्रिया व भरतीची वैधता याबाबतही चौकशीची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात श्री. गणेश तुळशीराम पगारे, सहा-लेखापाल नगर परिषद बीड यांच्या विरोधात स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून सखोल तपास करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती.

मात्र, इतका कालावधी उलटूनही कोणतीही चौकशी अथवा कार्यवाही न झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात आता आंदोलनाचा पवित्रा घेत दि. 28 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड समोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

पूर्वी हे उपोषण दि. 26 मे रोजी होणार होते; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे आंदोलनाची तारीख बदलून 28 मे करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

 “भ्रष्टाचार प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते अक्षय कोकाटे यांनी दिला आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी