Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी कुस्ती स्पर्धेमध्ये फडकवला विजयाचा झेंडा

Image
धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी कुस्ती स्पर्धेमध्ये फडकवला विजयाचा झेंडा-- रौप्य व कांस्यपदकाच्या ठरल्या मानकरी-- जनता शिक्षण संस्थेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा-- आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे) :   खोपोली येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कुमारी. स्वरा मोडक. ६२ केजी गटामध्ये रौप्य पदक , कुमारी तनुजा गोडांबे ५५ केजी कास्यपदक, तर कुमारी अद्विता फिरंगे ३३ केजी गटामध्ये कास्यपदक पटकावले .   जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील खेळाडूं विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले . जणता शिक्षण संस्थेच्या शिरपेच्यात पुन्हा मानाचा तुरा खौवला . या सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थिनींचे जनता वसतिगृह शिक्षण संस्थेचे सचिव श्री. विजयकुमार बांदल (अण्णा) , अध्यक्ष श्री. अब्दुल (भाई) सय्यद. प्राचार्य श्री. सय्यद ए .डी सर,संस्थेचे व्यवस्थापक श्री. विशाल( भैय्यासाहेब) बांदल , वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. विक्रम बांदल सर,उप ...

आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावरील क्रीडा स्पर्धेमध्ये मिळवले यश

Image
आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावरील क्रीडा स्पर्धेमध्ये मिळवले यश-- जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेच्यात विद्यार्थ्यांनी खोवला मानाचा तुरा--  आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) : जिल्हास्तरावर संपन्न होत असणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धेमध्ये जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले . १० ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हास्तरावरती क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या . या क्रीडा स्पर्धा मध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन खेळाडू विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रकाराचा उत्कृष्ट सराव करत हे उत्तुंग यश मिळवले .  यामध्ये कोल्हे आदित्य. रा. वाघळुज . भालाफेक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. तर ओमकार मिसाळ. रा. हातोळण थाळीफेक स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली .  जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्य...

श्रावण नामदेव जगतकर : पँथर ते यशस्वी पालक

Image
श्रावण नामदेव जगतकर : पँथर ते यशस्वी पालक! संघर्ष, स्वाभिमान, जिद्द आणि संस्कारांतून घडलेले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व “माणूस किती वर्षे जगला, यापेक्षा तो कसा जगला, हे अधिक महत्त्वाचे असते. स्वतःच्या कष्टाने आयुष्य घडवणे आणि आपल्या संस्कारांनी पुढची पिढी घडवणे, हेच खऱ्या आयुष्याचे यश असते.” माणसाचा जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा अटळ नियम आहे. मात्र, काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने, संघर्षाने, विचारांनी आणि जगण्याच्या मूल्यांनी समाजाच्या स्मरणात कायमचे स्थान निर्माण करतात. स्वतःच्या कष्टाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कुटुंबाला प्रगतीच्या मार्गावर नेणारे आणि सामाजिक चळवळीशी निष्ठा जपणारे श्रावण नामदेवराव जगतकर हे असेच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. मेहनत, जिद्द, चिकाटी, स्वाभिमान, निर्भीडपणा आणि निर्व्यसनी जीवनशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती. त्यांचा जीवनप्रवास म्हणजे केवळ एका व्यक्तीच्या संघर्षाची कहाणी नाही, तर एका सामान्य कुटुंबाने शिक्षण, कष्ट आणि संस्कारांच्या बळावर यशाकडे कशी वाटचाल केली, याचा प्रेरणादायी दस्तऐवज आहे. पेपर टाकणाऱ्या युवकापासून सरका...

वा रे वा! भाजप सरकार! दुष्काळात विद्यार्थ्यांची फी माफी, मग पाटोद्यात विविध कॉलेज मधून फी वसुलीचा तगादा का?

Image
वा रे वा! भाजप सरकार! दुष्काळात विद्यार्थ्यांची फी माफी, मग पाटोद्यात विविध कॉलेज मधून फी वसुलीचा तगादा का? पाटोदा (गणेश शेवाळे) दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला दिलासा देण्यासाठी सरकारकडून फी माफीची घोषणा केली जाते; मात्र पाटोद्यात विद्यार्थ्यांना कॉलेजची फी भरण्यास सांगितले जात असल्याची तक्रार समोर येत आहे. फी भरली नाही तर परीक्षेला बसता येणार नाही, असे विद्यार्थ्यांना सांगितले जात असल्याचा आरोप आहे. एकीकडे भाजप सरकारकडून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची भूमिका मांडली जाते, तर दुसरीकडे फी भरण्याच्या दबावामुळे विद्यार्थ्यांसमोर परीक्षेचे संकट उभे राहत असेल, तर या सवलतीचा प्रत्यक्ष लाभ मिळतोय कुठे? सरकारची घोषणा विद्यार्थ्यांसाठी, मग प्रत्यक्षात फीचा भार विद्यार्थ्यांच्याच डोक्यावर का? दुष्काळात शेतकऱ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असताना मुलांच्या शिक्षणासाठी पैसे आणायचे कुठून? शासनाने फी माफीचे लागू असलेले नियम स्पष्ट करावेत आणि पात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये, अशी मागणी होत आहे.

फसव्या शेतकरी कर्जमाफीच्या निषेधार्थ शेतकरी सुनील जावळे यांचे पाटोदा तहसीलसमोर समाधी आंदोलन

Image
फसव्या शेतकरी कर्जमाफीच्या निषेधार्थ शेतकरी सुनील जावळे यांचे पाटोदा तहसीलसमोर समाधी आंदोलन! पहिल्या यादीत नाव, खात्यात पैसे नाहीत; जुन्या कर्जामुळे नवीन पीककर्जही मिळेना, शेतकऱ्यांचा संताप! पाटोदा (प्रतिनिधी ) : ज्याच्या घामातून शेतात पीक उभे राहते, ज्याच्या कष्टावर संपूर्ण देशाची भूक भागते, त्याच बळीराजाला आज आपल्या हक्काच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. कर्जमाफीच्या पहिल्या यादीत नाव आले, पण बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत. जुन्या कर्जाचा प्रश्न कायम असल्याने नवीन पीककर्ज मिळवतानाही अडचणी येत आहेत. मग शेतकऱ्याने शेती करायची कशी? कुटुंबाचा संसार चालवायचा कसा? आणि पुढच्या हंगामाची तयारी करायची तरी कोणत्या पैशांत? या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी सुनील जावळे यांनी पाटोदा तहसील कार्यालयासमोर समाधी आंदोलन करून निषेध व्यक्त केला. कर्जमाफीच्या घोषणांनंतरही प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याची तक्रार या आंदोलनातून पुढे आली आहे. यादीत नाव आले, पण शेतकऱ्याच्या पदरात काय? कर्जमाफीच्या पहिल्या यादीत नाव आल्यावर शेतकऱ्याच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला असेल. आता ड...

पिक कर्जासाठी लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन

Image
पिक कर्जासाठी लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन! वैयक्तिक व जामीनदाराच्या थकीत कर्जामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पिक कर्ज नाकारल्याचा आरोप; सक्तीची कर्जवसुली थांबविण्याची मागणी — डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश : (दि.१५ ) ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यात अडथळे येत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वैयक्तिक कर्जाची थकबाकी तसेच जामीनदाराच्या खात्यावरील थकीत देयकांमुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लिंबागणेश शाखेकडून पिक कर्जाचे अर्ज पुढील प्रक्रियेसाठी स्वीकारले जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. थकीत कर्जाच्या अटींमुळे पिक कर्जाचा मार्ग अडल्याचा आरोप महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लिंबागणेश शाखेत पिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना वैयक्तिक कर्जाची थकबाकी किंवा जामीनदाराच्या खात्यावरील ...

विराट जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा – नागेश शिंदे, सतीश शिनगारे

Image
विराट जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा – नागेश शिंदे, सतीश शिनगारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती  बीड (प्रतिनिधी ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) जिल्हा बीडच्या वतीने शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विराट जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. रामदासजी आठवले साहेब यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. पपुजी कागदे, किसना तांगडे यांची उपस्थिती असणार आहे. या विराट जाहीर सभेच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, महिला तसेच वंचित आणि उपेक्षित घटकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. त्यामुळे बीड तालुक्यातील नाळवंडी सर्कल आणि पिंपळनेर सर्कल मधील नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागेश शिंदे व सतीश शिनगारे यांनी केले आहे. सभेत दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति ह...