Posts

Showing posts from October, 2022

शेख लाल हूसेन यांचा सेवा निवृत्ती निमित्त सत्कार संपन्न.

Image
पाटोदा (प्रतिनिधी ):~ पाटोदा येथील रहिवासी व सध्या बीड येथे स्थाईक असलेले शेख लाल हुसेन हे वस्तु व सेवाकर (GST) कार्यालय बीड येथे ३८ वर्षे यशस्वी नोकरी करून नियत वयोमानानुसार आज वयाच्या ६० व्या वर्षी सेवा निवृत्त झाले. या निमित्त त्याचे वस्तु व सेवाकर कार्यालया कडुन सत्कार करण्यात आला, व पुढील आयुष्य सुख, समृद्धी, शांती व आरोग्यदायी जावो म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी वस्तु व सेवाकर कार्यालयाचे नागरगोजे साहेब (सहाय्यक राज्य कर आयुक्त), फाटे साहेब (आस्थापना अधिकारी), सचिन जाधव साहेब (राज्य कर अधिकारी), बेद्रे साहेब, डोंगरे साहेब, गर्जे साहेब, नांदरे साहेब, केदार साहेब, विनोद बडे साहेब, निलेश बडे साहेब, ठोसर साहेब, मुंडे साहेब, लोकरे साहेब, माने साहेब, कदम साहेब, यांच्या सह कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व कुटुंबीय उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रवचनकार विवेक कुरुमकर महाराज यांचे कीर्तन गव्हाणी पाणी येथे संपन्न

Image
  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54 पुण्यतिथी निमित्त दिनांक 31.10.2022 ला रात्री 8 वाजता राष्ट्रीय कीर्तनकार प्रवचनकार विवेक कुरुमकर महाराज यांचे कीर्तन गव्हाणी पाणी येथे मोठ्या गावकरी मंडळीत उपस्थितीत संपन्न झाले .महाराजांनी आपल्या कीर्तनातून माणसाने माणसाशी कसं वागावं तरुणांनी कसं वागावं आजच्या परिस्थितीवर अतिशय मार्मिक पणे कीर्तनातून बोध दिला संतांच्या मते माणूस कसा असावा हे त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं कीर्तनाच्या कार्यक्रमाला साथ संगत करणारी मंडळी सिद्धिविनायक गुरुदेव सेवा मंडळ रेल्वे पेटीवादक प्रभाकर दादा हिवराळे ,हिम्मत दादा काळे तबलावादक गौरवदादा देवघरे ,बंडू दादा जुनघरे ,पाटीलकाका नारायणजी ठाकरे ,विशाल ठाकरे विनोदजी कुर्जेकर सचिनदादा धांदे,व गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला मंडळी तरुण मंडळी हे सर्व मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

छगन भुजबळ यांच्याकडे नाशिक मुंबई रस्ता दुरुस्तीसाठी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी ६ नोव्हंबरपर्यंत मागितली वेळ

Image
नाशिक मुंबई रस्ता ६ नोव्हेंबरपर्यंत खड्डेमुक्त करू ; आंदोलन न करण्याची अधिकाऱ्यांची छगन भुजबळ यांना विनंती नाशिक मुंबई रस्ता ६ नोव्हेंबरपर्यंत खड्डेमुक्त होणार नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांची छगन भुजबळ यांना माहिती नाशिक,दि.३१ ऑक्टोबर :- नाशिक मुंबई रस्ता दि.६ नोव्हेंबर पर्यंत संपूर्णपणे खड्डेमुक्त करण्यात येईल. तो पर्यंत आंदोलन करू नये अशी विनंती नॅशनल हायवे प्राधिकरणचे प्रकल्प संचालक साळुंखे यांनी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. त्यानुसार छगन भुजबळ यांची ही विनंती मान्य करत उद्या आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला असून दि.६ नोव्हेंबर पर्यंत अधिकाऱ्यांना वेळ वाढवून दिला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या आठवड्यात नॅशनल हायवे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते पडघा दरम्यान रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली होती. पाहणी झाल्यानंतर दि.३१ ऑक्टोबर पर्यंत रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा १ नोव्हेंबर पासून टोल बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तेव्हापासून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून सातत्याने रस्त्याच्या कामाबाबत पाठपुरावा सुरु होता

धन्यवाद मोदी अभियाना अंतर्गत पोस्ट पत्र लाभार्थ्यातून भरून घेऊन जिल्ह्याच्या खासदार प्रीतम ताई मुंडे यांना मा.आ.भीमराव धोंडे, रघुनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपुर्द

Image
आष्टी प्रतिनिधी  धन्यवाद मोदी अभियाना अंतर्गत पोस्ट पत्र लाभार्थ्यातून भरून घेऊन जिल्ह्याच्या खासदार प्रीतम ताई मुंडे यांना मा.आ.भीमराव धोंडे, रघुनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले याप्रसंगी संघटक मंत्री संजय जी कौडगे , जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के ,मा.आ.भिमरावजी धोंडे , जिल्हा संयोजक डॉक्टर अभय वनवे, शंकर देशमुख , धन्यवाद मोदीजी अभियान आष्टी तालुका सहसंयोजक रघुनाथ शिंदे, राम शेळके ,संदीप नागरगोजे, भरत खाडे धन्यवाद मोदीजी अभियान आष्टी तालुका सहसंयोजक व इतर मान्यवर उपस्थित होते

कृषी महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी येथे इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Image
आष्टी प्रतिनिधी कृषी महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी येथे इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1966 ते 1977 या काळात सलग तीन वेळा देशाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर 1980 मध्ये पुन्हा या पदावर पोहोचल्या. त्यांना आयरन लेडी ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. 31 ऑक्टोबर 2022 लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 147 वी जयंती साजरी करण्यात आली. सरदार पटेल हे स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्रीही होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण देशाला एकात्मतेच्या धाग्यात बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच वल्लभभाई पटेल यांची जयंती देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. कृषी महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन साजरा करुन सर्वांनी एकात्मतेची शपथ घेतली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीराम आरसुळ, प्राचार्य साईनाथ मोहळकर,इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

उपसंचालक यांची पाटोदा ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) आरोग्य उपसंचालक यांनी रात्रीच्या सुमारास पाटोदा ग्रामीण रुग्णालय यांना अचानक भेट देऊन रुग्णालयाचा आढावा घेत सर्व विभागाची पाहणी करून मेडिसिन विभागातील औषध गोळ्यांची एक्सपायरी दिनांक चेक केली. रुग्णालय परिसर स्वच्छते बाबत ग्रामीण रुग्णालय स्टाफचे कवतूक करत खूप स्वच्छ परिसर व रुग्णालय आहे असे मत आरोग्य उपसंचालक यांनी व्यक्त केले.ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची विचारपूस करत अडीअडचणी विचारल्या व सर्व दस्तावेज यांची पाहणी केली व स्वतः बायोमेट्रिक हजेरी लावून पाहणी केली त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राऊत व पाटोदा ग्रामीण रुग्णालय मधील सर्व स्टाफ उपस्थित होता

हातगाव येथील आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर व कर्मचारी यांचा मनमानी कारभार

Image
हतगाव प्रतिनिधी:- शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांचा व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे समोर आले. सोमवारी दुपारी साडेबारा ते एक च्या सुमारास हातगाव येथील रहिवासी गजराबाई रावसाहेब अभंग या वयस्कर महिलेला अचानक चक्कर व मळमळ होऊ लागली म्हणून त्यांच्या दिव्यांग मुलगा लक्ष्मण रावसाहेब अभंग हा आपल्या आईला घेऊन आरोग्य केंद्रत दाखल झाला. अभंग यांच्या आईला त्रास जास्त होत होता. हॉस्पिटलमध्ये कुठल्यातरी विषयावर मीटिंग चालू होती. अभंग यांनी पेश़न्ट ला तपासा डॉक्टरांना विनंती केली. परंतु डॉक्टरांनी सांगितले आमची मिटींग आहे आम्ही तीन वाजल्यानंतर पाहू. आईला जास्त वेदना होत असल्यामुळे अभंगांनी त्यांना दोन-तीन वेळा विनंती केली. तुम्हाला मीटिंग महत्त्वाची की पेशंट असं बोलल्यानंतर डॉक्टरांना राग आला. मुख्य अधिकारी डॉ तिडके मॅडम यांनी पेश़न्ट ला बाहेर काढा आसे सागितले. या सर्व प्रकाराला पाहून लक्ष्मण अभंग यांनी पत्रकार अविनाश बुटे यानां फोनवरून हा प्रकार सांगितला. बुटे गावातील असल्यामुळे ताबडतोब दवाखान्यात पोहचले व बुटे यांनी जाब विचारायला गेल्यास

तुमचे मिटले असेल पण जनतेच्या पैशाचे काय?: रंगा राचुरे,आप

Image
५० खोकी हा विषय केवळ रवी राणांच्या दिलगिरीचा नाही, ५० कोटी प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी व्हावी: आम आदमी पार्टी तुमचे मिटले असेल पण जनतेच्या पैशाचे काय?: रंगा राचुरे,आप आज बीजेपी आमदार रवी राणा यांनी माफी मागितली आहे तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, या सरकारचे समर्थक आमदार बच्चू कडू व रवी राणे अशी चर्चा झाल्याचे समजते. हे सर्व सत्ताधारी बाकांवरील आमदार आहेत. दोघांमधील वाद चव्हाट्यावर येण्यास कारण ठरलंय गुवाहाटी आणि खोके. रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर टीका करताना ५० खोके घेतल्याचा आरोप केला आहे. बच्चू कडूंनी शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला आहे. रवी राणांनी केलेल्या आरोपांवर सुरूवातीला बच्चू कडूंनी मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे), उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) यांनाही यात भूमिका मांडण्याचं आवाहन केलं होतं. खरे तर हा प्रश्न जनतेच्या पैशाचा आणि मतदारांच्या अपेक्षांभंगाचा आहे. हे सर्व फुटीर आमदार कोणत्या आमिषाला बळी पडले आहेत असा जनतेच्या मनात प्रश्न आहे. केला गेलेला आरोप हा तब्बल पन्नास कोटींचा आहे आणि शिंदे गटात सामील झालेल्या आमदा

बंजारा समाजाच्या मदतीला धावून आले युवक नेते माणिक भाऊ फड

Image
बंजारा समाजाची हाक ... अन् माणिक भाऊंची साथ बंजारा समाजाच्या मदतीला धावून आले युवक नेते माणिक भाऊ फड परळी प्रतिनिधी - परळी तालुक्यातील कन्हेरवाडी परिसरातील जांभूळदरा तांड्यावरील रस्ता परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्टी मध्ये वाहून गेल्याने या परिसरातील शेतकरी व मुख्यत्वे तांड्यावरील नागरिकांना रहदारीसाठी पर्यायी रस्ताच उपलब्ध नसल्याचे लक्षात येताच कन्हेरवाडी येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा युवक नेते माणिकभाऊ फड यांनी शेतकरी तसेच बंजारा समाजाच्या मदतीला धावून येत स्वखर्चाने रस्ता दुरुस्ती करून जांभूळदरा तांड्यावरील नागरिकांच्या दळणवळणाचा जिव्हाळ्याचा प्रश्न मिटवला असून बंजारा समाजाच्या वतीने माणिक भाऊ फड यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. याबाबत माहिती अशी की, परतीच्या पावसाने मराठवाड्यात सर्वत्र धुमाकूळ घातला होता. बीड जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले. परतीच्या पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन ग्रामीण भागामध्ये वाड्या, वस्त्या व तांड्यावरील रस्त्यांचे देखील अतोनात नुकसान झाले होते. याच परतीच्या पावसामुळे परळी तालुक्यातील कन्ह

कठोर आजारपण,हरवलेला आत्मविश्वास, आलेली आर्थिक मंदी आणि अंधश्रद्धा

Image
      दवाखान्यात एकटाच बसलो होतो. नुकतंच एका रुग्णाच सलाईन संपवून खुर्चीवर येऊन बसलो. मन आनंदी होत, दुपारची वेळ होती बाजारात कुजबुज वाढत होती गर्दी च्या आवारात दवाखाना असल्याने नेहमी वर्दळ, दुपारच्या अल्प आहाराने डोक्यात आरामाची संकल्पना येतं होती.नुकतेच खुर्चीवर टेकलो तोच एक छोटा मुलगा आला आणि जखमेवर मारायचा स्प्रे आहे का? अस त्यानं विचारलं. मी मेडिकल मध्ये विचारायला सांगितलं आणि तो मेडिकल वर गेला .थोड्या वेळात तो आणि त्याची आई माझ्याकडे आले आणि त्यांनी त्यांच्या मंदिरात आनलेल्या रूग्नाबद्दल विचारणा केली. रुग्णाचा आजार संगताना त्यांनी ताप डोक्यात गेल्याने रुग्णांच्या दोन्ही पायाच्या नसा बंद पडल्याच सांगितलं.आणि मूत्र नालिकेतून रक्त येत असल्याकारणाने कॅथेटर डायरेक्ट मूत्राशयातून शस्त्रक्रिया करुन टाकले आहे असे त्यांनी सांगितले. सगळ एकूण घेतल्यानंतर मी त्यांना संगितल तूम्ही जा मी उद्या किंवा परवा माझ्या वेळेनुसार येईल आणि मलमपट्टी करील त्यावर ते दोघे निघून गेले. मी औषधोपचार दीले नाहीत कारण रुग्ण पाहिल्याशिवाय देणार तरी कस ? नंतर मी तो पेशंट पाहण्यासाठी गेलो तर कॅथेटर च्या जा

माध्यमांची एकाधिकारशाही लोकशाहीसाठी घातक :एस.एम.देशमुख

Image
शेगाव : देशातील ९० टक्के मिडिया २५ भांडवलदारांच्या हाती एकवटला असून तो सत्तेची तळी उचलून धरताना दिसतो आहे ही स्थिती आणि एकूणच माध्यमांची एकाधिकारशाही लोकशाहीसाठी मारक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार आणि मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी व्यक्त केले.. मराठी पत्रकार परिषद सलग्न बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाचा जिल्हास्तरीय मेळावा आणि नवनिर्वाचित पदाधिकारयांचा सत्कार काल शेगाव येथे करण्यात आला.. त्यावेळी देशमुख बोलत होते.. एस.एम देशमुख म्हणाले, एकट्या रिलायन्सच्या ताब्यात ३६ चॅनल्स आहेत, अन्य २४ मोठ्या मिडिया हाऊसेसकडे देखील मोठ्या संख्येनं चॅनल्स, वर्तमानपत्रं एकवटलेली आहेत.. एनडीटीव्ही सारखे स्वतंत्र विचारांचे आणि तटस्थ बाण्याचे चॅनल देखील आता भाडवलदाराच्या ताब्यात गेले आहे...त्यामुळे आजच्या माध्यमात लोकभावनांचे प्रतिबिंब उमटत नाहीत अशा तक्रारी लोक करतात.. विशिष्ट राजकीय पक्षांची मुखपत्रं असल्यासारखी, आणि "हम करे सो कायदा बाण्यानं" ही माध्यमं वागत असल्याने राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा मुख्य मिडियात कुठेच दिसत नाही.. सोशल मिडिया नसता त

माजी विद्यार्थी २२ वर्षांनंतर पुन्हा रमले दहावीच्या वर्गात,माजी विद्यार्थी मेळावा व कृतज्ञता सोहळा संपन्न

Image
. सोयगाव (प्रतिनिधी / यासीन बेग ) सोयगाव , दि , ३०, जिल्हा परिषद महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा जिल्हा परिषद येथे तब्बल २२ वर्षानंतर एकत्र जुन्या आठवणींना उजाळा सोयगाव येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे सन २००१ ते २००२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. या स्नेह मिलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक लक्ष्मण रोकडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषेद चे शिक्षक एस. आर. नाईक, एकनाथ महाजन, जे.व्ही. जगताप, श्रीमती मंगला बोरसे लाभले होते. उपस्थित शिक्षक वृंद यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सर्व शिक्षकवर्गाने माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याचबरोबर अनमोल असे मार्गदर्शनही केले. यावेळी सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शाळा आणि जुन्या वर्ग मित्रमैत्रिणींच्या आठवणींना उजळा मिळाला एकत्रित शिक्षण घेतले हे सर्व विद्यार्थी आज सैनिक, प्राध्यापक, शिक्षक, इंजिनिअर, पोलीस, समाजसेवक, राजकीय अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचबर

भगवान विद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधीजी यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

Image
बीड (प्रतिनिधी ):- भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयामध्ये आपल्या देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून तर आपल्या देशाच्या भूतपूर्व महिला पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोकराव मिसाळ, उपमुख्याध्यापक श्री वासुदेवराव येवले,श्री डी.पी.डोळे व श्री सूर्यभान मिसाळ यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सर्वांना शपथ देण्यात आली.

तहसीलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर नालीत सिमेंट पाईप टाकले;अभ्यागतांचा त्रास कमी,तहसीलदार सुहास हजारे यांनी घेतली बातमीची दखल

Image
बीड (प्रतिनिधी ) - शहरातील अहेमदनगर रोड वरील तहसील च्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच्या नालीत  सिमेंट पाईप टाकण्यात आले. याविषयी प्रकाशित करण्यात आलेल्या बातमी ची दखल तहसीलदार सुहास हजारे यांनी घेतल्याने अभ्यागतांचा त्रास कमी झाला आहे.                 याविषयी सविस्तर वृत्त असे की, "हजारे साहेब तहसीलचे मेन गेट उघडले आभार !" "आता दोन्ही गेट समोरील नाली बनवून स्लॅब टाकायला लावा" या शीर्षकाने दैनिक न्यूज २३ पोर्टलवर बातमी प्रकाशित केली होती. याची दखल घेऊन तहसीलदार सुहास हजारे यांनी गेट समोरील नालीत सिमेंट पाईप टाकून त्यावर मुरूम टाकत आपल्या कर्तव्यदक्षतेची चुणूक दाखवली आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीड शहरातील तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उघडी नाली आणि काँक्रिटीकरण नसल्याने कार्यालयात ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांसह दुचाकी स्वारांची मोठ्या प्रमाणात अडचण झाली होती व त्रासही वाढला होता. ही बाब हेरुन या त्रासाचे वर्णन करत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी बातमीच्या माध्यमातून लक्ष वेधले होते. याची दखल घेऊन कर्तव्यदक्ष तहसीलदार म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झाले

प्रगती तांबे हिची एमबीबीएस शिक्षणासाठी निवड

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) पाटोदा तालुक्यातील तांबाराजूरी येथील माजी सैनिक अशोक नानासाहेब तांबे यांची कन्या प्रगती अशोक तांबे हिची एमबीबीएस या वैद्यकीय, शिक्षणासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे निवड झाली आहे. कु. प्रगती अशोक तांबे हिने जिद्द, चिकाटी आणि ध्येयाने प्रगतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये उंच अशी शैक्षणिक भरारी घेतलेली आहे. तिच्या या शैक्षणिक यशामुळे तांबाराजुरीतील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे. कु. प्रगती . तांबे हिने प्रगतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पाटोदा तालुक्यातील तांबाराजुरी गावाचे नाव नवलौकिक केले आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये अशोक नानासाहेब तांबे यांनी आपले बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून आहे. भारतीय सैन्य दलामध्ये नोकरी मिळवली आणि त्यांनी गरीबी ही शाप नसून एक आव्हान आहे. अशा जिद्दीने अशोक तांबे मेजर यांनी देशाची सेवा केली. अशोक तांबे मेजर नेहमी सांगत असतात की आपल्या पिढीने आपल्यापेक्षा पुढील पदावर यश मिळवावे आणि त्यांचे खूप मोठे स्वप्न होते की आपली मुलगी एमबीबीएस व्हावी नक्कीच प्रगतीने स्वतःचे आणि आपल्या आई वडिलांचे स्

छगन भुजबळ यांच्या हस्ते रानवड साखर कारखान्याच्या ४० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

Image
महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न;मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार नाही - छगन भुजबळ दिल्लीला आधार देण्याची ताकद महाराष्ट्रात;महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने भरीव मदत द्यावी - छगन भुजबळ नाशिक :- महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार नाही. दिल्लीला देखील आधार देण्याचं काम महाराष्ट्र करतो हे कुणीही विसरू नये अशी टीका करत महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही. दिवस येतात आणि दिवस जातात जरा धीर धरा आपले दिवस परत येतील असा सबुरीचा सल्ला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकरी मेळाव्या प्रसंगी उपस्थितांना दिला. काकासाहेब नगर, रानवड येथे स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था पिंपळगाव बसवंत, संचलित ‘कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा ४० वा गळीत हंगाम शुभारंभ छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, आमदार डॉ.सुधीर तांबे, आमद

महाराष्ट्रातील प्रकल्प इतरत्र जात असल्याने राज्यातील तरुणांचे मोठे नुकसान, तरुणांच्या रोजगारासाठी प्रयत्न करा - छगन भुजबळ

Image
एअरबस टाटा प्रकल्प महाराष्ट्रातच होणे गरजेचे होते - छगन भुजबळ महाराष्ट्रातील प्रकल्प पळविले जाताय ही महाराष्ट्रातील नागरिकांसाठी चिंताजनक बाब – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ नाशिक , :- सुमारे २२ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असतांना सदरचा प्रकल्प गुजरातला होत आहे. महाराष्ट्रात येणारे अनेक महत्वाचे प्रकल्प हे इतर राज्यात पळविले जात आहे, ही बाब महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय चिंताजनक असून सदरचा प्रकल्प हा नाशिकच्या एचएएल कंपनीत राबविण्यात यावा अशी मागणी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतनजी टाटा यांच्याकडे ऑक्टोबर २०२१ मध्येच पत्राद्वारे केली होती अशी माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना दिली. छगन भुजबळ यांच्यासोबत आज नाशिक येथील कार्यालयात माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सप्टेंबर २०२१ मध्ये भारतसरकारने देशात गुंतवणुकीसाठी एअरबस या कंपनीशी २२ हजार कोटी रुपयांचा करार केला होता. या विमान बनविणाऱ्या कंपनीचे काम टाटा कंपनीकडे आले. याबाबत लगेचच दि.

उद्योजक प्रेमकुमार तावरे पाटील यांचे मेडीकल क्षेत्रातील यश अभिमानास्पद - मा.आ.साहेबराव‌ दरेकर,

Image
आष्टी येथे पाटील मेडीकलच्या शाखेचे उद्घाटन संपन्न चांगले आचारण चिकाटी जिद्द यशाचे गुपित - ह.भ.प.दानवे महाराज आष्टी प्रतिनिधी   तालुक्यातील खानापूर येथील युवा उद्योजक प्रेमकुमार तावरे पाटील यांनी अल्पवधीतच मेडीकल क्षेत्रात नावलौकिक करुन ३ शाखा स्थापन केल्या आहेत.त्यांची मेडीकल क्षेत्रातील कामगिरी ही अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन मा.आ.साहेबराव दरेकर यांनी केले तर चांगले आचारण,चिकाटी जिद्द यशाचे गुपित आहे.मनात जर जिद्द बाळगली तर चिकाटीने मेहनत केली तर यश हमखास मिळते असे ह.भ.प.आदिनाथ दानवे महाराज यांनी प्रतिपादन केले ते आष्टी येथे पाटील मेडीकल या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. उद्घाटन माजी आमदार साहेबराव दरेकर,ह.भ.प.आदिनाथ महाराज दानवे,जि प सदस्य उद्धव दरेकर, जि प सदस्य सतीश शिंद,युवा नेते सागर धस,युवा नेते यश आजबे,तहसीलदार किशोर मराठे,युवा नेते अमोल राजे तरटे,अॅड. भाऊसाहेब लटपटे, उद्योजक श्याम धस, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष भाऊसाहेब घुले,अजित घुले,अ.नगर केमिस्ट अध्यक्ष दत्ता गाडळकर,बंडू साहेब तोडकर,आष्टी तालुका केमिस्ट अध्यक्ष सागर भोसले, उद्योजक श्रीपाद दाद

लोकप्रतिनिधी कंत्राटदार ,प्रशासकीय आधिका-यांच्या धोरणाच्या निषेधार्थ "यमराज स्वागत समारोह आंदोलन

Image
बीड शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेमुळे वाढत्या अपघातास जबाबदार लोकप्रतिनिधी कंत्राटदार ,प्रशासकीय आधिका-यांच्या धोरणाच्या निषेधार्थ "यमराज स्वागत समारोह आंदोलन:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर   बीड शहरातुन जाणारे राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूर,बीड-अहमदनगर तसेच अहमदपुर-अहमदनगर ,पैठण-पंढरपूर आदि मार्गाचे काम रखडलेले असुन अंदाजपत्रकाला फाटा देऊन धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग वगळता बहुतांश रस्ते दुपदरी,संरक्षक कठडे आणि दुभाजक नसलेले असुन अर्धवट कामे होऊन रखडलेलीच आहेत.अपघातांची वाढती संख्या व लोकप्रतिनिधींकडून केवळ श्रेयवादाची लढाई मात्र कामाच्या दर्जाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष प्रशासकीय आधिका-यांची कंत्राटदारा सोबत भागीदारी व त्याला लोकप्रतिनिधींकडून छुपा पाठींबा यामुळे बीड जिल्ह्य़ातील रस्ते यमसदनी जाणारे असुन याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली प्रतिकात्मक बीड शहरात यमराच्या वेशभुषेत यमराजाचे छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय "यमराज स्वागत समारोह आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात शेख युनुस, स

जलजीवन मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध,सुत्रधारांसह हल्लेखोरांना तात्त्काळ अटक करा;गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

Image
जलजीवन मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध,सुत्रधारांसह हल्लेखोरांना तात्त्काळ अटक करा;गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर   बीड जिल्ह्य़ातील जिल्हापरिषद जलजीवन मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते संभाजी बाबुराव सुर्वे यांच्यावर आज दिनांक.२८ ऑक्टोबर २०२२ वार शुक्रवार रोजी दुपारी जीवघेणा हल्ला झाला असुन सदरील हल्ला जलजीवन मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणातील लाभार्थी ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हापरिषद बीड विभागातील आधिकारी यांनी कंत्राटदार ठेकेदार यांच्याशी संगनमतानेच जलजीवन मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारदारांवर दबाव आणण्यासाठी हल्ला केला असून सदरील प्रकरणातील हल्लेखोर तसेच त्यामागील सुत्रधार यांना तातत्काळ अटक करण्यात यावी तसेच हल्लेखोर यांचे फोनची सीडीआर तपासणी करून कोणाकोणाशी हल्लेखोर संपर्कात होते याची उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यां

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जालना जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली

Image
जालना प्रतिनिधी:-कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जालना जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे, नळणी गाव परिसरात शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी सहानुभूती पूर्वक संवाद साधून त्यांना धीर दिला.     नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून तातडीने शासनास अहवाल सादर करावा असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.        नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. नुकसानभरपाई बाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत लवकरच निर्णय घेतील असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.        यावेळी जिल्हा परिषद सदस्या आशाताई पांडे, जि. प. सदस्य डॉ. साबळे, बाळासाहेबांची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भूषण शर्मा, अल्पसंख्याक आघाडीचे शेख नजीर, जिल्हा कृषी अधिकारी भीमराव

कन्हेरवाडी चे लोकप्रिय सरपंच, कृ.उ.बा.स.संचालक राजेभाऊ फड व श्रीरामजी मुंडे यांच्या वतीने स्वखर्चातून रत्याची दुरुस्ती

Image
स्थानिक गावकरण्यानी मानले मा.राजेभाऊ फड आणि श्रीरामजी मुंडे यांचे आभार.. परळी प्रतिनिधी शितलकुमार रोडे  -परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथे गेल्या अनेक वर्षापासून आनंद नगर येथे रस्त्याची दुरवस्था झाली होती येथील नागरिकांनी वेळोवेळी स्थानिक प्रशासनाला याची माहिती व पत्र व्यवहार केलेला होता पण सदरील गोष्टीवर कुठल्या ही प्रकारे लक्ष दिले गेले नाही म्हणून गावचे लोकप्रिय सरपंच आणि क्र.उ.बा.स.संचालक राजेभाऊ फड आणि श्रीरामजी मुंडे यांना भेटून समस्या सांगण्यात आली होती या वेळी त्यांनी आश्वासन देऊन 27/10/22 रोजी स्वखरच्यातून रस्था दूरस्थ करून दिला आहे त्यामुळे गावकर्यानी त्याचे मनापासून अभिनंदन करून आभार व्यक्त केले यावेळी ज्येष्ठ नेते श्रीरामजी मुंडे,उपसरपंच रामहरी फड,सो.चे.मिनिनाथ दादा फड, गुंडीबा फड,प्रल्हाद गित्ते,गोविंद मुंडे,ओमकार फड,मुकेश घेणे,आनंद दहीफळे,गणेश फड,माणिक मंदे,केशव दहिफळे,संतोष फड,रोहित फड,आदेश मोरे,प्रशांत रोडे,अमोल रोडे,आदी उपस्थित होते..

भूमीपूत्रांची आशी ही दिवाळी...

Image
परळीचे डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर यांची सामाजिक बांधिलकी ; स्वखर्चाने आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतीराव फूले जन योजनेचे मार्गदर्शनासह कार्डचे वाटप परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :- ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक तथा परळी शहरातील जगतकर गल्ली येथील भूमिपुत्र डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर यांनी सामाजिक बांधिलकीतून वैद्यकीय क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून "रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा" मानत कार्य करत आहेत. त्यांनी दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी आल्या नंतर तालुक्यातील मांडवा, मालेवाडी, मालेवाडी तांडा येथील नागरिकांचे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फूले जण आरोग्य योजनाबद्दल माहिती, नाव नोंदणीसह कार्डचे स्व; खर्चातून वाटप करून सामाजिक बांधीलक जपली आहे. यामाध्यमातून दोन्ही योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच त्यांनी अशा प्रकारे समाजसेवा करून अगळी वेगळी दिवाळी साजरी केली.       परळीचे भूमिपुत्र, ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर हे आपल्या गावी आल्यानंतर त्यांनी आपल्या

भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकरांचा इतिहास जागा करण्यासाठी युवकांनी पुढे यावे- प्रकाश सोनसळे

Image
भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकरांचा इतिहास जागा करण्यासाठी युवकांनी पुढे यावे- प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटन महाराष्ट्र राज्य   आज दिनांक २८ ऑक्टोंबर रोजी बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यासमोर भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त धनगर समाज संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने यशवंतराव होळकर यांना अभिवादन करण्यात आले यशवंतराव होळकर यांच्या विषयी बोलताना प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटन महाराष्ट्र राज्य यांनी संबोधित करताना सांगितले की, 28 ऑक्टोंबर १८११ हिंदुस्थानात आपल्या कबायती फौजांचा ठेंबा मिरविणाऱ्या इंग्रजांचा नक्षा फक्त वीर श्रेष्ठ यशवंतरावांनी उतरलेला होता. अखेर पर्यंत इंग्रजांची तैनानी फौज न स्वीकारणारा फक्त चक्रवती यशवंतराव होळकर हाच इंग्रजांचा शत्रू होता. महाराज यशवंतराव यांच्या विषयी इतिहासकार गो.स. सरदेसाईच्या मते मराठासाहीच्या अत्यंत विपन्नावस्थेच्या पडत्या काळात चक्रवती यशवंतराव होळकर हा एक फार मोठा हिरा अल्पकाळात चमकून गेला. या हिऱ्याने आपल्या तेजाने त्या काळ

अविनाश साबळे यांचा मांडवा ग्रामस्थांच्या हस्ते नागरी सत्कार

Image
आष्टी( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र अविनाश साबळे यांचे दिनांक 27 /09/  2022 रोजी सायंकाळी 7 वा आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र महादेव मंदिर मांडवा या त्यांच्या गावात गावांच्या वतीने नागरी सत्कार करण्याचे योजले आहे.     राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता अविनाश साबळे हे मैदानावर खेळायला सुरुवात करत होते तेव्हा मांडवा गावचे माजी सरपंच जयदेव धुमाळ यांनी गावाला शब्द दिला होता कि अविनाश साबळे हा ज्या वेळी गावात येईन तेव्हा अविनाश चा सत्कार व गाव जेवण घालणार आहे          या कार्यक्रमास मा आ सुरेश धस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी सरपंच जयदेव धुमाळ यांनी केले आहे

देशासेवा करून निवृत्त होऊन गावी परतलेल्या सैनिकांचे पाचंग्री ग्रामस्थाचा वतीने जंगी स्वागत

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) लष्करातून निवृत्त होऊन गावी परतलेल्या बहुतांश सैनिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.मात्र पाटोदा तालुक्यातील पाचंग्री येथे वेगळेच काही पाहिला मिळाले सेवा निवृत्त होऊन हवालदार प्रकाश कुडके फौजी गावी परतल्यानंतर पाचंग्री गावकर्यानी हार फेटा घालून व फटाक्याच्या आतष बाजीत मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. यानंतर गावातून प्रकाश कुडके फौजी यांची दिमाखदार भव्य दिव्य जंगी मिरवणूक काढण्यात आली.सैनिक जवान कुडके यांना हा अनोखा अनुभव आला असून प्रकाश कुडके लष्करातील सेवा पूर्ण करून ते गावात परतले असल्यामुळे गावाच्या या सुपुत्राचे ग्रामस्थच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. गावापासून दूर राहून लष्करात 20 वर्षे देशसेवा केलेल्या हवालदार प्रकाश कुडके यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली तर ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. या स्वागताने कुडके हेही भारावून गेले.'मातृभूमीची सेवा करून परतलो आहे. नोकरीची सेवापूर्ती झाली असली तरी देशसेवा अंतिम श्‍वासापर्यंत सुरूच राहील,'अशी प्रतिक्रिया प्रकाश कुडके यांनी आपल्या सत्कार पर भाषणात व्यक्त केली या कार्यक्र

वडगाव ढोक येथील पुल गेला वाहुन:भुमीपुत्र ग्रपचे युवा उद्योजक सचिन दादा यांनी केली पुलाची दुरूस्ती

Image
 गेवराई प्रतिनिधी :-दोन दिवसांपासून धो.धो.पडणाऱ्या पावसाने गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक या गावातील मुख्य मेन रस्त्यावरील पुल वाहून गेल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे आणि गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतांना दिसत आहेत. या विद्यार्थ्यांना आपला जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसापासुन तेथील नागरिकांनी या नविन पुलासाठी मागणी केली होती. आणि वडगाव ढोक चे युवा उद्योजक सचिन दादा यांनी तात्काळ पुलाची दुरूस्ती करुन त्यांनी लगेच दखल घेतली आहे आणि या पुलाची परिस्थितीत पाहून सचिन दादा यांनी मुरुम टाकुन दुरुस्त केला आहे आणि म्हटले आहे की हा पुल लवकरात लवकर नविन करून पुलाचे काम लवकर चालू करु असे आवाहन व गावकर्यांनन दीले आहे असे भुमीपुत्र ग्रुप वडगाव ढोक चे युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे यांनी दीले सविस्तर बातमी असी की गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक परिसरात अतिवृष्टी झाली असून राज्यभर मुसळधार पाऊस पडत राहिला त्यामुळे पूर्ण गाव जलमय झाले आहे. गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील तीन वर्षापासून वडगाव ढोक गावाच्या जवळून जा

स्व. शंकरराव सातपुते यांच्या पुण्यतिथी निमित्त शेवाळे महाराज आळंदीकर यांचे कीर्तन

Image
अशोक सातपुते यांचे पंचक्रोशीतील नागरिकांना या पुण्यतिथीनिमित्त आणि कीर्तनासाठी निमंत्रण परळी प्रतिनिधी - दिनांक 27/10/22 गुरुवार रोजी पंचक्रोशीत ह्यातनाम असणारे व्यक्तिमत्व व अडीअडचणीच्या वेळी नेहमी धावून जाणारे व्यक्तिमत्व असणारे स्वर्गवासी शंकर बंकटराव सातपुते यांच्या पुण्यतिथी निमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे यावेळी हरिभक्त परायण ॲ.श्री.शंकर महाराज शेवाळे आळंदीकर यांचे दुपारी बारा ते दोन या दरम्यान कीर्तन होणार आहे तरी समस्त परळी शहरातील व तालुक्यातील जनतेने याचा लाभ घ्यावा. या पुण्यतिथी निमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून ह.भ.प.श्री. तुकाराम महाराज शास्त्री,ह.भ. प.जगदीश महाराज सोनवणे उपस्थित राहणार आहेत. दुपारी दोन ते सहा या वेळेमध्ये श्री.संत गजानन महाराज मंदिर विद्यानगर,परळी येथे सुरुची भोजनाचा आस्वाद घेण्याचे आवाहन पायल हॉटेल चे संचालक अशोक सातपुते,माऊली सातपुते,विकास सातपुते यांनी केलेले आहे..

हॉटेल यश पॕलेसचे आमदार सुरेश धस यांच्या शुभहास्ते मोठ्या थाटात उद्घाटन संपन्न

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) पाटोदा शहराचे माजी सरपंच तथा युवा उद्योजक संतोष जाधव यांनी छञपती शिवाजी नगर मध्ये सर्व सुविधा युक्त हॉटेल यश पॕलेस दालनाची सुरवात केली असून पाटोद्यात हॉटेल क्षेत्रात यश पॕलेस मुळे शहराच्या वैभवात वाढ झाली असून सर्व नागरिकांना दर्जेदार जेवण व सर्व सुविधा पाटोदा शहरात मिळणार आहेत. हॉटेल यश पॕलेसचे बुधवार दि. २6 ऑक्टोंबर रोजी उस्मानाबाद बीड लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांच्या शुभहास्ते उदघाटण करण्यात आले यावेळी पाटोदा शहरातील राजकीय नेते मंडळी, व्यापारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवराचे आभार माजी सरपंच तथा नगरसेवक संतोष जाधव  यांनी मानले

गाडे पिंपळगाव येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेला बेपत्ता तरुण अक्षय आरगडे याचा ताबडतोब शोध घ्यावा

Image
गाडे पिंपळगाव येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेला बेपत्ता तरुण अक्षय आरगडे याचा ताबडतोब शोध घ्यावा ॲड.माधव जाधव यांनी केली मुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी परळी( वै.): गाडे पिंपळगाव तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील अक्षय विक्रम आरगडे हा 25 वर्ष वयाचा तरुण दिनांक 21-10-2022 रोजी सकाळी नऊ वाजता पुराच्या पाण्यामुळे नदीमध्ये वाहून गेलेला आहे व तो बेपत्ता आहे.दिनांक 21-10-2022 पासून आजतागायत त्या मुलाचा शोध लागलेला नाही. तालुकास्तरावरील प्रशासकीय यंत्रणेने बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.परंतु त्यामध्ये यश आले नाही.बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.परंतु बेपत्ता तरुण अक्षय आरगडे यांच्या शोध मोहिमेमध्ये वरिष्ठ पातळीवरून योग्य ती दखल घेतली जात नाही.त्यामुळे किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष तथा काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड सदस्य ॲड. माधव जाधव शेतकरी संघटनेचे नेते कालिदासराव आपेट व तसेच गाडे पिंपळगाव येथील प्रभाकरराव वाघमोडे यांनी गाडे पिंपळगाव येथील अक्षय आरगडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व धीर देऊन याबाबत महार

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुक्याच्या वतीने मा कवडे सर यांचा पंचायत समिती कार्यालय गेवराई या ठिकाणी वाढदिवस उत्साहात साजरा

Image
  गेवराई ( सखाराम पोहिकर ) गेवराई पंचायत समितीचे तालुका संघनक परिचालक व तालुका समन्यक . मा श्री . कवडे सर यांचा आज वाढदिवस साजरा पंचायत समितीच्या त्याच्या ऑफीस मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका महासचिव क्रॉ सखाराम पोहिकर तालुका संघटक शेख याशीनभाई क्रॉ नारायण जाधव व गेवराई तालुका प्रेस क्लबचे तालुका अध्यक्ष प्रा नवपुत्ते सर यांच्या सर्वाच्या उपस्थितीत मध्ये मा कवडे सराना शाल . फेटा पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरविला व आपणास महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या गेवराई तालुक्याच्यावतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व पुढील काळात आपल्या हातून आमच्या ग्रामपंचायत कर्मचार्याच्या आपल्या हातून आडीआडचणी सोडवण्यासाठी आपण सतत प्रयत्न कराल हिच आपल्या हातून घडावे अशी अपेक्षा आम्ही आपणाकडून बाळगतो यावेळी सत्काराला उत्तर देताना मा कवडे सर म्हणाले की गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या कोणती ही आडचण आल्यास मी माझ्या परीने सहकार्य करण्याचा प्रयत्न करीन असे ते म्हणाले व हा कार्यक्रम संपला आसे शेख याशीनभाई यांनी जाहिर केले

बीड येथील साद फाउंडेशन तर्फे गरीब कुटुंबांना दिवाळीचे फराळ वाटप

Image
   आष्टी / बीड ( प्रतिनिधी -- गोरख मोरे ) : बीड येथील साद फाउंडेशन तर्फे बीड येथील अनेक भागातील गोरगरीब कुटुंब शोधून दिवाळीचे फराळ वाटप करून या कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचे काम साद फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले . हा उपक्रम बीड मधील अनेक भागात राबवण्यात आला असून ग्रामीण भागात गोरगरीब कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून साद फाउंडेशनचे अध्यक्ष मेहर शेख , उपाध्यक्ष नारायण औटे, यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला असून यात सर्व सहभागी मित्र परिवारांचे आभार मानले .    याप्रसंगी बाळू तावरे , दशरथ बहिर , अमोल झोजे, कल्याण गावडे , सुनील टुले, शेख शौकत , प्रदीप आगाम , मकरंद आगाम , रवी शेंदाडे , असलम आदी मित्रपरिवार याप्रसंगी उपस्थित असून सर्वांच्या सहकार्यातून साद फाउंडेशनचा बीडमधील गोरगरीब कुटुंबांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आले .

परळी ही रत्नांची खान, किरण गित्ते परळीची शान - आ.धनंजय मुंडे

Image
  परळी चा गौरव व नावलौकिक वाढेल असे कार्य करू - किरणकुमार गित्ते राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या हस्ते गौरवप्राप्त किरणकुमार गित्ते यांचा परळीत नागरी सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनीधी ) :-      परळी ही रत्नांची खान असुन या भागातुन अनेकजण वेगवेगळ्या क्षेत्रात देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याद्वारे चमकत आहेत. त्रिपुरा राज्याचे नगर विकास खात्याचे सचिव किरणकुमार गित्ते हे परळीची शान असुन देशाच्या राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा नुकताच गौरव झाला.गित्ते यांच्या प्रशासकिय सेवेतील ज्ञानातुन महाराष्ट्राला लाभ व्हावा यासाठी मी त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी सांगितले.राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव प्राप्त केलेले परळीचे भुमिपुत्र त्रिपुरा राज्याचे नगर विकास खात्याचे सचिव किरणकुमार गित्ते यांचा रविवारी परळीत नागरी सत्कार करण्यात आला.    लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे रविवार दि.23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजत पार पडलेल्या या नागरी सत्कार सोहळ्याचे कार्यक्रमाचे अध्

पाटोदा तहसिलच्या कर्तव्यदक्षते मुळे पाटोद्यात आनंदाचा शिधा दिवाळी सणा दिवशीच वाटप

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) पाटोदा तहसीलच्या कर्तव्य दक्ष तहसीलदार चौघुले मँडम यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाच्या योग्य नियोजनामुळे लक्ष्मीपूजनच्या दिवशीच पाटोदा रेशनिंग दुकानांवर आनंदाचा शिधा उपलब्ध झाला असून त्याची वाटपाला सुरूवात झाली असून पुरवठा अधिकारी मुजावर यांनी रेशिंन दुकानवर सर्वत्र जाऊन पाहणी केली यावेळी पाटोदा तहसिल पुरवठा अधिकारी मुजावर यांच्या हस्ते खरेदी विक्री संघ स्वस्त धान्य दुकानात आंनदाचा शिधा वाटप करण्यात आला सर्वसामान्य जनतेची यावर्षीची दिवाळी शिंदे सरकारने गोड केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंत्योदय आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून हा ‘आनंदाचा शिदा ‘ राज्यातील रेशन दुकानांच्या माध्यमातून वितरीत केला जात आहे.पाटोदा तालुक्यात रेशन दुकानावर शुभारंभ करण्यात आला असून पुरवठा अधिकारी मुजावर यांच्या हस्ते हा ‘आनंदाचा शिदा’ वितरीत करण्यात आला.

पत्रकार अशोक काळकुटे यांना धमकी देणाऱ्या कलाकेंद्राला अखेर कुलुप.

Image
बीड | प्रतिनिधी . बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील जगदंबा कला केंद्रात एका महिलेला गेल्या काही महिन्यांपूर्वी बळजबरीने वेश्या व्यवसाय करायला लावुन तिच्या १२ वर्षीय मुलीला डांबुन ठेवल्याची तक्रार पिडीत महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयात दिली होती. यानंतर दि.१३ जुन २०२२ रोजी यातील आरोपी भाभी परभणीकर आणि तिच्या सोबत सागर शहाबोद्दीन शेख, शेख समीर शेख अनिस हे पोलीस ठाण्यात आले होते. यादरम्यान सूर्योदय पोर्टलला बातमी लावल्याचा व पोलिस स्टेशन परिसरात फोटो घेतल्याचा राग मनात धरून सूर्योदय संपादक अशोक काळकुटे यांना रात्री १० वाजता बुलेट आणि काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवरून पोलीस ठाण्याच्या बाहेर निघताच पाठलाग करत नेकनुर येथील बंकटस्वामी कमानीत अडवले आणि शिवीगाळ करत तुझा आता रोडवर अपघात होऊ शकतो अशी धमकी दिली होती. याप्रकरणी नेकनुर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची काही पत्रकारांसमवेत अशोक काळकुटे यांनी भेट घेऊन तपास वरिष्ठांकडे देण्याची मागणी केली होती. यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आय.पी.एस पंकज कुमावत य

नंदागौळ येथील दहिफळे कुटुंबाला ॲड.माधव जाधव यांनी दिला आधार

Image
सर्व सामान्यांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व ॲड.माधव जाधव यांच्यावर होतोय सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव परळी प्रतिनिधी - परळी विधानसभा मतदारसंघातील नंदागौळ येथील विठ्ठल शिवाजी दहिफळे यांनी मुलाच्या आजाराच्या खर्चाला पैसे नसल्यामुळे काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. विठ्ठल दहिफळे यांचा वडजु दहिफळे हा 5 वर्षे वयाचा मुलगा सतत आजारी असतो. विठ्ठल दहिफळे हे ऊस तोड मजुर असुन मुलाच्या आजाराच्या ऊपचारासाठी सतत खर्च होत असल्याने खर्च करण्याची ताकत नसल्यामुळे तनावातुन आत्महत्या केली.ही माहिती किसान कांग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड माधव जाधव यांना पेपरमधील बातमीमुळे कळाल्यानंतर ॲड.माधव जाधव यांनी नंदागौळ येथील दहिफळे कुटुंबाला भेट देऊन मुलाच्या आजारावरील ऊपचारासाठी 10000/- ( दहा हजार रुपये ) मदत केली.व त्यांच्या कुटूंबियांना दिपावळीनिमित्त फराळ देऊन सांत्वन केले.यावेळी सोबत ॲड.गौरशेटे, प्रा.श्रिकांत खुणे , बाळासाहेब गित्ते, भास्करराव गित्ते,रंगनाथ गित्ते,देवराव गित्ते,रमेश दहिफळे,विष्णू दहिफळे आदि उपस्थित होते. मयत विठ्ठल दहिफळे यांना 2 मुले, 1 मुलगी व पत्नी असा परीवार आहे.

टोकवाडी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या आदेशास उच्च न्यायालयात याचिका दाखल - भाई गौतम आगळे सर

Image
    परळी (प्रतिनिधी ) सविस्तर वृत्तांत असे कि, मौजे टोकवाडी येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी येथे झालेल्या विकास कामाध्ये मनमानी कारभार करुन भ्रष्टाचार व बोगस बिले उचलल्या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल करून झालेल्या बोगस कामांची स्वतंत्र विशेष त्रतीय निष्पक्ष पथक नेमून चौकशी करण्यात यावी, या करीता आंदोलन करुन मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी सुनावणी घेतली, परंतु भ्रष्टाचार करणार्यांना पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्याच्या विरोधात मा. विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद समोर आमरण उपोषण करण्यात आले होते. परंतु त्यांनी सुध्दा मुख्य कार्यकारी अधिकारी बीड, यांचा अहवाल मान्य केला. सत्य परिस्थिती झाकून ठेवत राजकीय दबावाखाली वंचित बहुजन आघाडी ची मागणी फेटाळली. त्या मुळे या आदेशाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी चे परळी तालुका महासचिव तथा याचिकाकर्ते विष्णू मुंडे यांनी माननीय उच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकार ग्रामविकास, मंत्रालय, मुंबई,विभागीय आयुक्त औरंगाबाद,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड,गट

गढी येथील सेवा सोसायटी सहकारी संस्थेची निवडणूक झाली बिनविरोध

Image
गेवराई ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील गढी येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक हि बिनविरोध करण्यासाठी गढी ग्रामपंचायत चे सरपंच आंकुशराव गायकवाड यांनी सर्व ग्रामस्थांना अनमोल आसे मार्गदर्शन करून हि आपली सेवा सोसायटी सहकारी संस्था बिन विरोध करण्यासाठी आपण सर्वानी सहकार्य करावे आसे सांगितले तेव्हा सर्व ग्रामस्थानी . या मतास सहमती देऊन हि सेवा सोसायटी बिनविरोध करण्यात आली या वेळी नुतन संचालकानी माजी आमदार तथा राष्ट्रवादी क्रॉग्रेस चे प्रदेश सरचिटणीस श्री अमर सिह पंडित यांची भेट घेतली . तेव्हा मा श्री अमर सिह पंडित यां नी नवीन संचालकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या सेवा सोसायटी चे नवीन बिनविरोध निवडून आलेले संचालक सर्वश्री 1) श्री इंगळे अंकुश २ ) मगर रामा . 3) मोरे बंजरंग महादेव 4) चौधरी गगुबाई 5 ) जाधव शहादेव 6) पवार बंडू 7) गायकवाड मधूकर लक्ष्मण 8) ससाने महादेव भिमराव 9 ) काळे नंदाबाई 10 ) मगर देऊबाई 11 ) मुंढे रामदास बाबासाहेब 12 ) गायकवाड दामोधर ईत्यादी यावेळी गढीचे सरपंच अंकुशराव गायकवाड . रत्नाकर कुलकर्णी मंगेश कांबळे महादेव सिरसट विष्णूपंत घोगडे उद्धव नाकाडे गोकूळ

अनुसुचित जाती-जमाती अंतर्गत सामाजिक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करून कायद्याचा गैरवापर व पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करणा-या पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांना बडतर्फ करण्यासाठी "संविधान बचाव आंदोलन:

Image
अनुसुचित जाती-जमाती अंतर्गत सामाजिक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करून कायद्याचा गैरवापर व पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करणा-या पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांना बडतर्फ करण्यासाठी "संविधान बचाव आंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर   राजकीय नेते व धनदांडगे यांच्या दबावापोटी सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिवर अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती अत्याचार (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ नुसार कलम ३ (१)(आर),३ (१)(एस) नुसार खोटे गुन्हे दाखल करणे तसेच पोलीस अधिक्षक बीड नंदकुमार ठाकुर आणि अप्पर पोलीस अधीक्षक बीड सुनिल लांजेवार यांच्या आदेशानंतर सुद्धा रामनाथ खोड व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीची तक्रार नोंदवून न घेणारे पेठ बीड पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी (अट्रसिटी)कायद्याचा गैरवापर व कायद्याची बदनामी केल्याबद्दल तसेच सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांच्या कुटुंबियावर हल्ला प्रकरणात बोटचेपी भुमिका घेऊन पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल पेठ बीड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांना बडतर्फ करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच पारदर्शी तप