कोक्रोच जनता पार्टी चे सर्वेसर्वा अभिजित दिपके यांना झेड प्लस सेक्युरिटी द्या-डॉ जितीन वंजारे


बीड प्रतिनिधी :- आज देशामध्ये सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कोणीही बोलले असता त्याला जेलमध्ये टाकण्याची परंपराच येथील सत्ताधाऱ्यांनी चालू केलेली आहे,विरोधकांना ईडी सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांचा धाक देऊन त्यांना जेलमध्ये टाकून विनाकारण त्रास दिला जात आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईली बाहेर काढून त्यांच्यावर दबावतंत्र टाकून स्वतःच्या पक्षांमध्ये त्यांची इनकमिंग केली जात आहे. भारतीय जनता पार्टीकडे अशी कोणती वाशिंग मशीन आहे की ज्या पक्षांमध्ये भ्रष्टाचारी नेता नसताना त्याच्यावर गंभीर आरोप केले जातात आणि तोच भ्रष्टाचारी नेता सरेंडर होऊन भाजपामध्ये प्रवेश केल्यास त्याच्या सर्व भ्रष्टाचारी चौकशी यंत्रणा बंद होतात आणि तो नेता मंत्री आमदार खासदार बनतो.हे का घडत आहे याला जबाबदार कोण आहे आणि याच कारणांमध्ये आज भारतामध्ये विरोधी पक्ष कमकुवत झाला आहे. टीव्ही पत्रकार सरकार ची दलाली करत आहे. येथील टीव्ही पत्रकार केवळ विशिष्ट सत्ताधारी लोकांचे गुलाम असताना आम्ही पाहत आहोत. मीडिया विकला गेलेला आहे. नवयुवकांना जातीवाद अन धर्मवाद शिकवून आणि जातीवादाच्या नावाखाली त्यांची माथी भडकवली जात आहेत. समाजात आसमानता वाढू लागली आहे.अशातच एक जनतेच पिवर हित समोर ठेवून बोस्टन युनिव्हर्सिटी मध्ये जनसंपर्काचे धडे गीरवणाऱ्या सामान्य कुटुंबातील अभिजीत दिपके या युवकाने कॉक्रोच जनता पार्टी हा सोशल मीडियावर पक्ष स्थापन केला आहे. याला अगदी काही तासातच तीन लाखावून अधिक सबस्क्राईबर तयार झाले आणि आज तेच जवळ जवळ पंधरा मिलियनच्या घरामध्ये सबस्क्राईबर पोहोचले आहेत. म्हणजे एक सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा त्याच्या शिक्षणाच्या ओढीमुळे बोस्टन युनिव्हर्सिटी मध्ये जनसंपर्क या विषयांमध्ये पदवी घेतो पण स्वतःच्या देशाचं राष्ट्रहीत लक्षात घेऊन त्याने झुरळ जनता पार्टी तयार केली ती येथील सी जे आय नव तरुणांना सुशिक्षित बेकार झूराळा सारखे आहेत ते पुढे चालून माहिती अधिकार टाकून परेशान करतात अशी कथित व्हलगना केली त्यावरून.आणि त्याच नवयुवकांना हीनवलेले झूरळ ह्या शब्दावर भारतीय जनतेचा नवतरुणांचा बेरोजगारी महागाई चा रोष समोर ठेऊन कोक्रोच जनता पार्टी ची स्थापना अभिजित दिपके यांनी केली आहे. हे येथील सत्ताधारी यांना कदाचित पसंद पडणार नाही कारण काँग्रेस आणि भाजपा च्या इन्स्टा फेसबुक आणि ट्विटर एक्स अकॉउंट पेक्षा जास्त फॉलोवर अभिजित दिपके यांच्या कोक्रोच जनता पार्टी चे झाले आहेत.भारतामध्ये वाढणारी महागाई, बेरोजगार, जातीयवाद, धर्मवाद आणि इतर गोष्टींमध्ये झालेली पाहून अभिजित दिपके यांना सहन झालं नाही आणि या सत्ताधाऱ्यांना ठिकाणावर आणण्यासाठी त्याने कॉकरोच जनता पार्टी या पक्षाची स्थापना केली. परंतु मुलगा बोस्टनला आहे आई-वडील संभाजीनगर येथे आहेत त्यामुळे त्यांच्या आईवडिलांना मुलाच्या सुरक्षेची चिंता सतावत आहे. अशातच अभिजीत दिपके यांचे सर्व अकाउंट भारतामध्ये बॅन केले जात आहेत. जो माणूस देश सेवेसाठी स्वतःच्या आयुष्य समर्पण देवू पाहत आहे अशा देश भक्ती करणाऱ्या अभिजीत दीपके या युवा नेत्याला आणि कॉकरोच जनता पार्टी चा सर्वेसर्वा असल्याकारणाने व येथील जवळजवळ पंधरा मिलीयन लोकांचा सपोर्ट असणारा एकमेव सामाजिक कार्यकर्ता अभिजीत दिपके यांना भारतात आल्यावर शासनाने झेडपस प्लस सुरक्षा सुरक्षा द्यावी.अभिजित दिपके यांना थ्रेट कॉल येत आहेत, त्यांना मारण्याच्या धमक्या येत आहेत,जर सुरक्षा प्रदान केले नाही तर त्यांच्या जीवास धोका उद्भवू शकतो काही लोक कुटील कारस्थान करू शकतात किंवा दबाव तंत्र वापरून सरकार अटक ही करू शकते आणि म्हणून ज्याप्रमाणे आर एस एस च्या मोहन भागवत यांना झेड प्लस सुरक्षा पुरवलेली आहे अगदी तशीच झेड प्लस सुरक्षा युवकांचे हृदय स्थान असणारे अभिजीत दिपके याला द्यावी असे आव्हान त्यांचे मेव्हणे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी येथील सरकारी यंत्रणेला प्रसिद्धीपत्रकाद्वारे निवेदन देऊन केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी