जिल्ह्यात १ हजार ८८५ विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश निश्चित
जिल्ह्यात १ हजार ८८५ विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश निश्चित
बोगस प्रवेश रोखण्यात शिक्षण विभाग सपशेल अपयशी - मनोज जाधव
बीड (प्रतिनिधी) आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना शिक्षण हक्क (आरटीई) कायदा अंतर्गत व्यवस्था करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी पहिल्या फेरीत १ हजार ८८५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चितकरण्यात आले असून .प्रवेश घेण्याची अंतिम मुदत उलटल्यानंतरही ४५९ जागा रिक्त राहिल्या आहेत नव्या सुचनेनुसार २९ मे पर्यंत या रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.अशी माहिती शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे.
नियमित प्रवेशात २५ टक्के जागा आरटीई कायद्यातंर्गत राखीव ठेवण्यात येतात. जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत २१४ शाळांमध्ये २ हजार ४२५ जागा आरक्षित आहेत. यात पहिल्या टप्प्यात २ हजार ३६० विद्यार्थ्यांची निवड झाली होती . त्यातील १ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून बीड जिल्ह्यात सद्यस्थितीत ४५९ जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
बोगस प्रवेश रोखण्यात शिक्षण विभाग सपशेल अपयशी - मनोज जाधव
आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी अनेक पालकांनी खोटी कागदपत्रे तयार करत मोफत प्रवेशांचा लाभ मिळवला आहे. या संदर्भात सक्षम पुरावे आढळले असून वेळोवेळी रीतसर तक्रार दिल्या आहेत. त्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने सखोल चौकशी करून आणि पडताळणी करून एकही बोगस प्रवेश होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे होते .
Comments
Post a Comment