आष्टी विधानसभा आढावा बैठकीस शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे– राहुल भैय्या चौरे यांचे आवाहन


पाटोदा (प्रतिनिधी) शिवसेना संसदीय गट नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या “शिवसंवाद दौऱ्या” अंतर्गत दिनांक २९ मे २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता रोहिदास मंगल कार्यालय, पाटोदा येथे आष्टी विधानसभा आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.या महत्त्वपूर्ण बैठकीस शिवसेनेचे संपर्क मंत्री श्री. भरतशेठ गोगावले, श्री. प्रकाश आबिटकर, श्री. आशीष जयस्वाल, खासदार श्री. संदिपान भुमरे, शिवसेना सचिव श्री. भाऊसाहेब चौधरी तसेच माजी खासदार श्री. आनंद परांजपे उपस्थित राहणार आहेत. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. स्वप्निल गलधर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख, गटप्रमुख, बूथप्रमुख, युवासेना, महिला आघाडी तसेच शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठक यशस्वी करावी, असे आवाहन शिवसेना पाटोदा तालुका प्रमुख राहुल भैय्या चौरे यांनी केले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, संघटनात्मक बांधणी, पक्ष विस्तार, बूथनिहाय नियोजन तसेच कार्यकर्त्यांशी थेट संवाद या महत्त्वाच्या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याने आष्टी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी