पाटोदा येथील विठ्ठलनगरमध्ये 'भव्य महिला कीर्तन महोत्सव व देवी भागवत कथा' सोहळ्याचे आयोजन

पाटोदा येथील विठ्ठलनगरमध्ये 'भव्य महिला कीर्तन महोत्सव व देवी भागवत कथा' सोहळ्याचे आयोजन
​पाटोदा (प्रतिनिधी) :पाटोदा तालुक्यातील विठ्ठलनगर (भाकरे वस्ती) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानच्या वतीने अधिकमास तपपूर्ती सोहळ्यानिमित्त "भव्य दिव्य महिला कीर्तन महोत्सव व देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा" याचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा २४ मे २०२६ ते ३१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होत आहे.
​ह.भ.प. सुखनिवासवासी गु.श्री. बँकठस्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि सौ. सुनंदाताई सतिश म. उरणकर यांच्या संयोजनाखाली हा धार्मिक महोत्सव होत आहे. या सोहळ्याचे नेतृत्व ह.भ.प. संगीताताई सोळसकर करत आहेत.
​सप्ताहभरात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ९ ते १० तुलसी अर्चन, १० ते १२ गाथा भजन, दुपारी १२ ते १ भोजन प्रसाद, दुपारी १ ते ४ या वेळेत सुप्रसिद्ध कथाप्रवक्त्या ह.भ.प. अंजलीताई दिघे (आळंदी) यांच्या सुश्राव्य वाणीतून 'देवी भागवत कथा' पार पडणार आहे. तसेच सायंकाळी ४.३० ते ६ हरिपाठ, ७ ते ९ भव्य कीर्तन, ९ ते १० भोजन प्रसाद आणि रात्री १० ते १२ संगीत भजन व हरिजागर असे अध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत.
​महाराष्ट्रातील नामवंत 
​या महोत्सवात दररोज रात्री ७ ते ९ या वेळेत राज्यातील ख्यातनाम महिला कीर्तनकारांची कीर्तन सेवा लाभणार आहे
​२४ मे (रविवार) : ह.भ.प. संगीताताई सोळसकर (जालनापूरकर)
​२५ मे (सोमवार) : ह.भ.प. प्रतिक्षाताई जाधव गिरमकर (धामणगाव शिर्डी)
​२६ मे (मंगळवार) : ह.भ.प. शिवांजलीताई जरांगे (मालेगाव)
​२७ मे (बुधवार) : ह.भ.प. योगिताताई हजारे (अहिल्यानगर)
​२८ मे (गुरुवार) : ह.भ.प. रेणुकाताई पाखरे (आष्टी)
​२९ मे (शुक्रवार) : ह.भ.प.सौ. माईसाहेब धर्मराज महाराज पा. (सामनगाव)
​३० मे (शनिवार) : ह.भ.प. रजनीताई जाधव (नाशिक)
​३१ मे (रविवार - सांगता) : सकाळी १० ते १२ या वेळेत प्रसिद्ध कथाकार ह.भ.प. कविताताई साबळे (शिर्डी) यांचे काल्याचे कीर्तन होईल.
​कै. जनाबाई विठ्ठलराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ सौ. मिराताई सुदर्शन चव्हाण (वामनभाऊ ट्रेडर्स) यांच्या वतीने काल्याच्या महाप्रसादाचे (महापंगत) आयोजन करण्यात आले आहे.
​हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पाटोदा व पाटोदा पंचक्रोशीतील महिला मंडळ आणि श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान विठ्ठलनगर पाटोदा येथील सर्व भाविक व विनीत परिश्रम घेत आहेत. या अपूर्व भक्तीरसाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी