Posts

Showing posts from June, 2022

गेवराई आगारामधील राज्य परिवहन महामंडळाचा सेवानिवृत कार्यक्रम संपन्न

Image
गेवराई आगारामधील राज्य परिवहन महामंडळाचा सेवानिवृत कार्यक्रम संपन्न .गेवराई विधानसभा मतदारसंघाचे युवानेते माननीय श्री शिवराज(दादा) पवार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई राष्ट्रीय परिवहन महामंडळ प्रनित गेवराई आगारांमधील व निपाणी जवळका येथील रहिवाशी श्री सुभाष (नाना) काकडे वाहन या पदावर गेली ( 30) वर्षे सेवा देऊन आज सेवा निवृत झाले या कार्यक्रमास गेवराई विधान सभा मतदार संघाचे भाजपा चे युवा नेते मा श्री शिवराज ( दादा ) पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला त्यावेळी या कार्यक्रमाला एस टी बॅक मुंबई चे संचालक मा बंडूभाऊ बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमास आगार प्रमुख श्री बालाजी आडसुळे सत्कारमुर्ती श्री सुभाष (नाना) काकडे वाहक जितेंद्र आरसुळ गोरक्ष खरात रामा जाधव श्री गिरी बप्पा अमोल मस्के समाधान ( जिजा ) मस्के शोहेब आत्तार कृष्णा ( भैय्या ) पाटोळे तसेच राज्य परिवहन चे असख्य कर्मचारी उपस्थित होते त्याप्रसंगी युवा नेते शिवराज (दादा) पवार यांनी बोलताना असे म्हणाले की पवार कुटूंबीय व भाजपा एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आ

खा.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्यावतीने महिला आरोग्य तपासणी शिबीर

Image
बीड (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रणरागिनी, महाराष्ट्राचा बुलंद आवाज खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पसंख्यांक आघाडीच्या बीड शहराध्यक्षा शकीला सय्यद यांनी जिल्हा रूग्णालयात महिला आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. उषाताई दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा रूग्णालयाचे डॉ. शहाणे, राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिव कमलताई निंबाळकर, प्रदेश उपाध्यक्षा प्रज्ञाताई खोसरे, पत्रकार आयेशा शेख, जिल्हा सचिव राणीताई शेख, प्रदेश सचिव ओबीसी सेलच्या संघटन सचिव मिनाक्षीताई देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती.  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खा. सुप्रियाताई सुळे यांचा दि. 30 जून रोजी 2022 वाढदिवस त्यानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या वतीने जिल्हा रूग्णालय येथे महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात 50 महिलांच्या आरोग्याची तपासणी करून औषधोपचार देण्यात आला. सदरील शिबीर राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक आघाडीच्या बीड शहराध्यक्षा शकीला सय्यद यांनी आयोजित केला

प्रा शिवराज बांगर पाटील व त्यांचे विरोधक

Image
बीड प्रतिनिधी:-प्रा. शिवराज बांगर पाटील यांच्या वर खोटी एमपीडीए झाली आणी महाराष्ट्रा मधील त्यांचे जिव्हाळ्याचे समर्थक, पेटुन उठले, सोशल मिडीया वर खोट्या एमपीडीए चा निषेध नोंदवु लागले, प्रा. शिवराज बांगर साहेब हे बाहेर आले पाहिजे हि सर्वांचीच इच्छा होती, प्रा शिवराज बांगर साहेब सारख्या देव माणसा वर कार्यवाही होणे चुकीचे होते, प्रा शिवराज बांगर पाटील यांच्या वर एमपीडीए सारखी कार्यवाही झाली हे समजताच बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या पाया खालची वाळू सरखली, प्रत्येक राजकीय पक्षांनी ही कार्यवाही खोटी आहे असे बीड जिल्हा अधीकारी यांना निवेदन दिले, परंतु ज्या पक्षा मध्ये जीव तोडुन प्रा. शिवराज बांगर साहेब यांनी काम केले त्या पक्षाने साधे निवेदन ही दिले नाही, ही एक शोकांतिका आहे, प्रा. शिवराज बांगर पाटील यांच्या वरील खोटी एमपीडीए रद्द व्हावी म्हणुन प्रा. शिवराज बांगर पाटील यांच्या पत्नी शिवलता ताई बांगर यांनी खुप कष्ट घेतले, गृहमंञ्या पासुन मुख्यमंञ्या पर्यंत भेट घेतल्या त्यांना निवेदन दिले, तरी पण एमपीडीए रद्द झाली नाही , नंतर ताईंनी सर्व जिव्हाभावाच्या कार्यकर्त्याना सांगीतले

नगर परिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती रासपा स्वबळावर लढणार-प्रा.अण्णासाहेब मतकर

Image
बीड येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक संपन्न.               बीड प्रतिनिधी बीड शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी.राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक.   बीड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री काशिनाथ नाना शेवते. श्री माऊली दादा सलगर. मुख्य महासचिव श्री अजित पाटील. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. राष्ट्रीय समाज पक्ष युवक जिल्हाध्यक्ष. प्राध्यापक मतकर सर. श्री माने सर कर्मचारी जिल्हाध्यक्ष. श्री विक्रम बाप्पा सोनसळे लोकसभा अध्यक्ष . नंदाताई सारुख. महिला जिल्हाध्यक्ष. शिंदे मॅडम जिल्हा उपाध्यक्ष. श्री शिवाजी चांगन शहराध्यक्ष. श्री बंडू कदम जिल्हा संघटक श्री परशुराम काशीद. जिल्हा मार्गदर्शक श्री दिपक वाघमारे .श्री राजू खंडागळे उपाध्यक्ष .श्री गोवर्धन गोरे. श्री वाघमोडे अमर .श्री माऊली मार्कड. यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक संपन्न झाली. यावेळी या बैठकीला मार्गदर्शन करताना.राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते नाना म्हणाले आहेत की. राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व युवक कार्यकर्त्यांनी आपल्या गाव .वाडी. वस्ती सर्कल मध्ये शाखा स्थापन कर

आम आदमी पार्टीच्या आंबेजोगाई तालुका अध्यक्षपदी राम कृष्ण गुंडरे यांची निवड

Image
 उपाध्यक्षपदी सोमेश्वर चौधरी, सचिव अमोल शिंदे, संघटन मंत्री गणेश कस्पटे, यांची निवड करण्यात आली.      आंबेजोगाई प्रतिनिधी :- अंबेजोगाई आम आदमी पार्टीच्या वतीने आंबेजोगाई येथे मा. माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या नेतृत्वामध्ये  शासकीय विश्राम गृह आंबेजोगाई येथे पार पडली या बैठकीत पदाधिकाऱ्यांना नियुक्त देण्यात आल्या आंबेजोगाई तालुका अध्यक्षपदी राम कृष्ण गुंडरे, तर उपाध्यक्ष सोमेश्वर चौधरी, सचिव अमोल शिंदे, व संघटन मंत्री गणेश कस्पटे सदस्य म्हणून केशव भाई यांची निवड करण्यात आली यावेळी जिल्हा कमिटीचे जिल्हा सचिव रामधनजी जमाने, यांच्या उपस्थितीमध्ये हे पदभार देण्यात आले हे सर्व पदाधिकारी आम आदमी पार्टीचे विचार आम आदमी पार्टीचे ध्येय धोरण व नागरिकांशी नाळ जोडण्याचं काम अंबेजोगाई तालुक्यामध्ये गावागावात पर्यंत मा.अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली सरकार व दिल्लीमध्ये झालेली कामे हे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतील अशी अपेक्षा बाळगतो व त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो या बैठकीय वेळी उपस्थित अभिषेक शिंदे बिभीषण भोसले सुशिल देशमुख सिद्धेश्वर वैद्य स

ग्रामपंचायत तळेगाव रोही कडून नियोजित बुद्ध विहार जागेवर अतिक्रमण

Image
चांदवड तालुका प्रतिनिधी उस्मान शेख:-   तळेगाव रोही येथील सर्व बौध्द बांधवांनी राजवाडा / बौध्द वाडा गट नंबर १०२० मध्ये सर्व बौध्द बांधव राहत होते, तसेच बौध्द बांधवांनी मागणी केल्याप्रमाणे हया जागेवर बुध्द विहारा करीता २ एकर जागा मिळणे बाबत सन २०१५ मध्ये मागणी करून आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाने आम्हाला हया राजवाडा, बौध्द वाडा येथे पूर्णपणे २ एकर जागा नसल्यामुळे जी जागा हया परिक्षेत्रात आहे ती सर्व जागा बुध्द विहार बांधकाम करण्यासाठी ग्रा.पं तळेगाव रोही मासिक बैठक ठराव क्रमांक.५३/५ दि.२६/१०/२०१५ रोजी संमत करून आम्हाला बुध्द विहारकरिता जागा दिलेली असतानाही, हया राजवाडा,बौद्ध वाडा गट नंबर १०२० मधील परिक्षेत्रात सध्याचे सत्ताधारी राजकीय पुढारी, नेते गावात जातीय, धर्मवाद निर्माण करून मनमानी कारभार पद्धतीने हया राजवाडा,बौद्ध वाडा परिसरात बेकायदेशीर बांधकाम करण्यासाठी तोंडी परवानग्या देऊन गावात जातीय, धर्म वाद तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे...       आम्ही आपणास पुन्हा एकदा सुचित करतो की, हया राजवाडा , बौद्ध वाडा परिसरात बेकायदेशीर झालेले बांधकाम अतिक्रमण त्वरीत हटवि

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष किरण वाघमारे यांच्या वर भ्याड हल्ला हल्लेखोरास तात्काळ अटक करा- अशोक हिंगे

Image
. बीड प्रतिनिधी/दि.28 वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष हे काल आरटीओ ऑफिस मध्ये आपल्या दुकानात काम करत बसले असताना अचानकपणे दोन अज्ञात युवकांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्या दोन्ही हातावरती वार आहेत डोक्यावरचा वार त्यांनी हातावर घेतले त्यामध्ये त्यांचा मोबाईल हि फुटला आहे, हल्ला झाल्यानंतर त्यांना तत्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले, हल्लेखोर अद्यापही मोकाट त्यांना अद्याप अटक झाली नाही याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस अधीक्षक कारल्याची अप्पर पोलीस अधीक्षक संतोष वाळके यांचे संपर्क साधून हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करून अटक करावी अशी मागणी केली आहे, आरटीओ ऑफिस कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून जे दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी केली आहे, तू फोन का उचलत नाहीस असं म्हणत हल्लेखोरांनी हल्ला चढवला होता, या प्रकाराचा तपास पोलिस करत असल्याची माहिती सांगण्यात आली आहे, किरण वाघमारे हे वंचित ब

बिल्डर क्षेत्रातील कोहिनूर हिरा युवा उद्योजक राजेश राठोड

Image
सामाजिक कार्यातून युवकांचा प्रश्‍न सोडवणारा युवा उद्योजक बीड प्रतिनिधी अंकुश गवळी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील तेलगाव या ठिकाणी अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेले व्यक्तिमत्व, राजेश राठोड, यांचा जन्म या गावी झाला, त्यांचे प्राथमिक शिक्षण यांच्या गावातील प्राथमिक शाळेत झाले, माध्यमिक शिक्षण वारोळा येथील आश्रम शाळेत झाले,  राजेश राठोड हे शिक्षण घेत असताना ,यांना मनात पडलेला मोठा प्रश्न, आपण कोणत्यातरी व्यवसायात उतरावे असं त्याच्या मनात पडलेला प्रश्न, राजेश राठोड यांनी बीड जिल्ह्यातील तेलगाव हे गाव सोडून त्यांनी कुठेतरी लांब शहरात जाण्याचं ठरवलं, त्यांनी मुंबईसारखी शहर निवडलं, आता मुंबईसारख्या शहरात रिअल इस्टेट क्षेत्रात ते आपल्या उल्लेखनीय कामगार बजावत आहेत, राजेश राठोड मुंबई सारख्या आज युवा उद्योजक म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे, अनेक सामाजिक कार्यातून गोरगरिबांचा आधार म्हणून यांनी गोरगरिबांना मदत केली, दवाखाना असो ,शालेय विद्यार्थ्यांची फिस, काम कोणतेही असो, अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवून त्यांनी समाजाला एक नवा आदर्श घडविण्याचे ठरवला आहे, युवकांना सातत्याने मार्गद

वडवणी ते चिंचोटी रस्ता बनला मौत का कुआखडा चुकवा बक्षीस मिळवा

Image
 रस्त्याचे काम तात्काळ करा अन्यथा वडवणी रास्ता रोको :- विनोद काकडे, प्रकाश उजगरे  वडवणी वार्ताहर वडवणी ते चिंचोटी हा रस्ता खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी दुर अवस्था निर्माण झाली असून या रस्त्यावर धोकादायक व मोठमोठे खडे झाले आहेत.या खड्या मध्ये पावसाचे पाणी साचून वाहनधारकांना मोठी काटेवरची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे हा रस्ता मोतकाकुवा बनला असून खड्डा चुकवा बक्षीस मिळवा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. या अगोदरही अर्ज विनंत्या करूनही या रस्त्याकडे प्रशासनाने व लोकप्रतिनिधी कडुन दुर्लक्ष केले आहे.या खड्डामय रस्त्याचे काम तात्काळ करा अन्यथा बीड परळी हायवे वर रस्ता रोको करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा संघटक विनोद काकडे रिपब्लीकन वि सेना जिल्हा अध्यक्ष प्रकाश ऊजगरे यांनी तहसिलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला यांना निवेदना द्वारे दिला आहे.      सविस्तर वृत्त असे की वडवणी ते चिंचोटी हा पाच किलोमीटरचा रहदारीचा रस्ता असून या रस्त्यावर  दिड दोन फुटाचे मोठ मोठे खडे पडले आहेत.या  रस्त्यावरून चिंचोटी,हरीचंद्र पिंपरी,चिंचवडगाव, काडीवडगाव,देवडी,ख लिमगाव,देवगाव,ख

बंकटस्वामी विद्यालयात ह. भ .प .गुरुवर्य श्री वसंत महाराज लोळदगाव यांच्या दिंडीचे जंगी स्वागत

Image
बीड प्रतिनिधी खडकीघाट येथील विद्यालयात दत्त संस्थान लोळदगाव यांच्या दिंडीचे गेल्या 29 वर्षापासून ह. भ .प . वैकुंठवासी बंकटस्वामी महाराज यांच्या नावाने चालवलेल्या बंकटस्वामी विद्यालयात याही वर्षी दिंडीचे स्वागत करण्यात आले .तसेच दिंडीतील सर्व महिला पुरुष यांना भोजनाची सोय शाळेतर्फे केली जाते .मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर तसेच विद्यालयातील शिक्षक श्री उंदरे सर श्री सुपेकर सर श्री रामहरी रिंगने सर श्री आनेराव सर श्री मोरे सर श्री तानाजी खाकरे सर श्री अविनाश खाकरे सर सुरेश भोसले संजय बनसोडे अशोक मांजरे पोपट कुरे श्री सुरेश भोसले श्री संजय बनसो डे श्री बाबुराव कानडे श्री कल्याण अनंत्रे इ. सर्व कर्मचारी यांच्या तर्फे दिंडीची व्यवस्था केली होती.  या वेळी गुरुवर्य ह. भ. प. श्री वसंत महाराज यांनी वारकरी संप्रदाय विषयी अमृततुल्य असे आपले विचार व्यक्त केले तसेच याप्रसंगी गावातील भजनी मंडळ महिलावर्ग ज्येष्ठ नागरिक व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रमात उपस्थित होते शेवटी कार्यक्रमाची सांगता गुरुवर्य ह-भ-प श्री वसंत महाराज यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर यांना

कंत्राटी कामगारांच्या अधिकाराचे सतत हनन केल्यामुळे कामगारांनी उचलले टोकाचे पाऊल - भाई गौतम आगळे सर.

Image
  परळी ( प्रतिनिधी ) शासनाने निश्चित केलेले किमान वेतन १८,६६० / रुपये आहे. देतात फक्त ७,५००/ रुपये, तेही दोन महिन्या नंतर देतात. हजेरी वेतन कार्ड, पगार स्लीप देत नाहीत. बॅंकेत पगार करत नाहीत. भविष्य निर्वाह निधीचा यु.एन.ऐ.नंबर अद्याप दिला नाही. मा. न्यायालयाचे निर्णय, अधिनियम, शासन निर्णयातील तरतुदीनां सुध्दा मुख्याधिकारी, नजर अंदाज करत असल्याने कामगारांनी टोकाचे पाऊल उचलले, असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले. सविस्तर माहिती अशी की शासन परिपत्रक - ०३/२०१४/  प्र. क्र. ९५/ कामगार - १० मंत्रालय मुंबई निर्गमित तारीख १०/०६/२०१४ ची अंमलबजावणी करावी. या करीता लोकशाही मार्गाने मागील सहा वर्षांपासून अनेक निवेदन देऊन प्रसंगी विविध आंदोलन सुध्दा केले. तसेच २६ जानेवारी २०२२ रोजी सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालया बीड समोरील लिंबाच्या झाडावर दोन महिला कामगार प्रतिनिधी चढून लक्षवेधी आंदोलन केले. त्या झाडाची कत्तल केली तरी अद्याप कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला नसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे रोजंदा

साप्त.महाराष्ट्र रक्षक आणि सिल्लोड तालुका स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटना कडून गुणवंताचा सत्कार

Image
 सिल्लोड (प्रतिनिधी)साप्त.महाराष्ट्र रक्षक व सिल्लोड तालुका स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेकडून नुकतेच सिल्लोड येथील शेवंताबाई मंगल कार्यालयात गुणवंत  जे 10वी 12वी तसेच इतर परिक्षेत या वर्षात यशवंत झाले आहेत त्यांचा सत्कार   तहसीलदार विक्रम राजपूत  तसेच अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाचे राज्य अध्यक्ष डि.एन.पाटील यांच्या हस्ते       पठाण अफ्शा फैज अहमद  ,सिल्लोड झोंड विश्वजीत रामभाऊ, गोळेगाव पठाण महेरून्निसा अब्दुल वहाब, नानेगांव, बागवान सानिया सलीम, निल्लोड,  शेख अर्शिया सलीम, निल्लोड, भोसले आरती गणेश, पिंपळगाव पेठ  साळवे परवीन दौलत, वांगी बुद्रुक पठाण मिस्बाह अतिक खान ,भराडी शेजुळ समर्थ प्रदिप, उपळी, डॉ आशिष जितेंद्र माहोर MBBS पांगरी  शेजुळ समर्थ प्रदिप, उपळी  शेख इम्रान खालेक, सिल्लोड शेख समीर शेख कलीम, सिल्लोड, ब्राह्मणे बाबासाहेब बंडु,बोरगाव कासारी, ब्राह्मणे दत्ता हिरामण,बोरगाव कासारी,  पठाण अब्दुल आहद खान ऐवाजखान, भराडी 12वी , कु.पुजा जगदीश वाघ खुल्लोड (इंजिनिअरींग) यांचे आईवडीलांसह सत्कार करण्यात आले व मान्यवरानी

कातरणी येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न

Image
बाबासाहेब डमाळे पाटील मित्र मंडळा तर्फे येवला तालुक्यातील कातरणी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीरआयोजित करण्यात आले होते.याचे उद्घघाटन सरपंच योगेश तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.                 या प्रसंगी संगीता संसारी,गोकुळ लोहकरे,विष्णू कदम,सखाराम गायकवाड, शिवाजीराव पवार,पंढरीनाथआहेर, उषा पवार, शांताराम वैराळ,जालिंदर कासार,भिमाबाई शिंदे,गोपीनाथ नवले,मिनाबाई नवले, हनुमान कुशारे,संदीप मुरकुटे,वृशाल डमाळे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.           डॉ.राजूखान सय्यद यांच्या माध्यमातून डॉ.अखीलेश रजपुत, डॉ.अजित यादव यांनी यावेळी महिला-पुरुष यांची नेत्र तपासणी केली.नेत्र रुग्णांनाच्या पुणे येथे एच.व्ही.देसाई हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया बाबासाहेब डमाळे पाटील मित्र मंडळा मार्फत करण्यात येणार आहे.अशी माहीती रोहन डमाळे यांनी दिली.

बंसल क्लासेस करणार १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा नागरी सत्कार

Image
    बीड, दि. २७ (प्रतिनिधी) :- विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरीत करणे आणि त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित करून देणे, हा दृष्टिकोन व उद्देश ठेवून राजस्थान कोटा येथील बंसल क्लासेस बीडच्या वतीने सौ. के एस के महाविद्यालय सभागृह येथे दि २९ जुन २०२२ संध्या. 5.30 वाजता. यंदा दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा या कार्यक्रमामध्ये भव्य दिव्य नागरी सत्कार व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. बीड शहरातील पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या अभूतपूर्व कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन बंसल क्लासेस बीडचे अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर आणि सचिव डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या वतीने करण्यात आले आहे.  आपल्या अभिनव शैक्षणिक तेजस्फूर्ती उपक्रमांनी अत्यल्पवधीत बीडवासीयांचा विश्वास प्राप्त करण्यात यशस्वी झालेल्या राजस्थान कोटा येथील बंसल क्लासेसने बीड शहरात दर्जेदार शैक्षणिक वातावरण निर्माण केले आहे. याबरोबरच बीड शहरातील अनेक विद्यार्थी, पालकांनी बंसल क्लासेसच्या अभ्यासक्रम नियोजन पद्धत, शैक्षणिक धोरण, विद

बीड शहरात जल वाहतूक सुरू करून प्रशासकांनी युवकांना रोजगार द्यावा - प्रशांत डोरले

Image
विकास पर्वाचे एकाच पावसात निघाले वाभाडे बीड (प्रतिनिधी ) :- बीड नगरपालिकेवर मागच्या चार महिन्यांपासून प्रशासक आहेत. त्यामुळे खन्या अर्थाने अधिकान्यांच्याच हाती सारी सत्ता आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वीच नगरपालिकेने मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम हाती घेणे आवश्यक होते. मात्र त्या काळात मुख्याधिकारी असलेले उत्कर्ष गुट्टे यांनी बीड शहरातील नाले सफाई, विकास कामे या पेक्षा राजकीय नेत्यांच्या पुढे मागे करण्यातच धन्यता मानल्याने त्यांच्या अकार्यक्षमतेचे परिणाम आता बीडच्या नागरिकांना भोगावे लागत आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास बीड शहरात तब्बल अर्धातास जोराचा पाऊस आला. शहरातील मान्सून पूर्व सफाईची कामे ही अपूर्णच असल्याने तर काही भागात केलीच गेली नसल्याने पावसाचे पाणी आणि तुबलेल्या गटारातून येणारे दूषित पाण्यातील कचरा व गाळ नागरिकांच्या घरात शिरत असल्याचे चित्र पहायला मिळत होते. विशेष म्हणजे शहराच्या सर्वच भागात हेच चित्र असल्याने नागरिकांची मात्र दाणादान उडाली. त्यामुळे मान्सून पूर्व सफाई नेमकी कोणाच्या फायद्यासाठी व कागदोपत्री बिल उचलण्यासाठी तर केली गेली नाही ना असा आरोप शिवसंग्रा

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेला मरगळ गती देत अंमलबजावणी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

Image
  येवला तालुका प्रतिनिधी उस्मान शेख :-महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा वतीने भटक्या विमुक्त जाती जमाती घटकासाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत मा. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना सुरू केली असून या योजनेमुळे या घटकातील लोकांची भटकंती थांबून स्थिरता प्राप्त होऊन त्याचे राहणीमान उंचावून आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने राबविण्यात येणारी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना तात्काळ राबवावी म्हणून वंचित बहुजन आघाडी चा वतीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन विचारणा करण्यात आली   केंद्र व राज्य सरकार चा वतीने अनुसूचित जातीच्या घटकांना रमाई घरकुल तर जमातीचा घटकांना शबरीमाता तसेच पंतप्रधान आवास घरकुल योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करून लाभ मिळत आहे तरी भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातील लोकांचा या घरकुल योजनेला मंजुरी असताना अंबलबजावणी का होत नाही असा सवाल वंचित चा पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला    तालुक्यातील मौजे धुळगाव येथे या योजनेसाठी ग्रामपंचायतीकडून पात्र व गरजू लाभार्थ्यांची निवड करून या घरकुला

वडवणी च्या पहिल्या महिला मराठी पत्रकार गितांजलीताई लव्हाळे या कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

Image
   वडवणी प्रतिनिधी अंकुश गवळी    दि 25 रोजी बीड बार्शी नाका परिसरातील सदैव सामाजिक कार्यात आग्रेसर आसणारे सर्व परिचीत धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते अशोक दादा ढोले पाटील यांच्या मित्र परिवाराच्या वतिने पसायदान सेवा प्रकल्प ढेणकमोह ता जी बीड येथे प्रमुख मान्यवर समाजसेवक प्रविण(भाऊ)पालीमकर, सातिराम(आण्णा)ढोले पाटील व शिवाजी माने,व सिनेअभिनेञी तथा रिल्सस्टार पायल वंजारे,सायली सोनवने,वैष्णवी नवले,स्नेहा सोनवाने,गौरी नवले सह आदिच्या उपस्थीती मध्ये कोविड काळात आनेकाने आपले मोलाचे योगदान देशासाठी दिले होते आशा योक्ती ना व महिलाना कोविड योध्दा हा पुरस्कार सन्मान पञ देऊन गितांजली लव्हाळे , समाजसेवक शरद झोडगे , विष्णुबाळ झोडगे कुष्णा पाठकसर ,राजेश शिंदे दराडेसर , सुरेश पवार ,महेश जाधव राज गायकवाड निखील फुंदे यांना देन्यात आला तसेच पसायदान प्रकल्पातील आनाथ बालकाना शैक्षणिक साहित्य सह जिवन आवश्यक वस्तु वाटप करुन पुण्यस्मरण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला आनेक मान्यवरा कंडुन.अशोक दादा ढोले पाटील यांच्या कार्याचे कवतुक केले या सर्व कार्यक्रमाला दिलीप राठोड व अभय काटे यांनी मोलांचे योगदान दिले

शेती व्यवस्थापन निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढणे आवश्यक- मंडळ कृषि अधिकारी खेडकर

Image
कृषी संजीवनी मोहिमेचा मौजे दिमाखवाडी येथे तिसरा दिवस आज दिनांक 27 जून 2022 रोजी मंडळ कृषि अधिकारी मादळमोही अंतर्गत मौजे दिमाखवाडी येथे कृषि संजीवनी मोहिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री खेडकर एच व्ही मंडळ कृषि अधिकारी मादळमोही हे बोलत होते. दिनांक 25 जून ते 1 जुलै या कालावधीत कृषि विभागार्फत कृषि संजिवनी मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेत कृषि विभागाच्या सर्व योजना व तंत्रज्ञान विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आज मोहिमेचा तिसरा दिवस होता.आजच्या कार्यक्रमाची थीम महिलांचा शेतीमधील योगदान व सेंद्रिय शेती ही होती.त्या अनुषंगाने श्री खेडकर यांनी महिलांचे शेती मधील योगदान विशद केले तसेच शेती व्यवस्थान निर्णय प्रक्रियेत महिलांनी सहभाग नोंदवला पाहिजे असे मत व्यक्त केले.तसेच या गावात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने एकात्मिक हुमणी नियंत्रण, एकात्मिक कापूस व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.तसेच दिमाखवाडी हे गाव जमीन आरोग्य मृद पत्रिका योजनेत आहे त्या अनुषंगाने श्री सांगळे आर व्ही यांनी माती परिक्षण, बीजप्रक्रिया व जैविक खतांचा वापर या बाबत सव

मान्सूनपूर्व नालेसफाईच कागदोपत्रीच ,नगरपरिषद बीड भ्रष्टाचार प्रकरणात कारवाईसाठी लक्ष्यवेधी होडी आंदोलन

Image
बीड नगरपालिकेमार्फत मान्सूनपूर्व नालेसफाईच्या  नावाखाली कागदोपत्रीच बोगस कामे दाखवुन लाखो रूपयांचा अपहार केला असून शहरातील मुख्य रस्ते, शासकीय कार्यालये,बाजारपेठा, शाळा एकंदरीतच शहरालाच तलावाचे स्वरूप आले असून चारचाकी दुचाकी इंजिनमध्ये पाणी शिरल्यामुळे बंद पडत असुन  पादचा-यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असून त्याच्या निषेधार्थ बीडकरांना होडी,नाव साठी माफक दरात कर्ज उपलब्ध करून बीड नगरपरिषदेला ग्रामपंचायत दर्जा देण्यात यावा आदि.मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी होडी/नाव चालवा आंदोलन करण्यात येऊन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले आंदोलनात अड.संगिता धसे,किस्किंदाताई पांचाळ,संगीता सांगोळे,शेख युनुस,,रामनाथ खोड, मोहम्मद मोईज्जोदीन,सय्यद आबेद,शेख मुबीन,बलभीम उबाळे आदिंनी सहभाग घेतला.    मान्सूनपूर्व लाखो रूपयांची नाल्यासफाई  कागदोपत्रीच; गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करा   शहरातील बहुतांश भागात नाल्याची कामेच नाहीत तसेच अपुर्ण असलेल्या नाल्याची नियमित साफसफाई नाही मान्सू

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन

Image
नाशिक,दि.२६ जून:- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज नाशिक येथे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयात डॉ.शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जात आहे. आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, योगेश निसाळ, राजेंद्र जगझाप, मकरंद सोमवंशी, समाधान तिवडे, ज्ञानेश्वर महाजन, श्रीराम मंडळ, दिपक गां

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताकडगाव येथे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन

Image
बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील ताकडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज सकाळी 10 = 00 वाजता लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयती निमित्त अभिवादन करताना या शाळेच्या मुख्याध्यापीका श्रीमती स्वामी मॅडम सेवानिवृत पाटबंधारे कर्मचारी श्री कल्याणराव स्वामी व या शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा उपक्रम कार्यक्रमाधिकारी श्री प्रल्हाद शिदे सर यावेळी शिदे सर म्हणाले कि आज शाळेला सुट्टी आसताना पण आम्ही सर्व शिक्षक शाळेत उपस्थितीत राहुन राजर्षी छत्रपती शाहू महाराजा ची जयंती साजरी करण्यात आली आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षक श्री शिदे सर म्हणाले 

डॉक्टर जितीन वंजारे यांनी वारकऱ्यांना दिली मोफत वैद्यकीय सेवा

Image
संत एकनाथ महाराज दिंडीचे रायमोह येथे आगमन.  डॉक्टर जितीन वंजारे यांनी वारकऱ्यांना दिली मोफत वैद्यकीय सेवा बीड प्रतिनिधी -महाराष्ट्राला अध्यात्माची खूप जुन्या काळापासून आवड आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, याच महाराष्ट्रात विविध संत-महात्मे, ऋषी-मुनी होऊन गेले त्यांनी महाराष्ट्राला अध्यात्मिकतेच वळण दिलं पारंपारिक ब्राह्मणी वैदिक वेगळी संस्कृती असली तरी शेतकरी, कष्टकरी,दलित,दुबळ्यांचा पंढरीचा 'विठोबा' हाच देव आणि तारणहार मानला जातो. विठुरायाला चंद्रभागेच्या वाळवंटात भेटण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून गाव, वाडी, तांडा आणि पाड्यावरून भोळेभाबडे भाविक भक्त पंढरपूरकडे जात असतात आणि आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर चंद्रभागा नदीच्या वाळवंटामध्ये हा वैष्णवांचा मेळावा आषाढी एकादशी ला भरला जातो.शेतकऱ्याची पेरणीची कामे सरासरी उरकून वयोवृद्ध, तरुण आणि पोरं-सोर आणि वारकरी परंपरेला जाणारे सर्व लोक अगदी आनंदाने या दिंडीमध्ये सहभागी होतात. संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर, संत गजानन, संत एकनाथ, संत मु्ताबाई अशा विविध संतांच्या आणि महात्म्यांच्या नावाने वेगवेगळ्या पालख्

फोटोग्राफी क्षेत्रातील कमी वयात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा युवा फोटोग्राफर . रुद्रा बाबर

Image
बीड प्रतिनिधी अंकुश गवळी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुद्रा सदाशिव बाबर वय वर्षे 24, गाव, ठा, आडगाव, तालुका गेवराई जिल्हा बीड, येथील रहिवासी रुद्रा बाबर यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठा,आडगाव येथे झाले, माध्यमिक शिक्षण यमादेवी विद्यालय जातेगाव या ठिकाणी झाले, उच्च माध्यमिक शिक्षण मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे बलभीम महाविद्यालय या ठिकाणी चालू आहे, अत्यंत गरीब परिस्थिती या युवकांची, मागील सहा वर्षा पूर्वी बीड शहरातील एका फोटोग्राफी दुकानावर ते कामाला होते, काम करत असताना त्यांच्या मनात आलं की आपण आता फोटोग्राफी व्यवसाय सुरू करावा, फोटोग्राफरची तर दुकान तर टाकायची पैसा भांडवल कुठून आणायचे, हा रुद्रा बाबर यांच्या मनात पडलेला मोठा प्रश्न, त्यांनी काही वर्ष फोटोग्राफी क्षेत्रात काम केले शहरात, मग त्यांनी स्वतःचा व्यवसाय व स्वतःचे दुकान बीड शहरातील सारडा सेंटर डीपी रोड या ठिकाणी आर,बी ,फोटो स्टुडिओ या दुकानाची स्थापना केली गेली दोन वर्ष पूर्वी, खरतर अत्यंत, जिद्द, चिकाटी ,संघर्ष घेऊन युवक फोटोग्राफी क्षेत्रात आपल्या व्यवसायात पदा

आलं इंडिया पॅंथर सेना अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका कार्यकारणी जाहीर

Image
अकोला प्रतिनिधी :-राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या आदेशावरून महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भाई भोळे विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली.अकोट तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली अकोला जिल्हा अध्यक्ष परवेज खान यांच्या नेतृत्वात कार्यकारणी व नियुक्ती करण्यात आली.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.व ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या अकोट तालुका अध्यक्षपदी. उमेश तायडे. तालुका उपाध्यक्ष पदी. एजाज शेख. तालुका महासचिवपदि  योगेश शिरसाट. तालुका सचिव. सतिश वानखडे. तालुका संघटक रिजवान शेख. तालुका कार्याध्यक्षपदी.अवेस शेख यांना नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सदांशिव. शाहरुख शेख. आमिर खान. शाकीर अब्दुल. मित्र परिवार उपस्थित होते

कवि उतमराव म्हस्के औरंगाबाद ,यांचा सत्कार

Image
आज दि, 26 जून शाहू महाराज याच्या जयंती निमित्त, औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेज पार्टी याच्या तर्फे,,,   खूली काव्य स्पर्धा राष्ट्रवादी भवन एन 12 हाडको औरंगाबाद येथे आयोजित केली होती, कविता सादर केल्या नंतर,,,,कवि गायक, शाहिर उतमराव म्हस्के औरंगाबाद, यांचे मा,श्री, कैलास पाटील ( माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) औरंगाबाद यांच्या हास्ते स्मृतीचिन्ह,,प्रमाणपत्र,,हार देवून म्हस्के यांचा सत्कार करण्यात आला,    संयोजक,मारूती साळवे,,,आशोक थोरात,,, रविभाऊ माहोरकर बाळासाहेब पा,सावंत, हे होते.

भिमराव चव्हाण यांचा वंचित पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार.

Image
गेवराई / प्रतिनिधी  राज्यात विरोधीपक्षाची भुमीका निभावनाऱ्या, ओबीसी समाजाच्या आरक्षण, सोशीत वंचीतासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या भटके विमुक्त राज्य सदस्य पदी भिमराव चव्हाण महाराज यांची वंचित बहुजन आघाडी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. एॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या अदेशावरुन प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र मा. रेखाताई ठाकुर यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड केली.  छोट्याश्या तांड्यावरील व्यक्तीला राज्यपातळीवर भटके विमुक्त सदस्य पदी निवड केल्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.  आनंद वाढवण्यासाठी व आपल्या गावातील भिमराव चव्हाण महाराज यांची वंचित बहुजन आघाडी भटके विमुक्त राज्य सदस्य पदी निवड झाल्याबद्दल काठोडा तांडा येथे दि. २६ रविवार रोजी भव्य नागरी सत्काराचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजन केले होते.  यावेळी बोलतांना भिमराव चव्हाण महाराज म्हणाले की सर्व भटके विमुक्त समाजासाठी आहोरात्र कष्ट घेवुन त्यासह ओबीसी आरक्षणासाठी पक्षाच्या अदेशानुसार अंदोलन उभा करु वाडी, वस्ती तांड्यावरील विखुरलेल्या समाजाला सोबत घेवुन वंचित बहुजन आघाडी पक्षाची ताकद वाढवेल असे प्र

पाटोदा ग्रुप ग्रा.प.च्या सरपंच पदी सौ. सविता बोराडे यांची निवड

Image
येवला प्रतिनिधी उस्मान शेख :-पाटोदा ग्रुप ग्रा.प.च्या सरपंच पदी सविता अंकुश बोराडे यांची निवड करण्यात आली. सरपंच प्रताप पाचपुते यांनी आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदरच्या रिक्त जागेवर सविता बोराडे यांची निवड शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीत एक गट व प्रहार या पक्षाच्या आघाडीकडून ग्रा प सदस्य १) रईस देशमुख २) प्रताप पाचपुते ३) राहुल वरे ४) खंडू पवार ५) संतोष दौंडे ६) अझरुद्दीन पठाण ७) गणेश बैरागी ८) जयश्री बोराडे ९) कौसाबाई जाधव १०) अलका वाघ ११) सुभद्रा मेंगाणे १२) मंगलबाई बोलणारे १३) वैशाली पवार १४) सविता बोराडे १५) मोनाली घोरपडे १६) सुनिता आहेर आधी ग्रा.प सदस्य यांनी मतदानात भाग घेतला. आणि गुप्त मतदान पद्धतीने करण्यात आली. कारण ग्रुप ग्रा.प. मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची १२ सदस्य निवडून आणून सत्तेत बसले परंतु सरपंच आवर्तन प्रमाणे सरपंच निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट झाले एक गट साहेबराव आहेर, अण्णा दौंडे तर दुसरा गट अशोक मेंगाणे, रमेश बोरणारे, प्रताप पाचपुते, मारुतीराव घोरपडे असे घट झाल्याने सरपंच पदाची निवडणूक ही चुरशीची झाली. या

भरधाव वेगाने ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने मारफळा फाटा येथे विद्यार्थ्याचा जागीच मुत्यू झाला

Image
  बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील खेर्डावाडी येथील ओमकार भागवत कादे वय 15 वर्षे हा विद्यार्थी खेर्डावाडी येथून मारफळा फाटा येथील शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत असताना मारफळा फाटा येथे हवेवर भरधाव वेगाने टूँव्हल्सने धडक दिल्याने त्याचा जागीच मुत्यू झाल्याची घटना आज सकाळी 9 = 00 वाजण्याच्या सुमारास घ डली आहे या विषयी सविस्तर माहिती आशी की गेवराई तालुक्यातील खेर्डावाडी येथील ओमकार भागवत कादे वय 15 वर्षे हा विद्यार्थी खेर्डावाडी येथून दि 25 / 6/2022 रोजी सकाळी 9 वाजता मारफळा फाटा येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत होता येत असताना गढी माजलगाव रोड राष्ट्रीय महामार्गावर मारफळा फाटा येथे हायवे वर भरधाव वेगाने टूँव्हल्स एम एच 23 डब्ल्यु 76 66 या टँव्हल्सने धडक दिल्याने ओमकार भागवत कादे याचा जागीच मुत्यू झाला जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ झोडपे याच्या मार्गदर्शनाखाली डॉ पंडित यांनी शवविच्छेदन केले खेर्डावाडी येथे दुपारी ओमकार भागवत कादे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पुढील तपास तल वाडा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे याच्या नेतृत्वाखाली

कनक इंटरप्राईजेस चा घनकचरा व्यवस्थापन म्हणजे आंधळ दळतंय कुत्र पिठ खातय - भाई गौतम आगळे सर

Image
     बीड प्रतिनिधी:-नगर परिषद बीड यांनी घनकचरा व्यवस्थापनाचे काम अमरावतीच्या कनक इंटरप्राईजेस या कंपनीला दिले आहे.परंतु या कंपनीचा कारभार म्हणजे आंधळ दळतय कुत्र पिठ खातय,अशाप्रकारे चालू असल्याचे मत कामगार नेते तथा रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.सविस्तर माहिती अशी की बीड नगर परिषदेने मागील दोन वर्ष अगोदर कनक इंटरप्राईजेस सोबत करारनामा करून कार्यारंभ आदेश दिला.परंतु सदरील एजन्सीने त्यास केराची टोपली दाखवली.त्यामुळे कामगार प्रतिनिधी तथा रोजंदारी मजदूर सेना बीड जिल्हा अध्यक्षाअनिता बचुटे यांनी दोन वेळा मा.जिल्हाधिकारी कार्यालय,बीड समोरील लिंबाच्या झाडावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.त्यामुळे मा. जिल्हा अधिकारी, बीड यांनी,मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांना व्यवस्थापक कनक एंटरप्राइजेस अमरावती,संघटना पदाधिकारी व कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी लेखी पत्र जा.क्र. २०२१/दिनांक ०८/१२/२०२१ रोजी दिले होते. त्या नुसार संयुक्त बैठक घेऊन मुख्यधिकारी,न.प.बीड यांनी व्यवस्थापक,कनक इंटरप्रायजेस

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताकडगाव या ठिकाणी पालक मेळावा संपन्न

Image
बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील ताकडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज दि 25 / 6 / 2022 रोजी सकाळी 9 = 00 वाजता पालक मेळावा घेण्यात आला यावेळी या पालक मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्यासाठी ताकडगाव येथील महिला पालक शिक्षक मुख्याध्यापक शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्य आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी या पालक मेळाव्याला मार्गदर्शन करताना श्री प्रल्हाद शिंदे सर यांनी शिक्षणाचे महत्व काय आहे ते सर्व पालक व विद्यार्थी ना पठवून दिले या वेळी उपस्थित पालकानी आसे सांगीतले की आपल्या ताकडगाव च्या शाळेचे नाव संपुर्ण बीड जिल्हा मध्ये नाव लौकीक होईल आसे शिक्षक आमच्या शाळेला लाभले आहे आसे पालक वर्गातुन बोलले जात होते या वेळी उपस्थित पालक वर्गाचे शाळेच्या वतीने श्री प्रल्हाद शिंदे सर यांनी आभार मानले व पालक मेळावा संपला आसे जाहिर केले

कला व विज्ञान महाविद्यालय कु-हा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न

Image
श्रीराम शिक्षण संस्था धामणगाव रेल्वे द्वारा संचालित कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा येथे राष्ट्रीय सेवा योजना व शारीरिक शिक्षण विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिन घेण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून मा.प्राचार्य डॉ अरविंद देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री मकरंद जी जोग हे होते.तसेच स्था.विकास समिती सदस्य मा. श्री विजयराव डहाके व मा.श्री किसनरावजी इखार हे होते. मा. श्री मकरंद जोग यांनी प्रात्यक्षिक करून सर्वांना योग शिकविले व आपले शरीर व मन स्वस्थ ठेवण्याकरिता दररोज योगा करणे किती आवश्यक आहे हे सर्व त्यांनी योग शिकवून, करून दाखविले . शारीरिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्याकरिता नित्य व्यायाम करणे हे आवश्यक आहे. व्यायामाचे महत्त्व त्यांनी विषद करून सांगितल तसेच एक प्रार्थना ही गायन करून सांगीतली.मा.श्री इखार काका यांनी ही व्यायामाची महत्ता सांगितली. अध्यक्षीय भाषणात मा. प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख सर उद्बोधन करतांना म्हणाले की व्यायामा मुळे न केवल शारिरीक स्वास्थ्य तर मानसिक स्वास्थ्य ही चांगलं राहतं हे आपली दिनचर्या असायला पाहिजे.सुत्रसंचालन श्री रंजन शेंडे यांनी त

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या समस्या मार्गी लागल्याने बीड येथे करण्यात आला जल्लोष राज्य सरकारच्या निर्यणाचे ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाकडून स्वागत

Image
बीड ( सखाराम पोहिकर ) महाराष्टू ग्रामपंचायत कर्मचारी महासंचे महाराष्ट्राचे सरचिटणीस क्रॉ नामदेवजी चव्हाण सर यांनी महाराष्ट्र राज्य सरकार चे आभार मानले व ते म्हणाले कि महाराष्ट्रातील साठ हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे तेव्हा आता कुठे तरी ग्रामपंचायत कर्मचार्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्या बद्दल या सरकार चे उपकार मानावे लागेल असे . क्रॉ नामदेवजी चव्हाण म्हणाले तेव्हा आता मात्र आशा आहे ती वाढ पगार केव्हा मिळते तेव्हा लवकरत लवकर वाढीव पगार देऊन या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पंचमी आंनदात साजरी करण्यात यावी अशी विनंती केली आहे तरी आता वेळ आली आहे की केव्हा होणार वाढीव पगार अशा प्रश्न ग्रामपंचायत कर्मचार्याना पडला आहे जो पर्यत 20 20 पासून चा फरकाची पगार शासनाने दिले तर जल्लोष आनंद साजरा करावा आसे कॉ नामदेवजी चव्हाण आपले विचार व्यक्त करताना म्हणाले शेवटी क्रॉ शेख याशीन भाई म्हणाले की हा विजय महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा आहे या महासंघाने आता पर्यत खुप वेळा धरणे आंदोलन मोर्चा उपोषन मंत्र्याना निवेदन देऊ हा विजय खेचू

गौडगावात ७७ लक्ष रुपये किंमतीच्या पाणी पुरवठा योजनेचा मा.विजयसिंह पंडितांच्या हास्ते शुभारंभ

Image
  बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील गौंडगाव येथे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे गौडगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत ७७ लक्ष रुपये किंमतीच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या शाखेची स्थापना माजी जि प अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शुभहास्ते करण्यात आली यावेळी गेवराई तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर चेअरमन नारायण नवले जय भवानी कारखान्याचे संचालक भास्कर खरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते गौडगाव येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत ७७ लक्ष रुपये किंमतीच्या पाणी पुरवठा कामाचा शुभारंभ विजयसिह पंडित यांच्या हास्ते करण्यात आला यामध्ये पाईप लाईन जलकुंभ आदी कामाचा समावेश आहे याच कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या शाखेची स्थापना विजयसिह पंडित ' यांच्या हास्ते करून शाखेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली या कार्यकारणीत अध्यक्षपदी अशोक सोलाट उपअध्यक्षपदी पांडूरंग बनसोडे सचिवपदी झुंबर सोनवणे तर सदस्य म्हणून महादेव बनसोडे पोपट प्रधान छगन सोनवणे लहूराव सोलाट नामदेव बनसोडे ईश्वर बनसोडे गणेश इनकार दाऊद शेख . विन

गौडगावात ७७ लक्ष रुपये किंमतीच्या पाणी पुरवठा योजनेचा मा.विजयसिंह पंडितांच्या हास्ते शुभारंभ

Image
बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील गौंडगाव येथे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे गौडगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत ७७ लक्ष रुपये किंमतीच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या शाखेची स्थापना माजी जि प अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शुभहास्ते करण्यात आली यावेळी गेवराई तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर चेअरमन नारायण नवले जय भवानी कारखान्याचे संचालक भास्कर खरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते गौडगाव येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत ७७ लक्ष रुपये किंमतीच्या पाणी पुरवठा कामाचा शुभारंभ विजयसिह पंडित यांच्या हास्ते करण्यात आला यामध्ये पाईप लाईन जलकुंभ आदी कामाचा समावेश आहे याच कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या शाखेची स्थापना विजयसिह पंडित ' यांच्या हास्ते करून शाखेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली या कार्यकारणीत अध्यक्षपदी अशोक सोलाट उपअध्यक्षपदी पांडूरंग बनसोडे सचिवपदी झुंबर सोनवणे तर सदस्य म्हणून महादेव बनसोडे पोपट प्रधान छगन सोनवणे लहूराव सोलाट नामदेव बनसोडे ईश्वर बनसोडे गणेश इनकार दाऊद शेख . विनोद