Posts

Showing posts from January, 2023

डाॅ.गणेश ढवळेंना पद्मपाणी राष्ट्रीय/राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार जाहीर

Image
___ पद्मपाणी प्रतिष्ठान बीड यांच्यामार्फत सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पद्मपाणी राष्ट्रीय/राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार २०२३ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना जाहीर झाला असून येत्या मार्च मध्ये बीड मधील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे आयोजक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलिपजी तरकसे यांनी माहितीपत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे.           प्रतिवर्षी पद्मपाणी प्रतिष्ठान द्वारे  सामाजिक, पत्रकारीता,शैक्षणिक,उद्योजक,साहित्य, प्रशासकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणा-या व्यक्तिंना पद्मपाणी राष्ट्रीय/राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे हे १४ वे वर्ष असून २०२२-२३ या वर्षातील उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार वितरण सन्मान सोहळा येत्या मार्च मध्ये बीड मधील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात होणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे. 

राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी मा.राधेश बी दिवाकर यांची निवड

Image
 बीड(प्रतिनिधी ) केंद्रीय रेल्वे बोर्ड सदस्य तथा प्रदेश सचिव भाजपा ओबीसी मोर्चा मा. राधेश बी दिवाकर यांची राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली        राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात येत आहे या निवडीमुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष उमेश आनेराव राज्य प्रवक्ते द्वारकादास फटाले,मा.गुलाब भावसार,राष्ट्रीय उपाध्यक्ष भूषण पवार,राष्ट्रीय सचिव मा. शरद राठोड यांच्यासह यावेळी संघटनेचे सचिव उमेश आनेराव बार्शी, शंकर वानेगावकर महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक व पुणे जिल्हा अध्यक्ष. मा. शरद धावारे, नांदेड संजय मोगरे नाशिक, महीला अध्यक्ष विजयालक्ष्मी आनेराव,प्रदेश अध्यक्ष सविता ताई घुले,मिनाक्षी ताई अहिरे,दिपा वैतकार वैशाली ताई परदेशी,मिनल लिंबोळे,विजया माळी, मंगल डफळ,विद्या कातखडे, दिपाली बोराडे  तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पदाधिकार्यांनी या निवडीबद्ल अभिनंदनांचा वर्षाव केला.

मूकनायक मानवमुक्तीच्या लढ्याचा सिद्धांत,सुधाकर सोनवणे : बार्टी केंद्रात मूकनायक दिन उत्साहात

Image
बीड प्रतिनिधी :-शोषित, वंचित, उपेक्षित समाजाच्या उन्नतीबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक पाक्षिकातून मानवमुक्तीचे सिद्धांतन केले. मानवी गुलामगिरी, दुःख आणि शोषणाचे समर्थन बनलेली तत्कालीन व्यवस्थेतील स्थितीशीलता बदलण्याची समतावादी- न्यायवादी- स्वातंत्रवादी परिभाषा मूकनायकाच्या माध्यमातून सामान्यांच्या कंठी उतरली. त्यामुळेच मूकनायक हे तळागाळातील उपेक्षितांचा बुलंद आवाज बनले. तसेच मूकनायक मानवमुक्तीच्या लढ्याचा सिद्धांत असल्याचे मत जेष्ठ पत्रकार सुधाकर सोनवणे यांनी व्यक्त केले.     बीड शहरातील सावंत प्लाझा, मित्र नगर चौक शिवाजी नगर येथे असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यताप्राप्त सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राकडून मंगळवार (दि.३१) रोजी मूकनायक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुधाकर सोनवणे बोलत होते. यावेळी विचार मंचावर अध्यक्षक म्हणून केंद्र प्रमुख प्रा.अविनाश वडमारे, संपादक सुनिल डोंगरे आदींची यांची प्रमुख उपस्थिती होती.       पुढे बोलतांन

मन्यारवाडी केंद्रातील केंद्र प्रमूख मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांची माहे जानेवारी ची शिक्षण परीषद संपन्न

Image
गेवराई प्रतिनिधी सखाराम पोहिकर :-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई जिल्हा बीड येथील प्राचार्य जयपाल कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व मार्गदर्शक पत्रानुसार केंद्रातील शिक्षकांचे शैक्षणिक मंथन होऊन प्रत्येक मुल शिकावं यासाठी नियोजन या हेतूने शिक्षण परीषद आयोजित करण्यात आली होती विषय क्रमांक एक शाळा स्तरावरील अध्ययन स्तर निर्धारणा नंतरचा कार्यक्रम विषय क्रमांक दोन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विषय क्रमांक तीन शालेय आरोग्य विषय क्रमांक चार व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन वरील चार विषयावर सुलभक सुनिल गवारे सर लहू पुरी सर पोटे सर संतोष शिंदे सर भाऊसाहेब बारगजे सर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले सदरील शिक्षण परिषदेचे अध्यक्ष पद प्रभारी मुख्याध्यापक श्री शिवाजी सानप यांनी भुषविले व प्रमुख पाहुणे केंद्र प्रमुख श्री सुनील कुर्लेकर सर व केंद्रीय मुख्याध्यापक श्री भारत येडे सर हे होते शिक्षण परिषदेस सर्व शिक्षक उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद शिंदे सर यांनी केले तर आभारप्रदर्शन काशिद सर यांनी मानले चहापान व भोजन कार्यक्रमानी परिषदेची सांगता करण्यात आली कार्

नाशिक मध्ये स्वराज्याचा भगवा फडकणार,डॉक्टर रुपेश हरिश्चंद्र नाठे यांची जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली

Image
नाशिक मध्ये स्वराज्याचा भगवा फडकणार डॉक्टर रुपेश हरिश्चंद्र नाठे यांची जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली . छत्रपती संभाजी राजे यांचा नाशिक दौरा आत्ताच पार पडला या दौऱ्या दरम्यान कार्यकर्ता मेळावा घेऊन छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज्याचे शिलेदार निवडले यातच स्वराज्य संघटनेचा विस्तार महाराष्ट्रभर होत असताना नाशिक हे केंद्रस्थानी ठेवून सर्वप्रथम नाशिक जिल्ह्याच्या नियुक्ती देण्यात आल्या यावेळी छत्रपती संभाजी राजे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे व ग्रामीण भागात अतिशय उत्तम संपर्क असणारे डॉक्टर रुपेश हरिश्चंद्र नाठे यांची जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी राजांनी मार्गदर्शन करताना स्वराज्य हे प्रस्थापितांचे नसून विस्थापितांचा आहे असे सांगितले त्यातूनच नवीन व अभ्यासू नेतृत्व घडवणार असल्याची ग्वाही संभाजी राजांनी दिले महाराष्ट्राच्या प्रगतीला हातभार लागावा व या महाराष्ट्राच्या मातीत नवीन नेतृत्व घडावे व महाराष्ट्राला नव उंचांक गाथा यावा यासाठी स्वराज्य कटीबद्ध राहील स्वराज्य हे 18 पगड जाती 12 बलुतेदारांचा आहे हे समाजातील प्रत्येक विस्थापित व अन्याय झालेल्या

मूकनायक दबलेल्या लोकांचा आवाज होते - यशवंत भंडारे

Image
मूकनायक दबलेल्या लोकांचा आवाज होते - यशवंत भंडारे  तुलसी कॉलेज मध्ये मूकनायक दिन साजरा बीड(प्रतिनिधी ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायकची स्थापना करून दबलेल्या पिचलेल्या लोकांचा आवाज बुलंद केला. मूकनायक दबलेल्या लोकांचा आवाज होते असे प्रतिपादन माजी उप संचालक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,महा.राज्य यशवंत भंडारे यांनी केले. तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, सभागृह बीड येथे दि. ३१ जानेवारी २०२३ सकाळी ११ वा. मूकनायक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी प्रतिष्ठान बीडचे अध्यक्ष प्रा. प्रदिप रोडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून लोकमत टाईम्स बीड जिल्हा प्रतिनिधी प्रा. सि. आर. पटेल, संपादक वैभव स्वामी, तुलसी कॉलेज ऑफ आयटी चे प्राचार्य डी.जी.निकाळजे यांची उपस्थिती होती. प्रस्ताविकात प्राचार्य डी.जी.निकाळजे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत बाबासाहेबांच्या सर्व समावेशक समाज हिताच्या पत्रकारिता विषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना भंडारे म्हणाले की,भावी उन्नती आणि त

गेवराई तहसील कार्यालयासमोरील जवंजाळ मल्टी सर्विसेस येथे ग्राहकांची भरमसाठ लूट

Image
गेवराई तहसील कार्यालयासमोरील जवंजाळ मल्टी सर्विसेस येथे ग्राहकांची भरमसाठ लूट प्रशासनाने लक्ष घालून ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कारवाई करावी गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 8888435869 :- गेवराई तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या मुख्य गेट समोरील जवंजाळ मल्टी सर्विसेस मध्ये भोळ्या भाबड्या ग्राहकांची भरमसाठ लूट होत आहे अशा अनेक तक्रारी आहेत.मात्र ह्या लुटमारीची योजना खरोखरच चालू आहे हे सोमवार दि.३० रोजी पहायला मिळाले.चक्क वीस रूपयांना एक झेरॉक्स प्रत या भामट्या दुकान चालकानं दिली.हा दुकानदार खूप जास्त पैसे घेतो याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे चर्चा नेहमीच तहसील कार्यालयासमोर लोकांमध्ये ऐकायला भेटते.या दुकानदाराच्या दरांकडे लक्ष देऊन यावर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी चर्चा लोकांमध्ये पहायला मिळाली.गेवराई तहसील कार्यालयासमोर हा भामटा लूटारू बसला असून यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी चर्चा लोकांमध्ये ऐकायला मिळत आहे. चक्क एका प्रिंट चे वीस रूपये घेऊन परत पाच रुपयांची मागणी करणारा हा भामटा लूटारू आहे.याचे दुकानाचे लायसन्स रद्द करून यावर योग्य तो दंड व फौजदार

नेपाळमधून दोन विशाल शालिग्राम शिळा अयोध्येत आणले जात आहेत. यापासून श्रीराम आणि माता सीता यांच्या मूर्ती बनवल्या जाणार आहेत

नेपाळमधून दोन विशाल शालिग्राम शिळा अयोध्येत आणले जात आहेत. यापासून श्रीराम आणि माता सीता यांच्या मूर्ती बनवल्या जाणार आहेत . जिथून शिळा जात आहेत तिथे लोक डोके टेकवत आहेत. फुले अर्पण करून शुभेच्छा देत आहेत. हे दोन्ही शिळा नेपाळमधील पोखरा येथे असलेल्या शालिग्रामी नदीतून (काली गंडकी) भूगर्भीय आणि पुरातत्व तज्ज्ञांच्या देखरेखीखाली काढण्यात आले आहेत. 26 जानेवारी रोजी ट्रकमध्ये भरले. पूजनानंतर दोन्ही शिळा ट्रकने रस्त्याने अयोध्येला पाठवण्यात येत आहेत.एका शिळाचे वजन 26 टन आहे तर दुसऱ्या शिळाचे वजन 14 टन आहे. म्हणजेच दोन्ही शिळांचे वजन 40 टन आहे.नदीच्या पात्रातून शिळा काढण्यापूर्वी धार्मिक विधी करण्यात आले. नदीची माफी मागितली. विशेष पूजा करण्यात आली. आता शिळा अयोध्येला आणल्या जात आहे. गाळेश्वर महादेव मंदिरात 26 जानेवारीला शिळांचा रुद्राभिषेकही करण्यात आला आहे.नेपाळमधील सीतामढीचे महंत दोन महिन्यांपूर्वी कारसेवक पुरम येथे रुद्राभिषेक करण्यासाठी आले होते. त्यांनीच ट्रस्टला शाळीग्राम शिळांची माहिती दिली. त्यानंतर या शिळा नदीतून बाहेर काढून अयोध्येत आणण्याचा कार्यक्रम ठरला. यामध्ये नेपाळ सरकारनेही

शेवगांव शहरातील त्या वादग्रस्त बांदकामाबाबत वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर व मा मुख्याधिकारी नगरपरिषद शेवगाव यांना सादर केले आहे सदरील बांधकामा बाबतचा वादाचा विषय हा संपुष्टात आलेला आहे

शेवगांव शहरातील त्या वादग्रस्त बांदकामाबाबत वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर व मा मुख्याधिकारी नगरपरिषद शेवगाव यांना सादर केले आहे सदरील बांधकामा बाबतचा वादाचा विषय हा संपुष्टात आलेला आहे { अविनाश देशमुख शेवगांव } मौजे शेवगाव येथील गट क्रमांक ११२४ पैकी ०० हे. ०२ आर या शासकीय मालकीच्या जागेवर कोणीतरी एक इसम अतिक्रमण करून बांधकाम करत असले बाबत चा अर्ज वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे आल्यानंतर सदर बांधकाम शासकीय जागेत सुरू असलेबाबत/ नसलेबाबत चौकशी करण्याच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी मार्फत मा. मुख्याधिकारी साहेब, नगरपरिषद शेवगाव आणि मा‌. तहसीलदार साहेब शेवगाव यांना दिनांक २३/११/२०२२ रोजी निवेदन देण्यात आलेले होते सदर निवेदनामध्ये सदरील बांधकाम हे शासकीय जागेमध्ये असल्यास त्याविरुद्ध कारवाई करणे कामी चौकशी करण्यासाठी नमूद करण्यात आले सदरील अर्जदार चौकशी न झाल्यास दि. ०१/१२/२२ रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्याबाबत ही कळविण्यात आलेले होते. सदरील वंचित बहुजन आघाडीच्या अर्जाच्या अनुषंगाने मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद शेवगाव यांचे मार्फत तातडीने सुनावणी घेण्यात आलेली आहे. सदरील सुनावण

पं.नेहरू विद्यालयाचे वार्षिक संमेलनाचे सौ.दमयंतीताई धोंडे यांचे हस्ते उद्घाटन संपन्न

Image
पं.नेहरू विद्यालयाचे वार्षिक संमेलनाचे सौ.दमयंतीताई धोंडे यांचे हस्ते उद्घाटन संपन्न मराठी चित्रपट गीते,राष्ट्रभक्तीपर गीते,"आई" नाटिका प्रेक्षकांची मने जिंकली...! आष्टी(प्रतिनिधी ) आष्टी येथील पंडीत जवाहरलाल नेहरू प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे दरवर्षीप्रमाणेच अतिशय सुरेख नियोजनात वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या स्नेह संमेलनाचे उदघाटन शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ.दमयंतीताई धोंडे,युवानेते अभयराजे धोंडे, गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव,शेतकरी शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक विठ्ठलआण्णा बन्सोडे,माजी जि.प.सदस्य बापूराव धोंडे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री भाऊसाहेब लटपटे,प्रशासन अधिकारी प्राचार्य डी.बी.राऊत सर,प्रा.शिवदास विधाते,डॉ.नदीम शेख,जालिंदर पोकळे,पत्रकार आण्णासाहेब साबळे,प्राचार्य सुरेश बोडखे या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी स्नेह संमेलनात शाळेतील विद्यार्थ्यांनी भक्तीगीत,समुह नृत्य,स्फुर्तीगीत,लोकगीत, देशभक्तीपर गीत,पारंपरिक सांस्कृतिक गीत,शिवचरित्र शिवगीते,वारकरी गीत,मराठी चित्रपटातील गीते,

सर्वधर्म प्रार्थनेने महात्मा गांधींना अभिवादन

Image
मालेगाव (प्रतिनिधी )- येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करून तसेच सर्वधर्म प्रार्थना सामुहिकरीत्या म्हणून अभिवादन करण्यात आले.  प्रारंभी अजीज एजाज, आनंद गोसावी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा संघटक नचिकेत कोळपकर, माजी जिल्हा संघटक रविराज सोनार, माजी जिल्हाध्यक्ष विलास वडगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दिनेश ठाकरे, जेष्ठ सेवा दल सैनिक राजीव वडगे, सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार, तालुका कोषाध्यक्ष राजेंद्र दिघे, बळवंत अहिरे, अशोक व्याळीज आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते‌

आरटीई प्रवेशासाठी शाळांची नोंदणी सुरू; प्रवेशाच्या वेळापत्रकाकडे पालकांचे लक्ष

Image
आरटीई प्रवेशासाठी शाळांची नोंदणी सुरू; प्रवेशाच्या वेळापत्रकाकडे पालकांचे लक्ष तपासणीसाठी समिती; संस्था चालकांच्या मर्जीने समिती गठित करू नका :- मनोज जाधव आरटीई प्रवेशाच्या अनुदानापोटी जिल्ह्यातील शाळांना अडीच कोटी रुपयांचा निधी वाटप बीड (प्रतिनिधी )प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मिळावा, या उद्देशाने शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के राखीव जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची प्रक्रिया आणखी सुरू झाली नाही. मात्र सोमवार दी.२३ पासून शाळांची नोंदणी सुरू झाली आहे. आता प्रवेशाच्या वेळापत्रकाकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला / मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. गत वर्षी डिसेंबर महिन्यातच आरटीई प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले होते. जानेवारीमध्ये शाळांची नोंदणीप्रक्रियाही पूर्ण झाली होती. यंदाच्या वर्षी मात्र, जानेवारी महिना संपत आलेले असतानादेखील शाळांची नोंदणीप्रक्र

गेवराईत साईंच्या पालखीचे जोरदार स्वागत,"साई बाबा की जय" जयघोषाने गेवराई शहर दणाणले

Image
  गेवराई प्रतिनिधी गणेश ढाकणे :- अंबासाखर कारखाना ते शिर्डी या साई भक्तांची पायी पालखी सोहळा साईबाबांच्या नामाचा जयघोष करत शिर्डीकडे रवाना होत असून गेवराई शहरातील जायकवाडी वसाहत येथील रूद्रेश्वर मंदिर या ठिकाणी पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी करत साईबाबांच्या नामाचा जयघोष केला.  अंबासाखर कारखाना येथील साई पालखी मराठवाड्यातील मानाची पाहिली पालखी म्हणून ओळखली जाते. गेली सत्तावीस वर्षापासुन पालखी सोहळा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जात असून २२ जानेवारी रोजी हा साई पायी पालखी सोहळा शिर्डीकडे मार्गस्थ होत असतो. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुवार दि.२६ जानेवारी रोजी सायंकाळी हा सोहळा शेकडो साई भक्तांसह गेवराई शहरात दाखल झाला होता. शहरातील मुख्य रस्त्याने साई नामाच्या जय घोषात ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत अतिषबाजी करत गेवराईच्या साईभक्तांनी मिरवणूक काढून साईंच्या पालखीचे जल्लोषात स्वागत केले. शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढूण फटाक्याची अतीषबाजीही करण्यात आली. पालखी सोहळा वाजत गाजत रूद्रेश्वर मंदिर जायकवाडी

अपक्ष सत्यजीत तांबे नाशिक मधुन बाजी मारणार ?

Image
   ईगतपुरी प्रतिनिधी- (नवनाथ गायकर यांजकडुन ):-     नाशिक पदवीधर मतदार संघाच्या जागेसाठी आज निवडणुक होत असुन अपक्ष तथा तगडे उमेदवार सत्यजीत तांबे व महा विकास आघाडी ने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटिल यांचेत सरळ व चुरशीची लढत होतानां दिसत आहे. मात्र या निवडणुकीत तांबे यांची असलेली घट्ट पकड पाहता तेच बहुधा बाजी मारतील अशी जोरदार चर्चा आहे.     नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणुक पहिल्यादांच एवढी गाजली आहे. या निवडणुकीचे वैशिष्टय म्हंणजे एकाही प्रमुख पक्षाचा उमेदवार या निवडणुकीत रिंगणात नाही.ही निवडणुक अपक्ष उमेदवारांमध्येच होत आहे. महा विकास आघाडी राज्यात सर्वत्र एकत्र निवडणुक लढवत आहे.त्या अनुषंगाने नाशिकची जागा ही कांग्रेसची हक्काची आहे.आणी ती कांग्रेसला बहाल ही केली होती.मात्र असे असतानांही कांग्रेसच्या घोषित उमेदवारानेच पक्षाचा ए.बी.फार्म मिळुनही चक्क माघार घेतल्याने महा विकास आघाडीला जबर धक्का बसला आहे. याचे तीव्र पडसाद राज्यात महा विकास आघाडीत संशयाचे वातावरण निर्माण होण्यात उमटले आहे. तसेच कांग्रेस मधील आतली गटबाजीही या निमित्ताने चव्हाटयावर आली आहे.     या

कार्यसम्राट आमदार लक्ष्मण ( आण्णा ) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यसम्राट चषक 2023-U 21 क्रिकेट स्पर्धचे उद्घाटन संपन्न

Image
गेवराई ( सखाराम पोहिकर ) गेवराई विधानसंभा मतदार संघाचे कार्यसंम्राट आमदार लक्ष्मण ( आण्णा ) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युनियर भगवती क्रिकेट क्लब आयोजित कार्यसम्राट प्रीमियर लिग चषक 2023 - U 21 या स्पर्धेचे उदघाटन गेवराई विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते माननीय शिवराज ( दादा ) पवार यांच्या शुभ हस्ते ज्युनियर भगवती क्रिकेट क्लब आयोजित कार्य सम्राट प्रीमीयर लीग कार्य सम्राट चषक चा भव्य दिव्य उद्वाघटन सभारंभ पार पडला या उद्धाटन प्रसंगी गेवराई नगरीचे माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब गिरी . नगरसेवक . रामभाऊ पवार . शेख निजामभाई . उद्धव मडके . करण सुतार . योगेश मोटे . सनी घुबांर्डे . समाधान ( जिजा ) मस्के . दाऊदभाई पठाण . कृष्णा . ( भैय्या ) पाटोळे . रामभाऊ लिंबोरे . विजय जंवजाळ . अनिकेत मस्के . दिलिप धुंरधरे . मनोज पाटोळे ज्ञानेश्वर . भाले . दत्ता चव्हाण . सुमित भुते . सुनिल चव्हाण . अमोल कानडे . दिगंबर गिरी शुभम लाड . करण आगलावे . राहुल कांबळे . वसिमभाई . भगवानराव . बाळू चव्हाण . रवी पाटोळे . कुणाल सरोदे . राम सोलाट . ऋषी गोरे इत्यादी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते

डोळे वटारून पाहू लागली की समजून घ्यावे कि, " इहलोकातील आपले अवतारकार्य शेवटच्या टप्यात आहे. "

वटारलेले डोळे पाहून दबणारी बायकोच, आता डोळे वटारून पाहू लागली की समजून घ्यावे कि, " इहलोकातील आपले अवतारकार्य शेवटच्या टप्यात आहे. " अविनाश देशमुख शेवगांव  9960051755        कमावत्या मुलांच्या आवाजात कडकपणा आला; तर समजून घ्यावे कि, आपण आता कौटूंबीक जबाबदारीतून हळूहळू अंग काढून घ्यावे.         बसल्या बसल्या ह्या शेंगातील दाणे काढा ,असे जेव्हा सुनबाईने म्हटले तर समजून घ्यावे की, बॉस नावाचे पद यांनी खारीज केले आहे.      वय वर्ष 60 नंतर कुणी आपल्याशी चांगले वागेल ही अपेक्षा ठेवु नका. भाऊबंदकीचे नाते कुटूंबाच्या फाळणी बरोबरच संपुष्टात आले, नातेवाईक देणे / घेणे वादातून संपले, पत्नीचा ओढा नकळत न टिकणाऱ्या मुलांच्या नात्याकडे वळू लागला. कार्यप्रसंगात नातेवाईक भेटतात, केवळ रामराम होतो, फारसी चौकशी होत नाही, तुम्ही मात्र मनात उजळणी करत असता, ह्याला मी किती मदत केली होती...         सगळे कटू अनुभव जमा झाले असतील, कुणी नाही कुणाचे हा अनुभव गर्द झाला असेल.          नाती बिघडली, सबंध बिघडले, वाट्याला एकटेपण आले, आता कुणाचे फोन येत नाहीत, दुखावलेले मन कुणाला फोन कर असेही म्हणत नाही.    

दुसऱ्यासाठी करतानासुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं...

!!!खंत!!! दुसऱ्यासाठी करतानासुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं... { अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755 अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो... झटतो.. प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो... कोणताही स्वार्थ नसतांना... मतप्रवाह तर दोन्ही बाजूंनी असतात. ज्याच्यासाठी करतो त्याला वाटतं केलं आमच्यासाठी, तर काय फरक पडतो... याचं कर्तव्यच आहे... करणाऱ्याचा हेतू स्वच्छ असतो.. आपल्या प्रयत्नाने कुणाचं तरी भलं व्हावं, हा निर्मळ प्रयत्न असतो.. गैरसमज हा फार मोठा शत्रू असतो. तो या निर्मळ भावनेलाच धोका निर्माण करतो... ज्याला समजून घ्यायचंय, तो समजूतदारपणे गोष्टी हाताळतो... ज्याला समजून उमजून घायचंच नाही, तो शब्दाचा किस पडतो... शब्दांनी घायाळ करतो... नात्यांची खरी मेख तर इथेच आहे... माझं माझं करता करता आपण आपल्यांना दुखावतो... घालून पाडून बोलतो... परिणाम फक्त वाईटच होतात... संबंध दुरावले जातात... आपुलकीतला रस संपत जातो... उरते ती फक्त निराशा... हल्ली तर नातं आर्थिकदृष्टीतच बांधलेली दिसतात... जणू पैसा म्हणजे सर्वस्व... अमक्याने अमक्या कार्यक्रमात आहेर

डॉक्टरांनी काढला चक्क मेंदुमधुन दगड

Image
डॉक्टरांनी काढला चक्क मेंदुमधुन दगड... शिर्डी,राजेंद्र दूनबले  श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये न्‍युरो सर्जन डॉ.मुकुंद चौधरी यांच्‍या न्‍युरो ओटीच्‍या टिमने गेल्‍या पाच महिन्‍यापासुन मेंदुमध्‍ये रुतलेला दगड काढण्‍याची शस्‍त्रक्रिया यशस्‍वीरित्‍या पार पाडली असुन या यशस्‍वी शस्‍त्रक्रियेबद्दल संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सर्व न्‍युरो सर्जरी टीमचे अभिनंदन केले.                  श्री साईबाबा संस्‍थान संचलित श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालयात राज्‍याच्‍या कानाकोप-यातुन तसेच राज्‍याबाहेरील हजारो रुग्‍ण विविध उपचारांसाठी दाखल होत असतात. यारुग्‍णालयामध्‍ये मेंदु शल्‍य विभागात (Neurosurgery) दर महिन्‍याला साधारणत सरासरी ६० ते ७० मेंदु आणि मणक्‍याच्‍या शस्‍त्रक्रिया होतात. त्‍यातच एक परभणीचे रुग्ण श्री.सचिन मारके वय वर्ष ३७ हे गेल्‍या पाच महिन्यापासून डोक्याला झालेली जखम घेवुन श्री साईबाबा हॉस्पिटल येथे तपासणीसाठी न्युरो सर्जन डॉ.मुकुंद चौधरी यांच्याकडे आले. साधारणत: पाच महिन्यांपुर्वी (ऑगास

सोयगाव पोलीस स्टेशन व शांताई फाउंडेशन वाकोद यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

Image
सोयगाव,दि.२९( प्रतिनिधी मुश्ताक शाह ) येथील पोलीस ठाणे सोयगाव येथे ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मनीष कलवानिया पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण,सुनिल लांजेवार अप्पर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण,डॉ.विजयकुमार मराठे उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड,यांचे मार्गदर्शनाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस ठाणे सोयगाव येथे दि.२६ जानेवारी रोजी पोलीस ठाणे सोयगाव व शांताई फाउंडेशन वाकोद यांचे संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष सोयगाव न्यायालय न्यायाधीश अमोल इंगोले यांनी केले,सदर रक्तदान शिबिराचे प्रमुख पाहुणे व रक्तदाते सोयगाव तहसीलदार रमेश यशवंत यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले आहे. सदर भव्य रक्तदान शिबिरामध्ये पोलीस ठाणे सोयगाव,सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार सह पोलीस अंमलदार मिळून यांनी ८ रक्तदान करून सहभाग नोंदीला तसेच सोयगाव येथील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून एकूण १६ रक्तदाते यांनी ७४ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद देण्यात

एकत्रित लढा आणि सरकारला जातीनिहाय जनगणना करण्यास भाग पाडा - छगन भुजबळ

Image
एकत्रित लढा आणि सरकारला जातीनिहाय जनगणना करण्यास भाग पाडा - छगन भुजबळ ओबीसींच्या वाट्याला कायमच संघर्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केली खंत ओबीसींचे हक्क नाकारून देशात एकाधिकारशाही आणत असाल तर त्याचा आम्ही विरोधच करू छगन भुजबळ यांचा दिल्लीत एल्गार दिल्ली, २९ जानेवारी - एकत्रित लढा आणि सरकारला जातीनिहाय जनगणना करण्यास भाग पाडा, जोपर्यंत तुम्ही तुमची एकी दाखवत नाही तोपर्यंत हे सरकार झुकनार नाही आणि म्हणूनच एकत्रित लढून येणारी जनगणना ही जातिनिहाय झाली पाहिजे असे मत आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लब दिल्ली येथे ओबीसी महासभे तर्फे आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान देश कधीच नाकारू शकत नाही. त्यांनी केलेल्या कार्यामुळेच आज राष्ट्रपती पदापासून सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर दिसत आहेत. डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातूव हजारो वर्ष पिचलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले…  आज देशात जणगनणा होत नाही याला कारण देतान

डाॅ.गणेश ढवळे रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

Image
  ___ रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत "मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा " राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०२३ आज दि.२९ जानेवारी रविवार रोजी जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांच्या हस्ते चित्रपट कलाकार आदि. मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सामाजिक न्याय भवन बीड येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात स्मृतिचिन्ह,पुष्पगुच्छ देऊन प्रदान करण्यात आला.यावेळी सहकारी शेख युनुस च-हाटकर उपस्थित होते.              कार्यक्रमाचे प्रस्तावित ओमप्रकाश गिरी यांनी केले तर रयत सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आर. जी. माने यांनी आभार मानले   रयत सामाजिक प्रतिष्ठानचे सभासद ॲड. संगीताताई धसे,चित्रपट अभिनेते संतोष वारे,उदय देशमुख ,उपाध्ये सर,संतोष कुराडे,विकास धोत्रे,किशोर सोनावणे आदि उपस्थित होते. 

कवी गायक शाहीर उत्तमराव मस्के यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार

Image
कवी गायक शाहीर उत्तमराव मस्के यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार   आज दि,29 जानेवारी ला मैत्री कट्टा कवी-मनाचा साहित्य समूह नागपूर राज्यस्तरीय कविसमेंल मध्ये भारतीय घटनाकार माझा भिमराव हि कविता सादर केल्या नंतर, कवि गायक शाहिर उतमराव म्हस्के यांचा, स्मृतीचिन्ह प्रमानपत्र देवून सत्कार करण्यात आला,

जातीनिर्मूलन मानवतावादी समाजनिर्मितीचा अग्रक्रम- सतीश बनसोडे

Image
जातीनिर्मूलन मानवतावादी समाजनिर्मितीचा अग्रक्रम- सतीश बनसोडे  शिक्षण आणि राजकारणातील धर्माचा शिरकाव हद्दपार करा  बीडमध्ये एकदिवशीय अभ्यासवर्ग प्रशिक्षण शिबिरात ज्ञानसंवाद बीड प्रतिनिधी : आजच्या सर्वतऱ्हेच्या समस्या सोडवण्याचे विचारसूत्र फुले- आंबेडकरी तत्वज्ञानात आहे. म. फुलेंनी आपल्या विचाराला कृतीची जोड देत स्त्री समस्या, अस्पृश्याता निवारण, शेतकरी समस्यांना न्याय दिला. घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या मार्गाने संविधानाच्या रूपात एक जीवनपद्धती आपल्याला दिली आहे. आधुनिक ज्ञानाची चर्चा करत असतांना कालबाह्य ज्ञानाची चर्चा टाकून देतांना कुणी दिसत नाही. देशभरातील सध्याची सर्व कालबाह्य चर्चा निकालात काढण्यासाठी विवेकवादी समाजरचना प्रस्तापित करणे आवश्यक आहे. त्यासाठी जातीनिर्मूलन मानवतावादी समाजनिर्मितीचा अग्रक्रम असल्याची वैचारिक मांडणी सतीश बनसोडे यांनी केली. शनिवारी दि. २८ रोजी येथील स. मा. गर्गे वाचनालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीबा जोतीराव फुले विचारधारेचे एक दिवशीय अभ्यासवर्ग प्रशिक्षण शिबीर आयोजन करण्यात आले होते. यावेळी फुले - आंबेडकर यांना समजून

आगामी काळात अँड. बी.डी. हंबर्डे महाविद्यालयातील विद्यार्थी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होतील...

Image
आगामी काळात अँड. बी.डी. हंबर्डे महाविद्यालयातील विद्यार्थी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होतील...  अध्यक्ष इंजि.किशोर हंबर्डे यांचे आत्मविश्वासपूर्ण प्रतिपादन. आष्टी। प्रतिनिधी पन्नास वर्षांपूर्वी स्थापन झालेले आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आता अँड. बी.डी हंबर्डे या नावाने अत्याधुनिक अभ्यासक्रमामुळे सुसंपन्न झाले आहे.. या रौप्य महोत्सवी वर्षांमध्ये संपूर्ण वर्षभर विविध उपक्रम होणार आहेत..  या महाविद्यालयातून राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिग्गज विद्यार्थी चमकले आहेत.  मात्र अद्यापही यूपीएससी या स्पर्धा परीक्षेमध्ये अद्याप यश मिळालेले नाही परंतु आम्ही लवकरच या स्पर्धा परीक्षेत यश मिळवतील असे विद्यार्थी घडवणार आहोत त्या प्रकारची अभ्यासक्रमाची संधी त्यांना निर्माण करून देणार आहोत असे दुर्दम्य आत्मविश्वास पूर्ण प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष इंजि. किशोर हंबर्डे यांनी केले...  आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अँड बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन समारंभामध्ये अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते..  

सुभाष वाव्हळ पत्रकारितेतील निष्काम कर्मयोगी - पंजाबराव मस्के

Image
सुभाष वाव्हळ पत्रकारितेतील निष्काम कर्मयोगी - पंजाबराव मस्के  लोकमान्य टिळक महाविद्यालयात केला गौरव सन्मान  वडवणी (प्रतिनिधी) मागील ४० वर्षांपासून वडवणी सारख्या ग्रामीण भागात अत्यंत खडतर परिस्थितीतून पत्रकारितेचा पायंडा रचलेले शासकीय अधिस्विकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ यांचे पत्रकारितेतील योगदान खरोखरच अतुलनीय असे आहे. पत्रकारितेप्रती त्यांची असलेली निस्वार्थी निष्ठा, श्रध्दा व प्रामाणिकपणा हे आजच्या तरुण वर्गाला प्रेरणादायी असून केवळ दिखाऊपणा करणाऱ्यांसाठी हे एक प्रकारचे झणझणीत अंजन आहे. रामलिंग नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी त्यांची बिनविरोध निवड होणे म्हणजे त्यांच्या कार्याचा एक प्रकारे गौरवच झाला आहे. त्यांच्या निवडीचा उलट पतसंस्थेला आता अधिक फायदा होणार असून पतसंस्थेच्या विकासाला नक्कीच हातभार लागेल याची आपणास शाश्वती आहे. असे गौरवोदगार लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे अध्यक्ष पंजाबराव मस्के काका यांनी महाविद्यालयातील त्यांच्या गौरव सन्मानाप्रसंगी व्यक्त केले.                                        याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील दैनिक झुंजार

वडवणीतील दंत व मुखरोग तपासणी शिबिराचा सैनिक व पत्रकारांनी घेतला लाभ

Image
वडवणीतील दंत व मुखरोग तपासणी शिबिराचा सैनिक व पत्रकारांनी घेतला लाभ  माळवदे परिवाराचा समाजाप्रती असलेला सेवाभाव प्रेरणादायी - नगराध्यक्ष शेषेराव जगताप   वडवणी,दि.२८(प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनानिमित्त वडवणीतील डॉ.माळवदे दातांचा दवाखाना यांच्या वतीने सर्व आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी तसेच सर्व पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आलेले मोफत दंत व मुखरोग तपासणी शिबिर हा अभिनव उपक्रम समाज विधायक असून देशाच्या सीमेवर भारत मातेचे रक्षण करुन देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक शिवप्रसाद माळवदे व त्यांचे चिरंजीव डॉ.अक्षयकुमार माळवदे सुनबाई डॉ.सौ.दिक्षा माळवदे यांनी या उपक्रमातून हे निभावलेले सामाजिक दायित्व संपूर्ण वडवणी शहरासाठी निश्चितपणे अभिमानास्पद असून या शहराचा नगराध्यक्ष या नात्याने आपल्यासाठीही या माळवदे कुटुंबीयांचा सेवाभाव प्रेरणादायी असल्याचे गौरवोदगार वडवणी नगरीचे नगराध्यक्ष शेषेराव बाप्पु जगताप यांनी याप्रसंगी काढले.                                            याबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नुकतेच दि.२६

शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या आ. विक्रम काळेंचा विजय 'विक्रमी' करा- बाजीराव भैय्या धर्माधिकारी

Image
शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या आ. विक्रम काळेंचा विजय 'विक्रमी' करा- बाजीराव भैय्या धर्माधिकारी परळी वैजनाथ, प्रतिनिधी :-शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या विक्रम काळेंचा विजय निश्चित असुन हा विजय शिक्षक बंधु भगिनींनी 'विक्रमी' करावा असे आवाहन परळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.      महाआघाडीचे सरकार असताना शिक्षकांना जुन्या पेन्शनचा प्रश्‍न अंतिम टप्प्यात होता. आणखी काही काळ सरकार असते तर तो अतापर्यंत मार्गी लागला असता. विक्रम काळे हे शिक्षकांचा प्रश्‍न म्हटले की, अगदी रस्त्यावर उतरून काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत. मागील १६ वर्षांत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले आहे. शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी शिक्षकांनी विक्रम काळे यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करावे, असे आवाहन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले.       आ.विक्रम काळे आ.धनंजय मुंडे यांचे विधिमंडळातील निकटचे सहकारी आहेत.आ.काळे मागील सोळा वर्षांपासून संपूर्ण मराठवाड्यात कायम कामात आहेत. ते प्रत्येकाच्य

राष्ट्रीय समाज पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी माऊली महाराज मार्कंड यांची निवड

Image
राष्ट्रीय समाज पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी माऊली महाराज मार्कंड यांची निवड मार्कंडवाडी  मध्ये माऊली महाराज मार्कंड यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न महादेव जानकर साहेबांचे विचार, ग्रामीण भागातील जनतेसमोर  पोहोचवणार बीड प्रतिनिधी ,अंकुश गवळी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मार्कंड वाडी या गावांमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, माननीय श्री माऊली  मार्कंड यांची बीड विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व सरपंच उपसरपंचाचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी या कार्यक्रमांमध्ये पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले ,यावेळी माऊली महाराज मार्कंड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांना अक्षरशः डोळ्यात पाणी आले,  व त्यांनी पक्षाविषयी साहेबा विषयी प्रेम दाखवले,  येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष बीड जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात गाव गाड्या  वस्त्यावर वाढवणार असल्याचे माऊली महाराज मार्कंड यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन केले आहे, या कार्यक्रमाला  उपस्थित, ह, भ, प, सुरेशानंद महाराज, ,दत्तामामा सुरन

विद्यार्थ्यांनों, प्राप्त ज्ञानाचा वापर करून आयुष्याच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हा - प्राचार्य सानप

Image
विद्यार्थ्यांनों, प्राप्त ज्ञानाचा वापर करून आयुष्याच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हा! बलभीम महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात प्राचार्य डॉ. वसंत सानप यांचे प्रतिपादन बीड (प्रतिनिधी ) - विद्यार्थी हे राष्ट्राचे आधारस्तंभ असून त्यांनी स्वातंत्र्य व स्वैराचार यातील फरक ओळखला पाहिजे. सर्व विषयांचे सखोल ज्ञान मिळवून मिळवलेले ज्ञान फक्त महाविद्यालयीन परीक्षेपुरते न वापरता आपल्या आयुष्यातही या ज्ञानाचा उपयोग करून आयुष्याच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे व आपले जीवन समृद्ध करावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वसंत सानप यांनी बलभीम महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात केले.  याविषयी सविस्तर वृत्त असे की, बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दि. २७ जानेवारी रोजी इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. मंचावर कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. विजय गुंड, पर्यवेक्षक प्रा. राम जाधव, प्रा. अश्विनी वावरे, प्रा. प्रशांत धापसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. व

कोपरगाव शहरातील डी पॉल पब्लिक स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनास आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.

Image
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तसेच विविध स्पर्धांमध्ये विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी व्ही.एम.एस.एस. अहमदनगरचे अध्यक्ष, फादर हेबिक इडापल्ली, माजी नगरसेवक, गटनेते विरेनजी बोरावके, कृष्णाजी आढाव, पोलीस निरीक्षक वासुदेवजी देसले, उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वरजी चाकणे, गटशिक्षण अधिकारी शबानाताई शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेशजी आव्हाड, प्रशांतजी शिंदे, सचिनजी बोरुडे, शिक्षक फादर साजी, फादर टिन्सन, आरतीताई जगताप, मनीषाताई परजणे, उज्वलाताई पाटील, राहुलजी तोरणे, भावनाताई अमृतकर, सुशीलजी देशमुख, पूजाताई भागवत आदींसह शिक्षक, विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते.

सेवाध्वज रथयात्रेच बुधवारी होणार गेवराई शहरात आगमन बंजारा बांधवांनी बहुसंख्येने उपस्थितीत रहावे प्रा पी .टी चव्हाण

Image
  बीड ( सखाराम पोहिकर ) बंजारा समाजाच्या इतिहासात प्रथमच देशातला सर्वात मोठा पंचधातू पासून निर्मित संत सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सेवाध्यज स्थापना पोहरादेवी व उमरी तिर्थक्षेत्राचा सर्वागीण विकास करण्यासाठी 593 रूपयाच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा बंजारा समाजाचे लोकनेते अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री ना संजयभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 12 फेब्रवारी 20 23 रोजी पोहरादेवी येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथरावजी शिंदे . उपमुख्यमंत्री ना देवेद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे या ऐतिहासिक व गौरवशाली सोहळ्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी देशातील आंध्रप्रदेश . मध्यप्रदेश . तेलगणा व मुंबई महाराष्ट्र या चार राज्यातुन हजारो किलोमीटरचा प्रवास करत सेवा ध्यज रथयात्रा 11 फेब्रवारी रोजी पोहरादेवी येथे पोहचणार आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई येथून पोहरादेवी कडे जाणाऱ्या सेवाध्यज रथयात्रेच बीड जिल्ह्यात फक्त गेवराई तालुक्यात बुधवार दिनांक 31 / 1 / 2023 रोजी दुपारी 3 = 30 वाजता आगमन होणार आहे . अशी माहिती रा

बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी व कंत्राट दाराच्या कायदा विरोधी धोरणामुळे कंत्राटी कामगार संकटात - भाई गौतम आगळे

Image
  परळी ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद/ नगरपंचायत व कंत्राट दाराच्या चुकीच्या धोरणामुळे कंत्राटी कामगार संकटात सापडला आहे. जोपर्यंत किमान वेतन व प्रचलित अद्यावत कामगार कायद्यांच्या सोयी-सुविधा मिळत नाहीत, तो पर्यंत रोजंदारी मजंदुर सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करणार आहे. जिल्हाधिकारी महोदय राधाबिनोद शर्मा यांनी ११ जानेवारी २०२३ रोजी संबंधित अधिकारी,संघटना पदाधिकारी व कंत्राटी कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन जिल्हायातील सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद/ नगरपंचायत यांना किमान वेतन कायदा व अस्तित्वात असलेल्या ‌कामगार कायद्यांचे पालन करण्याचे निर्देश दिले. त्याची अंमलबजावणी करावी या साठी आमरण उपोषण करण्यात आले असल्याचे,कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी सांगितले.                 रोजंदारी मजंदुर सेनेच्या आवाहनानुसार बुधवारी ता. २५  जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. किमान वेतन अधिनियम १९४८पुनर्निर्धारण २४ फेब्रुवारी २०१५नुसार वेतन मिळत नाही,300 रुपये रोजीने अल्प पगार देण्यात येतो, तोही दोन क

डोंगरकिनीच्या सोनवणेचा प्रताप गटात इंचभर ही जमीन नसताना केला विक्री व्यवहार चौकशी करून संबंधितावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा मधुकर येवले यांची मागणी

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) पाटोदा तालुक्यातील डोंगरकिनी शिवारातील गट नंबर 37 मधे सुलोचनाबाई हरिभाऊ सोनवणे यांची इंचभरही जागा नसताना दिनांक 18 /01/2023 रोजी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर सोनवणे यांनी नोटरीद्वारे 01 आर जागा 35000 रुपयाला विकली ही बाब गट नंबर 37 मधील शेतकऱ्यांला मिळाल्याने डोंगरकिनी शिवारातील गट नंबर 37 मधील शेतकरी भयभीत झाले असून ह्या गंभीर प्रकरणाची डोंगरकिनी परिसरात चर्चा झाल्याने खळबळ उडाली असून लोक चर्चा करु लागले गटात इंचभरही जागा नसताना शेतकऱ्यांच्या परस्पर जमीन कशी विकता येते का ? डोंगरकिनीतील एका पञकाराने आपली पावर वापरून स्टॅम्पवर खोटे अंगटे केले आहेत अशी बी चर्चा असल्यामुळे ह्या संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डोंगरकिनी गटाचे युवानेते मधुकर येवले यांनी केली आहे

बॅंक ऑफ इंडियाच्या वतीने दिव्यांगांच्या निवासी शाळेत पिठाची गिरणी भेट

Image
बॅंक ऑफ इंडियाच्या वतीने दिव्यांगांच्या निवासी शाळेत पिठाची गिरणी भेट  बॅंक ऑफ इंडियाचा स्तुत्य अन सामाजिक उपक्रम बीड गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे : रेणुकामाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, संचलीत कै.भगवानराव ढोबळे मुकबधिर व मतिमंद निवासी विद्यालय, गेवराई येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बॅंक ऑफ इंडिया, शाखा गेवराई यांच्या वतीने बॅंकेच्या विशेष फंडातून ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेत पिठाची गिरणी भेट देण्यात आली. सामाजिक उपक्रमाबद्दल बॅंकेचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. यावेळी बॅंक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक भागवतजी यादव, पा.ऑफिसर केतनजी शिंदे, कॅशियर उमेशजी वाघमारे, माजी स्वातंत्र्य सैनिक चत्रर्भुज सानप, सामाजिक कार्यकर्ते सावळेराम पौळ, शाळेचे मुख्याध्यापक माणिकराव रणबावळे, सोमनाथ ढोबळे, अशोक मोताळे, ज्ञानेश्वर मोताळे यांच्या सह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व दिव्यांग शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी संस्थेच्या तसेच शाळेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे रामकथेची भक्तीमय वातावरणात उत्साहात सांगता

Image
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे रामकथेची भक्तीमय वातावरणात उत्साहात सांगता जीवनात प्रत्येकाने रामकथा ऐकली पाहिजे रामायणाचार्य समाधान महाराज शर्मांच्या अमृततुल्य वाणीने भाविक मंत्रमुग्ध गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे :- जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर रामकथेत मिळते म्हणून प्रत्येकाने रामकथेच्या ज्ञान मंडपात येवून रामकथेच्या श्रवणाचा लाभ घ्यावा.तर घरातील एकता टिकवून ठेवायची असेल तर भावा-भावा मध्ये प्रेम असले पाहिजे आणि त्यासाठी जीवनात प्रत्येकाने रामकथा ऐकली पाहिजे.तर हनुमंताची भक्ती आणि प्रभु श्रीरामचंद्र यांची शक्ती हे नाते महान आहे.प्रभु श्रीरामचंद्र हे एकवचनी, एकबाणी, एकपत्नी असे प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम होते.असे प्रतिपादन सुप्रसिद्ध रामायणाचार्य संगीत तुळशी रामकथा प्रवक्ते समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले.  श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव, (ता.गेवराई) येथे वै.ब्रम्हनिष्ठ गुरुवर्य महंत वामन महाराज गिरी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त ह.भ.प महंत दत्ता महाराज गिरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामायणाचार्य सुप्रसिद्ध रामकथा प्रवक्ते

डाॅ.गणेश ढवळे यांना रयत सामाजिक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर

Image
  महाराष्ट्र राज्यातील विविध सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा "मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा "दरवर्षी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते .सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०२२-२३ राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला असून दि.२९ जानेवारी रविवार रोजी सामाजिक न्याय भवन येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.    या राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये आदर्श सरपंच,उद्योग भुषण,पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरी,युवारत्न समाजभूषण,आदर्श तलाठी,आदर्श ग्रामसेवक,आदर्श शिक्षक,प्रसारण सेवा,सामाजिक,शैक्षणिक,कृषी,आदि विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे रयत सामाजिक प्रतिष्ठानचे सचिव आर. जी.माने,ॲड. संगीताताई धसे,चित्रपट अभिनेते संतोष वारे,उदय देशमुख  ,उपाध्ये,संतोष कुराडे,विकास धोत्रे,किशोर सोनावणे  यांनी माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. 

शेवगांवच्या श्रीराम मंदीर न्यास देवस्थानच्या दोन विश्वस्तांच्या जागा साठी जाचक अटी पाहुन अनेक दिगज्जांचे डोळे पांढरे

शेवगांवच्या श्रीराम मंदीर न्यास देवस्थानच्या दोन विश्वस्तांच्या जागा साठी जाचक अटी पाहुन अनेक दिगज्जांचे डोळे पांढरे { अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755   श्रीराम मंदीर न्यास च्या रिक्त दोन विश्वस्तांच्या जागासाठी 9) न्यासाच्या मिळकतीत प्रतिकूल संबंध आहेत काय अर्जदार भाडेकरू किंवा कुळ आहे काय ? यां एका अटीमुळे मांडीखाली गुळ दाबुन धरणारी मंडळी चांगलीच चपापली आहेत अनेकांना आपण मंदिराचे विश्वस्त झाल्याचे स्वप्न पडु लागले होतें काही धनदांडग्यांना आपण शासकीय यंत्रणा येड्यात काढुन विश्वस्त होऊ असा अति आत्मविश्वास होता ये पार जमिनीवर आले असतील ताजा कलम यां निमित्ताने सर्व सामान्य रामभक्तांना विश्वस्त मंडळाविषयी काही प्रश्न पडले आहेत 1) विश्वस्त मंडळाचे एकूण सदस्य किती 2) वारसा हक्काने पात्रता नस्ताना किती लोकांची वर्णी लागली आहे 3) अध्यक्षपदी कोणाची आणि कश्या पद्धतीने निवड होणार 4) सर्व विश्वस्त संचालक हे अश्याच पद्धतीने पारदर्शक का निवडले नाहीत काही मागच्या दाराने आणि काही नियमाप्रमाणे कोणाला फायदा पोहचवण्या साठी? क्रमशः आता हे जनतेतुन निवडलेले अल्पमतात असणार म्हणजे पहिले बहुसंख्ये

नगर परिषद कार्यालयात मुख्यधिकारी एस.ए.बोंदर यांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
नगर परिषद कार्यालयात मुख्यधिकारी एस.ए.बोंदर यांच्या हस्ते ध्वजारोहण           परळी वैजनाथ , (प्रतिनिधी ) :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त परळी नगर परिषद कार्यालयात नगर परिषदचे मुख्यधिकारी एस.ए.बोंदर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.            भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवार 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगर परिषदचे मुख्यधिकारी एस.ए.बोंदर यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नगर परिषदेचे संतोष रोडे सह नगर परिषदचे सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी नागरिक उपस्थित होते.

लमानतांडा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा

Image
लमानतांडा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा सरपंच सौ. शाहू विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त लमानतांडा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय वसंतनगर येथे सरपंच सौ.शाहू विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.           लमानतांडा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय वसंतनगर येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहन सरपंच सौ. शाहू विजय राठोड यांच्या हस्ते दि 26 जानेवारी 2023 रोजी संपन्न झाले. दरम्यान या कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.  सरपंच सौ. शाहू विजय राठोड यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते