Posts

Showing posts from December, 2023

असंघटित क्षेत्रातील मजुरांना न्याय देण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज उभा करू- कडुदास कांबळे

Image
                                  गेवराई (प्रतिनिधी ) दि. 1 जानेवारी 24 - ग्रामीण आणि शहरी भागातील वीटभट्टी मजूर, बांधकाम मजूर, शेतमजूर अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही कार्यकर्ते घडवत आहोत. असंघटित क्षेत्रातील मजुरांना न्याय देण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज आम्ही उभा करत आहोत असे प्रतिपादन गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते कडुदास कांबळे यांनी मादळमोही येथील ॲक्शन एड संस्थेच्या वतीने दि. 31 डिसेंबर 2023 रोजी आयोजित केलेल्या "असंघटित क्षेत्रातील कामगारांचे अधिकार" या विषयावर बोलताना मत व्यक्त केले.           या कार्यक्रमासाठी मादळमोही येथील सामाजिक कार्यकर्ते शेख सिराज आणि ग्रामपंचायत सदस्य आदिल पठाण उपस्थित होते. या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणामध्ये शेख सिराज आणि आदिल पठाण यांनीही त्यांचे विचार मांडले.            मादळमोही येथे 31 डिसेंबर 2023 रोजी असंघटित कामगारांच्या अधिकारासंदर्भात आयोजित केलेल्या कार्यशाळेत बोलताना कडूदास कांबळे पुढे म्हणाले की, ग्रामीण आणि शहरी भागातील कामगारांचे प्रश्न खूप मोठ्या प

पुढाऱ्यांच्या दाराचे उंबरे झिज वण्यापेक्षा जनतेचे पैसे कुटे ग्रुप ने द्यावे-गणेश वरेकर

Image
      ज्ञानराधा पतसंस्थेचे पैसे स्वतःच्या  उद्योगासाठी व फायद्यासाठी वापरून करोडो रुपयांचा अपहार करणाऱ्या कुटे ग्रुप ने स्वतःचा अपहार झाकण्यासाठी सर्व पक्षीय पुढाऱ्यांच्या दाराचे उंबरे झिजवण्या पेक्षा गोर गरीब जनतेचे कष्टाचे व घामाचे पैसे तात्काळ अगोदर द्यावे           कुटे ग्रुप गोरगरीब जनतेचे पैसे स्वतःच्या घशात घालून ते पचविण्या साठी व स्वतःला वाचविण्यासाठी राज्यातील व देशातील मोठ मोठ्या पुढाऱ्यांच्या दाराचे उंबरे झिजवत आहेत यामाघे फक्त ते स्वतःला वाचविण्याचां प्रयत्न करत आहेत यापेक्षा जनतेचे पैसे देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा पुढाऱ्यांच्या पाया पडून ठेवीदारा वर दबाव आणून आपला हेतू कसा साध्य होईल एवढेच ते बघत आहे पण शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष हे साध्य होऊ देणार नाही व गोरगरीब जनतेला त्यांचे पैसे मिळे प्रयत्न शिवसेना पक्षा तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रसिध्दी पत्रकान्वये शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी दिला            कुटे ग्रुप ने व संचालक मंडळाने स्वतःच्या उद्योगासाठी पत संस्था चे पैसे गुंतवणूक करून ठेवीदारांची शुद्ध फसवणूक केली आहे प्

कंत्राटी कामगारांचे शोषण रोखण्यासाठी कामगार कायद्याचे, शासन परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करावी - कामगार नेते आगळे सर

Image
परळी ( प्रतिनिधी ) रोजंदरी/कंत्राटी कामगारांचे शोषण रोखण्यासाठी कामगार कायद्याचे व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करुन शासनाने निर्धारित केलेले किमान वेतन, प्रचलित कामगार कायद्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी केली. मंत्रालय मुंबई येथे साखळी उपोषणाच्या अनुषंगाने नगरविकास विभागाच्या बैठकीत आगळे सर बोलत होते. यावेळी नगरविकास विभागाचे अवर सचिव भास्कर बनसोडे यांच्यासह नगरविकास विभागाचे कर्मचारी व बीड जिल्ह्यातील सफाई कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.          कामगार नेते आगळे सर म्हणाले की बीड जिल्ह्यासह राज्यातील सर्व रोजंदरी/ कंत्राटी सफाई कामगारांसह इतर कामगारांना किमान वेतन मिळवून देण्यासाठी संबंधित मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत यांची जबाबदारी आहे, त्यांनी तसा प्रयत्न केला पाहिजे. यामध्ये आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय बेलापूर सीबीडी नवी मुंबई विभागाची जबाबदारी मोठी आहे. मा. मनोज रानडे भा. प्र. से. आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी परिपत्रक क्रमांक

मराठा सेवा संघाचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन बडोदा येथे संपन्न

Image
           बडोदा येथे नुकतेच मराठा सेवा संघाचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले.      बडोदा म्हणजेच महाराज सयाजीराजे गायकवाड राजेंचे मराठा संस्थान होते, एकेकाळी जगामध्ये सहा नंबरला श्रीमंतांच्या यादीमध्ये त्यांचे नाव होते . मराठ्यांमध्ये गर्व वाटावा असे सर्वश्रेष्ठ श्रीमंत व्यक्ती म्हणजेच सयाजीराजे गायकवाड होते.        आजही त्यांचा राजवाडा बडोदा येथे सातशे ऐक्कर इतक्या अवाढव्य परीसरात दिमाखात सुस्थितीत उभा आहे. ही वास्तू म्हणजे वयक्तीक मालकीची सातसे ऐक्करात विस्तारलेली एकमेव वास्तू आहे, जगाच्या पाठीवर इतकी भव्यदिव्य विस्तिर्ण वयक्तीक मालकीची दुसरी कोणतीही वास्तू नाही.           त्यांनी अनेक समाज उपयोगी गोष्टी केल्या आहेत.संस्थानामध्ये जागतीक पातळीवरची ग्रंथालयये सुरू केली आणि त्यासाठी पुस्तके भेटही दिली.    तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षणासाठी बऱ्याच वेळा मदत केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पदव्या घेतल्या,उच्च शिक्षण घेतलं ,त्याचं सारं श्रेय त्यांच्या बुद्धी इतकेच सयाजीराव गायकवाड राजेंकडून मिळालेली आर्थिक मदतीला सुद्धा जाते. आपल्या राज्यात त्यांनी शिक्षण

भारतीय कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन कोलकत्ता येथे थाटात संपन्न- उबाळे, चव्हाण,परळकर

Image
बीड(प्रतिनीधी ):- आज दिनांक २८,२९,३० डिसेंबर रोजी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष मा.कॉ.सुभाषजी लांबा,महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्यध्यक्ष तथा केंद्रीय उपाध्यक्ष मा.उमेश चंद्र चीलबुले साहेब,महासंघाचे सरचिटणीस संजय महाळनकर,कार्याध्यक्ष प्रशांत जामोदे, मा.अध्यक्ष नंदकुमार ठाकूर, म.राज्यध्यक्ष कविता बोंदर,राज्य उपाध्यक्ष सोनीताई केदारे,जालना महासंघाचे अध्यक्ष डी बी काळे,धाराशिव चे तांबोळी साहेब,देविदास चव्हाण संभाजी नगर चे गणेश धनवाई व राज्य पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सकाळी ठीक 9.30 वाजता विवेकानंद स्टेडियम येथून रॅलीने सांस्कृतिक केंद्र सॉल्ट लेक सिटी कलकत्ता येथे समाप्त होऊन केंद्रीय अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करून हुतात्मा स्मारकास मानवंदना दिली.कोलकत्ता शहर हे प्राचीन जगभरात 19 व्या शतकातील प्रबोधन क्षेत्र म्हणून ओळखले जाते.बहुआयामी स्वतंत्र चळवळीचे एक दोलायमान केंद्र आणि डाव्या लोकशाही चळवळीचे अग्रस्थान असलेले कोलकाता शहर ला मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते.आपल्या देशाचे धर्म निरपेक्ष लोकशाही

शिव सेना मागासर्वार्गय बीड जिल्हा अध्यक्ष पदी श्री महेश धुरंधरे यांची निवड

Image
बीड प्रतिनिधी सखाराम पोहिकर :-बीड येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी शिव सेना राज्य उपाध्याक्ष तथा नगर सेवक मा संजय भाऊ होळकर यांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्याची महत्वपुर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला नगर परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्रीमतराव क्षिरसागर . मागासवर्गीय विभागाचे जिल्हा प्रमुख श्री भैय्यासाहेब ससाणे . माजी सरपच सखाराम मोहिते . ईत्यादी मान्यवर उपस्थित होते . या बैठकीमध्ये श्री महेश मोहनराव धुरंधरे यांची शिव सेना मागासवर्गीय विभाग जिल्हा प्रमुख बीड ग्रामीण पदी नियुक्ती करण्यात आली . शिव सेना बीड जिल्हा सरचिटणीस पदी श्री योगीराज साळवे . तर शिव सेना मागासवर्गीय गेवराई तालुका अध्यक्ष पदी श्री नवनाथ ( जिजा ) धुरधरे यांची नियुक्ती करण्यात आली तर शहर प्रमुख म्हणून आनद सुतार . शहर सुचिव रामभाऊ सुतार . शहर उपाध्यक्ष पदी श्री सुभाष पौळ तर सिरसदेवी सर्कल प्रमुखपदी श्री शिवाजी शिदे . मादळमोही सर्कल प्रमुख श्री बबनराव धस . रेवकी सकल प्रमुख श्री गांवजी कांबळे . धोडराई सर्कल प्रमुख श्री पढरीनाथ सुतार . तलवाडा सर्कल प्रमुख श्री सुखदेव पवार . पाचेगाव सर

रामपुरी येथे लिंबराज महाराज यांच्या यात्रेला 1 जानेवारी पासून सुरवात ..

Image
 रामपुरी प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील मौजे रामपुरी येथे लिंबराज महाराज यांचा यात्रा उत्सव 1 जानेवारी म्हणजेच नविन वर्षापासून सुरवात होत आहे. हा यात्रा महोत्सव सात दिवस चालतो. 1 जानेवारी ला मौजे रामपुरी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरूवात होणार आसुन या अखंड हरिनाम सप्ताचे सुरूवात हभप रूपाली दिदि सवणे यांच्या उपस्थीत रामायण चालु होत आहे.किर्तनाचे खालील प्रमाणे किर्तनकार महाराज आहेत,दिनांक 1 जानेवारी सोमवार हभप सुधाकर महाराज वाघ श्री क्षेत्र पैठण यांचे संध्याकाळी किर्तनाचा कार्यक्रम. 2 जानेवारी ला हभप शिवदास महाराज शास्त्री माजलगाव यांचे संध्याकाळी किर्तन. 3 जानेवारी ला हभप आर्जुन महाराज खामगावकर [ मंगळवार शिक्षण संस्था महाकाळा ] 4 जानेवारी हभप युवराज महाराज देशमुख [आळंदी देवाची ] 5 जानेवारी ला हभप अशोक महाराज पंIचाळ [गुरूजी आळंदी ] 6 जानेवारी हभप ज्ञानेश्वर महाराज राऊत [ श्री क्षेत्र सोनगड गणोरी ] 7 जानेवारी हभप गुलाब महाराज खालकर [ श्री स्वामी मोहनानंद आश्रम आर्वीया प्रमाणे वरिल कार्यक्रम आयोजीत केलेले आहेत.

शासकीय नर्सिंग कॉलेजच्या राष्ट्रीय परिषदेत एस.एम.युसूफ़ यांचा सन्मान

Image
बीड (प्रतिनिधी ) - शहरातील नीलकमल हॉटेलमध्ये दिनांक २९ डिसेंबर २०२३ शुक्रवार रोजी बीड जिल्ह्यात प्रथमच घेण्यात आलेल्या शासकीय नर्सिंग कॉलेजच्या राष्ट्रीय परिषदेत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या दहा वर्षापासून मुक्तपत्रकारितेच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल बीड जिल्हा नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा बेदरे-कुलथे यांच्या हस्ते एस.एम.युसूफ़ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, इंडियन मेडिकल असोसिएशनचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश देशपांडे, सहाय्यक संचालक (शुश्रुषा, मुंबई) डॉ. निलीमा सोनावणे, आरोग्य उप‌संचालक, आरोग्य परिमंडळ लातूर डॉ. अर्चना भोसले, डॉ. उज्वला वनवे, डॉ. शुभानंद शिंदे, डॉ. शोभा गायकवाड, सुपरिटेंडंट ऑफ नर्सेस श्रीमती रमा गिरी, श्रीमती क्षीरसागर शैलजा, शिला मोहीते, डॉ. चिंचकर बी.डी., डॉ. कदम अरूण, नर्सिंग कॉलेजचे सर्व शिक्षक उलका साळवे, प्रतिक जोशी, रोहन जोगदंड, सतीष बोराडे, श्रीमती रोहिनी शिनगारे, दैनिक मराठवाडा साथीचे बीड

ठाकुर साहेब कायदा फक्त गोरगरीबांनाच लागु होतो का??गोरगरीब रिक्षाचालक,फळ,भाजी विक्रेत्यांना तंबी आणि अनाधिकृत होर्डिंग्ज धारकांना पायघड्या

Image
ठाकुर साहेब कायदा फक्त गोरगरीबांनाच लागु होतो का??गोरगरीब रिक्षाचालक,फळ,भाजी विक्रेत्यांना तंबी आणि अनाधिकृत होर्डिंग्ज धारकांना पायघड्या :- डॉ.गणेश ढवळे बीड :- बीड शहरातील रस्त्यांवरील हातगाडे,भाजी किंवा फळ विक्रेते यांच्यामुळे व बेशिस्त पार्किंग केलेल्या रिक्षामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असुन या दोन्ही घटकांनी शहरात वाहतूक शिस्त पाळावी अशा सुचना पोलिस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर यांनी मुख्याधिकारी नगरपरीषद बीड नीता अंधारे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सर्वांनी रोडवर वाहतुकीस अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावी अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी तंबीच दिली आहे मात्र याचवेळी बीड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत होर्डिंग्ज व फ्लेक्स मुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत तसेच दुभाजकावर मोठमोठाले होर्डिंग्ज लावल्यामुळे अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे.त्यामुळे वाहतुकीस अडथळा करणा-या गोरगरीब हातगाडे,फळे,भाजी विक्रेते,रिक्षाचालक यांना कायद्याचा धाक दाखवणारे पोलिस अधी

भिमा कोरेगांव शौर्य दिन उत्सवपुर्ण वातावरणात शांततेत साजरा करा -नगरसेवक अँड विकास जोगदंड

Image
बीड (प्रतिनिधी ) 30 डिसेंबर अमर्यादित केलेल्या अन्यायाचा प्रतिकार म्हणजेच भिमा कोरेगाव या ठिकाणी  1 जानेवारी 1818 ला  घडलेला रणसंग्राम इतिहासाच्या पानावर शूर वीर महार सैनिकांनी आपल्या पराक्रमातून कोरला असून त्याची साक्ष भीमा कोरेगाव येथील शौर्यस्तंभ कायम देत राहील  1 जानेवारी 1927 ला तमाम भारतीयांचे उद्धारकर्ते,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या शौर्य स्तंभास भेट देऊन शूर महार सैनिकांचा पराक्रम संबंध जगापुढे आणला तेंव्हा पासून 1 जानेवारीला भिमा कोरेगाव येथील विजयी शौर्य स्तंभास अभिवादन करत शौर्य दिन साजरा करण्यात येतो तो आजतागायत साजरा करण्यात येत आहे हा उत्सव आपल्या पूर्वजांच्या शौर्याची गाथा आठवून साजरा केला जातो तो कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नसून मानवी मूल्य नाकारणाऱ्या विचारधारेच्या विचारांना तिलांजली देण्याचा आहे शौर्य दिन उत्सवपुर्ण वातावरणात संबंध बहुजन समाजाला सोबत घेऊन शांततेत साजरा करावा बेरोजगारी,भ्रष्टाचार,या आधुनिक शत्रूंशी लढण्याचा निर्धार करून बेरोजगारी,भ्रष्टाचार कायमचा हद्दपार करण्याचा संकल्प करावा  असे आव्हान भिम स्

व्यसनमुक्ती जनजागृती रॅली,व्यसनमुक्ती घोषणांनी दणानुन गेले बीड शहर

Image
घोषणा फलक हाती घेऊन विद्यार्थ्यांचा सहभाग डॉ.ज्योती मेटे,जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दाखवला रॅलीला हिरवा झेंडा "हम लढेंगे भी और जितेंगे भी" ज्योती मेटे यांचा सूचक इशारा बीड (प्रतिनिधी ) वर्षाच्या शेवटच्या दिवशी तरुण नवर्षाच्या स्वागतासाठी व्यसन करतात. यामुळे भविष्यात या तरुणांचे कुटूंब उध्वस्त होऊन समाज व्यसनाधिन होतो. म्हणून दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे नववर्षाच्या आदल्या दिवशी दरवर्षी व्यसनमुक्तीसाठी जनजागृती फेरी काढून भव्य संगीत रजनी घेऊन गोड दुध पाजत असत. हीच चळवळ आत डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी हाती घेतली आहे. शनिवारी (दि. ३०) या निमित्त भव्य व्यसनमुक्ती जनजागृती फेरी काढून त्याचा समारोप संत महंत यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी.डॉ. ज्योती मेटे, ओम प्रकाश शेटे, शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदे, भारत श्री स्नेहा कोकाने पाटील, नारायण गडाचे मठाधिपती हभप शिवाजी महाराज , हभप लक्ष्मण महाराज मेंगडे, हभप नवनाथ महाराज , मौलाना मुक्ती अब्दुल सहाब मौलाना जफर काजी, ख्रिश्चन महासंघाचे आशिष शिंदे,रमेश पोकळे,शिवसंग्रामचे जिल्हा

संजय गांधी निराधार ,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना अंतर्गत माजी जेष्ठ नगरसेवक विष्णु (भैय्या ) वाघमारे यांनी पाठपुरावा करून लाभार्थ्यांना मिळुन दिले मंजुरी पत्र

Image
. सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासन,सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग योजना अंतर्गत या विभाकडून सदरची योजना राबवली जात आहे.शासनाच्या आदेशावरून मा.बीड जिल्हाधिकारी याच्या पत्रात सुचित केल्यानुसार सदरील योजनेची बैठक दि.२०/११/२०२३ रोजी संपन्न झाली .संजय गांधी (१५०० रुपये), श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना(१५०० रुपये), राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना (२०,००० रुपये) अर्थसाहाय्य करण्यासाठी लाभाथ्थींना आर्थिक साहाय्य केले जाते.या योजना तहसील कार्यालय यांच्याकडून अर्ज मागावले जातात. या समितीची बैठक दि.२०/११/२०२३ रोजी संपन्न झाली होती .या बैठकीच्या अनुशगाने माजी जेष्ठ नगरसेवक विष्णु (भैय्या) शामराव वाघमारे यांनी प्रभाग क्रः- 2 व बीड शहरातील निराधार व्यक्तींना यायोजनेचे लाभ मिळुन देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच योजने अंतर्गत ज्या लाभार्थींनीचे नाव त्रुटी मध्ये नाव आले असेल तर त्या लाभार्थींनी आपल्यानावापुढे त्रुटीचे शेरा असेल तर त्रुटी पुर्तता करण्यासाठी काही अडचण येत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन माजी नगरसेवक विष्णु (भैय्या) शामराव वाघमारे यांनी

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादनास लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे - ऋषिकेश वाघमारे

Image
 बीड प्रतिनिधी - भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शौर्य स्तंभास अभिनंदन कार्यक्रम व मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे युवक नेते ऋषिकेश वाघमारे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. भीमा कोरेगाव चा ऐतिहासिक लढा संपूर्ण जगाला माहित व्हावा. आमचे पूर्वज किती शूरवीर होते. त्यांच्या शौर्याची दखल घेत. इंग्रज शासकांनी भीमा नदीच्या काठावर शौर्यस्तंभ उभारला आहे. 1 जानेवारी 1818 या दिवशी ही लढाई लढली गेली होती. त्या लढाईत पेशव्यांचा पराभव करून महार योध्यांनी ही लढाई जिंकली वीरमरण पत्करले त्या शूरवीर पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक वर्षी कोरेगाव भीमा येथे येत असत .सध्या वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर हे प्रत्येक वर्षी जातात याही वर्षी अभिवादनसाठी महाराष्ट्रातून देशातून लाखोच्या संख्येने आंबेडकर प्रेमी यांनी उपस्थित राहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे युवक नेते ऋषिकेश वाघमारे यांनी केले आहे.

प्राध्यापक सशक्त असतील तरच सशक्त विद्यार्थी घडू शकतात - निलीमा सोनवणे

Image
शासकीय नर्सिंग कॉलेजच्या चर्चासत्राचे प्राचार्या सुवर्णा बेदरे-कुलथे यांचे उत्कृष्ट नियोजन बीड (प्रतिनिधी ) - प्राध्यापक जर शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सशक्त असतील तरच ते सशक्त अध्यापन करू शकतात. आजच्या आधुनिक काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकचे ज्ञान प्राप्त होते. प्राध्यापकांनी या गोष्टीचा विचार करून सर्व गुणसंपन्न राहणे महत्त्वाचे आहे. तरच भावी विद्यार्थ्यांची पिढी सशक्त बनू शकते असे प्रतिपादन सहाय्यक संचालक (सुश्रुषा, मुंबई) डॉ. निलीमा सोनवणे यांनी बीड जिल्हा शासकीय नर्सिंग कॉलेजच्या वतीने आयोजित इम्प्रोविंग नर्सिंग एज्युकेटर्स टू मीट ग्लोबल हेल्थकेअर चेंजेस या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी केले. शासकीय नर्सिंग कॉलेज, बीड यांच्या वतीने शहरातील हॉटेल नीलकमल येथे प्रथमतःच राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. शासकीय नर्सिंग कॉलेज जिल्हा रुग्णालय बीड मार्फत नर्सिंग एज्युकेटरस् व नर्सिंग विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आलेले हे राष

या जगण्यावर शतदा प्रेम करावे कार्यक्रमातून ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू आणल्याचा आनंद

Image
-अ.भा. नाट्यपरिषद परिषदेच्या अध्यक्ष डॉ.दिपाताई क्षीरसागर यांचे प्रतिपादन -बीडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमास जिल्हाभरातील ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद बीड (प्रतिनिधी ) दि.२७ : मागील ६ वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाचे हे सातवे वर्ष आहे. या कार्यक्रमातून ज्येष्ठ नागरिकांनी आपल्यातील कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. जीवनातील काही क्षण आनंदात घालवले. या जगण्यावर शतदा प्रेम करावे कार्यक्रमातून ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू आणल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्यपरिषद परिषदेच्या अध्यक्ष डॉ.दिपाताई क्षीरसागर यांनी केले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची बीड शाखा आणि सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने बीडमध्ये केएसके महाविद्यालयात ‘या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि.२७) करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून डॉ.दिपाताई क्षीरसागर या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटक

नेकनुर स्त्री व कुटीर रूग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना सुरू करण्यासाठी डॉ.ओमप्रकाश शेटे यांना निवेदन:- डॉ.गणेश ढवळे

Image
बीड:- केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा याकरीता विकसित भारत संकल्प यात्रा २०२४ अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संबंधित योजनांची आढावा बैठकीसाठी बीड येथे आले असता नेकनुर स्त्री व कुटीर रूग्णालयातील महात्मा ज्योतिराव फुले व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना वर्षभरापासून बंद असल्याने बालाघाटावरील ४०-५० गावातील रूग्णांना अडचण येत असुन त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करत बीडला उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे नेकनुर स्त्री व कुटीर रूग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना सुरू करण्यात यावी अशी मागणी डॉ.ओमप्रकाश शेटे , प्रमुख आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती महाराष्ट्र शासन यांना सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. *जिल्हा प्रशासनाला गांभीर्य नाही; शासन आपल्या दारीचा केवळ दिखावा* -------   नेकनुर ता.जि.बीड येथील स्त्री रूग्णालय बालाघाटावरील गोरगरीब रूग्णांसाठी आरोग्य सुविधेचे वरदान असुन महात्मा ज्योतीराव फुले जन आ

जिवाची वाडी ते लमांन तांडा,केज डांबरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

Image
  केज प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम कार्यालया केज आंतर्गत जीवाची वाडी ते लमान तांडा (येवता)या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम चालू असून सदरील रस्त्याचे बीबीएम न करता अंदाजपत्रक (इस्टीमेट) प्रमाणे डांबरी स्त्याचे कामझाले नाही.रस्त्याची जाडी कमी प्रमाणात असून कमी व दर्जाहिन डांबर वापरल्याने सदरील रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. याबाबत ग्रामस्तांनी संबंधित काम करणारे मजूर व गुत्तेदार यांना वेळोवेळी सांगूनही रस्ता अत्यंत खराब प्रतीचा केला आहे. या कामाचे गुण नियंत्रण विभाग,बीड यांच्या मार्फत चौकशीची मागणी गावकऱ्यांन कडून होत असून,अशा प्रकारचे निवेदन उप अभियंता,सार्वजनीक बांधकाम विभाग कार्यालय,केज यांना लेखी निवेदनाची तक्रार दि.२८ रोजी दिली असून निवेदनावर भाजपा नेते,तुळशीराम तोंडे, चेअरमन बालाप्रसाद भुतडा,मुख्याधापक रमेश चौरे,राजाभाऊ तांदळे,प्रभु सारुक,बाबासाहेब चौरे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या असुन प्रतिलिपी:मुख्यअभियंता,सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालय,छत्रपती संभाजी नगर. अधिक्षक अभियंता,मंडळ कार्यालय,धाराशीव. तहसीलदार तथा दंडाधिकारी,तहसील कार्यालय,केज. यांना पाठविल्याचे त

नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावी( अजित पवार गट ) इगतपुरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांची मागणी

Image
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी (-नवनाथ गायकर यांजकडुन ) --पुढील वर्षी लोकसभा व विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्या असुन यासाठी प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. तसेच युवकांनी गावनिहाय कमीटी तयार कराव्यात, विद्यार्थी संघटनेच्या पदधिकारी यांनी गावागावात जाऊन पक्ष वाढवावा असे आवाहन माजी आमदार शिवराम झोले यांनी केले.     खंबाळे- इगतपुरी येथे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली.     या बैठकीत माजी आमदार शिवराम झोले बोलत होते. जिल्हाध्यक्ष विष्णु म्हैसधुने यांनी या आढावा बैठकीत बोलतांना सांगितले की ज्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले आहे त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी जोमाने कामाला लागावे.          पुढील खासदार व आमदार, स्थानिक स्वराज्य संस्था वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी निवडुण आले पाहिजे यासाठी प्रत्येकाने मतभेद बाजुला ठेवुन प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे, तसेच नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी व मतदारसंघातून

ज्ञानेश्वरी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था डोर्लेवाडी झारगडवाडी बारामती येथे श्री संत बाळूमामाची प्राणप्रतिष्ठा निमित्त तीन दिवस अखंड हरिनाम सप्ताह

Image
ज्ञानेश्वरी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था डोर्लेवाडी झारगडवाडी बारामती येथे श्री संत बाळूमामाची प्राणप्रतिष्ठा निमित्त तीन दिवस अखंड हरिनाम सप्ताह   सांगता सोहळ्यास भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे युवा किर्तनकार शिवाजी महाराज शेळके   बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी झारगडवाडी येथे तीन दिवसांपासुन चालु असलेला अखंड हरिनाम सप्ताहाची वाणी भुषण स्वर संम्राट ह भ प श्री संजय महाराज वेळूकर  (कोरेगावसातारा)   ज्ञानेश्वरी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक युवा किर्तनकार शिवाजी महाराज शेळके यांच्या उपस्थितीत बुधवार दि.27 रोजी सकाळी आठ वाजता संंत बाळुमामाची मिरवणुक डोर्लेवाडी झारगडवाडी येथुन काढण्यात आली व नंतर बारा वाजता संत बाळूमामाची प्राणप्रतिष्ठा व विठ्ठल रुक्मिणीमातेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली नंतर बारा ते चार वाजे पर्यंत व्यसनमुक्ती शिबीर संपन्न झाले दिनांक 29डिसेंबर सकाळी 9 ते 11या वेळेत काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे.तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवा किर्तनकार शिवाजी महाराज शेळके यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

तिसऱ्या दिवशीही कंत्राटी कामगारांचे आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरूच

Image
मुंबई ( प्रतिनिधी ) राज्यातील वीज कंत्राटी कामगार व सफाई कामगारांसह इतर आस्थापनेतील कंत्राटी कामगारांना जोपर्यंत नियमित करत नाहीत तोपर्यंत समान काम समान वेतन मिळावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी रोजंदारी कंत्राटी कर्मचाऱ्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. २७ डिसेंबर २०२३ पासून आझाद मैदान मुंबई येथे साखळी उपोषण / धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा तिसरा दिवस सुरू झाला तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची कसलीही दखल शासनाने घेतली नाही. जोपर्यंत काही निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा संतप्त कामगार यांनी घेतला आहे.‌ राज्यातील वीज कंत्राटी कामगार व सफाई कामगार यांची अतिअवश्यक सेवेत गनना होते. त्यांना जोपर्यंत नियमित करत नाहीत तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे समान काम समान वेतन देण्यात यावे, बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद / नगरपंचायत आस्थापनानेत त्यांच्या अधिनस्त कंत्राटदार व मुख्याधिकारी यांच्यात करारनामा करून कार्यारंभ आदेश दिला जातो परंतु त्याची अंमलबजावणी न करता कंत्राटी कामगारांचे मागील २० ते २२ वर्षापासून शोषण करून त्

असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या योजनांची माहिती सर्व कामगारापर्यंत गेली पाहिजे-आकांक्षा घाटूळ

Image
गेवराई (प्रतिनिधी ) - असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला पुरुषांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती शेतमजूर, ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार अशा सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारापर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी ॲक्शन एड असोसिएशन इंडिया या संस्थेच्या वतीने काठवडा तालुका गेवराई जिल्हा बीड येथे दि. 28 डिसेंबर 2023 रोजी  " असंघटित कामगारांचे अधिकार " या विषयावर गाव पातळीवरील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.        या कार्यक्रमासाठी काठवडा येथील सरपंच जालिंदर कोरे, ग्रामसेविक, सामाजिक कार्यकर्ते कडूदास कांबळे, क्रांती असंघटित महिला कामगार युनियनच्या अध्यक्षा शाहीन पठाण, मंगलताई पवार, कविता डोंगरे, रोहिणी राऊत, शकुंतला घुंगासे, आकांक्षा घाटूळ, तुकाराम खरात, प्रामुख्याने उपस्थित होते.        असंघटित क्षेत्रातील कामगार साठी असलेल्या योजनांची माहिती सर्व कामगारापर्यंत गेली पाहिजे असे मत यावेळी काठवडा येथील  आकांक्षा घाटूळ यांनी प्रास्ताविक

मंचर विभागात संयुक्त कृती समितीच्या वतीने आंदोलन

Image
मंचर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री अनिल कुमार डोंगरे यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरुद्ध संयुक्त कृती समिती त्यामध्ये सब ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, तांत्रिक कामगार युनियन 50 59, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन 1029, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना ,महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ इत्यादी संघटनांच्या वतीने मंचर विभागिय कार्यलया समोर दिं 28.12.2023 रोजी  भव्य द्वारसभा घेऊन आंदोलन करण्यात आले मंचर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता हे शाखा अभियंता तांत्रिक कर्मचारी लेखा वाचताना कर्मचारी यांना मानसिक त्रास देत आहेत तसेच खाजगी एजंट  कंपनीच्या कामात सहभाग करून कर्मचारी व अधिकारी तसेच वीज ग्राहक यांना त्रास देत आहेत अनेक ग्राहकांनी विभागीय कार्यालयात लेखी तक्रारी दिलेल्या आहेत त्यामुळे कंपनीची प्रतिमा जनमानसात मलिन झाली आहे त्याचा परिणाम कंपनीच्या दैनंदिन कामकाजावर होत असल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी मंचर उपविभाग यांनी त्यांचे सोबत काम करण्याची मानसिकता नसल्याचे सह्यांचे निवेदन मान

हरयाणातील रोड मराठा " १४ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार शौर्य दिन

Image
हरयाणातील रोड मराठा " १४ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार शौर्य दिन     पानिपत युद्धानंतर दिल्ली तख्तावर मराठ्यांचे वर्चस्व होते  अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत ( बस्ताडा गाव ) हरयाणा आयोजित " पानिपत मराठा शौर्यदिन " साजरा करण्यात येतो. आणि या कार्यक्रमात गोमंतकातील शिवप्रेमींची उपस्थिती २०१८   पासून मराठा राजाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली असते. बुधवार दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी खास हरयाणातील रोड मराठ्यांच्याचे वंशज मराठा सुरजीत चौधरी, मराठा करमविर महाले , मराठा दलबीरसिंघ चौधरी, मराठा   परविरसिंघ चौधरी आणि इसमसिंघ तुराण सांकवाळ ( दक्षिण गोवा ) येथे राजाराम पाटील यांच्या निवासस्थानी आले होते. त्यांचे स्वागत श्री राजाराम पाटील (अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत गोवा प्रमुख ), श्री विष्णू निकम ( मराठा मित्र मंडळ, गोवा) श्री भरत पाटील ( मराठा सेवा संघ गोवा)) श्री देवराज राणे आणि श्री अमोल कोळी ( छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य सेवा मंडळ, सांकवाळ गोवा ) स्वागत केले. हिंदूस्थानावर अनेक परकीयानी आक्रमणे केली, आणि ती थोपवून धरण्याचे काम म

पंढरपूर मंदिर समितीतील भ्रष्टाचाराची ‘एस्आयटी’मार्फत चौकशी करा - महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

Image
श्री विठ्ठलाच्या प्राचीन दागिन्यांचे मूल्यांकन आणि त्यांच्या नोंदी न करणे, हा मोठा घोटाळाच  प्रसादाच्या लाडूपासून, गोशाळा, शौचालय, आगाऊ रक्कम सर्वत्रच अनागोंदी कारभार    महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणात असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात प्राचीन आणि मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने गहाळ झाल्याची घटना नुकतीच समोर आली. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानातही भूमी आणि दागिने यांत मोठा घोटाळा झाला होता. याचप्रमाणे आता कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात राजे, महाराजे, पेशवे, संस्थानिक आदींनी श्री विठ्ठल-रुख्मिणी यांना अर्पण केलेल्या 300 हून अधिक प्राचीन आणि मौल्यवान दागिन्यांची ताळेबंदामध्ये नोंद अन् मुल्यांकन नसल्याचे समोर आले आहे, हे अतिशय गंभीर आहे. हे विठुरायाचे दागिने हडप करण्याचे षड्यंत्र तर नाही ना ? याची सखोल चौकशी ‘राज्य गुन्हे अन्वेषण विभागा’च्या ‘विशेष तपास पथका’द्वारे (एस्.आय.टी.द्वारे) करण्यात यावी, तसेच दोषी अधिकारी, कर्मचारी आणि मंदिर समितीतील सदस्य यांवर तात्काळ गुन्हे नोंद करण्यात यावेत, *अशी मागणी ‘

शेवगांव शहराच्या नियोजित प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ मोजक्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये साध्या पद्धतीने संपन्न

 शेवगाव तालुका प्रतिनिधी दि. 28 डिसेंबर 2023 वार गुरुवार    याबाबत सविस्तर वृत्त असे की आज गुरुवार ता. 28 डिसेंबर रोजी प्रतिनिधिक स्वरूपामध्ये शेवगाव शहराच्या नियोजित पाणीपुरवठा योजनेच्या सुमारे आठ लाख 70 हजार लिटर क्षमतेच्या जल कुंभाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम गणपती मंदिर कोरडे वस्ती येथे पार पडला यावेळी शेवगाव शहर पाणी कृती समितीचे अध्यक्ष प्रेमसुख जाजू डॉ. संजय लड्डा व सराफ व्यावसायिक संजय शेवाळे देवेंद्र देवळाली कर सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख पाणीपुरवठ्याच्या नगरपरिषदेच्या अधिकारी श्रीमती. पूर्वा माळी इंद्रायणी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सुनील कुमार नागरगोजे त्यांचे इंजिनियर प्रमोदकुमार गुजरे नगरपालिकेचे पाणीपुरवठ्याचे मुकादम शरद लांडे या मोजक्या लोकांचच्या उपस्थितीमध्ये आज दुपारी 02:30 वाजता संपन्न झाला यावेळी बोलताना इंद्रायणी कन्स्ट्रक्शन चे सर्वेसर्वा श्री. सुनील कुमार नागरगोजे यांनी सांगितले की संबंधित पाणी योजना पूर्ण ताकतीनिशी नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे सर्व सामाजिक कार्यकर्ते शेवगाव चे सर्वसामान्य नागरिक सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना आणि नग

बीड जिल्हा राष्ट्रवादीची आढावा बैठक संपन्न-- रिक्त पदांवर पदाधिकार्यांची निवड

Image
बीड जिल्हा (प्रतिनिधी --गोरख मोरे ) :     बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गुरूवार (दि.२८) रोजी राष्ट्रवादी भवन येथे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांची जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी पक्षाच्या रिक्त असलेल्या पदांसाठी पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या.             बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांनी गुरुवारी (दि.२८) रोजी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात विविध स्तरावर सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच रिक्त असलेल्या  पदांसाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या बैठकीत, आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच पुढील वाटचालीसाठी चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हा सरचिटणीस पदी डॉ. उत्तम दत्तोबा खोडसे, माजलगाव तालुका कार्याध्यक्ष पदी भगवान खंडेराव सरवदे व मागासवर्गीय सेलच्या बीड शहराध्यक्ष पदी कपील इनकर यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आ. क्षीरसागर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . या बैठकीस सर्व प्रमुख पदाधि

मिशनी आपुलकी अंतर्गत भोगलवाडी शाळेस एक लाख रुपये लोकसहभाग

Image
  शाळेच्या पाणी सुविधेसाठी ग्रामपंचायत / श्री. बापूसाहेब कार्ले सरसावले आष्टी  ( प़तिनिधी --गोरख मोरे   ) :     जामखेड तालुक्यातील  जि.प.प्रा.शाळा भोगलवाडी या शाळेच्या पाणी सुविधेसाठी  मिशन आपुलकी अंतर्गत १५  वा वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत व श्री बापूसाहेब कार्ले यांनी तब्बल एक लाख रुपये वस्तूरुपाने लोकसहभाग देऊन दातृत्वाचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे .    भोगलवाडी शाळेस कुसडगाव ग्रामपंचायतकडून २०० फूट बोअर वेल घेण्यात आला ,परंतु पाणी कमतरते अभावी बोअर वेल खोली वाढविणे गरजेचे होते . शाळेतील शिक्षकांनी ही बाब ग्रामस्थांच्या  लक्षात आणून दिली. कुसडगाव भूमीपुञ युवा उद्योजक तथा कार्यकुशल राजकारणी बापूसाहेब कार्ले उपसरपंच संतोष भोगल व ग्रामपंचायत सदस्य कल्याण वटाणे यांनी  शाळेच्या मदतीसाठी हात पुढे करत स्वखर्चातून २०० फूट बोअर वेल घेऊन दिला , व मुबलक पाणीही लागले . दानशूर व्यक्तिमत्त्व  बापूसाहेब कार्ले यांनीही आपले दातृत्व दाखवत  स्वखर्चाने मोटार व इतर साहित्य देण्याचे जाहीर केले . जि.प.अहमदनगर कडून सुरु असलेल्या मिशन आपुलकी अंतर्गत तब्बल एक लाख रुपये वस्तूरुपाने दिले .शाळे

३१ डिसेंबर पासून दर रविवारी भरणार देऊळगाव घाटला शेळ्यांचा बाजार.

Image
आष्टी (प्रतिनिधी--गोरख मोरे ) :  रविवार दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी मौजे देऊळगाव घाट ,तालुका आष्टी, जिल्हा बीड ,येथे दर रविवारी शेळ्यांचा बाजार भरण्यास सुरुवात होणार आहे .    या बाजाराचा, देऊळगाव घाट परिसरातील सर्व गावांना, या बाजार पेठेचा फायदा होणार आहे . मौजे देऊळगाव घाट परिसरातील शेतकऱ्यांना ,शेळ्या विक्रीसाठी,पाथर्डी ,चिचोंडी ,कडा, बाजार सोडले तर आसपास कुठेही शेळ्यांचा बाजार भरत नसल्यामुळे, तो बाजार देऊळगाव घाट येथे भरण्यास सुरुवात झाल्यामुळे, देऊळगाव घाटला एक प्रकारे महत्त्व प्राप्त होणार आहे .त्यामुळे शेळी विक्रेत्या मधे एक प्रकारे नवचैतन्य निर्माण झाले आहे .    मौजे देऊळगाव घाटला दर आठवड्याच्या रविवारी, भाजीपाल्याचा बाजार भरत असल्यामुळे, त्यातच शेळ्यांचा बाजार सुरू झाल्यामुळे देऊळगाव घाट च्या बाजारपेठेला आणखीनच महत्त्व प्राप्त होणार आहे .   या बाजाराचे उद्घाटन मौजे देऊळगाव घाट चे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब ठोंबरे मेजर, सरपंच रामकिसन ठोंबरे, माजी सरपंच गोवर्धन ठोंबरे ,पत्रकार आदिनाथ ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी परिसरातील शेतकरी, नागरिकांनी उपस्थित

सावरगावकरानी प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढुन घ्यावा - सरपंच नारायण नागरगोजे

Image
पाटोदा (प्रतिनिधी )भारत सरकारची आयुष्यमान भारत योजना व महाराष्ट्र सरकाराची महात्मा ज्योतिबा फुले योजना गरीबांच्या आरोग्यासाठी वरदान ठरत असल्याने या दोन्ही योजनांचे महत्व विद्यमान सावरगावचे लोकप्रिय सरपंच नारायण (मामा) नागरगोजे यांनी सांगितले असुन या योजनेतंर्गत सरकार लोकांना 'आयुष्मान भारत कार्ड प्रदान करत आसुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना या योजनेअंतर्गत रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात यामुळे सोने सावरगाव येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्यासाठी सर्व पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड धारक यांनी रेशनकार्ड, आधार कार्ड,आधारला लिंक मोबाईल हे कागदपत्र घेऊन आपल्या जवळील सेतू सुविधा केंद्रात जावा आशे आवाहन सावरगावचे लोकप्रिय सरपंच नारायण (मामा) नागरगोजे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांचे बळी गेल्यावरच गतिरोधक बसवणार का? लिंबागणेशकर करणार चक्का जाम :- डॉ.गणेश ढवळे

Image
--- लिंबागणेश:- अतिवेग,वाहतुक नियमांचे उल्लंघन यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असुन अपघातात जीव गमावणारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.वेगाला आवर घालण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक ( स्पीड ब्रेकर) बसवले जातात.राष्ट्रीय महामार्गावर एनएचआय तर राज्य मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन गतिरोधके बसवली जातात .मात्र अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी मार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान लिंबागणेश येथील इयत्ता ४ ते १२ वी पर्यंत पंचक्रोशीतील १००० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून भालचंद्र माध्यमिक विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वार समोरील राज्य मार्गावर गतिरोधके बसविण्यात आली नसल्याचे शाळेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.संबधित प्रकरणी वारंवार निवेदने तसेच आंदोलनानंतर सुद्धा कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांचे बळी गेल्यावरच गतिरोधक बसवणार का?? असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.४ रोजी लिंबागणेश बसस्थानक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात

शासकीय नर्सिंग कॉलेज कडून नॅशनल कॉन्फरन्स चे आयोजन

Image
२९ डिसेंबर रोजी हॉटेल नीलकमल येथे होणार कॉन्फरन्स बीड (प्रतिनिधी ) - शासकीय नर्सिंग कॉलेज कडून नॅशनल कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात आले असून दिनांक २९ डिसेंबर २०२३ शुक्रवार रोजी शहरातील हॉटेल नीलकमल येथे कॉन्फरन्स होणार आहे. शासकीय नर्सिंग कॉलेज जिल्हा रुग्णालय बीड मार्फत नर्सिंग एज्युकेटरस् व नर्सिंग विद्यार्थ्यांकरिता नॅशनल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. कॉन्फरन्स दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ०८:०० ते संध्याकाळी ०६:०० पर्यंत चालणार आहे. या कॉन्फरन्सचा उद्‌घाटन समारंभ सकाळी ०९:०० वाजता होणार आहे. सदर उद्‌घाटन प्रसंगी आरोग्य उप‌संचालक, आरोग्य परिमंडळ लातूर डॉ. अर्चना भोसले, सहाय्यक संचालक (सुश्रुषा) मुंबई डॉ. निलीमा सोनवणे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक बडे, इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. अविनाश देशमांडे, डॉ. उज्वला वनवे, डॉ. शुभानंद शिंदे, डॉ. शोभा गायकवाड, डॉ. सुवर्णा बेदरे, श्रीमती रमा गिरी, श्रीमती क्षिरसागर शैलजा, शिला मोहीते, श्री. चिंचकर बी.डी., कदम अरूण यांच्यासह पत्रकार बांंधवांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कॉन्फरन्स करिता महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहू

शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करा ; कर्जाची वसुली थांबवा - विश्वनाथ शरणांगत

Image
बीड प्रतिनिधी -  महाराष्ट्रात सध्या पाण्याअभावी  दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप रब्बीची दोन्हीही हंगामी उध्वस्त झाली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही ठिकाणी निर्माण झाला आहे.  त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शासनकर्त्यांनी  याची गंभीर दखल घेऊन तात्काळ  शेतकऱ्याची कर्जमाफी व सक्तीची वसुली थांबवावी  अशी मागणी  विश्वनाथ शरणागत यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे कृषिमंत्री तथा  बीडचे पालकमंत्री  यांच्याकडे केली आहे. सरकारने सामान्ये शेतकर्यांची दिशाभुल केली का ? हिवाळी आधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकर्यांचे सरसगट कर्ज माफ करणार आसे पत्रकार परिषदे मध्ये केली होती घोषणा परंतु बँकवाले शेतकऱ्यांच्या दारात येवुन उसुलीचा तगादा शेतकऱ्यांकडे चालु आहे. जर शासनाने सरसगट  कर्ज माफीची पत्रकार षरिषद मध्ये केलेली घोषणा शेतकर्यांची दिशाभुल करणारी घोषणा आहे का? ... जर  दिशाभुल घोषणा नसेल तर जे बँकवाल्यांनी शेतकर्यांना सक्तीची वसुली चालवली ती ताबडतोब थांबवा. अन्यथा बाँकाना शासनाने पत्र द्यावे की शेतकर्यांच्या दारात कर्ज वसुली साठी जाऊ नये. याबाबतचे पत्र संबंधीत बाँक वाल्यांना

लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष विलास भिसे हे अपघातातुन बालबाल वाचले

Image
-बीड प्रतिनिधी सखाराम पोहिकर :- बीड जिल्ह्यातील केज येथे काही कामानिमित आपल्या स्वतः च्या आईसर पल्सर गाडी वर आपल्या पत्नीसह धारूर पोलिस स्टेशनला माझ्या कार्यकर्ते अमोल हातागळे वं त्याच्या नातेवाईकाना भेटण्यासाठी गेलो असता तिथील पोलीस स्टेशन मध्ये भेट दिल्यानंतर सविस्तर चर्चा करून त्या कार्यकर्तें ला भाडणाबद्दल ची व्यवस्थित चौकशी केल्यानतर मी बीडला निघालो असता माझ्या गाडीला पाठीमागून अज्ञान वाहनाने मस्साजोग फाट्याच्या दोन चार किलोमीटर अंतरावर हा आपघात झाला तेव्हा वेळ आली होती पण काळ आला नव्हता तेव्हा या आपघातातुन लहुजी शक्ती सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष विलास भिसे हे या आपघातातुन बालबाल बचावले आहेत तेव्हा श्री विलास भिसे याच्या जिवावर बेतले होते पण हातापायाला किरकोळ जखमी झाले आहेत तेव्हा म्हणतातना देव तारी त्याला कोण मारी या म्हणी प्रमाणे आज भिसे या आपघातातुन बचावले आहेत देव त्याना दिर्घआयुष्य लाभो आशी लहुजी शक्ती सेनेचे बीड जिल्ह्यातील त्याचे कार्यकर्ते देवाकडे प्रार्थना करत होते व त्याचे मित्र नातेवाईक यांच्याकडून त्याच्या आपघातात बद्दल चौकशी फोनद्वारे व प्रत्यक्षात भेट घेउन

भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी ऋषीकेश कराड यांची निवड कराड यांच्या निवडीने राज्य भरातून शुभेच्छाचा वर्षाव

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्याचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे,युवा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषीकेश कराड यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आल्याने येणाऱ्या निवडणुकीत यांचा फायदा भाजप पक्षाला निक्कीच होणार आसुन भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी म्हणून ऋषीकेश कराड हे भारतीय जनता पक्षाला राज्यभरात गावागावात जाऊन भारतीय जनता पार्टीची पुन्हा राज्यात व केंद्रात सत्ता आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणे विचार तथा पक्षाचे काम तळागळातील सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आसुन भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी ऋषीकेश कराड यांची निवड झाल्याबद्दल राज्य भरातून कराड यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे

कंत्राटी सफाई कामगारांना कामावर घेण्याच्या मागणी साठी अन्नत्याग उपोषण . बेरोजगार कामगारांचे साखळी उपोषण

Image
 . बीड२७( प्रतिनिधी ) मागील सहा महिन्यापासुन बीड जिल्ह्यातील कंत्राटी सफाई कामगारांना कामावरुन काढुन टाकले , त्यांना पुर्ववत कामावर घेण्यासाठी व कामगार नेत्यांसह महिला कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करून कारागृहात डांबले अशा अमानवीय कृत्याच्या विरोधात व इतर मागण्यासाठी बीड जिल्हाध्यक्ष तथा मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड अन्नत्याग उपोषणास मा . जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे २७ डिसेंबर २०२३ रोजी न्याय मिळेपर्यंत बसणार असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमाद्वारे देण्यात आली आहे . केंद्रिय अध्यक्ष भाई चैनदास भालाधरे यांच्या मार्गदर्शन व केंद्रिय महासचिव भाई गौतम आगळे सर यांच्या झुंजार नेतृत्वात बेरोजगार सफाई कामगार एकजुट दाखवत आपल्या न्याय हक्क प्राप्त करुन घेण्यासाठी साखळी उपोषणास बसणार असल्याची माहिती रोजदांरी मजदुर सेनेच्या वतीने देण्यात आली आहे .