त्यागमूर्ती माता रमाईंना स्मृतिदिनानिमित्त लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन

त्यागमूर्ती माता रमाईंना स्मृतिदिनानिमित्त लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन

लिंबागणेश, दि.२७ : बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात आज बुधवार दि.२७ रोजी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमास सरपंच बालासाहेब जाधव, भिम टायगर ग्रुपचे बीड जिल्हाध्यक्ष रविबापू निर्मळ, ग्रामपंचायत सदस्य दामोदर थोरात, रमेश गायकवाड, महादेव कुदळे, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, बाळकृष्ण थोरात, अँड. गणेश वाणी, सुरेश निर्मळ, गणपत तागड, दादासाहेब गायकवाड, मोहन कोटुळे, हरि पाटील, संजय पावले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना भिम टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रविबापू निर्मळ यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, वंचितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनात माता रमाई यांचा त्याग, प्रेरणा आणि खंबीर साथ मोलाची होती. बाबासाहेब परदेशात उच्च शिक्षण घेत असताना अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी संसाराची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या त्यागामुळेच बाबासाहेबांना समाजउद्धार व भारतीय संविधान निर्मितीचे महान कार्य करता आले, असे त्यांनी नमूद केले. तसेच बाबासाहेबांनी “थॉट्स ऑन पाकिस्तान” हा ग्रंथही माता रमाईंना समर्पित केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बाळासाहेब मुळे व रमेश गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. गणेश ढवळे यांनी केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी