Posts

Showing posts from July, 2023

पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती :दक्षिण आणि उत्तर नगरच्या नेमणुका जाहीर

  मुंबई : पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या दक्षिण नगर जिल्हा निमंत्रक पदी ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे (पुण्यनगरी) यांची तर समन्वयकपदी दीव्य मराठीचे बंडू पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे..उत्तर नगर जिल्ह्याचे निमंत्रक म्हणून गुरूप्रसाद देशपांडे (नेवासा) यांची तर समन्वयक म्हणून राजेंद्र उंडे(राहुरी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज या दोन्ही घोषणा केल्या.. .. राज्यातील पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्यांची पुनर्रचना करण्यासाठी सर्व जिल्हास्तरीय समित्या बरखास्त करण्यात आल्या असून आता नव्याने जिल्हा आणि तालुका स्तरावर या समित्या गठीत करण्यात येत आहेत.त्यानुसार दक्षिण आणि उत्तर नगर जिल्ह्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.. दोन्ही जिल्ह्यात पक्त्रकार हल्ला विरोधी कृती समित्या सक्षम करण्याची जबाबदारी नवीन पदाधिकारयांवर सोपविण्यात आली आहे.. नवीन नेमणुका पुढील दोन वर्षांसाठी असतील.. हे पदाधिकारी मराठी पत्रकार परिषदेला पूरक असे काम करतील..  पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जात असलेले खोटे खटले, पत्रकारांना देण्यात येणारया धमक्या बाबत आवा

अंबाजोगाई शहरातील शेकडो तरूणांचा मनसेत प्रवेश

Image
 बीड जिल्हा ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :  महाराषट्रातील चाललेल्या गच्छाळ राजकारणाला कंटाळलेल्या व राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन अंबाजोगाई शहरातील शेकडो तरुणांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला . राज्याच्या राजकारणाचा झालेला विचका पाहुन महाराष्ट्राला एकमेव आशेचा किरण म्हणुन राज ठाकरे यांच्याकडे तरुण वर्ग पहात आहे. शिवाय आतापर्यंत सर्व पक्षांना सत्ता दिली पण गोरगरिबांच्या वस्त्या विकासापासुन लांबच राहील्या. या वस्त्यांचा सर्वागिन विकास केवळ मनसेच करू शकते या भावनेतुन आज अंबाजोगाई शहरातील भोई गल्ली परिसरातील व शहरातील इतर तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला ज्या मधे मनोज हिरवे, विशाल जिरंगे, सचिन भोकरे, बालाजी हिरवे, सागर जिरंगे, प्रदिप हिरवे, राहुल गवळी, महेश भुजंगे, समर्थ गवळी, रोहीत भोकरे, युवराज भुजंगे, योगेश भोकरे, रोहीत हिरवे, सोमनाथ भोकरे, अविनाश हिरवे, प्रविण भोकरे, रोहीत खैरमोडे, शुभम जिरंगे, कपील गवळी, अंबादास खैरमोडे, रवि कीरण राठोड, संतोष बडे, काशीनाथ धोत्रे, अरूण साळुंके, सौरभ साबळे, आमेश्वर यादव, तन्मय कुलकर्णी

इंग्रजी शाळेच्या वेळेवर आतातरी बंधन आणणार का नाही? आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Image
बीड(प्रतिनिधी ) शाळेचा अतिताण असह्य झाल्याने बीडमध्ये एका विद्यार्थीनीला वर्गातच हृदय विकाराचा धक्का बसून त्यात तिचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने आपआपल्या शाळेच्या वेळा, विद्यार्थ्यांवर दफ्तरांचे होणारे ओझे, होमवर्क आदींवर पुनर्विचार करण्याची गरज आहे. बीड जिल्ह्यातील इंग्रजी शाळांच्या वेळा सकाळी 7ः45 ते दुपारी 2ः30 आहेत. म्हणजेच विद्यार्थी घरातून सकाळी सात वाजता बाहेर पडतात अन् साडेतीन वाजता घरी येतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतेवर याचा परिणाम होत असून इंग्रजी शाळांनी आपल्या शाळेची वेळ शासन नियमानुसार करावी, अशी मागणी आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधाळे मुंडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी सुहास पाटील, नवनाथ प्रभाळे, सचिन कोटुळे आदी उपस्थित होते तर निवेदनावर सामजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांचीही स्वाक्षरी होती. मनोज जाधव म्हणतात, सतत अभ्यास आणि व्यस्त दिनक्रमामुळे विद्यार्थी मानसिक तणावाखली जात आहेत. यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सकाळी सहा ते रात्री सात वाजेपर्यंत विद्यार्थी फक्त शाळा आणि ट्युशन यातच ग

श्रावण पौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रमाचे अयोजन

Image
मोफत नेञ तपासणी व अल्पदरात शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन पु.भिक्खु धम्मशील थेरो यांच्या 11 व्या वर्षावासाचे अधिष्ठान प्रारंभ . बौद्ध धम्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे.म्हणून प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था बीडच्या वतीने प्रत्येक पौर्णिमेला महाविहार धम्मभुमी डॉ.भदन्त आनंद कौसल्यायन नगर शिवणी येथे विविध कार्यक्रमाचे अयोजन करण्यात येते. श्रावण पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा हा कालावधी वर्षावासाचा असल्याने पु.भिक्खु धम्मशील थेरो यांच्या 11 व्या वर्षावासाचे अधिष्ठान आजपासुन होणार आहे.त्यांच्या समवेत औरंगाबाद येथील पु.भिक्खु मंगलबोधी हेही वर्षावास अधिष्ठान करणार आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुमीत डोंगरे यांचे चिरंजीव कु.शाश्वतच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन चंपावती नेञालयाच्या वतीने मोफत नेञ तपासणी व अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया शिबीराचे अयोजन करण्यात आले आहे. यावेळी पु.भिक्खु धम्मशील थेरो,पु.भिक्खु मंगलबोधी हे धम्मदेसना देणार आहेत.त्याच बरोबर आलेल्या सर्व उपासकांना संस्थेच्या वतीने भोजनदान खिरदान देण्यात येणार आहे.तरी उपरोक्त कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने स

संभाजी भिडेवर कारवाई करावी म्हणून पाटोदा वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Image
पाटोदा (गणेश शेवाळे) संभाजी भिडे हे वारंवार वादग्रस्त विधान करून महाराष्ट्रात जातीय द्वेष पसरवून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. भिडे यांने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अतिशय वादग्रस्त विधान करत अतंत्य निंदनीय व खालच्या दर्जाचे विधान करून राष्ट्रपिताचा अवमान करत देशवासीयांच्या भावना दुखावल्या आसुन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सारख्या महापुरुषांवर आवमान कारव वादग्रस्त विधान भिडेनी केलेले आहे यामुळे सरकारने जाणीवपूर्वक वादग्रस्त विधान करणाऱ्या वाचाळवीर मनोहर (संभाजी) भिडेवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याची तुरुंगात मरे पर्यंत रवानगी करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी पाटोदा वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार चितळे यांच्या कडे केली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष गोरख झेंड, सचिन मेघडबर,श्यामसुंदर वाघमारे,राहुल शिरोळे, सुभाष सोनवणे, पत्रकार हारिदास शेलार,परसराम गायकवाड, सुनील गायकवाड, गोकुळ पुलवळे, गोविंद यादव, संदीप मस्के, आदिंच्या सह्या आहेत.

स्वकष्टातून फुलवली ड्रॅगन फ्रूट ची शेती

Image
आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :  आपल्या बीड जिल्हा तसा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा असून याठिकाणी मागचे 2-3 वर्ष सोडले तर म्हणावं असा पाऊस कधी होत नाही.. दुष्काळ ग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो.. परंतु अशाच जिल्ह्याच्या ठिकाणी आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथिल नामवंत शेतकरी -बागायतदार भाऊसाहेब घुले यांने हे प्रमाण खोटे ठरवून आपल्या स्वकष्टातून हे ड्रॅगन फ्रूट पिकवून तालुक्यातील शेतकऱ्यांना एक नवीन आशा दिली आहे.. अशा कष्टातून पिकवलेल्या फळाची पहिली चव लाडके लोकप्रिय शेतकऱ्याची* जाणीव असलेले आमदार बाळासाहेब काका आजबे यांना देताना प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब घुले डॉ संतोष कदम, शिवाजी जरांगे, अशोक पोकळे, गणेश पडोळे, बबन काळे, राजेंद्र जरांगे, ताराचंद कानडे, दादा जरांगे, डॉ तावरे, राम गोंदकर, नितीन तावरे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते .

आमदार सुरेश ( आण्णा ) धस यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम बीड जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागळे सह गायरान धारकांनी आभार मानून सत्कार केला

Image
आमदार सुरेश ( आण्णा ) धस यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम बीड जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागळे सह गायरान धारकांनी आभार मानून सत्कार केला    आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) : महाराष्ट्रातील शासकीय गायरान जमिनीवरील / शेतीवरील अतिक्रमणे / आणि गायराना वरील बांधकामे या सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून चालू होता . यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम बीड जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोशल फोरम संघटनेमार्फत अनेक आंदोलने केली , निवेदने देऊन पाठपुरावा आज पर्यंत चालूच होता .    आदिवासी ,दिन, दलित, विमुक्त, भटके, समाजातील भूमिहीन शेतमजूर घटकांची उपजीविकेचे साधन अतिक्रमित केलेले गायरान जमीन नियमानुकुल करण्यात यावे यासाठी समाजात समरसता निर्माण होणार नाही , त्यामुळे गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल करण्यात यावे , आणि शेतमजुरांच्या नावे सातबारा मिळेपर्यंत आपण या अतिक्रमणधारकांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहून यशवंत खंडागळे साहेब यांनी धीर दिला असून राज्यात ४ लाख २३ हजारापेक्षा अधिक गायरान धारक असून या गायरान धारकांचा जिव्हाळ्याचा प

गेवराई येथे सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त क्रांती मशाल मार्च निघणार

Image
गेवराई प्रतिनिधी सखाराम पोहिकर सत्यशोधक.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त क्रांती मशाल मार्च दिनांक १/८/२०२३ रोजी सकाळी ९-०० वाजता सविधान अधिकार मोर्चा समन्वय समितीच्या वतीने गेवराई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकापर्यंत क्रांती मशाल मार्च काढून सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात येणार आहे अशी माहिती समन्वय समितीच्या वतीने प्रकाश भोले व शिवाजी डोंगरे यांनी दिली बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी संविधान अधिकार मोर्चा सन्माननीय समितीच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये संविधान अधिकार मोर्चाच्या कामाचा आढावा घेऊन सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गेवराई शहरांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकापर्यंत क्रांती मशाल मार्च काढून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाविषयी सहमती दर्शवली असून हा कार्यक्रम यशस्वी करण्य

टिपरे आणि सोंग या लोककलेला विजयसिंह पंडित यांनी राजाश्रय दिला - अ‍ॅड सुभाष निकम

Image
टिपरे महोत्सवात जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदविण्याचे शारदा प्रतिष्ठान कडुन आवाहन   गेवराई (प्रतिनिधी ) दि. ३० टिपरे आणि सोंग या गेवराई शहराच्या प्राचिन कला अविष्काराला विजयसिंह पंडित यांच्यामुळे राजाश्रय मिळाला आहे. शहरातील खेळाडु आणि कलावंतामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षीच्या टिपरे महोत्सवात विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातुन पारितोषिकांच्या रकमेमध्ये घसघसीत वाढ करण्यात आली आहे. सांघीक पारितोषिकांसह वैयक्तीक कलावंतांचाही गौरव शारदा प्रतिष्ठान करणार आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिक्षकांनी नियमावली तयार केली असुन गेवराईच्या लोककलेचा वारसा जपण्यासाठी जास्तीत जास्त टिपरे संघ व सोंग कलावंतांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन अ‍ॅड. सुभाष निकम यांनी केले आहे. टिपरे महोत्सवाच्या आयोजनासाठी आयोजित पुर्वतयारी बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी परिक्षकांसह आयोजन समिती सदस्य होते.  बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या संकल्पनेतुन शारदा प्रतिष्ठानच्या वतीने वतीने सालाबादाप्रमाणे याहीवर्षी नागपंचमीच्या दुसर्‍या दिवशी मंगळवार दि. २२ ऑगस्ट रोजी सायं.

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून साहित्यिक शरद गोरे यांना संधी द्यावी - ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची मागणी

Image
    ईगतपुरी तालुका प्रतिनिधी - राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांची नव्याने निवड होणार असल्याची चर्चा सध्या वेग घेत आहे. साहित्य, कला, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांची शिफारस सरकार राज्यपालांकडे करत असते. साहित्य क्षेत्रातून सुप्रसिध्द साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांना संधी द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली आहे. तसेच राजकीय पर्यावसन म्हणून कुणाचीही वर्णी लावू नये अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.  शरद गोरे हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. १९९३ साली त्यांनी साहित्य परिषदेची स्थापना केली. साहित्य परिषदेचे वीस हजार सभासद असून आजवर संस्थेने १५० हून अधिक साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केलेले आहे. त्यांनी महाराष्ट्रासह महाराष्ट्र बाहेर देखील अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संमेलने घेतलेली आहेत. नवोदित मराठी साहित्य संमेलन, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन , महात्मा फुले साहित्य संमेलन , छत्रपती

भाजपा सरकारने भिडेंच्या लवकर नाड्या आवळाव्यात नाहीतर महाराष्ट्रात दंगली पेटतील -गणेश शेवाळे

Image
पाटोदा (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य शाहु फुले आंबेडकर विचारधारेवर चालत असल्यामुळे महाराष्ट्रातील जनता गुण्यागोविंदाने सर्वत्र राहते मात्र भिडे सारखे किडे सतत देशातील व राज्यातील महापुरुषावर काही पण वाच्याळ भाष्य करून राज्यातील शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करतात यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने लवकरच भिडे सारख्या विकृत मानसिकतेचा लोकांच्या वेळीच नांग्या ठेचल्या पाहिजे नाहीतर महाराष्ट्रात दंगली पेटतील याला सर्वश्री जबाबदार महाराष्ट्रातील सरकार राहिल यामुळे शिंदे पवार पुरस्कृत भारतीय जनता पार्टीच्या सरकारने भिडेंचा लवकर बंदोबस्त करावा नसता महाराष्ट्र दंगली पेटतील

सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक शरद झोडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सॅनिटरी पॅड चे वाटप

Image
बीड दि.३० (प्रतिनिधी ) बीड शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक शरद झोडगे यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.  जुना धानोरा रोड परिसरातील अस्मिता ब्युटी पार्लर येथे देखील त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी महिलांच्या संरक्षणार्थ महिलांना सॅनिटरी पॅड चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अस्मिता ब्युटी पार्लर च्या संचालिका सौ.सुरेखा मधुकर कांबळे यांनी केले होते.  वाढदिवसानिमित्त सॅनिटरी पॅड चे वाटप केल्याबद्दल महिलांनी शरद झोडगे यांचे आभार मानले. तसेच दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रवीण पालीमकर, सातीराम ढोले, अशोक आठवले, विक्रम मोमीन, राज भैय्या गायकवाड, पत्रकार अंकुश गवळी, अमोल ढोले अमोल शिंदे यांच्यासह स्थानिक भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सुनील वाळुंज यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पुणे जिल्हा निमंत्रक पदी नियुक्ती

Image
मुंबई : पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पुणे जिल्हा निमंत्रक पदी ज्येष्ठ पत्रकार सुनील वाळुंज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज ही घोषणा केली.. राज्यातील पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्यांची पुनर्रचना करण्यासाठी सर्व जिल्हास्तरीय समित्या बरखास्त करण्यात आल्या असून आता नव्याने जिल्हा आणि तालुका स्तरावर या समित्या गठीत करण्यात येत आहेत.. त्यानुसार सुनील वाळुंज यांची पुणे जिल्ह्याचे निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आहे.. पुणे जिल्हयातील सर्व तालुक्यांचे निमंत्रक आणि समन्वयक यांच्या नियुक्त्या करण्याची जबाबदारी सुनील वाळुंज यांच्यावर सोपविण्यात आली आहे.. नवीन सर्व नियुक्त्या पुढील दोन वर्षांसाठी असतील.. पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जात असलेले खोटे खटले, पत्रकारांना देण्यात येणारया धमक्या बाबत आवाज उठविण्याचे काम पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करते.. सर्व जिल्ह्यातील नियुक्तया पूर्ण झाल्यानंतर पत्रकार संरक्षण कायदयाची माहिती जास्तीत जास्त पत्रकारांना व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड मध्ये एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेतले जाण

मलकापूर शहरात दोन लक्झरींची जोरदार टक्कर: 7 प्रवासी ठार

Image
बुलढाणा, 29 जुलै : मलकापूर शहरात नॅशनल हायवे क्रमांक सहावर असलेल्या उड्डाण पुलावर भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या दोन लक्झरी बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातामध्ये एकूण सात प्रवासी ठार झाले असून 25 ते 30 प्रवासी काही गंभीर तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आज पहाटे 02:45 वाजेच्या सुमारास दोन्ही बसमध्ये टक्कर झाली. यातील एक लक्झरी बस (एमएच 08-9458) रॉयल कंपनीची असून दुसरी बस यात्रेकरूंची होती. अमरनाथ यात्रा संपवून ही लक्झरी बस (एमएच 27 बिएक्स 4466) हिंगोलीच्या दिशेने जात होती. तर रॉयल कंपनीची बस नागपूरकडून नाशिकच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती मिळत आहेत. अपघातानंतर दोन्ही गोष्टी समोरील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाले आहेत. तीर्थयात्रींच्या बसमधील ड्रायव्हर सुद्धा या अपघातात ठार झाला आहे. घटनास्थळी एकूण 5 प्रवासी गतप्राण झालेत तर 2 प्रवासी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी आणल्यानंतर दगावले. 

परळी नगरपालिकेने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवावा. बालासाहेब जगतकर

Image
 परळी प्रतिनिधी- परळी नगरपालिकेने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्रचे संपादक बालासाहेब जगतकर यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त परळी शहरातील बस स्थानकासमोरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परळी नगरपालिकेने पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक बाळासाहेब जगतकर यांनी केली असून याचे लेखी निवेदन राज्याचे कृषिमंत्री माननीय नामदार धनंजय मुंडे परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनाही देण्यात येणार असल्याची माहिती ही प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

मनिपुर हत्याकांड प्रकरणी पाटोदा येथे सर्व पक्षीय दणका मोर्चाचे आयोजन-प्रतिक जावळे

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) मनिपुर येथे ३मे पासुन होणा-या दलित आदिवासी यांच्यावर होत असलेल्या अन्यायाप्रकरणी पाटोदा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य दणका मोर्चा चे दि.३ऑगस्ट२०२३ रोजी सकाळी ठिक ११वा सर्व पक्षीय मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चाची सुरुवात छञपती शिवाजी महाराज चौक ते राजमोहम्मद चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामधुन उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चामध्ये आष्टी पाटोदा व शिरुर तालुक्यातील सर्व अनुसूचित जाती व जमाती चे सर्व नागरिक सहभागी होणार आहेत. या मोर्चामध्ये ऑल इंडिया पॅंथर सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), आदिवासी समाज संघटना,भटक्या विमुक्त जमाती संघटना,एकलव्य संघटना,बिर्सा मुंडा संघटना,जय लहुजी संघटना,डेमो क्रोटिक पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा व इत्यादी सहभागी होणार आहेत.तरी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे प्रतिक जावळे यांच्याकडून आव्हान करण्यात येत आहे की मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून मणिपूर येथील सर्व मॄत बंधु भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी उपस्थित राहावे.

ईर्शाळवाडीच्या उभारणीसाठी परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 10 लाखांची मदत

Image
ईर्शाळवाडीच्या उभारणीसाठी परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 10 लाखांची मदत कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 10 लाखांचा धनाकर्ष सुपूर्द मुंबई (दि. 28 ) - राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी रायगड जिल्ह्यातील दुर्घटना घडल्यामुळे त्यांचा वाढदिवस साजरा न करता ईरशाळवाडी या गावाच्या उभारणी करण्याकरीता सहकार्य करावे हे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच परळी नगर पालिकेचे गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी राष्ट्रवादी काँग्रेसने १० लक्ष रुपये निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला. आज विधिमंडळात मुख्यमंत्री दालनात कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत 10 लाख रुपयांचा धनाकर्ष मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी आमदार संजय दौंड, बीड जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर आबा चव्हाण,ज्येष्ठ नेते राजकिशोर उर्फ पापा मोदी, परळी चे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,

सामाजिक उन्नतीसाठी तसेच जनतेचा आवाज सभागृहात मांडण्यासाठी मा.राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर आमदार पदी नियुक्ती करा-किसान पुत्र श्रीकांत गदळे

Image
. बीड: महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तसेच शेतकरी शेतमजुर. कष्टकरी. कामगार. उपेक्षित घटक. विधवा परित्यक्ता महिलां वरील होणारा अन्याय अत्याचार. शिक्षण. आरोग्य. निसर्ग समतोल इ. विविध विषयावर प्राण पणाला लावुन काम करत आहे. मात्र काम करत आसताना माझ्याकडे कसल्याही प्रकारचे पद नसल्यामुळे मला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.तरी मा. राज्यपाल साहेबांनी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मला विधान परिषदेवर आमदारकी द्यावी.मा.राज्यपाल महोदयांनी आपल्या कोट्यातील 12 जागेपैकी एका जागेवर मला आमदारकी या पदावर माझी नियुक्ती केल्यास समाज हिताचे काम करण्याचे माझे स्वप्न साकार होईल. तरी मा.राज्यपाल महोदयांनी राज्यपाल कोट्यातील विधान परिषदेसाठी आमदार म्हणून माझी नियुक्ती केल्यास मिळणाऱ्या मानधना मधून केवळ1रू.(एक रुपया) प्रतिमाह मानधन स्वतःसाठी महाराष्ट्र शासनाचा सन्मान म्हणून घेईन आणि उर्वरित मानधन रक्कम गोरगरीब शेतमजूर अल्पभूधारक शेतकरी यांच्या कल्याणासाठी शासनाच्या तिजोरीत जमा करावेत. असे शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपर

डॉ.बाबुराव जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली बालाघाटावरील राष्ट्रवादी संदीप क्षीरसागर यांच्या बाजुने

Image
सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते डॉ.जोगदंड यांच्या पाठीशी (बीड प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फुट पडल्यानंतर पक्षाचे दोन्ही गट आपली शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत यातच समाजरत्न पुरस्कार प्राप्त लोकनेते डॉ.बाबुरावजी जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बालाघाटावरती आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बाजुने पुन्हा एकदा उभी राहिली आहे . डॉ.बाबुराव जोगदंड हे आमदार संदीप क्षीरसागर यांचे एकनिष्ठ मानले जातात पुन्हा एकदा त्यांच्या शिलेदारांनी विश्वास संपादन केला आहे. बीड जिल्ह्यात बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी उभी राहिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. युवा वर्ग हा मोठया प्रमाणावर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी असुन बालाघाटावरील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी उभी करण्यात डॉ.बाबुरावजी जोगदंड यांना यश आले आहे.बालाघाटावरील विविध गावांतील वाडी-वस्तीवरील कार्यकर्त्यांची फौज आज डॉ.बाबुरावजी जोगदंड यांच्या शब्दावर कुमक करीत आहे.बालाघाटावर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट

कंत्राटी सफाई व इतर कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन. - भाई गौतम आगळे.

Image
   परळी वैजनाथ ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत यांच्या अधिनस्त कंत्राटदार सफाई व इतर कंत्राटी कामगारांना त्यांच्या मुलभूत हक्का पासून वंचित ठेवले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथे रास्ता रोको आंदोलना चे आयोजन केले आहे. एकीकडे स्वातंत्र्याचा अम्रत महोत्सव साजरा करण्यात येत आहे, तर दुसरीकडे कंत्राटी कामगारांना किमान वेतनासाठी मागील १० वर्षांपासून लढा द्यावा लागत आहे. ही जिल्हा प्रशासनासाठी अतिशय लाजीरवाणी बाब आहे. असा संतप्त सवाल वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.         सविस्तर व्रत असे की कंत्राटी सफाई व इतर कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी रोजंदारी मजदुर सेनेच्या बॅनरखाली २८ सप्टेंबर २०१३ ला नगरपरिषद परळ

राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल निंदाजनक वक्तव्याच्या निषेधार्थ संभाजी भिडेच्या पुतळ्याचे दहन

Image
---- लिंबागणेश:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या मुस्लिम द्वेष्ट्या संभाजी भिडे यांना अटक करा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२९ जुलै शनिवार रोजी दि.२९.०७.२०२३  सकाळी १०वा.अहमदपुर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गा वरील लिंबागणेश बसस्थानक येथे राष्ट्रद्रोही संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत जोडे मारत पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड, पोलिस अधीक्षक बीड यांच्या मार्फत ईमेल द्वारे राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, प्रधान सचिव यांना निवेदन देण्यात आले.यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, उपसरपंच बाळकृष्ण थोरात,ग्रां.स.दामुकाका थोरात, आंबेडकरवादी नेते रविबापु निर्मळ, सुरेश निर्मळ, लेहनाजी गायकवाड, पांडुरंग वाणी,विनायक मोरे, सर्पमित्र अशोक जाधव, विक्रांत वाणी, अभिजित गायकवाड, रामचंद्र मोरे,अजय थोरात, तुकाराम गायकवाड,कृष्णा वायभट आदि सहभागी होते. सविस्तर माहितीस्तव -----  अमरावती येथील कार्यक्रमात संभाजी भिडे नामक व्यक्तीने राष्ट्रपिता महात्मा गांधीचे

"इतरांप्रमाणे मला माझ्या आवाजाचाही न्यूनगंड होता...."- प्रसिध्द यूट्यूबर आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर

Image
जगात प्रत्येकाचा आवाज युनिक आणि छानच असतो, हे मला जाणवलं जेव्हा कसलीही गाण्याची पार्श्वभूमी नसताना 'व्हाइस अॅाफ इंडीया'चा 'व्हाइसओव्हर'साठी दिला जाणार पुरस्कार मला ;पेटलेलं मोरपीस; या ओडिओबुकसाठी मिळाला. कोणीही जन्मजात उत्तम आवाज घेऊन जन्माला येत नाही, जर तुम्हाला कथेची समज असेल तर कुठल्याही आवाजात तुम्ही उत्तम पद्धतीने कन्टेट पोचवू शकता, असं प्रसिध्द यूट्यूबर आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सांगते. यूट्यूबबरोबरच व्हाइसओव्हर या क्षेत्रामध्ये तिने स्वतःचा ठसा उमटवला असून स्टोरीटेल प्लॅटफॅार्मसाठी अनेक पुस्तकांना तिने आवाज दिला आहे तसेच स्वतःच्या पॅाडकास्ट शोची सुध्दा निर्मिती केली आहे. अनेक वेगवेगळ्या कादंब-यांना तिने आवाज दिला आणि त्या स्टोरीटेलवर लोकप्रिय झाल्या.  आपल्याकडे उगाचच असा गैरसमज आहे की ज्याला गाता येतं त्याचाच आवाज छान असतो. त्यामुळे इतरांप्रमाणे मला माझ्या आवाजाचाही न्यूनगंड होता. त्यात माझा आवाज थोडा बेसचा आहे, स्त्रीयांचा आवाज मंजूळ आणि पातळच असला पाहिजे तरच तो चांगला आवाज असाही अट्टाहास आहे. पण नाटकाचा अनुभव असल्यामुळे कथेतलं एखादं पात्र कसं

आज स्वराज्य पक्षाच्या वतीने मुबइ -नाशीक महामार्ग व जूनवणे वाडी तालुका इगतपुरी (नाशिक) येथे स्वराज्य पक्षाच्या वतीने रस्त्यासाठी आंदोलन करण्यात आले

Image
.  आज संपुर्ण महाराष्ट्र भर स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी राजे , संपर्क प्रमुख करण गायकर , सरचिटणीस धनंजय जाधव व नाशीक मधे जिल्हाप्रमुख रुपेश नाठे यांचा मार्गदर्शना माधे आंदोलन करण्यात आले. जुनवने वाडी येथील मयत भगिनीस श्रद्धांजली स्वराज्य पक्षाच्या वतीने वाहण्यात आली. पिडीत कुटुंबाची चौकशी केली असता बाहेर औषध उपचार करण्यात आले असे प्रशासन आरोप करत,कुटुंबाचा सांगण्या प्रमाने अशी कुठलीही ट्रीटमेंट वैद्या कडून घेतली गेली नाही . जुनवणेवाडी येथील पिडीत कुटुंबाचा न्याया साठी स्वराज्य पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं त्यात प्रामुख्याने रस्त्याची मागणी करण्या आली .स्थानीक आमदार व खासदार यांनी त्वरित लक्ष घालावे व न्याय द्यावा अन्यथा कलेक्टर ऑफिसला जुनवणे वाडीच्या रस्त्याबाबत नक्कीच आंदोलन करण्यात येइल . त्याच प्रमाने आज विविध गावांमधे आंदोलन करण्यात आले. स्थानीक लोकप्रतीनिधींनी जनतेला वेठीस धरु नाही अशी भुमीका स्वराज्य पक्षाने घेतली.  महामर्गावर खड्डे बुजवा ..जिव वाचवा.. रस्ते आमचा हक्काचे नाही कुनाचा बापाचे.. आशा घोशना देऊन स्वराज्य पक्षा चा वतीने महामार्गावर आंदोलन करण्यात आल

बहुजन रयत परिषदेच्या गेवराई तालुका उपाध्यक्षपदी अंकुश रोकडे यांची निवड

Image
बीड प्रतिनिधी सखाराम पोहिकर  :-गेवराई तालुक्यातील बहुजन रयत परिषदेच्या सर्व पदाधिकारी विषेश बैठक आज दिनांक २८/७/२०२३ रोजी सकाळी १२-०० वाजता हॉटेल गारवा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बहुजन रयत परिषदेचे गेवराई तालुका अध्यक्ष महेश बप्पा धुरंधरे हे होते तर या बैठकीस प्रमुख पाहुणे बहुजन रयत परिषदेचे बीड जिल्हा अध्यक्ष गोरख भाऊ मोमीन.व बहुजन रयत परिषदेचे बीड तालुका कार्याध्यक्ष मसु पवार . बहुजन रयत परिषदेचे गेवराई तालुका सरचिटणीस योगीराज साळवे तसेच बहुजन रयत परिषदेचे गेवराई शहराध्यक्ष नवनाथ जिजाऊ धुरंधरे व बहुजन रयत परिषदेचे शहर उपाध्यक्ष आनंद सुतार या सर्व पदाधिकारी यांचे शाल पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले यावेळी गेवराई तालुक्यातील मोजे डोईफोडवाडीचे उपसरपंच अंकुश रोकडे यांची बहुजन रयत परिषदेचे गेवराई तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी श्री अंकुश रोकडे यांना बहुजन रयत परिषदेचे बीड जिल्हा अध्यक्ष गोरख भाऊ मोमीन व बहुजन रयत परिषदेचे गेवराई तालुका अध्यक्ष महेश बप्पा धुरंधरे व सर्व माण्यवराच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले यावेळी बहुजन रयत परिषद

तुकाराम महाराज गाथा पारायण केले त्यांना पुण्य प्राप्त होते - ह.भ.प.महंत जनार्दन महाराज

Image
तळणेवाडी येथे संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याची उत्साहात सांगता  गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे   अधिक मासात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज गाथा पारायण केले. त्यांना प्रत्यक्ष वेदाचे पठण केल्याचे पुण्य फळ मिळते. असे प्रतिपादन श्री क्षेत्र गडाचे महंत स्वामी जर्नादन महाराज यांनी तळणेवाडी येथे आयोजित तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याच्या सांगतेप्रसंगी बोलताना व्यक्त केले.        गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे संत ह.भ.प.वै.गुरुवर्य स्वामी निगमानंद महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाचे महंत ह.भ.प. जनार्धन महाराज गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक मासानिमित्त पुर्व पुण्य काळाचे महत्व जाणून संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या सात दिवसांपासुन विठ्ठल रुक्मिणी मंदीरात तुकाराम महाराज गाथा पारायण मोठ्याउ उत्साहात संपन्न झाले. जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या शिंकें लावियेलें दुरी । होतों तिघांचे मी वरी ॥१॥ तुम्ही व्हारे दोहींकडे । मुख पसरूनि गडे ॥ध्.॥ वाहाती त्या धारा । घ्यारे दोहींच्या कोंपरा ॥२॥ तुका म्हणे

साक्री तालुकास्तरीय सार्वजनिक ग्रंथालयांचे ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न

Image
कर्मचारी व पदाधिकारी अपडेट राहणे गरजेचे- अनिल सोनवणे (प्रमुख कार्यवाह महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ ) धुळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे व धुळे जिल्हा ग्रंथालय संघ संयुक्त विद्यमाने साक्री तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह अनिल सोनवणे होते. प्रमुख अतिथी म्हणून सहायक जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश भदाणे ,कार्यवाह रोहिदास हाके, राहुल महिरे, उपाध्यक्ष महेंद्र जाधव,नाशिक विभाग संचालक राहुलकुमार महिरे,संचालक नरेंद्र देवरे,प्रमोद महाजन, तज्ञ मार्गदर्शक प्रमोद वाणी आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज व ग्रंथालय शास्त्राचे जनक एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक ग्रंथालयाच्या कामकाजात सुसूत्रता यावी म्हणुन ऑनलाईन वार्षिक अहवाल भरण्यात यावा. यासंदर्भात तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे कर्मचारी व पदाधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. नुकतेच महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक ग्रंथालया

धुळे जिल्हा ग्रंथालयातील ई प्रणाली कार्यशाळा संपन्न

Image
 धुळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व धुळे जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या सयुक्त विद्यमाने ग्रंथालय अनुदान ई प्रणाली कार्यशाळा. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय च्या हॉल मध्ये संपन्न. प्रणाली प्रशिक्षण कार्यशाळाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व धुळे जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या सयुक्त विद्यमाने केले होते . या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ . दत्ता परदेशी .कार्यध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ .ई प्रणालीचे उदघाटन श्री जगदिश पाटील . जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले . प्रमुख पाहूणे श्री चद्रशेखर ठाकूर . श्री अविनाश भदाणे. अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ श्री रोहिदास हाके प्रमुख कार्यवाह श्री प्रमोद वाणी .श्री एच ए. पाटील .पी एम सुर्यवंशी. हि .रा. चौधरी . हरीष पाटील . ज्ञानेश्वर माळी आदि . उपस्थित होते . यावेळी जगदिश पाटील यांनी सांगितले की . शिरपूर . शिंदखेडा . साक्री येथे ग्रंथालय पदाधिकारी ग्रंथपाल यांना ई प्रणालीची कार्यशाळा घेईन माहिती दिली आहे . त्याप्रमाणे धुळे ग्रामीण व धुळे शहर साठी ही माहिती देणार आहोत . अध्यक्षीय भाषणात डॉ . दत्ता

बाबासाहेबानंतर ॲड. प्रकाश आंबेडकरच गायरान जमीन हक्क न्यायचे आंदोलन करीत आहेत -डॉ. सुरज एंगडे

Image
ज्येष्ठ विचारवंत शांताराम बापू पंदेरे यांना सम्यक जीवन गौरव पुरस्कार प्रदान परभणी :  नवीन भांडवलशाही व्यवस्था जोमात आहे. सरकारच्या निधी धोरणांचा सर्वंकष लाभ त्यांनाच मिळत आहे. सामान्य जनता मात्र विकासापासून कोसो दूर आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत जनतेने फक्त कर भरायचा का ? असा प्रश्न उपस्थित करून सर्वांनी आत्मभान जागे ठेऊन आर्थिक बजेटचा अभ्यास केला पाहिजे असे म्हणत संविधान प्रदत्त प्रगतीच्या वाटेपासून आजही अनेक समूह शोषित, वंचित व दुर्लक्षित आहेत. त्यांच्या हक्कासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात्मक तरतूद केली आहे. बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी 1958-64 भूमिहीन जमीन हक्काचे यशस्वी आंदोलन केले होते. परंतु त्यानंतर फक्त ॲड . बाळासाहेब आंबेडकरच गायरान, जमीन हक्क, एसआरए इत्यादीसाठी प्रत्यक्ष हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांसह रस्त्यावर येऊन आंदोलन करून न्याय मिळवून देत आहेत ही विशेष बाब स्मरण ठेवून वंचितांनी पुढील दिशा निश्चित करावी असे प्रतिपादन विश्व विख्यात 'कास्ट मॅटर्स' ग्रंथाचे लेखक डॉ. सूरज एंगडे यांनी केले. स

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवले --- बाळासाहेब धनवे

Image
  आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :  माहिती संकलनात जिल्ह्यात शेवटी असणारा जामखेड तालुका आज प्रथम क्रमांकावर एके काळी शिक्षणात सर्वात मागे असणारा तालुका आज अग्रेसर आहे. तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक कार्यक्षम आहेत. त्यांच्या अनेक सकारात्मक बाबी आहेत त्यांना प्रोत्साहन दिले यामुळे जीव ओतून शिक्षकांनी काम केले त्यामुळे माहिती संकलनात शेवटी असणारा जामखेड तालुका आज प्रथम क्रमांकावर आला आहे. असे मत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी सांगितले.   शुक्रवार दि. २८ रोजी ल. ना. होशिंग विद्यालयातील ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात केंद्रस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात आली जामखेड, पाटोदा, राजुरी व साकत केंद्रातील शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गणपत चव्हाण, शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत, केंद्रप्रमुख मल्हारी पारखे, संजय घोडके, सुरेश मोहिते, ज्ञानेश्वर कोळेकर, विजय जेधे, राम ढवळे, विजयकुमार जाधव, भगवान समुद्र, संदिप ओझा, किशोर राठोड यांच्या सह जामखेड, पाटोदा, राजुरी व साकत केंद्रातील सर्व शिक्षक व शिक्षिका हजर होत्या.  विद्यार्जन करणारे विद्यार्थी

जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त सय्यदमीर बाबा विद्यालयामध्ये वृक्षारोपण

Image
 आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :  मौजे आष्टी तालुक्यातील लोणी येथे आज गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाळके आबा व मा. ग्रा. सदस्य सुभाष दादा भोसले यांनी सय्यदमीर बाबा विद्यालयांमध्ये वृक्षारोपण केले. नवीन पिढीसाठी खूप छान असा संदेश या ठिकाणी दिला असुन 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' हे आपण ऐकलेले आहेच. परंतु, वृक्षांचे पालनपोषण, संगोपन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे हे आपण विसरता कामा नये. वृक्षारोपणाने हा विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवला गेला...  या प़सगी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंदे सर ,तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्ययंत्रणाच सलाईनवर, आरोग्य सेवांवर परीणाम, कर्मचाऱ्यांवर ताण :- डॉ.गणेश ढवळे

Image
--- बीड जिल्ह्यातील जिल्हा परीषद अंतर्गत आरोग्य विभागातील ८५३ मंजुर पदापैकी ४७५ पदे म्हणजेच ६० टक्के पदे रिक्त असुन आरोग्य यंत्रणा सलाईनवर असुन तातडीने रिक्त पदे भरण्यात यावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांच्या मार्फत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना केली आहे.  बीड जिल्ह्यातील जिल्हा परीषद अंतर्गत आरोग्य विभागातील एकुण मंजूर ८५३ पदापैकी केवळ ४७५ पदे ( आरोग्य पर्यवेक्षक ५ पैकी ३ , औषध निर्माण अधिकारी ६८ पैकी  १६ , युनानी मिश्रक ५ पैकी ५ , आरोग्य सेवक महिला ४९५ पैकी ३१८ , आरोग्य सेवक पुरुष (४० टक्के) १२३ पैकी २३ , आरोग्य सेवक पुरुष ( ५० टक्के) १५४ पैकी १०९ , कुष्ठरोग तंत्रज्ञ  ३ पैकी १ म्हणजेच एकुण ६० टक्के पदे रिक्त असुन रिक्त पदांमुळे सेवा विस्कळित झाली असुन अन्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असुन पावसाळ्यात सध्या साथीचे आजार पसरत असुन आरोग्य सेवेवर मोठा परीणाम होत असुन रुग्णांची हेळसांड होत आहे त्यामुळे पर्यायाने संपूर्ण आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असुन रूग्णांची हेळसांड थांबण्यासाठी तातडीने रिक्त पदे भरण्यात याव

आठवड्यात मिरचीच्या भावात सहा हजाराची घसरण

Image
सोयगाव ( . प्रतिनिधी ) यासीन बेग . आठवड्यापूर्वी सोयगाव ता येथील मिरची बाजारात हिरवे च्या मिरचीने बारा हजार रुपयांचा टप्पा पार केला होता परंतु बाजारात आता मिरचीची अचानक एकदम वाढल्याने भावात घसरत घालत आहे मंगळवारी व्यापाऱ्यांची पाच हजार रुपये प्रति टन दराने खरेदी केल्याने शेतकऱ्यात नाराजी दिसून आली केळ आठ दिवसात मिरचीच्या भावात सहा हजाराची घसरण झाल्याने मिरची उत्पादनकाचा आनंद जास्त दिवस टिकला यापुढे आणखी अचानक वाढली तर भावात घसरण होण्याची शक्यता असल्याने मिरची व्यापारी सांगत आहेत सोयगाव तालुक्यातील व सोयगाव बाजारात परिसरातील शेतकऱ्यानी यंदा मोठ्या प्रमाणात उन्होाळी मिरचीची लागवड केली आहे महिन्या पासून ही मिरची शेतकरी विक्रीसाठी बाजारात घेऊन येऊ लागतो त्यांना सुरुवातीला प्रतीक्विंटल दहा ते बारा हजार रुपयांनी भाव मिळल्याने आनंदाचे वातावरण होतो परंतु आता भावात निम्म्याने घट झाली आहेत तसेच पाहिलेजरत सोयगाव चा बाजारात चिखली चिखली दिसून येतो आणि लोकजनतेचा बाजारात सामना करना पडतो नगरपंचायत सोयगावचे प्रशाकिय यांचा दुर्लक्ष व बाजार ठेकेदार बाजारावर बाजारात दुर्लक्ष

अल्ट्रा झकास मराठी ओटीटीच्या “हिरा फेरी” चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत प्रदर्शनाचा शानदार सोहळा संपन्न !!

Image
मुंबई, २६/०७/२०२३ : अल्ट्रा झकास मराठी ओटीटीच्या 'ढ लेकाचा’, 'अदृश्य', 'बोल हरी बोल' या आणि इतर सुपरहिट चित्रपटांनंतर आता "हिरा फेरी" हा नवा कोरा भन्नाट विनोदी चित्रपट १४ ऑगस्ट २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजीटल प्रिमियर होणाऱ्या “हिरा फेरी” या चित्रपटाच्या ट्रेलर आणि संगीत प्रदर्शनाचा शानदार सोहळा पार पडला असून यावेळी चित्रपटाचे निर्माते आणि अल्ट्रा मिडिया अँड एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे CEO श्री.सुशीलकुमार अग्रवाल, अल्ट्रा मिडिया अँड एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या मार्केटिंग हेड ब्रिंदा अग्रवाल, अल्ट्रा झकास मराठी ओटीटीचे बिजनेस हेड श्री.वेंकट गारापाटी, चित्रपटाचे दिग्दर्शक श्री.अमोल बिडकर आणि कलाकार अभिनय सावंत, प्रवीण प्रभाकर तसेच चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक श्री.काशी रिचार्ड आणि गायक अरुण देव यादव, मनाली चतुर्वेदी, लव पोद्दार उपस्थित होते. "हिरा फेरी" चित्रपटाचा ट्रेलर एकदम दिमाखदार असून चित्रपटात रातोरात श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्या आळशी घरजावई विक्कीने

बीड जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील ई-पीक पाहणी १०० टक्के पुर्ण करुन घ्या -किरण जावळे

Image
 आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :  बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. या ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून मागील रब्बी हंगामामध्ये बीड जिल्हयातील शेतकऱ्यांनी १०० टक्के ई-पीक पाहणी करुन आपल्या पीकाची नोंदणी करून शासनाच्या विविधि योजनांचा लाभ घेतला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सुरु असलेल्या खरीप हंगामाची ई-पीक पाहणी देखील आपल्याला १०० टक्के पुर्ण करावयाची आहे. खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई - पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी ०१ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात आलेली आहे. बीड जिल्हयातील सर्व शेतकरी बंधु-भगिनीं, गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहा

भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त तुलसी कॉलेज मध्ये अभिवादन.

Image
बीड(प्रतिनिधी ):-भारतीय तरुणांचे प्रेरणास्थान माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे प्राचार्य डॉ.एल.एम.थोरात यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी बोलतांना प्राचार्य डॉ.थोरात म्हणाले की कलाम यांनी देशाच्या संरक्षण आणि खगोलीय क्षेत्रात दिलेल्या अभूतपूर्व योगदान दिले आहे त्याबद्दल देशाचा प्रत्येक नागरिक त्यांचा ऋणी राहील असे त्यांनी सांगितले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

पाटोदयातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर उभा करणार्या वाहनावर कारवाई करा - नितीन जाधव

Image
पाटोदा(गणेश शेवाळे ) पाटोदा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बेशिस्त वाहनधारक कोणतेही नेयम न पाळता कशाही प्रकारे दोन चाकी चार चाकी वाहने रस्त्यावर उभा करीत असतात यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक अपघात होत असतात छत्रपती शिवाजी महाराज चौकात  मोठ्या संख्येने दोन चाकी चार चाकी वाहने उभा असल्यामुळे मोठाल्या गाड्या जाण्यास अडथळा निर्माण होतो यामुळे अनेक वेळा पाटोदेकराना ट्राफिकच्या समस्येचा सामना करावा लागला आसुन यावर प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे बेशिस्त वाहनधारकांना कुणाचा धाक राहिला नसून पाटोदयातील छत्रपती शिवाजी महाराज चौका मधील रस्त्यावर उभा करणाऱ्या वाहनावर प्रशासनाने कारवाई करावी नसता पाटोदा प्रशासनाच्या विरोधात लोकशाही पद्धतीने आंदोलन करू असा इशारा नितीन जाधव यांनी दिला आहे

बालाघाटावरील शेतपिकांचे वराहांकडुन नुकसान ; वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची माहिती वन विभागाकडेच नाही संरक्षणासाठी रंगीबेरंगी साड्यांचा आधार

Image
बालाघाटावरील शेतपिकांचे वराहांकडुन नुकसान ; वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची माहिती वन विभागाकडेच नाही संरक्षणासाठी रंगीबेरंगी साड्यांचा आधार:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेश:- नैसर्गिक संकटासह वराह व अन्य वन्यजीवामुळे शेतातील उभ्या पिकांची नासाडी केल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असुन वनविभागाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाई बाबत शेतकरी संभ्रमात आहेत तसेच वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यांवर हल्ला केल्यानंतर किती जणांना मदत मिळाली याविषयी माहिती विभागीय वन कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली असुन प्रशासनाने याबाबत जागृती राबवुन शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी बीड, तहसीलदार बीड,विभागीय वन अधिकारी (प्रादेशिक) बीड यांना केली असुन सध्या तरी शेतकरी रंगीबेरंगी साड्यांचे शेताभोवती कुंपन करत नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. सविस्तर माहितीस्तव --- बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश सर्कल मधिल डोंगराळ भागातील पिंपरनई , पोखरी (घाट), बेलगाव फुकेवाडी,सोमनाथवाडी, आदि परीसरातील शेतशि

कै.गुळवे नंतर जिल्हयाचे पक्षीय नेतृत्वाची संधी बोडकेनां (व्यक्तिविशेष लेख

Image
कै.गुळवे नंतर जिल्हयाचे पक्षीय नेतृत्वाची संधी बोडकेनां (व्यक्तिविशेष लेख )    नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, नाशिक महानगर नियोजन समितीचे सदस्य, नियोजन समिती नाशिक जिल्हा सदस्य , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती.ईगतपुरी- त्रंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे प्रमुख अशी अल्पवयातच विविध पदे भुषवणार्या व नुसते पदेच भुषवणे नाही तर त्या माध्यमातुन थेट तळागाळाचा विकास करणारे गोरख भाऊ बोडके यांची नुकतीच राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.     राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कांग्रेस चे सर्वेसर्वा अजित दादा पवार यांनी नुकतीच बोडके यांचे नियुक्तीची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांचे आदेशाचे नियुक्तीपत्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांचे उपस्थितीत नुकतेच मुंबई येथे राष्ट्रवादी कांग्रेस चे कार्यालयात प्रदान करणेत आले आहे.     यापुर्वी एखादया पक्षाचे जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी कै.गोपाळराव गुळवे या ईगतपुरी तालु