Posts

Showing posts from May, 2023

उडाणे वाचनालयात अहिल्यादेवी यांना जयंती निमित्त अभिवादन

Image
.  धुळे तालुक्यातील उडाणे येथील राजमाता अहिल्याबाई होळकर सार्व. वाचनालय येथे अहिल्यादेवी होळकर प्रतिमेस फुलहार टाकून नम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी माजी सरपंच श्रीमती अजनाताई शिंदे व सौ.सुमनताई पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाल्याने त्यांचा वाचनालयाच्या वतीने श्रीमती अजंना ताई हाके व सौ कामिनी हाके प्रा शिक्षिका यांनी शाल गुलाबपुष्प देऊन सत्कार केला सौअलका पाटील प्रा शिक्षिका यांनी ही सत्कार केला या कार्यक्रमासाठी ग्रा. प. सदस्य श्री भटू बागुल. राजु पदमर. दगा शिंदे . जगन शिंदे . वाचनालयाचे अध्यक्ष श्री रोहिदास हाके .जिभाऊ मासुळे उपस्थित होते . प्रस्ताविक व आभार रोहिदास हाके यांनी मानले . वाचक व ग्रंमास्थ हजर होते . सदर बातमी व फोटो आपल्या दैनिकात प्रसिद्धी करावी ही . विनंती रोहिदास हाके. अध्यक्ष

ग्रामपंचायत कार्यालय मिरकाळा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

Image
सखाराम पोहिकर बीड जिल्हा प्रतिनिधी :- गेवराई तालुक्यातील मौजे मिरकाळा येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचा पूजन करण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मिरकाळा गावातील भय्यू काम करणाऱ्या महिलांचा सन्मानही करण्यात आला या जयंतीच्या निमित्ताने यशोदा ढाकणे जयश्री सानप सामाजिक कार्यकर्ते व बचत गटात काम करणाऱ्या क्रांती बडे यांचा ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळेस सत्कारमूर्तीने आपले मनोगत व्यक्त केले व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यशोदा ताई ढाकणे जयश्रीताई सानप क्रांती बडे मिरकाळा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक श्री जवरे साहेब वडगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच वारुळे तसेच लक्ष्मण मुंडे अमोल ढाकणे गोवर्धन ढाकणे महेश ढाकणे राजेंद्र ढाकणे योगेश ढाकणे अंगद ढाकणे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी ग्रामसेवक

कान्होजी बाबा विद्यालय अंजनसिंगी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Image
कान्होजी बाबा विद्यालय येथे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. श्री. कान्होजी बाबा विद्यालय अंजनसिंगी येथे थोर तत्त्वज्ञ, कुशल प्रशासक, समाजसुधारक पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले, यावेळी उपस्थित श्री. कान्होजी बाबा विद्यालय अंजनसिंगी मुख्याध्यापक भाऊराव गाढवे व विनोद इंगोले लिलाधर देशमुख,प्रफुल गुल्हाणे, संजय ठाकरे, सुनील ठाकरे शेखर झाडे . व कर्मयोगी फाउंडेशन जिल्हा उपाध्यक्ष अमरावती "विशाल ठाकरे" उपस्थित होते, यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा विचाराचा उजाळा दिला

रुई नालकोल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात संपन्न.

Image
रुई नालकोल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात संपन्न. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन 40 महिलांना सन्मानित करण्यात आले बीड जिल्ह्य ( प़तीनिधी --गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील रुई नालकोल ग्रामपंचायत कार्यालय येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार अंगणवाडी सेविका जाधव कौशल्या सुदाम ,आशा सेविका दलतोड माधुरी पोपट यांचा सन्मान चिन्ह देऊन पुरस्कार देण्यात आला यावेळी इतर सामाजिक क्षेत्रात मध्ये काम करणाऱ्या महिला बचत गट, शिक्षिका, आरोग्य सेविका यांना प्रोत्साहन पर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती नामदेव धोंडे, सरपंच संजय काका नालकोल, उपसरपंच अनिल गजघाट, पांडुरंग धोंडे, चेअरमन शरद नालकोल,ग्रामसेवक शिवाजी पांडुळे ,शरद नानाभाऊ पवार, परसराम धोंडे, आजिनाथ कन्हेरकर ,आजिनाथ नालकोल,शाळेचे मुख्याध्यापक देविदास गांजुरे

दिव्यांग तपासणी शिबिरातून वंचितांची सेवा करण्याची संधी मिळाली,आष्टीच्या शिबीरात खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली भावना

Image
आष्टी। दि.३० मे (प्रतिनिधी --गोरख मोरे ) : समाजातील वंचित-उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या सुखदुःखात एकरूप होण्याचे संस्कार आम्हाला मुंडे साहेबांनी दिले आहेत.केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात दिव्यांग तपासणी शिबिर राबवताना आम्हाला वंचितांच्या सेवेची संधी मिळत आहे,ही बाब आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची असल्याची भावना खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आष्टी येथील दिव्यांग तपासणी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केली.ग्रामीण रुग्णालय आष्टी इथे काल केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग पूर्व तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी आ.सुरेश धस,मा. आ.भीमराव धोंडे,भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, वाल्मिक निकाळजे,विजय गोल्हार,पल्लवी धोंडे,डॉ.शैलजा गर्जे,जयदत्त धस,साहेबराव मस्के  डॉ.राहुल टेकाळे,डॉ जयश्री शिंदे डॉ मोरे,डॉ जावळे,सिस्टर कर्मचारी,सुखदेव पोकळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.तसेच यावेळी 'दिव

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालयात अभिवादन

Image
आष्टी ( प़तीनिधी -गोरख मोरे ) : आष्टी येथील श्री छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीराम आरसुळ यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते

भव्य मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबीर गरजु रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा - रोहित ऊर्फ बाळासाहेब धुरंधरे

Image
बीड प्रतिनिधी : रुग्ण मित्र फाउंडेशन महाराष्ट्र, व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, तथा डॉ, श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच सिद्धिविनायक नेत्रालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरामध्ये भव्य दिव्य मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने तसेच मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख श्री. मंगेशजी चिवटे साहेब व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री. राम राऊत साहेब यांच्या प्रयत्नाने व आशिर्वादाने शिबीराचे आयोजन केले आहे. नेहमीप्रमाणे बीड जिल्ह्यातील सर्व सामान्य रुग्णांची शासकीय व खाजगी दवाखान्यातील होणारी हेडसांड पाहता रुग्ण मित्र फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष रोहित उर्फ बाळासाहेब धुरंधरे यांनी वेळोवेळी बीड मधील ग्रामीण व शहरी भागातील गरीब व गरजू रुग्णांकरीता सर्वरोग मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करत आले आहेत. मात्र यावेळी बीड जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील डोळ्यांच्या आजारांचे वाढते रुग्णांचे प्रमाण आढळून आल्याने याच समस्याला पाहता बीडमध्ये भव्य दिव्य मोफत नेत्

स्व. विनायकराव मेटे यांचा पुतळा बीड येथे उभारण्यात यावा या मागणीसाठी व्यापक बैठक संपन्न

Image
बीड (प्रतिनिधी ) लोकनेते स्व. विनायकराव मेटे यांनी त्यांच्या हयातीत बहुजन समाजा सह मराठा समाजा साठी मोठे योगदान दिले आहे. येत्या ३० जून रोजी स्व. विनायकराव मेटे साहेबांची प्रथम जयंती साजरी करण्याचा मानस त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य चाहत्यांनी केला आहे . स्व. मेटे साहेबांनी समाजकारण करत असताना कधीही पक्ष , जात, धर्म पाहिला नाही त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व पक्ष, संघटना व सर्वधर्मीय लोकांनी एकत्र येत स्वर्गीय विनायकराव मेटे यांचा पूर्णाकृती पुतळा बीड जिल्ह्याच्या ठिकाणी असावा यासाठी शासकीय विश्रामगृह येथे सर्वपक्षीय व्यापक बैठक संपन्न झाली.            लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे यांचे सामाजिक कार्य महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. या कार्यातून त्यांनी आपल्या हयातीत महाराष्ट्रभर जिल्हा जिल्ह्यात तालुक्यात त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते निर्माण केले आहेत महाराष्ट्रभर उंची असलेल्या या बीड जिल्ह्यातील नेत्याचे भव्य पुतळा जिल्ह्याच्या ठिकाणी असावा असा मानस जिल्ह्यातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी केला आहे यासाठी काल दि. ३१ मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे

लिंबागणेश येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी ; पुतळे हटवल्याच्या निषेधार्थ निदर्शने

Image
बीड तालुक्यातील मौजे.लिंबागणेश येथे मोठ्या उत्साहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली.याचवेळी महाराष्ट्र सदनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या कर्तृत्ववान महिलांचे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त कार्यक्रमात पुतळे हटविण्यात आले या घटनेचा तीव्र निषेध करत अहिल्यादेवी होळकर चौकात निदर्शने करण्यात आली यावेळी डॉ.गणेश ढवळे, राजेभाऊ आप्पा गिरे, रविंद्र निर्मळ, बाळासाहेब मुळे, कृष्णा पितळे, ऋषिकेश तागड, संदिप मुळे,सुदाम मुळे, भालचंद्र गिरे, भगवान मोरे, विक्रांत वाणी,बालु मुळे,शहादेव धलपे , जयदेव गिरे, धनंजय मुळे, अँड.गणेश वाणी आदी सहभागी होते. सविस्तर माहितीस्तव -- दि.२८ मे रोजी महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे हटविण्यात आले.संस्कृती जतन करण्यासाठी हजारो मंदिरांचा जिर्णोद्धार करणा-या सामाजिक न्यायासाठी दिपस्तंभ असणा-या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि देशात

जिल्हा परीषद प्राथमिक शाळा ताकडगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

Image
  सखाराम पोहिकर बीड जिल्हा प्रतिनिधी  :- गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 31 5 2023 रोजी सकाळी 10~00 वाजता या शाळेमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करताना या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वामी मॅडम श्री सानप सर श्री काशीद सर श्री कोळी सर कल्याण स्वामी नारायण मोटे व या शाळेचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री प्रल्हाद शिंदे सर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर संस्कृत विभागाचे प्रमुख श्री प्रल्हाद शिंदे सर यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली

आमदार मा. रोहितदादा पवार यांची जामखेड गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सदिच्छा भेट

Image
... प़तीनिधी --गोरख मोरे   अहमदनगर :- कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघांचे आमदार मा. रोहितदादा पवार यांनी जामखेड गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सदिच्छा भेट दिली. त्यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. त्यावेळी धनवे यांनी कार्यालयीन कामकाजाची व विविध योजनांची माहिती दिली मा. रोहित पवार यांनी जामखेड तालुक्यात चांगले शैक्षणिक कामकाज चालले असून त्याबद्दल समाधान व्यक्त केले.  तसेच त्यांनी शुभेच्छा ही दिल्या. तालुक्यातील शिक्षक केंद्रप्रमुख यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.   त्यावेळी गट विकास अधिकारी प्रकाश पोळ, मार्केट कमिटीचे संचालक सुधीर राळेभात, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ज्योती बेलेकर, शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत, विकास मंडळाचे संचालक मुकुंद सातपुते, सुरेश कुंभार , राजेंद्र त्रिंबके, राम निकम, किसन वराट, सुनील महारुद्र, मल्हारी पारखे, संजय घोडके, संजय वांढरे, बाबासाहेब कुमटकर, प्रताप गांगर्डे सर्व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बांधकाम विभागाच्या विरोधात मनसेचे झिरमाळ्या आंदोलन.

Image
आष्टी /बीड ( प़तीनिधी -गोरख मोरे ) : आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील पूरहानी दुरूस्ती,एफ.डी आर,ए.एम.सी, पशुवैद्यकीय दवाखाना, वांजरा फाटा ते कुसळंब रस्ता कामातील अनियमितता व निकृष्ट कामाबाबत गेलेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा करून ही सदर निकृष्ट कामांची विभागीय गुणनियंत्रण पथकामार्फत तपासणी न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी आज रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 बीड यांच्या कार्यालयावर सर्व निवेदनाच्या झिरमाळ्या लावून आंदोलन केले दिलेल्या निवेदनावर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास यांनी व्यक्त केला या आंदोलनावेळी सहकार सेना जिल्हाध्यक्ष अशोक सुरवसे, तालुकाध्यक्ष सोपान मोरे, तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण गायके, किशोर डोमकावळे आदी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी घेतला.

अमरसिंह पंडित यांनी मुस्लिम समाजाचा सन्मान केला सहाल चाऊस

Image
 गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे मुस्लिम समाजातील एक साधा व सच्चा कार्यकर्ता मुजिब पठाण यांची बाजारसमितीच्या सभापती पदी निवड करुन अमरसिंह पंडित यांनी समानतेची परंपरा पुढे ठेऊन तमाम मुस्लिम समाजाचा सन्मान केला अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष तथा माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सहाल भैय्या चाऊस यांनी दिली. माजी आमदार अमरसिंह पंडित आणि गेवराई बाजार समितीचे नवनियुक्त सभापती मुजिब पठाण यांचा सत्कार करताना ते बोलत होते. गेवराई बाजार समितीच्या सभापती पदी अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजातील कार्यकर्ते मुजिब पठाण यांची तर उपसभापती पदी विकास सानप यांची नियुक्ती करण्यात आली. अमरसिंह पंडित यांनी या निवडीत सोशल इंजिनिअरिंग साधले असून त्या पार्श्वभूमीवर माजलगावे माजी नगराध्यक्ष सहाल भैय्या चाऊस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बीड येथे माजी आमदार अमरसिंह पंडित आणि संभापती मुजिब पठाण यांचा सत्कार केला. या वेळी सहाल चाऊस यांच्यासह, रशीद भाई, सलीम खान, नगरसेवक तालेब भाई मुजमल पटेल, अंगा खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दिव्यांग पूर्व तपासणी शिबीरास अंबाजोगाईत उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
५५३ दिव्यांग व्यक्तींची झाली तपासणी अंबाजोगाई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे   बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या पुढाकारातून जिल्हाभरात सुरु असलेल्या मोफत दिव्यांग पूर्व तपासणी शिबीरास अंबाजोगाईत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आ. नमिता मुंदडा यांच्या नियोजनाखाली राबविण्यात आलेल्या शिबिरात ५५३ दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यापैकी गरजू दिव्यांग व्यक्तींना लवकरच मोफत उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे.  केंद्र सरकारचे सामाजिक न्याय मंत्रालय, दिव्यांग सशक्तीकरण विभाग, बीड जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि खा. प्रीतमताई मुंडे यांच्या पुढाकारातून बीड जिल्ह्यात सर्वत्र दिव्यांग पूर्व तपासणी शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत. केज मतदार संघातील शिबिरांच्या नियोजनाची जबाबदारी आ. नमिता मुंदडा यांच्यावर सोपविण्यात आली होती. केज मधील शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर सोमवारी (दि.२९) अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात तब्बल ५५३ दिव्यांग व्यक्तींची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. तपास

माजलगांव शहरातील पावसाळ्याचा विचार करुन व अतिक्रमणातील मलबामुळे तुंबलेल्या नाल्या तात्काळ साफ करा-शेख रशिद

Image
एमआयएम पक्षातर्फे दिला आंदोलनाचा इशारा माजलगाव -माजलगाव शहरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली तसेच नागरिकांच्या घर,दुकान समोरील वट्टा तोडण्यात आले पण तोडलेल्या वट्टा,मलबा जसा कि तसा पडुन आहे त्यामुळे नाल्या तुंबल्या असुन सांडपाणी रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांची आरोग्य धोक्यात आले आहे तसेच पावसाळ्याचा विचार करुन माजलगाव शहरातील तुंबलेल्या गटारी तात्काळ साफ करा अशी मागणी एमआयएम शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.      माजलगाव शहरातील दलित, मुस्लिम वस्तीमधील भीम नगर, आझाद नगर, गौतम नगर,बिलाल मोहल्ला,ईदगाह,गांधनपुरा,राजगल्ली,बागवान गल्ली, कुरैशी गल्ली,तानाजी नगर, इंदिरा नगर,अशोक नगर, हनुमान चौक,मेन रोड व वेगवेगळ्या प्रभागातील नाल्यांची सफाई नियोजनबद्ध पद्धतीने सर्वेक्षण करुन तात्काळ नाल्या साफ करावे नसता लोकशाही मार्गाने एमआयएम पक्षातर्फे आंदोलन करु असा इशारा एमआयएम शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राज्यातील सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व तयारीचा आज सर्वंकष आढावा घेण्यात आला.

Image
येत्या पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहिम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्व अधिकाऱ्यांनी चोवीस तास फोन सुरु ठेवावेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा-विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय राखावा, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिले. उपस्थित अधिकारी तसेच सर्व विभागीय आयुक्तांकडून मुख्यमंत्र्यांनी आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापनाबाबत सज्जतेचा आढावा घेतला.  मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश : ✅ भूस्खलन झालेल्या भागातील नागरिकांशी संवाद साधा. पुन्हा काही लोक त्या भागात रहिवासासाठी गेले असतील, तर त्यांची माहिती घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. त्यांचे स्थलांतर आणि पुनर्वसनाबाबत आतापासूनच तयारी करा. ✅ स्थलांतरितांसाठी बहुउद्देशीय सभागृहे, शाळा किंवा तत्सम निवारे उपलब्धता याबाबत तयारी करून ठेवावी. याठिकाणी आवश्यक अन्न-धान्य तसेच औषधांचा साठा याबाबत संबंधित विभागांना आतापासूनच काळजी घ्यावी.  ✅ पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावात आतापासूनच

महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी बीड येथील मेळाव्यास उपस्थित राहावे - कार्याध्यक्ष अनिल वाघमारे

Image
बीड /प्रतिनिधी मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा शाखा आणि परळी शाखेच्या वतीने 4 जून 2023 रोजी एम. आय.डी.सी.बीड येथील वैष्णवी मंगल कार्यालयात मराठवाड्यातील पत्रकारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य आणि जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे. याबाबत माहिती देताना कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी सांगितले की मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा शाखा आणि परळी शाखेच्या वतीने 4 जून 2023 रोजी एम.आय.डी.सी.बीड येथील वैष्णवी मंगल कार्यालयात मराठवाड्यातील पत्रकारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर,सामाजिक कार्यकर्ते तथा निर्भय बनो आंदोलनाचे नेते डॉ.विश्वंभर चौधरी,असिम सरोदे आणि मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख हे सर्व मान्यवर उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. सकाळी 9.30 वाजता मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येईल.यावेळी माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान च्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुर

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चिंचाळा येथे भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर

Image
मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घ्यावा गावातील नागरिकांचे आव्हान वडवणी प्रतिनिधी   वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दि.३१ मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे आयोजन केले आहे या जयंतीनिमित्त गावामध्ये विविध शिबिरांचे आयोजन केले आहे यामध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर ,तसेच वंधत्व निवारण शिबीर(पशुसंवर्धन विभाग) हे घेण्यात येणार आहे तसेच याच दिवशी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक चिंचाळा नगरीमधुन निघणार आहे.       याबाबत अधिक माहिती अशी की प्रति वर्ष प्रमाणेच याही वर्षी चिंचाळा येथील गावकऱ्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे आयोजन ३१ मे रोजी केले या जयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यामध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे यामध्ये विविध आजारांची तपासणी करून रोग निधान करत योग्य ते उपचार केले जाणार आहेत तसेच,रक्तदान शिबिर ही घेण्यात येणार आहे यामध्ये गावातील १०१तरुण रक्तदान करणार आहेत, त्याचबरोबर प्रथमच जनावरांचे वंधत्व निवारण शिबिर (पशुसंवर्धन विभाग) होनार आहे यामध्ये

बोगस जप्तीचे टेंडर काढून 100 विनानंबर हायवा चालू करणाऱ्या तहसीलदार खाडे व आर टी ओ यांना सह आरोपी करा - राजेंद्र मोटे

Image
गेवराई (प्रतिनिधी ) दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मॅडम यांच्या अंगावर जप्तीचे टेंडर या गोंडस नावाखाली अवैध वाळू वाहतूक करणारा विनानंबर हायवा जाता जाता राहिला तसेच अंगरक्षक गाडी वरून झाडात धडकवण्याचा प्रयत्न झाला परंतु सुदैवाने मोठी घटना टळली. मात्र या पूर्वी 16 बळी गेले होते 17 आणी 18 वे बळी वाचले नेहमी प्रमाणे 1 दिवस आरडा ओरडा बैठक आणी पुन्हा तेच हे होणार च आहे हे प्रकार का घडत आहे तर वाळू वाल्या लोकांना जस पाहिजे तस वातावरण प्रशासन तयार करत या वेळी सुद्धा गेवराई तहसीलदार खाडे यांनी वाळू नसताना जप्तीचे एकाच जनाला 10 टेंडर करून दिले तसेच जास्त वेळ वाळू उपसा ला मिळावा म्हणून अगोदर 5 ताबा आणी नंतर 5 गाव जाणीवपूर्वक ठेवले आणी त्या जप्ती टेंडर आधारे सर्व हयावा वाल्याकडून मदत मिळवली त्यामुळे जवळ पास 100 विना नंबर हायावा रोडवर सुसाट धावत आहेत त्यांना माहिती त्यांनी सर्वाची भेट घेतली असल्याने काय पण करा प्रशासन सोबत आहे आणी त्यामुळेच काल चा प्रकार झाला तेव्हा वाळू नसताना जप्तीचे टेंडर करून ही गंभीर परिस्तिथी निर्माण करणाऱ्या तहसीलदार व विना नंबर हायावा 2 वर्ष पासून रोड व

बीड जिल्ह्यातील शासकीय/गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करणे कार्यवाही स्थगित करून अतिक्रमण कायम करा-नगरसेवक अँड विकास जोगदंड

Image
बीड (प्रतिनिधी) 30 में महाराष्ट्र सह बीड जिल्ह्यातील अनु.जाती, जमाती,भटके विमुक्त,इतर मागासवर्गीय भूमिहीनांना तसेच बहुजन समाजातील कष्टकरी कामगारांना शासनाने पडक गायरान जमिनी उदरनिर्वाह भागावा याकरीता कसण्यासाठी दिलेल्या असून आजमितीस चार पिढ्या त्या जमिनी कसत आहेत किंबहुना त्याच पडक जमिनीवर असंख्य कुटुंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे तसेच बीड शहरातील व ग्रामपंचायत हद्दीतील अनेक पडक शासकीय गायरान जमिनीवर बेघर कुटुंबीयांनी पक्के घर बांधून आपला प्रपंच अनंत कष्टांचा सामना करत पुढे चालवला आहे अशा भीषण परिस्थितीमध्ये राज्य शासनाने निर्णय घेऊन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 50 अन्वेय बीड जिल्ह्यातील  भूमिहीन,बेघर अतिक्रमण धारकांना नोटीस बजावून अतिक्रमण निष्कासित करणे बाबत सांगितले आहे         सदरील नोटीसमुळे बीड जिल्ह्यातील भूमिहीन,बेघर अतिक्रमणधारक हवालदिल झाला असून आपल्या पोटाला चिमटा काढत मोठ्या आर्थिक विवेचनेतून रमाई घरकुल आवास योजना, प्रधानमंत्री घरकुल आवास योजना अंतर्गत पक्के घर बांधले आहेत अतिक्रमण निष्कासित करण्याच्या कार्यवाहीमुळे बहुजनांचे अनेक कुटुंब भूमिहीन

बार्टी संशोधक विद्यार्थी आंदोलन आणि माध्यमिक मुख्याध्यापिका सौ. आशा नवनाथ रणखांबे

Image
बार्टी संशोधक विद्यार्थी आंदोलन आणि  माध्यमिक मुख्याध्यापिका सौ. आशा नवनाथ रणखांबे ( लेखक - जीवन संघर्षकार नवनाथ रणखांबे ) ----------------------------------------------    सौ. आशा नवनाथ रणखांबे कोठेही स्वतःची प्रसिद्धी न करता सामाजिक , शैक्षणिक , प्रसार माध्यम , पोलीस - ठाणे जिल्हा महिला दक्षता कमीटी इ. वेगवेगळ्या ठिकाणी घर संभाळत फार मोठे सामाजिक कार्य करीत असून महान विभूतीच्या वाटेवर चालत स्वतःला घडवत आहे. उत्कृष्ट सामाजिक काम करणारी माझी जीवनसाथी हिचे जेवढे कौतुक करावे तितके कमीच आहे.           शिक्षणापासून वंचित असणाऱ्या आदिवासी कातकरी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे उत्कृष्ट कार्य करीत आहे. घरादार - परिवाराचा विचार न करता अहमदनगर , नाशिक, पुणे, पालघर - जव्हार, मोखाडा शहापुर आदिवासी कातकरी वाड्यांवरती जाऊन पालकांना कन्व्हेन्स करून शिक्षणाचे महत्त्व पटवून शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शाळेत आणण्याचं काम करत आहे.         52 दिवस आझाद मैदान येथे चाललेल्या बार्टी संशोधक विद्यार्थी क

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जळगांव जिल्हा जामनेर तालुका संघटन बांधणी बैठक संपन्न

Image
जळगांव :-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जळगांव जिल्हा बैठका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय छगनराव भुजबळ यांचे आदेशान्वये राज्य उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब कर्डक, श्री अनिल नाळे, जिल्हाध्यक्ष श्री सतीश महाजन, युवती जिल्हाध्यक्ष अभिलाषा रोकडे , माजी जिल्हा सरचिटणीस उत्तम पवार यांच्या प्रमुख उपस्थित जामनेर येथे संघटन बांधणी बैठक संपन्न झाली. यावेळी जामनेर तालुक्यातील अरुण माळी नरेश महाजन, विनोद माळी ,अंबादास माळी योगेश झालटे, मंगेश माळी, शिवाजी माळी, अरुण महाजन ,दीपक माळी जितेंद्र गोरे, संतोष झाल्टे, आदित्य गायकवाड, दत्तात्रय नेरकर गणेश झाल्टे, पांडुरंग महाजन, देविदास माळी रामचंद्र माळी, संजय माळी आणि जामनेर तालुक्यातील कार्यकर्ते यांच्यासह समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावरकरांच्या कार्यक्रमासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य अतिशय दुर्दैवी- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

Image
नाशिक :- सावरकरांच्या कार्यक्रमासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.  आज नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. ही जयंती साजरी करत असताना महाराष्ट्रात सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविले. याबाबत निषेध व्यक्त करत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सदनात झालेल्या विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती कार्यक्रमाला आमचा विरोध नाही. मात्र या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती हे अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, ज्या सावि

अंबाजोगाईच्या 6000 नोटीस धारकांना मोहम्मद असिफोद्दीन खतीब (बाबा) यांच्या मुळे दिलासा मिळणार!

Image
सहा हजार अतिक्रमित नोटीस धारकांनी घाबरू नये - मोहम्मद असिफुद्दीन खतीब नोटीस धारकांनी घाबरण्याची गरज नाही ही खाजगी मालमत्ता असून माझा पाठपुरावा जेष्ठ विधिज्ञ् ऍड.अण्णाराव पाटील यांच्या मार्फत न्यायालयीन व प्रशासन दरबारी चालू आहे.आम्हाला नक्कीच न्याय भेटेल. जेव्हाही मालमत्ता अधिकृतरित्या आमच्या नावे होईल तेंव्हा या खाजगी मालमत्तेवर अतिक्रमण करणाऱ्या गोर गरीब जनतेची कुटुंब उध्वस्त न करता त्यांची नावे अधिकृत मालकी हक्कात लावणार.-मोहम्मद असिफुद्दीन खतीब (सामाजिक कार्यकर्ते तथा शहराध्यक्ष, काँग्रेस) अंबाजोगाई --: महाराष्ट्रात प्रामुख्याने बीड जिल्ह्यात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण धारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.यात अंबाजोगाई शहरातील तब्बल 6000 अतिक्रमण धारकांना नोटीसा देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.यामुळे भयभीत असलेल्या अंबाजोगाईच्या 6000 नोटीस धारकांना येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद असिफोद्दीन खतीब (बाबा) यांच्या मुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या नोटीस धारकापैकी मौजे.मोरेवाडी ता. अंबाजोगाई येथील सर्वे नं. 614/27, 614/26,

शेतकरी संघटनेच्या वतीने अंभोरा ता.आष्टी येथे शेतकरी आत्महत्या संवेदना सामुहिक श्रध्दांजली सभेचे आयोजन

Image
आष्टी (प़तीनिधी -गोरख मोरे ) : देशाचे प्रधान सेवक नरेंद्र मोदी संसदेत 'सेंगोल' स्थापन करण्यात मश्गुल असताना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एका महिन्यात सुमारे ३४ शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले आहे.त्यानिमित्ताने मौजे अंभोरा ता.आष्टी जि.बीड येथील अंबेश्वर मंदिरात १ जून २०२३ रोजी सकाळी ८:३० वाजता शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी आत्महत्या संवेदना सामुहिक श्रध्दांजली सभा आणि चिंतन बैठकीचे आयोजन केले आहे.बैठकीला शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, युवा आघाडीचे रामेश्वर गाडे, जिल्हाध्यक्ष अजिमोद्दीन शेख, अनुरथ काशीद उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती युवा आघाडी आष्टी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गुंड यांनी दिली.  बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका कांदा आणि दुध उत्पादनात अग्रेसर आहे.अधिक शेती उत्पादन काढून सुध्दा सरकारच्या धोरणाने शेतकऱ्यांना बाजारात हार पत्करावी लागत आहे. शेतीमालावर निर्यातबंदी घातल्याने दुध,भाजीपाला,कांदा,सोयाबीन, कापूस, करडी, हरभरा मातीमोल भावाने विकावा लागल्याने नुकसान झाले. सततच्या नुकसानीमुळे जगण्यात निराशा येणे स्वाभाविक आहे.शेतकरी आत्महत्या राष्ट्रीय समस्या

गेवराई ते मन्यारवाडी،शिंदखेड،जव्हारवाडी ،मादळमोही पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन संपन्न

Image
 गेवराई  प्रतिनिधी सखाराम पोहिकर:- गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी सिंदखेड जव्हारवाडी मादळमोही येथील नागरिकांनी कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्याकडे हा रस्ता दुरुस्तीसाठी सतत मागणी करत होते त्या मागणीचा विचार करून गेवराई तालुक्याचे कार्य सम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांनी आज दिनांक 29 5 2023 रोजी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी एक कोटी 62 लाख रुपये हा डांबरीकरण रस्त्याचा उदघाटनचा भव्य शुभारंभ आज गेवराई विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या शुभहस्ते एक कोटी 62 लाख रुपये या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी लक्ष्मण आण्णा पवार यांनी जाहीर केले व हा रस्ता चांगल्या दर्जाचा करून घेण्यासाठी वरील चारी गावातील नागरिकांनी करून घ्यावा व या रोडचे बोगस काम होताना आपल्या निदर्शनेच आले तर मला फोन करा व मी येईपर्यंत रोडचे काम बंद करणे असे उद्घाटन प्रसंगी नागरिकांना आवाहन केले या उद्घाटन प्रसंगी गेवराई नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुशील भाऊ जवजांळ، गेवराई नगर परिषदेचे नगरसेवक मंजूर भाई बागवान सचिन शेठ दाभाडे नितीन नाना वीर जीवन दाभाडे गोरख मोटे उस्मान भाई शेख

महाराष्ट्रातील सर्वात तरुण ग्रा.पं.सदस्य संतोष भैय्या खंदारे यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य मोफत आरोग्य व शस्रक्रिया शिबिर संपन्न

Image
बीड प्रतिनिधि ,   महाराष्ट्रातील सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य तथा स्वाभिमानी संघर्ष सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष मा.संतोष भैय्या खंदारे यांच्या वाढदिवसा निमित्त सिद्धिविनायक रुग्णालय बीड , साई स्किन हॉस्पीटल बीड यांच्या संयुक्त विद्यमान्य व संतोष भैय्या खंदारे मित्र मंडळाच्या वतीने भव्य मोफत आरोग्य व शस्रक्रिया शिबीराचे आयोजन कारेगव्हाण ता.जि.बीड येथे करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन जय भगवान महासंघाचे अध्यक्ष तथा भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते मा.बाळासाहेबजी सानप साहेब व बीड जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष मा.तानाजी आबा कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या शिबिरास परीसरातील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात 300 ते 350 रुग्णांची तपासणी करण्यात आली गरजु रुग्णांना मेडिसीन वाटप करण्यात आली या शिबिरात प्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ.एकनाथ पवार सर , जनरल सर्जन डॅा.अभिजीत येवले सर,प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.जिवण चव्हाण सर, प्रसिद्घ त्वचारोग,केस विकार व लेझर तज्ञ डॉ.सुषमा खोसे(देवगुडे), डॉ.सुप्रिया राठोड इत्यादी तज्ञ डॉक्टर रुग्ण तपासणीसाठी उपस्थित होते व या

डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये चळवळीतील अनुभवी कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

Image
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये चळवळीतील अनुभवी कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश अजिंक्य चांदणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वडवणीत DPI पक्षाची बैठक संपन्न. आप्पाराव मुजमुले सुभाष साळवे अरुण आव्हाड मनोहर कसबे बाळू आव्हाड महादेव आव्हाड पिंटू आढागळे यांनी केला प्रवेश. वडवणी तालुक्यातील आणखी शेकडो कार्यकर्ते डी पी आय च्या वाटेवर.         वडवणी प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, या व सर्वच महापुरुषांच्या विचाराला अनुसरून सबंध बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व देशात चळवळीच्या माध्यमातून या महापुरुषांची शिदोरी स्वतःच्या खांद्यावर घेऊन समाजाला एक वेगळ्या वळणावर घेऊन जाण्याचे काम ज्यांनी आयुष्यभर केलं असे स्मृतीशेष आत्मारामजी चांदणे, कर्मवीर एकनाथरावजी आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या बीड जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून चळवळीमध्ये काम केलेलं आहे. काम करत असतांना अनेक मोर्चे, आंदोलने, रास्ता रोको किंवा वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करत आलेले

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शाळा महाविद्यालय मध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करा-बबलु भैय्या राऊत

Image
बीड प्रतिनिधी  31मे म्हणजे धनगर समाजातील नाही तर अठरापगड जातीमध्ये या दिवशी आनंद उत्सव असतो . धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदु सामजातील देव देवळांचे रक्षण करून त्यांना हिंदु समाजातील देव देवळांचे बांधकाम केलं. अनेक महादेव शंकराच्या पिंडीचे त्यांनी रक्षण केले. अगदी सामान्य घरात जन्म घेतलेल्या या महिलेने जीवाची कोणतीही पर्वा न करता देव, देश, धर्म रक्षणासाठी रस्त्यावर आली. अशा धाडशी महीलेच काम शाळा महाविद्यालयातील तरुण मुलीपर्यंत पोहचलं तर नक्कीच पुन्हा एकदा आपल्या मराठी मातीत अहिल्याबाई जन्माला येतील तर नवलच नाय. देव, देश, धर्म रक्षणाच काम त्यांच्या हातातून चांगलं होईल.व नव्या पीढीसाठी एक आदर्श निर्माण होईल. असे आवाहन युवा मल्हार सेनेचे युवक जिल्हा अध्यक्ष बबलु भैय्या राऊत यांनी केले आहे,

शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट , नागरीकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी "मोफत बाटलीबंद पाणी वाटप आंदोलन

Image
शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट , नागरीकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी "मोफत बाटलीबंद पाणी वाटप आंदोलन :- डॉ.गणेश ढवळे  बीड शहरातील शासकीय कार्यालयात जिल्हाधिकारी, तहसिल, सामाजिक न्याय भवन, बसस्थानक आदि कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक व्यवस्था अपेक्षित असताना व त्यासाठी फिल्टर व इतर उपकरणांसाठी लाखोंचा खर्च करण्यात आलेला असताना सुद्धा बारामाही लोकांना तहान भागवण्यासाठी विकतचे बाटलीतील पाणी घेऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असुन बीड शहरातील नागरिकांना १५-१७ दिवस पाणी पुरवठा न झाल्याने नागरीकांचे हाल होत असुन ऊन्हाळा कडक असुन तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे सरकला असताना जिल्हा व नगरपरीषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभार व ढिसाळ नियोजनाच्या निषेधार्थ व तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२९ मे सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "मोफत बाटलीबंद पाणी वाटप"आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलनात शेख युनुस, बलभीम उबाळे,शेख मुबीन, शेख मुस्ताक, रामनाथ खोड आदि सहभागी

बीड जिल्ह्यात नोकरी करणं म्हणजे विद्यापिठातुन पदवी प्राप्त करणं

Image
बीड जिल्ह्यात नोकरी करणं म्हणजे विद्यापिठातुन पदवी प्राप्त करणं - साहय्यक पोलीस आयुक्त स्वप्नील राठोड यांचे प्रतिपादन  गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे  :-बीड जिल्ह्यातील राजकीय , सामाजिक परिस्थीती पाहता व ती हातळतांना अधीकारी यांना जो अनूभव येतो तो अनुभव एखाद्या विद्यापिठात पदवीचे शिक्षण घेण्यासारखा असतो मात्र बीड जिल्ह्यात काम करूण जाणं आणि खास करूण गेवराई सारख्या ठिकाणी काम करूण जाणं म्हणजे विद्यापिठातून पदवी प्राप्त करण्यासारख आहे आणि ती पदवी मी मिळवली आहे असे प्रतिपादन गेवराईचे तत्कालिन उपअधीक्षक व औंरगाबाद येथील नुतन साहाय्यक पोलीस आयुक्त यांनी केले आहे .  गेवराईचे उप अधीक्षक स्वप्नील राठोड यांची नुकतीच औंरगाबाद शहर याठिकाणी साहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे त्यांचा आज ( दि 28 रोजी ) निरोप सभारंभ पार पडला यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते .यावेळी व्यासपिठावर गेवराई पोलीस निरीक्षक धनंजय फराटे , माजी राज्यमंत्री बदामराव पंडित , नायब तहसिलदार प्रशांत जाधवर , पत्रकार संघाचे अध्यक्ष मधूकर तौर ,चकलांबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एकशिंगे , यांची उपस्थित

राजदंड बिना सब सूना (व्यंग्य : राजेन्द्र शर्मा)

Image
राजदंड बिना सब सूना  (व्यंग्य : राजेन्द्र शर्मा) विपक्ष वालों‚ ऐसी भी क्या तंग–दिली। संसद की नई बिल्डिंग बनवाने के लिए न सही‚ नई बिल्डिंग का उद्घाटन करने तक का सारा बोझ अकेले ही उठाने के लिए भी न सही‚ पर कम-से-कम नये इंडिया को उसके पचहत्तर साल से खोए राजदंड से दोबारा मिलाने के लिए तो‚ थैंक यू मोदी जी‚ बनता ही है। थैंक यू भी बड्ड़ा वाला। कोरोना के टीके वाले‚ पांच किलो मुफ्त अनाज के फोटोयुक्त थैले वाले‚ थैंक यू से भी बड़्ड़ा वाला थैंक यू। थैंक यू मोदी जी‚ कम से कम लोक सभा वाली संसद को डंडायुक्त कराने के लिए! देखा‚ इस मामले में भी गलती नेहरू जी की ही निकली। राजदंड तक संभाल कर नहीं रख पाए। सुना है कि घर पर रखकर ही भूल गए। इत्ती लापरवाहीॽ अब मोदी जी कुछ बोलेंगे, तो विरोधी बोलेंगे कि नेहरू जी के खिलाफ बोलता है। अरे जब राजदंड संभालने की कुव्वत ही नहीं थी‚ तो उचक कर कुर्सी पर बैठने की क्या जरूरत थी। नहीं बैठते। सरदार पटेल को बैठ जाने देते; फिर देश भी देखता कि राजदंड को संभालना क्या होता है! शुरू से ही राज का दंड चलता रहता, तो राष्ट्र को भी आदत बनी रहती। राज गोरों वाले की जगह भूरों

नई संसद के उद्घाटन का विपक्ष द्वारा बहिष्कार लोकतांत्रिक विरोध का एक रूप है

Image
नई संसद के उद्घाटन का विपक्ष द्वारा बहिष्कार लोकतांत्रिक विरोध का एक रूप है (आलेख : बृंदा करात, अंग्रेजी से अनुवाद : संजय पराते ) सार्वजनिक जीवन में प्रतीकों का बहुत महत्व होता है। प्रतीकों का चुनाव और प्रक्षेपण विचारधारा, संस्कृति, इतिहास, विश्वदृष्टि आदि-इत्यादि को दर्शाता है। 75 साल पहले संविधान सभा के ऐतिहासिक मध्यरात्रि सत्र में, एक औपचारिक समारोह में, स्वतंत्रता सेनानी और संविधान की 15 महिला सदस्यों में से एक हंसा मेहता द्वारा विधानमंडल के अध्यक्ष राजेंद्र प्रसाद को राष्ट्रीय ध्वज सौंपा गया था। तब उन्होंने कहा था, "यह उचित है कि यह पहला झंडा, जो इस प्रतिष्ठित सदन के ऊपर फहरेगा, भारत की महिलाओं की ओर से एक उपहार होना चाहिए ...।" यह तब और तब से लेकर अब तक के सभी वर्षों के लिए, ब्रिटिश शासन से भारत को मुक्त करने के गौरवशाली संघर्ष में भारत की महिलाओं द्वारा निभाई गई भूमिका की मान्यता का प्रतीक था।  लेकिन आज उस ऐतिहासिक घटना पर नजर डालें, तो इसका एक और स्पष्ट महत्व नजर आता है। यह भारत के पहले प्रधान मंत्री जवाहरलाल नेहरू नहीं, बल्कि यह स्वतंत्र भारत की विधानमंडल

केंद्रीय पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी फिरोज शेख यांची निवड

Image
औरंगाबाद प्रतिनिधी /मुश्ताक शाह    केंद्रीय पत्रकार संघ व किया न्युज (kay News)यांच्या सयुक्तविध्यामाने शिर्डी येथे भव्य पत्रकार संमेलन2023चे आयोजन करण्यात आले होते या संमेलनाला प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर, काय न्युज (Kay news)चे संपादक गुप्ता जी,Z24 तास चे मा. वृत्त निवेदक तथा मुख्य भाजपा चे सह प्रवक्ते अजित चव्हाण, गौरव शेट्टी,व्यास जी, आदी उपस्थित होते मागील आनेक वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या हिररीने सोडविणारे व केंद्रीय पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष तथा युद्ध भूमी चे संपादक फिरोज शेख यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर व राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन संपादक फिरोज शेख यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली या वेळी त्यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री राम

उडाणे येथे राजमाता अहिल्यादेवी वाचनालयात जिल्हा ग्रंथालय संघाची कार्यशाळा संपन्न

Image
उडाणे : धुळे जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ वृद्धींगत होण्यासाठी वाचनालय सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहेत. म्हणून जिल्ह्यातील वाचनालयांच्या इमारतींसाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दत्ता परदेशी यांनी उडाणे येथे आयोजीत कार्यशाळेत केली.        उडाणे येथे धुळे जिल्हा ग्रंथालय संघाची कार्यशाळा प्रा. डॉ. दत्ता परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश भदाणे यांनी केले व महाराष्ट्र राज्य कार्यवाह अनिल सोनवणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.        कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह रोहिदास हाके यांनी केले. यावेळी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक स्तरावर उल्लेखनीय कार्य केलेले श्री संतोष बागुल, गोकुळ देवरे, शिवाजी पाटील, गोरख पाटील, योगेश हालोर, बापुजी हाके, सागर हाके यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.       

ज्ञानाई - तुकाई गुरुकुल आष्टी येथे भव्य बालसंस्कार शिबीर उस्ताही व भक्तिमय वातावरणात संपन्न.

Image
 आष्टी(प्रतिनिधी -गोरख मोरे ) : विद्यार्थी,पालक,भक्तमंडळी आणि साधक या सर्वांसाठी   आदरणीय भागवताचार्य ह.भ.प.आदिनाथजी महाराज दानवे गुरुजी यांच्या संकल्पनेने व प्रेरणेने ज्ञानाई-तुकाई गुरुकुल,आष्टी येथे दिनांक १९ मे २०२३ ते २६ मे २०२३ या कालावधीत भव्यदिव्य बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.   यामध्ये दैनिक कार्यक्रम अध्यात्मिक परिपाठ , ओव्या,प्रार्थना पाठांतर,व्याख्यान गीतापाठ (गीता १५ वा अध्याय पाठांतर,) संत परिचय , चर्चासत्र ,पखवाज व संगीत शिक्षण वर्ग,हरिपाठ व हरिकीर्तन आदींचे आयोजन करण्यात आले व सर्व कार्यक्रम नियोजनानुसार पर पडले.शिबिरात सहभाग घेण्यासाठी वयाची अट नव्हती.इ.३री च्या पुढील कोणीही विद्यार्थी तसेच त्यांचे पालक कोणीही सहभागी होऊ शकले.हे शिबीर सर्वांसाठी होते.तसेच शिबिरासाठी कोणतेही शुल्क अथवा फी घेतलेली नाही.या शिबिरामध्ये पंगतीचे नियोजन श्री सतिष दळवी सर,ह.भ.प.सोनाजी महाराज बनकर,ह.भ.प.शिवाजी महाराज कोकणे,ह.भ.प.प्रज्ञाताई दानवे महाराज,श्री नवनाथ डोके,ह.भ.प.शांतीलाल घोलप,संस्कृती विद्यामंदिर श्री तांबे सर,श्री अशोक डोके सर यांनी केले.अशोक डोके सर यांनी

शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय दुसरा साहित्य कलाकृती पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. ४ जून २०२३ ला होणार

Image
 शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल ता येवला जि. नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय दुसरा साहित्य कलाकृती पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. ४ जून २०२३ ला होणार   येवला  तालुका प्रतिनिधी – येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय दुसरा साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळा रविवार दि. ४ जून २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे. पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून साहित्यिक येणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा संजय वाघ यांनी कळविले आहे. येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान यांचे वतीने शहादू शिवाजी वाघ यांच्या स्मृती दिनानिमित राज्यस्तरीय दुसऱ्या साहित्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने प्रतिष्ठानने माहे डिसेंबर २०२२ मध्ये राज्यभरातील साहित्यिकांकडून आपल्या कलाकृती पुरस्कारासाठी मागविल्या होत्या. कथा संग्रह, कविता संग्रह , गझल संग्रह, अभंग, ओवी, पोवाडा, चारोळी, काव्यसंग्रह, कादंबरी अशा विविध प्रकारच्या राज्यभर