Posts

Showing posts from January, 2024

परळी वैजनाथ शहरातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटूंबाचे सर्वेक्षण राहिले असल्यास नगर परिषद कार्यालयाशी संपर्क साधावा-मुख्यधिकारी त्र्यंबक कांबळे

Image
परळी वैजनाथ (प्रतिनिधी ):- राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यास सुरु असून हे सर्वेक्षण ०२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करावयाचे आहे. तरी परळी वैजनाथ शहरातील कुटूंबाचे सर्वेक्षण राहिले असल्यास तात्काळ नगर परिषद कार्यालयाशी संपर्क करा असे आवाहन मुख्यधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी केले आहे.             राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे दि. २३ जानेवारी २०२४ रोजी पासून प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यास सुरु असून हे सर्वेक्षण ०२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करावयाचे आहे. परळी वैजनाथ शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण नगर परिषदेचे मुख्यधिकारी त्र्यंबक कांबळे व उपमुख्याधिकारी संतोष रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली १ समन्वयक, ८ पर्यवेक्षक आणि १२० प्रगणकांमार्फत सदरील सर्वे पूर्ण करण्यात येत आहे. ०२ फेब्रुवारी २०२४ ही सर्वेक्षणाची शेवटची तारीख आहे. शहरातील मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचा सर्वे पूर्ण झालेला असून ज्या कुटुंबांचा सर्वेक्षण नजर चुकीने करायची शिल्लक राहिले असेल त्यांनी दि.०२ फेब्रुवारी पर्यंत समन्वयक

सुजल निर्मल गावांन करीता सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाची गरज. सुधाकर मुंडे.

Image
बीड प्रतिनिधी :-जिल्हा परिषद बीड पाणीपुरवठा स्वच्छता विभाग व मुख्य संसाधन संस्था अश्वमेघ ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास व शैक्षणिक संस्था फत्तेपूर (शिवणगाव) जिल्हा अमरावती त्यांच्या समन्वयाने सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम पाटोदा येथील पंचायत समिती कार्यालय येथे श्री सुधाकर मुंडे प्रकल्प संचालक पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद बीड तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कवी अशोक मसलेकर लिखित सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनावर आधारित प्रतिज्ञा देऊन कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना सुधाकर जी मुंडे म्हणाले की, गाव पातळीवर पर्यावरण व सर्वोत्तम आरोग्यासाठी व्यक्तिगत व सार्वजनिक सांडपाणी व दररोज निर्माण होणारा ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण करून ग्रामपंचायत च्या माध्यमातून व बचत गटाच्या सहकार्याने तंत्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करून खत निर्मिती व बायोगॅस सारख्या प्रकल्पातून घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.  घराघरातील सांडपाण्याचे शोष खड्डा,

बॅनर मुक्तीची कारवाई "इव्हेंट" ठरू नये; पुन्हा बॅनर लागल्यास फौजदारी कारवाई व्हावी:- डॉ.गणेश ढवळे

Image
बीड:- आज बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पोलिस प्रशासन आणि नगरपालिका संयुक्त विद्यमाने बॅनरमुक्ती साठी उचलण्यात आलेले पाऊस स्वागतार्ह आहे.मात्र नेहमीप्रमाणे बॅनर हटवण्याची कारवाई "इव्हेंट" ठरू नये . भविष्यात पुन्हा अनाधिकृत बॅनर अथवा होर्डिंग लावण्यात आल्यास संबंधितांवर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करता येतो ही जबाबदारी नगरपालिकेची आहे.मात्र गेल्या वर्षभरात पालिका प्रशासनाने एकही फौजदारी स्वरूपाची कारवाई केल्याची नोंद आढळून आली नाही.केवळ कागदी घोडे नाचवुन पथकाची नियुक्ती करण्यात येते आणि दोन चार ठिकाणचे बॅनर काढून बॅनर काढून कारवाई केल्याचे भासले जाते.प्रत्यक्षात कारवाई होतच नाही. राजकीय पुढाऱ्यांच्या सभा,ईतर कार्यक्रम आणि वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा यामुळे शहरात बॅनर ची गर्दी होते. यासाठी कुठलीही परवानगी घेतली जात नाही .असे असतानाही पालिकेकडुन कारवाई तर दूरच बॅनर हटवण्याची तसदीही घेतली जात नाही . बॅनर लावणाऱ्यां कडून नियम धाब्यावर बसवले जातात .नगरपालिकेचा महसूल बुडत असतानाही याकडे नगरपालिका प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करते .सुंदर शहराचे

स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपट आता अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

Image
आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. ऋतुराज धलगाडे दिग्दर्शित ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटाने आयुष्यात एकटेपणा जाणवणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण शोधण्यासाठी प्रेरित करण्याचा सुंदर संदेश दिला आहे. ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपट १ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याचे दु:ख लोक उराशी बाळगून असतात, कुटुंबापासून दूर राहणाऱ्या लोकांना एकटेपणा जाणवतो. अशा लोकांच्या आयुष्यातील संवादाचा दुरावा भरून काढण्यासाठी मानस, नैना, मारुती आणि श्रीरंग काका हे चार लोक ‘ॲंटी लोनलीनेस प्रोग्राम’ सुरू करतात, लोकांच्या जीवनातील एकटेपणाची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतात. पण प्रोग्राम यशस्वी ठरेल की नाही हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. “एकटेपणा हा केवळ शब्द नसून ती एक भावना आहे, जी ठराविक काळाने कोणालाही जाणवू शकते. परंतु त्याचा परिणाम न होता आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे ही गरज आहे. हा विलक्षण संदेश देणारा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटे

‘लोकशाही’ चित्रपटाचा शानदार ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा दणक्यात पार पडला

Image
लोकशाही चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. हीच उत्सुकता पुढे ताणत ३० जानेवारी २०२४ रोजी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा दणक्यात पार पडला आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या जबरदस्त ट्रेलर आणि चित्रपटातील गाण्यांने रसिकांचं मन जिंकून घेतलं असून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.  घराणेशाहीत जगणाऱ्या प्रस्थापितांचा कोणत्याही थराला जाऊन सत्ता मिळवण्याचा हव्यास ट्रेलरमधून दिसत आहे. या सत्तासंघर्षात कोणाचातरी जीव जाणार आहे, पण कोणाचा जीव कोण घेणार या रहस्याचं कोडं चित्रपटात उलगडणार आहे. मनाला प्रश्नांच्या घेऱ्यात अडकवणारं कथानक, गंभीर आणि खोल संवाद, दर्जेदार कलाकारांची जुगलबंदी, मंत्रमुग्ध करणारी गाणी आणि अंगावर शहारे आणणारं पार्श्वसंगीत या समीकरणामुळे लोकशाही चित्रपटाची चर्चा महाराष्ट्रात सर्वत्र होताना दिसत आहे.   चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा चित्रपटाचे निर्माते सुशीलकुमार अग्रवाल, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, तेजश्री प्रधान, अमितरियान आणि सर्व कलाकार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दणक्यात पार पडला

सार्वजनिक शिवजयंती उत्सव लिंबागणेश अध्यक्षपदी महावीर वाणी

Image
बीड प्रतिनिधी :- दि.३१ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय लिंबागणेश येथे सरपंच बालासाहेब जाधव उपसरपंच बाळकृष्ण थोरात, माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ आप्पा गिरे,सेवा सोसायटी चेअरमन रविबापु निर्मळ, दामुकाका थोरात,अक्षय वाणी, संतोष भोसले, रामदास मुळे, डॉ.गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी प्रमाणे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली.नवनिर्वाचित समितीमध्ये अध्यक्षपदी महावीर वाणी, उपाध्यक्ष औदुंबर नाईकवाडे, तुकाराम गायकवाड, सचिव विक्रांत वाणी, दिनेश जाधव, सहसचिव अशोक जाधव, कोषाध्यक्ष संतोष वाणी, सल्लागार अभिजित गायकवाड, सुरेश निर्मळ, दादासाहेब गायकवाड तर सदस्यपदी अमोल गिरे, राजेंद्र थोरात,विवेक बागल,संदिप आवसरे, तुळशीराम पवार,करण वायभट, गहिनीनाथ वाणी, जितेंद्र निर्मळ, सुखदेव वाणी,अख्तर सय्यद, नितीन जाधव,विक्की जाधव,अक्षय ढवळे, हरिओम क्षीरसागर आदिंची निवड करण्यात आली. प्रास्ताविकात डॉ.गणेश ढवळे यांनी मागील संपूर्ण वर्षभरात शिवजयंती उत्सव समितीकडुन झालेल्या कार्यक्रमांची संक्षिप्त स्वरूपात माहिती देत शिवजयंती उत्सवाची रूपरेषा आणि उत्सवाला अभिप्रेत असणा-या बा

भारतीय राज्यघटनेने कंत्राटी कामगारांना दिलेले अधिकार सनदी अधिकाऱ्यांकडून संपविण्याचा कट : - कामगार नेते श्री आगळे

Image
परळी (प्रतिनिधी ) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेत कंत्राटी कामगारांना विविध कायद्याद्वारे त्यांचे मूलभूत अधिकार व हक्क बहाल केलेले आहेत. ते संपविण्याचा कुटील डाव सध्या सुरू असून याला हाणून पाडण्यासाठी कंत्राटी कामगारांनी एकत्र यावे असे आवाहन कामगार नेते श्री भाई गौतम आगळे सर यांनी केले आहे.      याबाबत सविस्तर वृत्त असे की कंत्राटी कामगारांना विविध कामगार कायदे व सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून मागील ७ वर्षापासून रोजंदारी मजदूर सेनेच्या वतीने विविध आंदोलन करण्यात आले त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी बीड यांनी त्यांच्या दालनात बैठकीचा फार्स करून वेळ काढून पणा केला आहे. भारतीय राज्यघटनेचे स्वर्नमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे, तरी सुद्धा कंत्राटी कामगारांना किमान वेतनासाठी लढा द्यावा लागत आहे. ही फार मोठी शोकांतिका म्हणावी असे मला वाटते. त्या अनुषंगाने गुरुवार दिनांक ०१फेब्रुवारी २०२४ रोजी नवी मुंबई येथील आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचलनालय, सीबीडी बेलापूर कार्यालयासमोर दुपारी एक वाजता कंत्राटी कामगारांचे अधिकार वाचविण्यासाठी घेराव घालून तीव्र

गेवराई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांची गढी ग्रामपंचायतला सदिच्छा भेट

Image
 .  गेवराई पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी कांबळे मॅडम यांनी गढी ग्रामपंचायतला सदिच्छा भेट दिली यावेळी सरपंच घोंगडे विष्णूपंत यांनी त्यांचा आदर सत्कार केला. यावेळी कांबळे मॅडम यांनी सरपंच घोंगडे विष्णूपंत यांच्याकडून गावातील विकास कामांचा आढावा घेतला व पुढे कोणत्या कोणती कामे व कशा पद्धतीने करायची या कामांबाबत चर्चा केली. तसेच गढी गांवची पाण्याची समस्या गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करून घोंगडे विष्णूपंत यांनी गावात पाणी सुरू करून घेतले व सध्या गावातील पाण्याची समस्या सोडवली यांबाबत कौतुक करून शाल श्रीफळ देऊन अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व सांगितले की चांगले काम करा कोणत्याही प्रकारची समस्या असेल कोणतेही काम असेल तर ते कधीही घेऊन या मी ती सोडवण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. यावेळी मा इंजि जोगदंड साहेब मा गायकवाड साहेब गढीचे उपसरपंच राजु पठाण सदस्य अमोल ससाणे, सिरसट श्रीचंद,गहीनीनाथ उगलमुगले, ग्रामपंचायत कर्मचारी नारायण जाधव, मोहसीन पठाण, अण्णा ससाणे, सखाराम पोहेकर उपस्थित होते.

नोकभरती परीक्षेत झालेल्या "पेपरफुटी प्रकरणी मा. न्यायालयाच्या निगराणीखाली "विशेष चौकशी समिती"ची स्थापना करावी:- आम आदमी पार्टी

Image
आज राज्यात जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याचे जवळपास रोजचे झाले आहे. पेपर फुटी प्रकरणात आम आदमी पार्टीने आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांनी आंदोलन केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कुठलेही ठोस आश्वासन आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिले नाही, यामुळे आम आदमी पार्टीने राज्यभर "आक्रोश मोर्चा" काढून सरकारचे लक्ष वेधले आहे. अजित फाटके पाटील, कार्यकारी अध्यक्ष, आप, महाराष्ट्र  हमखास सरकारी नोकरी मिळत असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या तरुणांनी आज कोणाकडे न्यायाची अपेक्षा करायची असा प्रश्न आम्ही सरकारला विचारत आहोत. जर हे पेपर फुटीचे प्रकरण यापुढेही चालू राहिले तर आम आदमी पार्टी उग्र आंदोलन करेल असा इशारा आम्ही सरकारला देतो आहे. देवेंद्र फडवणीस हे गृहमंत्री असताना सुद्धा या महत्वाच्या पेपर फुटी प्रकरणावर कुठल्याही प्रकाराची कठोर कारवाई अजून तरी फडवणीस यांनी केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे असा स्पष्ट आरोप आम आदमी पार्टीचा आहे. यासंबंधीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना देण्यात आले. आम आदमी पार्टीने सरकारकडे पुढील

शासकीय नोकर भरती प्रक्रिया घोटाळा, पेपर फुटी नोकऱ्या विकणे आपचे जिल्हा अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

Image
  बीड प्रतिनिधी आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने वतीने जिल्हा अधिकाऱ्यामार्फत निवेदन दिले की महाराष्ट्रामध्ये शासकीय नोकर भरती प्रक्रिया घोटाळा पेपर फुटी नोकऱ्या विकणे यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात झालेले असून यावरती महाराष्ट्रामध्ये कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही गोरगरीब विद्यार्थी खाजगी क्लासेस लावून वर्ष नव वर्ष अभ्यास करतात त्यासाठी लाखो रुपये खर्च करून रातन दिवस अभ्यास करतात परंतु या विद्यार्थ्यांना त्या नोकऱ्यांचा लाभ न मिळता तो दलालांच्या मार्फत व महाराष्ट्र शासनाने प्रायव्हेट कंपन्यांना परीक्षा घेण्याचा व भरती करण्याचा जो टेंडरचा सपाटा चालू केला आहे यामुळे योग्य त्या विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्या होत आहे याकडे कसल्याही प्रकारे महाराष्ट्र शासन लक्ष देत नाही यामुळे आम आदमी पार्टी निवेदनाद्वारे आपणास कळवत आहे की याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व यामध्ये सामान्य विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय थांबवावा अन्यथा आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून याच्या विरोधामध्ये मोठे जन आंदोलन उभा करेल असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे ज

आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत संजय गांधी,श्रावण बाळ,आभाकार्ड, आयुषमान,विश्वकर्मा योजना,दिव्याग कर्ज योजना,कुणबी जातीचे मोफत प्रमाणपत्र संचिका करण्याचे आयोजन - महेंद्र(तात्या) गर्जे

Image
पाटोदा (गणेश शेवाळे) बीड उस्मानाबाद लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे तथा महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे दबंग आमदार सुरेश (आण्णा) धस यांच्या वाढदिवसा निम्मित पाटोदा तालुक्यातील संजय गांधी, श्रावण बाळ,दिव्यांग लाभार्थिचे पगारीसाठी मोफत संचिका तसेच पंतप्रधान विश्वकर्मा योजना, आयुषमान,आभा कार्ड(p.m kisan) पिएम किसान ई-  श्रम कार्ड,दिव्यांग बांधवांच्या इतर योजना,करण्याचे आयोजन सुरेश आण्णा धस यांचे कट्टर समर्थक माजी सभापती महेंद्र(तात्या)गर्जे यांनी केले आहे. यासाठी लागणारे कागदपत्रे मतदान कार्ड,आधार कार्ड, बँकपासबुक,पतीचे मृत्यू प्रमाणपत्र इत्यादी वरील सर्व कागदपत्र घेऊन बाळासाहेब बन यांचे श्रेयश बन डिजिटल झेराँक्स येथे संपर्क साधावा असे आवाहन बाळासाहेब बन यांनी केले आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड दुरुस्ती व कलर कामात गैरव्यवहार व बोगस कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी-प्रमोद शिंदे, अनिल निसर्गंध

Image
बीड प्रतिनिधी :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भावनांची संकुलची दुरुस्ती व नव्हते करण्याचे काम चालू आहे सदर काम 119 दशांश 87 लक्ष रुपयाचे आहे सदर कामाचे अंदाजपत्रकामध्ये दिल्याप्रमाणे काम न होता निकृष्ट झाल्याचे व बोगस काम अधिकारी व कर्मचारी व संबंधित काम करणाऱ्या एजन्सी यांच्या संगनमताने होत आहे सदर कामात मोठ्या प्रमाणात गैर व्यवहार होत असून या कामाची पाहणी करून तात्काळ थांबवण्यात यावे व  1) सदर कामाची दक्षता व गुन्हा नियंत्रण मंडळ छत्रपती संभाजी नगर यांच्याकडून गुणवत्ता तपासणी करण्यात यावी. समाज कल्याण विभागाचे दरवाजे व खिडक्या खराब झाले नाही त्यामुळे खिडक्या दरवाजे काढणे व बसवने योग्य नाही. 2) फरशी खराब नाही काय नाही सुस्थिती आहे तसेच सर्व कामे आहेत फक्त गुत्तेदाराला पोहोचण्यासाठी सदरील कामे काढले आहेत यामध्ये इंजिनियर भागवत अभियंता बोराडे यांनी अर्थपूर्ण व्यवहार करत डोळे झाकणा केला आहे. तसेच विविध प्रक्रिया नियमबाह्य राबविली आहे. करिता सखोल चौकशी करून माननीय जिल्हाधिकारी यांनी सहाय्यक आयुक्त बीड सदर कामाची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी दक्षता व गुण नियंत्रण मंडळ आ

महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षकांनी कार्य करावे - प्रो.डॉ.प्रल्हाद लुलेकर

Image
आंबेडकरवादी मिशन नांदेडला दोन लाख रुपयांचा धनादेश ; क्रांतीबा जोतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात साजरा  बीड(प्रतिनिधी ):- महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतीय समाजात मोठे सामाजिक परिवर्तन घडविले.शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षकांनी आपले अध्यापनाचे कार्य करावे,असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत प्रो.डॉ.प्रल्हाद लुलेकर यांनी केले. बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दि २८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता बीड जिल्हा मुप्टा संघटना आयोजित क्रांतीबा जोतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुप्टा बीड जिल्हाध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे, मुप्टाचे संस्थापक सचिव प्रा.सुनिल मगरे यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण उपसंचालक छ.संभाजीनगर सुधाकर बनाटे, बीड जिल्हा परिषदचे उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे, सिल्लोड शिक्षण संस्थाचे अध्यक्ष जनार्धन मस्के, मुप्टा विभागीय अध्यक्ष प्रा.डॉ.संभाजी वाघमारे, मुप्टा

गेवराईत होणाऱ्या ग्रा पं. कर्मचारी महासंघाच्या आमरण उपोषणास उपस्थित राहा क्रॉ सखाराम पोहिकर

Image
 गेवराई (प्रतिनिधी )गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण गेवराई येथील पंचायत समिती कार्यालय समोर दिनांक 5 / 2/ 2024 रोजी सकाळी11-00 वाजता आयोजित करण्यात आले आहे या आमरण उपोषण महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष काँ सखाराम पोहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमरण उपोषण होणार असून या उपोषणामध्ये खालील मागण्या घेऊन हे उपोषण होणार आहे मागण्या खालील प्रमाणे . 1) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत मासिक वेतन त्वरित द्या 2) राहणीमान भत्ता सहित मासिक वेतन द्या आणि आज पर्यंत चा थकित राहणीमान भत्ता त्वरित आजा करा 3) भविष्य निर्वाह निधीची वेतनातून कपात केलेली 8.33% रक्कम अधिक शासन हिस्सा 8.33% रकमेच्या हिशोबाचा तपशील द्या पावत्या द्या आणि पासबुकच्या नोंदी अध्याय करा 4)पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट द्या 5) आकृतीबंध बाहेरील कर्मचाऱ्यांना सुद्धा शासन निर्णयाप्रमाणे किमान वेतन द्या 6) सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणवेश द्या 7) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गटबाजीतून सूडबुद्धीने वागणूक देऊ नका वरील सर्व मागण्याच्या संदर्भात आम्ही दिनांक

एन.सी.सी. कॅडेट्सना आजपासून रोख रक्कम देणे सुरू - एस.एम.युसूफ़

Image
एन.सी.सी. कॅडेट्सना आजपासून रोख रक्कम देणे सुरू - एस.एम.युसूफ़ विद्यार्थ्यांची अडवणूक व पिळवणूक थांबली बीड (प्रतिनिधी ) - एन.सी.सी. विद्यार्थी कॅडेट्सना एन.सी.सी. कडून भत्ता रूपात देण्यात येणारी रक्कम चेकच्या माध्यमातून देण्यात येत असल्याने गेल्या वेळी एन.सी.सी. कॅडेट्सचे प्रत्येकी ३४९ रुपये बुडाले होते तर यावेळीही ११३० रूपये बुडण्याच्या मार्गावर होते. ही वस्तुस्थिती कळताच मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी प्रसिद्धी माध्यमातून बातमी रूपात हा विषय मांडला. या बातमीची दखल अवघ्या एकाच दिवसात घेण्यात आली. आज दिनांक ३० जानेवारी २०२४ पासून एन.सी.सी. कॅडेट्सना यावेळेसची रक्कम रोख वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची अडवणूक व पिळवणूक थांबली आहे. "एन.सी.सी.चे विद्यार्थी कॅडेट्स मिळालेल्या चेकने बेजार, गेल्या वेळी चेकची रक्कम बुडाली;यावेळीही बुडण्याच्या मार्गावर" या शीर्षकाने बातमी प्रकाशित केली होती. याची दखल घेऊन शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांना दिलेले चेक परत घेऊन रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून रोख रक्कम वाटपास सुरुवात केली आहे. यामुळ

मुगगावात रंगणार भव्य कुस्त्याची दंगल आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त भाऊसाहेब भवर यांचा स्तुत्य उपक्रम

Image
पाटोदा (गणेश शेवाळे )भारत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांनी खेळाकडे वळावे असे आवाहन केल्यानंतर आमदार सुरेश आण्णा धस यांचे हानुमान म्हणून अंमळनेर पंचक्रोशीत ओळख असणारे भाऊसाहेब भवर यांनी बीड उस्मानाबाद लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे तथा महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे दबंग आमदार सुरेश (आण्णा) धस यांच्या वाढदिवसा निम्मित भव्य नमो चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन 2 फेब्रुवारी रोजी मुगगाव येते करण्यात आले आहे या भव्य नमो चषक कुस्त्यांच्या स्पर्धेचे आयोजन नमो चषक समितीचे प्रमुख आमदार सुरेश आण्णा धस यांचे कट्टर समर्थक भाऊसाहेब भवर यांनी केले असून लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसा निमित्त आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील कुस्ती प्रेमीने व आमदार सुरेश धस समर्थक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अंमळनेर जिल्हा परिषद गटातील आमदार सुरेश आण्णा धस कट्टर समर्थक भाऊसाहेब भवर यांनी केले आहे

फडणवीस यांच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही म्हणण्यावरून मराठ्यांना आरक्षण भेटलं का नाही हा संशय-डॉ जितीन वंजारे

Image
बीड प्रतिनिधी /-दस्तर खुद्द महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणाला जोपर्यंत सत्तेमध्ये आहे तोपर्यंत कसलाही धक्का लावणार नाही. ओबीसी बांधवांवर कसल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होऊ देणार नाही, ओबीसी आरक्षणामध्ये इतर कोणालाही घुसू देणार नाही अशी उद्घोषणा करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून मराठा समाजाला आरक्षण दिले की नाही हा संशय निर्माण होत आहे.सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांनी महिनाभर काहीही न खाता पिता केलेलं उपोषण, मराठा बांधवांप्रति असलेल त्यांचं प्रेम,श्रद्धा आणि तीन कोटी मराठा बांधव घेऊन मुंबईकडे कूच करणारे सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश की अपयश हा कळीचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आणि मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी पहाटे तीन वाजता ची बैठक घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळाले अशी उद्घोषणा करून मनोज जरांगे पाटील यांची पहिली सरकारसोबत ची बोलणी आऊट ऑफ कॅमेरा झालेली असून नेमकं त्याच्यातून फलित बाहेर काय पडलं हे मह

डॉ योगेश क्षीरसागर यांची खंबीर साथ ; नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी साधला संपूर्ण प्रभागाचा विकास

Image
दोन दशकानंतर अंनत अडचणीवर मात करत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह,चौक ते मातोश्री मंगल कार्यालय पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण दर्जेदार, प्रशस्त रस्त्यासाठी अतिक्रमण धारक  व राजकीय विरोधकांनी केले प्राणघातक हल्ले तसबूर देखील डागमगले नाहीत विकास जोगदंड बीड (प्रतिनिधी ) 28 जानेवारी  विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून सर्वश्रेष्ठ लोकशाही देत अमूल्य असा मतदानाचा अधिकार प्रत्येक भारतीयास बहाल केला म्हणूनचं विश्वाने आपल्या देशाची लोकशाही मानवी श्रेष्ठत्वाचे प्रतीक मानले आहे.गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत   लोकप्रितनिधी निवडून देणाऱ्या मतदार राजाच्या सेर्वार्थ लोकप्रतिनिधींनी आपले कर्तव्य येथोचित्त पार पाडणे हे लोकप्रतिनीधीचे आद्य कर्तव्य आहे.याच कर्तव्याची जाणीव ठेवत प्रत्येक सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,नगराध्यक्ष,नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य,आमदार खासदार,आदी लोकप्रतिनिधीनीं आपले स्तरावरून प्रामाणिक पणे कार्य करत असतात अशाच एका कर्तव्यकठोर नगरसेवकां मूळे गेल्या दोन दशकाची रस्त्याची दैना फिटली आहे तत्कालीन नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, राष्

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर उमापुरात जल्लोष

Image
मुस्लिम बांधवांकडून पाणी वाटप करत आनंदोत्सव साजरा केला. उमापुर प्रतिनिधी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात शासनाने अध्यादेश जारी केल्यानंतर रविवार सकाळपासून मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला.उमापूर फाटा येथील एकत्रीत येत शंभुराजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत छत्रपती शिवाजी महाराज की जय ,मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो ,आणि विजयासंबंधी घोषणा देण्यात आल्या.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनात सहभागी असलेल्या १२३ गावांमध्ये उमापुर गावाचा देखील सहभाग होता.तर जरांगे पाटलांच्या आरक्षणासाठीच्या मुंबई पदयात्रेत उमापुरमधील मराठा कार्यकर्ते ही मुंबईत दाखल झाले होते.शनिवारी पहाटे मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश जाहीर झाल्याचे कळाल्यानंतर उमापुर मध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुस्लिम समाजाकडून पाणी वाटप मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी अध्यादेश काढल्यानंतर मराठा समाजाच्या बरोबरीने उमापूर मधील मुस्लिम समाजाने देखील जल्लोष साजरा करत मा.ग्रामपंचायत सदस्य मूबारक भैय्या शेख यांनी उमापूर गा

पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत शेतकऱ्यांना औषधाचे वाटप

Image
बीड (प्रतिनिधी ) बीड तालुक्यातील मानकुरवाडी येथे पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत कामधेनु दत्तक योजना ढेकनमोहांतर्गत मानकुरवाडी या गावांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. शिंदे साहेब, प्रा. गणोरकर साहेब, जाधव साहेब यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मिनरल मिक्स्चर व जंतनाशक औषध, गोचीड निर्मूलन औषधांचे पूर्ण गावात वाटप करण्यात आले. यांच्यासह काळेगाव हवेली या ठिकाणी ही औषधांचे वाटप करण्यात आले. डॉ. शिंदे साहेब, प्रा. गणोरकर साहेब, जाधव साहेब, सरपंच माऊली जोगदंड, माजी सरपंच ज्ञानेश्वर जाधव, ग्रामसेवक तांदळे साहेब, संपादक विनोद शिंदे ग्रामसेवक गंनगे साहेब, परिचार ए. एन. राऊत, संभाजी गोडसे, निखिल शिंदे, प्रशांत निसर्गध, अनिल जाधव, यांच्यासह गावातील शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंना , आँन ड्युटी मदत करणार्या सुमंत भांगेचा सुनिल सुरवसेंनी केला सत्कार

Image
  मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी सारख्या छोटयाशा खेडयातील मनोज जरांगे नावाचे योध्दा लढतांना उभ्या महाराष्ट्राने नव्हे तर अखंड हिंदुस्तानाने बघितले. शरीरातला शेवटचा रक्ताचा थेंब संपेपर्यंत मि आरक्षणाचा हा लढा लढणारच, परंतु माघार घेनार नाही अशी भिष्म प्रतिज्ञा मराठा आरक्षणाचे प्रमुख चेहरा असणार्या मनोज जरांगे यांनी केली आणी अखेर मनोज जरांगेसह मराठा बांधवांना महाराष्ट्राची राजधानी मुंबईत यश आलेच. परंतु या यशाच्या मागे हजारोअद्रुश्य हात असे आहेत कि त्यांनी या लढयाच्या यशासाठी ईमाने इतबारे काम करुन या लढयाला खरे यश मिळवुन दिले .त्यातीलच एक आहेत आपल्याच बीड जिल्हयातील केज तालुक्यातील सारणी या गावचे सुपुत्र सुमंत भांगे साहेब, सुमंत भांगे बीड जिल्हयाचे सुपुत्र तर आहेतच परंतु महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव देखील आहेत. सुमंत भांगे हे चोवीस तास आँन ड्युटी असणारे अधिकारी असुन सुध्दा मराठा समाजा बद्दलची आस्था आणी आरक्षणाच्या लढयामागची मराठा बांधवाची तळमळ पाहुन मनोज जरांगेना कायम चोवीस तास मदत करणारे अधिकारी म्हणुन सुमंत भांगे यांचे नाव शेकडो भाषणातून दस्तुरखुद्द मनोज जरा

एपीआय अनमोल केदार पाटोद्याचे नवनिर्वाचीत ठाणेदार

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) पाटोदा पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळ यांची अंमळनेर येथे बदली झाली आसुन त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या कडे पाटोदा पोलीस ठाण्याचा कारभार सोपविण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार हे आपल्या धडाकेबाज कामांच्या माध्यमातून जिते जातील तिथे आपला दबदबा निर्माण करतात सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार यांचा शांत संयमी वेळे प्रसंगी कठोर भुमिका घेत असल्यामुळे अनमोल केदार यांना गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून आपली ओळख निर्माण केली असल्यामुळे त्यांच्यासमोर पाटोदा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीवर वचक,चोरींच्या घटना,अवैध धंदे रोखण्याचे कडवे आव्हान नवनिर्वाचीत पाटोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या समोर असणार आहे.

जय जवान जय किसान सरकार येणार -माजी सैनिक नारायण आंकुशे

Image
पाटोदा (प्रतिनिधी )भारत हा कृषीप्रधान देश आहे, जवळपास 65 टक्के प्रतिसाद पापुलेशन हे शेतीवर अवलंबून आहे शेतकरी हा देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कना असून सुद्धा त्यांच्यावर लक्ष दिले नाही आज देशाची GDP 17 टक्के शेतीवर अवलंबून असून सुद्धा शेतकऱ्यावर पुरेपूर लक्ष दिले जात नाहीये. उद्योजकाला मागच्या दहा वर्षात १५ लाख कोटीचा अनुदान दिल्या आणि शेतकऱ्याला अडीच लाख कोटीचा अनुदान दिले हे खूप मोठे तफावत ह्या भारत देशामध्ये पाहायला भेटली आहे, आज आपल्या देशामध्ये 80 करोड हा किसान परिवार असून आजपर्यंतच्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्याला नजर अंदाज केलेल्या आहे आजच्या दृष्टीने शेतकरी शेतात मरत आहे सैनिक बॉर्डरवर मरत आहे आणि सर्वसामान्य महिला मिळून मरत आहे तरी सरकारला त्याचे काही घेणेदेणे नाहीये, कितीतरी वर्षापासून शेतकऱ्यांची एमएसपी ची मागणी होती सैनिकांची ओवा रोपे ची मागणी होती सर्वसामान्यांची न्यायाची मागणी होती विद्यार्थ्यांचे रोजगाराची मागणी होती पण सरकार पूर्णपणे या सर्व मागण्याला फेल होऊन जाते धर्माच्या मध्ये गुंतलेले कुठून कुठे दिसत आहे त्यामुळे 76 वर्षानंतर सर्वसामान्यांना न्या

जि. प. प्राथमीक शाळा कानळद येथे प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

Image
कूष्णा जाधव तालुका प्रतिनिधी निफाड  आज शुक्रवार दिनांक 26 /01/2024 रोजी सकाळी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर ग्रामपालिकेचे ध्वजारोहण सरपंच शांताराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.ग्रामपालिकेचे ध्वजारोहणानंतर जि. प.शाळेच्या प्रांगणात धवजारोहनासाठी सर्व उपस्थित झाले.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत जाधव यांनी ध्वजारोहणाबद्दल सूचना मांडली व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रवीण पगारे यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सुनील जाधव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . ध्वजारोहणानंतर अंगणवाडीचे विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन, बालगीत, भावगीत, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,अंधश्रद्धा निर्मूलन यावर आधरित नृत्य सादर केले. त्याचबरोबर छोटा उद्योग व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर विनोदी नाटिका सादर करण्यात आल्या या नाटीकांनी उपस्थितांना खळखळून हसवले .शाळेचे मुख्याध्यापक दिपक मोरे

एन.सी.सी.चे विद्यार्थी कॅडेट्स मिळालेल्या चेकने बेजार

Image
  गेल्या वेळी चेकची रक्कम बुडाली;यावेळीही बुडण्याच्या मार्गावर (बीड प्रतिनिधी ) - शहरातील एनसीसी असलेल्या माध्यमिक शाळेतील इयत्ता आठवी व नववी चे विद्यार्थी ज्यांनी एनसीसी मध्ये भाग घेतला होता. त्या कॅडेट्सना सन २०२१-२२ मध्ये आठवीत असताना तर सन २०२२-२३ मध्ये नववीत असताना सहभाग भत्ता म्हणून एनसीसी कडून आलेल्या रकमचे शाळांकडून चेक देण्यात आले. मात्र यातील अनेक विद्यार्थ्यांची रक्कम गेल्या वर्षी बुडाली असून यावेळीही बुडण्याच्या मार्गावर आहे. तरी संबंधित शाळा व्यवस्थापन व एन.सी.सी. चे संबंधित अधिकारी किंवा व्यवस्थापकांनी याकडे लक्ष देऊन एनसीसीच्या कॅडेट्स विद्यार्थ्यांची गेल्या वर्षा सहित यावेळचीही रक्कम अदा करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे. याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, काही वर्षांपूर्वी इयत्ता आठवी व नववीत एनसीसी घेतलेल्या विद्यार्थी कॅडेट्सना सहभाग भत्ता म्हणून एनसीसी कडून काही रक्कम दिली जायची. ती शाळेमार्फत देण्यात येत होती. मात्र त्यात काहींनी अपहार

परळीत होणाऱ्या शिक्षक साहित्य संमेलनामुळे परळीचा नावलौकिक वाढेल- प्रदीप खाडे

Image
संमेलनाच्या बोधचिन्हाचे झाले विमोचन परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :- परळी शहरात होणारे साप्ताहिक शिक्षण मार्ग च्या वतीने आयोजित 6 व्या विभागीय मराठवाडा शिक्षक साहित्य संमेलनामुळे परळी शहराचा नावलौकिक वाढेल असा आत्मविश्वास संमेलनाचे स्वागत अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांनी व्यक्त केला. संयोजन समितीच्या वतीने स्वागत अध्यक्ष प्रदीप खाडे तसेच संमेलन अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक व शिक्षण तज्ज्ञ ए.तु. कराड यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.       याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अतुल दुबे, उद्योजक सुरेश नाना फड, गोविंद मुंडे आदी उपस्थित होते. यावेळी सहाव्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रदीप खडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी प्रदीप खाडे यांनी परळीत होणाऱ्या साहित्य संमेलना विषयी आपली भूमिका विशद केली तसेच शिक्षकांचा आणि साहित्यिकांचा सन्मान करण्याचे भाग्य मला लाभल्याचेही ते म्हणाले यावेळी संमेलन अध्यक्ष ए.तु.कराड, प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे, प्राचार्य अतुल दुबे, रानबा गायकवाड, सुरेश नाना फड यांनीही आपले विचार मांडले

बीड न.प.भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी रि. पा.ई.आठवले गटाच्या वतीने लाक्षणिक उपोषण

Image
 पालकमंत्र्यांनी आंदोलन स्थळी भेट देत कारवाई करण्याचे दिले आदेश  बीड प्रतिनिधी - बीड नगर परिषदेमध्ये वाढत्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण शहर संघटक सचिव अक्षय कोकाटे यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन 2022- 23 प्रस्तावित 32 कामे प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे ज्यामध्ये प्रभाग चार मध्ये दोन कोटी 21 लाख 550 रुपयाचा निधी प्राप्त झाला असून सदरील निधी अंतर्गत पाच कामे मंजूर झाले असून एक काम वार्ड क्रमांक 19 मध्ये वळवण्यात आले आहे ते काम एकूण 49 लाख 95 हजार रुपयांचे आहे हे काम अनुसूचित जाती व नवबौद्ध यांची लोकसंख्या 50% किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवी किंवा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा प्रभाव अशा शासन नियम असताना देखील हे काम दुसऱ्या प्रभागांमध्ये वळविण्यात आले आहे याच्याच निषेधार्थ 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून ज

मनोज जरांगे पाटील यांचे विशेष अभिनंदन करणार -सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील

Image
प्रतिनिधी २७ जानेवारी            गोरगरीब मराठ्यांच्या आयुष्यात नवप्रकाश आणणारा मराठ्यांचा क्रांतिसूर्य मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी समाजाच्या हितासाठी उभारलेला ऐतिहासिक जिद्दीचा लढा यशस्वी झाला. विस्तापित व गरीब मराठा एकजुटीमुळे पिढ्यानपिढ्या प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गे लागला. महाराष्ट्र राज्याच्या कर्तव्यदक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितले होते की, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही! आज त्यांनी समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. मराठा समाज शतकानुशतके स्मरणात ठेवेल.          मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या आंदोलनाला मोठं यश प्राप्त झालं आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्याबाबतचा अध्यादेशही काढण्यात आला आहे. तर आज मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते आपलं उपोषण सोडले. जरांगे पाटील यांची लवकरच विजयी सभा होणार असून त्यापद्धतीने नियोजनासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे.        मरा

जिवाची वाडी येथे संत भगवानबाबा पुण्यनिथी मिमित्त संस्कार महाराज यांचे किर्तन संपन्न.

Image
येवता प्रतिनिधी :दि.२६ रोजी केज तालुक्यातील जीवाची वाडी येथे वैकुंठ वाशी हरिभक्त परायण संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त ह.भ.प.श्री.संस्कार महाराज खंडागळे,पंढरपूरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन हनुमान मंदिरासमोर सकाळी करण्यात आले होते महाराजांनी कीर्तन रुपी सेवेसाठी अभंग ॥याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड होवा आता निश्चितीने पावलो विसावा खुंटलोया धाव तृष्णीचीया कौतुक वाटे झालीत वेताचे नाम मंगळाचे तिन्ही गुणी तुका म्हणे मुक्ती पर्नेयली नोवलीआता दिवसचारी खेळीमेळी ॥अभंगाचे निरूपण केले भगवान बाबांनी समाजासाठी अनेक प्रकारचे प्रबोधन करून समाजाला दिशा देण्याचे काम केले भगवान बाबांनी गाव गावी कीर्तन करत शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले जमीन विक आपण मुलं शिकवा असा उपदेश घेऊन भगवान बाबांनी समाजाला चांगल्या प्रकारे दिशा देण्याचं काम केले कार्यक्रमास टाळकरी विणेकरी मृदंगाचार्य ग्रामस्थ उपस्थित होते कीर्तनाचे नियोजन जीवाची वाडी ग्रामस्थ व माजी सरपंच महादेव रामकिसन चौरे(पाटील)यांनी कीर्तनाचे सुंदर असे नियोजन केले.

रस्तयासाठी निवेदने देऊन देऊन थकली जनता सुशिल पिंगळे करणार आता स्वखर्चातुन रस्ता!

Image
बीड :-बीड शहराअंतर्गत रस्तयांची दुरावस्था ईतकी भिषण आहे कि कधी कधी आम्ही धरतीवर न राहता एखाद्या ग्रहावर रहातो कि काय अशी अवस्था या भागातील नागरींकाची झाली आहे. बीड शहरातील मुख्य रस्ते सोडता  शहरातील अंतर्गत रस्ताचे तिन तेरा नी नवु बारा वाजले आहेत.बीड शहरातील कांरजा टाँवर ते पिंगळे गल्ली ते जुनी भाजी मंडी या रस्तयाची अवस्था तर सगळयात बिकट अशीच आहे कारण हा रस्ता आधीच खुळखळा झालेला होता .पण या रस्तयाचे टेंन्डर काढुन प्रशासनाने पुन्हा या रस्तयावर जेसीबी च्या साहय्याने दगड आणी मुरुमाची चादर अंथरण्यात आली, तेंव्हा  या भागातील नागरीकांना दिलासा वाटला होता कि चला आपण परग्रहावर रहात नाही तर धरतीवरच रहातोय, आणि लवकर हा रस्ता आपल्यासाठी तयार होनार आहे. परंतु याच नागरींकांच्या टँक्सच्या पैशातुन सुरू केलेले हे काम दगडगोटे नी मुरुम टाकून संपविण्यात आले. मग मात्र या भागातील नागरिंकाचा हिरमोड झाला. कामाची सुरुवात केलेला हा रस्ता कुठल्या कारणाने फक्त खोदुन ठेवला आणि दगड गोटे मुरमाने फक्त झाकुन टाकला याची माहिती अनेक निवेदने, अर्ज, करुन देखील मिळाले नाही.रस्ता रस्ता बनवला तर नाहीच परंतु तो

चव्हाण महाराज यांची बावीस वर्षापासून अखंड चालू असणाऱ्या यात्रेस मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहावे

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यातुन गेली बावीस वर्षापासून अंखड पणे चालू असलेली ज्ञानोबा तुकोबा सेवा मंडळाचे ह.भ.प नामदेव महाराज चव्हाण यांची संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा व त्रिंबकेश्वर यात्रा उत्सव यावर्षी ही मोठ्या उत्साहात निघणार आहे.  तीर्थयात्रा लोकांकडून होत नाही त्या करिता ह.भ.प नामदेव महाराज चव्हाण यांनी भाविक भक्तांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे यात्रेत रेणुका मंदिर पाटोदा, गहिनीनाथ गड, मोहटादेवी, शनिशिंगणापूर,देवगड, शिर्डी,साईदर्शन,वनीची देवी, दिंडोरी, स्वामी समर्थ,यासह जेजुरी, मोरगाव, शिखर सिंगापूर, पंढरपूर आशे अनेक मोठ मोठाल्या देव देवताचे दर्शन घेता येणार आसुन ही यात्रा 4/2/2024 रोजी पाटोदा शहरातून निघणार आहे या यात्रेस सहभागी होण्यासाठी श्री ज्ञानोबा तुकोबा सेवा मंडळाचे ह.भ.प नामदेव महाराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा 9011293145

तुलसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळाला मोठे पॅकेज मिळवण्याचा करियर मंत्र

Image
एन.आय.टी नागालँड माजी विद्यार्थी इंजिनिअर देवेश कुमार शर्मा यांचे विद्यार्थ्यांना करियर विषयी मार्गदर्शन बीड(प्रतिनिधी ):- कॅम्पस प्लेसमेंट मधून विद्यार्थ्यांनी मोठे पॅकेज कसे मिळवायचे याचा मूलमंत्र एनआयटी नागालँडचे माजी विद्यार्थी इंजिनिअर देवेश कुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांना दिला ते ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष करियर मार्गदर्शन शिबिराप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी इंजी. दिपंकर रोडे, उपप्राचार्य डी.जी.निकाळजे यांची उपस्थिती होती. इंजिनिअर देवेश कुमार शर्मा यांनी आपल्या मार्गदर्शनात त्यांना ॲमेझॉन मध्ये त्यांना नोकरी कशी लागली आणि ४५ लाखांचे मोठे पॅकेज कसे मिळवले याविषयी सखोल माहिती सांगितली. ते सद्या कोटक ॲट एट इलेव्हन मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत आहेत. पुढे बोलताना इंजी.शर्मा म्हणाले की, यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांचा सी.व्ही (बायोडाटा) आहे. विद्यार्थ्यांनी आपला सी.व्ही (बायोडाटा) तयार करताना तो सर्वात चांगला कसा असेल याकडे लक

लोकशाही प्रबळ होण्यासाठी मतदान प्रक्रिया आवश्यक - प्रमोद कुदळे

Image
 पाटोदा (गणेश शेवाळे ) लोकशाही शासनप्रणाली अधिक प्रबळ होण्यासाठी मतदार नोंदणी व मतदान प्रक्रिया आवश्यक आहेत म्हणून वयाची १८ वर्षे पूर्ण करण्याऱ्या प्रत्येक नागरिकाने मतदार नोंदणी करून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे प्रतिपादन पाटोद्याचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांनी केले. येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्य आयोजित मतदार जागृती कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.तहसील कार्यालय निवडणूक विभाग आणि महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व मतदार नोंदणी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते. व्यासपीठावर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार संतोष बन,नायब तहसिलदार निवडणूक जालिंदर दोडके, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र सुळे,उपप्राचार्य डॉ. गणेश पाचकोरे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. काकासा

मा युवानेते रणविरराजे (काका ) पंडित यांचा गढी ग्रामस्थाच्या वतीने नागरिक सत्कार संपन्न

Image
 बीड प्रतिनिधी सखाराम पोहिकर :- गेवराई तालुक्यातील गढी ग्रामपंचायत च्या सरपंच पदाची नुकतीच निवड झाली असून सरपंच पदी विष्णुपंत घोंगडे यांची निवड करण्यात आली यावेळी गढी ग्रामस्थाच्या वतीने आज युवा नेते रणवीर राजे पंडित यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना रणवीर राजे पंडित असे म्हणाले की माननीय अमरसिंह पंडित साहेब व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय राजे पंडित साहेब यांनी गढी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी विष्णुपंत घोंगडे यांची निवड केल्याबद्दल युवा नेते रणवीर राजे पंडित साहेब यांचा गडी ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी रणवीर राजे पंडित यांनी गढी गावातील वडीलधारी ग्रामस्थांना आपले मत व्यक्त करताना सांगितले की तुमच्या सर्वांच्या सूचनेनुसार व घोंगडे विष्णुपंत यांनी गढी गावासाठी आजपर्यंत केलेल्या कामाची व त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांच्यावर गढी ग्रामपंचायत च्या सरपंच पदाची जिम्मेदारी टाकली आहे तरी यापुढे घोंगडे यांनी अजून जोमाने कामाला लागावे व काम करत राहा सर्वसामान्य माणसांना मदत करा गढी गावामध्ये सर्व गावकरी यांनी सुद्धा तेवढीच म

रविवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ब्युटी पार्लर चालक महिलांचा सन्मान - शेख आयेशा

Image
बीड प्रतिनिधी   प्रजासत्ताक दिनानिमित्त बीड शहर आणि ग्रामीण भागातील ज्या महिला ब्युटी पार्लर चालवून इतर महिलांचे सौंदर्य अधिक खुलवण्याचा प्रयत्न करतात अशा महिलांचा मान्यवर महिलांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. या सत्कार सोहळ्यासाठी ज्या ब्युटी पार्लर चालक महिला आहेत अशा महिलांनी 70 30 14 93 22 या नंबर वर संपर्क करून आपल्या नावाची नोंदणी करावी असे आवाहन आयोजक आश्रय सेवा केंद्राच्या संस्थापिका पत्रकार शेख आयेशा यांनी केले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त यावेळी ज्या महिला महिलांनी ब्युटी पार्लरचा व्यवसाय म्हणून जरी स्वीकार केलेला असला तरी या माध्यमातून त्या महिलांचे सौंदर्य वाढवण्याचे काम आपल्या कल्पकतेने करतात. हे काम देखील म्हणावे तेवढे सोपे नाही. ज्याप्रमाणे मूर्तीला आकार देणे सहज सोपे नाही. परंतु जेव्हा मूर्ती पूर्ण सुंदर रूप घेते तेव्हा त्या मूर्तीला नतमस्तक होऊन मिळणारे समाधान शब्दात व्यक्त करणे शक्य नाही.अगदी त्याच पद्धतीने मुलींच्या, महिलांच्या कडे असलेले जे नैसर्गिक सौंदर्य आहे त्या सौंदर्याला अधिक रूपवान करण्याचे काम ब्युटी पार्लरच्या माध्यमातून ज

पुरवठा विभागाकडील व वाहतूक कंत्राटदाराकडीलमजूरी साठी गोदाम हमालांचे बेमूदत धरणे आंदोलन.

Image
    बीड (प्रतिनिधी ) बीड जिल्हयातील शासकीय धान्य गोदामातील हमालांची आनंदाचा शिधा किटची हमाली 1 वर्षा पासूनची मिळावी माहे आक्टोंबर,नोव्हेंबर, डिसेंबरची पुरवठा विभागाची हमाली मिळावी पुरवठा विभागाच्या वाहतूक कंत्राटदाराकडील थेट वाहतूकीत केलेल्या कामाची हमाली माहे नोंव्हेंबर,डिसेंबर ची मिळावी तसेच मालाची आवक जावक एकाच वेळेस होऊ नये गोदामाच्या ठिकाणी नागरी सुविधा असावी व अ(1) व ब-2 व्यतिरिक्त होणार्‍या कामच्या हमाली मिळावी या व इतर मागण्यासाठी जिल्हयातील गोदामातील गोदाम हमालींनी प्रातनिधीक धरणे आंदोलन राजकुमार घायाळ,शेरजमाखा पठाण,यांच्या नेतृत्वात सुरु केले असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस रामभाऊ बादाडे यांनी दिली. धरणे आंदोलनाच्या इतर मागण्या पुढील प्रमाणे,महागाई निर्देशांकाचा फरक देण्याच्या उच्च न्यायालयाचा आदेशाची अंमलबजावणी व्हावी, 2012 ते 2017 या कालावधीतील कमी दिलेला फरक द्यावा गोदामात आवक जावक एकाच वेळेस करण्यात येवू नये शासकीय धान्य गोदामातील थेटवाहतूकीमुळे काम कमी झाले असल्याने ज्या त्या गोदामातील हमालाकडूनच काम करुन घ्यावे या व इतर मागण्यासाठी प्रातनिधीक बेमूदत धरणे