"नाते विकासाचे आणि विश्वासाचे"

"नाते विकासाचे आणि विश्वासाचे"
स्वर्गीय मारोतराव पा.नारे हे कोकलेगावच्या राजकारणात खूप मोठं प्रस्थ होतं.त्याचबरोबर कोकलेगावच्या राजकारणात त्यांचं मोठं योगदान राहिलं असून, त्यांनी अनेक नव्या दमाच्या तरुणांना कोकलेगावच्या राजकारणात प्रत्यक्ष सहभागी करून घेत अनेक मोठ्या पदावर विराजमान होण्याची संधी उपलब्ध करून दिली. स्वर्गीय मारोतराव पा.नारे हे अतिशय संयत, शालिन,बहुआयामी प्रतिभेचे धनी असलेले,वाचक, समीक्षक, सहकार, राजकारण, समाजकारण या क्षेत्रात ठाम वैचारिक अधिष्ठान निर्माण करणारे तसेच शिस्तीच्या बळावर राजकारणात समतोल व आदरयुक्य दरारा निर्माण करणारे,आपल्या कर्तृत्वाची अमीठ छाप उमटवणारे, ज्ञानी आणि गुणी तसेच समाजाभीमुख विकासाची दृष्ठी असलेले, सामाजिक जाणीवेच्या वैचारिक अधिष्ठानातून निर्माण झालेलं समाजमान्य व्यक्तिमत्व अशी त्यांची समाजात ओळख होती.
कोकलेगावातील अनेक रुग्णांना ते स्वतः नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जायचे. उपचार घेत असताना तो रुग्ण पूर्ण बरा होईपर्यंत डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहायचे तसेच उपचारावर अतिशय बारकाईने लक्ष ठेऊन असायचे. रुग्ण पूर्ण बरा होईपर्यंत ते घरी यायचे नाहीत.हा त्यांचा त्याग त्यांच्या सामाजिक कार्याची उंची दर्शवितो.
स्वर्गीय मारोतराव पा.नारे यांनी त्यांच्या राजकीय जीवनात  विकास आणि विश्वासाला कायम सर्वोच्च स्थानी ठेवलं होतं. एखादा राजकीय निर्णय घेताना पार्टीतील सहकाऱ्यांना जो काही शब्द दिला तो शब्द काही केल्या पडू दिला नाही किंबहुना मागे घेतला नाही.
"बोले तैसा चाले त्याची वृंदावी पाऊले"  म्हणूनच त्यांची व त्यांच्या  घराण्याची एकनिष्ठ,निष्ठावंत तसेच विश्वासू माणसं अशी समाजात ओळख आहे.

सन 2000 ते 2005 या  कालावधीकरिता कोकलेगावच्या सरपंच पदी जनतेतून लक्ष्मीबाई मारोतराव पा. नारे यांची निवड करण्यात आली.या दरम्यानच्या काळात कोकलेगाव नगरीचा सर्वांगीण विकास करण्यात स्वर्गीय मारोतराव पा.नारे त्यांच्या सुविज्ञ पत्नी लक्ष्मीबाई मारोतराव पा.नारे व त्यांचे जेष्ठ चिरंजीव काळबा मारोतराव पा. नारे यांचा सिंहाचा वाटा राहिला असून, त्यांना बालाजीराव पा. मोरे, बालाजीराव पा.घारके तसेच पंढरीनाथ महाराज गायकवाड यांच्या सोबतच समस्त गावकऱ्यांची मोलाची साथ लाभली.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोकलेगाव नगरीत पहिल्यांदा सिमेंटचा रस्ता झाला तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतनिकरण करण्यात आले अनेक होतकरू गोर-गरीब लोकांना घरकुल आवास योजनेचा लाभ मिळवून दिला.जिल्हा परिषद शाळेतील हातपंप काढून त्या ठिकाणी पाण्याची मोटार टाकून संपूर्ण गावात पाईपलाईन करून कोकलेगावातील पाण्याची समश्या कायमची निकाली काढली. जिल्हा परिषद शाळेत नवीन तीन ते चार खोल्यांचे नव्याने बांधकाम केले.
या पाच वर्षाच्या काळात अनेक विकासकामे निकाली निघाले. कोकलेगावातील कुणीही नागरिक त्यांची समश्या घेऊन स्वर्गीय मारोतराव पा. नारे यांच्या घरी आल्यानंतर चहापान घेऊन समश्यांचे निराकरण करून चेहऱ्यावर एक समाधानाचे हाश्य घेऊन परतायचा.
स्वर्गीय मारोतराव पा.नारे यांच्या तालमीत व संस्कारात तयार झालेलं निष्कलंक,चारित्र्यसंपन्न,कृषी विषयाचा गाढा अभ्यास असणारे तसेच आपल्या विश्वासू स्वभावामुळे राजेश जी देशमुख कुंटूरकर यांनी त्यांना कायम सन्मानाची वागणूक दिलेली आहे.तसेच गेल्या वीस वर्षात पार्टीने सोपवलेली कोणतीही जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे व लीलया पार पाडली. स्वतःला अनेक राजकीय संधी सहज उपलब्ध असताना त्या अतिशय मोठ्या मनाने नाकारल्या तब्बल वीस वर्षानंतर आज त्यांच्या परिवारावर कोकलेगावच्या जनतेनी विश्वास दाखवत त्यांना चेअरमन पदासाठीचा आश्वासक चेहरा म्हणून संधी उपलब्ध करून दिली आहे.जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचं विधायक काम काळबा पाटील नारे यांच्या हातून नक्कीच घडेल यात तिळमात्र शंका नाही.काळबा पा.नारे यांनी सरपंच प्रतिनिधी म्हणून कोकलेगावच्या कारभाराचा गाडा हाकत असताना, सर्व जनतेला सोबत घेऊन कायम न्यायिक भूमिका घेत सर्वसमावेशक निर्णय घेतले.कोकलेगावच्या विकासकामाची खऱ्या अर्थाने सुरवात ही त्यांच्या माध्यमातून झाली म्हंटल तर वावगं ठरणार नाही.स्वर्गीय मारोतराव पा.नारे यांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून समाज काळबा पा.नारे यांच्याकडे पाहत असून, त्यांच्याकडुन गावाकऱ्यांना खूप आशा आणि अपेक्षा आहेत. त्यावर ते नक्कीच खरे उतरतील असा ठाम विश्वास जनतेला आहे.
मी कोकलेगावातील सुजाण नागरिकांना विनंती करतो की आपल्या हाकेला साथ देणाऱ्या आपल्या हक्काच्या संत गंगागीर महाराज शेतकरी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहूमताने विजयी करावे.

विकास, विश्वास आणि निष्ठा याचं दुसरं नाव म्हणजे काळबा मारोतराव पा. नारे

आपला स्नेहांकित, 
अँड ज्ञानेश्वर बालाजीराव पा. मोरे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी