बीड जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडीच्या परळी, अंबाजोगाई, केज तालुक्याची बैठक संपन्न.
बीड (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्यातील शिवसेना पक्षाची महिला आघाडीच्या परळी, अंबाजोगाई, केज तालुक्याची बैठक दिनांक २५ एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह, अंबेजोगाई येथे संपन्न झाली. या बैठकीला शिवसेना मराठवाडा संपर्क प्रमुख अँड. संगिता चव्हाण यांनी संबोधित केले.
येणाऱ्या काळात कोणत्याही निवडणूक होणार नसल्याने शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती मा.ना.डॉ. निलम ताई गोऱ्हे, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेना सचिव श्री संजय जी मोरे साहेब, आणि शिवसेना नेत्या सौ. मीनाताई कांबळी यांच्या सुचनेने महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा शिवसेना मराठवाडा संपर्कप्रमुख मा.ना.श्री प्रकाशजी अबीटकर साहेब, बीड जिल्हा संपर्क मंत्री मा.ना.भरातसेठ गोगावले साहेब, शिवसेना मराठवाडा विभागीय सचिव श्री. अशोकजी पटवर्धन साहेब, लोकसभा संपर्क प्रमुख मनोज जी शिंदे साहेब, उपनेत्या संगिता ठोंबरे, जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, सचिन मुळूक, स्वप्नील गलधर, चंद्रकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील शिवसेना संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी आणि निवडणुकीची तयारी सशक्त करण्यासाठी बीड जिल्हा महिला आघाडीची आढावा बैठक आंबेजोगाई येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस शिवसेना महिला संपर्क प्रमुख बीड, धाराशिव, तथा महाराष्ट्र राज्य महीला आयोगाच्या सदस्य अँड.संगीताताई चव्हाण यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
या बैठकीस संबोधित करताना महिला आघाडी बळकट करण्यासाठी 'गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक' यावर लक्ष केंद्रित करण्यावर जोर दिला. महिला आघाडीत पदभरणे, शाखा वाढवणे, महिला आघाडी ची बैठक लावणे यावर चर्चा करण्यात आली. या वेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या बैठकीस मिरा आडे, उपजिल्हा प्रमुख अंबेजोगाई, सूनिता जाधव, तालुका प्रमुख, अंबेजोगाई, जया राऊत, तालूका प्रमुख, केज, यशोदा राठोड़, तालुका प्रमुख परळी, जयश्री पिपरे, अंबाजोगाई, आम्रपाली निसर्गंद, वर्षा मस्के, जयश्री मोरे, जयश्री गवळी, सुर्वाणा वाघमारे, सुमन गुरखेल, गंगुबाई पवार, मोहिनी कांबळे आणि इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment