चौसाळा येथे भीम जंयती निमित्त नेञ तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न




(बीड प्रतिनिधी ) विश्वरत्न महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती निमित्त बीड तालुक्यातील चौसाळा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथमतः कुळवाडी भुषण राजाधिराज छञपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वैधकिय अधिकारी डॉ. अंकुश मंचुके साहेब यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी रुग्णसेवक डॉ. मंगेश मंचुके साहेब,रुग्ण सेवक शैलाताई नाईकवाडे,सामाजिक कार्यकर्ते भारत सुरवसे, चौसाळा ग्रामपंचायत सदस्य आमोल कांबळे, भवानी ग्रुपचे अध्यक्ष सुधाकर गुंजाळ, विठ्ठल झोडगे पाटील,सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विवेक(बाबा)कुचेकर,उपाध्यक्ष विकी ढोकणे, सचिव मिलिंद सोनवणे यांच्यासह अनेक गरजु रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी