रामपुरी येथे आंबेडकर जयंती उत्सवात जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांची उपस्थिती

रामपुरी येथे आंबेडकर जयंती उत्सवात जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांची उपस्थिती

२८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रम; मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित
गेवराई प्रतिनिधी – मौजे रामपुरी येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. दिनांक २८ एप्रिल २०२६, मंगळवार रोजी आयोजित या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन हे सकाळी १० वाजता उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या जयंती उत्सवाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पूजी कागदे, किशोर कांडेकर, सचिन उजगरे आदी मान्यवरांचीही उपस्थिती अपेक्षित आहे.

मौजे रामपुरी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विकास शरणांगत, उपाध्यक्ष प्रविण शरणांगत तसेच समितीचे सर्व पदाधिकारी आणि मार्गदर्शक कचरू शरणांगत, विक्रम शरणांगत, धम्मपाल शरणांगत यांनी ही माहिती दिली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी