परळी नगरपरिषदेच्या अध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या मदतीने लेखी पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले


परळी नगरपरिषदेच्या अध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या मदतीने लेखी पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले
दिनांक 10 एप्रिल 26 थकीत वेतन व अनुषंगिक लाभ मिळावेत याकरिता झुंजार कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग सुरू केले होते*
अखेर चौथ्या दिवशी परळी शहराच्या कर्तव्यदक्क्ष नगराध्यक्षा मा.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी लिखित पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. इथून पुढे तुम्हाला आंदोलन करण्याची गरज पडणार नाही आपण संवाद साधून तुमच्या सर्व मागण्या टप्प्याटप्प्याने मंजूर करू आणि तुमचे मुलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी सातत्याने मी कामगार नेते भाई गौतम आगळे सर हे आमच्या सतत संपर्कात असल्याने तुम्हाला या पूढे आंदोलनाचे हत्यार उपसन्याची गरज पडणार नाही असे मी नगरपरिषद अध्यक्षा म्हणून आपणास शब्द देते. तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी चा, पि.एफ. कोड नंबर (यु.एन.ए. ) एक महिन्यात देण्यात येईल असेही लेखी पत्रात नमूद केले आहे.
       त्या अनुषंगाने दिनांक १५ एप्रिल २०२६ चे संतप्त कामगार टोकाची भूमिका घेणार होते. जिल्हा सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय बीड, यांनी सुद्धा बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/ नगरपंचायत यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आढावा बैठक घेऊन इतिवृत्त तयार केले त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे लेखी निर्देश दिले.  
त्यामुळे नियोजित 
असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले, अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे बीड जिल्हाध्यक्ष भाई सुनील कांबळे शहराध्यक्ष भाई मनोहर मुंडे यांनी एका संयुक्त प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी