जीवाचीवाडी येथे मारहाणीत चार जखमी..

जीवाचीवाडी येथे मारहाणीत चार जखमी..

 
10 जणांविरुद्ध केज पोलिसात गून्हा नोंद.
 
केज, दि. 27 : तालुक्यातील जीवाची वाडी येथे दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वरातील रुग्णालयात उपचार चालू आहेत. दैवशाला उमेश सारुक यांच्या फिर्यादीवरून दहा जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे....


 जीवाचीवाडी येथील दैवशाला उमेश सारुक या घरी आसताना त्यांचे पती व जाऊ हे त्यांच्या घराच्या मागील शेतात पाईप लाईन जोडीत होते , यावेळी शहादेव सारुक, महादेव सारुक, व ज्ञानेश्वर सारुक यां तिघांनी घरी येऊन दैवशाला उमेश सारुक त्यांच्याशी गैरवर्तन करून वाईट हेतूने त्यांच्या हाताला धरून त्यांना घरात ओढून नेत असताना त्यांनी आरडा,ओरडा केल्यामुळे त्यांचा नवरा व जाऊ धावत आले असता तिघेही पळून गेले. दरम्यान थोड्याच वेळात आरोपीतानी संगनमत करून लाथा बुक्क्याने, व काठीने केलेल्या मारहाणीत चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


याप्रकरणी दैवशाला उमेश सारुक यांच्या फिर्यादीवरून शहादेव तुकाराम सारुक,महादेव तुकाराम सारुक,ज्ञानेश्वर महादेव सारुक,चंद्रकला शहादेव सारुक,धुराबाई तुकाराम सारूक,प्रयागाबाई महादेव सारुक,सचिन महादेव सारूक, राजा शहादेव सारुक,पूजा महादेव सारुक,आणि तुकाराम आप्पाराव सारुक अशा एकूण दहा जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आसून,पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार पुरुषोत्तम शेप हे पुढील तपास करीत आहेत 

चौघे गंभीर जखमी...
या मारहाणीत नंदुबाई भिकाराम सारुक, दैवशाला उमेश सारुक, एक 12 वर्षाच्या मुलासह चौघे गंभीर जखमी आसून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णसंलयात उपचार सुरु आहेत.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी