मुस्लिमांच्या विकास योजनांवर सुनेत्राताई पवार कटिबद्ध मुलींचे वसती गृह व माटीॅ साठी ठाम भूमिका - शेख निजाम
मुस्लिमांच्या विकास योजनांवर सुनेत्राताई पवार कटिबद्ध मुलींचे वसती गृह व माटीॅ साठी ठाम भूमिका - शेख निजाम
अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज आयोजित करण्यात आलेली बैठक सकारात्मक आणि परिणामकारक चर्चेसह यशस्वीरीत्या संपन्न झाली.
यावेळी शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देत, चेंबूर येथील अणुशक्तीनगर परिसरात व बीड येथील अल्पसंख्याक मुलींसाठीच्या प्रस्तावित मुलीचे वसतिगृह व जागा उपलब्ध करून कामाला गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले मा.आमदार विजयसिंह पंडित, नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, शेख मुजीबभाई,फारुख पटेल, भागवत तावरे यांच्या सतत पाठपुरावा चालु आहे..
अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी राज्य सरकार विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असून या प्रयत्नांना अधिक गती देण्यात येणार आहे. विशेषतः मुलींच्या उच्च तांत्रिक शिक्षणासाठी दर्जेदार सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित केले.
या बैठकीत ‘मार्टी’ संस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेसाठी स्वतंत्र लेखा उघडणे, कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी मंजूर पदे तत्काळ भरणे तसेच तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर कार्यालय सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. अल्पसंख्याक तरुणांना आधुनिक शिक्षणाशी जोडण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. कौशल्य विकास, तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि रोजगाराभिमुख उपक्रमांद्वारे युवकांना सक्षम करण्यावर राज्य सरकारचा विशेष भर राहील, असे देखील स्पष्ट करण्यात आले अल्पसंख्याक पायाभूत सुविधां व इतर सर्व योजनाचा फायदा सर्वसामान्य नागरिकाना मिळून द्यावा असे निवेदन मा.उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी दिले आहेत.....
Comments
Post a Comment