मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा हटविल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रदिनी लिंबागणेश येथे निदर्शने
लिंबागणेश (दि.०१) : एनसीईआरटीच्या इयत्ता आठवीच्या इतिहास पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज दि.१ मे महाराष्ट्रदिनी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतीक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांना मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा अभ्यासक्रमातून हटविणे म्हणजे मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच राजस्थानातील विजयाची ऐतिहासिक वस्तुस्थिती नाकारणे चुकीचे असून कोणत्याही दबावाखाली इतिहासात बदल करू नये, अशी ठाम भूमिका व्यक्त करण्यात आली. निवेदन लिंबागणेश पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड यांनी निवेदन स्वीकारले.
या संदर्भात जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
या आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, बाळकृष्ण थोरात, दामोदर थोरात, सुनिल ढवळे, दादा गायकवाड, सुरेश ढवळे,सर्पमित्र अशोक जाधव, संजय पावले,भगवान मोरे, रमेश वाणी, अंकुश वाणी, सुरेश कुलकर्णी,कचरू निर्मळ
अनेक नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment