नेकनूर येथे इंटक सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद; कामगारांना संघटित होण्याचे आवाहन: श्री रामधन जमाले

  नेकनूर (ता. जि. बीड) प्रतिनिधी :राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या वतीने नेकनूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला आज मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. शेतमजूर, बांधकाम मजूर, ऊसतोड मजूर तसेच संघटित व असंघटित कामगारांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

      यावेळी इंटकचे जिल्हाध्यक्ष श्री. रामधन जमाले यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करताना संघटित होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कामगारांनी आपल्या हक्कांसाठी एकत्र येणे गरजेचे असून, इंटकच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सदस्य नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन अधिकाधिक कामगारांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

      इंटकचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री डॉ. कैलास भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत असून, जिल्हाध्यक्ष श्री रामधन जमाले यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी सदस्य नोंदणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर इंटक बीड तालुका उपाध्यक्ष शेख सद्दाम सकलेन यांनी नेकनूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले.

     या कार्यक्रमाला इंटक जिल्हा सहसचिव श्री. मधुसूदन मस्के, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष श्री. हनुमान घोडके पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री. भीमराव कुटे, श्री अतुल सालगुडे, लियाकत सर, शेख खमर, शेख रऊप, मेहताब मिस्त्री, यांच्यासह अनेक मान्यवर व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे परिसरात इंटकच्या कामाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर कामगार सदस्य नोंदणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे



Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी