चौसाळ्यात शिवजयंती व भीमजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न


​बीड (प्रतिनिधी):कुळवाडी भूषण राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती उत्सवाचे औचित्य साधून चौसाळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
​याप्रसंगी संदेश (शेठ) खिंवसरा, भाऊसाहेब जाधव, पत्रकार विकास नाईकवाडे, डॉ. प्रशांत जोगदंड आणि पत्रकार अजमेर मनियार यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या शिबिरात तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.

सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विवेक कुचेकर, भवानी ग्रुपचे अध्यक्ष सुधाकर गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे, उपाध्यक्ष विकी ढोकणे, सचिव मिलिंद सोनवणे, वैभव सोनवणे, प्रकाश पवार, बापू घोडके आणि शेखर सोनवणे यांच्यासह समितीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
​यावेळी उपस्थित मान्यवरांनी महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या या विधायक उपक्रमाचे कौतुक केले. शिबिरादरम्यान असंख्य रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक कर्तव्याची जाणीव जपली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी