पाटोदा ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था;प्रवेशद्वारावरील रस्त्याच्या दुर्दशेमुळे रुग्णांना खाव्या लागतात खस्ता - नगरसेवक संतोष जाधव
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता पूर्णतः खड्डेमय झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो नगरसेवक संतोष जाधव तसेच रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णांसाठी हा रस्ता सध्या धोकादायक ठरत आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडले असून, वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः रुग्णवाहिका आणि दुचाकीस्वारांना या रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. अनेक वेळा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचणेही कठीण होत असल्याची स्थिती आहे. रुग्णालया समोरील रस्ता इतक्या वाईट अवस्थेत असणे ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्ता दुरुस्ती करणे आवश्यक आहे,” असे नगरसेवक संतोष जाधव यांनी सांगितले.या रस्त्याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही नगरसेवक संतोष जाधव यांच्या वतीने देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment