शेतात वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने साजरा केला पुरुषोत्तम वीर यांचा वाढदिवस

शेतात वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने साजरा केला पुरुषोत्तम वीर यांचा वाढदिवस
बीड प्रतिनिधी :
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी…” या संत तुकाराम महाराजांच्या ओळींचा विचार प्रत्यक्षात उतरवत रिपब्लिकन सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष मा. पुरुषोत्तम (गोटू) वीर यांचा वाढदिवस यंदा अत्यंत वेगळ्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. बीड-गेवराई महामार्गावरील त्यांच्या शेतात वृक्षारोपण करून अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यासह शहरातून विविध पक्षांचे नेते, शासकीय अधिकारी-कर्मचारी, तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने डीजे, फटाके आणि दिखाऊ खर्च टाळत मित्रपरिवाराने साधेपणाला प्राधान्य देत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून समाजाला सकारात्मक संदेश दिला.

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करणारा हा उपक्रम विशेष ठरला. “एक व्यक्ती, एक वृक्ष” या संकल्पनेतून अनेकांनी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध मान्यवरांनी पुरुषोत्तम वीर यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. त्यांच्या कार्याचा आढावा घेताना अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बीड शहरातील नवोदित गायक-गायिकांनी सुमधुर गीतांनी वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी खास जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

साधेपणा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम साधणारा हा वाढदिवस सोहळा उपस्थितांच्या मनात विशेष ठसा उमटवून गेला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी