मुंबई येथील आंतरराष्ट्रीय लाइव्ह मॅथ स्तरावरील ओलंपियाडमध्ये,मयंक शैलेश चौधरीची सर्वोत्कृष्ट मॅथ विजेता म्हणून निवड

मुंबई येथील आंतरराष्ट्रीय लाइव्ह मॅथ स्तरावरील ओलंपियाडमध्ये,मयंक शैलेश चौधरीची सर्वोत्कृष्ट मॅथ विजेता म्हणून निवड

 मयंक शैलेश चौधरीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसाठी जागतिक मास्टर अबॅकस सर्वोत्कृष्ट स्पर्धक म्हणून झाली"
बीड (प्रतिनिधी) जागतिक स्तरावरच्या लाईव्ह मॅथ ओलंपियाडमध्ये सर्व स्पर्धेमध्ये मयंक चौधरीने सर्वोत्कृष्ट मानांकन, सर्वोत्कृष्ट स्पर्धक, सर्वोत्कृष्ट विजेता असे अनेक पदक आणि ट्रॉफी मेडल मिळवलेले आहेत. शालेय स्तरावरील सर्वांगिन विकास करण्याच्या मार्गाने गणित विषयाचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे त्यासाठी अबॅकस आणि वैदिक मॅथ गणितीय पध्दतीचा उपयोग होतो. शहरातील मॅथ आणि अबॅकस ट्रेनिंग केंद्राद्वारे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्य स्तरावर, अबॅकस आणि चॅम्पियनशिप आयोजित केल्या जातात. जागतिक स्तरावरच्या 19 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या लाईव्ह मॅथ ग्रँड मास्टर ओलंपियाड मध्ये मयंक शैलेश चौधरी याने सर्वोत्कृष्ट मॅथ ओलंपियाड म्हणून पदक मिळवलेले आहे. लाइव्ह मॅथ ओलंपियाड असोसिएशन दुबई आणि इंडिया आणि इंटरनॅशनल स्तरावरील ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिप तसेच अबॅकस ऑनलाईन लेव्हल प्रमाणे स्पर्धा पात्रता मिळवण्यासाठी अबॅकस लेवल पात्रता परीक्षा सर्वोत्कृष्ट क्रमांकाने सुद्धा मयंक चौधरीने यश मिळवले आहे. 19 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या जागतिक लाइव्ह मॅथ ओलंपियाड स्पर्धेमध्ये भारतासह, जपान, युनायटेड अरब अमिरात, रोमानिया, नेपाळ, श्रीलंका, यु एस ए , रशिया, जर्मनीमधील बर्लिन, चायना हॉंगकॉंग, मलेशिया देशातील विद्यार्थ्यांचा लाइव्ह मॅथ ओलंपियाड असोसिएशन सहभाग असलेल्या देशांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा मयंक चौधरीने फक्त 12 मिनिटांमध्ये अगदी बरोबर गणिते सोडवून पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून ऐतिहासिक विक्रम केलेला आहे. गेल्या चार ते पाच महिन्यापासून अबॅकस आणि मॅथ याचे सतत युक्तशीर पद्धतीने प्रयत्न करत असल्यामुळे आणि मयंकच्या पालकांनी, शिक्षकांनी सतत योग्य ते मार्गदर्शन करून त्याला यश प्राप्त करण्यास सहकार्य केलेली आहे. अबॅकस तथा मॅथ वैदिक गणित मार्गदर्शक डॉ.एस ए घोडके यांनी मयंक चौधरीला सतत गणितामधील असलेल्या अडचणी दूर करण्यास प्रयत्न केलेले आहे. अबॅकस स्टडी सेंटरचे प्रमुख डॉ. घोडके एस ए. अभिनंदन केले असून उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत.
 मयंक शैलेश चौधरीच्या यशामध्ये आणखी एक ऐतिहासिक क्षण म्हणजे त्याचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डच्या नोंदणीसाठी पाठवण्यात आलेले आहे.
 समाजातील सर्व स्तरांमधून मयंक चौधरीचे अभिनंदन होत असून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. अबॅकसमुळे गणित विषयाच्या आकडेमोड विश्वास मिळून , गणिताबद्दलची मनात असलेली भीती नष्ट होऊन अनेक क्लिष्ट अशा गणितीय पद्धती सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, स्मरणशक्ती यांचा विकास करण्यासाठी अबॅकसचा उपयोग केला जातो असे जिल्हा अबॅकस वितरक घोडके एस ए यांनी सांगितले आहे.

( मयंकच्या पालकांचे विचार = मयंकच्या यशाबद्दल आम्हाला पूर्ण खात्री होती परंतु जागतिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या सहभाग असल्यामुळे काळजीही वाटत होती तरीसुद्धा त्याने आत्मविश्वास आणि सखोल प्रयत्नाने मॅथ मधील सर्वोत्कृष्ट क्रमांक मिळवला त्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान आहे.)

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी