शिरूर कासार तालुक्यामध्ये शिवसेनेचा एल्गार! 'माघन त्याला विहीर' द्या, अन्यथा पंचायत समितीवर धडकणार जनआक्रोश मोर्चा-सोपान मोरे/अजिनाथ खेडकर
शिरूर कासार तालुक्यामध्ये शिवसेनेचा एल्गार!
'माघन त्याला विहीर' द्या, अन्यथा पंचायत समितीवर धडकणार जनआक्रोश मोर्चा-सोपान मोरे/अजिनाथ खेडकर
आष्टी(प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :
शिरूर कासार तालुक्यातील (जिल्हा बीड ') महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने' (मग्रारोहयो) अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील सावळागोंधळ आणि विहिरींच्या मर्यादित लक्षांकावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आता आक्रमक पवित्रा घेतला. गरजू शेतकऱ्याला विहीर आणि गोठा मिळालाच पाहिजे, टार्गेटचे रडगाणे बंद करा, असा सज्जड दम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख सोपान (काका ) मोरे आणि उपजिल्हाप्रमुख अजिनाथ (भाऊ ) खेडकर यांनी प्रशासनाला निवेदनात दिला .
मुख्य मागणी काय आहे--
शिरूर कासार पंचायत समितीने प्रत्येक ग्रामपंचायतला केवळ २० विहिरींचे तुटपुंजे टार्गेट देण्यात आल्याने यावर संताप व्यक्त करत शिवसेनेने गट विकास अधिकाऱ्यांना (BDO) निवेदन दिले .निवेदनातील मुख्य मागण्या खालीलप्रमाणे--
थेट लाभ: शेततळे, गाय गोठा, शेळीपालन आणि जलसिंचन विहिरींचे अनुदान कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हावे.
टार्गेटची अट रद्द करा-- तालुक्यात मागेल त्याला विहीर' या तत्त्वावर काम व्हावे. केवळ २० विहिरींचे टार्गेट देऊन वाड्या-वस्त्यांवरील हजारो शेतकऱ्यांना वंचित ठेवणे अन्यायकारक आहे.
योजनांची प्रभावी अंमलबजावणी--मग्रारोहयोच्या योजना कागदावर न राहता त्या तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात.
प्रशासनाला शेवटचा इशारा--
शिवसेना तालुकाप्रमुख सोपान (काका) मोरे यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले की, तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत आणि वाडी-वस्तीवरील शेतकऱ्याला त्याचा हक्क मिळालाच पाहिजे. जर प्रशासनाने टार्गेटचे कारण पुढे करून शेतकऱ्यांची अडवणूक थांबवली नाही, तर शिवसेनेच्या वतीने संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल असे दिलेल्या निवेदनात सांगितले .
शेतकरी किती दिवस वाट बघणार-- प्रत्येक गाव /वस्ती/ तांडा वाडीतील शेतकरी बांधवांना विहीर मिळाली पाहिजे, प्रत्येक हाताला काम आणि हक्काची विहीर मिळेपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्वस्थ बसणार नाही. हा फक्त इशारा नाही, तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पुकारलेले युद्ध असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिरूर कासार तालुका प्रमुख सोपान (काका ) मोरे /
अजिनाथ (भाऊ )खेडकर (उपजिल्हाप्रमुख, शिवसेना) यांनी संबंधित अधिकाऱ्याला दिलेल्या निवेदनात सांगितले .
Comments
Post a Comment